Tuesday, 1 September 2020

निखिल बन गया अर्णब : पत्रकार हेमंत जोशीनिखिल बन गया अर्णब : पत्रकार हेमंत जोशी 

२५-३० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती शिवसेनेकडून का केल्या गेली, शिवसेनेकडून पुन्हा तीच चूक का घडली, माझ्या तर हे आकलन शक्ती पलीकडले आहे. त्याचे वडील विद्युत महामंडळात बक्कळ पैसे मिळवून निवृत्त झाले होते वरून जवळच्या मित्राची जागा त्याने आपले कार्यालय काढण्यासाठी हडपली होती त्यातून निखिल वागळे यांनी महानगर सायंदैनिक सुरु केले होते ते मोठे करण्यासठी तो सारखा धडपडत होता पण शिवसेना जोरात व जोशात असल्याने तसेही या राज्यातले पुरोगामीत्व रसातळाला गेले होते त्यामुळे पुरोगामी विचारसरणीच्या निखिल यास महानगर हवे त्या पद्धतीने लोकप्रिय करणे जड जात होते मात्र बाळासाहेबांच्या हातून नको ती चूक घडली त्यांच्या नेत्यांनी निखिलच्या कानाखाली लावल्या पण त्यानंतर शिवसेनेला थप्पड बसली आणि निखिल मात्र रातोरात राज्यातल्या पत्रकारितेत नावारूपाला आला त्याच्या महानगरने देखील खपाच्या बाबतीत एवढी उचल घेतली कि मुंबईतले हे सायंदैनिक मुंबई बाहेर देखील काही प्रमाणात दुसरे विकले जाऊ लागले. निखिल ची शिवसेना विरोधात लिहिण्याची खुमखुमी तर मोठी झालीच पण त्याने दाखवलेल्या हिम्मतीमुळे मग राज्यातले इतरही वर्तमानपत्रे सेनेला अंगावर घेऊ लागले... 

एकदा दादरला दिवंगत लेखिका गिरीजा कीर यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी त्यांचे पती श्री उमाकांत कीर व मी मिळून थेट बाळासाहेबांना आमंत्रित केले होते त्यात आम्ही भाऊ तोरसेकर यांनाही मुद्दाम बोलावून घेतले होते, आम्ही बाळासाहेबांना जेव्हा म्हणालो कि तुम्ही उगाच अतिशय क्षुल्लक वात्रट निखिल वागळे यास अंगावर घेऊन सेनेची किंमत कमी करून घेतली आणि निखिल चे महत्व वाढवून ठेवले त्यांनी हो अशी मान डोलावली म्हणजे त्यांनाही आमचे म्हणणे पटलेले होते. पण बाळासाहेबांचे एक चांगले होते कि ते केवळ सभोवतालच्या श्रीमंत दलालांमध्ये कधीही फारसे अडकून पडले नाहीत ते पत्रकारांपासून तर विविध प्रांतात तद्न्य अशा सल्ला देणार्या अनेकांना बोलावून घ्यायचे गप्पा मारता मारता जे मनाला पटले ते अमलात आणायचे दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे हे बाळासाहेब किंवा राज ठाकरे यांच्यासारखे कधी आमच्याशी किंवा निकोप राजकीय तज्ज्ञांशी कधी अशांना जवळ घेऊन त्यांच्यात रमलेच नाही त्यामुळे त्यांचे नक्की फार मोठे राजकीय नुकसान झालेले आहे. असे माणूसघाणेपण नक्की चांगले नसते, रयतेच्या राजाला ते १००% कधीतरी नुकसानदायी ठरते जे आज त्यांच्याबाबतीत घडले आहे. अन्यथा आमच्यासारख्या राज्याचे राजकारण नेमके माहित असणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना नक्की हक्काने व हट्टाने सांगितले असते कि अर्णबला अंगावर घेण्याची ही योग्य  वेळ नाही... 

इतिहासाची हुबेहूब पुनरावृत्ती घडली आहे अर्णब गोस्वामीला शिवसेनेने व महाआघाडी सरकारने जगातला निखिल वागळे करून सोडले आहे. निखिल वागळे राज्यात गाजला पण अर्णब गोस्वामी तर जगभरात पोहोचला. उगाच अर्णब यांच्या नको त्या चौकशा राज्य सरकारने लावल्या. याच तक्रारींना पुढे थेट उच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली आणि महाआघाडी सरकारची तसेच मुंबई पोलिसांची अत्र तंत्र सर्वत्र नाचक्की बदनामी झाली. लगेचच पुढल्या पंधरा दिवसात सुशांत सिंग प्रकरण घडले मग याच अर्णब गोस्वामीने मुंबईत बसून दिल्लीतल्या सर्वच्या सर्व हिंदी व इंग्रजी वाहिन्यांना जणू आवाहन दिले अर्णबने आपली वाहिनी मुंबईत बसून दिल्लीकरांच्या खूप पुढे नेऊन ठेवली ज्याची शिवसेना व राज्य सरकारला सध्या या साऱ्या प्रकाराची मोठी किंमत मोजावी लागते आहे. एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक दुसरी लपविण्यासाठी तिसरी हे असे येथे घडते आहे आणि महाराष्ट्र देशात व जगात बदनाम होते आहे जसे कशाची म्हणून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेला भीती वाटली आणि त्यांनी अतिशय धोकादायक असतांना देखील कूपर हॉस्पिटल मधल्या ज्या पाच डॉक्तरांनी सुशांतसिंगचे पोस्टमार्टेम केले होते त्यांचे कोरोना च्या नावाखाली विलगीकरण करून घेतले. माझी माहिती अशी आहे कि कूपर इस्पितळाच्या प्रमुखांनी त्यांच्या शासकीय डायरीत हे लिहून ठेवलेले आहे कि त्यांनी कोणाच्या आज्ञेवरून त्या पाचही डॉक्टर मंडळींना सुट्टीवर धाडले आहे, केली ना अशी नवी पंचाईत सीबीआय कडून नको त्या चौकशी करण्याची. हे दिवस शांत बसण्याचे आहेत आगाऊपणा करण्याचे नाहीत...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment