Saturday, 28 November 2020

विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या : पत्रकार हेमंत जोशी

विविध वाहिन्या त्यांच्या कहाण्या : पत्रकार हेमंत जोशी 
विविध वृत्तपत्रे विविध वाहिन्यांमधून धडपडणारी तरुण पिढी बघितली कि आनंद होतो त्यांच्या धडपडण्याचे कौतुकही वाटते.  बातम्या देणाऱ्या झी मराठी वाहिनीमधून काढून टाकण्यात आलेल्या किंवा तडकाफडकी राजीनामा देण्यास भाग पाडलेल्या आशिष जाधव विषयी नेहमीच माझ्या डोळ्यात कौतुक असायचे. त्याला जेव्हा निरगुडकर यांच्यानंतर झी वाहिनीमध्ये तेही थेट निरगुडकरांची खुर्ची मिळाली, एवढी मोठी संधी, कौतुक वाटले. अशी प्रचंड संधी चालून आल्या नंतर आशिष जाधव यांनी या संधीचे सोने करायला हवे होते पण दुर्दैवाने त्यांच्याकडून ते अजिबात घडले नाही याउलट ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने म्हणा कि ओळखीने सुभाषचंद्र गोयल यांनी आशिष यांना त्यांच्या कुवतीपेक्षा मोठी जबाबदारी टाकली होती त्या जाधव यांना संपादक म्हणून किंवा एवढ्या मोठ्या वाहिनीचे प्रमुख म्हणून भान राखता आले नाही वरून आपण जणू राष्ट्रवादीचे किंवा मराठा मोर्च्याचे प्रवक्ते या भूमिकेतून आशिष नको त्या आक्रस्ताळ्या भूमिका घेत गेले बोलत राहिले त्यातून त्यांचे व्यक्तिगत नुकसान आज झाले असले तरी आपल्या वाहिनीची वाट लागते आहे हे सुभाषचंद्र गोयल यांच्या लक्षात आले आणि त्यांनी आशिष जाधव यांना बाहेर पडण्यास सांगितले. माझ्या या अतिशय आवडत्या लाडक्या तरुणाने खुबीने युक्तीने काही बाबतीत कुवत नसतांनाही एबीपी वाहिनी सामान्य वकुबीच्या राजीव खांडेकर पद्धतीने पुढे नेली असती तर आशिष आणखी आणखी मोठे होत गेले असते. ज्या राष्ट्रवादीची व मराठा मोर्चाची अगदी उघड सतत बाजू आशिष जाधव यांनी  विनाकारण घेतली, आता त्यांना लगेचच साम टीव्ही आपल्याकडे सामावून घेईल तर अधिक बरे होईल अन्यथा जाधव यांचाही वागळे होण्यास येथपासून सुरुवात होईल... 

श्रीमान उदय निरगुडकर यांना न्यूज १८ लोकमत पुन्हा सेवेत घ्यायला तयार नाही, इतर मराठी वाहिन्या त्यांच्या मते एकतर त्यांच्या तोडीच्या नाहीत किंवा इतर वाहिन्यांना निरगुडकरांना सामावून घ्यायचे नाही त्यामुळे सुभाषचंद्र गोयल त्यांच्या अतिशय जवळच्या मित्राला जे सांगतेहत त्यावरून त्यांना सतत अनेकदा, मला पुन्हा आपल्याकडे घ्या, अशा आशयाचे मेसेजेस निरगुडकर करतात किंवा अनेक मध्यस्थांमार्फत त्यापद्धतीने प्रेशराइज करतात असे मला कळले. गोयल यांना चांगले संपादक मिळाले नाहीत आणि निरगुडकर तर रिकामे बसून निरोपाकडे सारखे डोळे लावून आहेत  असे काहीसे या दोघांच्याही बाबतीत एखाद्या प्रौढ स्थळासारखे सतत घडल्याने नाही म्हणायला अगदी अलीकडे सतत टाळणाऱ्या सुभाषचंद्र गोयल यांनी नाही नाही म्हणत उदय निरगुडकर यांच्या सततच्या विनंत्यांना मान देऊन प्रत्यक्ष भेट दिली. भेटीतले बरेचसे बोलणे मला माहित आहे पण त्यांचे प्रमुख मुद्दे आधीचेच कि, एकतर मी मालक असूनही माझ्या पाठी तुम्ही माझ्याविषयी वाट्टेल ते आणि नको नको ते बोलता आणि मला अंधारात ठेऊन व्यवहारात किंवा अन्यत्र माझ्यापेक्षा मोठे होण्याचा उगाच प्रयत्न करता जे मला अजिबात रुचले आवडले नाही, नेमके हेच मी उदय निरगुडकर आणि निखिल वागळे या दोघांना ते नोकरीत असतांना सांगत होतो कि मालकाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जाऊ नका लाथ बसेल, माझे म्हणणे नेमके खरे ठरले. डबघाईला आलेली झी मराठी बातम्यांची वाहिनी आणि कोणत्याही वाहिनीत नसलेले निरगुडकर पुन्हा एकत्र यायला हरकत नाही किंबहुना गोयल यांनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीमुळे निरगुडकर यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्यास त्यात वावगे ते कसले, फक्त आपण एकमेव बुद्धिमान, या रांगेत त्यांनी स्वतःला आणून ठेऊ नये म्हणजे त्यांचे भरकटलेले जहाज पुन्हा मार्गी लागेल, दर्शकांना त्यातून निदान थोडेसे बरे काहीतरी बघायला ऐकायला मिळेल. निरगुडकर झी वाहिनीत पुन्हा रुजू होण्याची शक्यता अजिबात आता नाकारता येत नाही... 

एबीपी माझा चे राजीव खांडेकर असोत कि अन्य बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्या, अशुद्ध मराठी तेही रेटून बोलायची जी स्पर्धा या वाहिन्यांमध्ये लागलेली आहे बघून वाटते या अशा सततच्या अशुद्ध मराठी बोलणाऱ्या अँकर्स मंडळींना शंभर मारल्यानंतर एक मोजावी, विशेष म्हणजे या समस्त वाहिन्यांच्या संपादकांना मालकांना प्रमुखांना या लाजिरवाण्या प्रकाराची ना खंत आहे ना खेद आहे ना लाज आहे. मराठी अशुद्ध बोलणारे शिक्षक आणि अशुद्ध मराठी बोलणारे अँकर्स, अशांच्या ढुंगणावर लाथ घालून त्यांना हाकलून लावणे अत्यावश्यक असतांना वरून याच मंडळींना महत्व देणे म्हणजे घरच्या बाईला घराबाहेर काढून रांडेला मंगळसूत्र घालण्यासारखे. असो, आशिष जाधव यांना झी मराठीने तडकाफडकी काढणे त्याचवेळी उदय निरगुडकर यांना सतत टाळणाऱ्या सुभाषचंद्र गोयल यांनी भेट देणे हे योगायोग एकाचवेळी घडल्याने मला बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांमधली बदमाशी कशी असते हे लिहावेसे वाटले. तिकडे टीव्ही ९ मधल्या बातमीने सतत हसायला येते कि संपादक उमेश कुमावत यांना वाहिनीमध्ये कोणीतरी दररोज घरचा टिफिन घेऊन येते म्हणून काढून टाकण्यात आलेले आहे किंवा राजीनामा देण्यास सांगितले आहे. इतर बातम्या देणाऱ्या जवळपास साऱ्याच मराठी वाहिन्या कमजोर पडत असतांना किंवा त्यांच्यात अजिबात दम नसतांना आधी अति सामान्य वाटणाऱ्या टीव्ही ९ या मराठी वाहिनीने अचानक झेप घेऊन मार्केट मध्ये स्वतःला ज्या उत्कृष्ट पद्धतीने एस्टॅब्लिश केले त्याचे फार मोठे श्रेय दुर्दैवाने या वाहिनीतून बाहेर पडलेल्या रोहित विश्वकर्मा यांनाच जात असले तरी त्यांच्यानंतर आलेल्या उमेश कुमावत या सामान्य वकुबीच्या संपादकाने नाही म्हणायला या वाहिनीला मागे पडू दिलेले नाही हे कुमावत यांचे कौतुकास्पद कार्य त्यामुळे अमुक एखादे क्षुल्लक निमित्त पुढे करून जर उमेश कुमावत यांना टीव्ही ९ मधून बाहेर पडण्यास जर सांगण्यात येत असेल तर तो मॅनेजमेंटचा चांगला निर्णय आहे असे म्हणणे अजिबात योग्य ठरणारे नाही. अतिशय कर्तबगार पत्नी लाभलेले कुमावत एखाद्या टिफिनच्या प्रेमात पडतील अजिबात वाटत नाही, टिफिन आणणारे आज कुमावत साठी टिफिन आणत असतील आधी कुणा दुसऱ्यासाठी किंवा उद्या अन्य तिसऱ्यासाठी टिफिन आणून मोकळे होतील... 

क्रमश: हेमंत जोशी 

1 comment:

 1. नमस्कार हेमंत जोशी!

  उदय निरगुडकर हे मालकापेक्षा मोठे होऊ पहात होते असा आरोप ठेवून त्यांना काढले. तर उमेश कुमावत यांना काहीही ठोस कारण न देता काढले. एकंदरीत वाघ म्हंटलं तरी खाणार आणि वाघोबा म्हंटलं तरीही खाणार. मालकाची जात ही अशीच! तिला दारी कुत्रं बांधल्याखेरीज झोप येत नाही. आपण कुत्रं बनण्यालायक आहोत का याचा विचार करावा आणि मगंच मालकाच्या दारी नोकरी पत्करावी.

  प्रेक्षकांना हल्ली दारी बांधलेली कुत्री ताबडतोब ओळखता येतात. ही समस्त मालकांची डोकेदुखी आहे. ती आपण प्रेक्षकांनी वाढवली पाहिजे. हिलाच प्रेक्षकांचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य असंही म्हणतात. प्रसारमाध्यमांप्रमाणे प्रेक्षकांनाही अभिव्यक्तीस्वातंत्र्य असते. हा तुमच्या लेखाचा (मी लावलेला) मथितार्थ आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete