Wednesday, 30 September 2020

फडणवीस फंडा सेनेचा वांदा : पत्रकार हेमंत जोशी

 फडणवीस फंडा सेनेचा वांदा : पत्रकार हेमंत जोशी 
समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी म्हणाले होते कि उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य वेळी फडणवीसांना लाथ मारली आहे, अलीकडे मंत्रालयात जो प्रकार घडला म्हणजे आदित्य ठाकरे ऐकत नाहीत म्हणून अबू आझमी यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देऊन जो गोंधळ घातला कि आदित्य आमचे ऐकत नाहीत एवढेच काय ते आमचा फोनही उचलत नाहीत म्हणजे ठाकरे यांच्या राजकीय खेळीचा आता फडणवीस यांच्याप्रमाणे अबू आझमी यांनाही फटका बसला आहे पण यात मला वस्तुस्थिती कमी राजकारणचा भाग अधिक वाटतो. तुम्ही म्हणता तसे आम्ही त्या हिंदू व मराठी विरोधी मुसलमानांपुढे त्यांच्या नेत्यांपुढे अजिबात झुकलेलो वाकलेलो नाही कदाचित हे असे दाखवण्यासाठी किंवा पुन्हा एकवार शिवसैनिकांची मराठी माणसाची सिम्पथी मिळविण्यासाठी सहानुभूती परत एकदा प्राप्त करून घेण्यासाठीचे हे कदाचित ठाकरे यांचे राजकीय नाटकही असू शकते. पण अबू आझमी यांना तेही आदित्य ठाकरे यांनी थेट फाट्यावर मारणे हे जर सत्य असेल नक्की घडलेले असेल तर उशीर झालाय खरा पण अंगावर घेतलेली हि काही जात्यंध बदमाश मुसलमान नेत्यांची झूल ठाकरे पिता पुत्राने जेवढी शक्य असेल लवकरात लवकर अंगावरून काढणे योग्य व फायद्याचे ठरेल, शिवसेनेचे भविष्यत होणारे आणखी नुकसान त्यातून त्यांना टाळता येणे शक्य होईल... 

पण ज्या पद्धतीने झिशान आणि बाबा सिद्दीकी, अबू आझमी, अब्दुल सत्तार, नवाब मलिक, नसीम खान, अस्लम खान इत्यादी महान मुस्लिम नेत्यांनी ठाकरे पिता पुत्राभोवती कधी मैत्रीतून तर कधी सत्तेच्या माध्यमातून ज्या अति खतरनाक पद्धतीने कोळ्यासारखे जाळे टाकले विणले आहे त्यात अडकलेले ठाकरे पिता पुत्र अलगद कसे यापुढे बाहेर पडतात त्यावर खरे तर राजकीय जाणकारांच्या नजरा खिळलेल्या आहेत. जो विषाचा ग्लास हाती घेतला तर नक्की नाश होणार आहे हे माहित असतानाही उद्धव ठाकरे या अत्यंत सावध व सफल नेत्याने या मंडळींच्या मदतीने सत्ता हाती घेऊन स्वतःच्याच पायावर मोठा धोंडा उगाचच मारून घेतला आहे हे नक्की आहे. ज्याएकमेव कारणासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस शिवसेनेच्या पाठीशी ठाम उभा होता ते एक प्रमुख कारण म्हणजे या राष्ट्रावर ज्या काही मुसलमानांचे प्रेम नाही त्यांना कडाडून विरोध कारणे त्यांच्या थेट अंगावर धावून जाणे पण शरद पवार यांचे ऐकून आणि मुलाच्या मुसलमान मित्रांच्या पाठीवर कधी कौतुकाची तर कधी बक्षिसाची थाप मारून थेट सावध उद्धवही विरोधकांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांनी आपले व शिवसेनेचे फार मोठे नुकसान करून घेतले. चुकीच्या निर्णयांवर भलेही उद्धव ठाकरे यांचे पत्रकारांनी वाहिन्यांनी कौतुक करून त्यांना अधिक अडचणीत आणू नये पण जेथे त्यांचे उचललेले पाऊल योग्य असते त्याकडे संशयाने न बघता याही कठीण अवस्थेत त्यांचे अमुक एखाद्या ठिकाणी उत्तम निर्णय घेणे त्याकडे आपण साऱ्यांनीच कौतुकाने बघायला पाहिजे त्यावर संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये झालेली प्रदीर्घ भेट व बोलणे, हे तसे बोलके उदाहरण आहे मात्र  त्यातली नेमकी वस्तुस्थिती लोकांसमोर आली नाही हे दुर्दैवाचे ठरलेले आहे... 

शिवसेनेचे संजय राऊत यांनी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, या भेटी निमित्ताने तेही थेट भाजपामध्ये व राज्याच्या विशेषतः मुंबईच्या भाजपा नेत्यांमध्ये आधी प्रचंड अस्वस्थता पसरली नाराजी पसरली त्यानंतर देवेंद्र यांच्या विरोधात मोठी कुजबुज पहिल्यांदा सुरु झाली थोडक्यात देवेंद्र फडणवीस यांचे संजय राऊत यांना भेटणे अत्यंत चुकीचे असे हे घडले जो तो भाजपा नेता एकमेकांना सांगू लागला कारण चूक या नेत्यांची अजिबात नव्हती, खरे तर वस्तुस्थिती त्यांनाही माहित नव्हती एवढे हे भेटीचे राजकारण व प्रकरण गुप्त ठेवण्यात आले होते कारण ते थोडेसे जरी शरद पवार यांच्या राऊत व फडणवीस भेटी आधी कानावर गेले असते तर क्षणार्धात पवारांनी हे भेटीचे प्रकरण उखडून टाकले असते, पवार ते बिघडवून मोकळे झाले असते आणि नेमके हेच अगदी सुरुवस्तीपासून मी तुम्हाला अगदी लेखी सांगत आलेलो आहे कि उद्धव ठाकरे यांना अंडर एस्टीमेट कधीही करू नका. हे नक्की आहे कि मुख्यमंत्री होऊन शिवाय आदित्य यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन उद्धव ठाकरे यांच्या हातून कुठल्यातरी बेसावध क्षणी मोठी चूक झालेली आहे पण त्यात त्याआधी फडणवीसांकडून मानसिक कुचंबणा किंवा दुखावल्या जाणे हा महत्वाचा एक भाग होता हेही विसरून चालणार नाही. फडणवीस प्रत्येकच ठिकाणी योग्य होते असेही म्हणणार्यातला मी नाही हे वाचकांनो लक्षात घ्या... 
क्रमश: हेमंत जोशी 

Sunday, 27 September 2020

MMRDA & the coterie controlling it....

MMRDA & the coterie controlling it....       

 Exactly on 5th September 2020 I had exposed the MMRDA & it’s wrong doing of taking a decision to transfer the metro car shed to Pahadi Goregaon (Oshiwara) and how declaring Aarey a forest of 600 acres is merely an eyewash, even after NBT has not declared it...It was taken up by LoP Devendra Fadnavis 2 days later in the Monsoon Assembly Session. Now some more interesting facts on the same. The Pahadi Goregaon plot initially under 'accommodation reservation' belongs to a Parsi man who is allegedly NOW in partnership with our very own AB from Pune who is the middleman of a very powerful 'coterie'. So now instead of acquiring land under ( AR Policy ) accommodation reservation AB gets compensated in land acquisition (Govt pays two times; approx Rs. 1500 to 2000 crores for 60-acre land). My Marathi friend from Pune who controls Breach Candy & CMO too, (not CM) will participate in Tenders for the new car shed (a bonus). The beneficiaries of this coterie are AB and some very powerful IAS officers which includes R A Rajeev, the current MMRDA boss (though scared initially) but he was made a part of this. How? Read below.

 So, R A Rajeev wasn't keen on shifting the car shed. A loss of nearly 4000 crores to MMRDA wasn't a joke for him. He said to his boss (CM), only 5 to 6 months are remaining please let me go into retirement without any controversies. But at the same time, there was a case of a Raguleela who was penalized by the MMRDA for some irregularities for Rs. 432 crores. The coterie 'asked' Rajeev to help the industrialists, which again he refused. Even if I say, R A Rajeev isn't an active member of the coterie, he is surely in the good books of one of them, the advisor to the current CM. Before I forget, once the above Raghuleela was helped to 'waive off' Rs 432 crores by playing it smartly, next in line with similar case type is Reliance. Penalty for delayed construction issued by MMRDA is around 3800 crores of which I have heard Penalty of Reliance which can be waived because of this case law is around Rs 1800 crores . Now how & why did Rajeev do this? So, the coterie asked Rajeev to remove 'senior counsel' and appoint Attorney General of Maharashtra to fight in the High court. Everything was staged and very poor representation was made, I’m told. Obviously MMRDA lost in the High court, just that no one should challenge or smell a rat in this, MMRDA appealed in the SC and lost there too. It was on purpose, I'm told, MMRDA had lost this case and Raguleela was spared and penalty of Rs. 432 crores waived off. Now if Rs. 400 crores can go, why should Reliance be left behind. It won't come as a surprise to us, if Rs. 1800 crore penalty is waived off too soon. All credit goes to the coterie. 

Now in this circus R A Rajeev did not wish to help the coterie directly, he was then asked by AB and the coterie to speed up the administration process of shifting of car shed & giving permission for land acquisition for building another car shed (Line 3 & Line 6) at Pahadi Goregaon. He did that without battling an eyelid. Now the coterie HAD decided that if Rajeev fails to do both their works (waiving off penalties & speeding up administrative work for new car shed location) Anil Diggikar would be brought in his place as during that time, Diggikar was at home & without posting. Somehow the advisor convinced both Rajeev and the CM for this and Diggikar was given Mhada with a promise of MMRDA in March.  So, this is reality. The coterie headed by AB does not care a rat’s ass for you & me. All they care is how money can be tripled. Unfortunately, AB is in good books of almost everyone (Matoshri is still a no entry though) who matters and many IAS & IPS officers are on his payroll ( apart from the Dabbas sent regularly from the hospitality wing ) ; Ahh, a very serious matter in the meantime at Mhada of AB is stuck. It is the Aaram nagar project, I’m told. Watch out for this space on that....

Devendra Fadnavis & Sanjay Raut meet.

No 3 hours were not spent on asking one question, 'Interview doge kya'? The meeting was, am told, on insistence of the RSS. Sanjay Raut met Nitin Gadkari in Nagpur & in-turn Gadkari through RSS arranged this meeting with Fadnavis. Gadkari knew, Fadnavis would not meet Raut like this only, so intervention of RSS was required. The agenda of meeting, I'm told, is a straight submission. Let's not get into that. By the way, MP Arvind Sawant too met big wigs of BJP in Delhi recently. Is the Income Tax Notice trouble, is it the Drug case of Bollywood, or is it the SSR death case or what exactly one does not know might be the reason for Shivsena to be so desperate off late. But it surely won't be taken lightly by NCP supremo-Sharad Pawar. 

Varun Singh v/s Gurbir Singh.

Yes, both are established names in our profession of Journalism. But last year, there was a spat in between the two who coincidentally also happen to be members of the prestigious Mumbai Press Club, located opposite of the BMC. It so happened, Gurbir Singh on one of his 'days' hurled abuses on Varun for no rhyme or reason and there were bystanders, fellow journalists and members of the club who witnessed this. As a policy of the Club, with immediate effect on the complain received, with witnesses testifying, the said member has to be suspended; but it did not happen as Gurbir Singh himself happens to be the President of the Mumbai Press Club. That left the Chairman & the Secretary in a soup. But, a 3 member committee was appointed and decision of theirs was to be considered final. Varun, the complainant, kept on saying that in the Club rule book it is no where  mentioned that a committee has to be formed for such things, action of suspension has to be taken directly if the complaint is proved right. Guess what, 2 weeks back, the committee nearly after a year of its formation, has just fined Rs. 5000 to Gurbir to which Varun has decided to fight this the legal way. Before i conclude, this is the same Gurbir Singh who has suspended a lot of people himself when such cases were brought to his notice. 

 Vikrant Hemant Joshi 


Saturday, 26 September 2020

एकनाथ खडसे जरा धीरेसे : पत्रकार हेमंत जोशीएकनाथ खडसे जरा धीरेसे : पत्रकार हेमंत जोशी   

भलेही काँग्रेसचे, काँग्रेसच्या नेत्यांचे आचार किंवा आचरण त्यातल्या अनेकांचे चांगले नसेल पण काँग्रेसचे विचार मात्र संपू नयेत तसेच शिवसेना आणि भाजपाचा हिंदुत्व हा अजेंडा जरी कॉमन असला तरी सेनेचे मराठी माणसाच्या हक्कासाठी जे सुरुवातीला लढणे झगडणे होते ते कायम टिकावे असेच राज्यात साऱ्यांना अगदी मनापासून वाटते पण उद्धव ठाकरे या एकेकाळच्या किंवा आत्ता आत्ता पर्यंतच्या अत्यंत यशस्वी अशा शिवसेना प्रमुखाला कोठून अवदसा आठवली आणि त्यांनी मातोश्री बाहेर पडून म्हणजे आपण राजा आहोत, हे विसरून ते थेट प्रधान झाले म्हणजे राजाने स्वतःचे स्वतःच्या हातानेच डिमोशन करून घेतले हे सत्य आहे. ना काँग्रेस च्या लक्षात आले ना शिवसेनेच्या लक्षात आले कि शरदबाबू यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारले, शरदबाबूंनी एकाचवेळी या राज्यातली काँग्रेस आणि शिवसेना त्या दोघांनाही सत्तेचे गाजर दाखवत संपवून टाकले असे निदान आजचे तरी स्पष्ट नक्की चित्र आहे. एकाचवेळी बायको मिळाली पण घटस्फोटित देखणी उफाडि  मेहुणी देखील कायमस्वरूपी बहिणींबरोबरोबर तिच्या सासरी अगदी हनिमून पासूनच राहायला आली, हे असे शरद पवारांच्या बाबतीत शिवसेना व काँग्रेसचे झाले घडले. यापुढे या राज्यात पुढल्या अनेक वर्षांसाठी फक्त आणि फक्त शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मानणारे सत्तेत दिसले तर निदान मला तरी अजिबात आश्चर्य वाटणार नाही आणि त्याचसाठी मी उद्धवजींना हे वारंवार सुचवतो आहे कि त्यांनी सध्याच्या अतिशय सडक्या अशा सरकारमधून थेट बाहेर पडावे आणि शिवसेनेची विसकटलेली घडी नीट बसवावी... 

गेल्या काही दिवसात पुन्हा एकवार भाजपा नेते एकनाथजी खडसे यांची राजकीय फडफड आणि शिवसेना नेते संजयराऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेटून प्रदीर्घ चर्चा करणे हे दोन विषय चवीचा करमणुकीचा किंवा थोडाफार राजकीय खळबळीचा विषय ठरले त्यापैकी एकनाथ खडसे यांचा आता सिनेमातला प्रदीप कुमार झाला आहे म्हणजे सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट च्या जमान्यात प्रदीप कुमार हिरो होता नंतर त्याच्या अभिनयाच्या दिसण्याच्या मर्यादा दर्शकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला लीड भूमिका मिळेनाशा झाल्यावर तो पॉट भरण्यासाठी वाट्टेल त्या भूमिका स्वीकारू लागला. पण नाही म्हणायला त्याने आधी धडपड नक्की केली कि पुन्हा एकवार लीड भूमिकेत सिनेमे करता येतील का पण ते शक्य नव्हते कारण देखण्या तगड्या धर्मेंद्र सुनील दत्त फिरोज खान राज कुमार राजेंद्र कुमार यांचा जमाना सुरु झाला होता त्यामळे प्रदीप कुमार रहमान यांच्यासारख्या आजोबा दिसणाऱ्या वाटणाऱ्या हिरोंची धडपड आपोआप थांबली, संपली तेच राज्याच्या राजकारणात, जळगाव जिल्ह्यात, खान्देश परिसरात आणि भाजपा वर्तुळात एकनाथ खडसे  यांचे नेमके हे असेच झालेले आहे त्यांनी राजकारणात आणि भाजपा मधेच प्रदीप कुमार यांच्यासरख्या मिळतील त्या भूमिका स्विकारुन शांत राहावे गप्प बसावे त्यातच त्यांचे मोठे राजकीय हित साधल्या जाईल म्हणजे त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर देखील त्यांच्या सुनेला बायकोला मुलींना आणि इतरही नातेवाईकांना भाजपामध्ये सत्तेमध्ये काहीतरी नक्की स्थान मिळत राहील अन्यथा खडसे यांनी हि अशीच गडबड व बडबड सुरु ठेवली तर त्यांना आणि सुरेशदादा जैन यांना जैन हिल्स वर एकत्र बसून टाळ पिटून दिवस घालवावे लागतील. कधीकाळी जळगाव जिल्ह्यात कायम नेते म्हणून आघाडीवर असलेले बसलेले सुरेशदादा ज्यांना त्यांचा राजकीय आत्मविश्वास नडला आणि ते बाजूला फेकल्या गेले तशी वेळ आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर येऊ नये असे जर एकनाथ खडसे यांना वाटत असेल तर त्यांनी सुरेशदादा यांना जशी पक्ष बदलण्याची अत्यंत वाईट होती तशी सवय लावून घेऊन भविष्यातले मोठे राजकीय नुकसान करवून घेऊ नये असे निदान मला तरी वाटते... 

नेत्यांनी राजकारणात नितीन गडकरी व्हायचे असते म्हणजे राजकारणातली पडती बाजू दिसायला लागल्यावर चार पावले मागे येऊन गप्प बसायचे असते अशाने होणारे मोठे राजकीय व आर्थिक नुकसान टाळता येते. राजकारणात तसेही प्रत्येक बहुतेक नेत्यांना आपले आर्थिक नुकसान करवून घ्यायचे नसते त्याचे त्याला मग फार वाईट वाटते आणि एकनाथ खडसे तर राजकारणातील अर्थकारणात माहीर नेते म्हणून ओळखल्या गणल्या जातात त्यांना असे आर्थिक व राजकीय नुकसान करवून घ्यायचे नसेल तर राजकारणातल्या या प्रदीप कुमारने निदान काही काळ शांत बसावे नंतर पुन्हा आपल्या पक्षात राजकीय पकड आणि विश्वास निर्माण करून शरद पवार यांच्यासारखे उतार वयात देखील राजकीय फिनिक्स पक्षी होऊन झेप घ्यावी. आपले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाऊन फार भले होणार आहे या भ्रमात एकनाथ खडसे यांनी राहू नये जसे एकेकाळी शरद पवार यांच्याच सोबत जाऊन सुरेशदादा जैन यांनी मोठे राजकीय नुकसान करवून घेतले होते. जळगाव जिल्ह्यातील मराठा समाज आणि मराठा नेते हे सुरेशदादा जैन या मारवाड्यासमोर किंवा एकनाथ खडसे या लेवा पाटील असलेल्या म्हणजे मराठ्यांना न चालणाऱ्या नेत्यांसमोर झुकावे वाकावे असे शरद पवार यांना कधीही सहन होणारे नाही सहन झाले नाही त्यामुळे अस्वस्थ शरद पवार यांनी जसा राजकारणात सुरेशदादा जैन यांचा पार लोचा करून ठेवला तीच वेळ ते नक्की एकनाथ खडसे यांच्यावर आणून शरद पवार नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसून मोकळे होतील. अर्थात मी सांगितले आणि एकनाथ खडसे यांनी ऐकून राष्ट्रवादी मध्ये जाण्याचे रद्द केले असे नक्की होणारे घडणारे नाही पण एकाचवेळी लेवा, गुजर आणि मराठा पाटील या तिघांवरही जर एकनाथ खडसे यांना राजकीय पकड अशीच कायम ठेवायची असेल तर त्यांनी जीर्ण होत चाललेल्या आपल्या शरीराला डोक्याला विनाकारण अधिक ताप देऊन त्यांचे ज्या आपल्या स्वतःच्या खडसे कुटुंबावर मोठे प्रेम आहे त्या खडसे कुटुंबाचे आणि स्वतःचे होणारे राजकीय नुकसान टाळावे. दिवस योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांचे आहेत जसे एकेकाळी भाजपामध्ये दिवंगत प्रमोद महाजन यांचे स्थान होते कारण नरेंद्र मोदींच्याच तसे मनात आहे कि या दोघांना राष्ट्रीय नेते म्हणून वरच्या रांगेत आणण्याचे तेव्हा खडसे यांनी केव्हाही चार पावले मागे येणे त्यांच्यासाठी हिताचे आहे... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी Tuesday, 22 September 2020

अफलातून राज्यपाल : पत्रकार हेमंत जोशी


अफलातून राज्यपाल : पत्रकार हेमंत जोशी 

जे कॉमन आहे किंवा इतरत्र वाचकांना वाचायला मिळते ते लिखाण करायचे नाही हे जे आचार्य अत्रे ग. वा. बेहेरे यांनी ठरविले होते त्याच पावलांवर पाऊल ठेऊन मी अनिल थत्ते आणि पत्रकार महर्षी भाऊ तोरसेकर आम्ही तिघांनी ठरविले होते त्यापैकी १९९० च्या दशकानंतर दुर्दैवाने अनिल थत्ते यांचे लिखाण फारसे वाचण्यात आले नाही किंवा मी स्वतःला या मान्यवरांच्या रांगेतला एक असे अजिबात समजत नाही पण साधारणतः ३० वर्षांपूर्वी पत्रकार मित्र उदय तानपाठकने माझी पहिल्यांदा भाऊ तोरसेकर यांच्याशी पहिल्यांदा ओळख करून दिली पुढे ओळखीचे रूपांतर जिव्हाळ्यात झाले आणि त्यांचे लिखाण वाचता वाचता ऐकता ऐकता मन भरून पावले. उद्या मला जर एखाद्याने विचारले कि एकांत असलेल्या बेटावर सोबत कोणाला घेऊन जायला आवडेल म्हणजे एखाद्या भरगच्च सेक्सी मादक अभिनेत्रीला कि भाऊंना त्यावर क्षणाचाही विचार न करता मी म्हणेन, भाऊंच्या सहवासात गप्पा स्वर्ग तेथेच गवसला. अलीकडे भाऊंचे भाजपाच्या स्टेजवर मोदी नेमके कसे यावर भाषण झाले आणि काही नालायकांनी कमेंट्स केल्या, भाऊंना विधान परिषद सदस्य व्हायचे आहे तर. अर्थात ज्या भाऊंनी सहज शक्य असतांना पैशांना लाथ मारून आयुष्य एका चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत सहकुटुंब काढले त्यांना भाऊ नेमके समजणे महाकठीण. पत्रकार भाऊ तोरसेकर आणि त्यांचे बुद्धिमान पण अत्यंत साधे सरळ जीवन जगणारे छोटे कुटुंब त्यावर पुन्हा कधीतरी... 

आज दिनांक २२ सप्टेंबर मंगळवार रोजी मी आणि भाऊ माननीय राज्यपालांच्या भेटीला गेलो होतो, अर्थात आम्हाला या अफलातून भन्नाट पारदर्शी राज्यपालांविषयी म्हणाल तर आकर्षण होते म्हणाल तर कुतूहल होते. जवळपास ४५ मिनिटे एवढी प्रदीर्घ भेट झाली, बोलणे नेमके काय झाले ते येथे सांगणे अशक्य पण बहुतेक वेळ मी आणि राज्यपाल भाऊंचे बोलणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. माननीय राज्यपालांच्या भेटीतला मी मुद्दाम काढलेला एक विषय मात्र येथे गुपित न ठेवता सांगतो पण तत्पूर्वी एक आठवण सांगतो. १९८७ दरम्यान अभिनेत्री स्मिता पाटीलचे बाळंतपणात निधन झाले. येथे नाव सांगत नाही पण एका फार मोठ्या नेत्यांबरोबर मी शिवाजी पार्क मैदानावर स्मिताच्या अंत्यदर्शनाला गेलो. त्यानंतर जवळपास ३-४ महिन्यानंतर खार परिसरात जेथे स्मिताचे वडील शिवाजीराव पाटील राहायचे त्यांच्या घरी याच नेत्यांबरोबर प्रत्यक्ष सांत्वन करण्याकरिता गेलो. थोड्यावेळाने लहानग्या प्रतीकला विद्याताई बाहेर घेऊन आल्या. त्या आईविना प्रतीक ला बघून आम्हा दोघांच्याही डोळ्यात अश्रू दाटले आम्ही चक्क रडून घेतले. पुढे प्रतीक जसजसा मोठा व्हायला लागला कधीतरी तो राज बब्बरच्या जुहूच्या बंगल्यातून बाहेर पडतांना दिसायचा. ३-४ वर्षांपूर्वी  नागपूरचे गिरीश गांधी घराब्याचे नाते म्हणून जे गिरीश गांधी गेल्या ३० वर्षांपासून दरवर्षी स्मिता स्मृती विशेषांक नियमित काढतात जेव्हा शिवाजीरावांनी त्यांच्या घरी भेटायला गेले, काळजीच्या स्वरात शिवाजीराव म्हणाले, मी अस्वस्थ आहे कारण प्रतीकांच्या सवयी चांगल्या नाहीत... 

आणि अलीकडे त्यावर स्वतः प्रतीक बब्बरने स्वतःच खुलासा केला कि तो वयाच्या १३ व्या वर्षांपासून ड्रग्स घ्यायला लागला आहे. वास्तविक एक उत्तम अभिनेत्रीचा आईविना मुलगा, अभिनेता म्हणून स्मितप्रतीकला नक्की दर्शकांनी खूप खूप डोक्यावर घेतले असते पण या डेंजर व्यसनाने प्रतीकचा घात केला, बघूया प्रतीक त्यातून केव्हा आणि कसा बाहेर पडून आपल्या डोळ्यांचे पारणे कसे फेडतो ते. नेमका हाच धागा पकडून मी माननीय राज्यपालांना म्हणालो कि आमच्या या महा महाराष्ट्राला ड्रग्सच्या पसरणाऱ्या विळख्यातून तातडीने बाहेर काढायला रा. स्व. संघाला सांगा. जेथे उत्तम संस्कार हमखास केले जातात असे संत महाराज कीर्तनकार प्रवचनकार आणि रा. स्व. संघासारख्या देशप्रेमी,हिंदुप्रेमी संघटना इत्यादींनी अतिशय तातडीने या ड्रग्स विरोधी मोहिमेत सहभागी होऊन उडता महाराष्ट्र होणार नाही असे काहीतरी उत्तम कार्य घडवून आणायला हवे. जेव्हा काही वर्षांपूर्वी हिंदुतर धर्मांधांनी महाराष्ट्रात किंवा अख्ख्या देशात, हिंदुस्थानात व्यापक धर्मांतर घडवून हिंदूंना बाटवायला सुरुवात केली होती त्यावेळी आप्पासाहेब धर्माधिकारी वीर सावरकर यांच्यासारखे कडवे समाज पुरुष किंवा रा. स्व. संघ इत्यादी पुढे सरसावले आणि त्यांनी जसे फार मोठ्या प्रमाणावर होणारे हिंदूंचे धर्मांतर रोखण्यात बरेचसे यश मिळविले तेच आता यापुढे ड्रग्स विरोधी मोहिमेत अग्रेसर असणाऱ्यांना व्यसनाधीनता रोखण्याचे आणि नव्या पिढीला व्यसनमुक्त करण्याचे किंवा व्यसनांपासून दूर ठेवण्याचे कार्य हाती घेणे अत्यावश्यक आहे अन्यथा हिंदूंचा ह्रास शंभर टक्के मोठ्या प्रमाणावर होणार आहे....  

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Sunday, 20 September 2020

क्लुप्त्या अनंत मंत्री सामंत : पत्रकार हेमंत जोशी

क्लुप्त्या अनंत मंत्री सामंत : पत्रकार हेमंत जोशी 

कृपाशंकर सिंह गृह राज्यमंत्री असतांना, दारूच्या दुकानांच्या आणि दारू विकणाऱ्या हॉटेल्स च्या पाट्या देवांच्या नावाने नसाव्यात म्हणून खुद्द त्यांच्या पत्नीनेच आवाज उठवला होता ज्याचे राज्यात सर्वत्र कौतूक तर झालेच पण रिस्पॉन्स देखील मिळाला, कित्येकांनी दारू दुकानांची तसेच दारू विकणाऱ्या हॉटेल्सची देवदेवतांची असलेली नावे तात्काळ बदलविली होती. अलीकडे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सार्या पाट्या मराठीतूनच असाव्यात म्हणून जे आंदोलन छेडले किंवा मनसेने तेच आंदोलन उचलून धरले, महाराष्ट्रात देखील त्यातून इतर राज्यांसारखे घडले, मराठी किमान वाचायला मिळू लागले. या लेखानिमित्ते मला अत्यंत महत्वाचे, सरसंघचालक श्री मोहनजी भागवत यांना देखील हेच सुचवायचे आहे कि या जगात या देशात या राज्यात जेथे कमी तेथे कडवे हिंदू आम्ही, या ज्या आदर्श भूमिकेतून तुम्ही जग देश राज्य बदलविण्याचा प्रयत्न केला मोठे कार्य केले आता मला वाटते या देशात विशेषतः या राज्यात या महाराष्ट्रात बहुसंख्य पाक विचारांच्या मुसलमानांनी आणि या राज्यात विशेषतः पुणे मुंबईत असंख्य अमराठी मंडळींनी ड्रग्सच्या जाळ्यात फार मोठ्या प्रमाणावर तरुण मराठी किंवा भारतीय पिढीला ओढले आहे, रा. स्व. संघाने यापुढे तातडीने ड्रग्स मादक द्रव्य विरोधी मोहीम राबवून उडता भारत किंवा उडता महाराष्ट्र हे देशविघातक काम करणाऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळवावे.... 

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हा असाच झपाटलेला तरुण तडफदार नेता तो त्याच्या मतदारसंघात किंवा रत्नागिरी या त्यांच्या हक्काच्या जिल्ह्यात किंवा मंत्री या नात्याने या अवघड कठीण दिवसात देखील ते काही तरी वेगळे करवून दाखवण्यात कायम गुंतलेले असतात सदा व्यस्त असतात, त्यांच्या उत्साही वृत्तीला हे असे वागणे शोभतेही आणि इतरांना ते आवडतेही. आता हेच बघा, महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील राष्ट्रभावना जागृत ठेवण्याच्या दृष्टीने किंवा राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्यासाठी व देशाभिमानाचे युवा पिढी मध्ये संवर्धन करण्याकरिता उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली जी जी विद्यापीठे येतात त्या सर्व ठिकाणी अध्यनवर्ग सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायला हवे असा सरकारी फतवा सामंत यांनी काढून नवा इतिहास रचला आहे. जणू तरुण पिढीला या देशाशी राष्ट्राशी काही घेणे देणे नाही हे असे दृश्य विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून दिसायचे, राष्ट्र भावना रुजण्याची व वाढण्याच्या दृष्टीने राष्ट्रगीत कंपलसरी, हा नवा पायंडा मंत्री उदय सामंत यांनी पाडून महाराष्ट्रातील साऱ्यांची छाती अभिमानाने फुलून जावी जणू असे महान मोठे काम त्यांनी केले आहे. अनेकदा उदय सामंत यांचे काही निर्णय चुकतही असतील पण फायदे तोटे यांचा व्यक्तिगत विचार न करता त्यांचे धाडसाने पाऊल उचलणे, मला त्यांच्यातली हि हिम्मत आणि त्यासाठी त्यांची जी मेहनत घेण्याची मनापासून तयारी असते मला वाटते त्यांच्या रत्नागिरी मतदार संघातील प्रत्येकाला त्यांचे हे असे बेधडक वागणे आवडते म्हणून उदय कायम यशस्वी ठरत आले आहेत... 

अत्यंत महत्वाचे म्हणजे उच्च व तंत्रशिक्षण घेणारे वीस लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतात असे हे महाराष्ट्र राज्य देशातले पहिले राज्य ठरले आहे. दिवाकर रावते यांनी हाती घेतलेले अप्रत्यक्ष शिवसेनेने हाती घेतलेले महत्वाचे कार्य मंत्री झाल्या झाल्या उदय सामंत यांनी पुढे सुरु ठेवलेले आहे. उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्या खाली या राज्यात जे जे येते मग ती विविध महाविद्यालये येत असतील किंवा विद्यापीठे किंवा अन्य कुठलेही क्षेत्र भलेही ते विनाअनुदानित किंवा अशासकीय देखील असतील पण या सर्वंठिकाणचे फलक यापुढे फक्त आणि फक्त मराठीतच असावेत असा फतवा असा लेखी आदेश मंत्री उदय सामंत यांच्या  सूचनेनुसार शासनाने काढला आहे ज्याचे कौतुक राज्यात सर्वत्र होते आहे. डोक्यात कायम काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा किडा कसा वाळवळतो हे जवळून बघायचे झाल्यास, जा आणि काही क्षण सामंत यांच्या समवेत घालवा. मग तो त्यांचा व्यवसाय असेल किंवा मतदार संघ त्यांचा रत्नागिरी जिल्हा असेल किंवा त्यांचा त्या त्या वेळेचा राजकीय पक्ष, हाती घेतलेले काम आधी तडीस न्यायचे त्यानंतर त्याला नेमकी उंची गाठून देऊन मोकळे व्हायचे, मला वाटते हे असे वागणे त्यांच्या कायम अंगवळणी पडले आहे. चमत्कारिक नव्हे तर सामंत यांच्यासारखे चमत्कार घडवून आणणारे मंत्री सदा कायम प्रत्येक मंत्रिमंडळात असावेत...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी OFF THE RECORD review on some of the headlines...

OFF THE RECORD review on some of the headlines...

Kaun hai Woh? 
The current talk of the town...Who is the senior-most lady IPS officer who wanted to topple the MVA government? Home Minister Anil Deshmukh's interview to Lokmat has created ripples in the IPS lobby. Oh, was this the reason this senior most decorated lady officer, once in the race to become Mumbai Commissioner too, given a side posting in the reshuffle? What's wrong with State's "intelligence"? I just gave you a hint, did you get the name?....if not, you are't 'intelligent' enough 😉  But my 'intelligence' questioned, Does Devendra Fadnavis or the BJP require help of 2 to 3 IPS officers to topple this government? My 'intelligence' says a big NO.

Arrey, one more breaking from the IPS lobby. Do you remember the famous land grabbing case of 2017 wherein Romell Housing LLP had tried to grab a pime plot of 16 acres at Dahisar Check-naka worth Rs. 60 crores? It was in news then. Then CP, Barve, had suspended 4 police officers after finding out that his own departments people were hand-in-glove with the culprits. High Court had even slammed the police for their 'high-handness'...Doesn't ring the bell? Then Google it. Anyway, after suspending 4 cops, CP Barve had also written to the Home Department to initiate action on this entire episode. By the way, news is, & no one has reported this, Home Department has found one senior IPS officer guilty for supporting the land grab & HM Anil Deshmukh has given orders to prosecute this officer.

Not prosecuted, But then on finding out this matter, MVA government had to do something, what did they do? They ripped this IPS officer off his cream posting. Really Hats off to this MVA government. No other government had the audacity to touch this 'high profile' IPS officer--but this time, he has not only been touched, but he has been heckled, pushed and shoved! Credit entirely goes to Sharad Pawar, CM Uddhav Thackeray & HM Anil Deshmukh. By the way, don't know about other departments, I don't know any police officer bad mouthing this government. Reason--the recent transfers! It was done purely on merit. Some of them were here & there (& we totally understand) but 90% were more than satisfactory; including that of SP's. Out of 5 JT CP's & 4 Additional CP's of Mumbai--in the Devendra Fadnavis government, only 1 was Marathi out of 9, but in the Shivsena-NCP-Congress government, 7 babus are Marathi's. 

Talking of writing to the Home Department, another IPS Sanjay Pandey has written a very dangerous & damaging report on his findings of a particular case . His sole target was again the same IPS officer mentioned above in the land grab case. But now, just that the report shouldn't see the light, I have heard an ex CS, a PA to CM, and a senior most IAS officer had called Sanjay Pandey and pressurized him to not reveal anyone's identity in his report. Sanjay Pandey being himself, he went ahead and not only named that officer but he has also put  names of the ones who were 'pressurizing' him, with phone numbers they used for calling him and he claims to have recordings of the calls too....  

By the way, just for information, Atulchandra Kulkarni is at the top to replace Deven Bharti as the new ATS chief.

Maan Gaye Sachin Sawant
A week ago via phone calls, every Congress spokespersons in the Maharashtra were strictly given instructions to NOT participate in any kind of  debate or release any statement neither on Kangana_Sena war nor on the Sushant Singh Rajput case by the AICC. But Sachin Sawant, the fiery spokesperson from Mumbai, did participate in debates on Marathi channels and not caring one bit for his party's diktat, he fought for what he thought was the right thing to do. He continued to send loud tweets and defending his state against attacks of Kangana. At the end, why to keep silence nah? NCP is avoiding to utter a single word, but Sachin Sawant is the lone fighter from the MVA government to take Kangana head-on, despite AICC's diktat.  

Now, heard CM Uddhav Thackeray has given a contract to build his image in the social media circuit and fight the 'bhakts'. And the contract is worth 5.41 crores. People hammered this 'tender' of the government on social media that when the government has no money and is paying it's own employees salaries in installments, why is image building expenditure necessary? Devang Dave, National Convener at BJYM IT & Social Media, who unearthed this, says it is absolutely criminal waste of money especially in times when government employees salaries are paid in installments, not enough is spent to deal with Covid in Maharashtra, this kind of expense is not justified at all.

Last but not the least, seeing Tukaram Mundhe grabbing headlines, it makes me wonder has he come to serve public or is he more interested in PR and photo sessions and his own brand building? And those who think he does a wonderful job, talk to the authorities, MLA's at the corporation he serves. I know only two more people who want to be in limelight at any cost. One is Kirit "Fottoyaa", sorry Somayya and the other one is Supriya Sule. Supriya does not even leave one opportunity to have a selfie with anyone who visits her. Anyways, those who thought Nagpur send off of Tukaram Mundhe was out of own public's own will & interest, FYI and what I'm told, it was a paid 'event' of Congress's local corporator from Nagpur who is a "camcha" of Sunil Kedar. 

Vikrant Hemant Joshi  

Thursday, 17 September 2020

सामंत दणाणून सोडा आसमंत : पत्रकार हेमंत जोशी

सामंत दणाणून सोडा आसमंत : पत्रकार हेमंत जोशी 

जे अति होते त्यामागे लागायचे असे आमचे पत्रकारितेतील सूत्र आहे, अनेकांची अनेक गुपिते अगदी पुराव्यांसहित आमच्याकडे असतात, सारेच पुरावे उघड करावीत असे नसते अन्यथा कोणी मित्रच आम्हाला उरणार नाहीत जसे बिहारचे पोलीस मुंबईत आल्यानंतर रिया चक्रवर्ती अर्पिता खान कडे लपून बसलेली होती त्यामुळे अर्णब गोस्वामी जेव्हा उघड सलमान खानचे नाव घेतोय म्हटल्यावर मनास बरे वाटले, ज्या कुटुंबाचा ड्रग्स वर्तुळाशी अगदी जवळचा संबन्ध आहे त्याचे नाव अर्णब उघड करतोय म्हटल्यावर मनस्वी आनंद तो होणारच. पण त्याच सलमान खान याच्या गेली काही दिवस दोन वेगवेगळ्या महागड्या जाहिराती अर्णब च्या वाहिनीवर बघून नाही म्हणायला पोटात कसेतरी नक्की होते आहे, बघूया, अर्णब थांबतो कि सलमान विरुद्धची लढाई पुढे सुरु ठेवतो. अर्नब गोस्वामीचा नालायक नीच राजदीप सरदेसाई होऊ नये हे मात्र मनापासून प्रत्येक भारतीयांना वाटते आहे. तर मी तुम्हाला वर सांगत होतो कि कळलेली सारी गुपिते फोडायची नसतात अन्यथा मग कोणीही तुम्हाला जवळ उभे करीत नाही. याठिकाणी मला राज्याचे शिक्षण मंत्री रत्नागिरीचे अफाट लोकप्रिय आमदार शिवसेना पक्षाची विशेषतः अख्ख्या कोकणातली मोठी ताकद सळसळता उत्साह बोलक्या स्वभावाचे हसतमुख चेहऱ्याचे कायम लोकांमध्ये मिसळणारे आणि रमणारे उद्योगपती बुद्धिमान राजकारणी श्रीमान उदय सामंत यांची आठवण का झाली ते सांगतो... 

सात आठ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग. त्यावेळी उदय सामंत राष्ट्रवादीचे रत्नागिरीतलेच आमदार होते विशेषतः उदय यांचे त्यांच्या कुटुंबाचे नाट्यवेड त्यावेळी अध्यक्ष अभिनेते मोहन जोशी यांनी नाट्य परिषदेचे संमेलन रत्नागिरीला घ्यायचे असे ठरविले. मला निर्मात्या अभिनेत्री माझी जवळची सखी कांचन अधिकारी यांचा फोन आला, हेमंत आपण एकत्र गप्पा मारत रत्नागिरीला जाऊ या का, मी हो म्हणालो आणि माझ्या कार ने आम्ही तिघे म्हणजे मी, कांचन आणि माझे सार्वजनिक बांधकाम खात्यातले अभियंता जवळचे मित्र मिलिंद बच्चेवार तिघेही मनमोकळ्या धम्माल गप्पा मारत मारत रत्नागिरीला पोहोचलो. कांचन अधिकारी आणि मिलिंद बच्चेवार दोघेही तसे बोलण्यात अघळ पघळ त्यामुळे आमचा तो प्रवास अविस्मरणीय ठरला अनेक गुपिते मला या अशा गप्पांमधून कायम कळत आलेली आहेत. रत्नागिरीचा राजा म्हणजे उदय सामंत रत्नागिरीचा सर्वाधिक लाडका आणि आवडता नेता म्हणजे उदय सामंत त्यामुळे अख्खे रत्नागिरी शहर जणू आलेल्या प्रत्यकाचे कित्येकांचे घरी आलेल्या पाहुण्यांसारखे स्वागत करतांना मला दिसत होता. तेथली भोजन व्यवस्था राहण्याची सोय सारे काही पंचतारांकित त्यामुळे आलेली सारी मराठी चित्रपटसृष्टी, जमलेली मान्यवर मंडळी अगदी मनापासून सुखावली होती आनंदली होती, एखादा नेता सतत तेही आमदारकीला उगाच का निवडुन येतो, त्याचे काम कार्य प्रगती सारे काही स्थानिक मतदार उघड्या डोळ्यांनी बघत असतात म्हणून गेली दिड दोन दशके उदय सामंत रत्नागिरी जिल्ह्याचे यशस्वी नेतृत्व करतो आहे, पक्ष कोणता हे त्याच्यासाठी गौण आहे कारण मतदार त्याच्या कामगिरीवर फिदा आहेत, असतात... 

येथे मी उदय सामंत यांचा एकेरी उल्लेख केला आहे आणि राज्याचे सध्याचे राजकारण एकेरी उल्लेखावर गाजते आहे गांजते आहे त्यावर मला येथे काहीतरी सांगायचे आहे. वाचकहो, या राज्याचे असे कितीततरी मान्यवर नेते होते किंवा आजही आहेत कि ज्यांच्यापैकी अनेकांचा त्यांच्या नावामुळे आणि वागण्या बोलण्यामुळे काहींचा एकेरी तर काहींचा थेट त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासून आदरयुक्त शब्दांनी उल्लेख होतो किंवा तसे त्यांचे नाव घेतल्या जाते म्हणजे जेव्हा अजित पवार यांना राजकारणात ओ का ठो कळत नव्हते तेव्हापासुन त्यांना अजितदादा म्हटल्या जाते किंवा विलास देशमुख यांना विलासराव म्हटल्या जायचे पण काही नेते असे असतात कि जे त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाला आपल्या घरातले एक सदस्य वाटतात, कुटुंब सदस्य असे ज्या नेत्यांनी घराघरात स्वतःचे नाते निर्माण केलेले असते, त्यांच्यापैकी बहुतेकांना एकेरी नावाने ओळखल्या किंवा हाक मारल्या जाते विशेष म्हणजे अशा नेत्यांना आपला एकेरी उल्लेख होतो याचे वाईट वाटत नाही तर कौतूक असते आणि त्यावर उदय सामंत उद्धव ठाकरे सुनील तटकरे देवेंद्र फडणवीस अशी बहुसंख्य उदाहरणे आहेत. देवेंद्र तर या राज्याचे मुख्यमंत्री होते पण जो तो त्यांना देवेंद्र या एकेरी नावाने अगदी तोंडावर किंवा त्यांच्या पाठी उल्लेख करून मोकळा होई उलट कोणी देवेंद्र यांना फडणवीस साहेब म्हटले तर ते त्यांना स्वतःला देखील अवघडल्यासारखे होते किंवा होत असे तेच उदय सामंत यांचे, आजपर्यंत उदय तीन वेळा आमदार झाले तीन वेळा राज्यमंत्री मंत्री झाले अनेक महत्वाची मोठी पदे त्यांनी उपभोगली पण जे जे या राज्यातले किंवा त्यांच्या मतदारसंघातले त्यांना ओळखतात ते सारे उदय असे एकेरी नावानेच त्यांचा उल्लेख करतात त्यातून उदय हे प्रत्येकाच्या घरातले जणू एक सदस्य असाच त्यातून अर्थ निघतो आणि हेच मला नेमके उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत येथे सांगायचे आहे ते उद्या देशाचे पंतप्रधान जरी झालेत तरी जो तो मराठी माणूस त्यांचा एकेरीच उल्लेख करणार आहे कारण उद्धव हे प्रत्येकाला आपल्यातलेच एक वाटतात. तयामुळे अर्णब गोस्वामी किंवा कंगना राणावत इत्यादींना देखील उद्धव हे त्यांच्या घरातले एक सदस्य वाटत असावेत अशी स्वतःची समजूत करवून घेऊन आपण तूर्त या विषयाकडे दुर्लक्ष करूया आणि कोरोना महामारी कशी संपेल ते बघूया कि.... 

उदय सामंत यांचे मोठे सिक्रेट मी फोडणार पण पुढल्या भागात, तूर्त एवढेच : हेमंत जोशी 
Tuesday, 15 September 2020

गजब सेना अजब सरकार : पत्रकार हेमंत जोशी

गजब सेना अजब सरकार : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्या गावात देखणी स्त्री आणि तिच्या सुस्वरूप उफाड्या दोन तरुण मुली असतात, अशी स्त्री अचानक एकाकी विधवा झाल्यानंतर गावातल्या टवाळ मंडळींच्या नजरेने भीतीने तिच्यावर जी आपबिती कोसळलेली असते संकट ओढवते, राज्यातल्या तमाम मराठी मंडळींची अवस्था त्या विधवेपेक्षा फारशी वेगळी नाही नवऱ्यासारखे संरक्षण करणाऱ्या शिवसेनेला जर अब्दुल सत्तार आता नेते म्हणून हवे असतील, दिवाकर रावते ऐवजी अस्लम शेख यांचा पहिला फोन प्रिन्स ऑफ मातोश्रींना महत्वाचा वाटत असेल, महागड्या मोटार गाडीत शेजारी झिशान सिद्दीकी बसून महाआघाडी नेमकी कशी असली पाहिजे त्यावर सविस्तर बोलत असेल, अबू आझमी शिवसेनेची बाजू कधी सभागृहात तर कधी विविध वाहिन्यांवरून सांभाळतांना दिसत असेल, हसन मुश्रीफ आणि नवाब मलिक उद्धवजींच्या मंत्रीमंडळातले दोन प्रमुख सल्लागार मंत्री म्हणून आघाडीवर असतील, अनेक पाक विचारांचे देशद्रोही मुसलमान ज्या मुंब्य्रात वास्तव्याला आहेत अशा मुसलमानांची बाजू घेणारे त्यांचे नेतृत्व करणारे स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड तुमच्या मंत्रिमंडळात उद्धवजी महत्वाची खाती सांभाळत असतील, ज्या शरद पवारांकडे राज्याने अनेकदा दाऊदचे तारणहार म्हणून बघितले आहे त्या पवारांशिवाय तुमचे पानही  हलत नसेल किंवा थेट बांद्र्यात देखील तुम्हाला आशिष शेलार यांच्या ऐवजी बाबा सिद्दीकी जवळचा घरातला वाटत असेल आणि असे कितीतरी प्रसंग, या दिवसात प्रत्येक कित्येक बहुतेक मराठी मनांची अवस्था कशी हो असेल तुम्हीच विचार करून सांगा... 

उद्धव ठाकरे नेमके कोण असावेत म्हणजे शिवसेना प्रमुख कि मुख्यमंत्री या राज्याचे कि एकाचवेळी दोन्हीही. मला खात्री आहे जो तो म्हणेल सांगेल कि प्रत्येकाला उद्धवजी हे शिवसेना प्रमुख म्हणूनच हवे आहेत मान्य आहेत त्यांचे जुन्या सिनेमातल्या जगदीश राज सारखे आहे म्हणजे अनिता राज या अभिनेत्रींचे वडील जगदीश राज बहुतेक हिंदी सिनेमातून पोलीस अधिकाऱ्याची भूमिका वाढवायचे एखादी दुसरी भूमिका कधी त्यांच्या वाटेला आली तर दर्शक त्यांना त्या वेगळ्या भूमिकेत बघून नाक मुरडायचे. उद्धवजी हे मराठी माणसाचे जगदीश राज म्हणजे ते शिवसेना प्रमुख म्हणूनच शोभून दिसतात आणि उठावदार भूमिका निभावून बजावून मोकळेही होतात. सिनेमातली हेलन नाचवायची असते स्वतः हेलन होऊन नाचायचे नसते. ते एक अतिशय उत्तम संघटक अत्योत्तम शिवसेना प्रमुख पण कोणत्या क्षणी आमच्या या नेत्याला दुर्बुद्धी सुचली आणि त्याचा जणू पिंजरा सिनेमातला मास्तर झाला. अगदी ठरवून कोणा दुष्टाने नक्की डाव साधला आणि उद्धवजी तुम्हीच आता मुख्यमंत्री व्हायला हवे हे त्यांच्या मनावर पद्धतशीर बिंबवून त्यांना मातोश्री बाहेर काढले जणू मुख्य नर्तकाला कोरस मध्ये नाचायला सांगावे तसे कोणीतरी ठरवून या उत्तम राजाला प्रधान हो सांगितले आणि हेही महाराज यावेळी पद्धतशीर सापळ्यात अडकले, काय तर स्वतः मुख्यमंत्री झाले आणि सेनेच्या प्रमुख वारसदाराला देखील वरून मंत्री केले. स्वतः राजाच प्रधान होतोय म्हटल्यावर सेनेतले उत्सुक प्रधान आधी हिरमुसले नंतर आपल्या नेत्याचे केव्हा एकदा वाटोळे होते याची प्रथमच हे उत्सुक डोळ्यात तेल घालून वाट बघायला लागले हि वस्तुस्थिती आहे मित्रांनो.... 

तब्बेतीने शरीरयष्ठीने उद्धवजी तसे बऱ्यापैकी किरकोळ पण त्यांच्यातला शिवसेना नेता जागा झाला कि एरवी हेच उद्धव ठाकरे किती व कसे आक्रमक अनेकांनी आणि आम्ही अगदी जवळून केवळ एक पत्रकार  म्हणून बघितले आहेत. उद्धव म्हणजे दुर्लक्ष करण्याचा विषय असे जेव्हा वृद्धत्वाकडे झुकलेल्या बाळासाहेबांच्या अगदी जवळ असलेल्या स्मिता ठाकरे जयंत जाधव मुकेश पटेल किंवा सेनेतले तत्सम नेते, ज्यांना हे उद्धव बाबतीत  किरकोळ प्रकरण वाटायचे, एक दिवस याच उद्धव यांनी बंधू राज यांच्या मदतीने सहकार्याने बाळासाहेबांपासून अनेकांना बहुतेकांना अगदी सिनियर नेत्यांनाही खूप दूर पार कोपच्यात नेऊन ठेवले आणि काहीशी मरगळ आलेल्या शिवसेनेला मग त्यांनीच अटकेपार नेले जणू सेनेचे पराक्रमी पुरुष या नात्याने राज यांच्या संगतीने त्यांनी हे राज्य आणि राज्यातली शिवसेना दोन्ही पुन्हा एकवार दणाणून सोडले गाजवून सोडले, ज्याची दाखल राज्याला नव्हे तर देशाला देखील घ्यावी लागली. उद्धव यांना राज यांची ताकद आणि महत्व नेमके माहित आहे म्हणून आज या बिकट प्रसंगी दोन पावले मागे येऊन, चला पुन्हा संगतीने शिवसेना वाचवू या वाढवू या, हे असेच जणू राज ठाकरे यांना त्यांनी अप्रत्यक्ष सुचविलेले आहे. वाईट नाही, राज आणि उद्धवजी तसेच अमित आणि तेजस हे कॉम्बिनेशन. वास्तविक राज तू उर्वरित महाराष्ट्रातली शिवसेना सांभाळ मी मुंबईत बसून येथली सेना, महापालिका आणि शिवसेनेचे प्रशासन सांभाळतो हे त्याचवेळी काहीसे मन मोठे करून उद्धवजींनी बाळासाहेबांच्या हे नेमके मनातले राज यांना सुचवायला हवे होते किंबहुना वाटचाल त्याच मार्गाने सुरु होती पण उद्धव यांचे तेथे नाही म्हणायला काहीसे चुकले आणि आजचे हे नको ते झेंगट आणि संकट त्यांनी ओढवून घेतले... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Monday, 14 September 2020

कुठे फेडाल हि पापे : पत्रकार हेमंत जोशीकुठे फेडाल हि पापे : पत्रकार हेमंत जोशी 

रविवार दिनांक १३ सप्टेंबर,  दुपारी १ वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रसार माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधला आणि पुन्हा एकवार त्यांनी स्वतःला मोदी यांचा डुप्लिकेट करून घेतला. अनिल कपूर गोविंदा संजय दत्त शाहरुख खान जॅकी श्रॉफ इत्यादींचे डुप्लिकेट आले त्यांनी स्थानिक सामान्य जनतेचे मनोरंजन करून आपले पॉट भरले खरे पण त्यांना ओरिजनल कधीही होता आले नाही कारण तेच, ओरिजनल हा ओरिजनलच असतो आणि डुप्लिकेट हा डुप्लिकेट म्हणूनच शेवटपर्यंत स्वतःला मिरवतो, उद्धव यांना मोदी किंवा बाळासाहेबांचे  डुप्लिकेट म्हणून मिरवून घ्यायचे असेल तर मग हरकत नाही, काही वर्षे त्यात त्यांचे सिनेमातल्या डुप्लिकेट सारखे भागून जाईल पण वेगळे आहोत हे दाखवून द्यायचे असेल तर सध्या मुख्यमंत्री म्हणून त्यांचे जे काय या ८-९ महिन्यात सुरु आहे त्यात त्यांना आमूलाग्र बदल घडवून आणावे लागतील अन्यथा त्यांचा आणि सेनेचा प्रदीर्घ ह्रास ठरलेला आहे. लहानपणी मला एकच गाणे शाळेतल्या वर्गातले मित्र अनेकदा म्हणायला सांगायचे, मला वाटायचे कि मी ते गाणे उत्तम गातो म्हणून आग्रह केल्या जातो तर ते तसे नव्हते निदान तेवढे एक तरी गाणे मी चांगले म्हणावे म्हणून तो आग्रह असे तसे उद्धव यांचे कि नव्याने मुख्यमंत्री म्हणून सुरुवातीचे सुसंवाद पोरकट असायचे, चला निदान यावेळी तरी सुसंवाद उत्तम साधल्या जाईल पण कसले काय, यावेळी देखील त्यांचा सुसंवाद माझ्या रिपीटेड गाण्यासारखाच झाला. उद्धव यांच्याविषयी राग आणि फडणवीस यांच्यावर प्रेम उतू जाणे, असा येथे प्रकार नाही पण माणसे कोरोना हाताबाहेर गेल्याने उद्धवस्त होताहेत आणि ठाकरे सरकारचे तिकडे भलतेच प्रकार सुरु आहेत म्हणून मन अस्वस्थ आहे... 

उद्धव म्हणालेत, लोकांनो तुम्ही कसे नाही बघितले कोरोना काळात मला फिरतांना, केवळ रायगड जिल्ह्यातल्या वादळात ते फिरून आले त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस अख्खा महाराष्ट्र तेही विरोधी पक्षात असतांना पालथा घालून आले हे उद्धव यांना कदाचित लक्षात न आल्याने ते तसे बोलले असावेत. महत्वाचे म्हणजे 'तेरी साडी मेरे साडी से बढिया क्यों, हे जेव्हा याच उद्धव यांच्या लक्षात आले त्याक्षणी त्यांनी फडणवीसांच्या पायपिटीत अनेक शासकीय अडथळे आणण्यास सुरुवात केली पण तोपर्यंत फडणवीसांचे काम आटोपले होते विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जे काय करायचे होते त्यात पोटतिडिक होती त्यामुळे त्यांचे कोकणापासून तर मराठवाडा खान्देश पश्चिम महाराष्ट्र विदर्भ सर्वत्र जनतेने त्यांना उत्स्फूर्त डोक्यावर घेऊन प्रचंड स्वागत केले त्यांच्या सभोवताली गर्दी केली, एखादा लोकमान्य लोकप्रिय धाडसी निर्णय घेणारा निर्णय अमलात आणणारा मुख्यमंत्री लोकांचे गार्हाणे ऐकून घेतो आहे पद्धतीने लोकांनी गर्दी करून  गाऱ्हाणी त्यांच्यासमोर मांडली. मी जरी इकडे परदेशी नोकरीला असलो तरी चिंता कसली, तिकडे माझ्या बायकोला शेजारच्या गोखल्यांपासून मुले होताहेत कि किंवा रामू पाटील यांनी म्हणावे कि शेतीवर प्रत्यक्ष जाऊन शेती करण्याची गरज ती काय येथे वाड्यावर बसून कॅमेरा समोर ठेवून मला मजुरांना सूचना करता येतात कि, बघा, याच पद्धतीने आपले मुख्यमंत्री पण बोलले आहेत, लावा तो व्हिडीओ पुन्हा आणि बघा ऐका त्यांचे ते १३ तारखेचे भाषण. तेच म्हणताहेत उद्धवजी कि मी येथे चार भिंती आड बसतो हे खरे आहे आणि संगणकाकडे बघून म्हणतात, पण मला येथे सारे दिसत असते. तुम्हीच सांगा, त्यांच्या या बोलण्यावर हसावे कि रडावे, कोण नालायक त्यांना कायम असे हास्यास्पद मुद्दे काढून देतो आणि बोलायला भाग पाडतो येथेही कोणी तरी जॉनी लिव्हर बसलेला दिसतो जो त्यांच्या वाईटावर नजर ठेवून असावा. नवरा नागपूरला आणि बायको मुंबईला बसून हनिमून साजरा करता आला असता तर लोकांना बायकोच्या फोटोची पप्पी घेऊन देखील मुले झाली असती.उद्धवजी, अर्णब कंगना शर्मा ड्रग्स खून यात ज्यांनी चुका केल्या त्याकडे पाठ करा, भोगू द्या त्यांना त्यांच्या पापाची फळे, इकडे कोरोना महामारीकडे लक्ष द्या, महाराष्ट्र उद्धवस्त होतोय...
 
याच १३ सप्टेंबरच्या प्रसार माध्यम सुसंवादात उद्धवजी म्हणाले, या कोरोना काळात आम्ही पावणे दोन कोटी शिव भोजन थाळ्यांचे वाटप केले. कुठे नेऊन ठेवता आहेत ठाकरे आणि भुजबळ तुम्ही हा महाराष्ट्र ? निदान गरिबांचे तरी तळतळाट घेऊ नका त्यांच्या जखमेवर असे मीठ चोळू नका. अहो, पावणे दोन कोटी तर फार दूर, मला बोलायला लावू नका, पंचवीस लाख सुद्धा शिव भोजन थाळ्यांचे भुजबळ यांच्या खात्याने वाटप केलेले नाही आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. मला वाटते या अतिशय गंभीर प्रश्नांकडे किरीट सोमय्या देवेंद्र फडणवीस अतुल भातखळकर राम कदम इत्यादींना लक्ष द्यायला फुरसत नाही कि काय ? वेळ मिळाला कि जा आणि शोधून काढा छगन भुजबळ या तुरुंगातून सुटून आलेल्या मंत्र्याने त्याच्या अवती भोवती जमलेल्या दलालांनी हि शिव भोजन थाळ्यांची नेमकी कंत्राटे कोणाला दिलीत ती, जेव्हा ह्या टग्या कंत्राटदारांची नावे तुमच्या समोर येतील त्याक्षणी तुमच्या ते लक्षात येईल कि शिव भोजन थाळ्यांचे नेमके काय झाले असेल ? पावणे दोन कोटी थाळ्यांपैकी केवळ २५ लाख नित्कृष्ट थाळ्यांचे वाटप तुरुंगातून सुटून आलेल्या छगन भुजबळ यांच्या खात्याने केले अशी माझी माहिती आहे थोडक्यात प्रेताच्या टाळ्यावरचे लोणी यांच्या कंत्राटदरांनी खाल्ल्याचे, माहिती घेतल्यास तुमच्या अगदी सहज लक्षात येईल. इतरही सर्वच खात्यात या आठ महिन्यात प्रचंड भ्रष्टाचार झाले ज्याची माहिती माझ्याकडे आहे पण रडू तेव्हा कोसळले जेव्हा भुजबळ यांच्या कंत्राटदारांनी गरिबांच्या तोंडचे देखील जेवण हिसकावून घेतले. अहो, भुजबळ आणि कंपूने जर खरोखरी, प्रामाणिकपणे शिव भोजन थाळ्यांचे वाटप केले असते तर या मंडळींनी बसता उठता प्रसर माध्यमांना बोलावून त्यांच्या समोर गरिबांना थाळ्यांचे वाटप करतानाचे चित्रीकरण करवून घेऊन लोकांना ते नक्की दाखवले असते. कोट्यवधी रुपयांचा हा शिव भोजन थाळी घोटाळा आणि उद्धवजी मान वर करून सांगताहेत कि पावणे दोन कोटी थाळ्या वितरित केल्या. पुन्हा तेच कि खाणार्यांचा लुबाडणाऱ्यांचा दलालांचा नीच नेत्यांचा अति नीच अधिकाऱ्यांचा वक्त चांगला असू शकतो पण अंत शंभर टक्के वाईटच होणार आहे .... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 
Friday, 11 September 2020

सेना गोत्यात महाआघाडी संकटात : पत्रकार हेमंत जोशी

सेना गोत्यात महाआघाडी संकटात : पत्रकार हेमंत जोशी 

या दिवसात काही कुटुंब सदस्यांचा जर तुम्हाला मानसिक शारीरिक जाच त्रास असेल आणि तुमचे सतत घरी बसून असणे, मला वाटते त्यातून अनेकांना आत्महत्या करावी का असे वाटत असेल किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे त्यांना नक्कीच गरजेचे असेल, घराबाहेर पडल्यानंतर  एकवेळ थेट दाऊद शी पंगा घेऊन किंवा दंगा करून मोकळे व्हाल पण कुटुंब सदस्यांचे किंवा जवळच्या खाष्ट नातेवाईकांचे दुष्ट वागणे त्यासमोर टिकणे महाकठीण असे काम असते. एकमेकांशी सलोखा न राखता येणे अशी माणसे वास्तवात वेडी असावीत असे वाटते. या कठीण महामारीत ज्यांनी घरी शांतता राखली ते खरे सुसंस्कृत कारण राज्यकर्त्यांनी तर या कोरोना साथीचे महामारीचे महाधिंडवडे काढले आहेत असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे, केवळ उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून उपयोगाचे नाही तर एखादा दुसरा अपवाद सोडल्यास जवळपास अख्ख्या मंत्रीमंडळाने राज्याची लोकांची वाट लावलेली आहे, आज सत्ता हाती आहे त्यामुळे महा आघाडीच्या बहुसंख्य मंत्र्यांनी हवे तेवढे लुटून न्यावे पण जनता वैतागली आहे, भविष्यात मतदार तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत जवळ घेणार नाहीत. आपले सरकार फार टिकणारे नाही हे लक्षात आल्याने कि काय जो तो लूटमार करून मोकळा होतो आहे... 

आजवरचा राज्याचा राजकीय इतिहास असे सांगतो कि निवडणुकांच्या आधी जे हिंदू विशेषतः मराठी मतदार शिवसेना यावेळी संपली असे छातीठोकपणे सांगतात तेच पुढे शिवसेनेच्या पाठीशी भरभक्कम उभे राहून सेना उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मतदान करून मोकळे होतात त्यामुळे उद्धवजी विजयाच्या बाबतीत कायम सदा कॉन्फिडन्ट असतात,  पण लिहून ठेवा यापुढे नजीकच्या किमान दहा वर्षात असे घडणार नाही जर उद्धव यांनी त्वरित जनताभिमुख काही निर्णय घेऊन जनतेला मृत्यूच्या दारातून खेचून आणले नाही. भलेही कंगना रिया अर्णब सुशांत दिशा संजय असे विविध विषयांना महत्व देऊन महाआघाडी सरकार कोरोनाच्या अपयशातून जनतेचे लक्ष यादिवसात डायव्हर्ट करण्यात यशस्वी ठरत असेल किंवा ठरली असेल पण निवडणुकांच्या तोंडावर हेच मराठी हिंदू मतदार शिवसेनेची काँग्रेस केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत कारण जे विषय महत्वाचे आहेत त्याकडे महाआघाडीच्या मंत्र्यांचे, सरकारचे साफ दुर्लक्ष आणि आज याला संपवा उद्या त्याला बदनाम करा याकडेच अधिक लक्ष केंद्रित करणे, हे जे काय सुरु आहे, मोठी किंमत १०० टक्के विशेषतः शिवसेनेला मोजावी लागणार आहे आणि माझी लेटेस्ट माहिती अशी कि कोणत्याही क्षणी महाआघाडीतून बाहेर पडण्याची काँग्रेसची पूर्ण मानसिकता झाली आहे किंबहुना त्यांनी तसे ठरविलेच आहे.... 

राज्यातले सारेच  मराठी मतदार शिवसेनेच्या पाठीशी, असे आजतागायत कधीही राज्यात घडलेले नाही पण हे मात्र नक्की घडले आहे कि जे शिवसेनेचे परंपरागत मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार सेनेच्या पाठीशी प्रत्येक कठीण प्रसंगी किंवा कोणत्याही निवडणुकीत कायम उभे राहायचे उभे असायचे यावेळी मात्र मी जो राज्याचा कानोसा घेतो आहे ती एक प्रकारे सेनेला धोक्याची घंटा आहे, आता खुद्द सेनेचा परंपरागत मतदार विशेषतः कडवा शिवसैनिक देखील सेनेच्या चुकीच्या विविध भूमिकांना आणि युवा नेतृत्वाला मनापासून वैतागला आहे. एक ज्येष्ठ सेना नेते अलीकडे मला म्हणाले हि केवळ युवा सेना आहे, बाळासाहेबांची प्रगल्भ शिवसेना जवळपास इतिहासजमा झाली आहे कारण मातोश्रीवर कडव्या व अनुभवी नेत्यांना नव्हे तर उथळ पोरकट अमराठी दलालांचे महत्व वाढवून ठेवण्यात आलेले आहे. नको त्या अंगावर येणाऱ्या मंडळींच्या नादी लागून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या नादात सेना नेते का म्हणून आपली इज्जत  इभ्रत ताकद घालवून बसताहेत न उलगडणारे हे कोडे आहे ज्यामुळे यापुढे मुंबईतल्या शिवसेनेला कोण घाबरतो, अशी मोठी पुण्याई लाभलेल्या मिळविलेल्या शिवसेनेची जागतिक व भारतीय पातळीवर प्रतिमा नक्की निर्माण होणार आहे. भलेही माझ्यासारख्या असंख्य मराठी मंडळींना शिवसैनिक व्हायचे नसेल पण मराठी माणसाचे तारणहार म्हणून सेनेकडे प्रत्येक मराठी विशेषतः मुंबईकर मोठ्या अभिमानाने बघत आला आहे, आज तीच मराठी माणसाचा स्वाभिमान, शिवसेना जर अधोगतीच्या मार्गाने जात असेल तर  डोळ्यात टचकन अश्रू येतील, मन सैरभैर होईल.... 

एक आणखी अतिशय महत्वाचा मुद्दा येथे मांडतो कि आदित्य ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या, मी देखील आजोबा से सवाई आहे हे सेना नेता म्हणून सिद्ध करा, कुठे काही चुकलेच असेल तर अशा चुका पुन्हा करणार नाही अशी शपथ घ्या आणि आज तर साधे मंत्री आहात,  पुढे मुख्यमंत्री व्हा मात्र हे असे जर घडले नाही तर उद्धवजींची गादी तेज तेजस ठाकरेंच्या हवाली, अशी बातमी एक दिवस कानावर पडल्याशिवाय राहणार नाही, तातडीने सावध व्हा...

तूर्त एवढेच : हेमंत जोशीThursday, 10 September 2020

विषामुळे विनाशाकडे : पत्रकार हेमंत जोशीविषामुळे विनाशाकडे : पत्रकार हेमंत जोशी 
जुहू चौपाटी वर सकाळी फिरतांना एक दिवस रेतीवर फतकल मारून बसलेल्या एका वयस्क बाईकडे सहज लक्ष गेले, बायकांकडे निरखून बघण्याची जुनी सवय खोड माझी, निरखून बघितले, लक्षात आले अरे हि तर कधीकाळी आपली अत्यंत आवडती असलेली अभिनेत्री लीना चंदावरकर, तेवढ्यात नेहमी वॉक घेणारा अमित कुमार पण दिसला...तसेही किशोर कुमार नंतर म्हणे किशोरची पत्नी लीना आणि मुलगा अमित धाकट्या सुमितचे जवळपास आई बाबाच होते, खरे खोटे देव जाणो, पण लज्जा सोडलेल्या हिंदी किंवा मराठी चित्रपट सृष्टीत असे कितीतरी लीना चंदावरकर, महेश भट्ट आहेत. या प्रसंगाची यासाठी आठवण झाली कि दोन तीन दिवसांपूर्वी मी आणि माझा एक जवळचा मित्र जुहूच्या मेरियट हॉटेलमध्ये फ्रेश ब्रेड् आणण्यास जात असतांना वाटेत लगेच रिया चक्रवर्तीची इमारत लागली, एकाचवेळी आम्ही दोघेही पटकन सेम वाक्य बोलून गेलो कि हीच ती रिया एवढी निर्ढावलेली असेल असे कधीही तिच्याकडे बघतांना वाटायचे नाही जेव्हा कि जुहूला सकाळी वॉक घेतांना अनेकदा आमच्या आसपास फिरतांना ती दिसायची, असायची. म्हणतात तेच सत्य आहे, स्त्रियांचे चरित्र आणि पुरुषांचे भाग्य काय असेल साक्षात देवाला देखील सांगता येत नाही... 

न्यायालयात रिया चक्रवर्तीची रिमांड मागितल्या गेली नाही थेट १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडी मागण्यात आली. उद्या रियाला माफीची साक्षीदार म्हणून सोडल्या गेले तर मला त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही कारण देशातल्या राज्यातल्या मुंबईतल्या फार मोठ्या प्रमाणावर चालणाऱ्या ड्रग्स व्यवसायाची रियाने अनेक गुपिते फोडलेली आहेत त्यातून तिने ईडी, सीबीआय आणि नार्कोटीज या तिघांचेही काम सोपे करून सोडले आहे. राहिला प्रश्न रियाच्या तुरुंगात जाण्याचा, या तिन्ही केंद्रीय संस्थांनी, माझे असे थेट येथे सांगणे आहे कि त्यांनी तिला अटक करून तिचा जीव नक्की वाचवला आहे कारण जसे दिशा सुशांत आणि आणखी काही या दिवसात ज्या पद्धतीने खतम करण्यात आले, त्या बदमाशांच्या रडारवर शेवटचा दुवा रिया हीच उरलेली आहे, एकदा का रियाला खतम केले असते तर ड्रग माफिया आणि त्यांच्याशी संबंधित अनेक नेते, कदाचित काही मंत्री, बडे सरकारी अधिकारी आणि चित्रपट सृष्टीतले अरबाज, ऋत्तीक, शाहरुख सारख्या अनेकांचे फार मोठे संकट नक्की त्याक्षणी संपले असते. 

याठिकाणी अत्यंत अत्यंत महत्वाचा मुद्दा जो मलाही माहित आहे कि जे काही नेते अभिनेते कंगना राणावतला त्रास देताहेत, आव्हान करताहेत त्या नेत्यांनी अभिनेत्यांनी किंवा अन्य मंडळींनी एक बोट कंगना कडे दाखवतांना हेही नक्की तपासून घ्यायला हवे कि ते स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य ड्रग्सच्या आहारी गेले आहेत का ? कारण कंगना राणावतचे प्राप्त माहितीनुसार हे तर नक्की ठरलेले आहे कि ड्रग्स माफिया किंवा ड्रग्स घेणाऱ्या बड्या धेंडांची नावे तेही थेट पत्रकार पारिषद घेऊन ती जाहीर करणार आहे. विशेषतः पदावर असलेल्या किंवा नसलेल्या नेत्यांनी कंगना वर आरोप करतांना किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी त्यात सामील होतांना हे नक्की तपासून घ्यावे किंवा कुटुंबातील मुलांना भावांना मुलींना थोडक्यात कुटुंब सदस्यांना नक्की विचारून घ्यावे कि तुम्ही केवळ दारूच्या आहारी आहात कि तुम्हाला ड्रग्स घेण्याचे देखील व्यसन आहे का, अन्यथा उगाचच अनेकांचा कित्येकांचा राहुल महाजन होऊन नको ते बिंग फुटायचे. चुनायसेठ, जीनके अपने घर सिसेके हो वो दुसरे के घर पत्थर नही मारते!  माझा हे लिखाण, हा लेख राजकीय वर्तुळाशी सत्तेशी शासनाशी संबंधित असलेल्यांनी अवश्य अनेकदा वाचून नेमके काय करायचे आहे ते ठरवावे. मुंबई पुणे ठाणे नागपूर किंवा अन्य ठिकाणचे ड्रग्स घेणारे बडे मासे कोण याची जी यादी समोर येणार आहे त्यातले जवळपास निम्मे नावे तर माझ्याही जवळ आहेत. उगाच का मराठीत ती म्हण आहे कि दुसऱ्याकडे बोट दाखवतांना तीन बोटे आपल्याकडे असतात. अजूनही वेळ गेलेली नाही, उगाच उसने अवसान आणतांना आधी तुम्ही साऱ्यांनी अवश्य आपापली घरे आणि स्वतःला देखील तपासून घ्या, अन्यथा आरोप करणाऱ्यांचीच पळता भुई थोडी होईल. दिवंगत भय्यू महाराज आज जिवंत असते तर काही मंडळींना तर त्यांनीच सावध केले असते कि तुमची चड्डी फाटकी असतांना दुसऱ्याचे ढुंगण निरखून का बघता ? अर्थात महागुरु बालाजी तांबे यांनी देखील अशावेळी मौनव्रत सोडायला हरकत नाही. गप्प बसा, असे रागावून सांगायला हरकत नाही अनेकांचे तारणहार म्हणून... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी Wednesday, 9 September 2020

Kangana Vs Sena

Kangana Vs Sena 

No, this was never the war. It was a 'theory' of SSR's death and his fans been able to come to logical conclusion in regard to his death. This is what every SSR fan across the globe wants. But, then came Rhea Chakraborty, then the drug angle, and then came Kangana Ranaut & her "mandir" being demolished yesterday. As I have mentioned from Day 1 about SSR, that he wasn't a saint either (a stand I still maintain) but the way Mumbai Police handled the situation obviously it had to face repercussions. CBI, ED & NCB followed and now the drug angle has certainly made some very big people including some politicians of Maharashtra who are allegedly coke addicts, a bit uncomfortable. 

A NCP Cabinet Minister, who was on the way to his party's HO at Ballard Pier, next to where NCB is, was looked suspiciously only because he stopped for his favorite ham sandwich nearby on the day legislature assembly began. Certain channels started shouting his name & in slow voices saying that the Minister is a coke addict and was called for a statement or have come to meet Rhea! How ridiculous was that? At the end, friends like us had to come in support of Minister and defend his stand. Some did it on twitter, and I did it here. But this green eyed Minister, who otherwise is a fire brand and talks with so much enthusiasm, no channel or media has the right to make him go silent on this for days together. So certain agenda's must be stopped. High time now people like Jeetendra Awhad, Dhananjay Munde, Supriya Sule should come out in open to support the Shivsena, rather than choosing to be mum. 

And then yesterday, BMC did what it shouldn't have. Just like on my Facebook I will repeat the joke, if BJP has the NCB, CBI & ED, Shivsena has the JCB!😀

I thought yesterday Shivsena shouldn't have done what it did. They made it personal. Yes, she was wrong in comparing Mumbai with the PoK; but by not paying attention or simply acting without talking (just like the BJP does) would have helped Shivsena. What has happened, since yesterday Shivsena's image has taken a lot of beating, especially in Mumbai, it's den! And all this happened thanks to only one man, Sanjay Raut. I have described him as a master-man of Diversion. Whenever CM Uddhav or Sena are in middle of any crises, Raut has been called upon and he does exactly what is required. He diverts attention from the topic...And mind you those who feel Raut is a loudmouth & those are not CM Uddhav's words, believe me, all is happening only what CM Uddhav wants. When the Sainiks were down & out with a sea of people against them in the SSR death case & Rhea, Raut not only diverted the topic to H***khor, but also with BMC acting so quickly, made us forget about Rhea for a day. Such is the power of the Diversion Man. 

After the tearing down of Kangana's bunglow, then came the instruction from "Matoshri" that none of the newly appointed spokespersons have to make any comment on the Kangana incident. But then, Sharad Pawar spoke. Very easily, he distanced himself from the whole thing in fact putting Sena in a tight spot. But see how Pawar functions. Just a week ago this is the same Pawar who along with the whole family including his grand children went in to Thackeray's home for Ganpati Darshan when SSR & Arnab were hounding the Chief Minister. Another master stroke by Pawar who without saying, gave a message that we are together in every situation that will loom over this MVA government. Then this Kangana office incident, he saw the 'vibe' of the country and distanced himself very smartly. 

In middle of all of this, one feels for Aditya Thackeray. From being called Baby Penguin to being termed as a pedophile (whatsapp forwards), it just went on and on. Keeping meme's is OK but being termed pedophile even Aditya's arch rival Nitesh Rane said, is totally wrong & disgusting at the same time. One cannot control whatsapp forwards, but one cannot character assassinate anyone too. Now what I feel, Aditya is at an age of 30. I don't know any 30 year old having that kind of money and power Aditya has, to be away from the party circuit and luxuries of life. But this party circuit, has been the main cause for his name to get tarnished, & especially his friendship with the Bandra boys and Dino Morea. A close friend of Aditya tells me, we have seen so many best friends come and go in Aditya's life, but this Dino remains forever since 2012. High time Aditya should change his circle and habits else as no one is invincible in Shivsena. There is Tejas in waiting, who I have heard is a firebrand just like his late grandfather. 

Moving on, I feel somewhere down the line some big names are going to come out in this SSR death case and drug angle.What exactly must be the reason Shivsena is keeping a low profile and not acting the way we all know how it can react? In a post written by Journalist Vijay Chormare, he says Give Y security or Z security to Kangana, if Shivsena had it their way, not only Kangana could not have walked into Mumbai, landing of her flight would have been made difficult too...He continuous, that the cautious approach is been kept just because Shivsena is in power. I agree to this but also maintain Shivsena is no more governed or run by Shivsena now. It is run by "Yuvasena" with blessings of 'few' old timers Sainiks.  

Oh yaa, before I forget, a lot of political parties including Congress have started this message of instigating Marathi manus in the name of calling Mumbai POK. With all due respect, all these so called politicians of every party, just look around your homes & officers and tell me whom do you see in your closed circles? Do you find you having a drink (in your homes) with Marathi manus or a non Marathi Manus? Where do you invest your ill gotten wealth? With Marathi Manus? Whom does every tender go to, a Marathi Manus? Hence whatever I write against Avinash Bhosale or Vivek Jadhav, cross my heart, I'm really proud that somewhere a Marathi Manus is there. 

Vikrant Hemant Joshi  

Monday, 7 September 2020

संजय बोले उद्धवजी डोले : पत्रकार हेमंत जोशी

 संजय बोले उद्धवजी डोले : पत्रकार हेमंत जोशी 

मराठी मानसिकता अनेकदा कशी चुकीची असते त्यातून आपण मराठी इतरांसमोर स्वतःचे कसे हसे  करून घेतो त्यावर काही उदाहरणे देता येतील. नव्याने सुरु झालेल्या "माझाच होशील ना" या मालिकेतले एक पात्र डॉ. सुयश अतिशय श्रीमंत दाखवलेला आहे पण त्याची कार फार तर ८-१० लाख रुपयांची स्कोडा रॅपिड हि दाखवलेली आहे, अरे दाखवा कि एखादी मर्सिडीज वगैरे पण नाही... त्यावर  माझ्यासमोर घडलेला एक किस्सा मला आठवला. किस्सा तसा खूप जुना आहे. सिनेमाचे नाव आठवत नाही पण त्या मराठी सिनेमाचे जुहूच्या कुठल्यातरी बंगल्यात चित्रीकरण सुरु होते मी सहजच लक्ष्मीकांत बेर्डे शूटिंग करत होता म्हणून आत डोकावलो. शेजारी दिवंगत पत्नी रुही पण बसलेली होती, गप्पा रंगल्या. त्यात एक सिन होता कि खलनायक म्हणतो अमुक एका ठिकाणी पाच लाख रुपये घरून ये. मी लक्ष्याला म्हणालो अरे निदान पन्नास लाख तरी म्हणायला सांग, पैसे द्यायचे तर नसतातच कि. त्यावर लक्ष्या म्हणाला, अरे मराठी माणसाकडे नसतात एवढे पैसे म्हणून मागायला लाज वाटते. अशी हि आपली कमकुवत मानसिकता. "माझाच होशील ना" मधला डॉक्टर सुयश नायिका साईला म्हणतो कि कार ऍटोमॅटिक आहे, पण थोड्याच वेळात नायिका कार चे गियर बदलतांना दिसते.... 😆

आपण मराठी स्वतःचेच घोडे पुढे दामटतो समोरच्या माणसाच्या चष्म्यातून बघायला तयार नसतो. आमचेच सांगणे तेवढे सत्य किंवा योग्य असे काहीतरी वेगळेच आपले विचार असतात. जो उठतो तो काही एक विचार न करता एकतर त्या संजय राऊत यांना किंवा उद्धव ठाकरेंना शिव्या शाप दूषणे दोष देऊन मोकळे होतो इतकेच काय अगदी अलीकडे एका शिवसेना नेत्याने म्हणे उद्धव यांना हिम्मत करून थेट तोंडावरच विचारले कि कशाला हे संजय राऊत यांचे विचित्र वागणे तुम्ही खपवून घेता आहेत त्यावर क्षणाचाही विलंब न लावता उद्धवजी म्हणाले संजय इज राईट, जे मला हवे आहे तेच संजय करून बोलून मोकळे होतात. हे असे असते मराठी माणसाचे म्हणजे त्याला सेक्स, सिनेमा आणि राजकारण यातले फारसे काहीही कळत नसते पण तिन्ही विषय त्याच्या जिव्हाळ्याचे त्यामुळे संधी मिळाली रे मिळाली कि या तिन्ही विषयांवर आपण आपले असे काही ज्ञान पाजळून मोकळे होतो कि विचारू नका. तुम्ही आम्ही आपल्या नजरेतून बघतो उद्धव यांच्या नजरेतून बघण्याची आपली मानसिकताच नाही. माझे वाक्य लिहून ठेवा जर उद्या ठाकरे कुटुंबाबाहेरचा मुख्यमंत्री, सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडायचा झाल्यास ते एकनाथ शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकावर अनिल परब यांना दुसऱ्या क्रमांकावर तर संजय राऊत यांचा प्राधान्याने विचार करून त्यांनाच मुख्यमंत्री करून मोकळे होतील. कारण उद्धवजींना म्हणे असे सतत वाटते कि अनिल परब किंवा एकनाथ शिंदे या दोघांनाही जर आणखी मोठी फार मोठी संधी आणि जबाबदारी दिली तर ते स्वतःचा नारायण राणे करून मोकळे होतील म्हणजे कठीण प्रसंगी शिवसेनेतून बाहेर पडतील. धोका देतील कदाचित तसे होणारही नाही पण असे उद्धव यांना का वाटते त्यावर परब आणि शिंदे या दोघांनी स्वतःशी विचारमंथन करायला हवे... 

"शोले" या गाजलेल्या हिंदी चित्रपटात प्रत्येक गंभीर प्रसंगाआधी एकतर गाणे दाखवले आहे किंवा असरानी, धर्मेंद्र जगदीप, मावशी किंवा अमिताभ इत्यादींचे विनोदी प्रसंग टाकलेले आहेत. दर्शकांचे मन सिरीयस मूड मधून डायव्हर्ट करण्यासाठी हे केल्या गेले आहे. उद्धव ठाकरे दुसरे काय करतात म्हणजे आदित्य ठाकरे हा विषय असो किंवा कोरोना सारख्या महामारीत आलेले अपयश असो, ते मधेच संजय राऊत यांना आणून त्यांच्याकडून असे करून किंवा बोलून घेतात कि जनतेचेच नव्हे तर प्रखर प्रभावी विरोधकांचे देखील लक्ष डायव्हर्ट होऊन मन विचलित होते आणि उद्धव यांचे सरकार पुढे रेटण्याचे काम सोपे होते. काय बोलावे आणि काय बोलू नये हे तुम्हाला कळते ते संजय राऊत उद्धव ठाकरे यांना कळत नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तो मूर्खपणा आहे. आजपर्यंत संजय यांच्याकडून जे काय घडले आहे मग त्या मुलाखती असोत कि त्यांची बेताल वक्तव्ये, सारे काही नियोजन पूर्वक त्या दोघात हे आधी ठरविल्या जाते त्यांची त्यावर चरचा होते त्यानंतरच सारे काही घडत असते, लक्ष तुमचे विचलित होते त्यावेळी संजय आणि उद्धवजी गालातल्या गालात हसत असतात कारण त्यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला उल्लू बनविलेले असते. फारतर उद्धवजी यांना संजय यांचे हशिश, गांजा किंवा दारू सारखे ऍडिक्शन आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही म्हणजे त्यांना या कामासाठी फक्त संजयच हवे असतात असे वाटल्यास तुम्ही म्हणावे पण त्या दोघांना काही कळत नाही असे जेव्हा तुम्ही म्हणत असता वास्तवात लोकांनो अशावेळी खरेतर तुम्हालाच काही कळत नसते... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

पवार पंगा आणि पॉलिटिक्स : पत्रकार हेमंत जोशी

पवार पंगा आणि पॉलिटिक्स : पत्रकार हेमंत जोशी 

एखाद्या जंगलातला वाघ आजन्म ब्रह्मचारी राहणे पसंत करेल पण तो कामांध होऊन कधीही मांजरीच्या किंवा हरीणीच्या ओठांचे दीर्घ चुंबन घेणार नाही. पत्रकार उदय तानपाठक जरी एखाद्या घनदाट जंगलात अडकला तरीही तो तेथे एकटा नसेल माकड कोल्हा हरीण गेंडा अस्वल इत्यादींशी लगेच जुळवून त्यांना खदाखदा हसवून त्यांच्याशी गहिरी मैत्री करून मोकळा होईल. असे अनेक मंत्री माझ्या बघण्यातले कि त्यांना जरी थेट लंडनच्या इंग्रजाने शिकवणी दिली तरी त्यांना इंग्रजी येणार नाही. याउलट शिकवणी देणारा मराठी बोलायला लागेल. असे म्हणणारे म्हणतात कि हे दादांच्या बाबतीत प्रत्यक्षात घडले आहे म्हणजे इंग्रजी शिकवायला आलेली गोरी बाई पुढे इथलीच झाली आणि पुण्यात राहून लावण्यांचे कार्यक्रम करून पॉट भरण्यासाठी अस्क्खलीत मराठी बोलायला शिकली, जसे गोठ्यात ठेवलेला एक घाणेरडा बोकड त्याच्या जवळून जरी गेले तरी प्रत्येकजण क्षणार्धात नाक दाबून बाहेर येत असे पण नागपुरातून मुंबईत शिफ्ट झालेला एक पत्रकार त्या बोकडाजवळ गेल्यानंतर ते बोकड गळ्यात बान्धलेला दोर तोडून सैरावैरा धावत सुटले होते अर्थात हे सारे मला त्या शरद पवार यांच्यामुळे आठवले.... 

जसे एकदा भयावह कर्क रोगावर उपचार करतांना याच शरद पवारांनी थेट यमाला त्याच्याशी मस्त गप्पा मारून त्याला रिकाम्या हाताने माघारी धाडले होते तसे हेच शरद  पवार उद्या त्यांच्या मनात आले तर गणपतीला पण बारामतीला तेही स्वर्गातून बोलावून घेतील, गप्पा मारतील, नेम नाही पवारांकडे गणपतीचाही नक्की भ्रमणध्वनी असू शकतो, पण शरद पवार आपणहून गणपतीची स्थापना झाल्यानंतर तेही सह कुटुंब मात्र एखाद्याच्या घरी दर्शनाला गेले ना कोणी ऐकले ना कोणी बघितले, अगदी फौजिया खान पासून तर हेमंत टकले यांच्यापर्यंत अनेकांना माझे विचारून झाले. पण हेच अनप्रेडिक्टेबल शरद पवार यावर्षी तेही उद्धव ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनाला सहकुटुंब जाऊन आले विशेष म्हणजे त्यांनी हे दर्शन घेणे म्हणे मुद्दाम मीडियाला पण दाखवून दिले अर्थात त्यातून त्यांना हेच नक्की सुचवायचे होते कि उद्धवजी तुमच्यावर ओढवलेल्या या कठीण प्रसंगी मी सहकुटुंब तुमच्या पाठीशी आहे तरीही पवारांच्या या सूचक क्रियेवर उद्धव यांनी लगेच खुश होऊन सभोवताली गिरक्या घेऊन नाचू नये कारण पवारांचे तर ठरले आहे कि ते जे दाखवतात त्याच्या नेमके उलट देखील करतात वागतात किंवा क्रिया घडवून आणतात, कोरोना महामारीनंतर पवार त्यांच्या स्वभावाला साजेल असाच निर्णय घेऊन मोकळे होतील असे वाटते आहे... 

दिनांक ६ सप्टेंबरला नारकॉटिक्स केंद्रीय कार्यालयात जेथे रिया आणि कंपूची ड्रग्स प्रकरणी गंभीर चौकशी सुरु आहे त्या कार्यालया खाली दुपारपासून अचानक पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली थोडक्यात तेथला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. मीडियाने उथळ तेही विभत्स व ओंगळ भोंगळ आपले प्रदर्शन वास्तविक करवून घेऊ नये असे मी वारंवार जे बजावत असतो त्याची प्रचिती ६ सप्टेंबरला तेथे आली म्हणजे तेथे उपस्थित विशेषतः रिपब्लिक भारत आणि इतरही काही वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी बोंबलायला सुरवात केली कि थोड्याच वेळात रिया चक्रवर्तीला अटक होत असल्याने हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नेमकी माहिती न घेता उचलली जीभ लावली टाळूला पद्धतीने वाहिन्यांच्या प्रतिनिधींनी असे बोंबलत सुटू नये त्यातून उगाच जगभरातल्या भारतीय दर्शकांच्या मनाची अस्वस्थता वाढते. वास्तविक दाऊद कडून ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्री बॉम्ब ने उडवून देण्याची जी धमकी देण्यात आली होती त्या पार्शवभूमीवर तेही ड्रग्स तस्करीत दाऊद गॅंग चा १००% सहभाग असल्याने केवळ प्रिकॉशन म्हणून मुंबई पोलिसांनी स्वतःहून नारकॉटिक्स कार्यालयासमोर बंदोबस्त वाढवला होता, वाढवला आहे. काहीतरी चुकीचे अंदाज काढायचे आणि बातमी पसरवून मोकळे व्हायचे, वाहिन्यांचे हे असे उथळ वागणे कोणत्याही वाहिनीला  व त्यांच्या प्रतिनिधींना शोभणारे नाही अन्यथा भल्याभल्यांचा मग वाह्यात राजदीप सरदेसाई होतो ज्यांच्या तोंडावर थुंकावेसे वाटते. अत्यंत महत्वाचे म्हणजे, थर्डग्रडे रिया चक्रवर्ती हि विनायक दामोदर सावरकर नव्हे, कि तिला अटक करताना पोलिसांची गरज भासावी... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी Saturday, 5 September 2020

अब आयेगा मजा : पत्रकार हेमंत जोशी

अब आयेगा मजा : पत्रकार हेमंत जोशी 

डॉ. काशिनाथ घाणेकर मीना कुमारी लक्ष्मीकांत बेर्डे सतीश तारे इत्यादी अनेक आजच्या किंवा आधीच्या नट किंवा नट्या तुम्हा आम्हाला माहित आहेत कि त्यांनी घेतली कि त्यांना अभिनयाची भट्टी अधिक उत्तम जमून येत असे. येथे हा उल्लेख रीया चक्रवर्ती संदर्भात देखील मला येथे करायचा आहे. भामटा राजदीप सरदेसाई तर तोंडावर आपटला पण वाईट वाटले ते आज तक वाहिनीचे आणि सतीश मानशिंदे या दोघांचे निदान त्यांनी तरी भारतीयांच्या व मराठी माणसांच्या असे नजरेतून उतरणे मनाला वाईट वाटले मनाला यातना झाल्या. आणि रियाच्या संदर्भात जरा माहिती घ्या कि त्यादिवशी तिची पढवलेली मुलाखत आज तक वाहिनी वर अधिक सफाईदार व्हावी म्हणून तिला तू तुझा रोजचा डोस घेऊनच मुलाखत दे असे कोणी सांगितले होते. बघा तुमच्या सोर्स मधून माहिती मिळवा म्हणजे तुमच्या ते सहज लक्षात येईल कि पत्रकार किंवा एखाद्या मुलाखतीचे प्रायोजक किंवा आयोजक कसे व किती खालच्या थराला जाऊ शकतात ते. रिया पण एक अभिनेत्रीच आहे आणि काहींना नशा केली कि अभिनयाची भट्टी अधिक उत्तम जमून येते म्हणून का रियाला तसे करण्यास सांगण्यात आले... 

रियाला तर काय स्वतःचा बचाव करण्यासाठी वाट्टेल ते करावे लागले तरी ते तिला मान्य असेलच पण त्या मुलाखती मागे ज्यांचे ज्यांचे हात होते राग त्यांचा आला कि आम्ही भारतीय हिंदू किंवा मराठी किती खालची पातळी गाठून काहींना वाचविण्याचा कसा व किती किळसवाणा प्रकार घडवून आणतो आहे. रियाने जवळपास एक तास चाळीस मिनिटे चाललेली मुलाखत संपवली आणि ज्यांच्या डोक्यात रियाची तद्दन खोटी मुलाखत घेण्याचे आले त्यांची मला आधी किळस आली नंतर राग आला. मी त्यावेळी  म्हणालो, चला राजदीप ने हि मुलाखत घेऊन रिया सहित अनेकांचा  आज मार्ग कठीण करून सोडला, आता नेमके तेच घडते आहे. कदाचित या मागे असलेले नेते किंवा एखादी राजकीय पार्टी, मुलाखत घडवून आणणाऱ्या जाहिरात कंपन्या आज तक हि वाहिनी राजदीप सरदेसाई रिया चक्रवर्ती तिला नेमके काय व कसे खोटे बोलायचे हे लिहून देणारे समजावून सांगणारे कायदेतज्द्न्य सारेच भारतीयांच्या नजरेतून त्याक्षणी उतरले आहेत पण या प्रकरणात बघ्याची भूमिका घेणारे शरद पवार वेडे नाहीत कारण त्यांना माहित आहे कि वर बसलेला जो कडवा हिंदू राजा आहे तो पाप्यांना आणी पापात सहभागी व सामील असणाऱ्या प्रत्येकाला मग तो कोणीही असो सोडत नाही सोडणार नाही. एक कडवा हिंदू राजा आणि पाक विचारांचे जे कोणी मुसलमान या देशात ड्रग्स चा धंदा घेऊन बसले आहेत त्यांना हा राजा सोडणे शतसर टक्के अशक्य. हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा, हा राजा बीसीसीआय करून राहील त्यांना सुतासारखे सरळ करेल हे नक्की ठरलेले आहे... 

बघा मी जे तुम्हाला येथे सांगत आलोय तेच उघड होते आहे. आज आणखी एक महत्वाचे सांगतो कि ज्या दिशा सालियन ची आत्महत्या दाखवण्यात आलेली आहे ती आत्महत्या नसून खून आहे हे एक दिवस नक्की उजेडात येणार आहे आणि महत्वाचे म्हणजे नार्कोटीज सीबीआय इत्यादी मंडळींनी अद्याप दिशा सालियन प्रकारणावर काहीही सांगितलेले नाही कारण अतिशय धूर्तपणे ड्रग्स सुशांत सिंग आणि दिशा सालियन प्रकारणाचा छडा लावण्याचे नक्की वर ठरलेले आहे. अस्थाना वानखेडे किंवा अन्य सारे अधिकारी जे मुंबईत डेरेदाखल आहेत त्यांच्या साऱ्यांच्या दृष्टीने हा तपास महत्वाचा आहे आणि तो  सुरु आहे. मराठी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांनी भलेही यावर बातम्या करू नये पण केलेल्या बातम्या प्रायोजक असाव्यात असे जे चित्र त्यांच्यापैकी अनेकांच्या बाबतीत दिसते आहे त्यावरून ते आपली लोकप्रियता झपाट्याने घालवून बसणार आहेत कारण रियाच्या बाजूने बातम्या देणे म्हणजे एकप्रकारे ड्रग्स व्यवसायाला ते समर्थन देणे असे त्यातून सिद्ध होते आहे जे मराठी माणसाला मग तो कोणत्याही विचारांचा असो नक्की आवडण्यासारखे पटण्यासारखे नाही. रियाची राजदीप सरदेसाई ने आधी घेतली हिंदीतून मुलाखत ती एकाच छापील पद्धतीने त्यानंतर काही वेळातच मराठी वाहिन्यांनी दाखविणे त्यादिवशी तो प्रकार तर शिसारी आणणारा ठरला. सार्या मराठी वाहिन्या त्याक्षणी किळसवाण्या वाटल्या... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Friday, 4 September 2020

OFF THE RECORD review on some of the headlines....

OFF THE RECORD review on some of the headlines....

Aarey: Have to thank Maharshtra Government for reserving the 600 acres of land at Aarey as forest & protecting the lungs of Mumbai. But, don't know why have this habit of questioning everything this Government is doing...So dug & found something...surely, some questions need to be answered by the Government. To begin with, What happens to the metro car shed? I heard you are in process of shifting.  Obviously, it has too! So, those who don't know already a huge amount of money has been spent on the construction of this shed and now the construction is nearly 40% complete, I'm told. If this is shifted all this money used for construction goes down the drain, isn't it? And whose money is this? The investors right? And who pays the interest on this? The Government right? From where does the Government pay interest? From Common man's pocket right (taxes)? Hmmm.... By the way, The Metro 6 line that was promised by the MMRDA/MMRCL to be functional at the end of December 2021, again the project is indefinitely delayed as now there is no location finalised for the car shed, which is the end point of any line. Read somewhere yesterday, MMRDA is staring at the deposits to fund their projects. Now again the interest MMRDA is paying will again rise and again common man will be punished. And why all this? So that the Thackeray Government has something to show, isn't it? Again the next headache is that of finding of suitable location for construction for another car shed. Again heard the Government is eyeing a private land near Oshiwara (Pahadi Goregaon) so obviously the cost of land acquisition will be huge. Then again the TDR worth crores will have to be given to some AB. I don't understand, even after High Court and the Supreme Court has given a tight slap on face of Government by rejecting the plea to shift the shed, why all this exercise? To save our lungs, but broke our hipbone! To sum up, The Govt should enlighten us on the following : 

A. Cost incurred till date in the car shed at Aarey. 

B. Cost of acquisition of the private land at Pahadi Goregaon. 

C. Cost in delay and over runs in Metro line 6, which was to commence end 2021. 

D.  Metro line 6 was planned keeping car shed in mind. Alignment of the Metro line was done keeping car shed location in mind. Now if car shed is changing what happens to the alignment ?

E.  Who pays for increase in project cost.

2. IPS transfers: Mostly had written and all came out to be true. But surprising was shunting of Rashmi Shukla & keeping Deven Bharti on hold. No one in the Police Establishment Board since at least last 10 years has the guts to keep this man away. Neither in the Devendra Fadnavis government nor in this government. Then how did it happen? Sources say, since CM Uddhav Thackeray is on a spree of appointing OSD's / Advisors (At first, ex CS Ajoy Mehta, Ex Divisional Comm of Pune Deepak Mhaisekar being the latest), he might consider an IPS too, to be his eyes & ears in the Police Department. Earlier, all this was done only by one person...Never ever Uddhav Thackeray needed an army of advisors, when he had one & only Milind Narvekar with him! Only God knows, why times have changed? So all those who are expecting any kind of 'happiness',  mind you, he might become more powerful than before in the coming days due to his 'friendly' & 'can do anything for the boss' nature. But...& this is a big BUT, don't forget Sitaram Kunte is here and he is here to stay. He immediately solved the long pending issue of transfers, as soon as he was appointed full time "ACS-Home" & proved his mettle. Bharti sahab, yet a lot of dust to be dusted, off your shoulders!😊

3. Tv9: One of our own Journo Pandurang Raikar's death shook the entire fraternity. He died because he did not get an ambulance & oxygen on time in Pune. So the IAS officers of Pune Corporation who are shouting on top of their voices throughout social media about their achievements, just SHUT UP!! Anyway, Raikar has gone, and so has the image of TV9 in our eyes. A message is being viral on WhatsApp & even if I don't believe in such gossips, a little questionnaire, I'm sure, Umesh Kumavat & Gang won't be uncomfortable to answer, isn't it ? A. Is it True Tv9 office was made like a jail & for two months of initial lockdown no one was allowed to go in and out of office? B. Is it true a desk Roshan Dias also has expired in TV9 due to Corona & he wasn't allowed to go to home even after he complained about being unwell. C. Is it true a certain Gajanan Kadam, Manik Munde & Shamit Sinha are allowed to work from home just because they are management?  D.Why did the likes of Tulsidas Bhoite & Sachin Parab left TV9? & finally, E. What has TV9 done for Raikar & Dias families?  

Kangana Ye tune Kya Kiya: All your efforts of dragging Bollywood & stealing the daylights out of superstars by exposing the drug cartel all went in vain when you grabbed your phone yesterday & sat on Twitter. I agree, certain elements in Mumbai are of the Pak mentality, but even today, Mumbai is still a better place. In fact you gave a chance to otherwise "done nothing for marathi manus" party like Shivsena (it was a pride for all Marathi's till Hon'ble Balasaheb was there) a chance to rise their head and do what best they do, create panic...Now hope they won't create panic for the investigation agencies by their morchas & all. I had tweeted earlier, do whatsoever, PM Modi has intervened now. He has put all 3 best agencies of the country in Mumbai. They won't go empty handed from here. SSR's death case investigation was just the trigger they were waiting for....BCCI is done & dusted, mind you...It's Bollywood next...!!

Vikrant Hemant Joshi 

Wednesday, 2 September 2020

दलाल मालामाल राज्य कंगाल : पत्रकार हेमंत जोशी

दलाल मालामाल राज्य कंगाल :  पत्रकार हेमंत जोशी 

हिंदू राष्ट्राची आस आणि कास असलेल्या धरलेल्या नरेंद्र मोदी आणि त्यांच्या उत्तम बेधडक संस्कारांना आपले करणाऱ्या म्हणणाऱ्या मुंबईत ठाण मांडून बसलेल्या दिल्लीतल्या अधिकाऱ्यांनी खून आणि ड्रग्स प्रकरणात छुट पुट ड्रग्स पेडलर्स आत टाकून वातावरण निर्मित करण्याने राज्याच्या हिताच्या दृष्टीने काही एक हिताचे नक्की साधले जाणारे नाही. जर मला माहित आहे तर दिल्लीतल्या चलाख निष्णात अनुभवी अधिकाऱ्यांना तर नक्कीच पुराव्यांसहित हे माहित असणार आहे कि महाआघाडी मध्ये सामील असलेल्या नेमक्या मुंबई किंवा आसपासच्या कोणत्या एका मंत्र्याला आणि मुलगा आमदार असलेल्या एका माजी आमदाराला आत घेतले किंवा किमान दमात जरी घेतले तरी ड्रग्स चे राज्यातले सारे रॅकेट एका क्षणात त्यांना समजणारे आहे. मित्रहो, मुंबई किंवा मुंबईच्या आसपासचा ड्रग्स शी संबंधित मंत्री आईशपथ येथे आदित्य ठाकरे हे ते नाव नाही, वो तो बच्चा है! आशिष शेलार आमदार आहेत भाजपाचे अत्यंत प्रभावी नेते आहेत आणि ते मुंबईतल्या अशा परिसराचे आमदार आहे कि त्यांना ड्रग्सशी संबंधित खडान खडा १००% माहिती आहे मला त्यांच्याकडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत कि त्यांनी नेमकी माहिती व पुरावे केंद्रातल्या अधिकाऱ्यांना देऊन मोकळे व्हावे... 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना एक दिवस मी त्यांच्या कार्यालयात फार मोठ्या पदावर असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला फडणवीस यांनी कोणत्या दहा व्यक्तींना अजिबात जवळ घेऊ नये ती नावे सांगितली होती. राज्य मग ते कोणत्याही पक्षाचे आले असले तरी हेच दहा बिलंदर बदमाश बदनाम दलाल हे राज्य प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना बड्या नेत्यांना हाताशी धरून कसे ताब्यात घेतात हे त्यांना सविस्तर सांगितले होते त्यावर ते अधिकारी मला म्हणाले कि मला ती नावे फडणवीसांकडे उघड करता येणार नाही कारण त्यातले काही माझ्या देखील जवळचे आहेत आणि मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी माझ्या हातून देखील नको ती चूक नक्की घडते आहे. दुर्दैवाने मला पुढे सविस्तर त्या दहा व्यक्तींविषयी फडणवीसांना सांगता आले नाही पण ज्या दोघा तिघा विषयी सांगणे झाले त्यांना ते पटले असावे कारण त्यानंतर ज्यांची नावे मी सांगितली होती ती माणसे त्यांनी दूर केल्याचे मला जाणवले. त्यातली एक भाजपाची देखणी पण चिटर महिला पदाधिकारी होती, ती व तिचा लबाड नवरा अनेकांना एकाच पद्धतीने फसवायचे लुबाडायचे त्यांनी अनेकांना करोडो रुपयाचा "चुडा सॉरी चुना लावला" होता त्यात माझ्या एका अतिशय जवळची पुण्यातली महिला उद्योगपती होती... 

या महिला उद्योगपतीचे लुबाडल्या लुटल्या गेलेले पैसे परत मिळाले नाहीत पण फडणवीसांनी मात्र त्या चीटर महिला पदाधिकाऱ्याला  काट्या सारखे रस्त्यातून दूर केले आता म्हणे हि महिला पदाधिकारी दिल्लीत बसून नितीन गडकरी यांच्या गळ्यातली ताईत बनलेली आहे, चालायचेच सुंदर स्त्रियांना सहज ऍक्सेस असतो. ड्रग्स आणि खून प्रकरणात ज्या संदीप सिंग याचे नाव पुढे आले आहे त्याला एकेकाळी भाजपा मध्ये ज्या दलाली करणाऱ्या हिंदी अभिनेत्याने प्रतिष्ठा मिळवून दिली त्या अभिनेत्याचे आणि त्याच्या अतिशय खतरनाक दोन साथीदारांची नावे  देखील त्यावेळी माझ्या दहा दलालांच्या यादीत होती. फडणवीसांना त्यावेळी मी हेच सांगितले या धूर्त अभिनेत्याला कोणत्याही परिस्थितीत तुमच्या बाजूला घेऊ नका आणि किचन पर्यंत तर तो अजिबात येणार नाही याची खूप काळजी घ्या. कारण एकदा मी दुबई वरून मुंबईला परततांना एक अत्यंत देखणी अभिनेत्री जिचे त्याच्याशी ब्रेक अप झाले होते माझ्या शेजारी बसलेली होती. गप्पांच्या ओघात तिने जे काय सांगितले आणि पुढे मी त्या अभिनेत्याची जी दलाली त्याच्या दोन साथीदारांना तो घेऊन मंत्रालयात सरकारी कार्यालयात करत होता त्यातून तो कसा खतरनाक लबाड चलाख लुबाडू पण चेहऱ्याने इनोसंट मला माहित होते. आज बघा त्याच अभिनेत्याचे नाव संदीप सिंग चा जवळचा मित्र म्हणून पुढे आले आहे भाजपा इनोसंटली केवळ या अभिनेत्यामुळे बदनाम होऊ शकते. बरे झाले फडणवीस या लबाड "अविवेकी" पासून चार हात दूर झाले. हे असे मुख्यमंत्री म्हणून उद्धवजींनी देखील ऐकायला हवे संकटे कमी होतात... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी उडता महाराष्ट्र तुम्ही आणि आम्ही : पत्रकार हेमंत जोशी

 उडता महाराष्ट्र तुम्ही आणि आम्ही : पत्रकार हेमंत जोशी 

उडता पंजाब च्या जवळपास येऊन पोहोचलेला आजचा आपला महाराष्ट्र , पूर्वी फार तर उच्चभ्रू मराठी स्त्रिया दारू प्यायच्या खचित सिगारेट्स ओढायच्या मराठी पुरुष दारू प्यायचे ड्रग्स त्यांना ठाऊकही नव्हते, आता तसे नाही मराठी तरुण व तरुणी यामध्ये फारसा फरक उरलेला नाही दोघेही सर्हास दारू पितात सिगारेट्स ओढतात त्यांच्यात ड्रग्स घेण्याचे प्रमाण अति झपाट्याने वाढले आहे वाढते आहे कारण या व्यसनांचे आम्ही एकेकाळचे सुसंस्कृत मराठी देखील उदात्तीकरण करतो आहे , व्यसनांकडे श्रीमंतीचे लक्षण म्हणून बघतो आहे. नागपुरातला माझा अनुभव सांगतो, आदल्या दिवशीपर्यंत माझ्या अत्यंत जवळचे दोन पुरुष ज्या एका तिसऱ्या पुरुषविषयी व त्याच्या व्यसनांविषयी त्याच्या व्यसनी पत्नीविषयी विकृत वृत्तीविषयी भरभरून भडभडून सांगत होते दुसरे दिवशी ते त्याच माणसाच्या षष्ठीला थेट स्टेजवर अगदी जाहीर तोंड भरून न थकता न थांबता कौतुक करतांना, विशेष म्हणजे तो कसा देवत्व प्राप्त झालेला संकट मोचक म्हणून तारीफ करतांना बघून मी अचंबित झालो. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात त्यांच्या या व्यसनी नेत्यावर जो विशेषांक काढण्यात  आला होता त्यात या दोघांचेही भरभरून स्तुतीपर लिहिलेले लेख होते. कार्यक्रम संपल्यानंतर बेशरम चेहरा करून ते दोघेही पुन्हा ह्या ह्या हसत जेव्हा माझ्यासमोर आले, एक हलकट कटाक्ष टाकून मी त्यांच्या पुढ्यातून निघून गेलो. या अशा व्यसनी आणि विकृत नवरा बायकोला आपल्या घरातही घेणे म्हणजे कुटुंब आपल्याच हाताने संपविण्याससारखे आहे असे आदल्याच दिवशी मला त्या त्यांच्या नेत्यांविषयी सांगणारे हे तद्दन लाचार या समाजात जागोजाग असल्यानेच मराठी उच्च कुटुंब व्यवस्था घसरते आहे घसरली आहे... 

मी माझ्या आयुष्यातले चांगले किंवा वाईट कधीही लपवून न ठेवता समाजाला सामोरा गेलो. माणसाच्या हातून चुका होतात पण त्या लक्षात आल्यानंतर अशा चुका पुन्हा न करणे म्हणजे आयुष्यावर प्रभुत्व मिळविणे असे मी समजतो. वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून बाहेर पडल्यानंतर फार तर १७ व्या वर्षी मी नोकरीला लागलो तेव्हा मला पगार होता १५० रुपये त्यात धाकट्या भावाला माझ्यासारखे स्टेनोग्राफर करण्याचे माझे स्वप्न होते त्यामुळे कित्येक महिने मी एकदाच जेवत असे पण पगार मिळाला कि मी आणि माझा शिरीष नावाचा मित्र आपापल्या पगारातून दहा रुपये काढून त्यातल्या दोन रुपयांची गावठी दारू पिऊन उरलेल्या आठ रुपयांचे चमचमीत जेवण बाहेर घेत असू, पुढे याच गावठी दारूने शिरीष चा ऐन तारुण्यात जीव घेतला मी मात्र लगेचच वर्षभरात स्वतःला सावरले, गावठी दारूला कायमचा राम राम ठोकला पण ते दहा रुपये त्या दिवशी म्हणजे महिन्यातून एकदा मला दिवाळी साजरा केल्याचा आनंद द्यायचे. नंतर मात्र महिनाभर एकवेळ जेवण डोळ्यात पाणी आणायचे. पण पुढे फार लवकर मी दारिद्र्यावर मात केली त्यासाठी मला सुरेशदादा जैन व त्यांचे बंधू रमेश, सतीश व मधुभाभी यांची मोलाची मदत झाली.... 

भावाला स्टेनोग्राफर करून पुढे त्याला उच्च न्यायालयात त्यावेळेचे कायदा मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सचिव चौधरी सहकार्याने प्रमोशन मिळवून देण्यात मी यशस्वी झालो. माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. सुरेशदादा जैन किंवा मधुभाभी  यांची अलीकडे भेट होत नाही, सतीशदादा तर देवाघरी गेले पण जेव्हा केव्हा या कुटुंबाचा विषय निघतो मी त्यांच्यावर आधी कृतद्न्यता व्यक्त करून भरभरून बोलतो. खाल्ल्या मिठाला जागायचेच असते. मतभेद झाल्यानंतर देखील बेईमान व्हायचे नसते. १९९० नंतर मराठी माणूस देखील बेईमानी भ्रष्टाचार करून अनेक श्रीमंत झाले खरे पण नवश्रीमंत होणाऱ्यांचे कुटुंबाकडे मुलांकडे साफ दुर्लक्ष झाले. त्यामुळे १९९० नंतरची पिढी व्यसनांच्या आहारी गेलेली आहे. मला एक असे नेते कि मंत्री माहित आहेत कि ते पुण्यातल्या त्यांच्या घरी बाई आणि पैशांच्या आहारी गेल्याने जवळपास १५ वर्षे पत्नी आणि दोन मुलांकडे फिरकलेच नव्हते म्हणजे कधीतरी एखाद्या पाव्हण्या सारखे घरात थोडावेळ डोकवायचे त्यातून घडले असे कि त्यांचा एक मुलगा ड्रग्स व विविध वाईट व्यसनांच्या आहारी गेला. आता या नेत्याचे डोळे उघडले खरे पण वेळ निघून गेली आहे. आता हा नेता दररोज वाममार्गाला गेलेल्या तरुण मुलास म्हणतो कि तू वाट्टेल तसा वाग पण माझ्या नजरेसमोर २४ तास राहत जा आणि आता ते त्या मुलास शक्य नाही. अर्थात नवश्रीमंत झालेले आपण सारेच थोड्याफार फरकाने या नेत्यासारखे, राज्य विकून खाणारे जे कोणी आहेत असतील होतील त्यांना तो परमेश्वर सोडत नाही... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी Tuesday, 1 September 2020

निखिल बन गया अर्णब : पत्रकार हेमंत जोशीनिखिल बन गया अर्णब : पत्रकार हेमंत जोशी 

२५-३० वर्षांपूर्वीच्या इतिहासाची पुनरावृत्ती शिवसेनेकडून का केल्या गेली, शिवसेनेकडून पुन्हा तीच चूक का घडली, माझ्या तर हे आकलन शक्ती पलीकडले आहे. त्याचे वडील विद्युत महामंडळात बक्कळ पैसे मिळवून निवृत्त झाले होते वरून जवळच्या मित्राची जागा त्याने आपले कार्यालय काढण्यासाठी हडपली होती त्यातून निखिल वागळे यांनी महानगर सायंदैनिक सुरु केले होते ते मोठे करण्यासठी तो सारखा धडपडत होता पण शिवसेना जोरात व जोशात असल्याने तसेही या राज्यातले पुरोगामीत्व रसातळाला गेले होते त्यामुळे पुरोगामी विचारसरणीच्या निखिल यास महानगर हवे त्या पद्धतीने लोकप्रिय करणे जड जात होते मात्र बाळासाहेबांच्या हातून नको ती चूक घडली त्यांच्या नेत्यांनी निखिलच्या कानाखाली लावल्या पण त्यानंतर शिवसेनेला थप्पड बसली आणि निखिल मात्र रातोरात राज्यातल्या पत्रकारितेत नावारूपाला आला त्याच्या महानगरने देखील खपाच्या बाबतीत एवढी उचल घेतली कि मुंबईतले हे सायंदैनिक मुंबई बाहेर देखील काही प्रमाणात दुसरे विकले जाऊ लागले. निखिल ची शिवसेना विरोधात लिहिण्याची खुमखुमी तर मोठी झालीच पण त्याने दाखवलेल्या हिम्मतीमुळे मग राज्यातले इतरही वर्तमानपत्रे सेनेला अंगावर घेऊ लागले... 

एकदा दादरला दिवंगत लेखिका गिरीजा कीर यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी त्यांचे पती श्री उमाकांत कीर व मी मिळून थेट बाळासाहेबांना आमंत्रित केले होते त्यात आम्ही भाऊ तोरसेकर यांनाही मुद्दाम बोलावून घेतले होते, आम्ही बाळासाहेबांना जेव्हा म्हणालो कि तुम्ही उगाच अतिशय क्षुल्लक वात्रट निखिल वागळे यास अंगावर घेऊन सेनेची किंमत कमी करून घेतली आणि निखिल चे महत्व वाढवून ठेवले त्यांनी हो अशी मान डोलावली म्हणजे त्यांनाही आमचे म्हणणे पटलेले होते. पण बाळासाहेबांचे एक चांगले होते कि ते केवळ सभोवतालच्या श्रीमंत दलालांमध्ये कधीही फारसे अडकून पडले नाहीत ते पत्रकारांपासून तर विविध प्रांतात तद्न्य अशा सल्ला देणार्या अनेकांना बोलावून घ्यायचे गप्पा मारता मारता जे मनाला पटले ते अमलात आणायचे दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे हे बाळासाहेब किंवा राज ठाकरे यांच्यासारखे कधी आमच्याशी किंवा निकोप राजकीय तज्ज्ञांशी कधी अशांना जवळ घेऊन त्यांच्यात रमलेच नाही त्यामुळे त्यांचे नक्की फार मोठे राजकीय नुकसान झालेले आहे. असे माणूसघाणेपण नक्की चांगले नसते, रयतेच्या राजाला ते १००% कधीतरी नुकसानदायी ठरते जे आज त्यांच्याबाबतीत घडले आहे. अन्यथा आमच्यासारख्या राज्याचे राजकारण नेमके माहित असणाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना नक्की हक्काने व हट्टाने सांगितले असते कि अर्णबला अंगावर घेण्याची ही योग्य  वेळ नाही... 

इतिहासाची हुबेहूब पुनरावृत्ती घडली आहे अर्णब गोस्वामीला शिवसेनेने व महाआघाडी सरकारने जगातला निखिल वागळे करून सोडले आहे. निखिल वागळे राज्यात गाजला पण अर्णब गोस्वामी तर जगभरात पोहोचला. उगाच अर्णब यांच्या नको त्या चौकशा राज्य सरकारने लावल्या. याच तक्रारींना पुढे थेट उच्च न्यायालयाने केराची टोपली दाखवली आणि महाआघाडी सरकारची तसेच मुंबई पोलिसांची अत्र तंत्र सर्वत्र नाचक्की बदनामी झाली. लगेचच पुढल्या पंधरा दिवसात सुशांत सिंग प्रकरण घडले मग याच अर्णब गोस्वामीने मुंबईत बसून दिल्लीतल्या सर्वच्या सर्व हिंदी व इंग्रजी वाहिन्यांना जणू आवाहन दिले अर्णबने आपली वाहिनी मुंबईत बसून दिल्लीकरांच्या खूप पुढे नेऊन ठेवली ज्याची शिवसेना व राज्य सरकारला सध्या या साऱ्या प्रकाराची मोठी किंमत मोजावी लागते आहे. एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक दुसरी लपविण्यासाठी तिसरी हे असे येथे घडते आहे आणि महाराष्ट्र देशात व जगात बदनाम होते आहे जसे कशाची म्हणून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेला भीती वाटली आणि त्यांनी अतिशय धोकादायक असतांना देखील कूपर हॉस्पिटल मधल्या ज्या पाच डॉक्तरांनी सुशांतसिंगचे पोस्टमार्टेम केले होते त्यांचे कोरोना च्या नावाखाली विलगीकरण करून घेतले. माझी माहिती अशी आहे कि कूपर इस्पितळाच्या प्रमुखांनी त्यांच्या शासकीय डायरीत हे लिहून ठेवलेले आहे कि त्यांनी कोणाच्या आज्ञेवरून त्या पाचही डॉक्टर मंडळींना सुट्टीवर धाडले आहे, केली ना अशी नवी पंचाईत सीबीआय कडून नको त्या चौकशी करण्याची. हे दिवस शांत बसण्याचे आहेत आगाऊपणा करण्याचे नाहीत...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी