Wednesday, 30 December 2020

कोरोना आणि कैलासवासी कुंदन : पत्रकार हेमंत जोशीकोरोना आणि कैलासवासी कुंदन : पत्रकार हेमंत जोशी 

मित्रांनो, कोरोना अजिबात संपलेला नाही उलट तो गेल्या काही दिवसांपासून अधिक धोकादायक झाला आहे थेट हृदयात किंवा डोक्यात शिरतो माणूस कोसळतो देवाघरी जातो तेव्हा आपण काळजी घ्यायलाच हवी. २०२० आणि २०२१ च्या शेवटाला काय कमावले काय गमावले हे महत्वाचे ठरणारे नसून जर जिवंत राहिलो तर तीच मोठी कमाई अशी मनाची समजूत काढावी आणि तेच नेमके सत्य आहे. आमच्या खार परिसरातले एक व्यापारी गृहस्थ कुठेही घराबाहेर पडले नाही तरीही त्यांना कोरोना झाला आणि त्यात ते गेले कारण काय तर लॉक डाऊन संपताच त्यांची आवडती मोलकरीण घरी आली, बाईसाहेब अंघोळीला जातातच तिने शेटजींकडे ओठ आणि गाल केले यांनी मग पटापट तिचा आणि स्वतःचा इतक्या दिवसांचा उपवास सोडला, विकृतीपोटी तिच्यातली कोरोनाची लक्षणे त्यांना कळली नाहीत तिचा कोरोना पुढे वाढला पण त्यातून ती उठली शेटजी मात्र कायमचे देवाघरी गेले त्यांना हे असे मुके घेणे महागात पडले. अलीकडे एका व्यापारी मित्राचाच फोन आला, म्हणाला, हैप्पी एंडिंग आणि प्रत्येक अवयवाची मसाज करून घेण्यासाठी मी ज्या पार्लर मध्ये जातो तेथे पोलिसांनी धाड टाकली आहे तेथल्या मुलींना सोडा, हे तुम्ही पोलिसांना सांगा. मित्र जिवलग तरीही नाव खराब करणारे हे विकृत काम मी टाळले. हाच मित्र घरी सतत बायकोला जवळ घेऊन बसतो पण बाहेर जाऊन काय करतो तर वेश्यांकडून हि अशी भूक भागवून घेतो, कोरोना पसरेल नाही तर काय ? अर्थात हे नवीन नाही, जे पुरुष सहसा बाहेर घाण करून घरात येत नाहीत त्यांच्या बायका एवढ्या संशयी असतात कि नवऱ्यांना आयुष्य नकोसे वाटते आणि जे बायकोला पप्पी आणि बाहेर दररोज कुणाला तरी मिठी मारून मोकळे होतात अशा लबाड पुरुषांच्या बायकांना त्यांचे नवरे थेट प्रभू रामचंद्र आहेत असे वाटत असते... 

एक दिवस पुण्यात जवळचा मित्र व हरहुन्नरी कुंदन ढाके व मी एका कॉफी शॉप मध्ये गप्पा मारीत बसलो होतो. बाहेर त्याची बीएमडब्ल्यू फाईव्ह सिरीज कार उभी होती. माझ्याकडे यातले अमुक मॉडेल आहे पण फाईव्ह सिरीज नाही, मी म्हणालो.  त्यावर मला कुंदन लगेच म्हणाला, किंमत तुमची आणि गाडी माझी, घेऊन जा आणि त्याने खरेच मी सांगितलेल्या किमतीला मला फाईव्ह सिरीज दिली जी गेल्या तीन चार वर्षांपासून माझी आवडती कार आहे. वास्तविक मी कधीही वापरलेल्या कार्स विकत घेत नाही पण हि मित्राच्या प्रेमापोटी घेतली आणि हाच कुंदन ढाके, धडधाकट ढाके, परवा २८ डिसेंबरला सकाळी फिरायला गेला असता अचानक रस्त्यात जागेवरच कोसळला आणि ब्रेन हॅमरेज होऊन क्षणार्धात वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी जागच्या जागी गेला कारण तेच त्याला दिड महिन्यापूर्वी कोरोना झाला होता, शरीरात राहिलेली लक्षणे त्याच्या लक्षात आली नाहीत आणि मोस्ट हेल्थ कॉन्शस कुंदन माझा मित्र असा तडकाफडकी गेला, कोरोनाकडे असे जरासे दुर्लक्ष किंवा त्याबाबत न घाबरण्याचा अति आत्मविश्वास हा असा नडतो आणि अगदी पैलवान माणूस देखील जागच्या जागी जातो. पैसे पुढे आयुष्यभर मिळवायचे आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांनी निदान या दिवसात तरी रिस्क घेऊ नये, शक्यतो घराबाहेर पडू नये, जमिनीच्या खरेदी विक्रीतून साध्या शिक्षकाच्या या मुलाने ठेवायला जागा नाही एवढे पैसे मिळविले होते, पुढले काही दिवस त्याने जरा दमाने घेणे गरजेचे होते पण कोरोनातून उठताच तो पूर्वीच्याच उत्साहात कामाला लागला आणि कुंदन जीव गमावून बसला... 

८०-८२ च्या दरम्यान म्हणजे ८० दशकाच्या सुरुवातीला जळगावात दिवंगत ब्रिजलाल पाटील हे अतिशय प्रेमळ असे व्यक्तिमत्व होते ते जनता दलाचे नेते होते आणि जनशक्ती नावाचे दैनिक काढायचे विशेष म्हणजे हेच ब्रिजलाल पाटील व त्यांचे प्रेमळ बंधू विजय पाटील दोघांचाही मी अत्यंत लाडका त्यामुळे ते अतिशय अल्प दरात त्यांच्या ऑफसेट मशीनवर माझे त्यावेळेचे साप्ताहिक मला छापून द्यायचे. ज्या ब्रिजलाल पाटलांनी मला खूप सहकार्य केले त्यांचाच जनशक्ती पुढे कुंदन ढाके यांनी विकत घेतला कदाचित त्यामुळे मी व कुंदन एकमेकांच्या खूपसे जवळ आलो. जळगावला त्याने हे वृत्तपत्र चांगले सांभाळले आजही ते तेथे सुरु आहे, पुढे मात्र त्याने जनशक्ती जसा पुणे व मुंबईतून सुरु केला मी त्याला हटकले, म्हटले बंद कर हे दर्डा होण्याचे स्वप्न पण तोपर्यंत त्याचे जवळपास त्यावर ३५-४० करोड रुपये खर्च झाले होते. कुंदन मोठा व्यायसायिक होता म्हणून त्याने हा लॉस सहन केला पण त्याने माझे ऐकले आणि पुणे व मुंबईत वृत्तपत्र क्षेत्रात काढता पाय घेतला. सुखाचा जीव दुख्खात ज्यांना टाकायचा असतो त्यांनी दैनिक किंवा वाहिनी काढून मोकळे व्हायचे असते. उगाच मुंगेरीलाल के सपने बघतात आणि ज्यांना ज्ञान नाही अशी माणसे दैनिके काढून मोकळी होतात, खड्ड्यात जातात. अर्थात या संदर्भात कोणताही सल्ला हवा असला कि कुंदन ढाके आणि अनिल गावंडे माझ्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात हमखास यायचे मग आमचे एकत्र जेवण आणि मनसोक्त गप्पा पण आवडता कुंदन असा तडकाफडकी गेला असंख्य मित्रांना आणि तरुण कुटुंब सदस्यांना मागे ठेवून, अर्थात स्वर्गात देखील तो गप्प बसणार नाही, तेथेही ७-१२ बघून स्वस्तात जमिनी तेही थेट देवांकडून विकत घेऊन मोकळा होईल. कुंदन, तुझी सतत आठवण येत राहील, तुला श्रद्धांजली वाहतो... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Tuesday, 29 December 2020

नो राष्ट्रहित मुतून हागुन ठेवले चड्डीत : पत्रकार हेमंत जोशी

नो राष्ट्रहित मुतून हागुन ठेवले चड्डीत : पत्रकार हेमंत जोशी 

पैसा खा वाट्टेल ते धंदे करून मोकळे व्हा पण किमान काही वेळ काही प्रमाणात तर देशसेवा करा राष्ट्रप्रेम ठेवा या राष्ट्राचे भले करण्याचे स्वप्न बघा पण राज्यातल्या ज्यांच्या हाती कळत नकळत सत्ता आहे त्यांच्या असे काहीही अजिबात मनात नसते, राष्ट्रसेवा राष्ट्राचे भले करणे गेले चुलीत हे असेच ज्याच्या त्याच्या मनात असते, आधी माझे व माझ्या कुटुंबाचे भले त्यानंतर काही उरलेच तर राष्ट्राचे, असेच जो तो करतो आहे आणि याच राष्ट्र प्रेमाच्या पोट तिडकीतून, मोदी व शाह पुढे किमान दहा वर्षे तरी जागावेत सत्तेत असावेत असे वाटत राहते. देवेंद्र व पृथ्वीराज या राज्यात मुख्यमंत्री म्हणून नवीन होते अन्यथा जसे शंकारराव चव्हाणांच्या मनात राष्ट्रप्रेम ओसंडून वाहायचे तेच या दोघांचे मुख्यमंत्री म्हणून वागणे होते, मला खात्री आहे यापुढे पुन्हा जेव्हा केव्हा हे दोघे सत्तेत येतील असतील मागच्या चुका पुढे न करता ते हे राज्य चांगले घडविण्याचा नक्की प्रयत्न करतील. देवेंद्र व पृथ्वीराज या दोघांच्या चुका कोणत्या, असे जर मला कोणी विचारले तर हेच सांगेन किंवा त्यांनाही तोंडावर सांगेन कि देवेंद्र यांनी काही चुकीची माणसे नको तेवढ्या जवळ केली आणि पृथ्वीराज यांनी नेमके देवेंद्र यांच्या उलट केले, ते अतिशय माणूसघाणे होते, या दोघांनीही व्यवस्थित माणसे निवडून जवळ बाळगणे खूपच गरजेचे होते पण दोघांच्याही राष्ट्र व राज्य प्रेमाला तोड नाही, हे सारे येथे आठवले ईडी चौकशा सुरु झाल्याने... 

माझी माहिती अशी कि आमदार प्रताप सरनाईक किंवा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी किंवा एकनाथ खडसे हि तर सुरुवात आहे किंवा ईडी चौकशांचा हा तर पाया आहे खरी मजा पुढे येणार आहे जेव्हा ईडी चौकशांचा कळस रचल्या जाईल, केंद्रात सत्तेत असलेले सरकार हळूहळू का होईना कोणालाही शंभर टक्के सोडणार नाही प्रसंगी या राज्यातल्या काही अति करप्ट भाजपा नेत्यांना देखील ते सोडणार नाही आणि माझे हे सांगणे खोटे असेल तर नितीन गडकरी यांना विश्वासात घ्या, मी म्हणतो ते कसे खरे आहे ते स्वतःचे उदाहरण देऊन सांगतील. ज्या नितीन गडकरी यांच्या मनात जसे काही प्रमाणात का होईना आधी राष्ट्रप्रेम नंतर पैसे मिळविणे हे असे असते त्यांना जेथे जोडगळीने सोडलेले नाही अर्थ हाच कि प्रसंगी ते आपल्याच पक्षातल्या नेत्यांना किंवा अन्य कोणालाही सोडणार नाहीत सोडत नाहीत. उद्धवजींच्या मंत्री मंडळात एक अत्यंत महत्वाचे खाते सांभाळणारे मंत्री तर असे आहेत कि त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फारतर चार दोन वेळा सोडले तर स्वतःच्या मतदार संघाचे तोंड देखील बघितले नाही, मुलांना त्यांनी सांगून ठेवले आहे, तुम्हीच आमदार आहेत पद्धतीने मतदार संघाकडे लक्ष द्या इकडे दिवसरात्र मला पैसे जमा करू द्या उरल्या वेळेत तुम्हीही अय्याशी करा मी पण तरच करतो. मोदी शाह देवाच्या कृपेने जगले वाचले तर या राज्यातल्या बदमाशांचे नक्की काहीही खरे नाही, मोठी किंमत त्यांना मोजावी लागणार आहे... 

आयकर खाते किंवा ईडी सारख्या महत्वाच्या खात्यातील प्रामाणिक अधिकाऱ्यांकडे, कोणाकडे किती व कसे साचले त्यावर तंतोतंत माहिती घेण्याचे महत्वाचे काम सोपविण्यात आलेले आहे, असे नाही कि, अमुक एक नेता त्रास देतो का मग लावा त्याच्या मागे ससेमिरा, असे अजिबात नाही, सरनाईक राऊत खडसे हा केवळ योगायोग आहे पण ज्यांनी फक्त आणि फक्त सरकारी तिजोरीवर दरोडे घालून हवे तेवढे पैसे मिळविले आहेत मग ते मीडियावाले असोत वा अधिकारी, दलाल असोत वा व्यापारी, नेते असोत वा आजी माजी मंत्री, इत्यादी टॉपच्या भ्रष्ट मंडळींची या चौकशा करणाऱ्यांनी यादी तयार केली त्यानंतर त्यांची आर्थिक माहिती केव्हाच गोळा करणे सुरु झालेले आहे, एकही बदमाश त्यातून सुटणार नाही मग असे बदमाश कोणत्याही पक्षाचे अथवा विचारांचे असलेत तरी. राज्याच्या हिताकडे कोणाचेही अजिबात अजिबात लक्ष नसते, सत्तेत मग ते कोणीही आले तरी त्यांना आधी स्वसाठीच ओरबाडून खायचे असते म्हणून मध्यांतरी मी मोहन भागवत यांनाही याठिकाणी तेच म्हणालो होतो कि अमुक एखादा जोपर्यंत संघ स्वयंसेवक असतो त्याच्यात राष्ट्रप्रेम ओतप्रोत भरलेले असते पण तोच स्वयंसेवक जेव्हा सत्तेत येतो त्याच्यातला देवेंद्र फडणवीस नाहीसा होऊन तो थेट प्रमोद महाजन होण्या खात सुटतो आणि हे तुमचे मोठे अपयश आहे. बघूया, भागवत पुढे राजकारणात शिरणाऱ्या स्वयंसेवकाला कसे ताळ्यावर ठेवतात ते. पण का कोण जाणे ज्यापद्धतीने मी सभोवतालचे बदलते वातावरण व राजकारण बघतो आहे, बदल घडणे नक्की अपेक्षित आहे, देवाकडे देखील तेच मागुया... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Saturday, 26 December 2020

शुभेच्छा सामंत : पत्रकार हेमंत जोशीशुभेच्छा सामंत : पत्रकार हेमंत जोशी 
याआधी मी उभ्या आयुष्यात मराठी किंवा हिंदी मालिका कधीच बघितलेल्या नव्हत्या पण कोरोना महामारीमुळे कायम घरात, वेळ जात नाही म्हणून मुद्दाम एखादी दुसरी मराठी मालिका बघायला सुरुवात केली आणि सुरवात देखील नेमक्या एका अतिशय टुकार व भिकार मालिकेपासून झाली, अगबाई सासूबाई हि ती मालिका पण त्यातले दोन्ही प्रमुख पात्रे गिरीश ओक आणि निवेदिता जोशी सराफ जवळून परिचयाचे, म्हणून हि मालिका निवडली, या मालिकेचे भंगार कथानक, म्हणून मी एक दिवस गिरीश ओक यांना फोन करून विचारले त्यावर ते एवढेच म्हणाले, आमचा नाईलाज असतो ते जे सांगतात तेवढे करून मोकळे व्हायचे असते. अलीकडे तर निवेदिताला आलेल्या उचक्या बघून मनाशी म्हणालो, आता हे दाखवून मोकळे होतात कि काय, निवेदिताला गिरीश पासून दिवस गेलेत. अर्थात तसे प्रेक्षकांच्या पचनी यासाठी पडले असते किंवा योगायोग असा कि प्रत्यक्ष आयुष्यात गिरीश यांनी पोटच्या मुलीच्या मैत्रिणीशी लग्न केले आणि उतारवयात पुन्हा हे महाशय एका मुलीचे पुन्हा बाप देखील झाले तेच निवेदिताचे देखील, तिनेही आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या थोराड अशोक सराफ यांच्याशी त्याकाळी लग्न करून पुढे ती एका मुलाची आई देखील झाली.... 

२६ डिसेंबर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस, त्यांना दीर्घायुष्य चिंतूया. सामंत यांचेही तेच, त्यांच्या चेहर्याकडून बघून त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही त्यामुळे गिरीश किंवा निवेदिता सारखे त्यांच्याही बाबतीत असे घडू शकते कि उद्या समजा उदय शाळेचा गणवेश घालून दहावीच्या वर्गात येऊन बसले तरी इतरांच्या ते लक्षात येणार नाही. हसतमुख राहणे आणि सदैव उत्साही जगणे त्यांच्या तारुण्याचे उघड रहस्य. समोरचा मग तो कोणीही असो, क्षणार्धात एखाद्याला किंवा एखादीला आपलेसे करणे त्यांना अगदी सहज जमते, २६ डिसेंबरला सामंत यांचा वाढदिवस माझ्या ते लक्षात नव्हते पण २५ तारखेला तेही राष्ट्रवादीच्या नेत्याचा संजय शेट्ये यांचा फोन आला कि मी उदय सामंत यांच्यावर चार कौतुकाचे मी शब्द लिहावेत, असे हे सामंत ज्यांचे साऱ्या पक्षात अनेक क्षेत्रात राज्यात देशभरात जगभर मोठ्या संख्येने मित्र परिवार आहे. राष्ट्रवादी सोडून ते शिवसेनामय झाले तरीही त्यांचे आजही ते शरद पवार असोत कि काहीसे खडूस अजितदादा किंवा स्पर्धक सुनील तटकरे साऱ्यांशी  पूर्वीचे स्नेहाचे मैत्रीचे संबंध आहेत. जसे ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत लाडके आहेत विश्वासू सैनिक आहेत जबाबदारी न झटणारे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत त्याचवेळी त्यांना बघता क्षणी थेट देवेंद्र फडणवीस यांचाही उर भरून येतो अगदी मनापासून ते उदय सामंत यांना बिलगून शुभेच्छा देऊन मोकळे होतात याचे प्रमुख कारण म्हणजे खालची मान वर न करता भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे ते मनापासून तेथल्या तेथे निर्णय घेऊन काम करून देतात, त्यातून त्यांची लोकप्रियता अशी वाढत गेली, साऱ्यांनी त्यांना त्यांच्या असलेल्या गुण दोषांसहित स्वीकारले मैत्री केली... 

कोरोना महामारीत आरोग्य विभाग जेवढा महत्वाचा त्या खालोखाल गृह व शिक्षण खाते सांभाळणे अत्यंत जिकिरीचे किंवा महाकठीण असे काम होते आणि क्लिष्ट शिक्षण खात्याची जबाबदारी या महामारीत उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून उदय सामंत यांनी यशस्वीपणे हाताळली सांभाळली सांभाळताहेत, कदाचित त्यांचा एखादा दुसरा निर्णय मंत्री या नात्याने काहीसा वादग्रस्त ठरला देखील असेल पण त्यावर आडमुठी भूमिका न घेता त्यांनी होणाऱ्या टीकेचा देखील विचार केला अभ्यास केला प्रसंगी चार पावले ते नक्की मागे आले. विशेष म्हणजे तब्बल एक वेळ नव्हे तर लागोपाठ दोन वेळा त्यांनाही कोरोनाने घेरले पण उदय तेथेही घाबरले नाहीत मागे हटले नाहीत घाबरणे त्यांच्या रक्तात नाही ते जसे अंथरुणातून बाहेर आले लगेचच रत्नागिरी जिल्ह्यात आणि राज्यातील विविध जबाबदाऱ्यांना यशस्वी सामोरे गेले. असे म्हणतात, उदय सामंत कोकणातले असे एकमेव नेते जे कोणत्याही विधान सभा मतदार संघातून उभे राहिले तरी अगदी सहज नेहमीप्रमाणे निवडून येतील, अतिशय मोठ्या मनाचा हा नेता प्रत्येकासाठी धावून जातो साऱ्यांना संकटात सहकार्य करतो म्हणून कोकणातल्या प्रत्येकाला अगदी त्याच्या कट्टर विरोधकाला देखील हवाहवासा वाटतो. त्यांनी युवा नेता म्हणून एकेकाळी जशी राष्ट्रवादी राज्यात मोठी करण्यात महत्वाची भूमिका निभावली, मला खात्री आहे, आज त्यांनी त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना टॉपला आणली उद्या हेच उदय सामंत लोकप्रिय शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे यशस्वी नेते या नात्याने राज्यातल्या शिवसैनिकात उत्साह भरतील आणि शिवसेना आहे त्यापेक्षा मोठी करण्यात शंभर टक्के मोलाची महत्वाची भूमिका पार पाडून मोकळे होतील. त्यांना पुन्हा एकवार वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 
Tuesday, 22 December 2020

गुलाब रुते सैनिकांना : पत्रकार हेमंत जोशीगुलाब रुते सैनिकांना : पत्रकार हेमंत जोशी 
माहिजी किंवा चौफुल्याला जाऊन वेश्यागमन करण्यास हरकत नसते पण अमुक रांड माझी बायको आहे हे सांगणाऱ्याचे नक्की वाटोळे होते तद्वत राजकारणाचे म्हणजे जळगाव जिल्ह्यात गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांनी लुटारू फसवा भामटा भ्रष्ट सुनील झंवर आमचा मित्र आहे हे सांगणे म्हणजे रांडेला अगदी उघड माझी बायको आहे हे सांगण्यासारखे. अर्थात असाही एक नेता याच जळगाव जिल्ह्यात मी बघितला आहे जो जिल्ह्याच्या गलिच्छ राजकारणात पडण्यापूर्वी पूर्वापार गर्भश्रीमंत होता आणि राजकारणात पडल्यानंतर मारवाडी असूनही तोट्यात घाट्यात आला आर्थिक अडचणीत सापडला, मनीष ईश्वरलाल जैन हेच ते महाशय ज्यांना कोठून अवदसा आठवली आणि एकनाथ खडसे यांच्याशी थेट पंगा घेऊन मनीषभाई निखिल खडसे विरोधात त्यांनी विधान परिषद लढवली, मनीष निवडून आले पण सूडाच्या राजकारणासाठी कुप्रसिद्ध असलेला हा जळगाव जिल्हा, पुढे खडसे यांनी मनीष यांना अनेक बाजूंनी अडचणीत आणून आर्थिकदृष्ट्या मोठे संकट त्यांच्यासमोर उभे केले अर्थात मनीष यांना त्यांच्या जामनेर च्या राजकीय विरोधकांविषयी म्हणजे गिरीश महाजन यांच्याविषयी किंवा अगदी एकनाथ खडसे यांच्याविषयी कोणताही राग नाही किंवा बदला घ्यावा असेही त्यांच्या मनात नाही, सध्या ते व्यवसायातले पूर्वीचे यश खेचून आणण्या मनापासून भिडले असल्याचे सतत जाणवते... 

जळगाव जिल्ह्यातले सर्वाधिक वाईट असे राजकीय चित्र कि ते दिवंगत मधुकरराव चौधरी असोत कि प्रतिभाताई पाटील, सुरेशदादा जैन असोत अथवा एकनाथ खडसे, गुलाबराव पाटील किंवा गिरीश महाजन, सत्तेच्या राजकारणात यशस्वी होण्या तमाम नेत्यांनी या जिल्ह्यातील पार ओवाळून टाकलेल्या गुंडांना किंवा दलालांना जवळ केले, मोठे केले, त्यांना मानसन्मान दिला, विविध पदे वाटली त्यामुळे जिल्ह्यातली गुंड प्रवृत्ती व लुटारू वृत्ती वाढत गेली आणि सामान्य माणूस व सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र होते तेथेच राहिले, गुंड प्रवृत्तीचे तेवढे खूप मोठे झाले. जळगाव जिल्ह्यातले सर्वसामान्य दरवेळी नव्याने उदयाला आलेल्या नेत्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवून होते पण त्यांच्या पदरी कायम निराशा पडली. जळगाव जिल्ह्यातल्या शिवसैनिकांमध्ये आलेली मरगळ, ती झटकून टाकण्या आता हेच शिवसैनिक चिमणराव पाटील किंवा त्यांच्यापेक्षा नेतृत्वात अधिक सरस ठरू पाहणाऱ्या आमदार किशोर पाटील त्याहीपुढे जाऊन मुक्ताईनगर चे नवनिर्वाचित आमदार आणि शिवसेनेचेच चंद्रकांत पाटील यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा ठेऊन आहेत. हेच ते चंद्रकांत पाटील ज्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधान सभा लढवली आणि थेट एकनाथ खडसे यांच्या कन्येला रोहिणीला पराभूत केले. स्वतः उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा गुलाबराव पाटील यांच्या ऐवजी आमदार चंद्रकांत पाटलांच्या हाती सोपवावी अशी थेट मागणी जो तो शिवसैनिक करतो आहे अन्यथा पुढल्या काहीच महिन्यात जिल्ह्यातले विशेषत: मराठा समाजाचे शिवसैनिक आणि अन्य अनेक, एकनाथ खडसे राष्ट्रवादीकडे खेचून नेण्यात शंभर टक्के यशस्वी ठरतील... 

याच जिल्हयातले सुरेशदादा जैन, ईश्वरबाबू जैन, मनीष जैन, दिवंगत जे. टी. असे काही नेते असेही आहेत किंवा होते जे निर्व्यसनी होते व स्त्री कार्यकर्त्यांच्या बाबतीत सभयता पाळणारे सुसंस्कृत सेफ नेते म्हणून ओळखले गेले आहेत. गुलाबराव, तुम्ही छातीवर हात ठेवून या नेत्यांसारखे, आम्ही पण सदाचारी, हे सांगू शकता का किंवा माझ्यावरही सुसंस्कृत वागण्याच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांचे संस्कार आहेत, तुम्हाला हे भाषणातून सांगणे जमेल का? बघा कसे जमते ते. सुनील झंवर यांच्या घराशी घरोबा महत्वाचा कि लुटल्या गेलेल्या सर्वसामान्य लोकांच्या बाजूने तुम्ही कि तुम्ही देखील गिरीश महाजन यांच्याच पंक्तीला बसणारे, आता हि भूमिका तुम्ही उघड व्यक्त करणे अत्यंत महत्वाचे अन्यथा झंवर या नालायक दलालाला जवळ करणाऱ्या जिल्ह्यातल्या महानालायक नेत्यांच्या पंक्तीला एक तुम्हीही, हे दृश्य शिवसेनेला नक्की काळिमा फासणारे ठरेल, असे घडता कामा नये. हाच तो सुनील झंवर, एकदा मी गिरीश महाजन ते मंत्री असतांना त्यांना भेटण्या बंगल्यावर गेलो असता आणि आम्ही गप्पा मारण्यात दंग असतांना मध्येच कोलमडला आणि आमच्यात जसा सामील झाला, क्षणार्धात जेव्हा मी त्याला बाहेर जाण्यास सांगितले, बघून महाजन अवाक झाले. असले दलाल मंत्रालयात आसपास जरी दिसले तरी माझी सटकते मग ते दलाली करणारे हरामखोर पत्रकार असलेत तरी.... 

क्रमश: हेमंत जोशी 
Monday, 21 December 2020

The True Heroes of JJ.... The True Heroes of JJ....

 With yet another danger looming over us in the name of this new strain of Covid-19 & it being said to be more dangerous than ever, I just feel like going indoors once again would be a wise decision for all of us, as the threat is totally unknown, yet again! And looking at the brisk pace Maharashtra CM made some crucial announcements yesterday, from changing his stance of "no curfew or no new lock-down" to imposing night curfew immediately & laying down new guidelines for passengers arriving from Europe/UK/and Middle East, say anything, situation is grim once again! Friends who had planned Christmas & 31st parties at their place or were supposed to bring in the New Years with lot of fun & frolic after a such a torturous year --they might have to amend their plans once again.

Friends who had planned their new years to be celebrated in Dubai have some doubts; At first, they would have arrived back in the city with a fresh negative report of the Covid-19, as Dubai airport does not allow anyone to hop on a flight if you don't have as latest as 24-hour prior negative Covid-19 test report. Now coming here & again getting quarantined & again getting tested isn't it bit too much? I mean you are negative on arrival (from Dubai for sure) again spend 7 days & money for staying with family at the Quarantine Centre, get tested and if negative then only go home. Isn't this a bit torturous? But then am told, Dubai is also a transit point for many countries including the UK. Hence the checking is mandatory at our Mumbai Airport. So, friends think about your holiday, plan it well ...And for those who had kept 31st parties at their homes; your neighbour has full authority to complain to the cops and get you fined/arrested due to the night curfew rule...BTW, just asking why night curfew? Does the virus take a nap during the day?

Anyways, point of writing on this topic is to salute two great heroes of Mumbai--bit late but nevertheless--Dean of JJ Group of Hospitals Dr Ranjit Mankeshwar & Superintendent of St George Hospital Dr Akash Khobragade. I'm sure with the new guidelines coming to them yesterday, they will be in middle of preparation and the hospital staff to cater to us with equal enthusiasm and 'never-say-no-spirit'; but both of you--Thank You!! Those who don't know-- Dr Ranjit & Dr Akash both (proud Nagpurian's) during the pandemic at its peak had not slept a wink or taken an off till about October month, am told. Being heads of the biggest hospitals of our city, just imagine the workload. New Pandemic, no proper treatment in the earlier days, non-availability of PPE suits, masks, medicines, veils how these both did, only God knows! Challenges were created into opportunities to serve by these two! In between Dr Akash became a father to beautiful twins, but all that happiness later, duty first has been his motto!  And yes, nothing taking away from the man himself who has been the guiding force to the heads of two most important hospitals of the BMC --Dr T P Lahane, Director DMER. It was Lahane sahib, who was instrumental in excellent coordination from all over 18 hospitals of Maharashtra-be it the veils or PPE suits that was required anywhere during the pandemic, this man helped everyone, like always. Hat's off you all! 

By the way, both Doctor Mankeshwar & Dr Khobragade are pro-vaccine. They say many of us have co-morbidity and getting vaccinated would definitely help to reduce any further complications. Also, like many even these front-line warriors feel the second wave, if it comes, it will be extremely dangerous. They have appealed to us to be vigilant all the times and not to let that mask down for the next 6 months at least. 

 If I'm saluting them, let me not forget the gregarious efforts of Advisor to the CM-Ajoy Mehta and CS Sanjay Kumar who were at the helm of everything and his team of all IAS /IPS officers including the Municipal Commissioner his AMC's, the Police Commissioner his entire force-- and above all CM Uddhav Thackeray. Yes, you have controlled it well Mr. CM! Thank you everyone!! Mumbai owes you!!

 


Saturday, 19 December 2020

कोण हसले कोण रुसले कोण फसले : पत्रकार हेमंत जोशी

कोण हसले कोण रुसले कोण फसले : पत्रकार हेमंत जोशी 

शरद पवार यांच्याविषयी प्रामुख्याने राजकीय विरोधक किंबहुना त्यांच्या महाआघाडीमधले बहुसंख्य प्रसंगी राष्ट्रवादी पक्षातलेही असंख्य, अगदी त्यांच्या गावातले, पवार घरातले, एकमेकांना जेव्हा केव्हा भेटतात, च्यायला ! हे म्हातारं निवृत्तही होत नाही, हमखास हेच बोलून विचारून सांगून मोकळे होतात वास्तविक ते पवारांच्या निवृत्तीपलिकडले बोलून मोकळे होतात पण माझ्या घरावर उगाच दगडफेक नको म्हणून ते वाक्य येथे लिहिणे टाळतो. अर्थात पवारांविषयी अनेकांच्या मनात राग असेल पण त्यांच्याविषयी असले काहीबाही वाईट चिंतण्यापेक्षा त्यांना विरोध करणाऱ्यांनी पवारांनी काढलेल्या रेषेपेक्षा आपली रेषा मोठी काढून त्यांना मागे टाकण्याचा प्रयत्न करावा जे त्यांच्याच पक्षात राहून कधीकाळी विलासराव देशमुख किंवा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी करून दाखविले होते आता एकमेव देवेंद्र फडणवीस नेमके तेच करताहेत. मला वाटते एखाद्याच्या आयुष्याचे वाईट चिंतून उलट आपलेच वाईट होते त्यापेक्षा स्पर्धेत उतरणे केव्हाही चांगले. सुडाचे राजकारण कधीही संपत नसते उलट वाढत जाते, सूडाच्या राजकारणाचे कसे राजकीय बळी जातात त्यावर जळगाव जिल्हा हे उत्तम उदाहरण ठरावे. एक मात्र सध्या जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेनेत चांगले घडते आहे कि नामदार गुलाबराव पाटील यांचे पुन्हा दुसऱ्यांदा मंत्री होणे अख्य्या जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेत बहुतेक सेना नेत्यांना सेना आमदारांना विशेषतः शिव सैनिकांना अजिबात आवडले नाही राज्यमंत्री म्हणून एकनाथ खडसे किंवा गिरीश महाजन यांच्यासमोर अजिबात प्रभावी न ठरलेले गुलाबराव पाटील पुन्हा एकदा तेही पूर्णवेळ मंत्री व्हावेत, असे खुद्द शिवसेनेतच जेथे वाटत नव्हते तेथे इतरांचा आवडी निवडीचा कोणताही प्रश्न नव्हता... 

शरद पवार आणि त्यांचे याही वयातील नेतृत्व त्यावर मला सहजच काहीतरी आठवले. एक ८० वर्षीय वृद्ध गृहस्थ नेहमीच्या तपासणीसाठी म्हणून डॉक्टरांकडे गेले. त्याची तब्बेत डॉक्तरांनी तपासली आणि त्याच्या सुधृढ तब्बेतीचे रहस्य विचारले. मी फारसे काही करत नाही. सूर्योदयापूर्वी उठतो नंतर दोन तास सायकलिंग नंतर घरी येतो दोन ग्लास वाईन घेतो नंतर दिवसभराच्या कामाला लागतो. एक आणखी विचारतो, तुमचे वडील केव्हा गेले डॉक्टर म्हणाले त्यावर गृहस्थ चिडून म्हणाले, कोण म्हणते माझे वडील गेले, ते आता १०० वर्षांचे आहेत आणि एकदम ठणठणीत आहेत. तेही दररोज माझ्या सोबतीने तेच करतात, आत्ताच आम्ही वाईन घेतली नि मी तुमच्याकडे आलो. याचा अर्थ दीर्घायुष्य तुमच्या जीन्स मध्ये आहे. मग आजोबा गेले तेव्हा त्यांचे वय काय होते, डॉक्तरांनी विचारले. गृहस्थ आता अधिकच चिडले, म्हणाले, अहो, तेही अगदी ठणठणीत आहेत आणि १२० वर्षांचे आहेत विशेष म्हणजे आजही त्यांचे तेच आमच्यासारखे लवकर उठून सायकलिंग नंतर दोन ग्लास वाईन. फक्त उद्या ते सायकलिंगला येणार नाहीत कारण उद्या त्यांचे लग्न आहे आणि ते गृहस्थ आल्या पावली घरी परतले. काही दिवसानंतर रेग्युलर चेक अप साठी म्हणून ते गृहस्थ पुन्हा त्याच डॉक्टर कडे गेले नि बघतात काय कि दवाखाना बंद म्हणून त्यांनी जेव्हा शेजारी विचारले जेव्हा त्या काकू डोळे मिचकावत म्हणाल्या, डॉक्टर सकाळी नियमित सायकलिंग करतात आणि आल्यावर वाईन घेतात. सो फॉलो शरद पवार ते नेमके उत्साही व ताकदवान कसे, उगाच त्यांचे वाईट चिंतू नका, नुकसान तुमचेच होईल... 

पण जे घडायला नको होते ते पून्हा एकदा घडल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतेक शिवसैनिकांचा मोठा विरस झाल्याचे उघड चित्र येथे पाहायला मिळते, स्त्रिया त्यांच्या नावाने नाक मुरडून मोकळ्या होतात आणि पुरुष खास खान्देशी शिवी हासडून मोकळे होतात. वास्तविक खुद्द शिवसेनेतच यावेळी म्हणजे महाआघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर ज्याला त्याला जिल्ह्यातील पारोळा विधानसभेचे आमदार आणि शिवसेनेतले लोकप्रिय नेते चिमणराव पाटील मंत्री होणे अपेक्षित होते पण ते घडले नाही किंवा पाचोर्याचे आमदार किशोर पाटील आणि चिमणराव आबा यांचा विचारही न होता पुन्हा एकदा गुलाबराव तेही पूर्णवेळ मंत्री वरून पालकमंत्री म्हणून लादल्या गेल्याने, शिवसेना वरिष्ठांनी माहिती घ्यावी, शिवसैनिकांमध्ये मोठी खळबळ व खदखद निर्माण झालेली आहे. असे म्हणतात कि गुलाबराव पाटील मंत्री म्हणून जेवढे मालामाल झालेले नसतील त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने त्यांचा खाजगी सचिव भ्रष्ट अशोक पाटील  श्रीमंत होऊन मोकळा झाला आहे. पुरावे लवकरच हाती पडताहेत तेव्हा सविस्तर सांगता लिहिता येईल. अस्वस्थता जळगाव जिल्ह्यातल्या शिवसेनेत पुन्हा गुलाबराव मंत्री झाल्याने नक्की आहे पण ज्या कारणासठी हा जिल्हा नामचीन आहे ते सुडाचे राजकारण अद्याप जळगाव जिल्हा शिवसेनेत हवे तसे निर्माण न झाल्याने वेळीच दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनी या नाराजीची दखल घेऊन मराठा समाजाच्या जिल्ह्यातील प्रभावी चिमणराव पाटील यांना मंत्री करणे म्हणजे नक्की पुढले धोके टाळणे हे ठरेल असे मी येथे नक्की नमूद करू इच्छितो. जळगाव जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या परिवर्तन घडवून आणण्याची ताकद मराठा पाटील,  लेवा पाटील आणि गुजर पाटील या तीन ज्ञातींमध्ये पैकी चिमणराव हे मराठा गुलाबराव हे गुजर पाटील तर एकनाथ खडसे लेवा पाटील, लेवा आणि मराठ्यांना एकत्र आणून शिवसेनेत आलेली मरगळ झटकून टाकणे अधिक सोपे जाईल त्यासाठी गुलाबरावांना डच्चू आणि नाराज चिमणरावांना संधी, सेनेची ताकद वाढेल... 

क्रमश: हेमंत जोशी 
Thursday, 17 December 2020

Bade Dino Baad...

Bade Dino Baad...

Hello everyone! Yes, we are meeting bade dino baad...but the situation was so grim around  due to this pandemic that took my birthday of this year (3rd November) too seriously! The celebrations with family & friends continued for good month and half resulting in me being 'heavier' (politically I always was 😅) by some 8 to 9 kilograms; but now back on track with healthy lifestyle and regime and advice of senior most IPS officer who swears by intermittent fasting. Anyways, here too our politicians and bureaucrats too din't do anything worthwhile that perturbed or mattered any of the 'seasoned' journo's. But have some interesting gossips coming your way....

1. "Bhaisaab", I asked a Delhi BJP waala , " If an Amit Shah, J P Nadda, CM Yogi, Devendra Fadnavis, Sharad Pawar of the BJP--Ashish Shelar, Tejasvi Surya and many such tall leaders of the BJP were present in Hyderabad for just winning a Municipal Corporation--isn't Maharashtra a bigger ball game for the BJP than a mere Hyderabad Corporation? He replied with that typical smirk, "Not giving you any date this time, in 2021 Maharashtra will definitely see a change". Believe me, I'm fed up of these BJP's promises of this date & that date. Even their karyakarta's are. Now whenever it has to happen, it will happen. At the same time can't take anything away from Uddhav Thackeray government the way they controlled Corona in our state. Everything depends on the grand old man of Maharashtra Politics. Mark my words! But off the record, BJP has started to woo Sena. Talks are on, I'm told. Those who got this hint, pick up YouTube and see for yourself the speech of CM Uddhav Thackeray at Vidhan Bhavan of recently concluded Winter session. Like his previous two sessions, his reply in this one was not 'pinching' at all to the BJP... it was very friendly and mellowed down, I felt! Enough for me to speculate many undercurrents.

2. So, insiders say, Ajoy Mehta's name has been finalized as RERA chief and after retiring CS Sanjay Kumar too will go to the MERC. Yes, quite the opposite & vice-versa as to what was being said. But wasn't more able and senior Mukesh Khullar (member at MERC) deserving to be the Chairman of MERC after veteran Anand Kulkarni retires in February? Saying that, in this Government anything is possible. Juniors can become Seniors. You never know. Both CS and Advisor to CM can get extensions too... But to tell you more inside news, I can't see Ajoy Mehta stamp on many of the IAS reshuffle nowadays. Look at this. Lokesh Chandra after CIDCO was made Principal Secretary -Water Resources in September 2020. Within 2 months Vijay Gautam managed his way to replace Lokesh. This wouldn't be easily possible friends so easily in the olden days. Welcome back Mr. Vijay Gautam! After 3 years seeing you in the main frame! Make sure the ghost (if any) of the loan waiver scam does not come back to haunt you! 

3. Vijay Gautam reminds me of another Vijay, Vijay Singhal. I feel pretty bad for this one. Heard many bigwigs are playing with his sentiments by gambling his name weather he will join MSEDCL (Asim Gupta will be only PS then) or will they place him at MIDC. Now that Ajoy Mehta's anger has mellowed down with age, Vijay bhai, would advice you to meet him and then our CS very soon. Don't depend on anyone. Anyways, nowadays CS loves winter Mutton coming to his house. They say way to man's heart is through his stomach and many of current IAS  know that 😅 

4. Who said to whom, "I'm the Metro Man-and Metro in Mumbai will be possible only because of me"...Yes please laugh out loud on this joke claimed by an officer in MMRDA whose retirement is on the horizon. He says, if others can be given extension why can't I? CM Uddhav Thackeray loves me and so does Aaditya...Aree but "chotte", never ever there was any question of Thackeray's love for you...the grand old daddy of Maharashtra Politics has other views...  And also you can be given an extension--no problem--but just control that brother of your wife...Last "heard" in EOW someone big has complained about him and referring him as your collection agent😉😆😆

5. Why is our Jitendra 'Bunty' Awhad quiet these days? He didn't appear at his best at the two day winter session too. Aree Bunty sahab, ED has come to Sarnaik's house baba...Don't worry. And yes, please pass my message to Eknath Shinde too...But actually Shinde is the most sorted out politician in Sena for me these days. Works for Thackeray's and Winks at Devendra Fadnavis😉😉 just like Ajit Pawar. 

6. Hmm...last one....a news appeared that 90 crores were spent on Ministers bungalows modifications. Aree baba, this is toh common, move your attention to bureaucrats working at the BMC and MMRDA. These officers too don't leave their houses where huge amounts have been spent on renovations even after their postings are gone. Now the one's who have been allotted these homes have to wait for good 8 to 9 months to convince them to GET OUT. 

Vikrant Hemant Joshi 

Tuesday, 15 December 2020

हमाम में सब नंगे : पत्रकार हेमंत जोशी

हमाम में सब नंगे : पत्रकार हेमंत जोशी 

हि वस्तुस्थिती तर तुम्ही भलेही कबुल करणार नाही पण तुमच्याही आयुष्यात अनेकदा घडली असेल घडत असेल कि पलंगावर पत्नीशी प्रणय ऐन रंगात आला असतांना चुकून तुमच्या तोंडून पत्नी ऐवजी प्रेयसीचे नाव बाहेर पडते नंतरचे सात आठ दिवस मग यथेच्छ धुलाई होते अर्थात हे अलीकडे अनेक तरूणींच्याही बाबतीत घडत असल्याची म्हणाल तर माझी माहिती आहे किंवा तो अनुभव मला माहित आहे कि मुलींच्याही तोंडून नवऱ्यासंगे पलंगावरचा प्रणय ऐन रंगात आला असतांना प्रियकराचे किंवा अन्य पुरुषाचे नाव बाहेर पडते. अशावेळी यातले तरबेज स्त्री पुरुष व्यवस्थित बाजू सांभाळून घेतात अन्यथा घटस्फोट होईपर्यंत प्रकरण अंगाशी शेकते. अर्थात हे मला त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरून आठवले म्हणजे आज मुख्यमंत्री पदावरून ते पायउतार होऊन वर्ष लोटले तरीही अनेक वाहिन्यांचे अँकर बोलण्याच्या ओघात त्यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा करतात. एवढेच काय, पर्वा सभागृहात थेट अजितदादा देखील फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करून मोकळे झाले ज्यावेळी त्यांच्या शेजारी उद्धव ठाकरे बसलेले होते. माझ्या तर असे कानावर पडले आहे कि, श्रीमती रश्मी ठाकरे देखील फडणवीसांचा बोलण्याच्या ओघात मुख्यमंत्री असा उल्लेख करतात. एकदा एका लग्नात एक अनोळखी पुरुष माझ्या शेजारी उभा होता, ओळख झाल्यानंतर गप्पा मारताना त्याचेही तेच झाले. म्हणाला, कालपर्यंत हि वधु माझ्या अंगाखांद्यावर खेळत होती आणि आज दुसऱ्याची झाली. त्यावर, ती तुमची मुलगी आहे का, मी त्याला विचारताच तो म्हणाला, नाही हो, मी तिचा बॉस आहे! आणि हे असेच जर बिनधास्त वागण्या जगण्यात घडत असेल तर चुकून नको ती नावे तोंडून बाहेर पडतात. अर्थात हेही तेवढेच खरे कि स्त्री किंवा पुरुष ज्यांच्या प्रभावाखाली असतात किंवा प्रेमात आकंठ बुडालेले असतात अशांची नावे नको त्या वेळी आपोआप तोंडून बाहेर पडतात जे आजही देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत घडते आहे... 

अलीकडे कुठल्याशा बातम्या देणाऱ्या मराठी वाहिनीने महाआघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री व अन्य मंत्री राज्यमंत्र्यांनी शासकीय बंगल्यांवर केवळ वर्षभरात ९० कोटी रुपयांची केलेल्या उधळपट्टीचे पुरावे सांगितले अर्थात त्यांना हे आणखी विस्ताराने सांगता आले असते म्हणजे मंत्र्यांनी जशी शासकीय बंगल्यांवर उधळपट्टी केली तेच मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात पण घडले आहे, साऱ्याच मंत्र्यांनी आणि अति उच्च शासकीय अधिकाऱ्यांनी स्वतःच्या कार्यालयावर, केबिन्सवर वारेमाप खर्च करून आपण कसे नीच आणि जनतेच्या पैशांचे लुटारू हे सिद्ध केले पण मला सांगा हे पहिल्यांदा घडले आहे का, अजिबात नाही, सारेच नीच व हलकट म्हणजे जो वारेमाप खर्च यांनी केला तसाच खर्च युतीच्या मंत्र्यांनी केला तेच त्या आधीच्या मंत्री मंडळाने केले तेच त्या आधीच्या, वर्षानुवर्षे विशेषतः १९९५ नंतर सतत मी हेच बघत आलो आहे १९९५ आधी असे अजिबात किंवा फारसे घडत नसे, थोडीफार डागडुजी करून नव्याने आलेले मंत्री मुख्यमंत्री, शासकीय कार्यालये किंवा बंगले ताब्यात घेऊन मोकळे व्हायचे पण जसजसा राज्यातला मनमानी कारभार व भ्रष्टाचार हा शिष्टाचार म्हणून काम करू लागला तसतसे हे सारे बेशरम होत गेले, लोकांचा पैसा आपल्या बापाचा माल पद्धतीने वागू लागले. ज्या सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या शासकीय बंगल्याचे कोट्यवधी रुपये खर्च करून नूतनीकरण करून घेतले होते, पंचतारांकित केले होते, त्याच बंगल्यात राहायला येण्यापूर्वी यावेळी पुन्हा अजित पवार महाशयांनी पुन्हा नव्याने लगेचच काही महिन्यात नूतनीकरण करून घेतले, जनतेचे त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून आदर्शाच्या व शिस्तीच्या खोट्या गप्पा मारणाऱ्या या मंडळींनी असे शेण खाल्ले यालाच म्हणतात हमाम में सब नंगे... 

सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत देखभाल डागडुजी व नूतनीकरण हे सिनेमाच्या सेट सारखे असते म्हणजे पॉश दिसते पण त्यास अजिबात आयुष्य नसते कारण बांधकाम खात्यातील अभियंत्यांना आता हे पाठ झाले आहे कि जे काय करायचे आहे ते तात्पुरते करायचे आहे कारण अमुक एका जागेत नव्याने येणारे सचिव, मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, न्यायधीश किंवा अन्य उच्चभ्रू आधीचे तोडून पाडून सारे काही नव्याने करायला सांगणार आहेत ज्यात जनतेच्या पैशांची लूट आणि आपली देखील चांदी होणार आहे. हे सारेच बेशरम आणि तुम्हाला तर माहित आहेच कि बेशरम मंडळींच्या ढुंगणावर झाड उगवले तरी ते न लाजता सांगतात, सावली झाली. त्यामुळे असे विषय सभागृहात देखील चव्हाट्यावर येत नाहीत येणार नाहीत कारण जे आपले कायमस्वरूपी नाही त्यावर करोडो रुपये खर्च करण्यात विरोधी पक्ष देखील आघाडीवर असल्याने हे सारेच्या सारे, चोर चोर मौसिरे भाई पद्धतीचे आहेत. अमुक एखाद्या बंगल्यावर किंवा शासकीय कार्यलयावर देखभाल दुरुस्ती व डागडुजीचे नावाखाली आणि नूतनीकरणाच्या नावाखाली खर्च केल्यानंतर थोडाफार देखभालीचा खर्च सोडल्यास पुन्हा अशा पद्धतीने पुढली दहा वर्षे खर्च केल्या जाणार नाही, असा फतवा जर शासनाने काढला तरच त्यातून दर्जेदार निर्मिती घडू शकते अन्यथा सारेच लुटायला बसले असल्याने दुसऱ्याकडे एक बोट दाखवण्याची हिम्मत त्या त्या वेळेच्या विरोधकांमध्ये देखील अजिबात नाही कारण उरलेली तीन बोटे त्यांची स्वतःकडेच आहेत. विशेष म्हणजे बंगले व शासकीय कार्यालयांचे मंत्रालयाचे नूतनीकरण करतांना अलीकडे हे बेशरम हलकट मंत्री आणि बडे अधिकारी किंवा अन्य महत्वाचे त्या सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंत्यांवर अजिबात अवलंबून न राहता त्यांच्याकडे केवळ निरीक्षणाची जबाबदारी सोपवून बंगल्याचे कार्यालयाचे सारे काम शहरातल्या मुंबईतल्या महागड्या वास्तुविशारदाकडे आणि कंत्राटदाराकडे सोपवून मोकळे होतात थोडक्यात अव्वाच्या सव्वा किंमत या क्षणभंगुर वास्तूंवर खर्च करून आम्ही कसे व किती निलाजरे, सिद्ध करून मोकळे होतात. मला तर असे अनेक मंत्री माहित आहेत कि ते प्रत्येक मंत्रिमंडळात पुन्हा शपथ घेऊन मंत्री म्हणून आले रे आले कि पुन्हा त्याच बंगल्याचे व मंत्रालयातील कार्यालयाचे नूतनीकरण करून मोकळे होतात. या मंडळींना ना लाज ना शरम त्यामुळेच हे असे घडते आहे कारण आम्ही सर्वसामान्य कमालीचे गांडू आहोत... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Sunday, 13 December 2020

पवार कथासार पवारांवर वार : पत्रकार हेमंत जोशीपवार कथासार पवारांवर वार : पत्रकार  हेमंत जोशी 

मुसलमानांच्या जल्लोषात १२ डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस साजरा झाला, जिकडे तिकडे नवाब मलिक यांनी मुंबईत ८० हजार नोकऱ्या देणारे भले मोठे बॅनर्स व पोस्टर्स सगळीकडे पाहायला यादरम्यान मिळाले. या रोजगार मेळाव्यात मुसलमानांचीच चांदी झाल्याचे कानावर पडले. चालायचेच, तरुण हिंदुहृदय सम्राटाचे मित्र जर झिशान सिद्दीकी, बाबा सिद्दीकी किंवा अस्लम शेख यांच्यासारखे अतिमहान मुसलमान नेते घरातले जवळचे मित्र असतील तर पवारांनी मोठ्या खुबीने मुस्लिम मते स्वतःच्या पारड्यात पाडण्यासाठी असले मुसलमान नेत्यांकडून मेळावे भरवले तर त्यात त्यांचे चुकले कुठे ? आंधळा राजा पीठ दळायला बसला की हे असे घडणे अपेक्षित असते. या वाढदिवसा दरम्यान अस्वस्थ दादांच्या कार्यालयातून माझ्या एका पत्रकार मित्राला दादांच्याच एका जबादार पण अस्वस्थ अधिकाऱ्याने एक व्हाट्सअप मेसेज पाठवला त्यावर तसेच पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या अत्यंत खणखणीत लेखावर आणि प्रशांत पोळ यांनी मन अस्वस्थ करून सोडणाऱ्या त्यांच्याही लेखावर मला येथे नेमके काही सांगायचे आहे, कदाचित कोरोनाचे संकट किंवा भय असावे पण येथे १२ डिसेंबरला जसा बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे इत्यादी काही बोटांवर मोजण्या इतक्या नेत्यांच्या वाढदिवसाला जो जल्लोष उत्साह आनंद आम्ही बघत आलोय तसे पवारांच्या बाबतीत मात्र दुर्दैवाने काहीही कुठेही बघायला मिळाले नाही हि वस्तुस्थिती आहे कारण शरद पवार यांना आमचे आवडते नेते म्हणून मुंबैकर मंडळींनी कधी स्वीकारलेच नाही त्यामुळे कदाचित यावेळी नवाब मलिक यांना हाताशी धरून पवारांनी हा प्रयत्न केला असावा कारण महापालिका निवडणुका तोंडावर आहेत पण त्यांचा हाही प्रयत्न नक्की फसला आहे... 

लोकसत्ता दैनिकाचा त्यातील मजकुराचा संदर्भ घेत व्हाट्सअप वर माझ्या पत्रकार मित्राला जो मेसेज पाठवण्यात आला त्यात शरद पवारांनी चक्क लोणकढी थाप मारल्याचे सिद्ध होते. पवार म्हणतात, मुंबईत पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया उभारण्यात आले. ते जेव्हा भारतात आले, तेव्हा त्या गेट जवळ एक व्यक्ती उभी होती. त्या व्यक्तीला बाजू करण्याचा प्रयत्न पोलीस करीत होते. तेव्हा पंचम जॉर्ज यांनी स्वतः खाली उतरून त्यांची भेट घेतली. ती व्यक्ती म्हणजे ज्योतिबा फुले होते. शरद पवारांच्या या संदर्भाला याच मेसेज मध्ये उत्तर देण्यात आले आहे. त्यानुसार, महात्मा फुले यांचे निधन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाले. पंचम जॉर्ज यांची पहिली भारत भेट १९११ साली आणि गेट वे ऑफ इंडियाचे उदघाटन १९२४ साली झाले. मग महात्मा फुले मृत्यूनंतर २१ वर्षांनी जॉर्ज यांना कसे भेटले? कदाचित पवार साहेबांचा पुनर्जन्मावर विश्वास असावा पण तसा विश्वास महात्मा फुले यांचा नव्हता. घनश्याम पाटील यांचे हे लेखन १३ डिसेंबरला राज्यात सर्वत्र फिरत होते जे माझ्या मित्राला दादांच्या कार्यालयातून पाठवण्यात आले. पवारांनी हे असे बोलणे सतत टाळले असते तर मला वाटते त्यांच्याविषयी त्यांच्या घरी आणि दारी असलेली त्यांच्याविषयीची अस्वस्थता दिसली नसती त्यातून शरद पवार कसे अपयशी ठरत गेले त्यावर पुढला परिच्छेद... 

१२ डिसेंबर रोजी शरद पवार यांचा वाढदिवस साजरा होत असतांना त्यांच्यावर खोटे खोटे लिहावे कि नेमके सत्य सांगून मोकळे व्हावे या संभ्रमात मी असतांना माझ्या वाचण्यात दोन अप्रतिम लेख आले. कौतुक कसले व कोणाचे करायचे, या मथळ्याखाली पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लेखणीतून पवारांची जी बिन पाण्याने करून ठेवलेली आहे तो लेख जगभरातल्या मराठी जनतेत खूप गाजला तेच प्रशांत पोळ यांच्या, वैफल्याचे सहस्त्रचंद्र, या मथळ्याखाली केल्या गेलेले लिखाणही असेच जगभरातल्या मराठी मंडळींमध्ये गाजले. हे दोन्ही लेख याठिकाणी मुद्दाम तुम्हाला वाचावयास देत आहे. सावकाश वाचा आणि जाणून घ्या आजही आयुष्याच्या संध्याकाळचा प्रवास करतांना जनतेच्या मनात राज्याच्या या मोठ्या नेत्यांविषयी नेमके काय आहे. लोकांनी आपल्या जाण्याची नव्हे तर खूप खूप जगण्याची निदान वाढदिवसाला तरी तशी दुवा देवाकडे मागायला हवी होती पण पवारसाहेब काही टगे किंवा तुमच्या भरवशावर वाढलेले जगलेले सोडल्यास तसे फारसे मनापासून मनातून कोणाला वाटले नाही आणि नेमके हेच तुमचे अपयश आहे. ज्यांना वाटत होते कि आयुष्यभर पवारांना चिटकून व बिलगून राहावे त्यांना तुम्ही ढकलून बाजूला केले आणि ज्यांना पवार नको आहेत त्यांना बिलगण्यासाठी तुम्ही आयुष्यभर त्यांच्यापाठी पळत सुटले आणि हेच तुमचे मोठे अपयश आहे, यशस्वी होऊन देखील तुम्हाला त्या यशाची फळे चाखता आलेली नाहीत... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

१. भाऊ तोरसेकरांचा लेखाची लिंक  

२.  प्रशांत पोळ यांच्या लेखाची लिंक 

Saturday, 12 December 2020

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : पत्रकार हेमंत जोशी 

माझ्या जे मनात होते ते घडायला सुरुवात झाली आहे जे काम माहेश्वरी समाजाने पुढाकार घेऊन सुरु केले आहे तेच काम प्राधान्याने हिंदूंनी आणि ब्राम्हणांनी करायलाच हवे भलेही दोन दोन बायका करा पण हिंदूंनो भरपूर मुले जन्माला घाला, ब्राम्हणांनो तुमची ती तत्वे बासनात गुंडाळून ठेवा आणि लागा अधिकाधिक पोरे पैदा करायच्या कामाला अन्यथा एक दिवस हिंदूंचा विशेषतः ब्राम्हणाचा पारशी बाबा होईल, औषधाला देखील हिंदू उरणार नाहीत, हे दूरदर्शी माहेश्वरी समाजाच्या लक्षात आले किंबहुना या समाजात अलीकडे मुलींची संख्या तर एवढी रोडावलेली आहे कि त्यांना जातीबाहेर मुली लग्नासाठी म्हणे शोधून आणाव्या लागताहेत. माहेश्वरी समाजाने दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घातल्यास प्रोत्साहन म्हणून अशा दाम्पत्याच्या किंवा त्यांच्या मुलांच्या नावे मोठ्या रकमांच्या मुदत ठेवी बँकेत ठेवण्याचे जाहीर केले आहे. हेच यापुढे देशातल्या विशेषत: या राज्यातल्या ब्राम्हणांनी आणि हिंदूंनी देखील करायला हवे म्हणजे जो दोन पेक्षा अधिक मुले जन्माला घालेल त्याच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन त्या त्या जातीच्या संघटनांनी करणे यापुढे काळाची गरज आहे आणि हे घडले नाही तर माझे म्हणणे सांगणे कसे योग्य होते पुढल्या काही वर्षात तुमच्या ते नक्की लक्षात येईल... 

मुसलमान तेवढे लक्षात येतात संयमी ख्रिसचनांचे तेवढे लक्षात येत नाही पण हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्यात जेवढा असुरी आनंद मुसलमानांना होतो त्यात ख्रिश्चन देखील अजिबात मागे नाहीत, विविध धर्मादाय संस्था आणि विविध दुर्गम भागात काम करणारे पाद्री यांना परदेशातून फार मोठ्या प्रमाणावर जी आर्थिक रसद पुरविण्यात येते त्यातून हिंदूंचे धर्मांतर घडविणे हेच या मंडळींचे प्रमुख उद्दिष्ट किंवा लक्ष्य असते. विशेषतः हिंदूंचे धर्मांतर घडवून आणण्यासाठी भारत विरोधी आंदोलने घडवून गरिबांना अधिक अस्थिर करण्यासाठी किंवा भारताची प्रगती रोखण्यासाठी भारतात आधी धर्मादाय संस्था किंवा धर्मगुरू यांना हाताशी धरून प्रचंड पैसे ओतले जातात किंवा परदेशातल्या महागड्या जीवनावश्यक वस्तू या गरिबांना देऊन त्यांना आपापल्या धर्माकडे पद्धतशीर आकर्षित करण्यात येते महत्वाचे म्हणजे त्यांना रोखण्यात मोठी रिस्क असते विरोध होतो पण हे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांचे विश्व हिंदू परिषदेसारखे अन्य प्रांत फ्रंटवर येऊन काम करतात, धर्मांतराला हाणून पाडतात. अलीकडे म्हणजे केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा असे घडले कि ज्या धर्मादाय संस्था अशा मोठाल्या परदेशी रकमांवर हिंदूंचे धर्मांतर घडवून आण्यात आघाडीवर आहेत त्यांच्यावर आता सरकारने करडी नजर ठेवून त्यांच्यासमोर कायद्याची अडचण उभी करून त्यांना वठणीवर आणण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय संस्था एलआरओ ने अलीकडे अशा बदमाश ५५ संस्था शोधून काढल्या आहेत पण हि संख्या अगदीच नगण्य आहे. माहितीनुसार अशा परदेशी आर्थिक रसदीच्या भरवशावर धर्मांतर घडवून आणणाऱ्या हिंदुस्थानात पाच हजारा पेक्षा अधिक संख्यने या संस्था आहेत. केवळ या ५५ धर्मादाय संस्थांना परदेशातून हे असे हिंदूंचे धर्मांतर घडवून आण्यासाठी ३७०० कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत त्यावरून इतर अशा धर्मादाय संस्थांना केवढ्या रकमेची आर्थिक रसद पुरविण्यात येत असेल कल्पनाच केलेली बरी... 

ज्या कार्यासाठी कामासाठी हे पैसे परदेशातून अशा धर्मादाय संस्थांना पाठविण्यात येतात वास्तवात अशा सामाजिक  कामांवर प्रत्यक्षात अगदीच तुटपुंजी रक्कम खर्च करण्यात येते, उरलेली प्रचंड रक्कम केवळ धर्मांतर करण्यावर, आंदोलने दंगे हिंसा जाळपोळ लव्ह जिहाद किंवा पकडलेल्या आरोपींना सोडविण्यासाठी देण्यात येणारी लाच, मुले विकत घेऊन किंवा आर्थिक सामाजिक दृष्ट्या नाडलेल्या मुलामुलींना आर्थिक आमिषे दाखवून धर्मांतर घडवून आणणे इत्यादी हिंदूंना कमकुवत करणाऱ्या बाबींवर खर्च करण्यात येते, यासाठी मित्रांनो तुम्हाला फार दूर जाण्याची गरज नाही केवळ धारावी परिसरात गुप्तपणे फेरफटका मारून तेथल्या गोरगरीब हिंदू तरुण तरुणींना विश्वासात घ्या, मी जे धर्मांतराचे गूढ उकलले आहे त्याची प्रचिती तुम्हाला तेथे प्रत्यक्ष अनुभवता येईल. इतर कोणताही धर्म जगात किंवा मुख्यत्वे हिंदुस्थानात खतरेमे नाही धोक्यात आलेलो आहोत ते आपण समस्त हिंदू म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, हिंदूंची संख्या यापुढे झपाट्याने वाढलीच पाहिजे. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता नाही पण हि एकमेव संघटना जी हिंदू जनजागृती घडवून आणण्यात आघाडीवर आहे पण आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येईल, थोडक्यात हिंदू अधिक बलशाली बलाढ्य बलवान करावयाचा असेल तर हिंदूंची संख्या मोठी असावी झपाट्याने वाढवायला हवी, संख्येने अल्प असलेले हिंदू, ख्रिश्चन किंवा मुसलमानांसमोर टिकणे अन्यथा अवघड असे काम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांच्या १९२५ च्या स्थापनेपासून भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहतोय त्यासाठी जवळपास शंभर वर्षे ते अथक परिश्रम घेताहेत पण त्यांच्या एकट्याच्या प्रयत्नाने हे हिंदू राष्ट्र होणे कठीण असे काम आहे त्याऐवजी आमची संख्या झपाट्याने वाढणे आता हे आमचेच प्रथम कर्तव्य आहे.... 

क्रमश: हेमंत जोशी 

Wednesday, 9 December 2020

कोण जिंकले कोण कोण हरले : भाग २ : पत्रकार हेमंत जोशीकोण जिंकले कोण कोण हरले : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

या राज्यातल्या विरोधकांचा, प्रत्येक नेत्याचा मग तो नेता कोणत्याही जातीचा विचारांचा पक्षाचा असला तरी, बहुतेक पत्रकारांचा, बहुसंख्य व्यावसायिकांचा, राज्यातल्या जनतेचा, महिलांचा, तरुणांचा, विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा साऱ्यांचा सर्वांचा अत्यंत आवडता लाडका प्रिय नेता म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस त्यांच्यासारखी लोकप्रियता वरून सहानुभूती राज्यातल्या अलीकडच्या कोणत्याही नेत्याला कधीच लाभली मिळाली नाही अपवाद दिवंगत आर आर आबा पाटील यांच्यासारखे एखादे दुसरे. देवेंद्र फडणवीस यांना नुकतेच मिसरूड फुटले होते तेव्हापासून मी त्यांना बघत आलोय बऱ्यापैकी न्याहाळत आलोय. प्रत्येक कार्यकर्त्याला तो अमुक एखाद्या राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे काम करायला लागला कि त्याच्यात नेतृत्व करण्याची आकांक्षा आपोआप निर्माण होते. मुलाचे पाय पाळण्यात पद्धतीने देवेंद्र हे पुढले संघ व भाजपाचे भविष्यातले मोठे नेते त्यांना जवळून बघणार्यांच्या ते लक्षात येत होते पुढे नेमके तेच घडले. जसे लहानपणीच डॉक्टर डॉकटर खेळून मोकळी होणारी पोरगी तारुण्यात प्रवेश करताच वर्षाच्या आत किमान दोन प्रियकर करून मोकळी होईल हे जसे तिला बघणार्यांच्या लक्षात आलेले असते ते तसेच नागपूरकरांचे फडणवीसांना बघतांना वाढतांना लक्षात आले होते, जो तो 
त्यांना अगदी लहानपणापासून बघतांना हेच म्हणत होता कि देवेंद्र बाप गंगाधरराव यांच्यापेक्षा नेतृत्व करतांना नक्की सवाई ठरणार आहेत. मला सतत ४० वर्षे राजकीय पत्रकारिता करतांना असे फार कमी नेते त्या बाळासाहेब चौधरी यांच्यासारखे मनातून मनापासून आवडले त्यात का कोण जाणे पण देवेंद्र फडणवीस नंबर वन अगदी आजही कालही आणि उद्याही... 

नुकत्याच राज्यात पार पडलेल्या निवडणूका त्यात भाजपा आलेले अपयश त्यातून काहींची वाढलेली चिंता काहींना झालेला असुरी आनंद अनेकांना झालेले दुःख त्यावर मला येथे नेमके काही सांगायचे आहे. विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांच्या नेतृत्वावर त्यांच्या कर्तृत्वावर होणारी टीका त्यावर त्यांचे नेमके काय कुठे कसे चुकले हेही नेमके सांगायचे आहे. सध्याचे राजकारणातले सॉफ्ट टार्गेट म्हणजे देवेंद्र फडणवीस यापुढे त्यांनी नेमके काय करायचे आहे कसे वागायचे आहे कोणते निर्णय घेऊन मोकळे व्हायचे आहे त्यावर त्यांनाही काही सांगायचे आहे कारण मोदी आणि शाह या जोडगळीला त्यांच्या निवृत्तीनंतरचे नेते कोण त्यावर नेमके उत्तर सापडले होते त्यावर पहिल्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस होते दुसऱ्या क्रमांकावर योगी आदित्यनाथ तर तिसऱ्या क्रमांकावर खासदार तेजस्वी सूर्या हे होते अलीकडे मात्र दुर्दैवाने हि क्रमवारी त्यांनी बदलली आहे आणि आता पहिल्या क्रमांकावर तेजस्वी सूर्या तर फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत अर्थात त्यात मोठी चूक फडणवीस यांची स्वतःची असली तरी भाजपा आणि भाजपा बाहेरच्या राज्यातल्या नेत्यांनी त्यांची कधी उघड तर कधी आतून चालवलेली छळवणूक व बदनामी हेही एक महत्वाचे कारण आहे शिवाय अत्यंत महत्वाचे म्हणजे फडणवीस यांना ते मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातल्या १०-१२ अत्यंत नालायक नाकर्त्या भ्रष्ट दलाली करणाऱ्या मंडळींनी जवळचे मित्र निकटचे सहकारी महत्वाचे विश्वासू सवंगडी म्हणून फडणवीसांना मोठ्या खुबीने व युक्तीने घेरून ठेवणे मोठे महागात पडले आहे, या नालायकांना त्वरेने दूर करणे हे यापुढे फडणवीस यांचे मोठे महत्वाचे असे काम आहे.... 

केवळ त्यांना घेरणाऱ्या घेरलेल्या अति नालायक अशा १०-१२ सवंगड्यांना जवळच्यांना दूर करणे हाकलून लावणे महत्वाचे ठरणारे नाही तर भाजपा अंतर्गत घुसलेल्या नालायक नेत्यांना दूर करून दूर सारून त्याचवेळी त्यांना नवी टीम पुन्हा नव्याने उभी करणे, चंद्रशेखर बावनकुळे मेधा कुलकर्णी पंकजा मुंडे यांच्यासारख्या कितीतरी दुखावलेल्या व दुरावलेल्या नेत्यांचे पुनर्वसन हेही फडणवीसांनी स्वतः पुढाकार घेऊन करणे गरजेचे आहे एवढेच काय औरंगाबाद मध्ये शिरीष बोराळकर यांच्यासारख्या अति सामान्य नेत्याऐवजी फडणवीस यांनी पंकजा मुंडे यांना स्वतः प्रेस्टिज इश्यू करून उमेदवारी मिळवून दिली असती तर अतिशय ताकदवान सतीश चव्हाण यांच्यासमोर पंकजा यांनी नक्की आव्हान निर्माण करून कदाचित चित्र बदलले असते. चव्हाण यांच्यासमोर बोराळकर म्हणजे सुटलेल्या सांडासमोर भाकड गाय किंवा माकडाने हत्तीणीला सेक्स करण्यासाठी आव्हान करण्यासारखी हि निवडणूक ठरली, तेच पुण्यात आणि नागपुरात पण घडले म्हणजे पुण्यात मेधा कुलकर्णी व नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे किंवा पुन्हा अनिल सोले असे घडले असते तर भाजपाच्या या निवडणुकीत किमान दोन तरी जागा आणखी वाढल्या असत्या आणि कशी जिरवली असे फडणवीसांनी हातवारे करून शरद पवारांना चिडवले असते म्हणजे ते पवारांना वाकुल्या दाखवत मोकळे झाले असते पण या तिन्ही ठिकाणी भाजपाचे उमेदवार शंभर टक्के चुकले नेमके तेच पवारांना भावले फावले. फडणवीस व पवार या मुख्य शर्यतीत देवेंद्र फडणवीसांच्या चुका, पवार आयतेच पुढे निघून गेले. वर्गातल्या अत्यंत बुद्धिमान विद्यार्थ्याला ऐन परीक्षेच्या वेळी टायफाईड व्हावा आणि वर्गातला सामान्य विद्यार्थी त्याच्या पुढे निघून जावा तसे सध्या फडणवीसांच्या बाबतीत घडते आहे. स्वतःच्या हिंमतीवर आणि लोकप्रियतेवर विधान सभेत त्यांनी मिळविलेले प्रचंड यश, पुढे त्यांच्या हातून घडलेल्या लहान मोठ्या चुकांतून विनाकारण झाकोळल्या गेले... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Sunday, 6 December 2020

काही बकवास वृत्तपत्रे व वाहिन्या त्यांच्या कहाण्या : भाग ३ : पत्रकार हेमंत जोशी

काही बकवास वृत्तपत्रे व वाहिन्या त्यांच्या कहाण्या : भाग ३ : पत्रकार हेमंत जोशी 
महाराष्ट्रातही वृत्तपत्रांत काम करणारे किंवा वृत्तपत्रे चालवणारे असंख्य बहुसंख्य चेहऱ्यावर असा काही सुसंस्कृत सोवळे असल्याचा आव आणि भाव चेहऱ्यावर आणतात कि बघणार्याला वाटावे हि माणसे स्वतःचे ढुंगण देखील गोमुत्राने धूत असतील वास्तव मात्र भीषण व भयावह असते, घृणा वाटावी किंवा ओकारी यावी अशी हि माणसे बनावट बकवास बकाल बेदरकार भामटे भस्मासुर किंवा भंकस असतात. अलीकडे लिखाणातूनच तुम्हाला मी सांगितले कि मोठ्या वेगाने भारताचा किंवा महाराष्ट्राचा विशेषतः या कोरोना महामारीनंतर वृत्तपत्रे खपाच्या बाबतीत अमेरिका होतोय थोडक्यात खपाचा वेग वेगाने घसरला आहे मंदावला आहे खाली आलेला आहे आणि यापुढे हि प्रक्रिया अशीच नक्की सुरु राहणार आहे म्हणजे वृत्तपत्रे विकत घेऊन वाचण्याचे फॅड किंवा सवय आपल्यातून झपाट्याने निघून जाते आहे कारण लोकांचा वाचकांचा आता वृत्तपत्रांमधून छापून येणाऱ्या बातम्यांवर विश्वास राहिलेला नाही, सुपारीबाज वृत्तपत्रे त्याचे मालक आणि त्यात काम करणारे यांचे पुरावे लोकांना अगदी उघड दिसत असल्याने तसे घडते आहे घडले आहे घडणार आहे म्हणून राज्य व केंद्र सरकारने लोकांच्या पैशांची लूट थांबविण्यासाठी कडक धोरणांचा अवलंब करून नेमक्या खपावर जाहिराती वितरित करण्याची मोठी गरज आहे, आवश्यकता आहे. जवळपास साऱ्याच वाहिन्या व वृत्तपत्रे खोटी आकडेवारी देऊन ज्या पद्धतीने सार्वजनिक पैशांची लुटालूट करताहेत त्यावर तातडीने त्वरेने अंकुश आणणे अत्यंत गरजेचे आहे... 

अर्थात मोदी सरकारने त्यांच्या गुजराथ पासूनच या शुभ कार्याला सुरुवात केलेली दिसते. अगदी अलीकडे या संदर्भात ईडीने एका गुजराती दैनिकाच्या संचालकाला जाहिरातीसाठी खपाच्या खोट्या आकडेवारी संदर्भात अटक केलेली आहे. आता हे लोण महाराष्ट्रात देखील पसरावे आणि शासनाकडून विविध प्रकारे फार मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेणाऱ्या शासनाला लूट लूट लुटणाऱ्या विविध असंख्य बहुसंख्य वृत्तपत्रे व वाहिन्यांच्या मालकांना, तसेच त्यांना कायम चिरीमिरी घेऊन मदत करणाऱ्या शासकीय नोकरदारांना विविध संबंधितांना ताब्यात घेऊन नेमकी चौकशी करावी, वर्षानुवर्षे सततची दररोजची होणारी लूट थांबवावी. वृत्तपत्राचा खोटा खप दाखवून शासकीय तिजोरीवर किंवा लोकांच्या खिशावर दरोडा टाकण्यापेक्षा या मंडळींनी वाहिन्यांचे प्रसारण किंवा दैनिकांचे वितरण थांबवावे, धंदा बंद करून मोकळे व्हावे जसा निर्णय मुंबई मिरर या इंग्रजी सायं दैनिकाने घेतला आहे त्यांनी खपाअभावी आपल्या साऱ्या आवृत्त्या बंद करण्याचा मला वाटते  योग्य असा निर्णय घेतला आहे. हे अतिशय छान घडले कि सरकारी तसेच खाजगी जाहिरात संस्थांनी अधिकाधिक मूल्याच्या जाहिराती द्याव्यात, यासाठी आपल्या दैनिकाची खोटी आकडेवारी सादर करणाऱ्या एका माध्यमगृहाच्या नावाजलेल्या शासनावर जाहिरातींसाठी दबाव आणणाऱ्या पिव्हीएस शर्मा नावाच्या या संचालकाला नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ईडी ने अटक करून वृत्तपत्रे व वाहिन्यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण केलेली आहे, सध्या शर्मा महाशय गजाआड तर आहेतच पण ईडी ने त्यांना सारे हिशेब लेखी स्वरूपात मागितले आहेत असे आपल्या राज्यात देखील घडले तर जेमतेम किंवा तुटपुंजा पगारावर विविध वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांमध्ये काम करून फार मोठ्या प्रमाणावर काळे धन कमावणाऱ्या पगारदारांना किंवा मालकांना मोठा धक्का बसेल विशेष म्हणजे या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे खरे विकृत स्वरूप लोकांसमोर नक्की उघड होईल... 

आमचे पत्रकार मित्र राजेश राजोरे यांच्या पत्रकारितेतील वास्तव या पुस्तकाचा आधार घेऊन मला न दिसणाऱ्या न खपणाऱ्या महाराष्ट्रातील देशातील वर्तमान पत्रांचा प्रचंड खप दाखवून किंवा खपाची आकडेवारी फुगवून अगदी सहज शासकीय अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना हाताशी धरून जाहिरातींद्वारे शासनाला अप्रत्यक्ष जनतेला लुटणाऱ्या विविध वृत्तपत्रे व वाहिन्या बाबत खूप काही सांगता लिहिता येईल. हे पुस्तक कुठे उपलब्ध असल्यास अवश्य वाचावे म्हणजे मीडिया चे हिडीस स्वरूप तुम्हाला नेमके कळेल. विविध शासकीय अधिकाऱ्यांना विविध आमिषे पुढे करून कोणत्याही मार्गाने आधी आपली शासकीय यादीत वर्णी लावणे नंतर दर्जा वाढवून घेत सरकारी तिजोरीवर कित्येक पिढ्या दरोडे टाकणे हे वृत्तपत्रे व वाहिन्यांचे जे कुकर्म सतत सर्हास सुरु आहे त्यावर जी अहमदाबाद ला सुरुवात झाली आहे त्याचे लोण देशात व महाराष्ट्रात पसरून दबाव टाकून देशाची होणारी लूट आता थांबू शकते हे शर्मा यांना ज्यापद्धतीने ईडीने ताब्यात घेतले आहे, मला वाटते एक चांगली सुरुवात आहे. शासकीय यादीत आधी समावेश त्यानंतर विविध खात्यांकडे जाहिरातींसाठी तकादा हे जे अजिबात खप नसणाऱ्या विविध वृत्तपत्रांचे अन्य मीडियाचे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात माहिती व जनसंपर्क खात्यातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कधी दबाव टाकून तर कधी लाच देऊन आर्थिक लुटीचा जो फार मोठा धंदा सारीच मीडिया उजळ माथ्याने करून वरून लोकांनाच उपदेशाचे डोस पाजते आहे या विविध मीडिया मालकांना वठणीवर आणणे त्यांना त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे अत्यावश्यक झालेले आहे.  जाहिराती देतांना साहजिकच वर्तमानपत्राचा किंवा वेगवेगळ्या मीडियाचा खप किंवा दर्शक मोजल्या जातो आणि हे बहुतेक सारेच खोटे आकडेवारी पुढे करून शासकीय नियमावलीत आपला प्रवेश करून पुढे कायम लुटणे हा यांचा धंदा होऊन बसतो आणि त्यावरच आता वचक ठेवणेनजर ठेवणे अशांना शिक्षा होणे आवश्यक असे कर्तव्य आहे त्यात सरकारने हयगय न करता मीडिया ला अजिबात न घाबरता नेमके सत्य शोधले पाहिजे... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Saturday, 5 December 2020

कोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशीकोण जिंकले कोण कोण संपले : पत्रकार हेमंत जोशी 
शिवसेना व भाजपाने आपणहून ठरविलेच असेल कि राज्यातले स्वतःचे राजकीय अस्तित्व खालसा करायचे तर शरद पवार यांनी चालून आलेली सुवर्ण संधी का म्हणून गमवावी ? एखाद्या कामातुर कामांध पुरुषाला शेजारणीने अचानक मागून येऊन घट्ट मिठी मारावी अशावेळी त्या कामांधने तिला मिठीत पकडलेल्या बाईला  ताई म्हणून वाकून नमस्कार का करावा, तसे शरद पवार यांचे, ज्यांना सत्तेचे आकर्षण आहे त्या पवारांना सेना भाजपाने आपणहून संधी उपलब्ध करून द्यावी आणि पवारांनी आयत्या चालून आलेल्या संधीकडे पाठ फिरवावी असे नक्की घडणारे नाही घडणारही नाही. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणूकीत एक अमरीश पटेल आणि एक काँग्रेसचा उमेदवार सोडले तर इतर सारे पवारांचेच निवडून आले आहेत कारण अमरावती मधनं निवडून आलेले गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या घरातले त्यांचे जवळचे नातेवाईक किरण सरनाईक हेही अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी तोही पवारांचा गेम होतो, नेम अचूक लागला, गाफील श्रीकांत देशपांडे थोड्या मतांनी पराभूत झाले, सतत आजारी असणे किंवा पुणे मुंबईत अधिक  राहणे रमणे त्यांना चांगलेच महागात पडले वरून त्यांचे ब्राम्हण असणे त्यामुळे त्यांच्याच महाआघाडीच्या ब्राम्हणेतर नेत्यांनी त्यांना अजिबात सहकार्य न करणे त्यांना महागात पडले, पैठणी व पैसे वाटप शिवाय हळुवार मतदार संघ बांधणाऱ्या किरण सरनाईक यांना त्यामुळे यश मिळविणे खूप सोपे गेले, भाजपाला संपवितांना पवारांनी शिवसेनेचा देखील अलगद काटा काढला... 

माझे असे कितीतरी मित्र आहेत जे अगदी तोंड फाटेपर्यंत पत्नीची तरफ करतात, ती समोर असतांना थेट प्रभू रामचंद्रांच्या भूमिकेत शिरतात आणि बायकोचे किंवा इतरांचे लक्ष नसतांना इतरही मैत्रिणींना घट्ट पकडून ठेवतात, डॉक्टर डॉक्टर खेळ खेळून मोकळे होतात, एकाचवेळी बायकोला मुठीत आणि बायकांना मिठीत घेऊन मोकळे होतात. अमरावती शिक्षक मतदार संघात श्रीकांत देशपांडे या शिवसेनेच्या उमेदवाराचे बाबतीत नेमके हे असेच इतर त्यांच्या नेत्यांचे चालू पुरुषासारखे घडले, देशपांडे हे शिवसेनेचे म्हणजे महाआघाडीचे अधिकृत उमेदवार त्यामुळे वरकरणी महाआघाडीचे जे नेते मंत्री आमदार इत्यादी देशपांडे यांना आज बढो म्हणत होते आतून मात्र विरोधकांना विशेषतः किरण सरनाईक यांना डोळा मारून मोकळे झाले होते. महत्वाचे म्हणजे जे श्रीकांत देशपांडे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सांगितले होते कि मला अपक्ष म्हणून हि निवडणूक लढवू द्या मला केवळ पाठिंबा द्या मी नक्की निवडून येतो त्यांचे हे सांगणे उद्धव ठाकरे किंवा इतर शिवसेना नेत्यांनी फारसे मनावर घेतले नाही वरून विदर्भात अलीकडे ब्राम्हणांविषयी निर्माण झालेला प्रखर विरोध, देशपांडे पराभूत झाले थेट घरी गेले. तेच नेमके नागपुरात देखील घडले, एक देवेंद्र फडणवीस यांचा मनापासून पाठिंबा आणि प्रचार सोडल्यास संदीप जोशी यांची यावेळी एकही जमेची बाजू नव्हती आणि अभिजित वंजारी तुलनेत साऱ्या बाबतीत उजवे ठरत गेले, भाजपाने तेही नागपुरात पराभूत होणे म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या मुलीने मुसलमानाच्या घरात गेल्यासारखे तेथे घडले, भाजपाने मोठे नाक कापून घेतले गरज नसतांना... 

नागपुरातील भाजपाचे लोकमान्य लोकप्रय आमदार अनिल सोले हेच यावेळी उमेदवार म्हणून रिपीट झाले असते तर नक्की वेगळे चित्र बघायला मिळाले असते पण दूरदर्शी चतुर समजणाऱ्या भाजपा नेत्यांनी मोठी चूक केली सोले हे नितीन गडकरी गटाचे म्हणून त्यांना उमेदवारी नाकारली, गडकरी यांना सतत डावलणे यात गडकरी यांच्या चुका अधिक आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. सोले कि जोशी, वर्षभर नेमके नागपूर भाजपा मध्ये हेच सुरु होते आणि सोले यांना  उमेदवारी कि जोशी यांना आणि त्यांच्या या गोंधळात इकडे  तेली समाजाचे अभिजित वंजारी तेली माळी कुणबी या भाजपावर नाराज गटाला सोबतीने घेऊन पद्धतशीर मतदारसंघ बांधत होते वास्तविक महापौर असणाऱ्या संदीप जोशी यांनी निदान यावेळी तरी घाईने निवडणूक लढवायला नको होती किंवा सोले व जोशी या दोन्ही ब्राम्हणांना डावलून अगदी सहज निवडणूक जिंकून येण्याची शक्यता असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांचे जर उमेदवारी देऊन भाजपाने पुनर्वसन केले असते तर जंग जंग पछाडून देखील अभिजित वंजारी यांना हि निवडणूक जिंकणे कठीण होऊन बसले असते. मोदी गट आणि गडकरी गट त्यातून विदर्भात विशेषतः नागपुरात किंवा थेट राज्यातही भाजपा स्वतःचे मोठे नुकसान करवून घेते आहे. याच अनुषंगाने भाजपा अंतर्गत गटातून दोन अत्यंत महत्वाच्या बातम्या कानावर आलेल्या आहेत. चंद्रकांत पाटलांचे अलीकडे शरद पवार यांच्याशी जुळलेले सूर आणि नितीन गडकरी यांना लवकरच होऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारा दरम्यान डच्चू मिळण्याची दाट शक्यता या त्या दोन बातम्या पैकी गडकरी यांनी म्हणे भाजपा अध्यक्षांना सांगितले आहे कि डच्चू देण्याऐवजी मला आधी  कल्पना द्या मीच तब्बेतीचे कारण पुढे करून राजीनामा देईल. जे या राज्यात पवारांना शिवसेना व भाजपा मध्ये घडवून आणायचे होते त्यात ते यशस्वी ठरले ते कसे त्यावर नक्की मी लवकरच पुरावे मांडून मोकळा होणार आहे....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी