Saturday, 12 December 2020

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी 

माझ्या जे मनात होते ते घडायला सुरुवात झाली आहे जे काम माहेश्वरी समाजाने पुढाकार घेऊन सुरु केले आहे तेच काम प्राधान्याने हिंदूंनी आणि ब्राम्हणांनी करायलाच हवे भलेही दोन दोन बायका करा पण हिंदूंनो भरपूर मुले जन्माला घाला, ब्राम्हणांनो तुमची ती तत्वे बासनात गुंडाळून ठेवा आणि लागा अधिकाधिक पोरे पैदा करायच्या कामाला अन्यथा एक दिवस हिंदूंचा विशेषतः ब्राम्हणाचा पारशी बाबा होईल, औषधाला देखील हिंदू उरणार नाहीत, हे दूरदर्शी माहेश्वरी समाजाच्या लक्षात आले किंबहुना या समाजात अलीकडे मुलींची संख्या तर एवढी रोडावलेली आहे कि त्यांना जातीबाहेर मुली लग्नासाठी म्हणे शोधून आणाव्या लागताहेत. माहेश्वरी समाजाने दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घातल्यास प्रोत्साहन म्हणून अशा दाम्पत्याच्या किंवा त्यांच्या मुलांच्या नावे मोठ्या रकमांच्या मुदत ठेवी बँकेत ठेवण्याचे जाहीर केले आहे. हेच यापुढे देशातल्या विशेषत: या राज्यातल्या ब्राम्हणांनी आणि हिंदूंनी देखील करायला हवे म्हणजे जो दोन पेक्षा अधिक मुले जन्माला घालेल त्याच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन त्या त्या जातीच्या संघटनांनी करणे यापुढे काळाची गरज आहे आणि हे घडले नाही तर माझे म्हणणे सांगणे कसे योग्य होते पुढल्या काही वर्षात तुमच्या ते नक्की लक्षात येईल... 

मुसलमान तेवढे लक्षात येतात संयमी ख्रिसचनांचे तेवढे लक्षात येत नाही पण हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्यात जेवढा असुरी आनंद मुसलमानांना होतो त्यात ख्रिश्चन देखील अजिबात मागे नाहीत, विविध धर्मादाय संस्था आणि विविध दुर्गम भागात काम करणारे पाद्री यांना परदेशातून फार मोठ्या प्रमाणावर जी आर्थिक रसद पुरविण्यात येते त्यातून हिंदूंचे धर्मांतर घडविणे हेच या मंडळींचे प्रमुख उद्दिष्ट किंवा लक्ष्य असते. विशेषतः हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी भारत विरोधी आंदोलने घडवून गरिबांना अधिक अस्थिर करण्यासाठी किंवा भारताची प्रगती रोखण्यासाठी भारतात आधी धर्मादाय संस्था किंवा धर्मगुरू यांना हाताशी धरून प्रचंड पैसे ओतले जातात किंवा परदेशातल्या महागड्या जीवनावश्यक वस्तू या गरिबांना देऊन त्यांना आपापल्या धर्माकडे पद्धतशीर आकर्षित करण्यात येते महत्वाचे म्हणजे त्यांना रोखण्यात मोठी रिस्क असते विरोध होतो पण हे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे विश्व हिंदू परिषदेसारखे अन्य प्रांत फ्रंटवर येऊन काम करतात, धर्मांतराला हाणून पाडतात. अलीकडे म्हणजे केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा असे घडले कि ज्या धर्मादाय संस्था अशा मोठाल्या परदेशी रकमांवर हिंदूंचे धर्मांतर घडवून आण्यात आघाडीवर आहेत त्यांच्यावर आता सरकारने करडी नजर ठेवून त्यांच्यासमोर कायद्याची अडचण उभी करून त्यांना वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय संस्था एलआरओ ने अलीकडे अशा बदमाश ५५ संस्था शोधून काढल्या आहेत पण हि संख्या अगदीच नगण्य आहे. माहितीनुसार अशा परदेशी आर्थिक रसदीच्या भरवशावर धर्मांतर घडवून आणणाऱ्या हिंदुस्थानात पाच हजारा पेक्षा अधिक संख्यने या संस्था आहेत. केवळ या ५५ धर्मादाय संस्थांना परदेशातून हे असे हिंदूंचे धर्मांतर घडवून आण्यासाठी ३७०० कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत त्यावरून इतर अशा धर्मादाय संस्थांना केवढ्या रकमेची आर्थिक रसद पुरविण्यात येत असेल कल्पनाच केलेली बरी... 

ज्या कार्यासाठी कामासाठी हे पैसे परदेशातून अशा धर्मादाय संस्थांना पाठविण्यात येतात वास्तवात अशा सामाजिक  कामांवर प्रत्यक्षात अगदीच तुटपुंजी रक्कम खर्च करण्यात येते, उरलेली प्रचंड रक्कम केवळ धर्मांतर करण्यावर, आंदोलने दंगे हिंसा जाळपोळ लव्ह जिहाद किंवा पकडलेल्या आरोपींना सोडविण्यासाठी देण्यात येणारी लाच, मुले विकत घेऊन किंवा आर्थिक सामाजिक दृष्ट्या नाडलेल्या मुलामुलींना आर्थिक आमिषे दाखवून धर्मांतर घडवून आणणे इत्यादी हिंदूंना कमकुवत करणाऱ्या बाबींवर खर्च करण्यात येते, यासाठी मित्रांनो तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही केवळ धारावी परिसरात गुप्तपणे फेरफटका मारून तेथल्या गोरगरीब हिंदू तरुण तरुणींना विश्वासात घ्या, मी जे धर्मांतराचे गूढ उकलले आहे त्याची प्रचिती तुम्हाला तेथे प्रत्यक्ष अनुभवता येईल. इतर कोणताही धर्म जगात किंवा मुख्यत्वे हिंदुस्थानात खतरेमे नाही धोक्यात आलेलो आहोत ते आपण समस्त हिंदू म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, हिंदूंची संख्या यापुढे झपाट्याने वाढलीच पाहिजे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता नाही पण हि एकमेव संघटना जी हिंदू जनजागृती घडवून आणण्यात आघाडीवर आहे पण आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येईल, थोडक्यात हिंदू अधिक बलशाली बलाढ्य बलवान करावयाचा असेल तर हिंदूंची संख्या मोठी असावी झपाट्याने वाढवायला हवी, संख्येने अल्प असलेले हिंदू, ख्रिश्चन किंवा मुसलमानांसमोर टिकणे अन्यथा अवघड असे काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांच्या १९२५ च्या स्थापनेपासून भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहतोय त्यासाठी जवळपास शंभर वर्षे ते अथक परिश्रम घेताहेत पण त्यांच्या एकट्याच्या प्रयत्नाने हे हिंदू राष्ट्र होणे कठीण असे काम आहे त्याऐवजी आमची संख्या झपाट्याने वाढणे आता हे आमचेच प्रथम कर्तव्य आहे.... 

क्रमश: हेमंत जोशी 

No comments:

Post a comment