Sunday, 13 December 2020

पवार कथासार पवारांवर वार : पत्रकार हेमंत जोशीपवार कथासार पवारांवर वार : पत्रकार  हेमंत जोशी 

मुसलमानांच्या जल्लोषात १२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला, जिकडे तिकडे नवाब मलिक यांनी मुंबईत ८० हजार नोकऱ्या देणारे भले मोठे बॅनर्स व पोस्टर्स सगळीकडे पाहायला यादरम्यान मिळाले. या रोजगार मेळाव्यात मुसलमानांचीच चांदी झाल्याचे कानावर पडले. चालायचेच, तरुण हिंदुहृदय सम्राटाचे मित्र जर झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी किंवा अस्लम शेख यांच्यासारखे अतिमहान मुसलमान नेते घरातले जवळचे मित्र असतील तर पवारांनी मोठ्या खुबीने मुस्लिम मते स्वतःच्या पारड्यात पाडण्यासाठी असले मुसलमान नेत्यांकडून मेळावे भरवले तर त्यात त्यांचे चुकले कुठे ? आंधळा राजा पीठ दळायला बसला की हे असे घडणे अपेक्षित असते. या वाढदिवसा दरम्यान अस्वस्थ दादांच्या कार्यालयातून माझ्या एका पत्रकार मित्राला दादांच्याच एका जबादार पण अस्वस्थ अधिकाऱ्याने एक व्हाट्सअप मेसेज पाठवला त्यावर तसेच पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या अत्यंत खणखणीत लेखावर आणि प्रशांत पोळ यांनी मन अस्वस्थ करून सोडणाऱ्या त्यांच्याही लेखावर मला येथे नेमके काही सांगायचे आहे, कदाचित कोरोनाचे संकट किंवा भय असावे पण येथे १२ डिसेंबरला जसा बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे इत्यादी काही बोटांवर मोजण्या इतक्या नेत्यांच्या वाढदिवसाला जो जल्लोष उत्साह आनंद आम्ही बघत आलोय तसे पवारांच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने काहीही कुठेही बघायला मिळाले नाही हि वस्तुस्थिती आहे कारण शरद पवार यांना आमचे आवडते नेते म्हणून मुंबैकर मंडळींनी कधी स्वीकारलेच नाही त्यामुळे कदाचित यावेळी नवाब मलिक यांना हाताशी धरून पवारांनी हा प्रयत्न केला असावा कारण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत पण त्यांचा हाही प्रयत्न नक्की फसला आहे... 

लोकसत्ता दैनिकाचा त्यातील मजकुराचा संदर्भ घेत व्हाट्सअप वर माझ्या पत्रकार मित्राला जो मेसेज पाठवण्यात आला त्यात शरद पवारांनी चक्क लोणकढी थाप मारल्याचे सिद्ध होते. पवार म्हणतात, मुंबईत पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आले. ते जेव्हा भारतात आले, तेव्हा त्या गेट जवळ एक व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीला बाजू करण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. तेव्हा पंचम जॉर्ज यांनी स्वतः खाली उतरून त्यांची भेट घेतली. ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले होते. शरद पवारांच्या या संदर्भाला याच मेसेज मध्ये उत्तर देण्यात आले आहे. त्यानुसार, महात्मा फुले यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाले. पंचम जॉर्ज यांची पहिली भारत भेट १९११ साली आणि गेट वे ऑफ इंडियाचे उदघाटन १९२४ साली झाले. मग महात्मा फुले मृत्यूनंतर २१ वर्षांनी जॉर्ज यांना कसे भेटले? कदाचित पवार साहेबांचा पुनर्जन्मावर विश्वास असावा पण तसा विश्वास महात्मा फुले यांचा नव्हता. घनश्याम पाटील यांचे हे लेखन १३ डिसेंबरला राज्यात सर्वत्र फिरत होते जे माझ्या मित्राला दादांच्या कार्यालयातून पाठवण्यात आले. पवारांनी हे असे बोलणे सतत टाळले असते तर मला वाटते त्यांच्याविषयी त्यांच्या घरी आणि दारी असलेली त्यांच्याविषयीची अस्वस्थता दिसली नसती त्यातून शरद पवार कसे अपयशी ठरत गेले त्यावर पुढला परिच्छेद... 

१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस साजरा होत असतांना त्यांच्यावर खोटे खोटे लिहावे कि नेमके सत्य सांगून मोकळे व्हावे या संभ्रमात मी असतांना माझ्या वाचण्यात दोन अप्रतिम लेख आले. कौतुक कसले व कोणाचे करायचे, या मथळ्याखाली पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लेखणीतून पवारांची जी बिन पाण्याने करून ठेवलेली आहे तो लेख जगभरातल्या मराठी जनतेत खूप गाजला तेच प्रशांत पोळ यांच्या, वैफल्याचे सहस्त्रचंद्र, या मथळ्याखाली केल्या गेलेले लिखाणही असेच जगभरातल्या मराठी मंडळींमध्ये गाजले. हे दोन्ही लेख याठिकाणी मुद्दाम तुम्हाला वाचावयास देत आहे. सावकाश वाचा आणि जाणून घ्या आजही आयुष्याच्या संध्याकाळचा प्रवास करतांना जनतेच्या मनात राज्याच्या या मोठ्या नेत्यांविषयी नेमके काय आहे. लोकांनी आपल्या जाण्याची नव्हे तर खूप खूप जगण्याची निदान वाढदिवसाला तरी तशी दुवा देवाकडे मागायला हवी होती पण पवारसाहेब काही टगे किंवा तुमच्या भरवशावर वाढलेले जगलेले सोडल्यास तसे फारसे मनापासून मनातून कोणाला वाटले नाही आणि नेमके हेच तुमचे अपयश आहे. ज्यांना वाटत होते कि आयुष्यभर पवारांना चिटकून व बिलगून राहावे त्यांना तुम्ही ढकलून बाजूला केले आणि ज्यांना पवार नको आहेत त्यांना बिलगण्यासाठी तुम्ही आयुष्यभर त्यांच्यापाठी पळत सुटले आणि हेच तुमचे मोठे अपयश आहे, यशस्वी होऊन देखील तुम्हाला त्या यशाची फळे चाखता आलेली नाहीत... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

१. भाऊ तोरसेकरांचा लेखाची लिंक  

२.  प्रशांत पोळ यांच्या लेखाची लिंक 

No comments:

Post a comment