Wednesday, 6 January 2021

पुणे : अधिक व उणे : पत्रकार हेमंत जोशी

पुणे : अधिक व उणे :  पत्रकार हेमंत जोशी 
माझ्या मुलाचे नुकतेच लग्न झाले आहे त्यामुळे दुपारी एक ते चार दाराची बेल वाजवू नये, अशी पाटी फक्त पुणेकरच लावू शकतात याचा अर्थ ते दुपारी एक ते चार या वेळेतच हनिमून साजरा करतात एवढेच नव्हे तर पुणेकर जोडपे देखील म्हणे थेट मधुचंद्राच्या पहिल्या राती देखील इतरांसारखे साडे नऊ वाजता गाढ झोपलेले असतात. त्यांचे विवाह मुसलमानांसारखे आपापसातच होतात म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघेही पुण्याचे असतात. पुण्याबाहेर लग्न कारणाऱ्या मुलीचा नवरा म्हणे पुढल्या काही महिन्यातच पुण्याला शिफ्ट होतो थेट वेड्यांच्या इस्पितळात दाखल होतो. जाऊ द्या आपण नेहमीच ज्या पुणेकरांची थट्टा करतो त्यांनी अलीकडे जे केले आहे करून दाखवले आहे त्याला तोड नाही किंवा कौतुक करण्या मजजवळ शब्द नाहीत. कोणालाही यापुढे आर्थिक भीक द्यायची नाही, पुणेकरांनी सोडलेल्या या संकल्पाचे स्वागत करूया त्यांचे मनापासून कौतुक कर या आणि आपण देखील हीच शपथ घेऊया कि यापुढे मी कोणत्याही भिकाऱ्याला भिकारणीला आर्थिक स्वरूपात भीक देणार नाही... 

भिकाऱ्यांना अन्न पाणी नक्की देऊ पण एकही रुपया देणार नाही. पुणेकरांनी सुरु केलेली हि चळवळ आपण मुंबईकर किंवासारेच इतर पुणेकरांचे अनुकरण करून मोकळे होऊया. कोणत्याही प्रकारचे भिकारी असोत आर्थिक मदत नाही, पुण्यात सुरु झालेल्या या चळवळीचे कराल तेवढे कौतुक कमी पडावे. मित्रांनो, याचा परिणाम म्हणून नक्की असे घडेल कि आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय किंवा राज्यात, भिकारी या गटातील टोळ्या तर तूटतीलच पण त्यातून घडणारे लहान मुलामुलींचे अपहरण नक्की फार मोठ्या प्रमाणावर बंद पडेल. गुन्हेगारी जगातील टोळ्यांचा त्यातून अंत होऊ शकेल. आजपासूनच शपथ घ्या कि यापुढे प्रसंगी भिकाऱ्याला भूक लागलेली असेल तर स्वतः विकत घेऊन त्यांना खाऊ घालेल पण एकही पैसा त्यांना भीक म्हणून देणार नाही आणि मी हे करतो म्हणून तुम्हाला येथे हक्काने सांगतो आहे. माहीमच्या मुसलमान गल्लीत मी एकदाच एका भिकाऱ्याला पाचशे रुपयांची भीक दिली होती कारण कोणीतरी ती खोटी नोट माझ्या माथी मारली होती. त्याला तेव्हा पाचशे रुपये देतांना सांगितले, जा आणि इतर भिकाऱ्यांना पण आज जेऊ घाल. गंमतीचा भाग सोडा पण शपथ घ्या कि यापुढे पैशांच्या स्वरूपात मी भीक देणार नाही, भिकाऱ्यांची संख्या वाढू देणार नाही... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


No comments:

Post a comment