Wednesday, 2 September 2020

दलाल मालामाल राज्य कंगाल : पत्रकार हेमंत जोशी

दलाल मालामाल राज्य कंगाल :  पत्रकार हेमंत जोशी 

हिंदू राष्ट्राची आस आणि कास असलेल्या धरलेल्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या उत्तम बेधडक संस्कारांना आपले करणाऱ्या म्हणणाऱ्या मुंबईत ठाण मांडून बसलेल्या दिल्लीतल्या अधिकाऱ्यांनी खून आणि ड्रग्स प्रकरणात छुट पुट ड्रग्स पेडलर्स आत टाकून वातावरण निर्मित करण्याने राज्याच्या हिताच्या दृष्टीने काही एक हिताचे नक्की साधले जाणारे नाही. जर मला माहित आहे तर दिल्लीतल्या चलाख निष्णात अनुभवी अधिकाऱ्यांना तर नक्कीच पुराव्यांसहित हे माहित असणार आहे कि महाआघाडी मध्ये सामील असलेल्या नेमक्या मुंबई किंवा आसपासच्या कोणत्या एका मंत्र्याला आणि मुलगा आमदार असलेल्या एका माजी आमदाराला आत घेतले किंवा किमान दमात जरी घेतले तरी ड्रग्स चे राज्यातले सारे रॅकेट एका क्षणात त्यांना समजणारे आहे. मित्रहो, मुंबई किंवा मुंबईच्या आसपासचा ड्रग्स शी संबंधित मंत्री आईशपथ येथे आदित्य ठाकरे हे ते नाव नाही, वो तो बच्चा है! आशिष शेलार आमदार आहेत भाजपाचे अत्यंत प्रभावी नेते आहेत आणि ते मुंबईतल्या अशा परिसराचे आमदार आहे कि त्यांना ड्रग्सशी संबंधित खडान खडा १००% माहिती आहे मला त्यांच्याकडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत कि त्यांनी नेमकी माहिती व पुरावे केंद्रातल्या अधिकाऱ्यांना देऊन मोकळे व्हावे... 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना एक दिवस मी त्यांच्या कार्यालयात फार मोठ्या पदावर असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला फडणवीस यांनी कोणत्या दहा व्यक्तींना अजिबात जवळ घेऊ नये ती नावे सांगितली होती. राज्य मग ते कोणत्याही पक्षाचे आले असले तरी हेच दहा बिलंदर बदमाश बदनाम दलाल हे राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना बड्या नेत्यांना हाताशी धरून कसे ताब्यात घेतात हे त्यांना सविस्तर सांगितले होते त्यावर ते अधिकारी मला म्हणाले कि मला ती नावे फडणवीसांकडे उघड करता येणार नाही कारण त्यातले काही माझ्या देखील जवळचे आहेत आणि मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी माझ्या हातून देखील नको ती चूक नक्की घडते आहे. दुर्दैवाने मला पुढे सविस्तर त्या दहा व्यक्तींविषयी फडणवीसांना सांगता आले नाही पण ज्या दोघा तिघा विषयी सांगणे झाले त्यांना ते पटले असावे कारण त्यानंतर ज्यांची नावे मी सांगितली होती ती माणसे त्यांनी दूर केल्याचे मला जाणवले. त्यातली एक भाजपाची देखणी पण चिटर महिला पदाधिकारी होती, ती व तिचा लबाड नवरा अनेकांना एकाच पद्धतीने फसवायचे लुबाडायचे त्यांनी अनेकांना करोडो रुपयाचा "चुडा सॉरी चुना लावला" होता त्यात माझ्या एका अतिशय जवळची पुण्यातली महिला उद्योगपती होती... 

या महिला उद्योगपतीचे लुबाडल्या लुटल्या गेलेले पैसे परत मिळाले नाहीत पण फडणवीसांनी मात्र त्या चीटर महिला पदाधिकाऱ्याला  काट्या सारखे रस्त्यातून दूर केले आता म्हणे हि महिला पदाधिकारी दिल्लीत बसून नितीन गडकरी यांच्या गळ्यातली ताईत बनलेली आहे, चालायचेच सुंदर स्त्रियांना सहज ऍक्सेस असतो. ड्रग्स आणि खून प्रकरणात ज्या संदीप सिंग याचे नाव पुढे आले आहे त्याला एकेकाळी भाजपा मध्ये ज्या दलाली करणाऱ्या हिंदी अभिनेत्याने प्रतिष्ठा मिळवून दिली त्या अभिनेत्याचे आणि त्याच्या अतिशय खतरनाक दोन साथीदारांची नावे  देखील त्यावेळी माझ्या दहा दलालांच्या यादीत होती. फडणवीसांना त्यावेळी मी हेच सांगितले या धूर्त अभिनेत्याला कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूला घेऊ नका आणि किचन पर्यंत तर तो अजिबात येणार नाही याची खूप काळजी घ्या. कारण एकदा मी दुबई वरून मुंबईला परततांना एक अत्यंत देखणी अभिनेत्री जिचे त्याच्याशी ब्रेक अप झाले होते माझ्या शेजारी बसलेली होती. गप्पांच्या ओघात तिने जे काय सांगितले आणि पुढे मी त्या अभिनेत्याची जी दलाली त्याच्या दोन साथीदारांना तो घेऊन मंत्रालयात सरकारी कार्यालयात करत होता त्यातून तो कसा खतरनाक लबाड चलाख लुबाडू पण चेहऱ्याने इनोसंट मला माहित होते. आज बघा त्याच अभिनेत्याचे नाव संदीप सिंग चा जवळचा मित्र म्हणून पुढे आले आहे भाजपा इनोसंटली केवळ या अभिनेत्यामुळे बदनाम होऊ शकते. बरे झाले फडणवीस या लबाड "अविवेकी" पासून चार हात दूर झाले. हे असे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी देखील ऐकायला हवे संकटे कमी होतात... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 1 comment:

  1. हा का तो? :
    https://www.youtube.com/watch?v=JmNz1ZLq0eg

    -गामा पैलवान

    ReplyDelete