Tuesday, 15 December 2020

हमाम में सब नंगे : पत्रकार हेमंत जोशी

हमाम में सब नंगे : पत्रकार हेमंत जोशी 

हि वस्तुस्थिती तर तुम्ही भलेही कबुल करणार नाही पण तुमच्याही आयुष्यात अनेकदा घडली असेल घडत असेल कि पलंगावर पत्नीशी प्रणय ऐन रंगात आला असतांना चुकून तुमच्या तोंडून पत्नी ऐवजी प्रेयसीचे नाव बाहेर पडते नंतरचे सात आठ दिवस मग यथेच्छ धुलाई होते अर्थात हे अलीकडे अनेक तरूणींच्याही बाबतीत घडत असल्याची म्हणाल तर माझी माहिती आहे किंवा तो अनुभव मला माहित आहे कि मुलींच्याही तोंडून नवऱ्यासंगे पलंगावरचा प्रणय ऐन रंगात आला असतांना प्रियकराचे किंवा अन्य पुरुषाचे नाव बाहेर पडते. अशावेळी यातले तरबेज स्त्री पुरुष व्यवस्थित बाजू सांभाळून घेतात अन्यथा घटस्फोट होईपर्यंत प्रकरण अंगाशी शेकते. अर्थात हे मला त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरून आठवले म्हणजे आज मुख्यमंत्री पदावरून ते पायउतार होऊन वर्ष लोटले तरीही अनेक वाहिन्यांचे अँकर बोलण्याच्या ओघात त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा करतात. एवढेच काय, पर्वा सभागृहात थेट अजितदादा देखील फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करून मोकळे झाले ज्यावेळी त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे बसलेले होते. माझ्या तर असे कानावर पडले आहे कि, श्रीमती रश्मी ठाकरे देखील फडणवीसांचा बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्री असा उल्लेख करतात. एकदा एका लग्नात एक अनोळखी पुरुष माझ्या शेजारी उभा होता, ओळख झाल्यानंतर गप्पा मारताना त्याचेही तेच झाले. म्हणाला, कालपर्यंत हि वधु माझ्या अंगाखांद्यावर खेळत होती आणि आज दुसऱ्याची झाली. त्यावर, ती तुमची मुलगी आहे का, मी त्याला विचारताच तो म्हणाला, नाही हो, मी तिचा बॉस आहे! आणि हे असेच जर बिनधास्त वागण्या जगण्यात घडत असेल तर चुकून नको ती नावे तोंडून बाहेर पडतात. अर्थात हेही तेवढेच खरे कि स्त्री किंवा पुरुष ज्यांच्या प्रभावाखाली असतात किंवा प्रेमात आकंठ बुडालेले असतात अशांची नावे नको त्या वेळी आपोआप तोंडून बाहेर पडतात जे आजही देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत घडते आहे... 

अलीकडे कुठल्याशा बातम्या देणाऱ्या मराठी वाहिनीने महाआघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मंत्री राज्यमंत्र्यांनी शासकीय बंगल्यांवर केवळ वर्षभरात ९० कोटी रुपयांची केलेल्या उधळपट्टीचे पुरावे सांगितले अर्थात त्यांना हे आणखी विस्ताराने सांगता आले असते म्हणजे मंत्र्यांनी जशी शासकीय बंगल्यांवर उधळपट्टी केली तेच मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात पण घडले आहे, साऱ्याच मंत्र्यांनी आणि अति उच्च शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयावर, केबिन्सवर वारेमाप खर्च करून आपण कसे नीच आणि जनतेच्या पैशांचे लुटारू हे सिद्ध केले पण मला सांगा हे पहिल्यांदा घडले आहे का, अजिबात नाही, सारेच नीच व हलकट म्हणजे जो वारेमाप खर्च यांनी केला तसाच खर्च युतीच्या मंत्र्यांनी केला तेच त्या आधीच्या मंत्री मंडळाने केले तेच त्या आधीच्या, वर्षानुवर्षे विशेषतः १९९५ नंतर सतत मी हेच बघत आलो आहे १९९५ आधी असे अजिबात किंवा फारसे घडत नसे, थोडीफार डागडुजी करून नव्याने आलेले मंत्री मुख्यमंत्री, शासकीय कार्यालये किंवा बंगले ताब्यात घेऊन मोकळे व्हायचे पण जसजसा राज्यातला मनमानी कारभार व भ्रष्टाचार हा शिष्टाचार म्हणून काम करू लागला तसतसे हे सारे बेशरम होत गेले, लोकांचा पैसा आपल्या बापाचा माल पद्धतीने वागू लागले. ज्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शासकीय बंगल्याचे कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करून घेतले होते, पंचतारांकित केले होते, त्याच बंगल्यात राहायला येण्यापूर्वी यावेळी पुन्हा अजित पवार महाशयांनी पुन्हा नव्याने लगेचच काही महिन्यात नूतनीकरण करून घेतले, जनतेचे त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून आदर्शाच्या व शिस्तीच्या खोट्या गप्पा मारणाऱ्या या मंडळींनी असे शेण खाल्ले यालाच म्हणतात हमाम में सब नंगे... 

सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत देखभाल डागडुजी व नूतनीकरण हे सिनेमाच्या सेट सारखे असते म्हणजे पॉश दिसते पण त्यास अजिबात आयुष्य नसते कारण बांधकाम खात्यातील अभियंत्यांना आता हे पाठ झाले आहे कि जे काय करायचे आहे ते तात्पुरते करायचे आहे कारण अमुक एका जागेत नव्याने येणारे सचिव, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, न्यायधीश किंवा अन्य उच्चभ्रू आधीचे तोडून पाडून सारे काही नव्याने करायला सांगणार आहेत ज्यात जनतेच्या पैशांची लूट आणि आपली देखील चांदी होणार आहे. हे सारेच बेशरम आणि तुम्हाला तर माहित आहेच कि बेशरम मंडळींच्या ढुंगणावर झाड उगवले तरी ते न लाजता सांगतात, सावली झाली. त्यामुळे असे विषय सभागृहात देखील चव्हाट्यावर येत नाहीत येणार नाहीत कारण जे आपले कायमस्वरूपी नाही त्यावर करोडो रुपये खर्च करण्यात विरोधी पक्ष देखील आघाडीवर असल्याने हे सारेच्या सारे, चोर चोर मौसिरे भाई पद्धतीचे आहेत. अमुक एखाद्या बंगल्यावर किंवा शासकीय कार्यलयावर देखभाल दुरुस्ती व डागडुजीचे नावाखाली आणि नूतनीकरणाच्या नावाखाली खर्च केल्यानंतर थोडाफार देखभालीचा खर्च सोडल्यास पुन्हा अशा पद्धतीने पुढली दहा वर्षे खर्च केल्या जाणार नाही, असा फतवा जर शासनाने काढला तरच त्यातून दर्जेदार निर्मिती घडू शकते अन्यथा सारेच लुटायला बसले असल्याने दुसऱ्याकडे एक बोट दाखवण्याची हिम्मत त्या त्या वेळेच्या विरोधकांमध्ये देखील अजिबात नाही कारण उरलेली तीन बोटे त्यांची स्वतःकडेच आहेत. विशेष म्हणजे बंगले व शासकीय कार्यालयांचे मंत्रालयाचे नूतनीकरण करतांना अलीकडे हे बेशरम हलकट मंत्री आणि बडे अधिकारी किंवा अन्य महत्वाचे त्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांवर अजिबात अवलंबून न राहता त्यांच्याकडे केवळ निरीक्षणाची जबाबदारी सोपवून बंगल्याचे कार्यालयाचे सारे काम शहरातल्या मुंबईतल्या महागड्या वास्तुविशारदाकडे आणि कंत्राटदाराकडे सोपवून मोकळे होतात थोडक्यात अव्वाच्या सव्वा किंमत या क्षणभंगुर वास्तूंवर खर्च करून आम्ही कसे व किती निलाजरे, सिद्ध करून मोकळे होतात. मला तर असे अनेक मंत्री माहित आहेत कि ते प्रत्येक मंत्रिमंडळात पुन्हा शपथ घेऊन मंत्री म्हणून आले रे आले कि पुन्हा त्याच बंगल्याचे व मंत्रालयातील कार्यालयाचे नूतनीकरण करून मोकळे होतात. या मंडळींना ना लाज ना शरम त्यामुळेच हे असे घडते आहे कारण आम्ही सर्वसामान्य कमालीचे गांडू आहोत... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment