Thursday, 20 June 2019

पवार वार : पत्रकार हेमंत जोशी

पवार वार : पत्रकार हेमंत जोशी 

प्रात: शाखेची प्रार्थना आटोपताच गण्या देशपांडेने तडक पोराची घुश्यातच सोमलवार शाळा गाठली. रागाचे कारण देखील तसेच होते, सोमलवार शाळा संघाची नसूनही वरून अत्यंत नामवंत असूनही स्विमिंग आटोपल्यानंतर गण्याच्या मुलाचा टॉवेल वर्गातल्या कुठल्याशा मुलाने ढापला होता. वर्गात येताच तावातावाने गण्या पोराच्या क्लासटीचर ला म्हणाला, हेच का तुमच्या शाळेचे संस्कार...खुशाल चोऱ्या होताहेत, शाळेचे लक्ष नाही....अशाने पुढली पिढी कशी घडेल....? बाईंनी आधी गाण्याचे शांतपणे ऐकून घेतले मग विचारले, कोणत्या रंगाचा टॉवेल होता तुमच्या मुलाचा ? पांढऱ्या रंगाचा, गण्या म्हणाला. अहो, पांढऱ्या रंगाचे टॉवेल्स अनेकांचे असतात कसे ओळखायचे मी, बाई म्हणाल्या. त्यांचे वाक्य संपत नाहीच तोच गण्या त्यांना म्हणाला, अहो, त्याचा टॉवेल ओळखणे अगदी सोपे आहे, त्यावर ' इंडियन रेल्वे ' असे मोठ्या अक्षरात लिहिलेले आहे...

दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान, पद्धतीने वागणारे आम्ही जवळपास सारेच भारतीय, आपली खरकटी असतांना दुसऱ्याला स्वच्छ धुवून ये सांगणारे आम्ही, त्यामुळे वर वर चढणाऱ्या अप्रामाणिक भारतीयांचा ज्यावेळी प्रगतीचा आलेख उंचावत असतो त्याचवेळी त्याच्या अधोगतीच आलेख देखील नकळत झपाट्याने तयार होत असतो. वास्तविक शरद पवारांच्या हातात हात घेऊन एरवी प्रचंड खडूस असलेले नरेंद्र मोदी थेट बारामती दौरा करून आल्याचे तुम्हाला आठवत असेलच. म्हणजे पवारांना त्यांनी राजकीय गुरूच्या जागी ठेवून त्यांना आपलेसे करण्याची तयारी मोदी यांनी दाखवली होती..विशेष म्हणजे एरवी थेट भाजपा खासदाराने जरी मोदी यांना एखादे काम सांगितले तरीही काहीसे कधीकधी वेळकाढू धोरण राबवणारे मोदी त्या सुप्रिया सुळे यांना मात्र साक्षात लेक मानून तिने आणलेल्या कामांवर पटकन निर्णय घेऊन मोकळे व्हायचे पण जे पवार कधीही कोणाचे झाले नाहीत त्यांनी का म्हणून मोदी यांच्याशी म्हणाल तर मैत्रीची लॉयल्टी ठेवावी आणि येथेच पुन्हा एकवार शरद पवारांनी स्वतःचे एकवार मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. त्यांना लोकसभा निवडणूकी आधी अनेक सामान्य मतदारांना जे वाटायचे ते तसेच वाटले होते कि पुन्हा मोदी येणे मोदी पंतप्रधान होणे शक्य नाही याउलट मोदी आणि सोनिया वादाचा राजकीय फायदा आपल्याला उचलता येईल आणि तिसर्या आघाडीच्या कुबड्यांवर किंवा मोठ्या प्रमाणात खासदार निवडून आणून आपल्याला नक्की पंतप्रधान होणे सहज शक्य होईल...

www.vikrantjoshi.com

त्यातून लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान ज्या नेत्यांनी मोदी आणि भाजपाला नामोहरम केले त्यात शरद पवार सर्वाधिक आघाडीवर होते. पवारांचे चिन्ह घड्याळ, निकालानंतर त्यांचे खरेच बारा वाजले. आपण मोदी यांना धोका देऊन मोठी चूक केलेली आहे हे पवारांना कळून चुकलेले आहे पण मारलेला दगड एखाद्याच्या वर्मी लागल्यानंतर त्याने त्यानंतर का म्हणून तुम्हाला प्रेमाची झप्पी द्यावी, मोदी आणि भाजपा आता पवारांपासून कायमचे मनापासून दूर गेले आहेत. पवार यांनी जर मोदी यांना आपले मानले असते तर आज फार वेगळे चित्र बघायला मिळाले असते, आता ती वेळ निघून गेलेली आहे, पुन्हा एकवार सवयीप्रमाणे पवारांनी मोदी नामक मित्राला देखील ऐन मोक्याच्या वेळी धोका दिला, दगा दिला. पवार संपूर्ण देशात आणि या राज्यातही आता एकाकी पडले आहेत. येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत देखील त्यांच्या पक्षाचे चित्र फार पॉझेटिव्ह असेल असे निदान आज तरी दिसत नाही, पवारांच्या वृत्तीने पवारांचेच मोठे राजकीय नुकसान होत आलेले आहे...

ध्यानी मनी नसतांना एखाद्या रूपवतीने मागून पटकन यावे आणि एखाद्याच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेऊन त्यालासुखदधक्का द्यावा तसे राज्यमंत्री म्हणून अलीकडे शपथ घेतलेल्या परिणय रमेश फुके यांचे झाले आहे. परिणयवर जळफळाट करणारे उगाच कुजबुज करायचे कि फडणवीसांनी आपल्या या दोस्ताला आता दूर केले आहे, त्यांचे पूर्वीसारखे फारसे सलोख्याचे संबंध राहिलेले नाहीत पण ती केवळ एक अफवा ठरली. नागपुरात तसे देवेंद्र यांना अनेक मित्र अतिशय जवळचे त्या संदीप जोशी यांच्यासारखे, पण त्यांनी डान्स करायचा चान्स परिणय रमेश फुके यांना दिला. त्यांना थेट राज्यमंत्री केले. परिणय नाव एकदम रोमँटिक पण ते तसे फारसे नावाला शोभणारे नाहीत म्हणजे आजही जर परिणय यांना हाल्फ चड्डी सदरा घालून धरमपेठ शाळेत सोडले तर थेट शिक्षकांच्या देखील ते लक्षात येणार नाही कि चाळिशीतले परिणय वर्गात येऊन बसले आहेत. एखाद्या गुटगुटीत बाळासारखी त्यांची शरीरयष्टी पण माणूस लाई भारी...

मी जसा परिणय यांना ओळखतो तसा त्यांच्या बापाला देखील मी अतिशय जवळून बघितले आहे. रमेश फुके हे नागपुरातले मोठे शासकीय कंत्राटदार आणि जेव्हा डॉ. श्रीकांत जिचकार एकदम जोमात होते त्यादरम्यान ते डॉ. जिचकार यांचे जवळचे  विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जायचे, त्यामुळे रमेश फुके यांचा शासकीय कंत्राटदाराचा व्यवसाय देखील पटापट वाढत गेला. पुढे वयाच्या २६ व्य वर्षी परिणय हे अवघ्या २४ मतांनी अपक्ष नगरसेवक म्हणून पहिल्यांदा महापालिकेत निवडून गेले आणि त्यानंतर सतत आजतागायत देवेंद्र फडणवीस यांचे ' हनुमान ' म्हणून नागपुरात नावाजले, राज्यात गाजले. मैत्रीची परिणीती अशी झाली कि अलीकडे केवळ देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहातून परिणीती परिणय फुके यांना देखील भाजपातर्फे उमेदवारी देण्यात आली, सध्या त्या देखील नागपूर महापालिकेत नगरसेविका आहेत. सुदैवाने आता तर परिणय फुके यांच्याकडे  सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आली. परिणय यांना हे खाते तोंडपाठ आहे त्यांनी अवघ्या तीन साडेतीन महिन्यात या खात्यात वेगळे काहीतरी असे करवून दाखवावे कि राज्याला वाटावे बांधकाम खात्याला पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्यासारखा बाप माणूस मिळालेला आहे. बघूया, परिणय यांचे कौतुक करावे लागणार आहे कि त्यांनाही शाब्दिक हासडणे आमच्या नशिबी येणार आहे...

जे उद्धव ठाकरे यांना यावेळी अजिबात जमले नाही ते देवेंद्र फडणवीसांना अतिशय छान जमले आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल करतांना खऱ्या अर्थाने भाजपाने बाजी मारली आणि शिवसेनेने मोठे नुकसान करवून घेतले. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा फडणवीसांनी केलेला फायदा आणि इतरांचे ऐकून उद्धव ठाकरे यांनी सेनेचे करवून घेतलेले नुकसान त्यावर पुढे मी व्यापक नक्की लिहिणार आहे. लोकसभा निवडणुकीत नागपुरात बाहेरचे उमेदवार आघाडीचे नाना पटोले आणि त्यांच्या नागपुरातील मराठा कुणबी समाजाने खऱ्या अर्थाने गडकरी आणि थेट फडणवीस दोघांच्याही नाकात दम आणला, गडकरी हे देशात सर्वाधिक मतांधक्याने निवडून येतील असे जे सुरुवातीला वाटायचे ते गडकरी कुणबी मराठा समाजातील ऐक्यामुळे कसेबसे निवडणुकीत पास झाले आहेत. या समाजाचा एकत्रित असणायचा फायदा निदान येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीला मोठ्या प्रमाणात व्हावा त्याचसाठी फडणवीसांनी या समाजात त्या त्या भागात ज्या नेत्यांचा आमदारांचा समाजावर प्रभाव आणि प्रभुत्व आहे त्यांना विस्तार करतांना मंत्रिमंडळात स्थान देऊन राजकीय कौशल्याची जणू चुणूक दाखवली आहे. त्यांनी बुलढाणा अकोला भागातून डॉ. संजय कुटे, अमरावती भागातून डॉ. अनिल बोन्डे आणि नागपुरातून परिणय फुके यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन, येणाऱ्या विधानसभेची बेगमी आजच करून ठेवली आहे. वास्तविक डॉ. संजय कुटे अगदी सुरुवातीलाच मंत्री झाले असते पण फडणवीसांच्या एका लाडक्या पत्रकाराने संजय कुटे यांच्या ऐवजी पांडुरंग फुंडकर यांनाच मंत्रीपद देण्यात यावे असा सतत आग्रह धरल्याने पुढे कुटे यांचे राजकीय वाटोळे झाले आणि फुंडकर मात्र लगेचच मंत्री झाले. फुंडकर यांचे देहावसान झाले नसते तर कुटे निदान या पंचवार्षिक योजनेत नक्कीच मंत्री झाले नसते. जवळचा मित्र धोका देतो तेव्हा माणूस कोलमडून पडतो. असे म्हणतात, फुंडकर मंत्री कसे झाले हे कळल्यानंतर कुटे अनिल गावंडे नामक मित्राच्या खांद्यावर डोके ठेवून मुलगी सासरला जातांना बाप जसा 
ढसाढसा रडतो तसे म्हणे रडले होते. आता मात्र कुटे स्वतःवर जाम खुश आहेत....
तूर्त एवढेच :

आपला मराठी बिग बॉस २ : पत्रकार हेमंत जोशी

आपला मराठी बिग बॉस २ : पत्रकार हेमंत जोशी 
बिग बॉस या सुरु असलेल्या कलर वाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेत्री मैथिली जावकरवर अन्याय झाला तिच्यावरअन्याय केल्या गेला असे वारंवार जाणवते. जेवढे १५ दिवस ती बिग बॉस मध्ये सहभागी झाली तिच्यावर कॅमेरा एवढा कमी फोकस केल्या गेला कि ती या कार्यक्रमात सहभागी आहे किंवा नाही त्यादरम्यान दर्शकांना जाणवायला लागले होते, हा तिच्यावर सारासार अन्याय झाला वाटायला लागले आहे याठिकाणी समजा वैशाली माडे वर अन्याय झाला असता तर मनसेची कार्यकर्ती म्हणून लगेच राजगडावरून कलर ला धमकावले गेले असते किंवा त्या बिचुकलेवर अन्याय झाला असता तर थेट साताऱ्यातून उदयन राजे भोसले यांनी कलर वाहिनीच्या संबंधित प्रमुखांना भोसडले असते, आमच्या माणसांवर अन्याय होतोय...

तसे मात्र भाजपाकडून मैथिली जावकरच्या बाबतीत घडले नाही म्हणजे भाजपामधल्या अत्यंत प्रभावी विनोद तावडे किंवा आशिष शेलार यांनी कलर वाहिनीला साधा जाब देखील बिचारलेला नाही कि एकमेव मैथिली जावकर वर, आमच्या या प्रामाणिक कार्यकर्तीवर तुम्ही अन्याय का केलाय, तिला वाईल्ड कार्ड एंट्री तुम्ही द्यायलाच हवी, हे असे विविध वाहिन्यांवर राजकीय दबाव आणून सऱ्हास अनेक स्पर्धकांना पुढे केले जाते, पुढे नेले जाते जाते. आज तुम्हाला मी येथे मुद्दाम सांगू इच्छितो आहे जसे एखादया शाळेत लाडक्या विद्यार्थ्याला वेगळ्या फॅसिलिटीज असतात माझी माहिती अशी कि वाहिन्यांवरील स्पर्धांमध्ये रिऍलिटी शोज मध्ये असे अनेकदा, वारंवार घडत असते त्यामुळे सर्वसामान्य लागा नसलेल्यांवर त्यातून हमखास अन्याय होतो, केल्या जातो...

उद्या समजा मला हे समजले कि बिग बॉस मध्ये भाग घेणारे जे स्पर्धक, आम्हाला दररोज दिल्या जाणारे तुमचे मानधन नको फक्त आमचे तेवढे अस्तित्व कायम ठेवा, असे जर त्यातल्या काही स्पर्धकांनी स्वतःची फुकाची जगभर जाहिरात करवून घेण्या साठी सांगितले आणि कलर ने ते ऐकले तर मला त्यात अजिबात यापुढे आश्चर्य वाटणार नाही किंवा कदाचित असे घडलेले देखील असेल, घडत असेल. विशेष म्हणजे जेवढे महेश मांजरेकर मी जवळून ओळखतो त्या मांजरेकर यांचे वैशिष्ट्य असे कि ते त्यांच्या मित्रपरिवाराला कायम संधी देण्यात आघाडीवर असतात. त्यांचा बंद पडलेला मिफ्ता अवॉर्ड शो मी जवळून अनुभवला असल्याने, मांजरेकर नेमके कसे तेथे मी थेट जवळून बघितलेले आहेत, येथेही ते दिसले आहेच, तो कोण बाप्पा किंवा केळकर किंवा हीना पांचाळ इत्यादींकडे बघून आणि त्यांचे खास असलेले जर उद्या मोठ्या खुबीने शेवटपर्यंत टिकून ठेवण्यात आले तरी देखील त्यामुळे आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नसेल. महेश मांजरेकर यांचा हा मनमानी खाजगी शो असे बिग बॉस चे वर्णन करणे येथे अधिक सोयीस्कर वाटते...

मीडिया च्या विरुद्ध मीडिया सहसा जात नाही, व्हेस्टेड इंटरेस्ट मार खाल्ले तरच ते एकमेकांच्या विरोधात जाहीरपणे जातात ज्याप्रकारे गेल्या अनेक वर्षात दैनिक लोकमत त्या देशोन्नती, सकाळ, नागपूर पत्रिका इत्यादींशी पंगा घेऊन मोकळे झाले आहे त्यावरून सांगतो. पण येथे आमच्याबाबतीत असे अजिबात नसतांना आम्ही असे केवळ मूठभर त्या भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकार आहोत कि कोणत्याही प्रभावी असलेल्या मीडिया क्षेत्राची अजिबात पर्वा न करता ते जेथे जेथे चुकलेत, चुकतात, त्यांना तेथे तेथे ठोकून काढतो. कारण भानगडी करणाऱ्या मीडिया क्षेत्रातील मंडळींना वठणीवर आणण्याचे काम फक्त मीडिया करू शकते, इतरांनी तसा प्रयत्न जरी केला तरी त्यांना सारे एकत्र येऊन उध्वस्त करतील, आयुष्यातून उठवतील. यांच्याशी पंगा घ्यायचा म्हणजे सर पे कफन बांधके लिखना पडता है...
तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

आपला मराठी बिग बॉस : पत्रकार हेमंत जोशी

आपला मराठी बिग बॉस : पत्रकार हेमंत जोशी 

आयुष्यात नेहमी छान छान घडावे असे वाटत असेल तर आज ज्या पद्धतीने बहुतेक भारतीय वागताहेत ते तसे वागणे जरा सोडून बघा, आयुष्याकडे, विशेषतः इतरांकडे सतत निगेटिव्ह बघण्याने, प्रतिस्पर्ध्यांचे सतत वाईट कसे होईल या विचाराने आयुष्याकडे बघू नका अर्थात स्वतः मी हे फॉलो करतो,माझ्या कुटुंबात एखादया हिंदी मराठी मालिकेसारखे वातावरण तयार होणार नाही याची काळजी घेतो. इतरांकडे सकारात्मक नजरेतून बघण्याचे फायदे फार होतात. माझा एखादा मित्र किंवा नातेवाईक मी जवळून बघत असतो कि तो सतत डोक्यात निगेटिव्ह विचार ठेवून जगतो, माझ्या असे लक्षात येते कि त्यातून त्याच्या वाटेला आलेले सुख तो या डावपेच खेळण्याच्या वृत्तीतून उपभोगू शकत नाही, सतत चांगले विचार, तुमचे आयुष्य आपोआप सुंदर बनत जाईल मग ओढवलेल्या एखाद्या संकटात किंवा दुख्खात देखील जगण्याचे बळ तुमच्या शरीरात नक्की निर्माण होईल.हे मी तुम्हाला येथे यासाठी सांगतोय कि कलर वाहिनीवर सध्या सुरु असलेल्या बिग बॉस या कार्यक्रमात जो तो एकमेकांशी डावपेच लढवून खेळून हि स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतोय, सकारात्मक पद्धतीने माणूस यशस्वी होऊच शकत नाही हा नेहमीचाभारतीय घराघरातला हलकट विचार जणू त्यात यशाचे गमक म्हणून दाखवल्या जातोय, जे अत्यंत हिडीस वाटते...

अलीकडे वर्षा दोन वर्षात मराठीत देखील बिग बॉस चे फॅड आले आहे, सध्या कलर वाहिनीवर आपण हा कार्यक्रम बघतोय. मी सहसा असले टुकार कार्यक्रम बघत नाही पण आधीच्या मराठी बिग बॉस मध्ये आमचे मित्र पत्रकार अनिल थत्ते होते आणि यावेळी माझी जवळची मैत्रीण अभिनेत्री मैथिली जावकर असल्याने मराठी बिग बॉसबघण्याचा मोह आवरला नाही. वाईट वाटले ते गायिका वैशाली माडे बद्दल. वास्तविक ती मोठ्या उंचीची मराठी आणि हिंदीतली व्यस्त आघाडीची गायिका. तिने बिग बॉस या मॅनेज केल्या जाणार्या कार्यक्रमात वास्तविक सहभागी व्हायला नको होते त्यातून तिने स्वतःची किंमत कमी करून घेतली. सुरेख पुणेकर यात सहभागी झाल्या आहेत, त्यांचे आणि दिवंगत वसंत डावखरे यांचे हटके संबंध असतांना एकदा अचानक त्या दोघांची आणि माझी कुठेतरी गाठ पडली मग डावखरे यांनीच नाईलाज झाल्याने माझी सुरेखापुणेकर यांच्याशी ओळख करून दिली होती...


www.vikrantjoshi.com

आधीच्या बिग बॉस मधली विनर अभिनेत्री मेधा धाडे आणि यावेळची स्पर्धक गायिका वैशाली माडे यांचे वैवाहिक आयुष्य तसे खूपच सेम सेम आहे म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर शारीरिक अत्याचार बळजबरी केली त्याच तरुणांशी पुढे जाऊन त्यांना लग्न करावे लागले,विशेष म्हणजे त्यांना त्या प्रकारच्या नवऱ्यापासून दोघींनाही एक एक मुलगी आहे. पण या दोघांच्या त्या विवाहाकडे आणि मुलींना जन्म देण्याच्या एकंदर प्रोसेस कडे बघून हेच वाटते कि आपल्या या महाराष्ट्रात देखील बिहार सारखेच घडत असते फक्त वैशाली माडे आणि मेधा धाडे या दोघी भोवती ग्लॅमर असल्याने आपल्याला त्यांचे आयुष्य कळले पण अशा अनेक मेधा किंवा वैशाली या राज्यात असाव्यात ज्या आयुष्याच्या ऐन तरुण टप्प्यावर पुरुषांच्या वासनेला बळी पडलेल्या असतील, दुर्दैवाने ते बाहेर येत नाही पण या अशा तरुण स्त्रियांचे आयुष्य अंगावर शहारे आणणारे असते. अर्थात मेधा आणि वैशाली दोघींनीही पुढे स्वतःला सावरले आणि खंबीर मनाने कठीण परिस्थितीवर मात करीत त्या दोघीही प्रसिद्धीच्या झोतात आल्या. मेधा घाडगे यांनी सुपरस्टार नावाचा सिनेमा काढल्याचे मला आठवते ज्यात हिरो सिद्धार्थ जाधव होता, वास्तविक त्या सिनेमाशी संबधित एक व्यक्ती मला मेधा यांचे दुसरे पती असावेत वाटायचे पण बिग बॉस मध्ये तिसराच कोणीतरी समोर आला. जाऊ द्या चित्रपटसृष्टीत हे अतिशय कॉमन आहे, 
म्हणून तिकडे लिखाणासाठी वळावेसे वाटले नाही...

दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे कलर च्या या बिग बॉस कार्यक्रमात ज्यांना सहभागी करून घेतल्या जाते त्यांचा इतिहास फसवाफसवीचा आहे का हे कलर वाहिनी किंवा दस्तुरखुद्द महेश मांजरेकर इत्यादींनी आवर्जून तपासले पाहिजे पण ते तसे होतांना घडतांना तेथे आढळत नाही, आढळले नाही त्यामुळे लोकांशी गोड गोड बोलून त्यांना आर्थिक फसविणारे मागल्या वेळी आणि यावेळीही सहभागी झालेले काही महाभाग, काही स्पर्धक मी त्यात बघतो आहे, बघितले आहेत. विशेष म्हणजे यावेळच्या बिग बॉस मध्ये एक स्पर्धक तर असा आहे कि लोकांना फसवून लुबाडून चरितार्थ चालविणे हेच त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे. विशेष म्हणजे नेमके यावेळी या अशा चीटर पुरुष स्पर्धकाला यशस्वी होतांना ते दाखवताहेत, बिग बॉस मधला हा भामटा आणि व्यसनांच्या अतिशय आहारी गेलेला स्पर्धक लोकांना,मुलींना जाळ्यात ओढून ' एखाद्या पुणेरी भामट्यासारखा ' नेमका कोण आहे हे लोकांनी,मुलींनी ओळखावे आणि त्याच्या या ग्लॅमर ला भुलून त्याने अमुक एखादी योजना तुमच्यासमोर भविष्यात मांडलीच तर त्याच्या फसविण्याला कृपया बळी पडू नये. तो जे बिग बॉस मध्ये स्वतःचे मोठेपण रंगवून कधी एखाद्या मुलीला जाळ्यात अडकवितोय किंवा स्पर्धेत हिरो म्हणून जिंकण्याचा प्रयत्न करतोय, गावभराची माहिती ठेवणार्या महेश मांजरेकर यांनी हेही बघितले पाहिजे. समाजाने ओवाळून टाकलेल्या मंडळींना मांजरेकर आणि कलर वाहिनीने उगाच मोठेपण देऊ नये, प्रवेश देखील देऊ नये...
पुढल्या भागात : तूर्त एवढेच.

मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल : पत्रकार हेमंत जोशी

मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल : पत्रकार हेमंत जोशी 
होणार होणार असे गेली चार वर्षे मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाचे चालले होते पण त्याचे सतत चोरी चोरी चुपके चुपके मधल्या राणी मुखर्जी सारखे सुरु होते. त्या सिनेमात राणीला बाळ होणार असेच साऱ्यांना दिसत असते पण तसे नसते तिने पोटाला उशी बांधलेली असते. मंत्रिमंडळ आणि विस्तारविषयी सतत साडेतीन चार वर्षे मुख्यमंत्र्यांनी हे असेच करून ठेवले होते,म्हणजे मीडिया बातम्या सोडून मोकळे व्हायचे कि अमुक दिवशी मंत्रिमंडळ बदल तसेच विस्ताराचा मुहूर्त ठरलेला आहे पण ते प्रत्यक्षात कधीही घडले नाही, राणी मुखर्जी सारखे सतत घडले मीडिया कायम तोंडावर पडली...

पण एकदाचे गंगेत घोडे न्हाले. मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलही झाला पण नव्याने झालेल्या मंत्र्यांचे औट घटकेच्या सवाष्णीसारखे झाले आहे म्हणजे काही तरुणींचे लग्न होत नाहीत तोच त्या विधवा होतात पण त्याकाळात त्यांच्या हाती जे पडते तेवढ्या आठवणींवर त्यांना जगायचे असते, काहींचा फक्त हनिमून साजरा होतो काहींना दिवस जातात आणि लगेच नवरा मारतो. नव्याने झालेले मंत्री, त्यांना तर माहित आहे कि पुढल्या काही हा दिवसात आम्हाला वैधव्य येणार आहे त्यामुळे त्यांच्यातल्या बहुतेकांची भूमिका जेवढा सरकारी तिजोरीवर, जनतेच्या पैशांवर अधिक दरोडा घालता येईल डल्ला मारल्या जाईल तोच आपला प्रॉफिट शिवाय कायम कुमारी म्हणून मेल्यापेक्षा एखाद्याच्या नावाने विधवा म्हणून तर जगता येईल तसे ' माजी मंत्री ' हि मरेपर्यंत कायम बिरुदावली तर चिटकून राहील यातच ते समाधान मानणार आहेत...

www.vikrantjoshi.com

जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासारखेच बहुतेक मंत्री किंवा राज्यमंत्री अनुभवातून दरोडे टाकण्यात वाकबगार आहेत त्यामुळे कमी वेळात अधिक फायदा कसा उचलायचा त्यांना ते नेमके माहित आहे. खातेवाटप जाहीर होताच त्यादृष्टीने त्यातले अनुभवी मंत्री राज्यमंत्री त्यादृष्टीने कामाला देखील लागले आहेत. असा एकही फडणवीस मंत्रिमंडळातला आजी माजी मंत्री नाही ज्यांचे इत्यंभूत पुरावे माझ्याकडे नव्हते किंवा नाहीत मग मी ते उघड का केलेले नाहीत हा तुमचा सवाल ऐकण्याआधी मला माझी एक चूक कबूल करायची आहे ती अशी कि अनेक वर्षांनी या राज्याला चांगले मुख्यमंत्री लागोपाठ दोन वेळा मिळाले, श्री पृथ्वीराज चव्हाण आणि आताचे देवेंद्र फडणवीस. कोणत्याही मंत्र्यांचे पुरावे बाहेर काढले तर त्यात अधिक बदनामी देवेंद्र फडणवीसांची होते. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे आधीचे आघाडीतले सारेच मंत्री हे दरोडेखोर असायचे, युतीचे दोन तीन मंत्री दरोडेखोर होते आहेत बाकीचे बहुतेक पाकीटमार पद्धतीचे वागणारे असल्याने त्यांना आताच पुरावे मांडून शब्दांतून झोडपून काढणे आवश्यक वाटले नाही. तशी गरज वाटली नाही...

आता फार महत्वाचे सांगतो, मंत्री किंवा अधिकारी मग तो कितीही स्वतःला ताकदवान समजत असेल पण जेव्हाकेव्हा यांच्यातले काही अति करतात आई शपथ सांगतो त्यांच्या केबिन मध्ये जाऊन मी त्यांची आईबहीण घेतो, त्यांना सांगतो, खबरदार हे असे वागून फडणवीस सरकारला अडचणीत आणले तर. एकदा प्रयोग करून पहा, चारित्र्य घालवून बसलेला माणूस जगातला सर्वाधिक गांडू माणूस असतो. अर्थात त्यांना ते माझे मनापासूनचे कळकळीचे सांगणे पटते, त्यातले काही सावध झाले, काहींनी मनावर फारसे घेतलेले नाही, हरकत नाही, फारशी वेळ गेलेली नाही. फडणवीसांनी एक फार चांगले केले त्यांनी माझ्या वडिलांच्या विद्यार्थ्याला माझ्या गावातल्या आमदाराला माझ्या मित्राला, डॉ. संजय कुटे या त्यांच्याही मित्राला पूर्णवेळ मंत्री केले पण आमच्या जळगाव जामोद या बुलढाणा जिल्ह्यातील गावाला ज्या खात्याचे दूरदूरपर्यंत काम पडणार नाही अशा कामगार खात्याचे त्यांना मंत्री केले...

फडणवीसांनी सध्या मी ज्या गावात राहतो त्या गावातल्या आमदाराला देखील मंत्री केले. आमच्या परिसराचे आमदार भाजपातले शरद पवार ( चांगल्या अर्थाने ) आशिष शेलार आणि संजय कुटे या दोघांनाही एकाचवेळी मंत्री केले पण त्यांना मंत्री करायचेच होते तर फार आधी संधी दिली असती खूप वर्षे माथ्याला वैधव्य न आलेल्या स्त्रीसारखे ते मनाला वाटले असते पण हे औट घटकेचे सौभाग्य या दोघांच्याही वाटेला निदान सध्या तरी आलेले आहे, बघूया येणाऱ्या विधान सभा निवडणुकीनंतर नेमके काय घडते ते म्हणजे सत्ता युतीची आली तर हे दोघेही पुन्हा मंत्री म्हणून शपथ घेतील तेवढे नक्की आहे. बापरे, समजा भाजपाचे अतुल भातखळकर मंत्री झाले असते तर, फार काहीं घडले नसते फक्त आजूबाजूला सतत शिवराळ आणि अश्लील शब्द ऐकायला मिळाले असते...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Wednesday, 19 June 2019

भामटे, पटेल आणि पवार : पत्रकार हेमंत जोशी

भामटे, पटेल आणि पवार : पत्रकार हेमंत जोशी 
एखाद्यावर तेही लिखाणातून राग व्यक्त करतांना फार खालच्या पातळीवरजाऊन मी सहसा शब्द वापरत नाही पण या आधीच्या लिखाणात माजीकेंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी लिहितांना त्यांची ' गांड फाटली 'आहे हा शब्दप्रयोग अनेकांनाच्या भुवया उंचावणारा ठरला पण राजकीय पत्रकारितेत वावरतांना काही माणसे अतिशय मस्तकात जातात त्यातले हे महाशय, ज्यांना मी अतिशय जवळून राजकीयदृष्ट्या ओळखतो त्यामुळे त्यांचे नाव जरी नजरेसमोर आले तरी आपली सटकते. पण हे असे क्वचित घडते. अमुक एखाद्याविषयी राग किंवा लोभ त्या त्या लिखाणापुरते संबंधित असतात, कधीही कायम टिकणारे नसतात....

अलीकडे विमानतळावर माझे आणि अजित पवार यांचे तब्बल दहा वर्षानंतर तोंडावर तोंड पडले, बोलणे झाले पण त्याआधी कधीही विनाकारण त्यांचे कौतुक केले नाही किंवा विनाकारण त्यांच्यावर घसरलो नाही. जेथे जेथे दादा योग्य वाटले मनापासून कौतुक केले आणि जेथे जेथे ते अयोग्य वागले वाटले तेथे तेथे ते अगदी सत्तेत आक्रमक नेते असतांनाही त्यांना शब्दांतून लिखाणातून ठोकून काढले. काही नेत्यांनी काही अधिकाऱ्यांनी हे राज्य बुडविण्यात फार मोठी भूमिका बजावलेली असते अशावेळी मग मनापासून सटकते, पुरावे हाती पडले रे पडले कि मग माझे शाब्दिक झोडपणे सुरु होते त्यातून भले भले पत्रकार देखील अशावेळी सुटत नाहीत...

प्रफुल्ल पटेल यांनी ते केंद्रात मंत्री असतांना थेट सोनिया गांधी आणि शरद पवार या दोघांनाही एकाचवेळी उल्लू बनवून मोठा आर्थिक गैरफायदा करवून घेतला. ईडी सारख्या शासकीय यंत्रणा तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या कधी चौकशा करतील का, नाय नो नेव्हर. या प्रफुल्ल पटेलांनी घोळ घातले म्हणून ईडी त्यांच्या मागे लागली तोवर खरे तर फार उशीर होऊन गेला आहे पण जे काय ईडी च्या हाती लागेल तेही नसेल थोडके त्यामुळे बघूया पुढे पुढे काय होते ते. मी अनेकदा लिखाणातून पवारांना फार पूर्वी सांगितले, वारंवार सांगितले कि प्रफुल्ल पटेल आमच्या विदर्भात तुम्ही वाढविलेल्या राष्ट्रवादी पक्षाचे वाटोळे करतो आहे, एक दिवस असा येईल कि याच  प्रफुल पटेलांमुळे तुमची राष्ट्रवादी माझ्या विदर्भात औषधाला देखील सापडणार नाही, नेमके आज तेच घडले....

राजकारणातून निवृत्त होऊ पण प्रफुल पटेल यांच्या लबाड नेतृत्वाखाली अजिबात काम करणे नको असे दत्ता मेघे गिरीश गांधी संजय खोडके अजय पाटलांसारख्या विदर्भात राष्ट्रवादी पक्षात एकेकाळी भरीव कार्य करणाऱ्या नेत्यांना वाटले आणि त्यांनी थेट राष्ट्रवादीतून बाहेर पडणे पसंत केले. ज्यांनी तसे केले नाही त्यांचा अनिल देशमुख झाला, प्रफुल्ल पटेलांची हुजरेगिरी करणाऱ्या अनिल देशमुखांनी भलेही पैसे अमाप मिळविले असतील पण केवळ बख्खळ पैसा असणे म्हणजे सुखी आयुष्य जगणे नसते त्यांच्या ते लक्षात आले तोवर उशीर झाला होता, अनिल देशमुख तसा प्रचंड राजकीय ताकदीचा नेता पण काही काळासाठी नोव्हेअर झाला, आता अनिलबाबू राजकारणात पुन्हा एसट्याब्लिश होण्यासाठी झगडताहेत, प्रयत्न करताहेत. पण मी जे बेंबीच्या देठापासून शरद पवारांना सांगत होतो कि तुमच्या या अशा बेधुंद वागण्याने विदर्भातली तुम्ही उभी केलेली नेत्यांची फळी आणि राष्ट्रवादी रसातळाला जाईल, माझे ते सांगणे पवारांना आज पटले असेल, आता विदर्भात राष्ट्रवादी अस्ताला गेलेल्या माकडांच्या काही प्रजातींसारखी शोधावी लागते कारण पवारांनी पटेलांसारख्या मधुर फळांचा नाश करणाऱ्या माकडांना जवळ केले आणि मेघेसारखे सहकारी अपमानित केले...
क्रमश :
 पत्रकार हेमंत जोशी 

भाकड गायीला वासरू : पत्रकार हेमंत जोशी

भाकड गायीला वासरू : पत्रकार हेमंत जोशी 
योग्य वयात लग्न उरकल्यानंतर वैवाहिक जीवन लुटण्याचा आनंद मिळतो. मासिक पाळी गेल्यानंतर हनिमून साजरा करणे म्हणजे बत्तीशी पडलेल्या जक्खड म्हाताऱ्याला चुंबन घेण्याची संधी चालून आल्यासारखे. योग्य वेळी योग्य संधी चालून आली तर आयुष्याचे सोने झाल्यासारखे वाटते पण नको त्यावेळी चालून आलेली सुवर्ण संधी हि अंथरुणावर शेवटच्या घटका मोजणाऱ्या व्यक्तीला तरुण नर्सने लग्नाचे अमिश दाखवल्यासारखे असते. फडणवीसांनी विधान सभा निवडणुकीला केवळ ८०-९० दिवस शिल्लक असतांना मंत्रिमंडळ विस्तार आणि बदलाचे जे घोडे दामटले त्यावरून हे असे सारे आठवले....

कोणत्याही पंचवार्षिक योजनेत अलीकडे नव्याने अस्तित्वात आलेल्या मंत्री मंडळाचा विस्तार लवकरच केल्या जाईल असे हमखास सांगितले जाते आणि आज उद्या करता करता नाही म्हणायला शेवटच्या वर्षात तरी मंत्रिमंडळ बदल आणि विस्तार हमखास केल्या जातो. असा विस्तार आणि बदल वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनीही करणे अति अति आवश्यक होते, काही नालायक मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना डच्चू देऊन काही लायक आमदारांना संधी देणे त्यांचे ते महत्वाचे असे काम होते पण यात फडणवीसांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले असे नाही त्यांना त्यांच्या विरोधकांनी आणि शिवसेनेने देखील मोठा मानसिक त्रास दिला त्यामुळे खरे तर मंत्रिमंडळ विस्तार आणि बदल रखडला...

तेच ते चेहरे कायम मंत्रिमंडळात त्यामुळे या राज्यातली आघाडी म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस रसातळाला गेली. पवारांचे आजपर्यंत अनेकदा फिनिक्स पक्ष्यासारखे घडले म्हणजे अनेकदा वाटायचे कि पवार आता राजकारणातून संपले किंवा त्यांच्या आयुष्यातून उठले पण लोकांचे साऱ्यांचे अंदाज चुकीचे ठरायचे आणि शरद पवार पुन्हा नव्या दमाने नव्या जोमाने सत्तेत भरारी आघाडी घ्यायचे. यावेळीही पवार तसे राज्याच्या आणि देशाच्याही राजकारणातून संपले आहेत बाजूला पडले आहेत त्यांचे महत्व जवळपास संपुष्टात आले आहे पण पवार पुन्हा एकदा फिनिक्स पक्षासारखी  भरारी घेऊन नव्याने जोमाने सत्तेत येतील का तर त्यावर माझं उत्तर ' नाही ' असे आहे कारण दरवेळी पवारांना जी भरारी घ्यावी लगे ती त्यांच्याच विचारांच्या नेत्यांमधून घ्यावी लागे, यावेळी तसे अजिबात नाही कारण त्यावेळेचे त्यांचे राजकीय विरोधक अजिबात लेचेपेचे नाहीत....

जे या राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे झाले ते तसे यापुढे शिवसेना आणि भाजपाचे होऊ नये असे जर या राज्याच्या मोदींना म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर यापुढे त्यांनी योग्य वेळी भाकरी परतवणे आवश्यक आहे म्हणजे त्यांचा या राज्याचा नेता म्हणून त्यांच्या युतीमध्ये बऱ्यापैकी वचक असेल, वचक बसेल. मंत्रिमंडळात बदल आणि विस्तार न करणे हि त्यांच्या हातून घडलेली मोठी चूक आहे आणि या चुकीचे खापर उद्धव ठाकरे यांच्यावर देखील फोडणे तेवढेच आवश्यक आहे कारण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच एवढा विलंब झाला आहे हेही नाकारून चालणार नाही. एक मात्र बरे झाले मोदी पंतप्रधान पदी विराजमान झाल्यानंतर लगेचच लबाड प्रफुल पटेल यांची ईडी ने चौकशी सुरु केली आहे. गॉड गॉड बोलून माझे सारे पाप खपून जाते हा जो हलकट प्रफुल्ल पटेल यांना अति आत्मविश्वास होता, आम्ही तुझे बाप आहोत हे मात्र मोदी यांनी दाखवून दिल्याने पटेलांची यावेळी बऱ्यापैकी गांड फाटली आहे. पटेलांना अतिशय जवळचा असलेला एक सहकारी मला म्हणाला, एवढे घाबरलेले प्रफुल्ल पटेल मी आजवर कधीही बघितलेले नव्हते, पण त्यांचे सारे पैसे परदेशात गुंतविल्या गेले असल्याने प्रफुल्ल फार अडचणीत येतील असे वाटत नाही, असेही तो बोलण्याच्या ओघात म्हणाला...
क्रमश :

पत्रकार हेमंत जोशी 

Tuesday, 11 June 2019

अमेरिकन्स आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी


अमेरिकन्स आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी 
जे जे म्हणून चांगले आहे पाश्चिमात्यांचे अनुकरण करणे वावगे नाही पण जे जे आपले सर्वोत्कृष्ट आहे ते ते सोडून त्यांचे वाईट तेवढे घेणे नक्की चुकीचे. त्यांना देखील हिंदूंचे जे चांगले आहे ते उशिरा कळले यावेळी मला ते अमेरिकेत फार मोठ्या प्रमाणावर जाणवले. योगासने आणि भारतीय शाकाहार याकडे अमेरिकन्स झुकलेले दिसले. जिकडे नजर टाकावी तिकडे योगासनांचा प्रभाव, उर भरून आले. बाबा रामदेव आणि नरेंद्र मोदी या दोघांच्या प्रभावाखाली अमेरिकन्स झुकल्याचे त्यांच्या बोलण्यातून तसे जाणवले. मी तर नेहमीच सांगत आलोय, लबाड भामट्या लुटारू बुवा बाबांना डोक्यावर घेतल्यापेक्षा जणू आधुनिक परमेश्वरी अवतार रामदेव बाबा केव्हाही या देशाचे, आपले भले करणारा, अशांना पुजण्यास किंवा त्यांचे अनुकरण केव्हाही फायद्याचे ठरणारे....

न्यू जर्सीला एका भारतीय मित्राकडे जेवायला गेलो. त्याचा स्वतःचा उत्तम व्यवसाय, वास्तविक एकुलत्या एक मुलाने तो सांभाळावा त्या दाम्पत्याची इच्छा पण अमेरिकेत वाढलेली मुले स्वतंत्र विचारांची असतात. मुलगा ऐकायला तयार नाही, तो फुटकळ नोकरी करतो, चाळिशीला आलाय पण लग्न करायला तयार नाही, गेल्या तीन चार वर्षांपासून गोऱ्या मैत्रिणीसंगे लग्न न करता घरातच तळ ठोकून आहे. आमचे छान जमले पटले तर दोन तीन वर्षांनी लग्न करू, मूल तर त्या दोघांनाही नको आहे, दोघेही ड्रग्स च्या अमलाखाली, अनेक घरातून हे असेच बेधुंद वागणे, मुलाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता सतत जाणवत होती. हेच आता आपल्याकडे सर्हास घडायला लागलेले आहे. ज्यांच्या घरी काळा हरामाचा पैसा मोठ्या प्रमाणावर येतो आहे असे एकही कुटुंब नाही जेथे मुले आणि मायबाप देखील संस्कारांना धरून आहेत...

मुले अतिशय खुबीने आईवडिलांच्या वाईट सवयी आत्मसात करीत असतात. मायबापांना वाटते कि आपले चोरून व्यसनाधीन होणे मुलांच्या लक्षात येत नाही पण हि पिढी अनेक पटींनी चतुर हुशार आहे, काही वर्षांनी अशा संस्कारात वाढलेली मुले बिघडलेल्या माय बापाच्या कितीतरी पटीने पुढे निघून जातात म्हणून पाश्चिमात्यांचे पेज थ्री अनुकरण हि आता आपल्या समाजाला लागलेली मोठी कीड आहे. मी तर आगाऊपणाने असे म्हणेन कि फडणवीसांनी जसे शाळेतून मराठी सक्तीचे केले तसे त्यांनी संघशाखेसारखे प्रत्येक शाळेतून असे काहीतरी घडवून आणावे जेणेकरून संघ शाखेवर केल्या जाणारे उत्तमोत्तम हिंदू संस्कार मुलांच्या, शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर होतील, केल्या जातील. इतर धर्मात देखील उत्तम कसे वागावे सांगितले आहेच पण कुराणातले अत्युत्तम विचार बाजूला ठेवून नको ते हिंसक पाकिस्थानी वागणे काही मुसलमानांच्या डोक्यात शिरते तेव्हा मात्र फार वाईट वाटते. मला खात्री आहे जसे हिंदू नसलेल्यांनी देखील म्हणजे थेट काही मुस्लिमांनी देखील जसे योगासने गरजेचे मानले तसे संघ संस्कार देखील त्यांच्याही मुलांवर व्हावेत असे त्यांनाही एक दिवस नक्की वाटेल...
www.vikrantjoshi.com
अलीकडे शरद पवारांनी संघाचे केलेले समर्थन, बहुतेकांनी ते मोठ्या थट्टेने घेतले जे नक्की रुचण्यासारखे नव्हते. विशेषतः पवारांच्या त्या वाक्यांवर संघ आणि भाजपा समर्थकांनीच अधिक तीव्र खालच्या पातळीवर येऊन थट्टा केली म्हणजे पवारांचे कौतुक स्वागत करायचे सोडून, आता कशी जिरली, पद्धतीने तोंडे वाकडी करून ज्या मंडळींनी पवारांवर तोंडसुख घेतले ते नालायक आहेत होते म्हणणे अधिक योग्य ठरेल. शेवटी मोठ्या प्रमाणावर आलेला काळा पैसा त्यातून घडणारे घडलेले दुष्परिणाम, पवारांनी स्वतः त्यांच्या कदाचित घराण्यात किंवा काँग्रेस संस्कृतीत वाढलेल्यांच्या खानदानात जवळून अनुभवले बघितले म्हणून त्यांनाही हे कुठेतरी वाटले कि उत्तम हिंदू संस्कारापासून दूर गेले तर जे घडते ते नक्की वाईट असते. आणखी एक अतिशय महत्वाचे सांगतो कि संघात किंवा संघाशी संबंधित क्षेत्रात पक्षात काम करणारे जर मुंडे महाजन पद्धतीने वागत गेलेत तर केवळ उशाशी संघ संस्कृती ठेवून भागत नसते, विचार आचरणातही आणावे लागतात....
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Saturday, 8 June 2019

संघ आणि शरद पवार : पत्रकार हेमंत जोशीसंघ आणि शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी 
भाजपाला मतदान करणाऱ्या अनेक मतदारांचे खासदार पत्रकार कुमार केतकर यांच्यासारखे आहे अर्थात प्राण्यांचेही तसेच असते म्हणजे लग्न न करता एकत्र राहण्यासारखे. प्रत्येक संघ स्वयंसेवक हा भाजपाचा कार्यकर्ता आणि मतदारही असतो पण भाजपाचा कार्यकर्ता किंबहुना नेते मंत्री देखील संघ स्वयंसेवक असावेत असे आवश्यक नाही, नसते. सक्तीही नसते. त्यामुळे या देशात, केंद्रात किंवा अन्यत्र राज्यात जेथे जेथे भाजपाची सत्ता आली त्यावरून उठसुठ संघाला जे क्रेडिट देणे सुरु आहे ते काही अंशी योग्य नाही त्यामुळे कधीही संघाशी संबंध न आलेल्या पण भाजपाला मतदान करणाऱ्या मतदाराला, भाजपाचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नक्की वाईट वाटेल...

पण भाजपामध्ये काम करणाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संघाचे विचार नक्की समजावून घ्यावेत त्यामुळे भाजपामध्ये अशांना काम करणे कार्यरत राहणे खूप सोपे जाऊ शकते. हे नक्की आहे कि भाजपा किंवा आधीचा जनसंघ किंवा अन्य कितीतरी संघटना केवळ संघाच्या मुशीतूनच तयार झाल्या आहेत, जन्माला आले आहेत पण संघाच्या अन्य कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्यांनी संघात स्वयंसवक म्हणून काम करायलाच हवे असे अजिबात नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये कार्यरत असलेले असणारे कितीतरी सदस्य आहेत ज्यांनी संघाचे कधी साधे तोंड बघितलेले नाही, नसते. त्यामुळे आजकाल विशेषतः मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर संघावर मीडिया, सोशल मीडियावरून जे वाट्टेल ते लिहिणे सुरु आहे, ते अनेकदा चुकीचे वाटते. अत्यंत महत्वाचे म्हणजे आधी संघात नियमित जाणारे पण काळाच्या ओघात भाजपामध्ये पूर्णवेळ गुंतलेले असे कितीतरी आहेत कि ज्यांचा पुढे पुढे संघाशी संबंध कमी होत गेलेला आहे...

www.vikrantjoshi.com

एक मात्र नक्की आहे कि संघाने अटलजींसारखे या देशाला दिलेले किमती हिरे त्यांची किंमत न मोजता येणारी. देशाचे राष्ट्रपती असोत कि पंतप्रधान किंवा सुमित्रा महाजन, गृहमंत्री, उपराष्ट्रपती किंवा देशातले १८ मुख्यमंत्री २९ राज्यपाल एकेकाळी संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केलेले थोडक्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघात त्यागाने जगलेल्यांना त्यांच्या कष्टाचे आणि निष्ठेचे नक्की फळ मिळालेले आहे पण संघ त्यासाठी आधी समजावून घ्यावा लागतो त्याचे इतर काही बाजारू राजकीय पक्षांसारखे नाही कि जा संघात आणि घ्या सत्ता हातात, संघाच्या कडक शिस्तीत तयार झाल्यानंतरच काहीतरी पदरात पडण्याची तेही शक्यता असते. येथे साऱ्याच स्वयंसेवकांना सारे काही मिळते असे अजिबात नाही, एक मात्र नक्की, देशसेवा करण्याचे शंभर टक्के समाधान मात्र मिळते...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे हिंदूंच्या उत्तमोत्तम संस्कारांची सुविचारांची संघटना. गाव तेथे गुंड तसे संघातही काही वाईट विचारांचे स्वयंसेवक घुसलेले दिसतात पण या देशाचे फार वाईट व्हावे असे त्यांनाही वाटत नसल्याने असे सडके आंबे संघाला देखील खपवून घ्यावे लागतात. संघ नेमका कसा हे शरद पवारांसहित आता सर्वांना समजावून घ्यावासा वाटतो यातच संघाचे आणि संघातल्या अनेकांच्या आजवरच्या बलिदानाचे यश दडलेले आहे. शरद पवार यांनी त्यांचे मत उघड व्यक्त केले इतरांना तसे वाटते पण बोलण्याची हिम्मत होत नाही. त्यामुळे शरद पवारांच्या वक्तव्यावर जी उघड टीका केली जाते आहे, त्यांची खिल्ली उडविली जाते आहे ते अतिशय लाजिरवाणे आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटातून जसे त्यातले खलनायक अगदी शेवटी आपली चूक सर्वासमोर मान्य करतात ते तसे शरद पवारांच्या बाबतीत घडले समजून पुढे जावे उगाच त्यांना हिणवू नये. येथे शरद पवार देखील खलनायक आहेत असा कृपया अर्थ काढू नये...

कुठेतरी वाचलेला एक चुटका खास तुमच्यासाठी : 
सत्यनारायणाच्या आरतीचे तबक माझ्यासमोर आले आणि हळूच मी खिशातली दहा रुपयांची फाटकी नोट तबकात टाकून त्यातले नऊ रुपये काढून घेतले. फाटकी नोट खपली वरून नऊ रुपये काढून घेतल्याच्या आनंदात मी पटकन मागे वळलो. मागे वळून बघतो तर काय, शेजारच्या काकूंनी माझ्या हाती दोन हजाराची नोट दिली. मी लगेच ती नोट तबकात टाकली पण माझीच मला लाज वाटली कि काकूंनी तब्बल दोन हजार रुपये टाकायला दिले आणि मी केवढा हलकट, फाटकी नोट टाकून थेट देवाला फसविले...
दरवाजा बाहेर पडलो नि शूज घालायला लागलो तर काय त्या काकू देखील पुन्हा शेजारीच आल्या चपला घालायला. रागावून मला म्हणतात कशा, पैशांची किंमत ठेवा रे, समजा तुझ्या खिशातून पडलेल्या दोन हजाराच्या त्या नोटेकडे माझे लक्ष गेले नसते तर...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य २ : पत्रकार हेमंत जोशीभ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य २ : पत्रकार हेमंत जोशी 
महाराष्ट्रात वाममार्गाने अलिकडल्या ३० वर्षात ज्यांनी अमापसमाप संपत्ती जमा केली असे एकही कुटुंब नाही ज्यांच्या घरी पुढली पिढी आणि ते स्वतः सुखा समाधानाने आयुष्य जगताहेत. बहुतेकांची मुले मुली वाया गेलेली त्या अपत्यांचे दररोजचा खर्च किमान एक लाख रुपये कारण ड्रग्स च्या आहारी गेलेल्या तरुण पिढीचा खर्च मोठा असतो. महिन्याकाठी २५-३० लाख रुपये उडविणे त्यांना त्याचे काहीही वाटत नाही. पेज थ्री च्या आहारी गेलेली तरुण पिढी, त्यांच्याकडे बघून त्यांचे मायबाप, त्यांची अवस्था येथेच नर्क भोगायला भाग पाडणारी असते. माझ्या कडे तर या राज्यातल्या तमाम बिघडलेल्या पिढीचे तंतोतंत पुरावेच आहेत. त्यामुळे काळ्या कमाईतून जेमतेम एखादी दुसरी पिढी ऐश करू शकते, फार काळ देशाला खड्ड्यात घालणारे सुखासमाधानाने जगणे अशक्य ठरते....

मिसाळ आडनावाचे अधिकारी आहेत, कोणत्याही फाईलवर पैसे दिसल्याशिवाय ते काम पुढे रेटतच नाहीत, अर्थात या राज्यातले नेते आणि अधिकारी सारेच मिसाळ, अशांना साथ देणारे आम्ही सारेच म्हणजे त्यात दलाल व्यापारी मीडिया कंत्राटदार मंत्री, आमदार, खासदार, सारेच्या सारे आलेत. कोकणात नाणार प्रकल्प जाहीर झाल्यानंतर त्या प्रकल्पाची इत्यंभूत माहिती असणाऱ्या साऱ्यांनीच नाणार प्रकल्प परिसरात कोट्यवधी रुपयांच्या जमिनी खरेदी केल्या कारण नाणार प्रकल्प सुरु होताच जमिनींचे भाव नक्की गगनाला भिडणारे होते पण प्रकल्प रद्द झाला आणि मिसाळ सहित अनेक शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले, मिसाळ तर फक्त वेडे व्हायचे तेवढे बाकी आहेत कारण या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी विविध लोकांच्या नावे करोडो रुपये गुंतवून जमिनी खरेदी केल्या आहेत. यापुढे नाणार प्रकल्प जर सुरु होणार नसेल तर खरेदी केलेल्या जमिनींचे भाव कवडी मोल ठरणारे आहेत. वाचकहो, हा प्रकृतीचा नियमच आहे कि केलेले सारे येथेच फेडून वर जावे लागते, मी पण अनुभव घेतलाय, घेतोय...
www.vikrantjoshi.com

पुढल्या वेळी फडणवीसांनी गुणवत्ता पारखून आणि दमात घेऊन जर अधिकाऱ्यांना पोस्टिंग दिले आणि मंत्रिमंडळ सदस्यांना देखील भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या तर घरचा रास्ता दाखवेल, सांगितले तर येथे या राज्यात बऱ्यापैकी कामाचा दर्जा राखून प्रगती साधने शक्य होईल. विशेषतः पदोन्नती होत होत जे मराठी अधिकारी या राज्यात पुढे प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त केल्या जातात त्या सर्वांना माजी सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्यासारखे उत्तम काम करून आयुष्याचे सार्थ नियोजन का करावेसे वाटत नाही. सुरेश साळवी नावाचे एक सनदी अधिकारी मला वाटते निवृत्त होऊन १७-१८ उलटली असावीत. आजही त्यांची अधूनमधून भेट होते, ते केवळ पेन्शनच्या भरवशावर जगतात, एवढे नोकरीत असतांना प्रामाणिक होते, त्यामुळे बस ने प्रवास करतात, तुम्ही अगदी सुरेश साळवी म्हणून बनून नोकरी करावी असेही नाही पण घरातल्या पैशांना आणि पुढल्या पिढीला कीड लागेल निदान असेही आडवेतिडवे मिळवू नये. १९८० ते आजतागायत, या राज्याची घडी जी विस्कटली ती पुन्हा बसेल वाटत नाही....

सरकार मग ते कोणाचेही असो, विशेषतः संघ संस्कारातून आणि प्रबोधनकारांच्या विचारातून जन्माला आलेल्या युतीकडून तरी स्वच्छ सरकारची हमी अपेक्षित आहे. शासकीय व प्रशासकीय अधिकारी मोक्याच्या पदावर नेमत्तांना गुणवत्तेच्या तत्वांचा अंगीकार स्वीकार करणे महत्वाचे ठरते याचे अधिक भान पृथ्वीराज चव्हाण ते या राज्याचे मुख्यमंत्री असतांना त्यांना होते. देवेंद्र फडणवीसांची हि पाच वर्षे त्यांना या राज्यातल्या भामट्या नेत्यांशी सामना करण्यात गेली त्यामुळे त्यांना मनातून तीव्र इच्छा असून देखील थेट पृथ्वीराज चव्हाण होता आले नाही पण त्यांच्या मनातली अस्वस्थता कायम जाणवत असते आणि मला शंभर टक्के खात्री आहे, पुढले मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र हे चव्हाणांपेक्षा अधिक आक्रमक होऊन काम करतील. उत्तम प्रशासनाची खात्री जेथे असते तेथे राज्य नक्की झपाट्याने प्रगती करते. आधी गुणवत्तेच्या आधारावर मोठ्या प्रमाणात पोस्टिंग होत असे पण शरद पवार, अशोक चव्हाणांसारखे सत्तेत मुख्य पदी विराजमान झाले आणि महाराष्ट्र हे महाभ्रष्टराष्ट्र म्हणून देशात ओळखल्या जाऊ लागले....
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

भ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य हेच स्वप्न : पत्रकार हेमंत जोशीभ्रष्टाचार मुक्त राष्ट्र राज्य हेच स्वप्न : पत्रकार हेमंत जोशी 
सगळ्या लढाया जिंकता येतील पण सर्वप्रथम भ्रष्टाचार विरोधी लढाई जिंकता यायला हवी आणि हे तुम्हाला मी सांगतो आहे ज्याने स्वतःच भ्रष्टाचार करण्या साथ दिलेली आहे. पण जसे दारुड्या बापाला वाटते कि माझ्या पोराने दारूला स्पर्श देखील करता कामा नये किंवा धंदा घेणाऱ्या स्त्रीला हेच वाटत राहते कि तिच्या मुलीने पतिव्रता निघावे तसे या देशातल्या या राज्यातल्या प्रत्येक भ्रष्ट मंदाचे झाले आहे त्या त्या प्रत्येकाच्या तोंडून कायम सतत दररोज हेच निघते कि हे राज्य भ्रष्टाचार मुक्त झाले तरच या राज्याचे या देशाचे काही खरे आहे. समोर श्रीखंड येईपर्यंत आपण गोड न खाणे ठरविलेले असते किंवा छाती उघडी करून एखादी समोर आली कि पुरुषांचे ब्रम्हचर्य किंवा एकपत्नीव्रत सारे संपलेले असते तसे पैसे खाण्याचे आहे, आपले ज्ञानाचे डोस पाजणे तोपर्यंत सुरु असते जोपर्यंत समोर पैशांचे ताट येत नाही, एकदा का ते आले कि त्याक्षणी आपल्यासारखा काळ्या पैशांवर तुटून पडणारा कोणीही नसतो...

जसे नरेंद्र मोदी मोठे मताधिक्य घेऊन देशाचे पंतप्रधान झाले तसे जर येत्या विधानसभेला देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत घडले तर निदान मी तरी त्यांना सांगणार आहे, त्यांच्याकडे आग्रह धरणार आहे कि भ्रष्टाचारमूक्त राज्य नक्की शक्य नाही पण तुमच्या मंत्रिमंडळात पैसे खाण्याच्या बाबतीत अगदीच रस्त्यावरच्या वेश्यांसारखे सदस्य घेऊ नका, दलालांना बऱ्यापैकी वेसण घाला आणि शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना खतरनाक मुख्यमंत्री किती भयंकर असतो, हे दाखवून द्या. जसे एखादा भित्रा पण चावट शिक्षक शाळेतल्या सेक्सी शिक्षिकेच्या वक्षस्थळांकडे तिच्या नकळत नजर टाकतोच किंवा प्रत्येक घरातला पुरुष बायकोचे लक्ष नसतांना शेजारणीला लाडाने हाय हॅलो करून येतोच किंवा बायको अंघोळीला गेली कि तरुण मोलकरणीची आस्थने चौकशी करून काही लागले तर केव्हाही आठवण कर, म्हणतोच तसे या राज्यात भ्रष्टाचाराच्या बाबतीत घडले तर अजिबात काळजी करण्याचे कारण नाही जसे कायम लेडीज बार मध्ये जाण्याची सवय लागलेला पुरुष कधीकधी घरातून बाहेर पडतांना अधिक पैशांसाठी हट्ट करून बसलेल्या बायकोच्याही ब्लाउजमध्ये पैसे कोंबून पळ काढतो तसे या राज्यातल्या भ्रष्टाचाराचे होणार आहे म्हणजे भ्रष्टाचारविरहित राज्य राष्ट्र हे स्वप्न सत्यात प्रत्यक्षात उतरणे अशक्य पण जे सध्या सतत घडते त्याचे प्रमाण तरी कमी होणे अत्यावश्यक आहे...

www.vikrantjoshi.com

मध्यंतरी सुधीर मुनगंटीवार यांच्या संदर्भात अर्थ विभागात प्रदीर्घ काम केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याशी जेव्हा मी बोलत होतो तेव्हा ते देखील हेच म्हणाले कि संघाचे विचार संघस्थानापुरते मर्यादित असता कामा नयेत ते प्रत्यक्षात देखील उतरायला हवेत, हे कप्तान म्हणून फडणवीसांना घडावे असे वाटते पण ते स्वतः देखील हि लढाई निदान यावेळी तरी जिंकू शकले नाहीत पण जेव्हा केव्हा स्वतः मोदी भ्रष्टाचारविरोधी लढाईला सुरुवात करतील, हे राज्य भ्रष्टाचारमुक्त करणे निदान देवेंद्र फडणवीस यांना सहज शक्य होईल, फडणवीस प्रसंगी अतिशय कठोर आहेत आणि एक दिवस ते नक्की या लढ्यात बऱ्यापैकी उतरतील असे सतत वाटत राहते. पुढले मंत्रिमंडळ स्थापन करतांना निदान भाजपमधून तरी फडणवीस चांगल्या विचारांचे मंत्री राज्यमंत्री निवडण्याचा प्रयत्न नक्की करतील असे वाटते आणि महत्वाच्या ठिकाणी पदांवर चांगल्याची आस असणाऱ्या मग ते शासकीय अधिकारी असोत अथवा प्रशासकीय, अधिकाऱ्यांची पोस्टिंग, शंभर टक्के देवेंद्र यांचा तो कटाक्ष असेल...

भ्रष्टाचार हाच भारताचा अंतस्थ किंवा नंबर एकचा शत्रू आहे तो पाकिस्थांपेक्षा अधिक आक्रमक खतरनाक महाभयंकर आहे. त्याचा विळखा ज्यांना मनापासून सोडवावासा वाटतो त्यातला प्रत्येक त्यातच अडकलेला असल्याने जसे एक वेश्या आपल्या पोरीला वेश्याव्यवसायात पडू नको सांगू शकत नाही तसे भ्रष्टाचाराचे झालेले आहे, जो तो त्यात अडकला आहे, जे त्यात अडकत नाहीत त्यांना अक्षरश: वाळीत टाकल्या जाते, खड्यासारखे बाजूला काढल्या जाते. वेतन कमी आणि आकर्षण अधिक त्यातून सरकारीबाबू किंवा अधिकारी भ्रष्टाचाराला मोठ्या प्रमाणावर खतपाणी घालतात. मी जेव्हा पत्रकारितेत आलो तेव्हा या राज्यातले अगदी बोटावर मोजण्याएवढे प्रशासकीय अधिकारी थोडाफार हात मारायचे पण त्यांची आणि नेत्यांची जशी अधिक जवळीक निर्माण झाली ते देखील त्याचा एक भाग बनून गेले. एखादा तुकाराम मुंडे यांच्यासारखा या लढाईत उतरतो तेव्हा अशा अधिकाऱ्याला अगदी तोंडावर वेड्यात काढण्यात येते. भा. प्र. से. सदस्यांचे जे राजकीयीकरण झाले तेच मुळात धोक्याचे ठरले. अलीकडे तर असे एखादेच आनंद लिमये यांच्यासारखे प्रशासकीय अधिकारी असावेत कि जे वर्षानुवर्षे मलाईच्या पदावर जाण्याची इच्छा व्यक्त करतांना दिसत नाहीत, सारेच कसे कठीण होऊन बसलेले आहे. एड्स किंवा कँसर बारा होईल पण भ्रष्टाचाराचा महारोग दुरुस्त करणे परमेश्वर असेलच तर त्याकाळी ते या देशात शक्य नाही...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 3 June 2019

धर्म आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी


धर्म आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी 
हिंदू संस्कारांपासून स्वतःची सुटका करवून घेणाऱ्या बिघडलेल्या भरकटलेल्या भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या अशोक चव्हाणांसारख्या नेत्यांच्या हाती हा देश आपले राज्य मतदारांनी वर्षानुवर्षे सोपविले आणि बंगला देश पाकिस्थांपेक्षा किंचित बरे असे या देशाचे झाले. रा. स्व. संघाने आपली निष्ठा जिद्द तळमळ सोडली नाही, विविध माध्यमातून संघ नेते आणि स्वयंसेवक जगभरात देशभरात राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करीत राहिले आणि तो दिवस उजाडला जेव्हा हे हिंदुराष्ट्र आहे असे एकदाचे वाटायला लागले. या राज्याचा विचार करायचा झाल्यास युती मध्ये सारे काही आलबेल आहे असेही अजिबात नाही, यापुढला लढा नक्की युतीच्या भ्रष्ट मंडळींविरुद्धही लढावं लागणार आहेच...

सूक्ष्म निरीक्षणातून एक सांगतो, जेव्हा केव्हा मी अमेरिकेत जातो तेथल्या विविध,हिंदू असलेल्या भारतीयांशी माझे जेव्हा संभाषण होते, विशेषतः ज्यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे अशा मंडळींशी बोलणे होते, माझ्या हे लक्षात आले आहे कि एकतर अमेरिकेत जन्मलेली पिढी अजिबात खोटे बोलत नाही आणि ते हिंदू असून देखील कधीही अमेरिकेविषयी वाईट बोलत नाहीत, अपशब्द वापरत नाहीत किंवा अमेरिकेची बदनामी होईल असे काहीही त्यांच्या तोंडून निघत नाही पण आपल्याकडे असलेले मुसलमान हे हिंदुस्थानचाच एक भाग असून देखील त्यांना आपल्या देशाविषयी आणि हिंदूंविषयी मनातून प्रचंड राग आहे, घृणा आहे, त्यांच्या मनात नेहमीच बदल्याची बदला घेण्याची भावना असते, हिंदूंना जेवढा अधिक त्रास होईल, दिल्या जाईल त्याकडे त्यांचा हमखास ओढा असतो. नेमके हे काँग्रेस ने किंवा संघ भाजपा विरोधी राजकीय संघटनांनी पक्षांनी वर्षानुवर्षे खपवून घेतले, ज्याचा फार मोठा मानसिक त्रास हिंदूंना सहन करावा लागला. यापुढे मुस्लिमांनी सकारात्मक भूमिकेतून हिंदुस्थानकडे बघावे, मला वाटते त्यांना तसे संस्कार विचार मौलवींनी द्यावेत म्हणजे मुस्लिमांना येथे अधिक मानाचे स्थान मिळेल, प्रगती साधण्या त्यांना खूप सोपे जाईल...

www.vikrantjoshi.com

परराज्यांशी माझा फारसा संबंध आलेला नाही पण आपल्या या राज्यात धर्मांतर केलेले ख्रिस्ती तसेच बौद्ध, मुसलमान आणि हिंदू असे विविध धर्मीय राहतात, मुस्लिम सोडले तर बौद्ध आणि मराठी ख्रिस्ती या दोन्हीही धर्मातले माझे मित्र त्यांच्या स्वतःच्या धर्माचा आदर तर नक्की करतातच पण त्यांच्या घरात हिंदू विचार हिंदू देवदेवता हिंदू सण, या तिन्हींचा मोठा पगडा असतो. हिंदू धर्मातले जे जे चांगले आहे ते ते त्यांच्या मुलांवर बिंबवण्याचा ते कायम प्रयत्न करतात. वास्तविक ख्रिस्ती आणि बौद्ध झालेले बहुतेक स्वतःला सवर्ण समजणाऱ्यांकडून हिणविल्या गेले, दुर्लक्षित केल्या गेले त्यातून बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली काहींनी बौद्ध धर्म स्वीकारला तर पाद्रींनी अनेकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. भलेही काही बौद्धांना ब्राम्हणांविषयी नक्की तिरस्कार होता त्यात चूक नक्की त्यावेळेच्या ब्राम्हणांची होती, आता तसे अजिबात राहिले नाही कारण काळ जसजसा पुढे गेला ब्राम्हणांनी देखील स्वतःला बदलवून घेतले...

थोडक्यात हिंदू, बौद्ध आणि ख्रिस्ती जसे या देशात आपल्या राज्यात गुण्यागोविंदाने राहतात ते तसे मुस्लिमांनी देखील वागावे, त्यासाठी त्यांच्यातल्या विचारवंतांनी त्यांच्या तरुण पिढीला पटवून देणे आवश्यक आहे कि हा आपलाच देश आहे, पाकिस्तानशी त्यांचे अजिबात देणे घेणे नाही. काश्मीर आणि मुस्लिम या दोघांना नेहरूंनी दिलेल्या फाजील सवलती जर काढण्यासाठी मुस्लिमांनीच पुढाकार घेतला तर नक्की सहिष्णू हिंदू आणि या देशातले मुस्लिम दोघातले सलोख्याचे वागणे, त्याने आनंदात मोठी भर पडेल. मुस्लिमांच्या सतत दडपणाखाली हिंदू हे जे चित्र सतत येथे बघायला मिळते, ते वीट आणणारे आहे त्या वैतागातूनच सारे हिंदू एकवटले आणि त्यांनी या देशातली काँग्रेस आणि काँग्रेसी विचारांना उलथवून टाकले...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

IAS Nidhi Choudhari & her "tweet" controversy!


IAS Nidhi Choudhari & her "tweet" controversy!

Readers, do you understand what is Sarcasm? FYI, just posting the definition here for better understanding, " the use of irony to mock or convey contempt". In simpler language, sarcasm is nothing but communicating displeasure over something or some person! To cite few examples of what sarcasm is, last month when the Loksabha elections were won by the BJP, there was news of reshuffle in our Devendra Fadnavis Government in Mahrashtra and Devendra Fadnavis decided to give Ministrial birth to controversial Prasad Lad. Now what I hear a bunch of few MLA's went to CM Fadnavis and in a sarcastic way applauded his effort to introduce Lad in cabinet as few of their tenders in the IT & security personnel department would be passed henceforth with ease. This was sarcasm. None of them want "imported" Prasad Lad as a Minister, leave aside gentling tenders backed in IT. Only SVR Srinivasan is having the cream. Then on Sunday, MLA Amit Satam via a  program "Rokthok", a book was inaugurated by the hands of CM Fadnavis of Satam's speeches of all these years made in the Vidhan Sabha,  special guest and a senior Journalist  in his speech urged CM Fadnavis to make Satam a Minister in his cabinet whenever the reshuffle happens. Since we all know what it meant we read it between the lines, and we said to each other, never ever Satam will be given Ministerial birth in this lifetime by Fadnavis. Narendra Barde is the most non-corrupt Deputy Municipal Commissioner in the BMC, Girish Mahajan's character is as clean as river Ganga, Sharad Pawar was NOT responsible for defeat of his grandson Parth Pawar, Jayant Patil of NCP is NOT keen on joining the BJP since two years, retd IAS officer Uttam Khobragade did work for the upliftment of Maratha's & Brahmin's of our society, "Suppliers" Prashant Maheshwari & Sachitanand Lalwani have never been to MSRDC's office, are few other examples of what Sarcasm is!

Now come to Twitter...though am not much of a fan of few words and lines, I try to stay away from it. But what I know it is a medium of communicating your PERSONAL feelings to people who follow you. You can be a bureaucrat, a person selling soap bars or even a person driving an auto rickshaw. That's why many of them even if in Government service have made it clear in their profile, "Views expressed here are personal"...Please understand this very clearly---Now coming to the main topic--the tweet of Nidhi Choudhari, the controversy followed by it and then her abrupt transfer. Do you all know who Nidhi Choudhari is or what has been her contribution?

www.vikrantjoshi.com

 Those who don't know, lets all travel to Palghar and ask the locals there. She was ZP CEO there & day-in day out fought for the backwards and tribals there even taking on the mighty Vivek Pandit head-on over various controversies. It was due to this "helpless at home" Minister Vishnu Savra and  hen MLA Vivek Pandit's pressure that her transfer was to happen as all she did was--fight controversial people and expose the corrupt milking the tribal department. When the news came as to Nidhi Choudhari been asked to move, it was then BMC Commissioner and now our CS Ajoy Mehta who handpicked her and placed her as the Deputy Municipal Commissioner-encrochments at the BMC...I have know Choudhari since her ZP CEO days and had travelled to Palghar when the fight against Vivek Pandit had turned ugly. MLA Manisha Choudhary had also helped her in many ways then. I have known her and believe me since we are those journalists who don't trust anyone completely, the first meeting with her and till today I had become her fan. A lady with substance who manages and takes her job very seriously and for her serving the country is altogether another high. Anyways, to cut long story short, please understand her tweet. It was not anti-Gandhi. Please in actual words, follow her twitter since 2011 as she said...All she meant by that one tweet was "SARCASM". Don't we people understand Satire? Have we lost the sense of literature in every way or what? Anyways, as again, just because Sharad Pawar wrote a letter and few NCP karyakarta's voiced their opinion against her, our government with no sense of remorse or even waiting for her answer on the show-cause notice, transferred her. This much pressure? Aree boss, now what I hear is altogether a different story....SInce Choudhari was incharge of encroachments and was being a major headache for many top politicians of our city Mumbai- a BJP big neta had hatched this plan of her abrupt transfer...Gossip in the corridors of Mantralaya are shouting on top of their voices that this tweet was actually used as a tool to pressure Ajoy Mehta and CM Fadnavis to support illegal encroachments by this powerful neta of BJP. NCP leaders were just a tool of communications. But on the other hand don't we see officers blatantly supporting casteism in Mantralaya. PWD is a classic example. The brahmin CP Joshi who is the secretary of the department is often made to bite the dust by Maratha engineers many times when it comes to implementing certain schemes...

Anyways, one more good officer is demotivated with such transfers. What motivation people like Nidhi Choudhari will take from this? But again I'll tell her, where the likes of UPS Madan was not spared, Nidhi-you have a long way to go lady ! Please continue to tweet, be sarcastic, opine your views openly and Journalists like me will be always with you; but bureaucrats a certain code of conduct should be followed and certain topics which make people uncomfortable- should be avoided!

Thursday, 30 May 2019

पवारांचा पार्थ : पत्रकार हेमंत जोशीपवारांचा पार्थ : पत्रकार हेमंत जोशी 
आम्ही भारतीय नेमके कसे त्यावर अलीकडे माझ्या अमेरिकेतल्या पाठक आडनावाच्या मैत्रिणीने पाठवलेला छान किस्सा सांगतो. नंतर पुढल्या महत्वाच्या विषयाला हात घालतो...कॅनडा देश पर्यटनासाठी फार प्रसिद्ध आहे. ( माझा धाकटा मुलगा विनीत तेथे शिकायला होता. मी खूप वेळ कॅनडा बघितले, निसर्गरम्य देश आहे. नायगरा धबधबा अमेरिकेतून नव्हे आर कॅनडातून अधिक सुंदर दिसतो, डोळ्याचे पारणे फेडतो) तिकडच्या नागरी सुधारणा कशा उत्तम त्यावर मिसेस पाठक यांनी पाठवलेला हा किस्सा...अलीकडे एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत जामनगरहून एक गुजराथी कुटुंब कॅनडा फिरायला निघाले होते. त्यात पती पत्नी, त्यांची दोन मुले आणि एक वृद्ध जोडप्याचा समावेश होता. एकदा ते आपल्या कार मधून फिरत असतांना त्यांच्या मागे एका कॅनडियन स्त्रीची गाडी होती. अचानक त्या स्त्रीने पाहिले कि पुढील गाडीतील त्या गुजराथी आजोबांनी बाहेर तोंड काढून रक्ताची उलटी केली. लगेच त्या स्त्रीने ९११ क्रमांकावर फोन केला. बघितले ते सांगितले...काही क्षणातच तेथे ऍम्ब्युलन्स हेलिकॉप्टर हजर झाले. आजोबांना त्यात टाकून त्वरित ऑक्सिजन लावून इस्पितळात हलविण्यात आले. डॉक्तरांनी अत्यंत लक्ष ठेवून आजोबांच्या जीवाचा धोका टाळला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्या जागृत स्त्रीचे आभार मानण्यात आले. नंतर इस्पितळाने लगेच आजोबांच्या मुलाकडे कॅनेडियन डॉलर ४५०० असे बिलही दिले. पण या अनपेक्षित बिलाने मुलगा बिथरला आणि बापावर खेकसून म्हणाला, पान खाऊन बाहेर पिचकारी मारायची काय गरज होती...? 
आता नेमक्या विषयाकडे वळतो, 

देवाने माझे अनेक हट्ट आयुष्यात पूर्ण केले. एखादी नटी तेही अतिशय तोकड्या कपड्यांनिशी जवळून बघायची होती. थेट आलिया भट आणि मी कित्येक महिने जुहूच्या सन अँड सॅण्ड मध्ये एकत्र स्विमिंग करीत असू फरक एवढाच त्यावेळी तिचे अवघे वयोमान वय वर्षे चार होते. हेही वाटायचे कि एखाद्या नटीशी एकांत चार घटका गप्पा माराव्यात. अलीकडे कुठल्याशा कामानिमित्ते उषा नाडकर्णी माझ्या ऑफिस मध्ये येऊन बसल्या होत्या. छान गप्पा झाल्या. २९ मे ला माझा आणखी एक हट्ट देवाने पूर्ण केला. कुटुंबवत्सल तेही थेट अजित पवार मला बघायचे होते, देवाने माझे तेही स्वप्न पूर्ण केले. अजितदादा आणि पार्थ पवार दोघेही एकत्र खूप प्रसन्न मूड मध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय विमान तळावरील बिझिनेस लाउंज मध्ये भेटले आणि डोळ्याचे पारणे फिटले...

आता देवाने आणखी एक इच्छा पूर्ण करावी. माझ्या ओळखीच्या एखाद्या तरुणीशी आमचा अविवाहित पत्रकार मित्र राजन पारकर याचे लग्न व्हावे मग त्याने संसाराची सारी जबाबदारी माझ्यावर सोपवावी. त्यावर तो म्हणतो, मी अविवाहित राहीन पण तुमच्या ओळखीच्या तरुणीशी लग्न करणार नाही. नको रे राजन असा हट्ट धरून बसू. मोठ्यांचे ऐकावे. २९ तारखेला मी न्यू यॉर्कला निघालो आणि हि अशी अचानक भल्या पहाटे अजितदादा आणि पार्थ शी म्हणाल तर भेट झाली म्हणाल तर गाठ पडली. मनाशी लगेच म्हणालो, चला एक विषय मिळाला लिहायला कि इकडे राज्यात जनता दुष्काळाशी सामना करते आहे आणि तिकडे अजितदादा निघालेत फडणवीस मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांसारखे बेशरम होऊन निवडणूक संपताच परदेशात सहलीला पण ते तसे 
नव्हते, अजितदादा असे निर्लज्ज नाहीत....

तिकडे दुबईत अजितदादांचा धाकटा जय उत्तम व्यवसाय करतो आहे, लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत त्याच्याशी भेट नाही, फारसे बोलणे झाले नव्हते म्हणून दादा आणि पार्थ त्याला केवळ दोन दिवस भेटायला गेले होते. मला नेमके जे अपेक्षित आहे होते ते त्यादिवशी मनासारखे घडले. तरुण मुलांशी गप्पा मारणारे त्यांच्या नेमक्या अडचणी त्यांचे स्वप्न समजावून घेणारा बाप मला अजितदादांमध्ये बघायचा होता तो बघितला. पार्थ आणि दादा दोघे ज्यापद्धतीने दहा पंधरा मिनिटे माझ्याशी गप्पा मारल्या. त्यादरम्यान त्या दोघांचे एखाद्या मित्रांसारखे ट्युनिंग बघून मी मनोमन सुखावलो. अतिशय हळुवार स्वभावाच्या म्हणजे काका शरद पवारांच्या घराण्यात अजिबात न शोभणाऱ्या पार्थ पवार नामक भावनाप्रधान तरुण नेत्याला जे वाटायचे कि त्याच्या बाबांनी त्याला समजावून घ्यावे, तो देखील राजकारणात किंवा व्यवसायात पुढे जाऊ शकतो, हे लोकसभा निवडणुकीनिमित्ते दिसून आले. अजितदादा आणि पार्थ सतत तीन महिने प्रचारानिमित्ते जे एकत्र फिरले, बसले उठले, त्याने आता नजीकच्या काळात नक्की फरक पडणार आहे, त्यातून त्याचे एकटेपण नक्की दूर झाले आहे, पार्थ मनापासून शंभर टक्के खुश आहे...

निवडणूक हरलो, पराभूत झालो, थोडा डिस्टरब झालोय, पार्थ म्हणाला. डिस्टरब का, कशासाठी, तुला जी लाखो मते मिळालेली आहेत ते सारे मतदार तुझे आणि तुझ्या बाबांचे, आजोबांचे फॉलोअर्स आहेत, पराभूत झाल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून जाणार आहेस का, तसे असेल तर ते अजिबात योग्य नाही. हारजीत होतच असते, त्याने अजिबात खचून जायचे नसते, जिद्दीने आणखी पुढे जायचे असते, मी त्याला म्हणालो. नम्र पार्थला ते मनापासून पटले असावे. तेवढ्यात विमानाची वेळ झाली म्हणून त्यांना बोलावणे आले, दादा निघाले, पार्थचा पाय निघत नव्हता. अरे आज तुझ्यासोबत प्रॉम्प्ट बाप आहे, दादा आहेत, पळ लवकर मग तो निघाला. मी जे अजितदादांना म्हणालो कि पार्थ माझा आणि विक्रांत चा अतिशय लाडका आहे, तेच खरे आहे, पार्थ अतिशय वेगळा हळुवार तरुण नेता आहे...

शरद पवारांनी नेहमीप्रमाणे घरातही शक्यतो भेदभाव करू नये. त्यांनी अलीकडे रोहित पवारला जवळ घेतले आहे, नक्की चांगले घडले आहे पण आजोबांना दोन्ही नातू सारखे असावेत जसा त्यांनी रोहित पवारांवर विश्वास टाकला आहे ती भूमिका त्यांनी पार्थबाबत पण घ्यावी. वर्गातली सारी मुले अभ्यासाच्या बाबतीत सारखी नसतात पण जे अस्सल गुरु गुरुजी असतात ते अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांकडे देखील लक्ष पुरवतात, लक्ष ठेवून असतात. शरदरावांनी गुरुजींच्या भूमिकेत शिरावे आणि उजव्या खांद्यावर रोहितला घेतले आहे, डाव्या खांद्यावर पार्थ ला देखील उचलून घ्यावे, त्यालाही नेमके राजकारण समजावून सांगून पुढली त्याची राजकीय दिशा त्याला ठरवून द्यावी, पार्थ नक्की ऐकेल. या लोकसभा पराभवाच्या निमित्ताने बाबा आणि आबा दोघांचे ऐकणे कसे आवश्यक आहे, असते हे एव्हाना त्याच्या नक्की लक्षात आले आहे. पार्थ देखील पुढे जाणारा आहे...
तूर्त एवढेच :


पत्रकार हेमंत जोशी 

Monday, 27 May 2019

जरा सांभाळून : पत्रकार हेमंत जोशी


जरा सांभाळून : पत्रकार हेमंत जोशी 
जसे पूर आलेल्या नदीत पोहायला उतरायचे नसते, धूर सोडणाऱ्या ढुंगणासमोर तोंड करून बसायचे नसते, मूड कोणताही असो अधिक वजन असलेल्या बायकोला अंगाखांद्यावर घेऊन काहीही करायचे नसते, पिसाळलेल्या कुत्र्याच्या पाठीवर कुरवाळायचे नसते, सेक्स करायचा मूड आल्यानंतर पिसाळणाऱ्या हत्तीसमोर हत्तीण सोडून अन्य कोणीही जावयाचे नसते, माकड होऊन माणसाने कधीही या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारायच्या नसतात, तेच ते पाचकळ विनोद करून माणसाने स्वतःचा मेहमूद लक्ष्मीकांत बेर्डे, जगदीप, डॉ. साबळे करून घ्यायचा नसतो तद्वत अपयश समोर दिसल्यानंतर पेटून उठलेल्या शरद पवार यांच्या नादी भल्याभल्यांनी लागायचे नसते. अक्कलहुशारीने त्यांना सामोरे जायचे असते. आकांडतांडव करणारे पवार भयंकर डेंजरस असतात, ठरतात, हा इतिहास सर्वांनाच माहित आहे, पाठ आहे. दाऊद युगाचा अस्त झाल्यानंतर पवार तसे बऱ्यापैकी शांत राहून राज्याचे राजकारण स्वतःसाठी खेळत होते पण त्यावेळेचे भाजपाला मिळालेले यश आणि त्यांना मिळणारे अपयश, पवार यांचे पित्त अतिशय खवळलेले आहे. डोळ्यात तेल घालून या राज्यातल्या युतीने विशेषतः फडणवीसांनी पवारांना सामोरे जायचे आहे कारण चिडलेले पवार कोणत्याही थराला जातांना मागलापुढला विचार करतांना दिसणार नाहीत, अशावेळी पाकिस्थान परवडला म्हणायची वेळ आपल्यावर येते...

नवनीत राणा विदर्भातल्या अमरावती मधून निवडून आल्या म्हणून फारसा आनंद झाला असे अजिबात नाही कारण प्रोफेशनली मतदारांचा वापर करवून घेणारे नेते विदर्भातल्या मतदारांच्या कधी लक्षात आलेच नाहीत त्यामुळे आम्हाला कायम विदर्भातल्या स्थानिक व्यापारी वृत्तीच्या नेत्यांनी वापरून घेतलेले आहे, नवनीत किंवा त्यांचा नवरा त्यातलेच एक त्यामुळे त्यांच्या निवडून येण्याने मनाला आनंद झाला असे अजिबात नाही पण आनंदराव अडसुळांना विदर्भातल्या मतदारांनी मोदी लाट असतानाही पराभूत केले, बरे झाले. फार पूर्वी एक डॉक्टर दाम्पत्य मंत्रालयात दलाली करीत असे त्यासाठी हा डॉक्टर आपल्या देखण्या तरुण सेक्सी बायकोचा तिला शौकीन मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर पाठवून तिचा वाईट पद्धतीने उपयोग करवून घेत असे. त्यावर डी वाय पाटील, सुशीलकुमार शिंदे, अनंतराव थोपटे, दिनेश अफजलपूरकर इत्यादी नेते अधिकारी विस्ताराने तुम्हाला सांगू शकतील. हा डॉक्टर बाहेर चतुर्थ कर्मचाऱ्यांशी गप्पा मारीत बसायचा आणि त्याची पत्नी शौकिनांकडे जाऊन फाईल्स क्लिअर करवून घ्यायची, त्यांची ती नेहमीची पद्धत होती...

आम्हा विदर्भातल्या मतदारांची अवस्था वर्षानुवर्षे त्या डॉक्टर दाम्पत्यासारखी हलकट लाळघोट्या नेत्यांनी मजबूर करून ठेवली आहे, बाहेरचा उमेदवार आमच्यावर वेळोवेळी लादायचा मग ते दिवंगत नरसिंह राव असतील, गुलाम नबी आझाद असतील, आनंदराव अडसूळ असतील, वासनिक बापबेटे असतील, असे कितीतरी. विदर्भातल्या भोळ्या मतदारांना गृहीत धरून या नालायक संधीसाधू नेत्यांनी कायम आमचा त्या डॉक्टरने जसा बायकोचा वापर करून घेतला, आमचे हे असे झालेले होते त्यामुळे अडसूळ पडले बरे झाले निदान यापुढे तरी सहसा बाहेरचा उमेदवार लादण्याची विविध राजकीय पक्षातल्या श्रेष्ठींची हिम्मत होणार नाही. डॉक्टर दाम्पत्याचे उदाहरण दिले, अशा अनेक बायका या मंत्रालयात आपले शरीर विकून पैसे मिळवतात आणि सुंदर शरीराची चाळण करवून घेतात, त्यावर १९९० च्या दरम्यान कांताला वापरून घेणारे निंबाळकर आणि निंबाळकरांच्या भरवशावर मुलगी जावयाला जोडलेले दोन दोन फ्लॅट घेणाऱ्या कांता तुम्हाला व्यापक सांगतील...

शिवसेनेचे यावेळीही १८ खासदार निवडून आले पण यावेळची संख्या १८ वरून अगदी सहज २२ वर गेली असती. केवळ फडणवीसांच्या आग्रहाला उद्धव ठाकरे बळी पडले आणि ऐनवेळी नरेंद्र पाटलांना उमेदवारी देऊन, उदयनराजे भोसले यांना निवडून आणण्यात अप्रत्यक्ष जणू मदतच केली कारण राजे यांच्या समोर बाहेरचे तसेच युतीला अपरिचित नरेंद्र पाटील उभे करण्यात काहीही अर्थ नव्हता. पचका झाला. तेथून डॉ. अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवावी अशी ठाकरे यांची इच्छा होती पण अमोल कोल्हे अगदी सुरुवातीपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा हट्ट करून बसले होते. कोल्हे जर साताऱ्यामधून उभे असते तर शिवसेनेच्या एकाचवेळी दोन जागा अगदी सहज वाढल्या असत्या. साताऱ्यामधून डॉ. अमोल कोल्हे व शिरूर मधून पुन्हा एकदा आढळराव पाटील शंभर टक्के निवडून आले असते. उद्धवजी विनाकारण यावेळी आढळराव पाटील यांच्या प्रेमाला बळी पडले आणि कोल्हे थेट राष्ट्रवादीत जाऊन निवडून आले. येथे उद्धवजी आणि डॉ अमोल दोघांनीही स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. उद्धव ठाकरे यांनी आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील अनंत गीते इत्यादी त्याच त्या उमेदवारांना रिपीट केले नसते तर नक्की चित्र वेगळे दिसले असते. या राज्यात युतीमध्ये आणि शिवसेनेत त्यातून आनंदाला नक्की उधाण आले असते, दुर्दैवाने तसे घडले नाही...
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी