Wednesday, 17 June 2020

मीडियाची ऐसीतैसी : पत्रकार हेमंत जोशी


मीडियाची ऐसीतैसी : पत्रकार हेमंत जोशी 
महाराष्ट्र टाइम्सचा अतुल आंबेरकर अचानक गेला, अलीकडे वृत्तपत्रातून अनेकांना तडकाफडकी कोरोना महामारीत काढल्या जाते आहे अशा काढणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असल्याचे अतुलला कळले असावे म्हणून त्याला हा धक्का सहन झाला नाही का त्यावर अर्थात पत्रकार सुशील आंबेरकर व्यापक सांगू बोलू शकतील. ज्यांच्या भरवशावर आपण मोठे झालो गब्बर झालो त्याच स्टाफला मीडिया मालक अशी रांडेची ट्रीटमेंट देतात कारण त्यांना एक काढला तर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आमच्याकडे जय महाराष्ट्र हि बातम्या देणारी वाहिनी दिसणे बंद झाल्यावर ती वाहिनी बंद पडली कि काय त्यामुळे छातीत क्षणभर धस्स झाले नाही तर या वाहिनीचा मोठा आधार अतिमोठा आदर्श तडफदार वाक्य वाकबगार प्रसाद काथे आम्हाला दिसणार नाही म्हणून मन अस्वस्थ झाले जसे लोकमत किंवा झी वरून उदय निरगुडकर किंवा निखिल वागळे यांच्या अचानक गायब होण्याने आमचे डोके भणाणले होते. अतुल मानसिक धक्क्याने गेला लोकमत मधल्या 750 लोकांना या महामारीत काढल्यानंतर तेही जिवंत असून मेल्यागत झाले आहेत. ज्यांच्या भरवशावर शेठजी कमावून मोकळे झाले आहेत त्यांना त्यांनी चार पाच महिने सांभाळू नये, पुढारी सकाळ दैनिकाने फक्त ४०% वेतन देणे किंवा देशोन्नती सारख्या शेठजींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या दैनिकाने देखील ५०% वेतन देणे म्हणजे वृत्तपत्र मालक किती व कसे हलकट हरामखोर हिडीस असतात त्यावर हि उदाहरणे...

मी एक बघितले आहे कि शासनात जो कोणी असतो ते सारेच वृत्तपत्र मालकांना मीडियाला विनाकारण फार घाबरून असतात त्यातूनच विविध मान्यवर वृत्तपत्रे माहिती आणि जनसंपर्क विभागाला अक्षरश: ब्लॅकमेल करून ज्या दरदिवशी मोठ्या रकमेच्या जाहिराती उकळतात अप्रत्यक्ष अशी वृत्तपत्रे जनतेच्या पैशांची गेली कित्येक वर्षे लूट करताहेत त्याविरोधात आवाज उठविणे किंवा शासनाच्या जाहिरातींसंबंधात शासनाला व जाहिराती लुबाडणार्या वृत्तपत्रांना न्यायालयात खेचणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे, है कोई हिम्मतवाला माय का लाल ? आपले हात बरबटलेले नसतील तर मीडियाला घाबरण्याचे काहीही एक कारण नसते पण या देशातले या राज्यातले सत्तेशी संबंधित जवळपास सारेच खूपच बरबटलेले असल्याने मीडिया विशेषतः विविध वृत्तपत्रे या मंडळींना ब्लॅकमेल करून वर्षानुवर्षे देशाला राज्याला लूट लूट लुटताहेत. ठिकठिकाणी खुबीने आवृत्त्या काढायच्या मोठे खप दाखवायचे व महागड्या शासकीय जाहिराती ढापायच्या वृत्तपत्रांचा हा मोठा खोटा धंदा, त्याविरोधात एकही नेता अधिकारी समाजसेवक मंत्री आमदार खासदार कोणीही बोलायला तयार नाहीत हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कोरोना महामारीत विविध दैनिकांच्या ठिकठिकाणी निघणाऱ्या अनेक आवृत्त्या बंद करण्यात आलेल्या आहेत अत्यंत महत्वाचे म्हणजे नेहमीपेक्षा वृत्तपत्रांचे खप खूपच खाली आलेले आहेत, शासकीय जाहिरातींची मोठी रक्कम हि आवृत्त्या आणि खपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते त्यामुळे आवृत्त्या बंद होणे आणि खप खाली येणे त्यावर आता शासनाने देखील वृत्तपत्रांच्या जाहिरातीच्या रकमेत कपात करणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे कारण शासनाकडे निधीची मोठी अडचण आहेच.... 

www.vikrantjoshi.com

मित्रहो, अजिबात गरज नसतांना विविध वृत्तपत्रांनी ज्यांना काढले त्यातल्या अनेकांनी माझ्याकडे विविध वृत्तपत्रांचे मीडियाचे मालकांचे संपादकांचे जी काय प्रकरणे दिलेली पाठविलेली आहेत ती वाचून मला प्रचंड मानसिक धक्का बसला म्हणजे माझ्याकडे आधी जे पुरावे होते ते अक्षरश: हिमनगाचे टोक होते, बघूया, संधी चालून आली कि असे पुरावे मी नक्की तुमच्यासमोर मांडेन. अलीकडे लोकमत दैनिकाने हे असेच  महाराष्ट्रातून तेही थेट दिल्लीत पाठवलेल्या नितीन नायगावकर या प्रतिनिधीला तडकाफडकी काढून टाकले त्याने आम्हाला जे नेमकी व्यथा सांगणारे पत्र पाठविले आहे ते वाचल्यानंतर हृदय पिळवटून निघते. रडू कोसळते. तो लिहितो, पत्रकारिता बेभरवशाची आहे आणि या क्षेत्रातील नोकरीच्या भरवशावर स्वप्न बघणे आणि कुटुंबाला दाखविणे हा स्वतःवर अन्याय आहे. दहा वीस पन्नास हजार पगार असलेल्यांना नोकरीवरून काढण्याचा सल्ला जे मालकांना देतात ते स्वतः मात्र लाखो रुपयांचे पॅकेजवर ठाण मांडून बसले असतात. असे बिलंदर लाखो कुटुंब उध्वस्त करण्यात विकृत आनंद मानतात. मी वयाने खूप लहान असलो तरीही पत्रकारितेकडे करिअर म्हणून बघण्याची चूक नव्या मुलांनी करू नये. मेहनत करायची तयारी असेल तर अनेक क्षेत्र आहेत इथे मेहनतीच्या भरवशावर नोकऱ्या टिकवता येत नाहीत हेच सत्य आहे. अर्थात नितीन नायगावकर चे ते लांबलचक पत्र येथे संपूर्ण देणे शक्य नाही पुन्हा त्यावर एकदा लिहिता येईल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment