Monday, 31 August 2020

उडता राजदीप पडती रिया : पत्रकार हेमंत जोशी

उडता राजदीप पडती रिया : पत्रकार  हेमंत जोशी 

आज हा लेख लिहीत असतांना ३१ ऑगस्ट आहे उद्या गणपती विसर्जन आणि माझी खात्री आहे रिया चक्रवर्ती व तिच्या अन्य साथीदारांना २-३ तारखेला नक्की अटक करण्यात येईल. गणपती विसर्जनाच्या दिवशी उगाच गोंधळ नको म्हणून रिया व तिच्या साथीदारांची अटक २-३ दिवस पुढे ढकलण्यात आली आहे असे दिसते. माकडचाळे करणारा पत्रकार राजदीप सरदेसाई दुल्हे राजा सिनेमातल्या माकडछाप जॉनी लिव्हर सारखा मला तंतोतंत हुबेहूबत्या रिया चक्रवर्ती ची आज तक वर मुलाखत घेतांना वाटला भासला त्या सिनेमात कादर खानला जसे शेवटपर्यंत हे लक्षात ध्यानात येत नाही कि त्याचा मॅनेजर जॉनी लिव्हर नेमका त्याचा माणूस आहे कि कादर खानचा शत्रू असलेल्या हिरो गोविंदाचा माणूस आहे, अर्थात जॉनी जसा त्या सिनेमात ज्याची रोझी रोटी खातो त्या बॉसच्या विरोधकाचा म्हणजे गोविंदाचा खास माणूस असतो आणि वेळोवेळी तो कादर खान यालाच अडचणीत आणत असतो तो जॉनी लिव्हर आणि आमच्या पत्रकारितेतील जॉनी लिव्हर राजदीप सरदेसाई या दोघात मला काडीचाही फरक जाणवलेला नाही, अर्थात तुमचेही तेच म्हणणे असेल कारण ज्या रियासठी व तिच्या गुप्त पाठिराख्यांसाठी राजदीप सरदेसाई या वादग्रस्त पत्रकाराने मुलखात घेण्याचे कुभांड रचले त्यात या राजदीपने एकाचवेळी दुल्हे राजा सिनेमातल्या माकडचाळे करणाऱ्या जॉनी लिव्हर या विनोदी पात्रासारखे रियासहित अनेक मित्रांना अडचणीत आणून ठेवलेच पण अतिशय गलिच्छ त्यातून काही घडले असेल तर गेली अनेक वर्षे दर्शकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विश्वास जपण्यासाठी ज्या आज तक हिंदी वाहिनीने अनेक परिश्रम घेतले त्या वाहिनीचा रियाची मुलाखत घेऊन आणि दाखवून जगभरात बट्ट्याबोळ केला... 

केवळ रिया चक्रवर्तीच्या एका नाठाळ भंपक उथळ पोरकट वात्रट नीच हलकट बाष्कळ मुलाखतीपायी आज तक हिंदी वाहिनीने क्षणात क्षणार्धात गमावलेली लोकप्रियता आणि विश्वासाहर्ता पुन्हा कमावण्यासाठी त्यांना यापुढे म्हणजे राजदीप सरदेसाईच्या या घृणास्पद मुलाखतीमुळे हि वाहिनी जागेवर आणण्यासाठी अनेक वर्षे शंभर टक्के खर्ची घालावे लागणार आहे विशेष म्हणजे अगदी विनाकारण आज तक च्या या उथळ भूमिकेतून आक्रस्ताळ्या अर्णब गोस्वामी व त्याच्या वाहिनीला टीआरपी बाबत मोठा फायदा झाला आहे. अर्णब सत्याची बाजू घेतो विकल्या न जाता न घाबरता सत्याला सामोरे जातो अशी आता त्याची इमेज बनल्याने रिपब्लिक वाहिनी एका झटक्यात किती तरी पुढे निघून गेली आहे. तेच राज्यातल्या बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांचे. आज तक वर अख्खे जग राजदीप सरदेसाई याने मॅनेज केलेली रिया चक्रवर्ती ची मुलाखत बघत असतांना त्या मुलाखतीचा काही भाग मोठ्या खुबीने त्यांच्याकडे ज्या पीआर एजन्सीने मराठीकरण करून पाठवला होता, कदाचित कोणाला घाबरून कि क्षणिक मोहाला बळी पडून दाखवण्याची काय गरज होती ? ते मराठीकरण कोणीही सिरियसली तर घेतले नाहीच पण तद्दन बातम्या दाखवणार्या मराठी बातम्यांची मात्र जगभरातल्या मराठी दर्शकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नाचक्की छी थू झाली. त्यादिवशी एरवी मला बऱ्यापैकी सुसंस्कृत वाटणारा मुच्छड राजीव खांडेकर थेट बदनाम राजदीप सरदेसाईच्या शेजारी बसल्यासारखा भास झाला. राजीव तुलाही दोन देखण्या तरुण मुली आहेत अशा जबाबदार पित्याने तरी बेजबाबदार वागू नये,  काय झाले ढुंगणावर झाड उगवले तर उलट सावली झाली अशी बेशरम भूमिका घेऊ नये, तू काय उमेश कमावत आहेस काय ? 

थोडक्यात काय तर आगाऊ राजदीप सरदेसाई याने घेतलेल्या पोपट पंची मुलाखतीमुळे आज तक या सुप्रसिद्ध हिंदी बातम्या देणार्या वाहिनीने जणू त्यादिवशी आत्महत्या केली. हत्येला आत्महत्या दाखवण्याच्या लोभापायी शेवटी आज तक या वाहिनीने आत्महत्या केली. राजदीप सरदेसाई याने रिया चक्रवर्तीच्या घेतलेल्या मुलाखतीमुळे सीबीआय नार्कोटीज आणि ईडी या तिन्ही सरकारी यंत्रणेचे काम अतिशय सोपे झाले म्हणून मी राजदीपला जॉनी लिव्हर नावाचा विदूषक म्हटले ठरविले आहे. अर्थात जर राजदीप सरदेसाई यासी मुलबाळ नसेल कि नाही त्यामुळे त्याला एखाद्या बापाचे एकुलते एक पुत्र गेल्यानंतरचे दुःख काय असते कसे कळेल ? एक मात्र सध्या प्रकर्षाने जाणवते आहे कि राज्य सरकार जे अगदी उघड सीबीआय ईडी नार्कोटीज न्यायालये व केंद्र सरकार विरुद्ध उघड पंगा घ्यायला निघाले होते ज्यातून त्यांनी विनाकारण स्वतःच्या पायावर मोठा धोंडा पडून घेतला ते राज्य सरकार बरेचसे खूपसे बॅक फूट वर आलेले दिसते कारण ज्या सीबीआयच्या मुंबईत आलेल्या अधिकाऱ्यांना मुंबई महापालिका आयुक्त अगदी उघड म्हणजे मीडियासमोर सांगत होते कि आम्ही त्यांनाही सात दिवसानंतर विनय तिवारी यांच्यासारखे विलग्नवास (quarantine) करू ते मात्र करण्याची त्यांची मुदत संपल्यानंतर देखील हिम्मत झालेली नाही आणि त्यांनी ती केली नाही बरे झाले, काही वेळा हार पत्करणे फायद्याचे ठरते. उद्दाम भाषा आणि मुद्दाम मुलाखती काहींना अधिकाधिक अडचणीच्या ठरणार आहेत ठरतील हि काळ्या दगडावरची रेघ आहे... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी Saturday, 29 August 2020

उडता महाराष्ट्र : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी

उडता महाराष्ट्र : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 

हिंदी सिरियल्स मी आजतागायत कधीही बघितलेल्या नाहीत आणि मराठी फारतर दोन तीन बघितल्या असतील. अगबाई सासूबाई यासाठी बघायला सुरुवात केली होती कि त्यात माझ्या परिचयाचे आमच्या विदर्भातले गिरीश ओक आहेत आणि माझी एकेकाळची अतिशय जिवलग मैत्रीण निवेदिता जोशी पण आहे. मालिके मध्ये गिरीश ओक प्रौढ विवाहित दाखवले आहेत किंवा ते प्रौढ आहेत यात काही चुकीचे नाही पण त्यांनी डोक्याचे केस रंगवून काळे दाखवले असते तर गिरीश म्हातारे आणि किळसवाणे दिसले नसते तसेही शेफ किळसवाणा असता दिसता कामा नये. विशेषतः कोरोना मध्ये बंद पडलेली हि सिरीयल पुन्हा सुरु केल्यानंतर मराठी कुटुंबात न घडणारे प्रसंग या मालिकेत या सिरीयल मध्ये दाखवून निर्माते आणि दिग्दर्शक या सिरीयलची वाढलेली लोकप्रियता झपाट्याने घालवून बसले आहेत. एक चिप मालिका असे निदान आज तरी या मालिकेचे वर्णन करता येईल. अशाने फार मोठे नुकसान होते ते त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे, दर्शकांना अशा चिप थर्ड ग्रेड थर्ड क्लास मालिका बघतांना त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा राग येत असतो अशावेळी त्यांना लेखक दिग्दर्शक निर्माते आठवत नसतात... अशोक पत्की यांचा मुलगा, तेजश्री प्रधान, गिरीश ओक आणि निवेदिता यांना या अशा दर्जाहीन मालिकांमधून काम करताना अभिनय करतांना नक्की फटका बसू शकतो किंवा बसेलही. एवढे अक्कलशून्य प्रसंग कसे दाखवू शकतात याचे राहून राहून आश्चर्य आणि वाईटही वाटते. वास्तवात गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांनी त्यांच्या असामान्य कुवतीनुसार जरी त्यात बदल सुचवले असते तरी मालिका बघणे दर्शकांना सुसह्य झाले असते. माफ करा, येथे विषय उडता महाराष्ट्र म्हणजे व्यसनी महाराष्ट्र असा असतांना मी भलतीकडेच वळलो म्हणजे हे तर असे झाले कि सिनेमा बघतांना अंधारात बायको ऐवजी भलत्याच बाईच्या खांदयावर हात ठेवला किंवा माझा टी शर्ट शेजारच्या भाभींना देऊन त्यांचे ब्लाउज घालून मी बाजारात गेलो. वाचकहो, म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावता कामा नये म्हणजे या हिंदी सिनेमावाल्यांचे काय वाटोळे व्हायचे असेल ते आणखी होवो पण त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि अमराठी व काही देशद्रोही हिंदुतर हरामखोरांच्या वाईट सवयींना बळी पडून आम्हा नवश्रीमंत मराठी कुटुंबे जे अख्खेच्या अख्खे बरबाद होताहेत, ते घडता कामा नये. वाईट त्याचे वाटते. 

यात त्या रिया चक्रवर्ती पेक्षा अधिक राग सुप्रसिद्ध कायदेतद्न्य मराठी सतीश मानशिंदे यांचा येतो कि ज्यांनी आधी देशद्रोही सलमान खान आणि बॉम्ब स्फोट मालिकेत मराठी माणसांचा बळी घेणाऱ्या संजय दत्त या मुसलमानांना वाचवले, आता ते पुन्हा एकवार अशाच काही देशद्रोह्यांना वाचवायला निघाले आहेत. आमच्याशी ज्यांचे अनेकदा सतत मित्र म्हणून बोलणे होते ते सांगतील कि सुशांत सिंग प्रकरण बाहेर पडल्या पाडल्या दिशा आणि सुशांत यांची हि आत्महत्या नसून हत्या आहे हे कसे घडले मी मित्रांना जसेच्या तसे सांगत होतो आणखी डिटेल हे कसे केव्हा घडले ऐकायचे असेल तर या प्रकरणी अतिशय व्यथित अस्वस्थ निराश झालेल्या पार्थ अजित पवार किंवा नितेश नारायण राणे यांना विचारावे विशेष म्हणजे नितेश तर जाहीर म्हणाले आहेत कि मला सीबीआय ने बोलवावे मी प्रकरण कसे घडले आणि कोणी कोणी घडवून जसेच्या तसे सांगू शकतो. अर्थात या अशा अस्वस्थतेतूनच पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती कारण मुंबई पोलीस काहीही करणार नाहीत हे पार्थ यांना आधीच कळले होते.... 

विशेष म्हणजे जेव्हा बिहार पोलीस रिया चक्रवर्तीची चौकशी करायला मुंबईत येऊन धडकले थडकले होते तेव्हा हीच रिया थेट अर्पिताच्या घरी राहायला गेली होती मला वाटते अद्याप हे अर्णब किंवा सीबीआयला कळलेले दिसत नाही, एखाद्याने त्यांच्या कानावर घालायला हरकत नाही. सतीशजी, एखाद्या हिंदी सिनेमा सारखे उद्या तुमचे देखील होऊ शकते त्यात कसे खलनायकाची गोळी चुकून पोटच्या मुलालाच लागते म्हणजे ज्या क्षेत्रातल्या लोकांना तुम्ही वाचवताहात उद्या हीच माणसे ती व्यसने तुमच्या कुटुंबाला लावून मोकळी झालीत तर, नका घेऊ या नालायक देशद्रोह्यांचे वकीलपत्र आणि वाचवू नका या नालायकांना. रिया चक्रवर्ती माझ्या घरापासून केवळ तीन मिनिटांच्या अंतरावर राहते तिच्या शेजारच्या कंपाउंड मध्ये सुरेश वाडकर राहतात तर तिच्या इमारती समोर शाहरुख खानच्या पत्नीचे म्हणजे गौरीचे भव्य कार्यालय आहे किंवा सलमान खान संजय दत्त अशा नालायकांची किंवा विधू विनोद चोप्रा, अनिल कपूर यांची कार्यालये तर माझ्या गल्लीत आहेत त्यामुळे सतत या लोकांची आमच्या इमारतीच्या आसपास वर्दळ असते पण या अशा महाराष्ट्राला मुंबईला मराठी माणसाला बरबाद करणाऱ्यांकडे बघावेसे देखील वाटत नाही. वर जे म्हणालो ते रिपीट करतो कि म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण मुंबई पोलीस आणि सध्याचे महाआघाडी सरकार मधले काही केवळ लोभापायी पैशांच्या हव्यासापोटी बदनाम झाले आहे आणखी आणखी होते आहे त्याचे वाईट वाटते. ड्रग्स सारख्या पिढीच्या पिढी बरबाद करणाऱ्या मंडळींना जे मदत करताहेत पाठीशी घालताहेत त्यांच्याच घरात उद्या हेच ड्रग्स नक्की घुसणार आहेत किंवा यापूर्वीच त्यांना मदत केल्याने घुसले आहेत थोडक्यात तुम्हा साऱ्यांची देखील अवस्था हिंदी सिनेमातल्या खलनायकांसारखी होते आहे  म्हणजे तुम्ही आपल्याच हातांनी आपल्या कुटुंबाला पुढल्या पिढीला बंदुकीच्या गोळ्या घालताहात हे नक्की लक्षात घ्या... 

क्रमश: हेमंत जोशी 


Friday, 28 August 2020

उडता महाराष्ट्र : भाग १ : पत्रकार हेमंत जोशीउडता महाराष्ट्र : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी 

अगदी आत्ता आत्ता पर्यंत फारतर मराठी पुरुष दारू प्यायचे सिगारेट ओढायचे तंबाखू गुटका खायचे नशा म्हणून फारतर दारू नक्की प्यायचे त्यापलीकडे काही नाही म्हणजे इतर नशा नाहीच नाही. पण आता ते मराठी कुटुंबातूनही पूर्वीचे वातावरण राहिलेले नाही स्त्रिया आणि पुरुष तसेच तरुण मुले व मुली अगदी उघड उघड वाट्टेल ती तशी नशा करतात आणि रस्त्यावर उभ्या राहून मराठी स्त्रिया सिगारेट्स ओढतात. मुंबई ची लोकसंख्या पुण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पण पुण्यातले पब्स मुंबईपेक्षा अधिक भरलेले असतात, पुणेकर मुले मुली स्त्री पुरुष दाटीवाटीने तेथे गर्दी करतात म्हणून मी अलीकडे म्हणालो होतो कि पुण्याबाहेरच्या मराठी माणसाला पूर्वी जे वाटायचे कि आपली मुले व मुली पुण्यात शिकली पाहिजेत जरआजही तेच तुमच्या मनात असेल तर ती पालकांची मोठी चूक आहे आपल्या हाताने ते पोटच्या मुलांचा व्यसनांच्या आहारी नेऊन सोडताहेत असे माझे स्पष्ट मत आहे... 

उडता पंजाब तसा उडता महाराष्ट्र एवढे हे राज्य अलिकडल्या काही वर्षात दारू आणि ड्रग्स च्या आहारी गेले आहे झपाट्याने वेगाने अधिकाधिक आहारी जाते आहे. विशेष म्हणजे मराठी तरुण पिढी मग ती कोणत्याही जाती धर्माची असेल, सारे एका छताखाली बसून विविध जहरी नशा करताहेत. ड्रग्स ची सुरुवात मुंबई आणि पुण्यात पोलिसांच्या सहकार्याने राज्याबाहेरच्या मंडळींनी आणि विशिष्ट धर्माच्या या देशावर कवडीचेही प्रेम नसलेल्यांनी केली आणि येथल्या मराठी तरुण पण नवश्रीमंत पिढीला बरबाद केले. १९९० नंतर जसजसा या राज्यात भ्रष्टाचार वाढला तसा ज्या मराठी लोकांच्या हाती विविध अँगल मधून सत्ता, त्यांच्याकडे झपाट्याने मोठा पैसा आला आणि हा असा अचानक आलेला पैसा साठवून साठवून किती साठवायचा त्यामुळे असे मराठी कुटुंब व्यसनांच्या विशेषतः ड्रग्स आणि लैंगिक विकृत आनंदाच्या आहारी गेले त्यात जसे या घरातले पुरुष होते तसे स्त्रिया व मुली पण होत्या त्यामुळे लग्नानंतर अनटच मुलगी हि पूर्वीची मराठी कन्सेप्ट केव्हाच इतिहासजमा झाली....

www.vikrantjoshi.com

 ड्रग्स आणि लैंगिक विकृतीचे वातावरणचे वातावरण सुरुवातीला मुंबई आणि पुण्यात पसरले निर्माण झाले त्यानंतर ते नागपूरपर्यंत केव्हाच पोहोचले आता ते अतिशय झपाट्याने अख्य्या राज्यात पसरते आहे ज्यांच्याकडे वाममार्गाने आलेला येणारा पैसा त्यांच्या घरात कुटुंबात व्यसने नाहीत लैंगिक व्यभिचार नाही ड्रग्स दारू  नाही, असे घर यापुढे या राज्यात औषधाला पण सापडणार नाही. असंख्य सरकारी अधिकाऱ्यांनी तर केव्हाच लाज सोडलेली पण आता तर मला असे आजी माजी मंत्री पुराव्यांसहित माहित आहेत कि जे स्वतः आणि काही तर अख्य्या कुटुंबासहित ड्रग्स दारू सिगारेट व लैंगिक विकृतीच्या आहारी गेलेले आहेत. सर्वसामान्य मराठी माणूस ज्यांच्याकडून सतत लुटल्या लुबाडल्या जातो आहे तो शापाचा व पापाचा पैसा हा असाच खर्च होणार यात तिळमात्र शंका उरलेली नाही. तुम्ही आम्ही सारेच येथे पाप फेडून वर जाणार आहोत हे नक्की आहे. जे सुसंस्कृत मराठी आहेत ज्यांना वाटत असेल आपले कुटुंब वाममार्गाला लागू नये त्यांनी या देशावर ज्या धर्माचे प्रेम नाही,अशा देशद्रोही लोकांच्या नादाला आपली मुले व मुली लागणार नाहीत याची डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी. 

क्रमश: हेमंत जोशी Wednesday, 26 August 2020

तुमच्यासाठी जान कुर्बान : पत्रकार हेमंत जोशी

तुमच्यासाठी जान कुर्बान : पत्रकार हेमंत जोशी 

तशीही माझी मीन रास असल्याने मी कायम द्वीधा मनःस्थितीत असतो,  लग्न करतांनाही मी असाच द्विधा मनस्थितीत होतो म्हणजे नेमके कोणत्या नटीशी लग्न करावे सुचत नव्हते शेवटी भलतीकडेच विवाहबद्ध झालो. अर्थात लग्नाच्या बाबतीत प्रत्येकच पुरुषाला प्रश्न पडलेला असतो कि चार  दिवस वाट पहिली असती चार दिवस थांबलो असतो तर आणखी बरे मॉडेल मिळाले असते अगदी डॉ. नेने यांना देखील तेच वाटते म्हणे. आणि हे तर खरेच आहे कि प्रत्येकाला दुसऱ्याच्या ताटातला लाडू नेहमी मोठा वाटतो. जगात असे फार कमी स्त्री पुरुष आहेत कि ते एकमेकांशी संभोग करतांना एकमेकांना बघतात, बहुतेक नवरा बायको संभोग करतांना आपला आवडता तिसराच चेहरा नजरेसमोर आणतात.  आणखी मोलाचा सल्ला, फेस बुक वर टाकलेले फोटो तद्दन फसवे असतात म्हणजे फोटो मध्ये ज्या मधुबाला दिसतात प्रत्यक्षात त्या थेट बाईच्या वेषातल्या भाऊ कदम सारख्या जवळपास दिसायला असतात. फोटो फिनिशिंग तद्दन फसवे असते. असे म्हणतात ज्या देखण्या असतात त्यांचे फोटो  खचित चांगले येतात... 

ज्या विषयावर मी अगदी अलीकडे तुम्हाला मनातले सांगितले होते तेच येथे पुन्हा रिपीट करतोय म्हणजे आम्ही सत्यवान, भाऊ तोरसेकर विक्रांत जोशी विक्रांत पाटील इत्यादी बोटावर मोजता येतील अशा काही देशभक्त, आक्रमक राज्यातल्या लढवय्या पत्रकारांनी सध्याची पत्रकारिता सुरु ठेवावी कि सोडून द्यावी कारण माझी माहिती माझा अनुभव हेच सांगतो कि यापुढे सत्य, तेही आक्रमक स्वरूपात मांडणे म्हणजे आगीशी जीवाशी आयुष्याशी खेळ खेळण्यासारखे झालेले आहे आणि हे शरद पवार देखील शंभर टक्के स्वतः खाजगीत मान्य करतील. हे बघा शरद पवार त्यांच्या राजकीय वाटचालीत अनेक बाबतीत वादग्रस्त संशयास्पद ठरलेले असतील पण त्यांच्याविरुद्ध थेट मात्र सत्य कितीही आक्रमक रीतीने आम्ही पत्रकारांनी अनेकदा मांडले असताना त्यांनी कधीही कोणत्याही वाहिनी विषयी, वृत्तपत्राविषयी, पत्रकाराविषयी मनात कायम राग द्वेष कपट ठेवून बदला घेण्याची भाषा केली नाही पण यावेळी थेट सत्तेत असतानाही त्यांना नक्की हा प्रश्न पडलेला असेल कि यापुढे लढवय्या देशप्रेमी पत्रकारांचे या विचित्र विध्वंसक उद्भवलेल्या परिस्थितीत कसे व्हावे ? 

मला अलिकडल्या काही महिन्यात जी भीती वाटत होती तेच नेमके घडले आहे म्हणजे त्याचे असे झाले अलीकडे एका मंत्र्यांचे लायझनिंग सांभाळणार्या निवृत्त सरकारी अधिकारी असलेल्या मित्राचा मला फोन आला, म्हणाला, हेमंतराव तुम्ही आणि चिरंजीव यापुढे सांभाळून लिखाण करा आणि हा निरोप मला तुम्हाला एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने द्यायला सांगितला आहे. वरून तो हेही म्हणाला कि यदु गॅंग मधल्या एका बड्या वार्ताहराला असेच विरोधात लिखाण केले म्हणून एका पोलीस अधिकाऱ्याने दमात घेतले होते त्यामुळे तो वार्ताहर घाबरला आणि त्याने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे धाव घेतली, स्वतःची सुटका करून घेतली. त्याच्या या निरोपाचा थेट सरळ अर्थ हाच निघतो कि हि वेळ तुमच्यावर देखील येऊ शकते. माझी मीन रास त्यामुळे गोंधळलो आहे कि यापुढे गांडू व्हावे कि अधिक आक्रमक होऊन असत्याविरुद्ध लढत राहावे जीव गेला तरी. अर्थात मन अनेकदा गोंधळात जरी पडत असले तरी कोणत्या तरी कन्क्लुजनला यायचे असतेच त्यामुळे फायनल निर्णय मी आम्ही हाच घेतला कि सारे काही गमावले तरी चालेल जीव गेला जीव घेतला तरी चालेल पण लढवय्या पत्रकारिता सोडायची नाही, अन्यायाविरुद्ध लढतच मरायचे. तसेही चार दशकाच्या या प्रदीर्घ पत्रकारितेत कित्येकदा जीवघेणे, बदनामीचे, कठीण प्रसंग जीवावर बेतले असतील तेव्हा आपण कुठे घाबरलो. ठीक आहे कि आता तो पूर्वीचा महाराष्ट्र राहिला नाही हे जाणवते आहे खरे पण गांडू निराश होऊन जगणे कधी जमलेच नाही यापुढे तरी ते कसे शक्य आहे, आणखी काय सांगायचे ? 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Saturday, 22 August 2020

दर्जाहीन मराठी वाहिन्या : पत्रकार हेमंत जोशी

दर्जाहीन मराठी वाहिन्या : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे विशेषतः बातम्या देणाऱ्या काही मराठी वाहिन्या विकायला निघाल्या आहेत, अलीकडे साऱ्याच बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्यांचा घसरलेला दर्जा बघता हळूहळू क्रमाक्रमाने साऱ्याच बातम्या देणाऱ्या मराठी वाहिन्या विकायला निघाल्यास तुम्ही आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. बहुतेक वाहिन्यांमध्ये अमुक एखाद्या वाहिनी पेक्षा मी स्वतः नावाने चेहऱ्याने आणि पैशाने कसा श्रीमंत होईल अशीच माणसे फार मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतांना आपल्या बातम्या देणार्या मराठी वाहिन्यांना दिल्लीची सर श्रीमन्ती येणे अशक्य आहे. मुंबई २४ हि बातम्या देणारी वाहिनी आम्ही चालवत असतांना ती वाहिनी कशी मोठी करता येईल याकडे आमचा सतत कल असे त्यामुळे त्या वाहिनीला अल्पावधीत यश मिळाले होते. केवळ काही टेक्निकल अडचण आल्याने आम्हाला मुंबई २४ वाहिनी बंद करावी लागली. इथे महाराष्ट्रात कोणत्याही बातम्या देणारी मराठी वाहिनीकडे त्या त्या वाहिन्यांचे मालक ओनर जातीने लक्ष देत नसल्याने किंवा त्यांच्या केवळ व्यवसायासाठी या वाहिन्यांचा ते बहुतेकवेळा उपयोग करून घेत असल्याने येथल्या वाहिन्यांचा दर्जा सुधारणे वाढणे लोकप्रिय होणे कठीण आहे अशक्य आहे. मुंबईत महाराष्ट्रात घडणाऱ्या सुशांत सिंग दिशा सालियन सारखी गंभीर प्रकरणे मराठी वाहिन्या उघड करून त्या विरोधात लढतांना हल्ली दिसतच नाहीत त्याचे प्रमुख कारण एकतर व्यक्तिगत फायदे करून घेणे असावे किंवा राज्यकर्त्यांना घाबरणाऱ्या आपल्या मराठी बातम्या देणार्या वाहिन्या असे तरी तयांचे वर्णन करावे लागेल... 

विशेष म्हणजे ज्याकडे दर्जेदार लढवय्यी धडाकेबाज वैचारिक वाहिनी म्हणून बघावे अशी मराठी वाहिनी अलीकडे बघायला मिळत नसतांना विशेष म्हणजे त्यात नवनवीन बातम्या देणार्या वाहिन्यांची भर पडणार आहे पडू लागलेली आहे. झी बातम्या देणार्या वाहिनीचा आशिष जाधव अलीकडे या सुशांत सिंग प्रकरणी जेव्हा न्यायालयाने सिबीआयला अधिकार दिले अगदी अस्वस्थ होऊन आणि घसा फाडून जेव्हा वाहिनी प्रमुख म्हणून सांगत होता कि आता हि लढाई राज्यातली महाआघाडी विरुद्ध भाजपा अशी झालेली आहे त्याच्या या बोलण्यावर हसावे कि रडावे कळत नव्हते. जणू काही आशिष हा या राज्यातल्या महाआघाडीचा प्रवक्ता असल्यासारखे या पद्धतीने बोलत असतो. उद्या हे असे आशिष यदाकदाचित राज्यात भाजपाची सत्ता आली आणि त्यांची बाजू घेतांना मांडतांना आक्रमक वाटले तर मला अनुभवावरून त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही. अर्थात केवळ आशिष जाधवला मूर्ख ठरविणे योग्य नाही कारण साऱ्याच बातम्या देणार्या मराठी वाहिन्या निव्वळ पोरखेळ खेळण्यात मग्न आहेत विशेष म्हणजे या वाहिन्यांमध्ये मोक्याच्या विविध पदांवर काम करणाऱ्यांचा आणि वाहिन्यांच्या मालकांचाही व्यक्तिगत फायदा करवून घेण्याकडे मोठा कल असल्याने बातम्या देणाऱ्या साऱ्याच मराठी वाहिन्यांचा टीआरपी व दर्जा असाच वेगाने घसरत जाणार आहे हे निश्चित.... 

तुम्ही जर एखादे प्रकरण समोर कोण आहे हे न घाबरता किंवा न बघता लावून धरणार असाल तरच यापुढे बहुसंख्य हुशार अनुभवी चतुर अभ्यासू दर्शक तुमची वाहिनी बघणार आहेत अन्यथा ते ढुंकूनही तुमच्याकडे बघणार नाहीत. विविध विषयांवरच्या मराठी वाहिन्यांचे उदंड पीक सध्या आलेले आहे पण दर्जेदार बघावे अशी एकही मराठी वाहिनी दूरदूरपर्यंत दिसत नाही आणि हीच ती वेळ आहे विशेषतः बातम्या देणाऱ्या एखाद्या नवीन वाहिनीला येथे या राज्यात एस्टॅब्लिश होण्याची, बघूया कोणाला या सुवर्ण संधीचा फायदा घेता येतॊ ते. मी स्वतः अगदी आत्ता आता पर्यंत बातम्या घेण्यासाठी हिंदी किंवा इंग्रजी वाहिनी क्वचित बघत असे पण मराठी बातम्या देणार्या वाहिन्यांमध्ये ज्या वेगाने लिंगाची वयानुसार यावी तशी शिथिलता आल्यानंतर ते ढिले व मलूल पडू लागल्यानंतर मी या काहीशा पुचाट ठरू लागलेल्या मराठी वाहिन्या बघण्याऐवजी आक्रमक धाडसी लढवय्या हिंदी व इंग्रजी वाहिन्या बातम्या साठी सुरुवात केली आहे. राज्यात दररोज अनेक राजकीय मान्यवरांशी विविध बड्या अधिकाऱ्यांशी माझे बोलणे होत असते विशेष म्हणजे त्यांच्याही बोलण्यातून ते अलीकडे इंग्रजी व हिंदी वाहिन्यांना प्राधान्य देत असल्याचे  जाणवते समजते. जशी मुंबई पोलिसांनी राज्यात व जगभर आपली विश्वासहर्ता पूर्णपणे गमावलेली आहे तेच वेगाने झपाट्याने बातम्या देणार्या मराठी वाहिन्यांचे होते आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बदनामीत आणखी भर पडू लागलेली आहे जे स्वाभिमानी मराठी माणसाला लाजिरवाणे वाटते... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Thursday, 20 August 2020

काका पुतणे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


काका पुतणे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे घराणे आणि कुटुंब सदस्य संख्यने फार मोठे पण राज ठाकरे यांना ज्यादिवशी मजबूर होऊन मातोश्रीला पारखे व्हावे लागले तेव्हापासून जवळपास सारेच ठाकरे व नातेवाईक एकमेकांपासून दूर गेले आणि खुबीने केवळ चार सदस्यांचे ठाकरे कुटुंब आता ओळखल्या जाऊ लागले आहे, तेजस आदित्य श्रीमती रश्मी आणि उद्धवजी नेमके हे असेच राज्याचे राजकरणातले जे दुसरे नामांकित पवार घराणे आहे तेथे देखील सेम तो सेम घडलेले आहे. अख्खे प्रचंड संख्येचे पवार एकीकडे आणि शरदराव व त्यांच्या मुलीचे कुटुंब एकीकडे असे सध्या पवारांकडे देखील आहे. आप्पासाहेबांपासून तर अभिजित अजित रोहित पार्थ इत्यादी इतर पवार कुटुंब सदस्यात कोणीही शरदरावांच्या आणि सुप्रियाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करता कामा नये अन्यथा त्यांचा लगेच राजकीय खात्मा करण्यात येतो हि वस्तुस्थिती आहे. पवार आणि ठाकरे या दोन्ही कुटुंबातले काही सदस्य जवळचे नातेवाईक माझ्या बऱ्यापैकी परिचयाचे ओळखीचे आहेत, जेव्हा केव्हा अनुक्रमे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय ग्राफ खाली येतात ते एखाद्या मोठ्या अडचणीत सापडतात तेव्हा तेव्हा या दोघांच्याही अनेक तेही अतिशय जवळच्या नातलगांना गुदगुदल्या होतात हि वस्तुस्थिती आहे, माझ्या या परिच्छेदावर शरद पवार आणि उद्धवजींना नक्की राग येईल पण काय करू काहीही मनात ठेवणे मला अशक्य असते मी लिहून मोकळा होतो... 

पवार आणि ठाकरे कुटुंबात कटुता निर्माण झाली ती काका व पुतणे या नात्याने विशेष म्हणजे पवार व ठाकरे यांच्यासारखे या राज्यात काका पुतणे असे वाद निर्माण झालेले अनेक राजकीय घराणी आहेत ज्यात कटुता आल्याने काकांचेच अधिक राजकीय नुकसान झालेले आहे जे पवार व ठाकरे यांचे झाले तसे. रोह्याचे सुनील तटकरे नव्या मुंबईचे गणेश नाईक नागपूर काटोलचे अनिल देशमुख बीडचे जयदत्त क्षीरसागर उस्मानाबादचे डॉ. पदमसिंह पाटील असे त्यावर कितीतरी उदाहरणे तुम्हाला सांगता येतील. ज्या सुनील तटकरे यांची राजकीय ताकद राज्याचे संघटन सांभाळण्याची त्या सुनील तटकरे यांना पोटचे जेमतेम राजकीय ताकद असणारे किंवा बापाच्या भरवशावर पुढे गेलेले मुलगा अनिकेत आणि मुलगी आदिती फार महत्वाचे वाटले त्याचवेळी पाठीशी कायम राजकीय ताकद देणारे बंधू अनिल आणि पुतणे अवधूत डोळ्यात खुपले त्यातून नेमके घडले असे कि हेच सुनील तटकरे आज केवळ राज्यमंत्री असलेल्या मुलीचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र मंत्रालयात अगदी उघड बघायला मिळते आहे. पैसा आणि सत्ता आधी माझ्या मुलांसाठी नंतर इतर नातेवाईकांसाठी आणि कधीतरी जीवाला जीव देणार्या कार्यकर्त्यांसाठी हि हलकट स्वार्थी नीच बदमाश संधीसाधू वृत्तीच ज्या त्या नेत्यांमध्ये बघायला मिळते त्यातूनच क्षणिक फायदा पण पुढे अशा कुटुंबांचे वाटोळे होते गेलेले दिसते... 

www.vikrantjoshi.com

या राज्यातल्या हिंदुत्वाची मक्तेदारी जशी भाजपा आणि राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाकडे आहे तशी तमाम मराठी जनतेची मक्तेदारी केवळ शिवसेनेकडे आत्ता आत्तापर्यंत होती विशेषतः मुंबईतील विशेषतः अमराठी व मुस्लिम समाजासमोर हतबल ठरलेल्या मराठी माणसाला शिवसेनेचा फार मोठा आधार होता हे तुम्हाला सांगणे म्हणजे सुनील ताटकरेंच्या मालमत्तेविषयी अनिल तटकरे यांना सांगण्यासारखे. पण उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी अतिशय खुबीने मुख्यमंत्री केले उद्धव यांनी आदित्य यांना काही एक गरज नसतांना आधी आमदार केले नंतर मंत्री केले तेथेच सारे बिनसले. उद्धव मातोश्रीच्या ज्या दिवशी बाहेर पडले त्याच दिवशी मी लिहून ठेवले आहे कि आता सारे संपले. सत्तेतले अननुभवी उद्धवजी विनाकारण पवारांच्या जाळ्यात अलगद सापडले आणि त्यांच्या याच बेसावध निर्णयाचा यापुढे मोठा फायदा भाजपाला होणार आहे, मुंबईतला मराठी मोठ्या प्रमाणावर भाजपा आता आपल्याकडे नक्की आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे, अलीकडे त्यासाठी त्यांनी जसे नारायण राणे यांना पुढे केले आहे तसे काही शिवसेनेतले प्रभावी मराठी नेते आपल्याकडे खेचण्याचा मोठा प्रयत्न भाजपाकडून होतो आहे. संघटना शिवसेना वाढविण्यात मातब्बर उद्धवजी मुख्यमंत्री झाले खरे पण त्यातून मराठी माणसाचा फायदा नव्हे तर मोठे नुकसान झालेले आहे, जे घडले ते चुकीचे नक्की घडले आहे.,. 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Wednesday, 19 August 2020

संजय ताप कि उद्धवजी बाप : पत्रकार हेमंत जोशी


संजय ताप कि उद्धवजी बाप : पत्रकार हेमंत जोशी 
पिंट्याला ताप आहे दवाखान्यात घेऊन गेलो होतो पण समोर डॉक्टर बसले होते आणि कंपाउंडर हणम्या आला नव्हता मग आल्या पावलीच परतलो. पुढला जोक, रुग्णांसाठी विशेष सूचना : येथे रुग्णांची तपासणी तद्न्य डॉक्टरांकडून केली जाते. आमच्याकडे कंपाउंडर नाही. ज्या रुग्णांना कंपाउंडारकडून तपासणी करून घ्यायची असेल त्यांनी कृपया आत येऊ नये. आदेशावरून. पुढला जोक, देशपांडेंच्या मुलीने डॉक्टर असलेल्या स्थळाला नाकारले कारण ती शंकर कंपाउंडरच्या आकंठ प्रेमात बुडाली आहे. डॉक्टर ऐवजी कंपाउंडर जावई त्यामुळे देशपांडे दाम्पत्यानेही मुलीला लग्नाची आनंदाने परवानगी दिली आहे. पुढला जोक, डॉक्टर मंडळींना काय समजते हे विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिल्याने यावर्षी बहुतेक मेरीटस स्टुडंट्सचा कंपाउंडर होण्याकडे ओढा. पुढला जोक, बाबा उठा कंपाउंडर तुम्हाला बघायला आले आहेत. पुढला जोक, तुम्हाला डॉक्टर कडून तपासून घ्यायचे असेल तर फी १०० रुपये आणि कंपाउंडर कडून तपासून घायचे असेल तर ३०० रुपये मोजावे लागतील. पुढला जोक, डॉक्टर, कंपाउंडर दिग्या आहे का, नसेल तर उद्या येतो. संजय राऊत एका वाहिनीला मुलाखत देतांना वाट्टेल ते बोलले आणि सोशल मीडियावरून लाखो जोक्स त्यांच्यावर केवळ दोन दिवसात टाकण्यात आले. मी जे लिहिले होते नेमके तेच घडले राऊतांना त्यांची चूक उमगली ते चार पावले मागे आले त्यांनी पत्रकारांसमोर युक्तीने चूक मान्य केली प्रकरण लगेच शमले....

उद्धव ठाकरे यांना राजकारणातले काही कळत नाही, संजय राऊत यांच्यामुळे त्यांची बदनामी होते आहे त्यांचे मोठे राजकीय नुकसान होते आहे, ठाकरे यांनी त्वरेने संजय राऊत यांना बाजूला करायला हवे अन्यथा उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत आणि त्यांचे राजकीय गुरु शरद पवार दोघे मिळून राजकीय खात्मा करून मोकळे होतील असे एक ना अनेक पद्धतीने राऊत व उद्धवजी या दोघांबद्दल यादिवसात सतत सर्वत्र खमंग चर्च सुरु आहे ज्या चर्चेला काहीही अर्थ नाही. एक लक्षात घ्या या कठीण कालखंडात अगदी उद्धवजी यांच्यासहित सारे शिवसेना नेते व मंत्री अक्षरश: मूग गिळून बसलेले असतांना एकटे संजय राऊत साऱ्यांना बेधडक अंगावर घेताहेत वाट्टेल ते बोलून मोकळे होताहेत आणि उद्धवजी त्यांना थांबवत नाहीत तुम्हाला काय वाटते उद्धव हे बोळ्याने दूध पितात का, राऊत हे राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा प्रभावी ठरले आहेत का कि त्यांना राज्याच्या राजकारणातले झिरो कॉलेज आहे तुम्हाला म्हणायचे आहे का? असे सारे म्हणताहेत त्या म्हणण्याला कवडीचाही अर्थ नाही उलट याचा सरळ अर्थ आहे जे हे असे बोलताहेत त्यांना उद्धव ठाकरे अजिबात समजलेले कळलेले नाहीत. एवढेच सांगतो एकवेळ महाखतर्नाक शरद पवार परवडले पण कडक निर्णय घेण्यात उद्धव त्यांच्या शंभर टक्के पुढे आहेत. जे संजय राऊत यांच्यापेक्षा राजकारणात ताकदवान, प्रचंड अनुभवी, महाबेरकी होते त्या अनेकांना ज्या उद्धव यांनी बाहेरचा रस्ता दाखवून त्यांचे प्रचंड राजकीय नुकसान करून ठेवले आहे आणि तुम्ही म्हणताहेत कि शरद पवार आणि संजय राऊत उद्धवजींना राजकीय खात्मा करून मोकळे होतील.... 

मागेही एकदा मी जे लिहून ठेवले आहे तेच पुन्हा येथे रिपीट करतो कि संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्याशी कोणत्याही विषयावर बोलल्याशिवाय ना कधी अमुक एखाद्या नेत्याला भेटतील किंवा कोणतेही स्टेटमेंट करून मोकळे होतील. आणि हे ज्या दिवशी घडेल  लिहून ठेवा उद्धव ठाकरे यांचे नव्हे तर संजय राऊत यांचे मोठे राजकीय नुकसान झालेले असेल. जंग जंग पछाडून जे संजय राऊत त्यांच्या आमदार असलेल्या भावाला म्हणजे सुनील राऊत यांना मंत्री कारू शकले नाहीत उलट त्यावेळी त्यांनी आवंढा गिळत गप्प राहणे पसंत केले ते राऊत उद्धव यांना बायपास करून म्हणजे उद्धव यांना न विचारता काहीही जाहीर बोलणे शक्य नाही, अशक्य आहे. उद्धव यांची फक्त एकच चूक झाली ते मातोश्रीच्या बाहेर पडून थेट मंत्रालयात घुसले म्हणजे ज्यादिवशी राजा प्रधान झाला थेट वाघाने मांसाहार सोडून सात्विक थाळी जेवायला घेतली तेथेच सारे संपले. यापुढे पूर्वीची म्हणजे उद्धव हे मुख्यमंत्री होण्यापूर्वीची जी शिवसेना होती तिच्या पुनर्बांधणीसाठी उद्धव यांना पुढले अनेक वर्षे खर्ची घालावे लागणार आहेत. मला तर वाटते जर काय महामारीनंतर महाआघाडी सरकार चुकून कोसळणार नसेल तर उद्धव यांनी मुख्यमंत्री म्हणून पायउतार व्हावे आणि एकनाथ शिंदे यांच्यासरख्या एखाद्या समोर  मग कोणीही असो अंगावर घेण्याची ताकद ठेवणार्या नेत्याला मुख्यमंत्री करून मोकळे व्हावे. शिवसेनेची तसेच पोटच्या मुलाची जी राजकीय घडी सध्या विस्कटलेली आहे त्यात त्यांनी लक्ष घालावे सेनेला व आदित्यला पुन्हा 
राजकारणात सुगीचे  दिवस आणावेत......
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

आदित्य विक्रमादित्य व्हा : पत्रकार हेमंत जोशी


आदित्य विक्रमादित्य व्हा : पत्रकार हेमंत जोशी 
मी माझ्या बापापेक्षा सरस आजोबा पेक्षा जबरदस्त आणि पणजोबा पेक्षा कणखर आहे हे जेव्हा सिद्ध करेल तेव्हाच पुन्हा एकवार मंत्री म्हणून शपथ घेईन, मी माझे निर्दोषत्व जोपर्यंत सिद्ध करीत नाही आणि जोपर्यंत राज्यातल्या, मुंबईतल्या मराठी माणसाचा केवळ मीच तारणहार आणि नेता हे इतरांना दाखवून  देत नाही तोपर्यँत स्वस्थ शांत बसणार नाही असे मंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला ठणकावून सांगावे आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मोकळे व्हावे. हे असे आजपर्यंत ज्यांनी केले ते राजकारणात पुढे फार मोठे झाले. त्यातले एक होते दिवंगत आर आर पाटील आणि दुसरे होते अजितदादा पवार. एकेकाळी ते दोघे असेच जनतेच्या रोषाला जेव्हा बळी पडले होते तेव्हा एका झटक्यात त्यांनी मंत्रिपदाचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता विशेष म्हणजे पुढे दोघांनीही आपापले निर्दोषत्व सिद्ध केले आणि शानसे पुन्हा त्याच पदांवर ते शपथ घेऊन मोकळे झाले. आदित्य तुम्ही हे केले तर तुमच्या वडिलांचे नाव आणि त्यांचे सध्याचे पद तर वाचेलच पण तुमचे उद्धवजींच्या राजकीय निवृत्तीनंतर शिवसेना प्रमुख हे पद अबाधित राहीलच पण प्रबोधनकार, हिंदुहृदय सम्राट आणि खतरनाक उद्धवजींच्या रांगेत तुम्हालाही स्थान मिळेल... 

आदित्य, मला हे नेमके माहित आहे कि वडील उद्धव तुम्हाला वारंवार ठणकावून हेच सांगत होते कि आपण राज्याचे हिंदूहृदय सम्राट आहोत आपण येथे मातोश्री वर बसून आदेश द्यायचे असतात, पेज थ्री छाप तरुण तरुणींबरोबर रात्री बेरात्री फिरायचे नसते आणि त्यांच्या पासून त्यांच्या पार्ट्यांपासून चार हात लांब राहायचे असते पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही, वडिलांपेक्षा तुम्हाला झिशान सिद्दीकी सारखे मित्र मोलाचे आणि महत्वाचे वाटले. आज हे असे वातावरण तुमच्या अंगलट आले, हरकत नाही सारेच उद्धव यांच्यासारखे चतुर आणि सावध नसतात, तरुण वयात चुका होत असतात पण आता मात्र तडफेने त्वरेने सावध व्हा मंत्रिपदाचा राजीनामा द्या विस्कटलेली शिवसेना बांधायला घ्या जे बुजुर्ग शिवसेना नेते मातोश्री आणि तुम्हा बाप बेट्यांना पारखे झाले आहेत त्यांना जवळ करा, त्यांचे सल्ले मोलाचे माना बाकी सारे वडिलांवर सोडून द्या कारण उद्धव हे अनेकदा युद्धात हरतात पण तहात कायम जिंकतात, यावेळीही तेच होईल, सुशांत दिशा युद्धात ते आज हरले आहेत पण तहात कसे जिंकायचे आणि शरद पवार यांना दूर करून क्षणार्धात मोदी व शहा यांना कसे बिलगायचे त्यांना ते उत्तम जमते...

www.vikrantjoshi.com 

सुशांत आणि दिशा प्रकरणी अनेकांच्या विकेट पडतील कित्येक आत जातील पण आदित्य ठाकरे यांचा बाल देखील बाका होणार नाही मात्र तत्पूर्वी त्यांनी मंत्री मंडळातून ताबडतोब बाहेर पडणे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आजपर्यंत जे काय भोगायचे उपभोगायचे ते पुरे झाले अशी शपथ घेऊन आदित्य यांनी आधी मुंबईतली नंतर राज्यातली शिवसेनेची विस्कटलेली घडी नीट बसवावी, माझ्याकडे पैशांना नव्हे मराठी माणसांना विशेषतः सामान्य शिवसैनिकांना महत्व आहे हे आपल्या आजोबांसारखे या राज्याला आणि सामान्य मराठी माणसाला दाखवून द्यावे त्यानंतर म्हणजे काही वर्षांच्या मेहनतीनंतर वाटल्यास पुन्हा मंत्रिपद स्वीकारावे अगदी मुख्यमंत्री देखील व्हावे. नेते आणि मंत्री सामान्य शिवसैनिकांना नव्हे तर पैशांना पैसेवाल्यांना दलालांना व्यापाऱ्यांना अधिक महत्व देतात आमच्याकडे साफ दुर्लक्ष करतात हि जी राज्यातल्या प्रत्येक शिवसैनिकांची भावना सध्या मनात निर्माण झालेली आहे त्यात सुधारणा आणि बदल अत्यावश्यक आहेत. आम्हा प्रत्येक मराठी व हिंदू माणसाची गरज शिवसेना आहे जरी माझ्यासारखे अनेक हिंदू व मराठी शिवसैनिक नसलेत तरी. अन्यथा एक लक्षात घ्या हे असे बदल जर घडले नाहीत तर शिवसेनेची जागा लवकरच भाजपा घेईल आणि देवेंद्र फडणवीस हे या राज्यातले नरेंद्र मोदी ठरतील. मी जे लिहितो ते कायम खरे ठरत आलेले आहे... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी Tuesday, 18 August 2020

The ANGRY DGP-Subodh Kumar Jaiswal!


The ANGRY DGP-Subodh Kumar Jaiswal!

What angers the DGP of Maharashtra? Is it understanding 'clearly' what HM Anil Deshmukh talks, OR explaining sections of IPC in Marathi to CM Uddhav Thackeray, OR seeing CP Parambir Singh at Police Establishment Board meetings OR is it people judging his friendship with CS Sanjay Kumar & IPS Deven Bharti? What exactly angers him? No friends, none of the above angers him. He is OK to tolerate the wrath of HM Anil Deshmukh too, every-time something major happens in Maharashtra.  But what he cannot stand & what angers him the most is is the TREMENDOUS political interference that takes place every single time the mention of  "transfers" of SP's/ADG's/DIG's comes ....Yes, he is angry now, and made that bold statement of going on a holiday over signing of any list. Yes! He along with CM Uddhav Thackeray has shown everyone who is the boss, by cancelling every single name of that list that was prepared by some 'greedy' politicians. He has gone against the wishes of some of biggest MVA Government Ministers and changed the entire list of 'recommended' postings of all Ministers & dalaal's ....and now logically & professionally made a new one (few of them from the list given below) which will be declared soon. Latest information as per last evening is: Heard AJIT PAWAR has asked for an inquiry in this whole matter. But isn't Home with NCP? Hmmm, in liue of Sushant Singh & now this whole episode, I'm fearing for Anil Babu...Also in the meeting held last evening, it was decided that the Pune CP K. Venkatesham will be continued for a month due to the pandemic only, but will be soon be replaced as soon as the pandemic subsides in Pune. 

In a video-conferencing meeting held with the top lot of policeman's last week the DGP announced that if times comes, he will proceed on leave but not sign any list on any "recommended list' of transfers of officers. And second most important thing he addressed his officers was that, transfers would be done, logically, and till Ganpati is over, do not expect anything. Officers present at that VC were discussing why to wait till Ganpati? As, ins't Ganpati not be a public event this time? Confused & angry many officers who are due for transfers and were on side posting for long didn't take this message of the boss kindly. What did they do? They started bombarding messages against  the DGP, & within 2 hours of the meeting my mobile was flooded with at least 10 messages with letter written ACP Rajendra Kumar Trivedi.

Obviously, curious as me opened the letter message & was shocked to read it. The letter wherein  b y GUTSY Trivedi has exposed the DGP and his misdoings in 5 brief paragraphs, in fact challenging DGP's own posting & promotion which is against Supreme Court decisions. In the letter Trivedi  blames the DGP for going 'out of the way'  to help Rajesh Pradhan (IG Establishment) & Manoj Sharma (Addl CP West) to get them promoted & give them at important postings. This everyone is aware how Pradhan & Sharma are given preferential treatments. Them this Trivedi goes one step ahead & reminds us of how DGP was "hit' by then Court's strictures to help the Telgi Scamsters....And finally Trivedi said the DGP just cannot function without Deven Bharti & how does he end up getting top post in spite of severe competition all round (even I want to know this ) and so on...Those who want this letter ping me, will send it...I'm surprised, Din't know Jaiswal was so biased & had so many skeletons in his cupboard. Always knew his love for few Kayasta's and favoritism & that's all but helping Telgi scamsters & all (as per the letter) I must say, I'm shocked!   

Anyways, as soon as this letter was on many people's Whatsapp I decided to investigate a little and my trail went back to a meeting held at Sayadri guest house between the top MVA Ministers of all 3 parties. Well, at this meeting, the extremely 'hungry' Ministers had got their own lists made as to whom would they want as SP's and IG's and who would be the CP's in their towns. The list obviously went to the DGP. Boss, say anything, a wake up call from Almighty or anything, DGP got angry...Angry & how....He took the list & straight away rushed to meet CM Uddhav Thackeray via his close friend "AM". He pointed out the 'dealings' , dalaal's interfered, and how the list prepared by these Ministers is absolutely ABSURD & IN-GENUINE and also unethical. CM Uddhav on hearing this did give that "Lalita Pawar" look to DGP Jaiswal & immediately CM Uddhav Thackeray was provided evidences in form of recordings of below mentioned some IPS offices and their talks & negotiations with their political masters. 

www.vikrantjoshi.com

The list was changed and the DGP made THAT statement at video conferencing. Now the proposed list goes as follows that is allegedly approved by the DGP & CM...Anil Deshmukh is hell bent on making Amitesh Kumar the Nagpur CP (agreed now by everyone-earlier it was Mira Bhayander), then Krushna Prakash's post will be downgraded & he will be the new CP for Pimpri Chinchwad, Amitabh Gupta will the new Pune CP (it is close to Mahabaleshwar also 😆) finally Sadanand Date will take charge of newly formed Mira Bhayander as CP, Bipin Kumar Singh will be the Navi Mumbai CP, Vivek Phansalkar continues to be in Thane, Quaiser Khalid who was supposed to the Nashik CP has been been replaced bty Deepak Pande. and, friends hangon, Joint CP Traffic will be Yashashvi Yadav. Now the fight is for the Joint CP (L&O) for which Vishwas Nagre Patil & Milind Bharambe. Just for your information--EOW does not see any change nor does the ATS chief. These were fought for...Now the list of SP's and IG's and DIG's is in process. 

Anyone in the IPS has heard of a certain Hitendra or a Dhirendra....Bhaisaab this man is calling himself nephew of our Governor and he has lobbied very strongly for Yashashvi Yadav and many others, I'm told. BTW, heard Yashashvi has met everyone for his posting now which shows he shares an excellent rapport with the Bandra roads & the one's leading to Breach Candy. Also since couple of weeks Social Activist Niraj Gunde has been strongly tweeting about presence of 4 to 5 dalaal's have been contacting police officers to get lucrative postings for money. Anyway,  My only concern through this blog is ---Many officers have paid huge advances to the dalaal's & Ministers during Pandemic AND many of them have lost their advances surely & chance of coming to that particular post too....

Vikrant Hemant Joshi.
Sunday, 16 August 2020

दादा आणि काका : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी


दादा आणि काका : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी 

अमिताभ चार ठिकाणी कामाला जातो त्यामुळे त्याला कोरोना होणे अपेक्षित होते पण अभिषेकला देखील कोरोना होतो म्हणजे काय? अलीकडे बायकोने विचारले, तुम्हाला सुंदर बायका आवडतात कि हुशार? त्यावर मी भान राखत पटकन म्हणालो, मला फक्त तू आवडते. गेले आठ दिवस झाले असतील मी मित्रांना सांगत सुटलोय कि मी माझ्या घरात माझ्या आवडीचे पदार्थ नेहमीच खातो. पॉझेटिव्ह हा एकमेव छानसा इंग्रजी शब्द होता पण कोरोनाने त्यालाही खराब करून ठेवले. शेजारची शेवंता मोलकरीण आमच्या मोलकरणीला सांगत होती कि मी साहेबांना राखी बांधली तर कंजूष साहेबांनी फक्त पन्नास रुपये दिले पण बाईसाहेबांनी मात्र खुश होऊन पाचशे रुपये दिले, बघूया पाडव्याला काय घडणार आहे ते. दिवस सिरीयस आहेत आणि मला नको त्या वेळी चुटके आठवताहेत. पवारांच्या घराण्यात सारे आलबेल झाले असे वरकरणी फक्त दिसते आहे लक्षात घ्या कारण जेथे नाते किंवा नातेवाईक तेथे एकदा का संशयाचा धूर निर्माण झाला कि त्या नात्याचे मुळव्याधीसारखे होते म्हणजे संशय कधीही संपत नाही उलट तो वारंवार उफाळून वर येतो. सत्ता हाती आहे एकमेकात भांडत बसण्याची नव्हे तर हाती मिळेल ते सावटण्याची हीच खरी वेळ आहे असा सल्ला फार तर पवारांच्या घरातल्यांनी पार्थला दिला असेल ज्यातून वातावरण निवळले आहे दुसरे काहीही नाही.... 

आणि हे तर खरेच आहे जे महाआघाडी मंत्रिमंडळात आहेत किंवा मंत्रिमंडळाशी जवळीक असणारे ते या कोरोना महामारीत प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यापलीकडे फारसे काही करतांना दिसत नाहीत. मी सुट्टीवर निघून जाईल पण बदल्यांच्या फाईल्स हातावेगळ्या करणार नाही हि अशी जी उद्विग्नता जयस्वाल यांच्यासारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना येते आहे कारण क्लिअर आहे जो तो फक्त लुटतो आहे लुबाडतो आहे आणि ओरबाडतो आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अलीकडे महाआघाडीच्या बदल्यांच्या व्यवहारांवरून जी त्यांची लाज काढली उद्या नक्की लफडी पण बाहेर काढतील त्यात शंभर टक्के तथ्य व सत्य आहे. राहिला अजित पवार आणि पार्थ पवारांचा प्रश्न तो तर शरद पवार यांनी केव्हाच निकाली काढून अजितदादांची राजकीय हवा मोठ्या खुबीने काढून घेतलेली आहे. या महाआघाडीत सामील होण्यापूर्वी अजितदादा जेव्हापासून राज्यमंत्री किंवा मंत्री किंवा उपमुख्यमंत्री होते त्या त्या वेळी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक सुरु होण्यापूर्वी अजितदादा आपल्या केबिनमध्ये मिनी कॅबिनेट मीटिंग घेऊन मोकळे व्हायचे ज्यात त्यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री राज्यमंत्री आमदार आणि बडे अधिकारी कंपलसरी सामील असायचे. नाही म्हणायला यावेळीही सुरुवातीला अजितदादांनी हा आपला नेहमीचा स्वतःचे अति महत्व वाढवणारा फंडा सुरु केला होता पण काकांनी यावेळी तर ठरविलेलेच आहे कि दादांचे राजकीय आर्थिक महत्व ताळ्यावर आणायचे त्यामुळे हि पद्धत जेव्हा काकांनी तातडीने बंद केली तेव्हाच म्हणजे अगदी सुरुवातीलाच अजितदादांच्या पायाखालची वाळू सरकली. दादांचे महत्व काकांनी कमी केले हि बातमी राष्ट्रवादीमध्ये वाऱ्यासारखी पसरली वरून हाही मेसेज गेला कि ज्याची दादांशी जवळीक त्याला भविष्यात शरद काकांकडे अजिबात मोकळीक राहणार नाही तेव्हापासून महाआघाडीत अजितदादांचे  भाजपामधल्या नितीन गडकरी यांच्यासारखे होऊन बसले आहे म्हणजे जो नितीनजी बरोबर फिरतांना दिसतो त्याचा पुढे बावनकुळे करण्यात येतो. मोठा नेता देखील प्रसंगी क्षणार्धात नॉव्हेअर करण्यात येतो. नाते दुभंगले आहे नजीकच्या काळात पवारांच्या वर्तुळात नक्की काहीतरी मोठे घडणार आहे... 

क्रमश: हेमंत जोशी 

संजय बेताल बोलले : पत्रकार हेमंत जोशी


संजय बेताल बोलले : पत्रकार हेमंत जोशी 

अशी म्हण आहे कि ज्या गाढवाचा कामाग्नी पेटलेला आहे असे गाढव कधीही अंगावर घेऊ नये. अमुक एका बिळात विंचू आहे इंगळी आहे किंवा साप आहे माहित असतांना त्या बिळात एखाद्याने कधीही डोकावून बघू नये ज्या ठिकाणी थेट ड्रग पार्टी सुरु आहे तेथे शहाण्याने कधीही जाऊ नये, मला हे सारे संजय राऊत यांच्यामुळे आठवले. त्यांना माहित आहे हे दिवस शिवसेनेसाठी विशेषतः थेट ठाकरे परिवारासाठी अत्यंत कठीण आहेत आणि हे ठाऊक असतानाही संजय राऊत काहीही तेही थेट वाहिनीवर मुलाखत देत असतांना बोलून मोकळे होतात. ज्या सीबीआय ला या दिवसात महाआघाडी सरकारने टरकून ठाकरे यांनी दबकून व राऊत यांनी घाबरून राहायला हवे त्या सीबीआयला काय समजते हे विधान जेव्हा एबीपी माझा वाहिनीवर करून मोकळे होतात ते ऐकल्यानंतर संजय राऊत यांनी थेट नागिणीच्या ओठांचे चुंबन घेतले असे वाटायला लागलेले आहे. संजय राऊत यांच्या, सीबीआयला काय समजते या विधानावर उद्या सीबीआयला संजय राऊत आणि परिवार, ठाकरे परिवार यांचे काय काय समजले आणि त्यातून राऊत ठाकरे व त्यांच्या सभोवतालीचे कसे अडचणीत संकटात सापडले हे दृश्य भविष्यात बघायला मिळाले तर फारसे आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. हि वेळ कोणती आणि आपण काय कशी मुलाखत देतो आहे याचे निदान भान यादिवसात राऊत यांनी ठेवण्याचे आवश्यक असतांना आणि सभोवताली राऊत यांचा तिरस्कारच अधिक करणारे असतांना राऊत यांनी आपला सुखाचा जीव दुख्खात टाकणे तितकेसे मनाला पटलेले नाही... 

संजय राऊत आदल्या दिवशी एबीपी माझा वाहिनीवर मुलाखत देऊन मोकळे झाले खरे पण १५ ऑगस्ट पासून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागे नवीन काम तेही या करोना महामारीत लावून ठेवले. राऊत यांनी उद्धव यांना निष्णात कंपाउंडर ठरविल्याने आणि डॉक्टर पेक्षा कंपाउंडर कसा महत्वाचा असतो हुशार असतो तद्न्य असतो हे राज्याच्या या जबाबदार नेत्याने पत्रकाराने संपादकाने शिवसेना खासदाराने सांगितल्याने उद्धव ठाकरे यांना १५ ऑगस्ट पासून रोग्यांना तपासून औषधे सांगण्याचे नवीन काम संजय यांनी लावून त्यांना इच्छा नसतांना विनाकारण व्यस्त करून सोडले आहे. हू या जागतिक आरोग्य संघटनेपेक्षा आमचे उद्धव कंपाउंडर हुशार अशी जाहिरात संजय यांनी केल्यावर मला गर्दीच्या ठिकाणी मटक्याचे दुकान लावून आपलीच चार माणसे खेळतांना जिंकल्याचे दाखवून तेथून येणाऱ्या जाणाऱ्या सामान्य माणसांना लुटणाऱ्या त्या वाईट लोकांची येथे आठवण झाली. हू या जागतिक आरोग्य संघटनेला आरोग्यातले काहीही समजत नाही तर उद्धव हेच खरे निष्णात कंपाउंडर असे थेट वेडे विधान करून या कठीण दिवसात राऊत यांनी नवा उपद्व्याप करून  ठेवला आहे. ज्या दिवसात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून अक्कलहुशारीने महासंकटातून अलगद बाहेर पडायचे अशावेळी मुलाखत घेण्यासाठीचे जमलेले खांडेकर यांच्यासहित सारेच्या सारे प्रतिनिधी तुम्ही एक मूर्ख असा तुमच्याकडे हावभाव करून फिदीफिदी हसतात, कसा व किती हास्यास्पद असा हा मेसेज तुम्ही शिवसैनिकांना देऊन एकप्रकारे साऱ्या शिवसेनेचा जाहीर अपमान घडवून आणला आहे, अशाने कोणीही राऊत यांना सिरियसली न घेता राजकारणात नवा जोकर जन्माला आला पद्धतीने बघून मोकळे होतील जे थेट सेनेला परवडणारे नाही... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

स्फोटक ! धक्कादायक !! खतरनाक !!!—पत्रकार हेमंत जोशी

 स्फोटक ! धक्कादायक !! खतरनाक !!!—पत्रकार हेमंत जोशी 

जेव्हा बुडत्याचा पाय खोलात शिरतो तेव्हा बुडणार्याने अधिक रिस्क न घेता एका झटक्यात चार पावले मागे येऊन आपला जीव वाचवायचा असतो. एखाद्याला हे माहित आहे कि अमुक एका व्यक्तीसंगे जर संभोग केला तर एड्स होणारच आहे अशावेळी मोह आवरायचा असतो आणि अंगावर कपडे चढवून तेथून पळ काढायचा असतो. पाहून घेऊ बघून घेऊ बदल घेऊ अशी भाषा मग ते आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील किंवा अन्य शिवसेनेतले कोणीही, हि भाषा त्यांना निदान या कठीण दिवसात शंभर टक्के परवडणारी नाही. बिहार पोलिसांना किंवा थेट ईडी सीबीआय ला सुरुवातीला मुंबई पोलिसांकडून किंवा थेट महाआघाडी सरकारमधून न मिळणारे न मिळालेले सहकार्य त्यातून या साऱ्यांचा मोठा रोष नजीकच्या भविष्यात मुंबई पोलीस, शिवसेना आणि महाआघाडी सरकारने ओढवून घेतला आहे हे उघड दिसते आहे आणि हे जे या सर्वांनी केले ते अत्यंत चुकीचे ठरले असे ज्याला त्याला वाटते आहे. काही पुरावे नष्ट करून महाराष्ट्र सरकारने विनाकारण संशयाचा धूर गडद केल्याचे जाणवते आहे... 

आता मला जी अत्यंत धक्कादायक धोकादायक माहिती मिळालेली आहे ती वाचून ऐकून तुमची पण नक्की फाटणार आहे. मला तर वाटते पुढे मी जे तुम्हाला सांगणार आहे ते वाचून जसे राजकारणात दोन प्रभावी गट एकमेकांवर आसूड ओढून एकमेकांना संपविण्यात मग्न असतात आता तेच शंभर टक्के बड्या अधिकाऱ्यांबाबत येथे या राज्यात घडते आहे घडायला लागले आहे. अधिकाऱ्यात आता जे दोन उघड गट पडले आहेत त्यातून त्यांचे आपापसात घनघोर युद्ध पेटण्याची माहितगारांना भीती वाटू लागलेली आहे. मिळालेली माहिती अशी कि आपल्या राज्यात एक अत्यंत प्रभावी खतरनाक धाडसी स्पष्टवक्ते अजिबात न घाबरणारे लढवय्ये असे निवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत आणि मुंबईत सुशांत सिंग व दिशा सालियन प्रकरणाचा शोध घेतांना सीबीआयच्या अनेक पुरुष व महिला बड्या अधिकाऱ्यांना काही दिवस मुक्काम करायला लागल्यानंतर त्यांना कोणतेही म्हणजे राहण्यापासून तर अगदी जेवणापर्यंत असहकार्य करण्याचे जे महाआघाडी सरकारचे ठरल्याचे समजते त्यावर मार्ग काढण्यासाठी हे निवृत्त बेधडक सनदी अधिकारी आपले अवंती अंबर मधले शासकीय निवास्थान या सीबीआय अधिकाऱ्यांना राहण्यासाठी व स्वतःचे शासकीय वाहन देखील उपलब्ध करून देणार असल्याचे माझी पक्की माहिती आहे. म्हणून हेच सांगतोय राज्यातल्या बड्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत हे तेवढेच खरे आहे. जो कोणी माझ्या निवासस्थानी राहणाऱ्या सीबीआय च्या अधिकाऱ्यांना मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करेल मग तो अधिकारी असो कि पुढारी अशांना मी व्यक्तिगत पाहून घेईन असे थेट वक्तव्य या निवृत्त सनदी अधिकाऱ्याने केल्याचेही माझी पक्की माहिती आहे. बापरे! आता या राज्याचे काही खरे नाही... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Friday, 14 August 2020

जय जय जयराज ठक्कर : पत्रकार हेमंत जोशीजय जय जयराज ठक्कर : पत्रकार हेमंत जोशी 

मी ज्या सांताक्रूझ जुहू परिसरात राहतो तो विविधतेने नटलेला ग्लॅमर असलेला विविध फिल्मस्टार मोठे व्यवसायिक पंच तारांकित होटल्स चौपाटी जगाचे पर्यटन स्थळ ठरलेला उत्तमोत्तम रेस्टोरंटस फॅशन किंवा विविधांगी क्षेत्राने मढलेला असा परिसर ज्याचे जगाला आकर्षण आहे अख्य्या हिंदुस्थानला कौतुक आहे. आमच्या या सांताक्रूझ पार्ले जुहू पश्चिम परिसरात गर्वाने ज्याचे नाव घ्यावे किंवा ज्याचे करावे तेवढे कौतुक कमी पडावे असा शिक्षण सम्राट नव्हे तर शिक्षण महर्षी किंवा तपस्वी राहतो ज्याचे नाव जो तो आदराने घेतो त्याच्या शिस्तीचे आदर्शाचे उदाहरण दिल्या जाते आणि ते नाव आहे जयराजभाई ठक्कर म्हणजे आमच्या परिसरातील सर्वोत्तम जमनाबाई शाळेचे सर्वेसर्वा मालक व चालक.... 

कितीतरी लोकांना दिलदार जयराजजी या कानाचे त्या कानाला न कळू देता मदत करतात सहकार्य करतात. त्यांची हि दिलेर वृत्ती कधीकाळी एका लबाड राजकीय कुटुंबाने ओळखली त्यांच्याशी आधी या कुटुंबाने जवळीक साधली आणि एक दिवस जयराजजींना अंधारात ठेवून फसवून त्यांची केवढी मोठी शैक्षणिक संस्था हडप केली अर्थात पुढे त्या शैक्षणिक संस्था हडपणाऱ्या कुटुंबाला देवाने फार मोठी शिक्षा दिली खरी पण त्यांनी मात्र जयराजभाईंचे मोठे मानसिक व सामाजिक नुकसान केले. आमच्याच परिसरात माझे एक जवळचे उद्योगपती मित्र सुभाष अग्रवाल राहतात. त्यांचा विवान नावाचा नातू आणि याच जमनाबाई शाळेतून यावर्षी दहावीला अख्ख्या शाळेतून दहावीला दुसरा आला विशेष म्हणजे पहिले तीन आलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या मनाचे जयराजभाई मोठी म्हणजे लाखात रक्कम देऊन शाळेत दरवर्षी सत्कार घडवून आणतात यावर्षी या बक्षिसांचा मानकरी अर्थात विवान ठरला. जयराजभाई म्हणाले, आमच्या शाळेतली पारीख आडनावाची एक मुलगी तर कोणतीही शिकवणी न लावता ९९.७५% गूण  मिळवून मोकळी झाली. अनेक फिल्मी स्टार्स ची मुले मुली या शाळेत आहेत पण माझेही दोन नातू याच शाळेचे विद्यार्थी असल्याने जयराजभाईंची शिस्त कशी करडी मला ते उत्तम ठाऊक आहे. जयराजभाईंवर खरेतर कोणीतरी पुस्तक काढावे... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी "OFF THE RECORD" review on some of headlines...

 "OFF THE RECORD" review on some of headlines...

1. Say anything, in my views the way Arnab Goswami has made a dead case of Sushant Singh Rajput alive, after being declared his death as a suicide, hats off to him. Though it was actress Kangana Ranaut who was the whistleblower, it was Arnab who forced the entire nation now to come to a conclusion--Something somewhere the dots are not connecting. The way Arnab debates, see I don't know what exactly will come to light, but boss, it has definitely made the entire Maharashtra Government a little uneasy. Believe me, even today when the case has reached the Supreme Court due to mammoth efforts from Arnab & SSR's family efforts (obviously backed by some one big) , not one Marathi news channel has shown the guts or the courage to keep the case alive on their channels through debates. Obviously, there are relations for keeps, caste equations, advertisements for the channels & fear of getting offices torn down or even get beaten up like how Nikhil Wagle was beaten up when he followed up Ramesh Kini case & bad-mouthed Balasaheb Thackeray by then Sainiks. This is Journalism. Might be Arnab is completely wrong, but boss sitting in Parel & addressing the CM by his first name and knowing he is a Shiv Sainik first, isn't a joke...Fearless Journalism, common give that much to him...

Coming to IAS--Why is Manisha Verma being ignored? Few months ago she was shunted from  the Tribal department & various reasons were attached to the transfers. Apart from reasons mentioned in my previous blog, I have a different story to tell this time. A senior Secretary level officer was punished for no fault of hers, at least that was been presented. So it happened, Court had passed strictures on a certain Gaikwad Committee report. It was about many irregularities that happened in Tribal Department during 2004 to 2009. Mind you, Verma wasn't even posted in that department then. Yet she was framed in that . Also then the Government, against the Court strictures, did not even file a rejoinder or a SLP to protect Manisha, and for no fault of hers, she was shunted. Now we all know only a certain group (of 4) are the Karta-Dharta's in whose hands lie transfers of IAS & IPS of Maharashtra. They are AM, SK, MS & mere pyaare SJ ...Please may I request either of them to let Verma have a respectable posting? 

The reason I used abbreviations is because in the Sushant case, Rhea's phone call records said AU. If AU can be a girl friend of Rhea, isn't it safe for me too-to use abbreviations whilst naming & shaming. 

Now, the biggest talk of the town is transfer of Vinita Vaid Singhal from Tribal Department within a span of 2 months of her appointment there. Please note--in fact she has been rescued! When she joined Tribal, I had spoken to one of my friend that one of the Karta-Dharta Gang Member (of 4 mentioned above) wasn't too happy to get her there. But, she joined as Minister Padvi was hell bent & got Singhal at Tribal. By the way, those who don't know---ALERT--- Congress is the only party in this MVA government who does not allow this main Karta-Dharta team member to participate in transfers of IAS of their department's. One example is that of Vinita Singhal how Padvi got her, and second is Nitin Raut-He has 'his' people in Dinesh Waghmare & Sanjay Khandare against the choice of AM, one of the Karta-Dharta Gang. Thank God, Singhal Ma'am, you were 'left' unhurt & unbruised! But Singhal Ma'am, I had heard, Minister Uday Samant, Rajesh Tope & Ashok Chavan wanted you to their department's then what went wrong? You were straight away given a side posting...

www.vikrantjoshi.com

AM of the Karta-Dharta gang wanted to get rid of Rajesh Kumar Meena due to his proximity with other powerful bureaucrat. He succeeded in removing 'decent' Rajesh Kumar but wasn't able to settle scores with him by replacing him with Vinita Singhal at Tribal Department. So, my news of Congress not allowing this Karta-Dharta at all in any postings of IAS is TRUE. But now senior-most Meena, remains without posting. Talking about a lof of people being without postings, there are so many of them with 2 to 3 additional charges. Why does not AM get them relieved and hand-over crucial posts which are a burden to another one to the one's who are sitting at home? Strange na...

Also, to bring in people like Anup Yadav, Vipin Sharma ( in short above 2000 batch) & so many new ones in the main circuit to head crucial department is a master stroke by Karta Dharta Gang. But sirs, let me tell you--don't expect loyalty & camps from these new blood officers. They have learnt lessons from you and come. When it is Devendra Fadnavis regime, he is God, & when Uddhav Raj comes, he becomes God!! 

Forest & Environment are like husband & wife, in short they are corelated. Co-incidentally both the departments are headed by both husband & wife now--Milind & Manisha Mhaiskar. By the way, the impression of CM Uddhav Thackeray being very bad with bureaucrats who were in the inner circle of Devendra Fadnavis, is not true at all. Both Mhaiskar's touted to be close to Fadnavis were respectfully treated by CM Thackeray. They were allowed to complete their terms & given good postings. 100% It is also because of their image & work they put in... So those close to Fadnavis, don't loose hope. 

Bhaisaab, I'm in awe with CIDCO boss Lokesh Chandra. Even after completing his term, he does not want the post to go. AM is also happy with him. Then why is wife of Lokesh, Abha Shukla getting restless & 'heard' lobbying for Lokesh. Ma'am, if you have AM on your side, a promise made to Dr. Sanjay Mukherjee does not stand ground.  

Also, now that the post of MHADA is vacant, who is the front runner? Heard Pravin Darade is in contention. Till now I always thought Sanjeev Jaiswal to be in the race, but Jaiswal's file that had reached all tables got stuck majorly at AM's table. Also Sujata Saunik who was almost finalized as ACS Home, where did it get stuck, God knows? She is in the US and I request her to return here as out of sight is out of mind, ma'am! Manukumar Shrivastav might score huh....

And finally the news of SRA--BMC's DMC Ranjit Dhakne scored above Nitin Mahajan, SDO Kalyan and became the secretary at SRA. No, it ain't like that. Even though SRA comes under Minister Jitendra Awhad, this time the important posting of SRA Secretary was done by the ShivSena MLA & with consultation of a high profile PA. 

NOW NOTICE 2 consequences below: 

(A) Shivsena broke up with the BJP

(B) Sharad Pawar officially brought "ghar ghar ki kahaani" in public by humiliating Parth Pawar & calling him what not...

Guess what readers, during both the incidents-Sanjay Raut was present in & around of Sharad Pawar. So now you know who is the "Kaumolika" (vamp of an Indian series) 😅


Vikrant Hemant Joshi 


Monday, 10 August 2020

नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग ३: पत्रकार हेमंत जोशी


नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग ३: पत्रकार हेमंत जोशी

संजय राऊत यांची बिनधास्त बडबड आणि सामनातील त्यांचे लेख किंवा अग्रलेख करोना काळातील शिवसेना किंवा उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतरची काहीशी सुस्त मवाळ सावध बेसावध झालेली सेना जिवंत ठेवण्यात राऊतांचेच खरे हातभार. असे आहे कि प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात राऊत तर शिवसेनेचे नेते आहेत खासदार आहेत सामना दैनिकाचे सर्वेसर्वा आहेत त्यामुळे त्यांना जसे असंख्य मित्र आहेत तसे बहुसंख्य शत्रू असणे स्वाभाविक आहे. भाषा शिवसेनेला शोभणारी असली तरी एक मात्र मला त्या आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांचेही खटकले. जी धमकी थेट लेखी म्हणजे पत्रक काढून आदित्य ठाकरे यांनी दिली त्याच पद्धतीने संजय राऊत देखील वाहिन्यांसमोर धमकी देऊन मोकळे झाले. राऊत म्हणाले ज्यांचे हात दगडाखाली असतात आहेत त्यांना आम्हालाहि पाहून घेता येईल आणि आदित्य म्हणाले अद्याप माझा संयम ढळलेला नाही. म्हणजे संयम ढळला तर मीडियावलो तुमचे काही खरे नाही. दोघांनीही उघड उघड उगाच मीडियाला किंवा तत्सम विरोधकांना धमकावले आहे जे निदान या कठीण काळात त्यांच्यादृष्टीने शिवसेना व मुख्यमंत्रांच्या देखील दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. चुकून काही विपरीत घडले तर त्याची मोठी किंमत कदाचित थेट उद्धव ठाकरे यांनाही मोजावी लागू शकते. हि ती उघड धमकी देण्याची अजिबात वेळ नाही किंवा राऊत यांनी तर थेट ब्लॅक मेलिंग करणारी भाषा वापरलेली आहे. वातावरण पूरक नसतांना लेखणी किंवा भाषा जपून वापरलेली बरी....


आंधळीला कधी डोळा मारू नये, मुक्या माणसाला गाणं म्हणायला सांगू नये, तोतऱ्याला संस्कृत सुभाषित म्हणण्याचा आग्रह धरू नये, नवरा भलेही रोमँटिक मूड मध्ये असेल पण हगवणीचा त्रास असतांना त्याचा हात पकडून त्याला पलंगावर बसवून ठेवू नये, गाढव लाथा झाडत असतांना अगदी ढोर डॉक्टरने देखील त्याचे ढुंगण तपासायला जाऊ नये, कुत्र्याच्या डोळ्यात कधीच फुंकर मारू नये, सिंहिणीच्या तोंडात अगदी ती लाडात आलेली असली तरी माणसाने बोट देऊ नये, मरतुकड्या माणसाने खूप मोह झाला तरी बलदंड बायकोला कडेवर उचलून घेऊ नये अशाने देव त्याला हमखास आपल्याकडे उचलून नेतो, चवताळलेल्या वाघिणीला आणि चिडलेल्या आडदांड बायकोसमोर कधीही तिला अंगावर शिंगावर किंवा डोक्यावर बसवून घेण्याची भाषा करू नये तद्वत याक्षणी शिवसेनेने अर्णब गोस्वामीला विनाकारण महत्व देऊ नये, त्याच्या ढुंगणाला चीमटा काढून तो चिडेल त्याला त्यातून अधिकाधिक बोलण्याची संधी मिळेल असे करू नये जे शिवसेनेसाठी अजिबात हितावह ठरणारे नसेल. शिवसेना त्यातून घाबरली अर्णब समोर हादरली असा कुठलाही अर्थ कोणीही काढणार नाही उलट संजय राऊत किंवा शिवसेना नेते अक्कलहुशारीने वागले असाच त्यातून अर्थ काढता येईल जे शंभर टक्के सेनेला विशेषतः जे शिवसेना नेता मीडियाच्या किंवा अर्णब गोस्वामीच्या रडारवर आहेत ते आणखी आणखी टार्गेट होत जातील...

www.vikrantjoshi.com


मी पत्रकारितेत अगदीच लहान होतो बऱ्यापैकी नवखा होतो तेव्हाही हे असेच शिवसेनेच्या बाबतीत घडले होते आणि मी लिहिले होते कि बाळासाहेबांनी तोंडफळ वाचाळवीर विरोधी विचारांच्या निखिल वागळे व त्याच्या जेमतेम खप असलेल्या महानगर दैनिकाच्या मागे अजिबात लागू नये त्याच्यावर व महानगरच्या कार्यालयावर हल्ला करू नये त्यातून शंभर टक्के शिवसेनेच्या लोकप्रियतेत आणि बाळासाहेबांच्या लोकमान्य नेतृत्वात मोठा फरक असून त्याचे वाईट परिणाम शिवसेनेला दीर्घकाळ भोगावे लागतील, नेमके तेच घडले माहीम परिसरातील सदा सरवणकर सारखे बलाढ्य नेते वागळे आणि महानगर कार्यालयावर चाल करून गेले पुढे तेच घडले त्याआधी जेमतेम पत्रकारितेत मान्यता असलेला निखिल वागळे रात्रीतून मोठा झाला महानगर चा खप प्रचंड वाढला वागळे यांना पुढे कित्येक वर्षे पोलीस सौरक्षण देण्यात आले तो त्याचे वृत्तपत्र महानगर मोठे झाले आणि शिवसेना तसेच बाळासाहेब ठाकरे यांना न घाबरणारा शिवसेनेला फाट्यावर मारणारा महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांचा कायम बाळ असा एकेरी उल्लेख करणारा निखिल पुढे प्रसिद्धीच्या झोतात आला, त्याला आर्थिक गणिते जमली नाहीत म्हणून महानगर संपले नंतर निखिल गाढवाच्या मागून व मालकाच्या पुढून जाऊ लागल्याने त्याला विविध वाहिन्या मधून बाहेर पडावे लागले तो भाग वेगळा पण निखिल वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांमध्ये टिकला असता तर आज उद्धव, आदित्य आणि शिवसेनेला आणखी एका कटकटीला सामोरे जावे लागले असते. अर्णव ओरडतो आहे आणि इतर हिंदी इंग्रजी वाहिन्या शांतपणे नेमकी टीका करून मोकळे होताहेत हाच काय तो अर्णब आणि इतर वाहिन्यामधला फरक दिसतो. थोडक्यात कोणाकोणाची तोंडे तुम्ही बंद करणार आहात ?


विचित्र योगायोग म्हणावा कि इतिहासाची पुनरावृत्ती पण तेव्हा जसे घडले होते ते तसेच आजही घडते आहे घडले आहे म्हणजे रमेश किणी म्हणाल तर आत्महत्या म्हणाल तर हत्या प्रकरण घडले आणि निखिल वागळे यांनी तेव्हा रमेश किणी खून प्रकरण उचलून धरले ते थेट याप्रकरणी बाळासाहेबांवर सडकून टीका करीत होते शिवसेनेला वाट्टेल त्यापद्धतीने बदनाम केले जात होते, आज तीच पुनरावृत्ती घडलेली आहे दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग आत्महत्या कि हत्या प्रकरणात यावेळी देखील संशयाची खरी खोटी सुई मातोश्रीकडे टोचल्या जात असल्याने पुन्हा यावेळी संजय राऊत किंवा अन्य वागळे पद्धतीने अर्णब गोस्वामी किंवा त्याच्या रिपब्लिक भारत वाहिनीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताहेत जी त्यांची मोठी चूक होते आहे, सोयीस्कर दुर्लक्ष करणे वास्तविक त्यावर एकमेव उपाय व इलाज असतांना संजय राऊत आणि तत्सम सेना नेते अर्णबला मोठे करताहेत त्याचे आणखी आणखी महत्व वाढवताहेत ज्यातून काहीही फलनिष्पत्ती न घडता पुढे शिवसेनेलाच त्याचा मोठा फटका बसू शकतो, जेव्हा आपली बाजू पडती असते तेव्हा शांत राहून नेमके उत्तर देऊन मोकळे व्हायचे असते. याआधी मी जे म्हणालो तेही यापुढे अजिबात घडता कामा नये म्हणजे एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक करणे म्हणजे दिशा गेली सुशांत गेला आता तिजा घडता कामा नये म्हणजे ज्यांना हे आत्महत्या प्रकरण नेमके माहित आहे त्यातल्या एखाद्याने आत्महत्या केली असेही यापुढे कानावर येता पडता कामा नये थोडक्यात चुकांची वारंवार पुनरावृत्ती घडता कामा नये. अशावेळी शांत बसणे आणि ज्यांच्या हातून दिशा किंवा सुशांत आत्महत्या कि हत्या प्रकरणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत झाली त्यांनी चुका कबूल करून मोकळे होणे हाच त्यावर उत्तम उपाय असेल. शिवसेनेने मनाला लावून न घेता अधिक हुशारीने पावले उचलावीत कारण ज्या ज्या वेळी इतरांना वाटते शिवसेना आता संपली त्या त्या वेळी हीच शिवसेना उफाळून वर आलेली आहे यावेळीही तसेच घडेल, माझे हे वाक्य लिहून ठेवा...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Thursday, 6 August 2020

नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक दुसरी लपविण्यासाठी तिसरी चवथी पाचवी अशा चुका सुशांत सिंग आणि दिशा सॅलियन आत्महत्या कि खून प्रकरणी या प्रकरणाशी संबंधित साऱ्यांच्याच होत गेल्या निष्पन्न निघणार आहे शिक्षा नुकसान अपमान आणि बदनामी. सर्वाधिक नुकसान याप्रकरणी होणार आहे ते मुंबई आणि राज्याच्या पोलिसांचे आणि राज्यातल्या तमाम जनतेचेही कारण ज्या पद्धतीने विनाकारण अजिबात गरज नसतांना कुठल्यातरी बदमाश नेत्याला खुश व इम्प्रेस करण्यासाठी मुंबई पोलिसातील काही वरिष्ठांनी चुकीचे, चुकीच्या पद्धतीने त्यात अडकलेल्या रियासारख्या काही मंडळींना सहकार्य केले ज्यामुळे नजीकच्या भविष्यात पोलिसांनो तुम्हा आम्हा सर्वांनाच या चुकीचा मोठा त्रास फार मोठा मनःस्ताप नक्की होणार आहे. यामुळे यापुढे आता असे घडेल कि गुन्हेगार येथे या मुंबईत या राज्यात गंभीर गुन्हे करून थेट बिहारला पळून जातील जेथे त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या आपल्या पोलिसांना यापुढे सहकार्य मिळणार नाही सहजासहजी शिरकाव मिळणार नाही एवढेच काय राज्याचे पोलीस तेथे गेलेच तर त्यांना मारहाण होऊ शकते ज्यात आमच्या पोलसांना अतिशय चिडलेल्या बिहारी पोलिसांचे कुठेही सहकार्य मिळणार नाही त्यामुळे यापुढे गुन्हेगारांचे देखील हेच ठरलेले असेल कि येथे गुन्हे करून मोकळे व्हायचे आणि थेट बिहार मध्ये पलायन करायचे. अन्य राज्यातले गुन्हेगार देखील बिहार मध्ये पळून जातील...

www.vikrantjoshi.com
कोणावरही लिखाण किंवा टीका करतांना आम्हाला आजपर्यंत कधीही कोणाचेही भय वाटले नाही पण सुशांत व दिशा प्रकरण ज्याप्रकारे सुरुवातीला दाबल्या गेले त्यामुळेच आता भीती वाटायला लागलेली आहे, येथे या राज्यातल्या बदमाशांविरुद्ध यापुढे लढा द्यायचा कि येथेच थांबायचे. कारण दिव्या भारतीपासून तर सुशांतसिंग पर्यंत चित्रपटसृष्टीतले खून ज्यापद्धतीने आजपर्यंत आत्महत्या दाखवून सारी प्रकरणे व गुन्हे विशेषतः मुंबई पोलिसांनी रफा दफा करून ते मोकळे झाले आहेत उद्या इतरांच्या बाबतीत देखील हे असे सऱ्हास घडणार आहे,आणि मराठी माणसाची शिवसेना सत्तेत असतांना हे घडते आहे ज्याची मोठी किंमत यापुढे राज्यातल्या जनतेला आणि शिवसेनेलाही चुकवावी लागणार आहे. वाचकहो, जे घडलेच नाही त्यावर कृपया कोणाचीही अजिबात बदनामी करू नका जसे सोशल मीडियावर कार मध्ये बसलेल्या आदित्य ठाकरे यांचा कुठल्याशा नटीबरोबर एक फोटो सर्वदूर व्हायरल करण्यात आला आहे आणि त्याखाली "आदित्य विथ रिया चक्रवर्ती" असे लिहिण्यात आलेले आहे जे तद्दन चूक आहे खोटे आहे ती नटी रिया नसून दिशा पटणी आहे, रियाला आपल्या कार मध्ये कधीही आदित्य ठाकरे यांनी बसविले नसल्याची माझी १००% माहिती आहे...

विवाहापूर्वी आदित्य यांच्या हातून चुका घडू शकतात पण चुकीच्या प्रकरणात त्यांना विनाकारण ओढून बदनाम करू नका. विशेष म्हणजे आदित्य यांनी देखील बापाच्या पावलावर पाउल ठेऊन स्त्रियांच्या बाबतीत उद्धव व्हावे,आदर्श ठरावे एकेकाळी अत्यंत पराक्रमी तेजस्वी ठरलेला काका जयदेव होऊन शिवसेनाप्रमुख होण्याची चालून आलेली संधी गमावू नये म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती करू नये म्हणजे जयदेव यांना बाळासाहेबांनी दूर केले आणि उद्धव यांना जवळ घेऊन त्यांना आपली  गादी चालविण्यास दिली, आदित्य तुम्ही देखील अशाच पद्धतीने वागत गेलात तर तुमचाही काका होईल आणि उद्धवजी तेजसला नाईलाजाने पुढे करून मोकळे होतील. आम्हा पत्रकारांना कोणताही राजकीय पक्ष महत्वाचा नसतो पण माझ्यासाठी मराठी बाणा आणि हिंदू असल्याचा मोठा अभिमान आहे. ठाकरे परंपरा आम्हा सर्वांचे दैवत आहे आणि देव हा राम असावा लागतो रावण नव्हे. तुमच्यातला जो तो उठतो आणि सांगत सुटतो कि हे भाजपाचे कारस्थान आहे पण तुम्हाला अत्यंत महत्वाची बातमी येथे आज सांगतो तुमच्या आणि वरुण सरदेसाई विषयी विशेषतः शिवसेना नेते आणि मंत्र्यांमध्ये फार मोठी अस्वस्थता आहे, नाराजी आहे, ती का आहे त्याची करणे शोधून काढा. आजच त्यावर विचारमंथन करून सावध व्हा. तुमच्यातलेच अनेक तुमच्या पाठी लागले आहेत का जरा शोध घ्या. या राज्यात शिवसेनेचे महत्व संपणे किंवा कमीही होणे आम्हाला कोणालाही ते परवडणारे नाही. वरुण सरदेसाई तुमचे नातेवाईक असतील किंवा तुमचे मिलिंद नार्वेकर असतील पण त्यांनीही तेवढीच काळजी घ्यायला हवी कि तुमची, मातोश्रीची आणि तुमच्या आईवडिलांची कुठेही कधीही बदनामी होणार नाही. प्रत्त्येक पुरावा छापायचा नसतो पण येथे तुम्हाला आणि उद्धवजींनाही सावध करणे तेही न घाबरता माझे काम कर्तव्य होते ते मी केले तुम्ही त्यातून हवा तो अर्थ काढा...
क्रमश: हेमंत जोशी 

Tuesday, 4 August 2020

नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी


नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 
तुम्हीच आठवा, महाविद्यालयात शिकत असतांना तुमच्या सभोवताली दोन भिन्न स्वभावाच्या तरुणी कायम असायच्या. काही एकदम बिनधास्त वागणाऱ्या अगदी टवाळ तरुणांसारख्या वर्गातल्या टग्या मुलांसारख्या, या मुलींना चालू हि पदवी हमखास बहाल केल्या जायची कारण त्यांची एकंदर वागणूक वर्तणूक किंवा वृत्ती वादातीत असायचे आणि काही तरुणी म्हणजे एकदम सुसंस्कृत खालची मानही वर न करता शिकणाऱ्या त्या मुलांच्या नजरेत काकूबाई ठरायचा पण पुढे अनेकदा नेमके उलटे घडते म्हणजे ज्या तरुणीला बुद्धिमान किंवा काकूबाई म्हणून बघितल्या जायचे ती एक दिवस चक्क धर्माबाहेर असलेल्या तरुणांबरोबर पळून जाते आणि जिच्या एकंदरच चारित्र्य किंवा भवितव्याविषयी कायम शंका अशी तरुणी पुढे उत्तम संसार आणि छान करिअर घडवून मोकळी होते. बिहार आणि मुंबई महाराष्ट्र पोलिसांना या सुशांत सिंग आणि दिशा मृत्यू किंवा घातपात प्रकरणी वर दिलेले उदाहरण नेमके लागू पडते. आजतागायत बिहार पोलिसांविषयी कधीही केव्हाही फारसे चांगले बोलल्याच गेले नाही ते सध्या सर्वत्र देशभर कौतुकाला पात्र ठरताहेत आणि विशेषतः मुंबई पोलिसांची अगदी जगभर या प्रकरणातून छी थू बदनामी नाचक्की झालेली आहे थोडक्यात बिहारी पोलीस सुशांत दिशा प्रकरणी अव्वल ठरले त्याचवेळी मुंबई पोलिसांना बिहारी तुमच्यापेक्षा कित्येक पटीने चांगले हिणवल्या गेले, चिडविल्या जाते आहे जे मन सुन्न व डोके बधिर करणारे ठरले...

www.vikrantjoshi.com

जीवाची मुंबई हा वाक्प्रचार तसा अख्य्या मुंबईला फारसा कधीही लागू पडत नाही, जीवाची मुंबई हा वाक्प्रचार बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान जी मुंबई पसरलेली आहे उभी आहे केवळ त्याच फिल्मी ग्लॅमरने वेढलेल्या परिसराला तंतोतंत लागू पडतो. जसे जगभरातल्या शौकिनांचे पाय आपोआप गोव्याकडे पुण्याकडे वळतात त्या पेक्षा कितीतरी अधिक पटीने मुंबईतील बांद्रा ते अंधेरी पश्चिम दरम्यान असलेल्या परिसराची शौकिनांना भुरळ पडते. 24 तास हा परिसर हॉट असतो जागा असतो स्वतःच्या धुंदीत आणि मस्तीत जगत असतो आणि आम्ही मुंबईकर जे नेमके या परिसरात वास्तव्याला आहोत आमच्या या परिसरात नेमके काय आणि कसे गंभीर घडत असते ते आम्हाला माहित असते. अलीकडे माजी मुख्यमंत्री नारायण राणे अगदी उघड व बिनधास्त घडलेल्या सुशांत सिंग आणि दिशा प्रकरणी यासाठी एवढे मोकळेपणाने बोलू शकले कारण ते आणि त्यांचे कुटुंब याच परिसरातल्या हॉटेस्ट परिसरात म्हणजे जुहूच्या समुद्रकिनारी वास्तव्याला आहेत त्यामुळे तरुण नितेश राणे यांना दिशा व सुशांत प्रकरण नेमके कसे घडत गेले किंवा बड्या घरातली कुटुंबातली कोणती मुले व मुली कसे, नितेश किंवा पार्थ अजित पवार यांना अतिशय बारकाईने माहित असते किंवा असल्याने स्वतः पार्थ पवार आणि नितेश यांचे वडील नारायण राणे कॉन्फिडन्टली आरोप करून मोकळे झाले... 

जी पिढी ऐन तारुण्यात सर्वच क्षेत्रात स्वतः बेफाम बेधुंद अंदाधुंद तुफान जंगली राजकारणात आणि पैशांनी अवाढव्य झाली त्या मागच्या पिढीला आज सर्वाधिक मोठी काळजी आहे राजकारणात उतरलेल्या उतरणाऱ्या पोटच्या मुलांची कारण आम्हा भारतीयांचे तर हे ठरलेलेच आहे कि आधी स्वतःचे घर मोठे करायचे त्यातून काही उरलेच तर कार्यकर्त्यांच्या अंगावर भिकाऱ्यासारखे भिरकवायचे त्यातलेच एक अजित पवार, आजकाल त्यांना सर्वाधिक चिंता व काळजी आहे ते माझ्या पार्थचे कसे होईल त्याची आणि त्यात अजितदादांची काही चूक आहे असे वाटत नाही कारण जशी या राज्यातल्या अजितदादांच्या वयाच्या ज्या त्या नेत्याला जशी फक्त आणि फक्त पोटच्या बबड्याची काळजी आहे त्यातलेच एक अजितदादा हे देखील त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पार्थ मागल्या लोकसभा निवडणुकांपासून वडिलांच्या संपर्कात असतो त्याला जसे जमेल त्यापद्धतीने तो येथे पाय रोवण्यासाठी धडपडत देखील असतो आणि हे असे राजकीय बाप व त्यांच्या मुलांचे प्रत्येक राजकीय पक्षात सतत धडपडणे सुरु आहे सुरु असते. पारनेर चे नगरसेवक शिवसेनेतून राष्ट्रवादीत आणले ते अजितदादांनी नव्हेत तर पार्थ पवार यांनी आणि ती पार्थ याची अत्यंत यशस्वी खेळी ठरली आहे हे मी तुम्हाला आज सांगतो जरी उद्धव ठाकरे यांनी त्या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत आणण्यात यश मिळविले असले तरी. आणि याच पार्थ पवार यांनी सुशांत व दिशा प्रकरणात लागोपाठ दुसऱ्यांदा म्हणजे पारनेर नगरसेवक फूट प्रकरण घडल्यानंतर दुसरा शिवसेनेला फार मोठा धक्का दिला आहे. मला तर वाटते पार्थ अजित पवार हे धक्का तंत्र वापरण्यात हे असे बापाच्या पावलावर पाऊल ठेवते झाले तर उद्या कदाचित ते स्वतःच्या हिंमतीवर विधान परिषदेतील आमदारकी मिळवून मोकळे झाल्याचे दृश्य आपल्या सर्वांना हमखास नक्की निश्चित पाहायला बघायला मिळेल...

मित्रहो, सुशांत आणि दिशा आत्महत्या प्रकरणी वरकरणी जेव्हा सारे काही शांत झाले आहे मिटलेले आहे असे संबंधितांना व साऱ्या भारतीयांना वाटत होते ते बघून या आत्महत्येची नेमकी वस्तुस्थिती माहित असलेले आणि मनातून अस्वस्थ डिस्टरब झालेले एकमेव पार्थ पवार जाहीर मागणी करीत होते कि या घातपाताची सीबीआय चौकशी करा. हा शिवसेनेला आणि मित्र आदित्य ठाकरे यांना पार्थ यांनी दिलेला दुसरा मोठा दणका होता. कृपया पार्थ तुम्ही शांत बसा, असा निरोप त्यांना धाडल्यानंतर देखील ते शांत बसले नाहीत, अजितदादांच्या स्वभावाची झलक आणि चुणूक जणू पोटच्या पोरातून दिसून आली. अस्वस्थ झालेले आणि दिशा व सुशांत मृत्यू व घातपात प्रकरणी नेमकी वस्तुस्थिती माहित असलेले पार्थ अजित पवार अगदी उघड गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटले आणि लेखी निवेदन देऊन वरून त्याचा फोटो पुरावा सर्वांसमोर उघड करून मोकळे झाले. आपल्या घरातलेच म्हणजे आपल्याच आघाडीतले आपल्यावर उलटल्याने बघून अनेक पार्थ यांनी घेतलेल्या उघड भूमिकेतून हादरले आणि घाबरलेही....
क्रमश: हेमंत जोशी 

Sunday, 2 August 2020

Mumbai Police Debacle!!
It is otherwise a very open war in the IPS between the Kayasta's & other IPS officers of Maharashtra. Kayasta's are hands-down coming on the top always as compared to other IPS's in Maharashtra since years now. Even today the retired one's along with their prodigies are very much involved in day-to-day business. Now that the Bihar Police requires maximum support from these Kayasta IPS officers  lobby dominating the force, no where the top guns are to be seen supporting Bihari cops in investigation of the death of Sushant Singh Rajput & Disha Salian. This proves Kayasta IPS officers are far more away than caste, region--- only one thing is on top of their mind--themselves ! And yes, Mumbai Police are in lot of trouble for accidentally deleting the Disha Salian file from records. 


You must be aware, most of the crimes that happen in our city/state, criminals tend to take Bihar route to escape out of the country. Hence maximum good relations should have been maintained with them, which Mumbai cops & the HM have failed to do so. Would we get a good welcome and co-operation when we go to Bihar to solve a case? I don't think so. This is a state where CS, DG and many other top ranking officials are Kayasta's, not only they are at the top, but yes--they are a dominant too. 

PS: If you get a chance, do log on the net and watch Arnab's show yesterday (Sunday Debate) where the topic was Bollywood Dark Secrets. He ripped everyone apart....A Must watch!!!

Vikrant Hemant Joshi.