Wednesday, 28 October 2020

खडसेंचे हसे कि खडसे फसे : भाग २: पत्रकार हेमंत जोशीखडसेंचे हसे कि खडसे फसे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
मधुचंद्राच्या राती मुका घेतला आणि बायकोला दिवस गेले वरून तीन महिन्यात बाळंतपणही आटोपले असे होत नसते किंवा शेतात काम करतांना उन्हाने ढुंगण भाजले म्हणून तेथे झाड लावले ते उगवले आणि सावली झाली, असेही होत नसते तद्वत एकनाथ खडसे उर्फ नाथाभाऊ यांचे म्हणजे ते आज राष्ट्रवादी पक्षात सामील झाले आणि दुसरे दिवशी त्यांना मंत्री पदाची शपथ देण्यात आली असेही नक्की घडणारे नव्हते नेमके हेच खूप आधी मीच तुम्हा खडसे यांच्या बाबतीत सांगितले होते आणि तेच घडले आहे, आता त्यांना डिसेंबर पर्यंत वाट पाहण्यास थेट शरद पवार यांनीच सांगितलेले आहे. जे मी लिहिले तेच घडले आहे म्हणजे खान्देश किंवा जळगाव जिल्हा किंवा महाराष्ट्र कोठूनही कोणतेही नामवंत कीर्तिवंत जातिवंत बडे नेते एकनाथ खडसे यांच्या संगतीने राष्ट्रवादी मध्ये आले नाहीत अपवाद माजी विधान पारिषद सदस्य गुरुमुख जगवाणी यांचा कारण जगवाणी यांना गिरीश महाजन मनापासून लाईक करत नव्हते आणि देवेंद्र फडणवीस यांना ते मनापासून कधी भावले किंवा आवडले नाहीत त्यामुळे जगवाणी यांना झुक झुक गाडी करीत खडसे यांचा पाठीमागून सदरा पकडून त्यांच्यासंगे राष्ट्रवादी मध्ये येण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय व उपाय नव्हता... 

एकनाथ खडसे यांना मंत्री करायचे झाल्यास अख्य्या मंत्रिमंडळात फेरबदल घडवून आणावे लागणार आहेत आणि तसे फेरबदल घडवून आणणे म्हणजे माकडाच्या ढुंगणाला झंडू बाम चोळण्यासारखे किंवा प्रमोद हिंदुराव यांनी उंटिणीचा मुका घेण्यासारखे ते कठीण असे काम आहे, अनेक पक्षांच्या महाआघाडीत हवे तसे बदल घडवून आणणे तेवढे सोपे नसते. नाही म्हणायला शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना त्यांचे गृह खाते शिवसेनेकडे सोपवून त्याबदल्यात एखादे ज्यादाचे खाते आपल्याकडे वळविण्याची इच्छा व्यक्त केली आहे पण गृह खाते सोपवून भलतेच एखादे हलके खाते स्वतःकडे घेणे म्हणजे पंचवीस वर्षाची तरुण प्रेयसी मित्राकडे सोपवून त्याची विटाळ गेलेली प्रेयसी गळ्यात मारून घेण्यासारखे हे काम त्यामुळे हे असे कृपया काही करू नका, अनिलबाबूंनी अतिशय स्पष्ट शब्दात पवारांना सांगितले आहे जर अनिलबाबूंचा गृहखाते सोडण्यास नकार असेल तर हक्काचा माणूस जितेंद्र आव्हाड यांना प्रदेशाध्यक्ष करावे आणि त्यांचे खाते एकनाथ खडसे यांच्याकडे सोपवून त्यांना थोडक्यात मंत्री करण्याचे पवारांनी जवळपास नक्की केलेले आहे, तशाही कार्यकर्त्यांच्या, अधिकाऱ्यांच्या, राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांच्या इतर त्यांच्या मंत्र्यांच्या मनात जितेंद्र आव्हाड मंत्री असावेत राहावेत असे अजिबात नाही, अनेकांचा जितेंद्र आव्हाड यांना मंत्री म्हणून काम करू देण्यास विरोध का आहे त्यावर असंख्य पुरावे मी नक्की मांडणार आहे. आव्हाड यांचे मंत्री पद खडसे यांना बहाल करण्याचे जवळपास नक्की झाल्याचे समजते....  

एरवी अनेक सुंदर मोहक देखण्या स्त्रिया खूप खूप नटून थाटून आपले छान छान फोटो फेसबुक वर अपलोड करून तमाम चावट पुरुष मंडळींना अस्वस्थ करून सोडतात पण याच देखण्या स्त्रिया कपल चॅलेंज म्हणून नवऱ्याबरोबर फोटो टाकतात आणि त्यांच्या नवऱ्याचे फोटो बघितले म्हणजे चांगल्या झाडावर बसलेली हि माकडे बघितली  कि जसे आपल्याला खूप खूप जोरजोरात हसायला येते ते तसे माझे अलीकडे कायम मंत्री दिलीप वळसे पाटलांचे नाव जरी डोळ्यासमोर आले तरी मला पॉट दुखेपर्यंत हसायला येते किंवा हसता हसता डोळ्यात पाणी येते कारण सध्या बऱ्यापैकी नाजूक प्रकृतीच्या दिलीप वळसे पाटलांनी या राज्यात अतिशय सन्मानाचे पद भूषविलेले आहे ते विधान सभेचे अध्यक्ष होते त्यामुळे पवारांनी त्यांना मंत्री केल्यानंतर त्या तोडीची खाती त्यांच्याकडे सोपविणे अतिशय आवश्यक होते पण न शोभणारी किंवा न झेपणारी कामगार आणि उत्पादन शुल्क हि खाती त्यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहेत त्यामुळे वळसे पाटील पवारांवर कमालीचे नाराज आहेत मनातून अतिशय अस्वस्थ आहेत त्यांना त्यामुळे नाममात्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करून त्यांच्या जागी एकनाथ खडसे यांना हिवाळी अधिवेशनानंतर मंत्री करण्याचे पवारांच्या तेही मनात असल्याचे मला त्यांच्या एका निकटवर्तीयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. काहीही करा पण मला घोडीवर बसवा, खडसे सारखे सारखे शरद पवारांना सांगताहेत, बघूया पवार खडसे यांच्या मनासारखे करतात कि खडसे यांच्या प्रवेशाने जळगाव जिल्ह्यातील नाराज झालेल्या मराठा समाजाला पवार खुश करून मोकळे होतात, डिसेंबर नंतर त्यावर नेमके काय घडले, पाहायला मिळेल... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी No comments:

Post a comment