Tuesday, 17 November 2020

अशोक चव्हाण : तो मी नव्हेच : पत्रकार हेमंत जोशीअशोक चव्हाण : तो मी नव्हेच : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे एक तरुण आणि एक तरुणी एकमेकांना अनोळखी, जालना ते चिखली प्रवास करतांना एकमेकांच्या शेजारी बसले होते, आधी खिडकीजवळ सीट पकडतांना एकमेकांशी भांडले आणि उतरतांना मात्र चक्क एकमेकांच्या प्रेमात पडले कारण राज्यातले रस्ते एवढे खड्डेमय झाले आहेत कि त्या प्रवासात एकदा हा तिच्या अंगावर पडायचा आणि आपोआप तिचा मुका घेतला जायचा, कधी खड्डा आल्याने ती त्यांच्या अंगावर पडायची आणि आपोआप मुका घेऊन मोकळी व्हायची त्यातून सुरुवातीला भांडणारे हे एसटीतून उतरतांना मात्र एकमेकांच्या प्रेमात पडले होते, हातात हात घेऊन गाव आल्यावर एसटीतून उतरले. आजकाल राज्यातल्या अनेक भागातून नैसर्गिक पद्धतीने पुन्हा बाळंतपणे होऊ लागलेली आहेत, दिवस भरले, वेदना सुरु झाल्या कि अनेक गर्भार बायका दवाखान्यात न जाता रिक्षेत बसतात पुढे काही वेळाने खड्डेमय रस्त्यांमुळे त्यांची प्रसूतीची वेळ आली कि चार बायका आडोशाला तिच्याभोवताली चादर धरतात कि झालीच म्हणून समजा खड्डेमय रस्त्यांमुळे नैसर्गिक प्रसूती, हे असे प्रकार या राज्यात बकाल भंगार दर्जाहीन खड्डेमय रस्त्यांमुळे सतत घडत असल्याने मी माजी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि बांधकाम खात्याचा शतश: ऋणी आहे. युती सरकारचा मी यासाठी ऋणी आहे कि त्यांनी सवंग लोकप्रियतेच्या मागे लागून राज्य सरकारच्या अख्त्यारीतले टोल नाके बंद केले त्याचवेळी सरकारकडे पुरेसे आर्थिक नियोजन नसल्याने, फंडस् ची अतिशय कमी असल्याने रस्त्यांची देखभाल करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पैसे नाहीत परिणामी खड्डेमय रस्ते म्हणजे रस्त्यात खड्डा नव्हे तर खड्ड्यात रस्ता असे आजचे या राज्याचे महाभयावह चित्र आहे... 

ज्यांच्याकडे रस्त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी आहे त्यांचे टोल बंद आहेत आणि सरकार त्यांना पैसे उपलब्ध करून देत नाही, जे थोडेफार पैसे शासन सार्वजनिक बांधकाम खात्याला उपलब्ध करून देतात ती रक्कम रस्त्यांच्या दुरुस्तीवर फारशी खर्च न होता अभियंते आमदार कंत्राटदार मंत्री विविध कर्मचारी पत्रकार स्थानिक नेते इत्यादींच्या हमखास खिशात जाते आणि ज्या राज्याचे ज्या राष्ट्राचे रस्ते चांगले नाहीत असे राज्य किंवा राष्ट्र कधीही प्रगती करूच शकत नाही तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हात जोडून विनंती कि बांधकाम खात्याला त्वरेने फंड्स उपलब्ध करून द्यावेत किंवा प्रसंगी जनतेची काही प्रमाणात नाराजी पत्करून चार चाकी गाड्यांकडून बिनधास्त टोल वसूल करण्यास सांगावे, आम्हाला लाज भीती शरम घृणा लज्जा वाटते अशा रस्त्यांवरून फिरतांना जे राज्य सरकारच्या मालकीचे आहेत. विशेष म्हणजे हाच टोल माफीचा प्रस्ताव राज्यातल्या नॅशनल हायवेजला देखील लागू करावा म्हणून चंद्रकांत पाटील जेव्हा केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेले होते तेव्हा तो प्रस्ताव दूरदर्शी अभ्यासू अनुभवी नितीन गडकरी यांनी अक्षरश: केराच्या टोपलीत फेकून दिला होता जो त्यांचा निर्णय अतिशय योग्य होता अन्यथा राज्यातल्या राष्ट्रीय महामार्गाची पण अशीच वाट लागली असती, राज्याच्या प्रगतीचे आणखीनच वाटोळे झाले असते. विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील रस्त्यांची दुर्दशा एड्स झालेल्या वेश्येसारखी झालेली आहे अर्थात कोकण खान्देशात देखील तेच चित्र आहे. टोल घ्या पण रस्ते दुरुस्त करा असे यापुढे लोकांनीच सरकारला आपणहून सांगायला हवे अन्यथा रस्त्यावर प्रवास करतानाची यादिवसातली संकटे आणखी आणखी वाढत जाणार आहेत... 

अत्यंत महत्वाचे असे कि यावेळेचे अशोक चव्हाण पूर्णतः वेगळे आहेत त्यांनी आलेल्या वाईट अनुभवातून स्वतःमधे अनेक चांगले बदल घडवून आणले आहेत, एरवी एवढ्या वर्षात मला फारसे न भावलेले अशोक चव्हाण यावेळी माझ्या आवडत्या किंवा आवडलेल्या मंत्र्यांपैकी एक असतील, एक आहेत. सुरुवातीला मुंबईत आलेला पत्रकार उदय तानपाठक जसा गावठी दिसायचा बोलायचा आणि आता कसा तो पॉश गाडीतून फिरतांना एकदम राजडिम्बा दिसतो तसे वागण्याच्या वृत्तीच्या कामांच्या बोलण्याच्या वागण्याच्या व्यवहाराच्या बाबतीत अशोक चव्हाण यांनी स्वतः मध्ये छान बदल घडवून आणले आहेत. अशोकजी आणि उद्धवराव तुम्हाला म्हणून सांगतो कि देवेंद्र फडणवीस यांनी अनेक अडचणीतून समृद्धी महामार्ग उभारण्यास सुरुवात केली आणि चमत्कार घडला विदर्भ खान्देश आणि मराठवाड्याच्या मतदारांमध्ये एकाकी फार मोठा आदर त्यांच्याविषयी निर्माण होऊन त्याचा मोठा फायदा भाजपा व फडणवीस दोघांनाही विधानसभा व लोकसभा निवडणुकीत झाला. तुम्ही दोघांनीही तडफेने त्वरेने सोबतीला त्या अजितदादांना घेऊन जाहीर शपथ घ्या आणि राज्याच्या मालकीच्या रस्त्यात चांगले बदल आधी घडवून आणा त्यानंतर रजनीकांत सारखे गॉगल लावून या झक्कास केलेल्या रस्त्यांवर उभे राहून फोटो काढून त्यांना प्रसिद्धी द्या जर तुमच्या लोकप्रियतेत अतिप्रचंड वाढ एका झटक्यात झाली नाही तर मला काहीही म्हणा अगदी संजय राऊत म्हणा, निखिल वागले म्हणा अर्णब गोस्वामी म्हणा किंवा विचित्र वेशभूषा करणारा ठार वेडा पत्रकार म्हणा पण रस्ते दुरुस्त करा लोकांचे आशीर्वाद मिळवा. उल्हास देबडवार बांधकाम खात्याचे सचिव झालेत खरे पण त्यांचा आनंद क्षणात नाहीसा झाला, आता ते कायम भेदरलेले घाबरलेले त्रासलेले खंगलेले गांजलेले दिसतात वाटतात कारण जो तो या रस्त्यांवरून त्यांना शिव्या घालतो त्यांना त्रासून सोडतो त्यामुळे एरवी आनंदी हसतमुख देबडवार या दिवसात कायम हागवणीचे पेशंट असल्यासारखे ओळखीच्यांना घरातल्यांना भासतात, सतत ते दर्दभरी गाणी म्हणत असतात... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment