Saturday, 7 November 2020

आंबेडकरांनी पुन्हा एक हिरा गमावला... पुरुषोत्तम आवारे पाटील

आमचे मित्र पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील यांनी केलेले लिखाण येथे देत आहे, अवश्य वाचावे नंतर 

त्याखाली असलेल्या माझ्या लिखाणाकडे आपण वळावे...

आंबेडकरांनी पुन्हा एक हिरा गमावला...

राजकारणात प्रचंड महत्वाकांक्षा असणारी माणसं येतात हे नवीन नाही,झटपट आपला ग्राफ कोणत्या पक्षात वाढेल याची गणिते करून ते पक्षही निवडत असतात अन काही काळ काम केल्यावर भविष्याची रेखा धूसर दिसायला लागली की तेवढ्याच ताकदीने नवी रेखा खेचतात, नवा गडी नवे राज सुरू करतात...

झटपट उमेदवारी,लोकप्रियता आणि कार्यकर्त्यांचे मोहोळ प्राप्त होणारा एकमेव पक्ष सध्या महाराराष्ट्रात आहे,त्याचे नाव "वंचित बहुजन आघाडी" अर्थात ऍड.बाळासाहेब आंबेडकर हे नाव आलेच.नेता मृदू मनाचा आहे,प्रतिभावंत माणसांवर लवकर भाळतो,जीवापाड भरोसा ठेवतो अन नवी एन्ट्री घेणाऱ्याला मग आकाश ठेंगणे वाटायला लागते.नवा कार्यकर्ता कम नेता अधिक जवळ येतो आणि काही काळातच त्याचे या वंचित प्रवाहात मन रमत नाही,

आठवा लोकसभा निवडणुकीत वंचितवर किती उमेदवार उभे होते अन आता ते कुठे आहेत ? नेत्याने पाठ फिरवली की स्थानिक पदाधिकारी त्यांच्याही चार पावले पुढे होतात,लोकसभेत झालेल्या प्रचाराच्या विराट सभा अन चैतन्य बघून तिसरी शक्ती उदयाला येतेय हा समज पक्का होण्याआधीच हा बर्फाचा इमला वितळतो,असे आणखी किती दिवस,महिने,वर्ष सुरू राहणार आहे,माहीत नाही.नांदेड जिल्ह्यात डॉ.यशपाल भिंगे ही ताकदीची प्रतिभा वंचित जवळ होती,याच माणसाने अशोक चव्हाण सारखा संस्थानिक घरी बसवला ,लेखक,साहित्यिक असणाऱ्या भिंगे यांनी मौर्य प्रतिष्ठान मार्फत जिल्ह्यात जनांचा मोठा प्रवाहो निर्माण केल्यावर हा रेडिमेड नेता राष्ट्रवादी काँग्रेसने जवळ केला,राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत त्याला स्थानही दिले,बाळासाहेबांनी मराठवाड्यात जे अनेक हिरे गमावले त्यात आणखी एकाची भर पडली.
 
हे असे का होते ? नेत्यांचे भाबडे प्रेम की कार्यकर्त्यांची महत्वाकांक्षा ? नेत्याची निर्व्याज माया की कार्यकर्त्यांचे चतुर नियोजन ? नेत्याची धरसोड की कार्यकार्याची घाई ? प्रश्न असंख्य आहेत ,उत्तर मात्र टप्प्यात नाही,असो, वंचित मधून नेतृत्वाचे धडे घेतलेल्या नव्या आमदार डॉ.यशपाल भिंगे याना सदिच्छा... कुठेही जा...वंचितांच्या रांगड्या भूमीवर नांगर चालविणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची हिम्मत जिवंत ठेवा....

 पुरुषोत्तम आवारे पाटील

1 comment:

  1. अगदी बरोबर !असे ही म्हणता येईल की अॅ.बाळासाहेब आंबेडकर नवीन उमेदवार तयार करून दुसऱ्यांच्या कळपा तरी सोडत नाहीत ना असा अर्थ ध्वनित होत आहे

    ReplyDelete