Saturday, 19 December 2020

कोण हसले कोण रुसले कोण फसले : पत्रकार हेमंत जोशी

कोण हसले कोण रुसले कोण फसले : पत्रकार हेमंत जोशी 

शरद पवार यांच्याविषयी प्रामुख्याने राजकीय विरोधक किंबहुना त्यांच्या महाआघाडीमधले बहुसंख्य प्रसंगी राष्ट्रवादी पक्षातलेही असंख्य, अगदी त्यांच्या गावातले, पवार घरातले, एकमेकांना जेव्हा केव्हा भेटतात, च्यायला ! हे म्हातारं निवृत्तही होत नाही, हमखास हेच बोलून विचारून सांगून मोकळे होतात वास्तविक ते पवारांच्या निवृत्तीपलिकडले बोलून मोकळे होतात पण माझ्या घरावर उगाच दगडफेक नको म्हणून ते वाक्य येथे लिहिणे टाळतो. अर्थात पवारांविषयी अनेकांच्या मनात राग असेल पण त्यांच्याविषयी असले काहीबाही वाईट चिंतण्यापेक्षा त्यांना विरोध करणाऱ्यांनी पवारांनी काढलेल्या रेषेपेक्षा आपली रेषा मोठी काढून त्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करावा जे त्यांच्याच पक्षात राहून कधीकाळी विलासराव देशमुख किंवा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी करून दाखविले होते आता एकमेव देवेंद्र फडणवीस नेमके तेच करताहेत. मला वाटते एखाद्याच्या आयुष्याचे वाईट चिंतून उलट आपलेच वाईट होते त्यापेक्षा स्पर्धेत उतरणे केव्हाही चांगले. सुडाचे राजकारण कधीही संपत नसते उलट वाढत जाते, सूडाच्या राजकारणाचे कसे राजकीय बळी जातात त्यावर जळगाव जिल्हा हे उत्तम उदाहरण ठरावे. एक मात्र सध्या जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेनेत चांगले घडते आहे कि नामदार गुलाबराव पाटील यांचे पुन्हा दुसऱ्यांदा मंत्री होणे अख्य्या जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेत बहुतेक सेना नेत्यांना सेना आमदारांना विशेषतः शिव सैनिकांना अजिबात आवडले नाही राज्यमंत्री म्हणून एकनाथ खडसे किंवा गिरीश महाजन यांच्यासमोर अजिबात प्रभावी न ठरलेले गुलाबराव पाटील पुन्हा एकदा तेही पूर्णवेळ मंत्री व्हावेत, असे खुद्द शिवसेनेतच जेथे वाटत नव्हते तेथे इतरांचा आवडी निवडीचा कोणताही प्रश्न नव्हता... 

शरद पवार आणि त्यांचे याही वयातील नेतृत्व त्यावर मला सहजच काहीतरी आठवले. एक ८० वर्षीय वृद्ध गृहस्थ नेहमीच्या तपासणीसाठी म्हणून डॉक्टरांकडे गेले. त्याची तब्बेत डॉक्तरांनी तपासली आणि त्याच्या सुधृढ तब्बेतीचे रहस्य विचारले. मी फारसे काही करत नाही. सूर्योदयापूर्वी उठतो नंतर दोन तास सायकलिंग नंतर घरी येतो दोन ग्लास वाईन घेतो नंतर दिवसभराच्या कामाला लागतो. एक आणखी विचारतो, तुमचे वडील केव्हा गेले डॉक्टर म्हणाले त्यावर गृहस्थ चिडून म्हणाले, कोण म्हणते माझे वडील गेले, ते आता १०० वर्षांचे आहेत आणि एकदम ठणठणीत आहेत. तेही दररोज माझ्या सोबतीने तेच करतात, आत्ताच आम्ही वाईन घेतली नि मी तुमच्याकडे आलो. याचा अर्थ दीर्घायुष्य तुमच्या जीन्स मध्ये आहे. मग आजोबा गेले तेव्हा त्यांचे वय काय होते, डॉक्तरांनी विचारले. गृहस्थ आता अधिकच चिडले, म्हणाले, अहो, तेही अगदी ठणठणीत आहेत आणि १२० वर्षांचे आहेत विशेष म्हणजे आजही त्यांचे तेच आमच्यासारखे लवकर उठून सायकलिंग नंतर दोन ग्लास वाईन. फक्त उद्या ते सायकलिंगला येणार नाहीत कारण उद्या त्यांचे लग्न आहे आणि ते गृहस्थ आल्या पावली घरी परतले. काही दिवसानंतर रेग्युलर चेक अप साठी म्हणून ते गृहस्थ पुन्हा त्याच डॉक्टर कडे गेले नि बघतात काय कि दवाखाना बंद म्हणून त्यांनी जेव्हा शेजारी विचारले जेव्हा त्या काकू डोळे मिचकावत म्हणाल्या, डॉक्टर सकाळी नियमित सायकलिंग करतात आणि आल्यावर वाईन घेतात. सो फॉलो शरद पवार ते नेमके उत्साही व ताकदवान कसे, उगाच त्यांचे वाईट चिंतू नका, नुकसान तुमचेच होईल... 

पण जे घडायला नको होते ते पून्हा एकदा घडल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतेक शिवसैनिकांचा मोठा विरस झाल्याचे उघड चित्र येथे पाहायला मिळते, स्त्रिया त्यांच्या नावाने नाक मुरडून मोकळ्या होतात आणि पुरुष खास खान्देशी शिवी हासडून मोकळे होतात. वास्तविक खुद्द शिवसेनेतच यावेळी म्हणजे महाआघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर ज्याला त्याला जिल्ह्यातील पारोळा विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेतले लोकप्रिय नेते चिमणराव पाटील मंत्री होणे अपेक्षित होते पण ते घडले नाही किंवा पाचोर्याचे आमदार किशोर पाटील आणि चिमणराव आबा यांचा विचारही न होता पुन्हा एकदा गुलाबराव तेही पूर्णवेळ मंत्री वरून पालकमंत्री म्हणून लादल्या गेल्याने, शिवसेना वरिष्ठांनी माहिती घ्यावी, शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ व खदखद निर्माण झालेली आहे. असे म्हणतात कि गुलाबराव पाटील मंत्री म्हणून जेवढे मालामाल झालेले नसतील त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांचा खाजगी सचिव भ्रष्ट अशोक पाटील  श्रीमंत होऊन मोकळा झाला आहे. पुरावे लवकरच हाती पडताहेत तेव्हा सविस्तर सांगता लिहिता येईल. अस्वस्थता जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेनेत पुन्हा गुलाबराव मंत्री झाल्याने नक्की आहे पण ज्या कारणासठी हा जिल्हा नामचीन आहे ते सुडाचे राजकारण अद्याप जळगाव जिल्हा शिवसेनेत हवे तसे निर्माण न झाल्याने वेळीच दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी या नाराजीची दखल घेऊन मराठा समाजाच्या जिल्ह्यातील प्रभावी चिमणराव पाटील यांना मंत्री करणे म्हणजे नक्की पुढले धोके टाळणे हे ठरेल असे मी येथे नक्की नमूद करू इच्छितो. जळगाव जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या परिवर्तन घडवून आणण्याची ताकद मराठा पाटील,  लेवा पाटील आणि गुजर पाटील या तीन ज्ञातींमध्ये पैकी चिमणराव हे मराठा गुलाबराव हे गुजर पाटील तर एकनाथ खडसे लेवा पाटील, लेवा आणि मराठ्यांना एकत्र आणून शिवसेनेत आलेली मरगळ झटकून टाकणे अधिक सोपे जाईल त्यासाठी गुलाबरावांना डच्चू आणि नाराज चिमणरावांना संधी, सेनेची ताकद वाढेल... 

क्रमश: हेमंत जोशी 
No comments:

Post a comment