Sunday, 7 June 2020

वाहिन्या वृत्तपत्रे आणि वाह्यातपणा : पत्रकार हेमंत जोशी


वाहिन्या वृत्तपत्रे आणि वाह्यातपणा : पत्रकार हेमंत जोशी 
एका मोठ्या वृत्तपत्राच्या वयस्क मालकाला बायकांचा मोठा नाद आहे हा षौक पूर्ण करण्यासाठी तो जगभर फिरतो अनेकदा माझे काही व्यवसायिक किंवा राजकारणातले बाईलवेडे मित्र त्याला हा षौक पूर्ण करतांना कंपनी देतात जी कंपनी त्या शौकीन फुकट्या मित्रांसाठी फायद्याची ठरते. घडते असे कि सत्तरीच्या पुढला हा शेटजी लैंगिक दृष्ट्या आता फार दुबळा झाला आहे पण कामवासना मात्र त्याला सतत उत्तेजित करीत असते, जेव्हा केव्हा हे महाशय महागड्या कॉलगर्ल्सला बोलावून घेतात थोडावेळ दारू ढोसून नंतर विकृत लैंगिक चाळे करून महागड्या कॉलगर्ल्सला सोबीतला असणाऱ्या मित्रांच्या रूम मध्ये ढकलून मोकळे होतात. हे उदाहरण येथे यासाठी कि आमच्या वृत्तपत्र आणि अन्य मीडिया क्षेत्रात याचपद्धतीने या क्षेत्रात काम करणारे चेकाळले आहेत म्हणजे समजा विपुल नावाचा एखादा इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार जर शासन दरबारी आपल्या मालकाची मलिदा देणारी पाच कामें करवून आणत असेल तर त्यात तो स्वतःचे देखील एखादे काम करवून मलिदा मिळवून मोकळा होतो. अनेक वाहिन्या वृत्तपत्रे किंवा मीडिया क्षेत्रातून अशी दलाली करणारे भडवे जागोजाग आढळतात ज्यांना मिळणारे वेतन म्हणजे त्यांच्यासाठी पिनटस सारखे असते.... 

अलीकडे जय महाराष्ट्र हि बातम्या देणारी वाहिनी बंद पडलेली दिसते, आर्थिक गणिते बिघडली कि या वाहिन्यांचे बंद पडणे आपसूक असते. वाहिन्यांचे तर असे असते कि समजा बातम्या अर्ध्या तासाच्या असतील तर त्यात बारा मिनिटांच्या किमान जाहिराती हव्यात शिवाय त्या बातम्यांमध्ये पण जाहिराती लपलेल्या असाव्यात सध्या या अशा जाहिरातींच्या बाबतीत मराठीमध्ये एबीपी माझा केवळ यशस्वी आहे इतर वाहिन्यांची अवस्था तशी बिकटच आहे पण साम किंवा लोकमत यांना नेमके आर्थिक गणित कसे जुळवून आणायचे हे अनुभवाने माहित असल्याने या वाहिन्या बंद पडतील असे निदान आज तरी चित्र नाही. वृत्तपत्रे असोत अथवा बातम्या देणाऱ्या वाहिन्या या दोन्हीकडे बातम्या लेख मुलाखती इत्यादी माध्यमातून पैसे मोठ्या प्रमाणावर मिळविण्याची एक बेमालूम बदमाशी असते त्यात नवाकाळ हे दैनिक निळूभाऊंच्या काळातच उघडे पडल्याने त्याचा एकेकाळचा सहा लाख खप वाचकांनी मग काही हजार आणून ठेवला, इतरांची बदमाशी तितकीशी लक्षात न आल्याने इतर वृत्तपत्रे आणि वाहिन्या खोऱ्याने काळा पैसा कायम खेचत असतात हि वस्तुस्थिती आहे....

www.vikrantjoshi.com

बातम्या लेख मुलाखती इत्यादी माध्यमातून पैसे खेचून आणणारे असे पैसे मालकांना पोहचवून त्यांना खुश ठेवणारे बहुतेक वृत्तपत्रे वाहिन्या आणि मीडिया क्षेत्रात असे प्रतिनिधी आहेत त्यांची नोकरी त्याच भरवशावर टिकून असते त्याशिवाय शासन दरबारी लिखाणातून आपला स्वतःचा दबाव निर्माण करून मालकांच्या आणि स्वतःच्या मलिदा मिळवून देणाऱ्या नस्त्या क्लिअर करवून घेणारे भडवे प्रतिनिधी तर शासकीय कार्यालयातून मंत्रालयातून जागोजाग दिसले कि त्यांच्या पुढ्यातच त्यांच्या तोंडावर ओकारी करावीशी वाटते. ज्या प्रतिनिधींकडे या अशा भडवेगिरीतून प्रचंड माया जमा झालेली आहे त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही पण ज्यांचे पॉट केवळ प्रामाणिक नोकरीवर अवलंबून असते अशा मीडियामध्ये काम  करणाऱ्या प्रतिनिधींना जेव्हा मालकांनी या कोरोना महामारीत कामावरून काढून टाकले किंवा ज्यांना केवळ निम्म्या वेतनावर काम करावे लागते आहे ते ऐकून बघून तळपायाची आग मस्तकात पोहोचते कारण बहुतांशी मीडिया मालक हे आर्थिक दृष्ट्या प्रचंड श्रीमंत गब्बर आहेत त्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या प्रामाणिक स्टाफला या तीन महिन्यात कामावरून न काढता पूर्ण वेतन दिले असते तर त्यांचे काहीही कुठेही अजिबात बिघडले नसते पण आपल्याकडे काम करणाऱ्या प्रतिनिधींकडे एखाद्या रांडेसारखे बघण्याची या मालकांची वृत्ती असल्याने त्यांनी मीडिया क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रतिनिधींवर फार मोठे आर्थिक संकट उभे केले आहे जे अतिशय नीच असे कृत्य त्यांनी केले आहे...
क्रमश: हेमंत जोशी 


No comments:

Post a comment