Tuesday, 30 June 2020

नाराज मराठी, निराश मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी


नाराज मराठी, निराश मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
या मास्कमुळे मोठी पंचाईत झाली आहे. अलीकडे एकाने त्याच्या प्रेयसीच्या घराचा पत्ता थेट आपल्या बायकोलाच विचारला विशेष म्हणजे त्यावेळी त्याची बायको तिच्या प्रियकराबरोबर होती पण मास्क लावूनच त्यामुळे ती बाल बाल वाचली. मागच्या पंचवार्षिक योजनेत एकही दिवस नव्हता अशी एकही संधी ज्याला असूयेची दुर्गंधी म्हणा विरोधकांनी सोडली नाही ज्यादिवशी माझ्या पाहण्यातला आजवरच्या केवळ चार दोन सर्वोत्तम सर्वांगसुंदर विचारांच्या प्रजेचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक  फडणवीस यांना मागच्या पंचवार्षिक योजनेत छळले नाही मानसिक त्रास दिला नाही सासुरवास केला नाही. फडणवीस यांची मानसिक कोंडी कुचंबणा अवहेलना करण्यात विरोधक आणि मित्र दोघांतही एकप्रकारे स्पर्धा लागली होती कि फडणवीसांना सर्वाधिक कोण छळून मोकळे होते ते. आणि तेच कालचे वटवट करणारे आज आम्हा साऱ्यांना अक्षरश: ज्यांनी मृत्यूच्या दाढेत आणून ठेवले आहे त्यांना कोणतेही दूषण द्यायला त्यांचे दोष चुका काढायला पुढे येत नाही. पाकिस्थांनची निर्मिती करून त्यावेळेच्या नेत्यांनी जशी कायमस्वरूपी हिंदी मुस्लिम द्वेष अशी जी खोल दरी  निर्माण करून ठेवली आहे ते तसेच येथे आज या राज्यात घडले आहे, फडणवीसांच्या सुविचारांचे नेते आणि इतर असे जातीचे पद्धतशीर गणित महाराष्ट्राची भविष्यातली चिंता केवळ सत्ता मिळविण्याच्या नादात काही दुष्ट नेत्यांनी वाढवून ठेवली आहे मोठी दरी  त्यातून निर्माण झाली आहे ज्यामुळे सुविचारी पण काहीशा दुबळ्या म्हणजे टगेगिरीत मागे असणाऱ्या नेत्यांना लोकांना कार्यकर्त्यांना मतदारांना त्याचा फार मोठा त्रास होणार आहे, मानसिक त्रास वाढत जाणार आहे. भुजबळ आणि ठाकरे यांनी निदान एकदा तरी या राज्यात वाहिन्यांच्या माध्यमातून जनतेला दाखवून द्यावे कि शिवभोजन थाळ्यांचे कंत्राट कोणाला देण्यात आलेले आहे आणि किती थाळ्यांचे कसे वाटप होते ते....

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये फारसा समन्वय नाही आणि येथे या राज्यात ऑडीट नसलेली फार मोठी रक्कम कोविड वर खर्च न होता अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या दलालांच्या मंत्र्यांच्या घरात खरेदीच्या नावाने जाते आहे जमा होते आहे हीच वस्तुस्थिती आहे थोडक्यात या महामारीत देखील सत्तेशी संबंधित संधीसाधू प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मग्न आहेत हीच वस्तुस्थिती आहे, पुन्हा तेच हतबल ठरलेल्या उद्धव ठाकरे यांनी राजाचे सिंहासन सोडून पंतप्रधानकी स्वीकारली आणि तेथेच सारे बिनसले, मी म्हणतो तेच खरे ठरले आहे कि वाघाने शेळीचे कपडे घालायचे नसतात दिलीपकुमारने अलोकनाथच्या अभिनयाची नक्कल करायची नसते मुकेश अंबानीने अंटालिया च्या खाली चहाची टपरी लावून निताबाईंनी भजी तळायची नसतात संदीप जोशींनी तुकाराम मुंडेंवर शिंतोडे उडवायचे नसतात साऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन कुर्निसात करायचा असतो तेथे बसलेल्या सिंहाधिपतीने कधीही इतर क्षुल्लक सिंहासनावर आरूढ व्हायचे नसते, सारेच गणित या राज्याचे बिघडले आहे सेना भाजपा दुराव्यामुळे राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी वाईट असा होत नाही पण कॉम्बिनेशन चुकले सेनाप्रमुख चुकीच्या पंक्तीला जाऊन बसले म्हणजे विहीणबाई त्यांच्या पंक्तीला न बसता बुफेच्या रांगेत जेवणासठी उभ्या आहेत असे ठाकरेंच्या बाबतीत घडले. प्रबोधनकार असोत कि बाळासाहेब आणि उद्धव असोत कि आजचा आदित्य, आम्हा निदान मराठींना तरी हे सहन होणारे नाही कि राजा इतरांसमोर झुकतो आहे म्हणजे उद्धव आणि आदित्य यांनी प्रबोधनकार व बाळासाहेबांची गादी पुढे चालवावी त्यांनी कैकयी होऊन रथाच्या खाली उतरू नये, मोठे नैराश्य मराठी माणसांमध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये या दिवसात पसरलेले आहे... 

www.vikrantjoshi.com

राज्यकर्त्यांच्या जीवघेण्या सत्ता स्पर्धेत विशेषतः आम्ही मुंबई आणि ठाणेकर वस्तुस्थिती सांगतो मृत्यूचे तांडव सहन करतो आहे, कोरोना संपता संपता तुम्ही आम्ही एकमेकांना बघणार तरी आहोत का असे आज या मुंबई टेरेटरी मध्ये भयावह धोकादायक चिंताजनक काळजी करण्यासारखे वातावरण नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयातून निर्माण झाले आहे त्यात केवळ राज्याची नव्हे तर राष्ट्र हाकणाऱयांची पण मोठी चूक आहे, राज्यकर्त्यांनी कोरोना महामारीत घेतलेले चुकीचे निर्णय मित्रांनो एवढेच लक्षात ठेवा आपल्या साऱ्यांचे प्राण कंठाशी आहेत केव्हा कोणाकडे काय घडेल सांगता येत नाही असे बिघडलेले वातावरण या राज्यात विशेषतः मुंबई टेरेटरीमध्ये आहे. काही पुरावे मांडून मला तुम्हाला आणखी आणखी घाबरवून सोडायचे नाही पण एकही क्षण बेसावध न राहता कोरोनाशी आपण स्वतःच मुकाबला करायचा आहे सरकारी सहकार्य तुटपुंजे आहे त्या भरवंशावर फारसे विसंबून न राहता आपणच आता आपले रक्षण करावे. अलीकडे मला काँग्रेसचे एक फार मोठे नेते जे म्हणाले ते ऐकून काँग्रेसच्या मनात गोटात देखील मोठी खदखद आहे जी अधून मधून बाहेर पडत असते किंबहुना या खदखदीचा एक दिवस नक्की स्फोट होणारच आहे. ते म्हणाले आमच्या व सेनेच्या मंत्र्यांची आणि राज्यमंत्र्यांची अवस्था या सरकारमध्ये एखाद्या चपराश्यासारखी झालेली आहे हे राज्य अजोय मेहता व त्यांचे  भोसले छाप साथीदार आणि शरद पवार जे ठरवतील त्यापद्धतीने हाकले जाते आहे जे चित्र अत्यंत निराशजनक आहे पण कोरोना महामारीत उघड विरोध करणे त्यातून आमचे मोठे राजकीय नुकसान होईल म्हणून आम्ही मूग गिळून गप्प बसलो आहोत. माझे त्यावर असे म्हणणे आहे कि निदान शंभर टक्के तरी शरद  पवार अजोय मेहता यांनी कोरोना महामारीत हाती छडी घेऊन हे राज्य हाकावे कारण कोणत्याही संकटात पवार कमी पडणारे नाहीत हे या राज्याने अनेकदा अनुभवलेले आहे आणि मेहता यांची देखील अत्यंत वाकबगार प्रशासकीय अधिकारी म्हणून ख्याती आहे. पवार मेहता कॉम्बिनेशन अजिबात वाईट नाही पण त्या दोघांमध्ये तरी तणावाचे संबंध नसावेत आता निदान त्यांनी आम्हाला वाचवावे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 
Monday, 29 June 2020

विधवा सरनाईक घटस्फोटित गाडगीळ व वांझ पवार : पत्रकार हेमंत जोशी

विधवा सरनाईक घटस्फोटित गाडगीळ व वांझ पवार : पत्रकार हेमंत जोशी 
मित्र म्हणाला या दिवसात मी एवढा घाबरलोय कि प्रेयसीशी किंवा मैत्रिणींशी तेही भ्रमणध्वनीवर बोलतानाही मास्क घालून बोलतो वास्तिवक दोघांच्यामध्ये मोठे अंतर आणि भ्रमणध्वनी असतांना देखील मास्कविना बोलण्याची हिम्मत होत नाही. कोरोना येण्याआधी भारतीय पुरुषांनी विशेषतः मुस्लिमांनी नको त्या अवयवाला मास्क लावला असता तर लोकसंख्या वाढीचे संकट भारतावर कधीही ओढवले नसते. जाऊ द्या लोकसंख्या वाढीचे आपण हिंदूंनी संकट म्हणून न बघता त्याकडे संधी म्हणून बघायला हवे आणि हिंदूंनी अधिकाधिक लोकसंख्या वाढीचे टार्गेट ठेवून त्यापद्धतीने वाटचाल करायला हवी कारण अख्य्या जगात आता हिंदुस्थान तेही नावापुरते एकमेव हिंदुराष्ट्र उरले आहे, नेपाळींना चिन्यांनी केव्हाच लालूच दाखवून त्यांच्या धर्मात आणून ठेवले आहे. जेमतेम नेपाळीच आता कट्टर हिंदू म्हणून उरले आहेत. या देशात या राज्यात आम्हा ब्राम्हणांचे तर पारशी समाजासारखे एक दिवस नक्की होणार आहे, एकापेक्षा अधिक नको हि गांडू संकल्पना ब्राम्हणांना संपवते आहे जे अतिशय वाईट घडते आहे.... 

चार दशके तेही न थांबता सतत राजकीय पत्रकारिता करतांना काही नेत्यांना त्यांच्या आणि माझ्याही मनासारखे यश न मिळाल्याने मला अनेकदा त्याची खंत वाटते म्हणजे अनंत गाडगीळ निदान एकदा तरी मंत्री आणि त्यांच्या पत्नी मेधा या मुख्य सचिव म्हणून निवृत्त व्हायला हवे होते असे वारंवार वाटते. आता तर अनंत गाडगीळ यांची विधान परिषद सदस्य म्हणूनही मुदत संपत आलेली आहे. हि इज असेट टू काँग्रेस पार्टी, प्रचंड अभ्यास स्पष्ट स्वभाव आणि भ्रष्टाचारापासून कोसो दूर, असे नेते अतिशय विरळ असतात किंवा असे नेते फारतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शोभतात पण गाडगीळ काँग्रेस मध्ये आहेत आणि पिढीजात गाडगीळ कुटुंब काँग्रेस आणि गांधी घराण्याशी अतिशय निष्ठा राखून आहे, निदान असे नेते तरी काँग्रेसने विधान परिषदेत अनेकदा रिपीट करायलाच हवे, बघूया काय घडते ते. वाईट तर मला ठाण्यातल्या शिवसेनेच्या कायम आमदारकीला आणि त्या आधी अख्खे कुटुंब नगरसेवक म्हणून निवडून आणणार्या प्रताप सरनाईक यांच्याविषयी पण वाटते. प्रताप यांची अवस्था त्यांच्याच शिवसेनेतल्या काही नेत्यांनी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या विरोधकांनी शत्रूंनी दाट लोकवस्तीच्या मुस्लिम वस्तीत हिंदू मुलीला पळवून नेल्यासारखी करून ठेवली आहे म्हणजे प्रताप यांनी आवाज उठवण्याचा अवकाश एकतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबण्यात येतो किंवा त्यांचे हातपाय बांधून ठेवण्यात येतात....

www.vikrantjoshi.com

प्रताप सरनाईक यांचे एक चांगले आहे कि त्यांना जेव्हा अपमानित करण्यात येते डावलण्यात येते दुर्लक्ष करण्यात येते कमी लेखण्यात किंवा अपमानित करण्यात येते तेव्हा सरनाईक हे तोंडाची वाफ न गमावता विविध कामांवर अधिक जोर देतात आणि सत्कृत्यातून आपण नेता आणि नेतृत्व म्हणून कसे उत्तम मातोश्री वर व विरोधकांना ते दाखवून देतात निदान लोकांमधले मतदारांमधले स्थान तरी ते त्यातून अबाधित राखतात. आणखी दोन अभागी दुर्दैवी कमनशिबी नेत्यांचा येथे मला उल्लेख करायचा आहे त्यापैकी एक आहेत मनसेचे माझे अत्यंत लाडके संदीप देशपांडे आणि भाजपाचे डोंबिवली कल्याण भागातले माजी आमदार नरेंद्र पवार. भाजपाने नरेंद्र पवार यांच्यावर फार मोठा अन्याय केला त्यांना पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळाली नाही ते अपक्ष उभे राहिले, पराभूत झाले पण त्यांनी भाजपाशी आपली नाळ तोडली नाही. नरेंद्र पवार मला वाटते या राज्यातले असे एकमेव पराभूत उमेदवार असावेत जे पराभवानंतर न खचता हताश नाराज निराश न होता थेट दुसरे दिवशीपासून पुनःश्च लोकसेवेला लागले आश्चर्य म्हणजे तेथे आजही निवडून आलेला आमदार  जेवढा लोकसेवेत व्यस्त नसतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी नरेंद्र पवार लोकांसाठी धावून जातात सर्वजनिक कामात आणि उपक्रमात कायम व्यस्त असतात हसतमुख व सकारात्मक राहून मतदारांसाठी विविध उपक्रम राबवून मोकळे होतात त्यातून नक्की भाजपा श्रेष्ठींना कायम खजील झाल्यासरखे नक्की वाटत असेल कि आपण आपल्या सद्गुणी मेहनती पराक्रमी लोकमान्य लोकप्रिय नेत्यावर अन्याय केला आहे. जागेअभावी मित्रवर्य लोकसंग्रही संदीप देशपांडे यांच्यावर येथे लिहिणे शक्य झाले नाही, लवकरच देशपांडे कसे तुम्हाला मला नक्की सांगायचे आहे. 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Saturday, 27 June 2020

दादागिरी आणि काकाजी : पत्रकार हेमंत जोशी


दादागिरी आणि काकाजी : पत्रकार हेमंत जोशी 
सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसेस मध्ये चार मित्र एकत्र आले कि बायका एकत्र जमल्या कि चार टाळकी एकत्र आलीत कि आता सॅनिटायझरचे तंबाखू घुटका माव्यासरखे झाले आहे म्हणजे खिशातून काढायचा अवकाश चार हात लगेच पुढे येतात. विशेषतः भारतीय म्हणे कोरोनामुळे नव्हे तर वाढलेल्या थकलेल्या उधारीमुळे मास्क लावून फिरताहेत. अलीकडे एका मित्राची बायको त्याच्याबरोबर दारावर बसायला म्हणे यासाठी गेली नाही कारण तिला वेळेवर मॅचिंग मास्क सापडला नाही. भारतीय आपल्या गाड्यांच्या मागे काय लिहून मोकळे होतील सांगता येत नाही. सासूची कृपा, काकांचा आशीर्वाद, अमुक देवाची पुण्याई, तमुक बुवा किंवा बाबांचा हात असे काय काय म्हणून आम्ही भारतीय आपापल्या घरांवर गाड्यांवर लिहून मोकळे होतो. उद्या समजा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आपापल्या खुर्च्यांच्या मागे आई किंवा बाबांचा आशीर्वाद अथवा पुण्याई असे लिहायचे ठरविले तर मला वाटते बहुतांश नेत्यांना हे असे लिहून मोकळे व्हावे लागेल कारण आपल्या देशातली हि तर मोठी विकृत मानसिकता आहे कि आधी आपापल्या कुटुंब सदस्यांचे भले करायचे साधायचे त्यातून चुकून उरले तरच इतरांच्या अंगावर भिकारी, किंवा रस्त्यावरच्या कुत्र्यासारखे उरले सुरले भिरकवायचे, मलिदा तेवढा आपल्याला आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलायला...

या दिवसात शरद पवार यांची सर्वाधिक भीती कोणाला वाटते आहे किंवा सर्वाधिक परेशान कोण आहे किंवा सर्वाधिक धास्तावलेला घाबरलेला हादरलेला केविलवाणा कोण असावा असे तुम्हाला वाटते किंवा जळी स्थळी शरद पवार कोणाला एखाद्या चवताळलेल्या वाघासारखे  किंवा भुकेल्या सिंहासारखे दिसत असावेत असे तुम्हाला वाटते. देवेंद्र फडणवीस अजिबात नाहीत, उद्धव ठाकरे दुरदुरपर्यंत नाहीत, जयंत पाटील ते फक्त तसा विनाकारण चेहरा करून फिरतात, दिलीप वळसे पाटील त्यांचा चेहरा तर त्यांच्या मधुचंद्राला पण असाच धास्तावलेला दिसत होता, हेमंत टकले ते तर बोलतांना हसताहेत कि नेमके हुंदके देताहेत हेच कळत नाही, जितेंद्र आव्हाड तो तर गब्बर चा अरे ओ सांभा असल्याने उनको पवारमियाँ का डर नाही लागत है, सुप्रिया सुळे त्या या दिवसात मेकअप शिवाय असल्याने त्यांचा चेहरा असा व्याकुळ ओढलेला थकलेला वाटतो म्हणजे नेमके त्यांच्या कडे बघून वाटते कि नवऱ्याचा चार महिन्यांपासून पगार झालेला नाही आणि उधाऱ्या तर खूप थकलेल्या आहेत. सुनील तटकरे त्यांचा तसाही चेहरा नेहमी मुळव्याध ग्रस्त आणि एखाद्या बाईला नेहमीच्या होणाऱ्या बाळंतपणाने त्रस्त असा दिसतो. छगन भुजबळ ते कायमच लग्नाआधी प्रियकरामुळे पाळी टळल्याच्या मुड मध्ये असतात. जाऊ द्या तुमची उत्सुकता फार ताणून धरत नाही. या दिवसात शरद पवार यांच्यामुळे अशांत अस्वस्थ परेशान डिस्टरब आहेत ते फक्त अजितदादा... 

www.vikrantjoshi.com

जसा कोरोनाचा लॉक डाऊन कालावधी इकडे सुरु झाला तिकडे अजित पवार यांचा थेट जादूगार रघुवीर किंवा गुप्तहेर राजू झाला म्हणजे ते त्यानंतरच्या दिवसात नेमके कुठे आहेत कसे आहेत काय करताहेत हेच कळत नाही. नाही म्हणायला सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना छानपैकी कडेवर घेऊन  नंतर डोक्यावर पण घेतले नंतर असे वाटायला दिसायला लागले कि याच उद्धव यांनी त्यांना आधी डोक्यावर घेऊन कौतुक केले पण लवकरच अजितदादांचा थेट बोळवायला आणलेला गणपती बाप्पा केला. उद्धव यांच्याकडून दादांच्या बाबतीत घडले आहे घडते आहे ते खरे आहे कारण तशा  सूचनाच म्हणे शरद पवार यांनी उद्धव सारख्या संबंधितांना अप्रत्यक्ष दिल्या आहेत कि दादांचे स्तोम महत्व यापुढे फारसे वाढता कामा नये. वास्तविक अजितदादा अतिशय नियमित नेहमीप्रमाणे त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात येऊन बसतात पण त्यांचा आमच्या शाळेतल्या मानस्कर सरांसारखे झाले आहे म्हणजे मानस्कर सर निवृत्तीनंतरही शाळेतल्या टीचर्स रूममध्ये नुसतेच येऊन बसायचे आणि जमलेल्या इतर शिक्षकांचे छान मनोरंजन करमणूक करून मोकळे व्हायचे. हे सारे येथे अर्थात गमतीने घेण्याचे नाही, मॅटर सिरीयस आहे निदान अजितदादांनी अतिशय सिरियसली घेण्यासारखे आहे आणि थेट राजकारणातल्या बलाढ्य काकांशी दोन हात करायचे असतील तर अजितदादांनी जी चूक मागे केली ती निदान यावेळी तरी करू नये, निदान स्टाफ तरी लुच्चा भामटा लफंगा भ्रष्ट हरामखोर नीच असू नये. अशा थर्ड ग्रेड अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना चार हात लांब ठेवावे. चहापेक्षा किटली अधिक गरम असे या पद्धतीने दादांच्या सभोवतालचे कार्यालयातले वागायला लागले आहेत जे धोकादायक वाटते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Thursday, 25 June 2020

जिद्दी आणि हट्टी ठाकरे : पत्रकार हेमंत जोशी

जिद्दी आणि हट्टी ठाकरे : पत्रकार हेमंत जोशी 
बहुसंख्य माणसे मोठी जिद्दी असतात, फायदा तोटा नफा नुकसान बरबादी आबादी इत्यादी विविध परिणाम दुष्परिणामांचा अशी माणसे विचार न करता मनाला येईल किंवा मनात आले तसे वागून मोकळे होतात. आमचा एक पत्रकार मित्र आहे त्याने अगदीच दोन आवश्यक लोकांना सोबतीला नेऊन कोर्ट मॅरेज केले पण पुढे काही महिन्यानंतर एक दिवस अचानक त्याच्या मनात आले कि लग्नाचा दणक्यात स्वागत समारंभ घडवून आणावा वास्तविक तेव्हा त्याची बायको सहा महिन्यांची गरोदर होती तरीही त्याने हेका हट्ट सोडला नाही, बायको ठेंगणी लठ्ठ त्यामुळे पॉट एकदम पुढे आलेले पण त्याने स्वागत समारंभ उरकलाच किंवा लाड आडनावाचा पूर्वी एक वादग्रस्त पत्रकार होता तो तर मुलगी वयात आल्यानंतर हनिमून साजरा करण्यासाठी मुलीसहित काश्मीर ला गेला होता. मला हे आठवले आपल्या मुख्यमंत्र्यांमुळे, तेही असेच जिद्दी आणि कमालीचे हट्टी त्यांच्या जे मनात येते ते करून मोकळे होतात अशावेळी सांगणारे त्यांच्यासमोर हात टेकतात पण उद्धव घेतलेल्या अमुक एखाद्या भूमिकेवरून निर्णयावरून मागे न फिरणारे मागे न हटणारे आहेत म्हणजे त्यांच्या मनात अमुक एक आले कि रश्मीवाहिनी पण हतबल असमर्थ ठरतात. जो विरोध प्रसंगी थेट घरातून मिलिंद नार्वेकर यांना झाला किंवा आजही होतो, काढून टाका असा अनेकांनी जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान बाबतीत उद्धवजींकडे अनेकदा आग्रह धरला, उपयोग अशा अनेकांच्या बाबतीत शून्य टक्के झाला आणि नेमके हे असेच आता अजॉय मेहता यांच्याबाबतीत देखील घडते आहे किंवा घडले आहे... 

मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर मेहता यांना आता थेट सहाव्या माळ्यावर उद्धवजींनी त्यांच्या अगदी शेजारी अजॉय मेहता यांना बसवून घेतले आहे तुम्हाला काय वाटते याआधी मेहता यांचे ऐकू नये त्यांना एवढे अति महत्व देऊ नये म्हणून काय कमी दबाव किंवा लावालाव्या उद्धव यांच्याकडे थेट करण्यात आल्या नाहीत, असे अजिबात नाही याउलट मेहता विरोधातून उद्धव यांच्याकडे त्यांचे महत्व अधिकाधिक वाढत गेले आणि अनेक असंख्य विरोधक हात चोळत बसले, मेहता का त्यांना नको आहेत त्याची अनेक कारणे आहेत पण एकदा का आले उद्धवजींच्या मना तेथे थेट ब्रम्हदेवाचेही चालेना हि अशीच त्यांच्याबाबतीत वस्तुस्थिती आहे. माझे सांगणे कदाचित येथे आगाऊपणाचे ठरेल पण प्रसंगी उद्धव यांना अडचणीच्या ठरणाऱ्या नस्त्या त्यांनी त्या अगदी पवारांच्या मर्जीतल्या असल्या तरी क्लिअर करू नयेत या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना सावध करणाऱ्या मेहता यांना थेट शरद पवार यांचाही या निवृत्तीनंतरच्या नेमणुकीला आणि ते मुख्य सचिव म्हणून देखील विरोध होता पण प्रसंगी उद्धव जेथे रष्मीवहिनी किंवा आदित्य यांच्या सांगण्याला धुडकावून लावतात तेथे पवार यांचे सांगणे आणि ऐकणे फार दूर राहते त्यामुळे मेहता यांच्या निवृत्त होण्याआधीच त्यांच्या निवृत्ती नंतरच्या केबिनचे सहाव्या माळ्यावर तेही अशोक चव्हाणांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने काम सुरु केले होते. फार कमी नेते असे बघायला मिळतात जे चांगल्या वाईट परिणामांची फिकर चिंता पर्वा न करता घेतलेल्या निर्णयांवर ठाम असतात त्यात उद्धव यांचा पहिला नम्बर लागतो....

www.vikrantjoshi.com

1985 नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले राजकारण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्णतः बदलवून व हादरवून सोडले म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात घडायचे असे कि बाप काँग्रेसमध्ये आणि नेत्यांची पुढली पिढी शिवसेनेत महत्वाचे म्हणजे या गदारोळात काँग्रेस नेते घरी  बसले आणि त्यांची मुले तेही शिवसेनेतून पुढे आले अर्थात तेव्हा पवारांचे स्वतंत्र असे अस्तित्व नव्हते त्यांची स्वतंत्र राजकीय पार्टी अस्तित्वातही आली नव्हती. 1980 नंतरची पिढी काँग्रेसपासून फार मोठ्या प्रमाणात दूर गेली त्यातले बहुसंख्य शिवसेनेत गेले पण रथयात्रा आणि भाजपाचे बदललेले धाडसी रूप त्यातून अनेक भाजपामध्ये पण काम करू लागले ज्याचा मोठा फटका राज्यात पवारांच्या नेतृत्वाला व काँग्रेसच्या राजकारणाला नेतृत्वाला देखील बसला. इतर विसरले पण शरद पवारांना हा फटका हा झटका चांगलाच झोंबला होता त्यातून तेव्हापासून त्यांनी पद्धतशीर आखणी करून ती कसर भरून काढली त्यात त्यांनी मुस्लिम मराठा इत्यादी कार्ड्स चा मोठ्या खुबीने उपयोग करून  घेतलाआणि पुन्हा एकदा अनेक वर्षांनी तरुण पिढी पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडे खेचून आणली आकर्षित केली ज्याचा काही प्रमाणात काही ठिकाणी फायदा काँग्रेस पण झाला ज्याकडे मला वाटते उद्धव ठाकरे यांचे निदान आजतरी अजिबात लक्ष नाही त्यांना सध्या मुख्यमंत्रीपद अधिक महत्वाचे वाटते आहे. आजची तरुण पिढी बऱ्यापैकी आपल्यापासून दूर गेली आहे हे भाजपाच्या देखील लक्षात आले आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकवार रा. स्व. संघाच्या माध्यमातून दुरावलेल्या तरुण तरुणींना आपलेसे करण्याचा विशेषतः ब्राम्हणेतर तरुण पिढीत पुन्हा एकवार कुठे मुंढे खडसे दिसतात का त्यावर चाचपणी आणि प्रयत्न सुरु केलेले आहेत... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

गंदा है पर धंदा है : पत्रकार हेमंत जोशी

गंदा है पर धंदा है : पत्रकार हेमंत जोशी 
सलून ओस पडले कारण पार्लर्स चे महत्व वाढले आहे. सलून पेक्षा काय तर जरा उत्तम दर्जा पण त्यासाठी पार्लर्स कितीतरी ज्यादा पैसे वसूल करतात. समजा अमुक एखाद्याला केसांचा कलर करायचा आहे त्यासाठी तो घरून शॅम्पू करून गेला तरी त्यांना चालत नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या दिवशी ग्राहक केस कलर करतो त्यादिवशी म्हणजे केस कलर केल्यानंतर ते लगेच नव्हे तर दुसरे दिवशी शॅम्पू लावायचा असतो कलर केल्यानंतर केस केवळ पाण्याने धुवायचे असतात पण पार्लर्स लुटायलाच बसले असल्याने ते लगेच शॅम्पू करून मोकळे होतात ज्यामुळे वास्तविक केसांचा कलर ज्यादा टिकत नाही ग्राहकाला पुन्हा लगेच काही दिवसात पार्लरमध्ये जावे लागते आणि हे सिक्रेट मला एका पार्लर चालविणाऱ्यानेच सांगितले आहे. बोलायचे झाल्यास न्हावी समाज केस कर्तनालयापासून दूर जातो आहे आणि न्हावी नसलेलेच हजामत करायला लागले आहेत. उद्या ते कसाई पण होतील काहीच सांगता येत नाही....

पूर्वी कुठे हो होते हे पार्लर चे फॅड तरीही आमचे शिक्षक एखाद्या हिरोसारखे दिसायचे कि, म्हणजे आमचे कोल्हटकर सर खलनायक मनमोहन सारखे दिसायचे सुरेश कुलकर्णी सरांना आम्ही जॉय मुखर्जी तर गोविंद देशपांडे सरांना विश्वजीत तर दूरदूरपर्यंत हि मंडळी सेम टू सेम नसायची तरी माझ्या वडिलांना विद्यार्थी दिलीपकुमार म्हणायचे. हे असे केवळ त्या त्या शिक्षकांच्या हेअर स्टाईल वरून म्हटल्या जायचे. माझ्या वर्गातली जी मुलगी मला साक्षात आशा पारेख आणि आणखी एक मुलगी थेट झीनत अमान वाटायची, आज त्या मुलींना तुम्ही चुकून बघितले तर मला नक्की एखाद्या झाडाला बांधून पोकळ बांबूचे फटके द्याल. तुम्हाला तर मी हे सांगितलेच आहे कि माझ्या ओळखीचे एक शासकीय अधिकारी बायकोला जवळ घेतल्यानंतर म्हणायचे कि मला तुझ्यात शेजारच्या इमारती मधली मिसेस साळुंखे दिसते मग त्यांची बायको पण एक दिवस त्यांना म्हणाली कि मला पण तुमच्यात हेमंत जोशी दिसतो. एक सूचना तर तुम्हाला विशेषतः चावट पुरुषांना मी कायम करत आलोय कि तुम्ही फेस बुक वर टाकलेल्या फोटोंवर फिदा होऊन एखादीच्या मागे लागू नका फजिती हमखास होते...

जी फेस बुक वर साक्षात दीक्षितांच्या माधुरीसरखी वाटते दिसते प्रत्यक्षात तिच्यापेक्षा एखादी युगांडाची मुलगी बरी म्हणायची वेळ तुमच्यावर नक्की येते. माझा एक मित्र जुहू चौपाटीवर फिरतांना एक दिवस अचानक पळायला लागला काय तर त्याला पुढे पळणारी तरुणी खूप खूप देखणी चिकणी आणि एकदम षोडशा असावी असे वाटले. याला धाप लागली तरी हा पळत होता शेवटी त्याने तिला गाठलेच, मित्रहो येथे नाव सांगत नाही पण ती पाठमोरी सेक्सी खूबसूरत वाटणारी किशोरी चक्क जख्खड म्हातारी आणि एके काळची मराठी  सिनेमातली गाजलेली नटी निघाली जी म्हाताऱ्या पण आडदांड नवऱ्याला कायम घेऊन वॉकला येत असते. आमच्या सांताक्रूझ परिसरात रात्रीच्या अंधारात त्या पवन हंस जवळ हिडीस मेकअप आणि उत्तान कपडे घालून काही बायका उभ्या राहतात, पिणारे पुरुष त्यांना रात्री एकदा  का झिंगले कि पिकअप करतात,  उतरल्यानंतर आणि खिशातले पैसे काढून घेतल्यानंतर या आंबट शौकिनांच्या ते लक्षात येते कि स्त्रीवेषातले तेही पुरुषच असतात, मग काय, सारे लुटल्यानंतर ग्राहक आल्या पावली आरडा ओरड करत अक्षरश: पळत सुटतात. कशाला म्हणून अशा सवयी लावून घ्यायच्या आम्ही पुरुषांनी...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Tuesday, 23 June 2020

Jaane Bhi Do Mehta ji....


Jaane Bhi Do Mehta ji....

There is a joke doing the rounds. Looking at the way CS Ajoy Mehta is transferring IAS officers around, heard Thackrey, Pawar & Thorat have re-looked into their agreement of formation of MVA government. Some of them are doubting that if Ajoy Mehta finds any discrepancy, only he has the power to bring down this MVA government 😜 ...

But will this power be restricted or remains the same after June 30th, (his retirement date) or will it be even MORE if he comes in the CMO with a "PA" (Principal Advisor) tag? Time will say and what order and powers does CM Uddhav Thackeray confer upon Mr. Mehta. If he gets Principal Advisor with a cabinet rank, will the new CS report to PA Ajoy Mehta & then the file goes to the CM or will it be some other way? Everything now depends on what CM Thackeray has in his mind. But what I know Mehta, he will just not accept anything 'meaningless' coming his way. It has to be bigger than what he is doing now & more importantly, it has to be result oriented!

It came as a big surprise as to why so many Municipal Commissioners were transferred in such a haste.  Mumbai, Thane, Navi Mumbai, Bhiwandi, Mira Bhayander and so on....Observe closely friends! Majority of all the officers transferred from these MC posts, 'promotee' officers have been kept in mind. CS Ajoy Mehta is a man of principals. He does not believe in state cadre being able to run the show with equal zest the way direct recruits do. My guess says, he feels Promotee's have seen everything right from being a Deputy Collector to being IAS today, and majority of them have already milked the system enough. They are influenced easily by the politicians and vice-versa and also they are known to everyone since day 1. This might be a reason playing on Mehta's mind, when he shunted all of these pormotee's. As for direct recruit, couldn't come to a conclusion. ACS Pravin Pardeshi, we all know Mehta didn't share the vibe with him, and as far as Vijay Singhal goes, it's better to remain silent. Vijay, once a favourite of Mehta and today Mehta is so angry that he has gone against the wishes of Aaditya Thackeray too by transferring Vijay Singhal. Again, then I see the names of Collectors posted in the same MMR where Municipal Commissioner's were transferred. Majority of them are Promotee's. Mumbai (both Suburban & Greater), Thane and so on...Hence, the mystery continues....

www.vikrantjoshi.com

The transfer of Manisha Verma to Filmcity from the 'famous' and 'ready to be milked' Tribal Department did come as a surprise. But then, why am I forgetting this is department where 'dalaal's' run the show! I mean, Verma was doing such a fabulous job, but the Jadhav's & others wanted a change in face, it seems. (From Fabulous Job, I meant, nowadays many bureaucrats believe in self promotion of their works on social media when so called mainstream Media is only interested in "scams" and "scandalous" news from them). But, now life will not be easy for Vinita Singhal, the new Tribal boss. There were some strong oppositions to her name from the beginning-- from the top! Singhal also shouldn't forget Verma is in good books of many ACS's too. But then what was the reason of Verma's transfer? My source, says, just meet the Minister. So it is said, K C Padvi was so infuriated with Verma, that he made her transfer a prestige issue with both Ashok Chavan & Balasaheb Thorat who then went to the CM and got it done. Heard one or two dalaal's and biggest suppliers of this department did accompany too...Now waiting for some "Express" news as the reporter was doing the rounds of the floor on the day of Verma's transfer. 

In all of this, if an if Mehta gets promoted to the CMO with Cabinet rank, what happens to senior IAS officers like Ashish Kumar Singh & Vikas Kharge? Any which ways, heard their power and their works have been restricted to that of an ordinary PA since the time they have resumed office at the CMO. And now if Mehta comes here, I'm worried, unkaa "Gagrani" naa ho jaye...

Also, I feel this government is acting a bit tough on some good IAS officers. OK, in IAS there is a very stupid rule, that you won't get your salary if you are not posted anywhere. But this government, ACS Sitaram Kunte fought for it in the Cabinet and now any IAS officers will get paid even if they aren't posted anywhere. BTW, in this battle Rajiv Jalota who wasn't posted anywhere since months had to forego his salary. Now after the new rule, he might get the arrears, but ultimately he will have to forego some part. A punishment for an upright officer, who does not have any other avenues to sustain like others....

The number in 'restless' souls in IAS is showing an upward trend in the bureaucracy of Maharshtra against CS Ajoy Mehta. If you ask me personally, he is a great officer. A go-getter! But, but, but...he has taken some calls which weren't appreciated by 99% , he has some strong opposition in IAS/IPS lobby and the Congress & NCP , yet, even today his call is final. CM Uddhav Thackeray just cannot function without him. A man who has retired 6 months ago, who himself is on extension, now if he goes, should leave with everyone praising him and not "bitching" behind him...I know, many calls what Mehta has taken might be great in the longer term, but at the end this is no anarchy, sir ! Every officer, big or small, is living in fear, which is not good especially during these testing times when bureaucracy should have been united! 
Hence the title sir, "Jaane Bhi Do Mehta ji...."

Last but not the least--the PWD debacle of Rs. 350 crore tender is back to haunt the Government...Be careful, Mr. Manoj Saunik!!! You might be made a scapegoat here....Next CS? Heart says Kunte or Pardeshi but 'my business' mind says Sanjay Kumar. 

Vikrant Hemant Joshi 
Monday, 22 June 2020

फीर एक बार शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी


Felt like sharing a very important information:

There has been demolition going on the 6th floor of Mantralaya right next to CM's cabin. No, not to accommodate Aaditya! It is made to make a huge cabin for a soon to be appointed PA. 'PA' can be Principal Advisor or a Private Assistant!! But we all know who the Private Assistant of CM Uddhav Thackeray is....Now, no price for guessing who will be taking this post with Cabinet status very soon...

Vikrant Joshi.

फीर एक बार शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी 
 जे करतो तेच सांगतो, या दिवसात मी जे करतो आहे ते तुम्हीही करा.वाचकहो, दररोज काही ओळखीच्यांना मित्रमैत्रिणींना फोन करून फोन वरून खुशाली विचारत चला, या दिवसात ज्याला त्याला प्रत्येकाला कदाचित आर्थिक नसेल पण मानसिक आधार देण्याची नितांत गरज आहे, फोन करणे जमत नसेल साधा मेसेज करा पण ओळखीच्यांना त्याची खुशाली विचारा, त्यातून कोणीतरी आपल्या पाठीशी आहे अशी भावना निर्माण होते आणि आलेले येणारे नैराश्य दूर पळून जाण्यास त्यातून आपली इतरांना मदत होते. अगदी अलीकडे काँग्रेसच्या डॉ. गजानन देसाई यांचा फोन आला होता तेव्हा मला कळले कि आमच्याच ग्रुप मधले एक मित्र जितेंद्र गोस्वामी एक दीड महिन्यापूर्वीच गेले, तसे ते अपघातानंतर वर्षे दीड वर्षे विकलांग अवस्थेत अंथरुणावरच पडून होते आता गेले. मित्र वर्तुळातील एक जातो आणि आपल्या कळत नाही हे असे सध्या खूप होते आहे अलीकडे पितृतुल्य वसंतराव कुलकर्णी गेले त्यांच्या अंत्यदर्शनाला ना मला जाता आले ना त्यांच्या पोटच्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला आपल्या अत्यंत लाडक्या बापाच्या अखेरच्या दर्शनासाठी, सारेच कठीण होऊन बसले आहे, दुष्ट चिन्यांनी शेवटी डाव साधलाच पण आपण भारतीय अजूनही निर्लज्ज आहोत चिनी उत्पादने सोडायला तयार नाही, प्रत्येकाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा... 

कोण होते जितेंद्र गोस्वामी आणि कोण आहेत डॉ. गजानन देसाई. सुरुवात शरद पवारांपासूनच करूया म्हणजे या दोघांविषयी सांगणे सोपे जाईल. शरद पवार यांचे वागणे किंवा जवळच्यांना खुश करणे तिरुपतीच्या न्हाव्यांसारखे आहे, तिरुपतीचे न्हावी अनेक ग्राहकांना एकाच रांगेत आधी बसवतात मग प्रत्येक ग्राहकाची अर्धी अर्धी भादरवुन ठेवतात त्यातून ग्राहकाला आनंद होतो कि मेरा नंबर आ गया पण त्याला तेथून धड उठताही येत नाही कारण अर्धीच भादरवुन ठेवलेली असते.म्हणजे ग्राहक कंटाळून उठून बाहेर समजा पडले तर हास्यास्पद तेच ठरते कापणारा नाही त्यामुळे वाट पाहत बसण्यापलीकडे त्या ग्राहकाच्या काहीही हाती उरलेले नसते. अमुक एखादा जेव्हा राज्याच्या राजकारणात झिरो असतो पण पुढे जाण्यासाठी जेव्हा धडपडत असतो एकदा का तो पवारांच्या नजरेत पडला कि झाला त्याचा तिरुपतीचा केस कापून घेणारा ग्राहक. म्हणजे शरण आलेल्याला त्यांच्या राजकीय कळपात सामील झालेल्याला पवार नक्की आर्थिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या मोठे करतात पण त्या नेत्याला कार्यकर्त्याला त्याच्या जे मनात असते ते मिळवून देतांना त्याची अवस्था तिरुपतीच्या केस कापून घेणाऱ्या ग्राहकांसारखी करून ठेवतात जे नेमके डॉ. गजानन देसाई किंवा दिवंगत जितेंद्र गोस्वामी किंवा बाप्पा सावंत दिनकर तावडे दिवंगत गोविंदराव आदिक इत्यादी बहुतेक साऱ्यांचे झाले. असाच एक अस्वस्थ पवारप्रेमी जितेंद्र गोस्वामी म्हणाल तर आर्थिक सुबत्ता पण म्हणाल तर भंगलेली राजकीय अँबिशन येथेच सोडून गेला, आमच्या या मित्राला श्रद्धांजली वाहतो व पुढल्या लिखाणाला लागतो....

www.vikrantjoshi.com

सांगलीचे  जयंत पाटील आज देखील गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना कानात जाऊन सांगा वाट पहा म्हणून. यात नेमकी चूक कोणाची तर पवारांची नक्की नाही. घाई त्या त्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नडते. जे चतुर असतात ते शांत राहतात आणि आपला जितेंद्र आव्हाड करून घेतात मोठा राजकीय आर्थिक सामाजिक साराच मोठा फायदा करून घेतात, घाई करणाऱ्यांचा अजितदादा होतो कारण मी तर तुम्हाला आधीच सांगितले आहे कि पवारांच्या पुढून कधीही जायचे नसते त्यांना राजकारणात कधीही ओव्हर टेक अजिबात करायचे नसते, आहे तेथेच थांबायचे असते अन्यथा पवार अशावेळी जाम चिडतात त्यांचा सिनेमातला संतापलेला चिडलेला रागावलेला धर्मेंद्र होतो आणि ते ज्याच्यावर चिडले त्याचा भास्कर जाधव बबनराव पाचपुते करून मोकळे होतात. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात स्वतःला चोवीस तास झोकून दिले तरच तुम्हाला त्या त्या क्षेत्रातले राजा होता येते पवार यांचे असेच सतत या वयातही झोकून देणे आहे त्यांच्यानंतर हे असे एवढे झोकून देणे मी देवेंद्र फडणवीसांचे बघितले आहे त्यामुळे आजही राज्यातल्या सर्वाधिक बातम्या आणि चर्चा फडणविसांच्याच असतात. शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस असे फार कमी राजकारणातले सत्तेत, नसले तरी सुपर स्टार ठरलेले आहेत. दिवंगत जितेंद्र गोस्वामी असतील, नागपूरचे गिरीश गांधी किंवा त्यांच्यातलेच अनेक डॉ. देसाई यांच्यासारखे ज्यांना पवारांनी मोठी ताकद सर्वार्थाने दिली पण त्यांचा तिरुपतीचा केस कापून घेणारा ग्राहक करून ठेवला त्यातले मग काही शरद पवार यांच्यावर चिडले आणि त्यांच्यातून बाहेर पडले पण पुढे त्यातले कोणीही मोठे झाले नाही त्यापेक्षा ते जेथे होते तेथेच त्यांनी पवारांना घट्ट बिलगून मस्त चिपकून राहायला हवे होते फायदा कदाचित झाला नसता म्हणजे स्वप्नपूर्ती कदाचित झालीही नसती पण राजकीय आर्थिक नुकसान मात्र टळले असते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Saturday, 20 June 2020

बायकांनो बिघडू नका : पत्रकार हेमंत जोशी


बायकांनो बिघडू नका : पत्रकार हेमंत जोशी 
आमच्या कुटुंबात एक ओळखीची विवाहित गुजराथी तरुणी आहे ती उत्तम फॅशन डिझाइनर आहे याच व्यवसायात तिचे उत्तम भागायचे पण कोरोना महामारीत व्यवसाय करणाऱ्या बहुतेकांची जशी धूळधाण उडाली आहे त्यातून बहुतेकांची चांगलीच फाटली आहे तिचेही नेमके तेच झाले व्यवसाय पूर्ण ठप्प झाला पण ती हिम्मत हरली नाही तिने या तीन महिन्यात शांत न बसता घाबरून न जाता फूड इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकले, मला एक चांगली सवय आहे, मी मुंबई पुणे महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही गेलो तर त्या त्या ठिकाणची उत्तम लोणची शोधून काढतो आणि विकत घेतो, कधी एखाद्या सुग्रण कुटुंबात गेलो तर तेथून निघतांना त्यांच्या घरी तयार केलेली लोणची मुद्दाम पॅक करून घेतो, वृत्तीने आणि जातीने भटजी वरून पत्रकार आहे त्यामुळे दारूच्या बाटलीऐवजी लोणचे मागतांना मला मागायला लाज वाटत नाही थोडक्यात आजतागायत मी अनेक उत्तमोत्तम लोणच्याचा स्वाद घेतला असेल पण अलीकडे आमच्या या गुजराथी तरुण स्त्रीने सॅम्पल म्हणून पाठवलेले लोणचे, तुम्हाला म्हणून सांगतो, आजपर्यंत एवढे अप्रतिम स्वादिष्ट चवदार लोणचे माझ्या खाण्यात आलेले नाही, मुलाचे पाय पाण्यात, ती या क्षेत्रात देखील नक्की यशस्वी होईल आणि कुटुंबाला पुन्हा हातभार लावेल....

कोरोना महामारीत अनेक विशेषतः मराठी कुटुंब रस्त्यावर येणार आहेत कारण अनेकांना व्यवसाय फटका बसला आहे बसणार आहे तर कित्येकांच्या नोकऱ्या जाणार आहेत पण हे संकट म्हणजे चालून आलेली संधी म्हणून त्याकडे बघा आणि हसत खेळत नवीन काहीतरी सुरु करून त्यातही मोठे व्हा यश संपादन करा विशेषतः तरुण मराठी स्त्रियांनी या आर्थिक मंदीच्या संकटात आपला पाय घसरणार नाही याची मोठी काळजी घ्यावी कारण आमच्यातले विकृत तुमच्या मजबुरीकडे बारीक लक्ष ठेऊन आहेत, महत्वाचे म्हणजे ज्यांना मजबूर स्त्रियांचे शरीर हवे असते त्यांना अशा तरुण स्त्रियांसाठी नक्की काहीही करायचे नसते मदत सहकार्य करण्याचा विकृतांचा केवळ एक बहाणा असतो. यापुढे एकाचवेळी उत्पन्नाची अनेक साधने हि संकल्पना ध्यानात घेऊन ठेवूनच मराठी कुटुंबांना नोकरीत किंवा व्यवसायात राहायचे जगायचे आहे हे यापुढे साऱ्यांनी पाठ करून ठेवावे, म्हणजे कठीण प्रसंगातही आपले आर्थिक गणित फारसे बिघडणार नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे व्यवसाय बुडाला किंवा नोकरी गेली म्हणून विशेषतः मराठी तरुण जोडप्यांनी व्यसनांना जवळ करून आपले उर्वरित आयुष्य उध्वस्त करून घेऊ नये, तुम्हाला बिघडवायला माणसे आतुर असतात कृपया अशा मंडळींपासून चार हात लांब राहा आणि हिम्मतीने कामाला लागा... 

www.vikrantjoshi.com

भले भले कोरोना महामारीनंतर पूर्णतः बदलले दिसतील विशेषतः हिम्मत न हरता तुमचे आमचे अनेक मित्र उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी नक्की काहीतरी चांगले करतील म्हणजे उद्या उदय तानपाठक मुलुंड चेक नाक्यावर बुढीके बाल विकतांना दिसेल किंवा कैलास म्हापदी टेंभी नाक्यावर खारे शेंगदाणे विकतांना दिसू शकतो किंवा मंदार फणसे चार घरी जाऊन इंदोरी साड्या घ्या म्हणून आग्रह करतांना दिसेल किंवा आशिष मोहदरकर पुण्यातल्या पान टपऱ्यांवर जाऊन कंडोमचे प्रमोशन करतांना दिसेल किंवा प्रल्हाद जाधव कुठेतरी चायनीज ची गाडी लावून नूडलस करतांना दिसतील किंवा भली भली माणसे एखाद्या मॉल मध्ये मॉलिश तेलाचे प्रमोशन करतांना दिसतील किंवा एखाद्या  मेडिकल स्टोअर्स बाहेर उभे राहून गर्भनिरोधक गोळ्या विकतांना दिसतील अगदी सुकृत खांडेकर पण तुम्हाला माहीमला सुके बोंबील विकतांना दिसू शकतात. मित्रहो, कदाचित माझीही एखाद्या नाक्यावर कॉफीची टपरी असेल आणि माझ्या शेजारी माझा पत्रकार भाऊ भजी तळताना दिसेल, या महामारीत काहीही घडू शकते अगदी टीना आणि अनिल अंबानी तुम्हाला हातगाडीवर भाजी विकतांना दिसू शकतात पण तुम्हाला हेच सांगायचे आहे कि आयुष्याच्या अखेरच्या श्वासापार्यंत हिम्मत हरायची नसते, मार्ग शोधून परिस्थितीवर मात करून पुढे पुढे जायचे सरकायचे असते. कोरोना महामारी मध्ये आधी आपला जीव वाचणे महत्वाचे आहे कारण राज्य सरकारला हि परिस्थिती फारशी सांभाळता आलेली नाही त्यामुळे वातावरण गंभीर आहे उद्या प्रेत ठेवायला जागा नाही असे बोर्ड लागलेले तुम्हाला दिसलेत तर  त्यात फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Wednesday, 17 June 2020

मीडियाची ऐसीतैसी : पत्रकार हेमंत जोशी


मीडियाची ऐसीतैसी : पत्रकार हेमंत जोशी 
महाराष्ट्र टाइम्सचा अतुल आंबेरकर अचानक गेला, अलीकडे वृत्तपत्रातून अनेकांना तडकाफडकी कोरोना महामारीत काढल्या जाते आहे अशा काढणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असल्याचे अतुलला कळले असावे म्हणून त्याला हा धक्का सहन झाला नाही का त्यावर अर्थात पत्रकार सुशील आंबेरकर व्यापक सांगू बोलू शकतील. ज्यांच्या भरवशावर आपण मोठे झालो गब्बर झालो त्याच स्टाफला मीडिया मालक अशी रांडेची ट्रीटमेंट देतात कारण त्यांना एक काढला तर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आमच्याकडे जय महाराष्ट्र हि बातम्या देणारी वाहिनी दिसणे बंद झाल्यावर ती वाहिनी बंद पडली कि काय त्यामुळे छातीत क्षणभर धस्स झाले नाही तर या वाहिनीचा मोठा आधार अतिमोठा आदर्श तडफदार वाक्य वाकबगार प्रसाद काथे आम्हाला दिसणार नाही म्हणून मन अस्वस्थ झाले जसे लोकमत किंवा झी वरून उदय निरगुडकर किंवा निखिल वागळे यांच्या अचानक गायब होण्याने आमचे डोके भणाणले होते. अतुल मानसिक धक्क्याने गेला लोकमत मधल्या 750 लोकांना या महामारीत काढल्यानंतर तेही जिवंत असून मेल्यागत झाले आहेत. ज्यांच्या भरवशावर शेठजी कमावून मोकळे झाले आहेत त्यांना त्यांनी चार पाच महिने सांभाळू नये, पुढारी सकाळ दैनिकाने फक्त ४०% वेतन देणे किंवा देशोन्नती सारख्या शेठजींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या दैनिकाने देखील ५०% वेतन देणे म्हणजे वृत्तपत्र मालक किती व कसे हलकट हरामखोर हिडीस असतात त्यावर हि उदाहरणे...

मी एक बघितले आहे कि शासनात जो कोणी असतो ते सारेच वृत्तपत्र मालकांना मीडियाला विनाकारण फार घाबरून असतात त्यातूनच विविध मान्यवर वृत्तपत्रे माहिती आणि जनसंपर्क विभागाला अक्षरश: ब्लॅकमेल करून ज्या दरदिवशी मोठ्या रकमेच्या जाहिराती उकळतात अप्रत्यक्ष अशी वृत्तपत्रे जनतेच्या पैशांची गेली कित्येक वर्षे लूट करताहेत त्याविरोधात आवाज उठविणे किंवा शासनाच्या जाहिरातींसंबंधात शासनाला व जाहिराती लुबाडणार्या वृत्तपत्रांना न्यायालयात खेचणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे, है कोई हिम्मतवाला माय का लाल ? आपले हात बरबटलेले नसतील तर मीडियाला घाबरण्याचे काहीही एक कारण नसते पण या देशातले या राज्यातले सत्तेशी संबंधित जवळपास सारेच खूपच बरबटलेले असल्याने मीडिया विशेषतः विविध वृत्तपत्रे या मंडळींना ब्लॅकमेल करून वर्षानुवर्षे देशाला राज्याला लूट लूट लुटताहेत. ठिकठिकाणी खुबीने आवृत्त्या काढायच्या मोठे खप दाखवायचे व महागड्या शासकीय जाहिराती ढापायच्या वृत्तपत्रांचा हा मोठा खोटा धंदा, त्याविरोधात एकही नेता अधिकारी समाजसेवक मंत्री आमदार खासदार कोणीही बोलायला तयार नाहीत हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कोरोना महामारीत विविध दैनिकांच्या ठिकठिकाणी निघणाऱ्या अनेक आवृत्त्या बंद करण्यात आलेल्या आहेत अत्यंत महत्वाचे म्हणजे नेहमीपेक्षा वृत्तपत्रांचे खप खूपच खाली आलेले आहेत, शासकीय जाहिरातींची मोठी रक्कम हि आवृत्त्या आणि खपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते त्यामुळे आवृत्त्या बंद होणे आणि खप खाली येणे त्यावर आता शासनाने देखील वृत्तपत्रांच्या जाहिरातीच्या रकमेत कपात करणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे कारण शासनाकडे निधीची मोठी अडचण आहेच.... 

www.vikrantjoshi.com

मित्रहो, अजिबात गरज नसतांना विविध वृत्तपत्रांनी ज्यांना काढले त्यातल्या अनेकांनी माझ्याकडे विविध वृत्तपत्रांचे मीडियाचे मालकांचे संपादकांचे जी काय प्रकरणे दिलेली पाठविलेली आहेत ती वाचून मला प्रचंड मानसिक धक्का बसला म्हणजे माझ्याकडे आधी जे पुरावे होते ते अक्षरश: हिमनगाचे टोक होते, बघूया, संधी चालून आली कि असे पुरावे मी नक्की तुमच्यासमोर मांडेन. अलीकडे लोकमत दैनिकाने हे असेच  महाराष्ट्रातून तेही थेट दिल्लीत पाठवलेल्या नितीन नायगावकर या प्रतिनिधीला तडकाफडकी काढून टाकले त्याने आम्हाला जे नेमकी व्यथा सांगणारे पत्र पाठविले आहे ते वाचल्यानंतर हृदय पिळवटून निघते. रडू कोसळते. तो लिहितो, पत्रकारिता बेभरवशाची आहे आणि या क्षेत्रातील नोकरीच्या भरवशावर स्वप्न बघणे आणि कुटुंबाला दाखविणे हा स्वतःवर अन्याय आहे. दहा वीस पन्नास हजार पगार असलेल्यांना नोकरीवरून काढण्याचा सल्ला जे मालकांना देतात ते स्वतः मात्र लाखो रुपयांचे पॅकेजवर ठाण मांडून बसले असतात. असे बिलंदर लाखो कुटुंब उध्वस्त करण्यात विकृत आनंद मानतात. मी वयाने खूप लहान असलो तरीही पत्रकारितेकडे करिअर म्हणून बघण्याची चूक नव्या मुलांनी करू नये. मेहनत करायची तयारी असेल तर अनेक क्षेत्र आहेत इथे मेहनतीच्या भरवशावर नोकऱ्या टिकवता येत नाहीत हेच सत्य आहे. अर्थात नितीन नायगावकर चे ते लांबलचक पत्र येथे संपूर्ण देणे शक्य नाही पुन्हा त्यावर एकदा लिहिता येईल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Tuesday, 16 June 2020

सुशांत सिंग राजपूत : पत्रकार हेमंत जोशी

सुशांत सिंग राजपूत :  पत्रकार हेमंत जोशी 
देशात सर्वाधिक अमली पदार्थांचे सेवन करणारे म्हणे पंजाब मध्ये सर्वाधिक आहेत आणि ज्या पंचकुला या चंदिगढ जवळील शहरात हे प्रमाण फार मोठे आहे त्याच पंचकुला मध्ये सुशांत सिंग राजपूत आपल्या सख्ख्या मोठ्या बहिणीकडे शिकायला होता, अतिशय बुद्धिमान पण नको त्या वाईट सवयी त्याला लहान वयात लागल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला, उडता पंजाब हा सिनेमा अमली पदार्थांचे सेवन त्यावर कथानक आधारलेले होते आणि चंदिगढ पंचकुला हे तर अमली पदार्थांच्या अमलाखाली गेलेल्या लोकांचे बदनाम असे परिसर ठरले आहेत. मुंबई आणि पुणे हे जवळपास चंदिगढ सारखीच व्यसनी मुला मुलींची शहरे आहेत त्यामुळे आपल्या मुलांना मुलींना पुण्यात शिकायला ठेवतांना शंभर वेळा विचार करावा. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या किंवा पब संस्कृतीच्या आहारी गेलेल्या जाणाऱ्या पिढीचा मृत्यू असाच कायम विदारक असतो. अलीकडे एक नेता कोरोना मधून केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचला कारण डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते कि या नेत्याला वाचविणे तसे मुश्किल आहे कारण हे महाशय ड्रॅगच्या अमलाखाली असणारे पेशंट आहेत आणि हे तर मला माहित असतेच कि कोण अधिकारी कोण मंत्री किंवा कोणते आमदार खासदार मंत्री व्हायग्रा घेतात किंवा अमली पदार्थांचे सतत सेवन करतात. नेत्यांचे मोठ्यांचे अधिकाऱ्यांचे मुले व मुली अमली पदार्थांच्या अमलाखाली जाणे हे तर अलिकडल्या काळात अतिशय कॉमन असा प्रकार आहे....

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या करण्याने आपण सारे हळहळलो, झाले ते अतिशय वाईट घडले, पण अमली पदार्थांच्या आहारी गेल्यानेच हे घडले आहे किंबहुना अलीकडे अमुक एखाद्या पार्टीमध्ये जाऊन आधी अति मद्यपान किंवा ड्रग्स घेऊन गोंधळ घालणे नंतर सुशांतला त्या पार्टीतून बाहेर काढणे हा आमच्या फिल्मी परिसरातला नित्याचाच प्रकार झाला होता आणि एकदा का व्यसनी लोकांना इतर चांगली माणसे टाळायला लागलीत कि त्याचे नैराश्य वाढत जाते आणि परिणाम मृत्यू आत्महत्या वेड लागणे अशा प्रकारात परिवर्तित होतो. जेव्हा केव्हा मी या अशा वातावरणाविषयी घरी विषय काढतो तेव्हा दोन्हीही मुलांना नेमके हेच सांगतो कि आपण तोतरे बोललो कि जशी लहान मुले तोतरे बोलतात तसे व्यसनांचे असते. आपल्याला उगाचच वाटते कि मुले लहान आहेत त्यांना काय समजते पण एक लक्षात ठेवा मूल एकदा पाच वर्षांचे झाले कि त्याला सारे समजायला लागते त्यामुळे रात्री पार्ट्या करून झिंगत येणारे मायबाप अप्रत्यक्ष आपल्या पुढल्या पिढीला हमखास बिघडवत असतात. सुशांत सिंग राजपूत तर व्यसनांच्या आणि त्यातून आलेल्या नैराश्येच्या एवढ्या गर्तेत सापडला होता कि तो रात्री किंवा दिवसा केव्हातरी केवळ दोन तास झोपत असे. थोडक्यात इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो, अमली पदार्थांसारखी व्यसनेच तरुण पिढीला संपवत असतात म्हणून तरुण होणाऱ्या पिढीसमोर मायबापांनी अतिशय संयम पाळणे गरजेचे असते... 

www.vikrantjoshi.com

सुशांत सिंग राजपूत याने आत्महत्या केली कि तो एक खून आहे हे सिद्ध होण्याआधीच मीडियाने विशेषतः बातम्या देणाऱ्या साऱ्याच वाहिन्यांनी जो काय अभूतपूर्व गोंधळ घालून टिआरपी वाढविण्या आटापिटा केला ते बघून ऐकून किळस आली ओकारी आली. वास्तविक असे प्रकार लोकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्या द्यावयाची शिक्षणाची जणू संधी आहे त्यापद्धतीने वृत्तांकन वाहिन्यांनी करायला हवे ते करायचे सोडून सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू अधिक सनसनाटी कसा करून दाखवता येईल त्याकडेच सार्या वाहिन्यांनी मुद्दाम जाणूनबुजून लक्ष दिले. आत्महत्या हेच समस्येचे उत्तर या पद्धतीने या वाहिन्यांनी बातम्यांचा अक्षरश: उच्छाद मांडला गोंधळ घातला. सुशांत सिंग राजपूत घरात मृतावस्थेत आढळला असे जर वाहिन्यांनी सांगितले असते तर अधिक बरे झाले असते पण ते सोडून काही सिद्ध व्हायच्या आधीच वाहिन्यांनी पोलिसांच्या भूमिकेत शिरून सुशांत सिंग राजपूत ने आत्महत्या केल्याचे सांगितले, पोलिसांनी अशा किंवा या वाहिन्यांना धारेवर धरले तर बरे होईल, जरा तरी वचक बसेल...

जेव्हा विशेषतः या मुंबई शहरात तुम्ही प्रस्थापितांच्या स्थानाला धक्का देता तेव्हा येथले प्रस्थापित तुम्हला येथून हुसकावण्याचा संपविण्याचा घाबरवण्याचा बदनाम करण्याचा हाकलून देण्याचा तुमचे स्थान हिरावून घेण्याचा तुमचे चित्त विचलित करण्याचा थोडक्यात तुम्हाला संपविण्याचा आटोकाट सतत कायम अविरत मुद्दाम जाणून बुजून प्रयत्न करतात ज्याचा अनुभव मी घेतला आहे किंवा माझा पत्रकार असलेला चिरंजीव पण घेतो आहे. प्रसंगी अगदी पत्रकार असलेल्या कुटुंबातल्या सदस्यांनी देखील आम्हाला संपविण्याचा आधी विडा उचलला नंतर आम्हाला बदनाम करण्याचे आटोकाट प्रयत्न झाले पण आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो ठाम असतो त्यामुळे समोर साक्षात मृत्यू जरी उभा राहिला तरी एकही क्षण विचलित न होता आम्ही आमचे काम सुरु ठेवतो पत्रकारितेचा वसा जपतो सुरु ठेवतो. हत्ती चले बाजार तो कुत्ते भुके हजार हि म्हण लक्षात घेऊन पुढे पुढे जायचे सरकायचे असते यशाने माजून न जाता आणि अपयशाने अजिबात खचून न जाता आणि नेमके हेच कंगना राणावत असेल किंवा सुशांत सिंग राजपूत यांनी ते ध्यानात घेतले नाही कधी ते अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेत तर कधी ते येथल्या प्रस्थापितांना कंटाळले. वास्तविक समोर वाघ आला तरी अजिबात अजिबात घाबरायचे नसते विचलित व्हायचे नसते... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Friday, 12 June 2020

Primary Health Centre in SRA--Is it, can it be possible?


Primary Health Centre in SRA--Is it, can it be possible? 

On Friday, Housing Minister Jitendra Awhad via Twitter announced that all Slum Rehabilitation Authority (SRA) Projects will now have Primary Healthcare Centre's (PHC) from now on as an intrinsic part of the approved project layout. Henceforth, he announced for which orders too have been issued, that all Slum Rehabilitation Projects will have Primary Healthcare Centre admeasuring 1000 to 5000 sq feet. It will be free of FSI basis. Time to analyse this decision.  

There are 3 amenities that are compulsory in a Rehab Project for a builder to provide to the slum dwellers. The developers have to provide Balwadis (pre-school education centres) and Gardens if the project and is reserved for these things; then there is a Welfare Centre to be provided & 3rd compulsory amenity-  it is the Society Office. These 3 amenities are absolutely mandatory for builders to provide. Now the 4th amenity, that is optional, most of the societies give it for a Gym or a Community Hall to private parties outside so that their monthly expenditure is covered by the income which comes in form of rentals. Apart from these 3 compulsory and 4th one optional it is not possible for anyone to make amendments in the rulebook and make a provision for the PHC's. I'm told by experts if a PHC has to be provided form now on in every SRA project, at first you will have to change the entire DCPR 2034. For that it is a long procedure and under Section 37 you will again have to call for suggestions and objections and take hearings. 

Suppose, we only can suppose as it will be a miracle if  Mr. Awhad pulls this one to make changes in the DCPR. We all know Mr. Awhad is an influential man and if he makes changes in the DCPR say in a month or so, how will you think is it going to work? When the whole of State and city of Mumbai and Government Hospitals are without Doctors and Nurses and staff's you feel Mr. Awhad, leaving 5 star hospitals (in there they don't come) they will come and serve in a SRA building? 

Again we suppose, you get a team of Doctors and Nurses from Mumbra (please check the certificates huh...) who is paying them? Had we made any provisions in the Budget? Which department will their salaries go from? Who and from where will the medicines be procured? Who will bear the monthly electricity charges? Medicine expenditure will run in lakhs. How will the slum dwellers afford this 'service' is a big question mark for us. 

Now we all know Slum Dwellers are living hand-to-mouth situation. I'm sure being the Minister of this department now you are aware, that these people at the end of the month they don't even have the money to pay for their electricity bills and water & drainage charges. So it looks a bit sceptical to me as of now. Also changes in the DCPR is not a simple job readers. And finally, DCPR does not fall under the purview of the Housing department. DCPR comes under Urban Development Department. 

Vikrant Hemant Joshi 

PS:
1. Friends, please identify this man for me. If they have Kim Jong-Un, a ruler of North Korea, in Maharshtra also we have one! No, it ain't any Thackeray or Pawar. This man in literal sense behaves like Kim Jong-Un. Hint--He sits in Mantralaya. He is now been called names such as Mr. Mental Imbalance, Munshi ji, Mr Covid-20 and God knows what all. No, this is not my discovery, it is spoken....

2. Heard Sonia Sethi of the MMRDA went to do a presentation at Mantralaya with Chota Chetan and the presentation was so bad and full of errors that CS Mehta lost his cool and in his style, gave an earful to Mrs. Sethi. Ma'am I'll share my experience. Since the beginning of school life and even whilst I was in the UK for all 3 years of my student life I always made a point I had at least 1 to 2 South Indian "friends". These South Indians are too good with presentations and technical know how! I never failed ma'am because of their help, All I needed was to ask them. 

3. Satish Supe a DS in Food & Civil Supply got kicked out on of his department and was absurdly transferred to his parent department, the finance one! Now he was transferred because of the fiasco that happened in the Cabinet when a proposal was directly signed by the CM and got to the Cabinet for the final decision. The Minister of the department was not knowing about the same and he along with Ashok Chavan and Jayant Patil targeted CS Ajoy Mehta for ignoring them. It came in papers. Now I'm told the target was Ajoy Mehta any which ways, and this fiasco became the reason. But in this fight of One versus ALL, Satish Supe got transferred. By the way, check Supe's attendance when none of these so called Ministers and officers were not in Mantralaya in the 3 months of lockdown  From handling Pardeshi's (Bhujbal's secretary)rude attitude to corrupt means, and to finally see the last supply of ration to reach every district, Supe had done all. What does he get at the end of 3 months 24 hour job? No, Not a Covid warrior certificate, he gets transferred. Some blamed IAS Sanjay Khandare for the fiasco, many said he was made a scapegoat...

Vikrant Hemant Joshi  

वसंतराव माझे चुकले : पत्रकार हेमंत जोशी


वसंतराव माझे चुकले : पत्रकार हेमंत जोशी 
दिनांक 11 जून गुरुवारची रात्र मला अस्वस्थ करून सोडणारी ठरली, माझे पित्यासमान वसंतराव कुलकर्णी मला आम्हा अनेकांना सोडून गेले. कोण होते वसंतराव, सांगितले तर तुम्हालाही आस्चर्य वाटेल, ते 80-90 च्या दशकात विविध मंत्र्यांचे खाजगी सचिव होते नंतर ते त्यावेळेच्या राज्यपालांचे सचिव होऊन निवृत्त झाले आणि सतत सत्तेभोवताली रमलेला हा अधिकारी दूर थेट पन्हाळ्याला निघून गेला आणि तेथेच लोकसेवा करता करता 11 जून ला आम्हाला कायमचा सोडून गेला नक्की थेट स्वर्गातच पोहोचला कारण या हाताचे त्या हाताला कळू न देता प्रत्येकाला भरभरून देणारा तो एक आधुनिक मसीहा संत होता. कित्येकांचे संसार त्यांनी उभे केले कित्येकांना त्यांनी पोटापाण्याला लावले. एखादा मंत्र्यांचा साधा खाजगी सचिव एकेकाळी शरद पवार ते थेट राज्यपाल प्रत्येकाचा कसा आणि किती लाडका ठरू शकतो हे त्यांच्याकडून मंत्र्यांच्या खाजगी सचिवांनी सरकारी अधिकाऱ्यांनी खरोखरी शिकण्याससारखे होते. माझ्या वडिलांना तर त्यांच्या मृत्यूच्या केवळ दोन महिने आधी त्यांनी वचन दिले होते कि मी हेमंत कडे मुलासारखे लक्ष ठेवेन त्यांनी ते दिलेले वचन अगदी शेवटपर्यंत पाळले...

वसंतराव माझा भावनिक आधार होते, माझ्या मनातले सारे सुख आणि दुःख त्यांना माहिती होते कारण माझे दुःख हलके करण्याचे मी ते हक्काचे ठिकाण समजत असे विशेष म्हणजे त्यांच्या या दानशूर कर्ण वृत्तीला त्यांच्या पत्नीने कायम साथ दिली, देत आल्या. ज्या जोडप्याकडे बघून कायम वाटावे कि यांचे कालच लग्न झाले आहे कि काय त्यातले कुलकर्णी दाम्पत्य होते. माझा त्यांच्या घरी दारी कायम मुक्त संचार होता, मला तर वडील गेल्याचे दुःख झाले. नोकरीत असतांना ते मुंबईत होते त्यानंतर ते पुण्यात जवळपास 7-8 वर्षे होते म्हणजे 17-18 वर्षे सतत त्यांनी स्वतः कोणतीही माझ्याकडून अपेक्षा न ठेवता माझ्या पैशांचे अगदी व्यक्तिगत बँकेत जाऊन नियोजन केले त्यामुळेच मला आर्थिक सुबत्ता आली, एका मंत्र्यांचा खाजगी सचिव माझ्या खडतर आक्रमक बेभरवशाच्या आयुष्यात साक्षात देवदूत बनून आला व माझे कल्याण करून गेला. अलीकडे काही कटकटींमुळे अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांमुळे या दीड दोन वर्षात त्यांच्याशी बोलणे होत नव्हते ती खंत यापुढे मला कायम अस्वस्थ करून सोडणारी असेल...

दिवंगत श्री आर आर पाटील यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात जे भरीव कार्य केले त्या योगदानात त्यावेळेचे सचिव सुधीर ठाकरे, आबांचे त्यावेळेचे खाजगी सचिव चंद्रकांत दळवी आणि ग्राम विकास खात्याचे उपसचिव म्हणून वसंतराव कुलकर्णी या तीघांचाच सिंहाचा वाटा होता. वसंतराव ज्यामंत्र्यांकडे खाजगी सचिव म्हणून रुजू व्हायचे तो मंत्री हमखास यशस्वी ठरे विशेष म्हणजे त्याकाळी हे सांगतील ते खाजगी सचिव किंवा स्वीय सहाय्यक इतर मंत्री मुद्दाम घेत असत एवढा ब्राम्हण असूनही  वसंतरावच्या शब्दाला मानसन्मान होता. त्यांना मी अवतार मधला राजेश खन्ना म्हणत असे कारण सेवा निवृत्तीनंतर सरकारी अधिकारी फारसे वेगळे काही करतांना दिसत नाही, वसंतराव मात्र स्विमिंग ड्रायविंग तर शिकलेच पण त्यांनी फेंगशुई शास्त्राचा सखोल अभ्यास करून त्यानंतर जगभर आपले फॉलोअर्स निर्माण केले जे कार्य त्यांनी आपल्या खिशातले पैसे टाकून केले अन्यथा या क्षेत्रात देखील त्यांना तेही निवृत्तीनंतर करोडो रुपये मिळविता आले असते. प्रत्येक नातेवाईकाचे ते जसे अगदी तरुण वयापासूनपित्यासमान होते तीच जबाबदारी त्यांनी बाहेरच्या जगात देखील पार पाडली एवढे ते श्रेष्ठ होते दानशूर मोठ्या मनाचे होते. अशी पुण्यवान माणसे खचित जन्माला येतात आणि तुम्हाला भेटतात. वसंतरावांना श्रद्धांजली वाहतांना मला खूप खूप खूपच दुःख होते आहे, माझे अपरिमित नुकसान झालेले आहे...
हेमंत जोशी. 

Monday, 8 June 2020

Aisa Bhi Hota Hai....


Aisa Bhi Hota Hai.....

So Shahid Balwa of DB realty is back to being powerful. Yesterday, when the news of IAS Satish Lokhande (Mhada) replacing SRA CEO Deepak Kapoor was doing the rounds, on the WhatsApp group titled MCHI SRA at exactly 18:09 hours Shahid Balwa knew that the order has been done. Will read the exact WhatsApp to you and later will do the aftermath. 

Mayur Shah of Marathon wrote, " Rumours recvd, yet to be confirmed: SRA CEO Mr. Kapoor trasnferred...New CEO Mr. Lokhande" This message of Mayur Shah was sent at 18:08 and exactly within a minute Shahid Balwa replies," The news is true. I got to know from Mantralaya just now. 

 A person who has been involved in 2G scam, who has spent time in Tihar Jail, still manages to be in the corridors of power of Mantralaya, I'm surprised. No actually when am I surprised? In the previous government only handful of dalaal's were given the permission to create havoc in all departments, the minute this 'unholy' government was formed and all the old timers right from Shahid Balwa to Jayant Shah are back in Mantralaya. I don't find anything amusing in this. Anyway, when I got this whatsapp from a friend, I immediately sprung in action. First texted the SRA CEO himself, if he was aware of any such order, then called up a source of GAD to confirm it , and finally rung up an influential journalist from a daily but none of them had a clue of this transfer. Yes, there were transfers, but of 3 IAS. Nand Kumar, Atul Patne and Dr. Pallavi Darade, I don't want to get into their postings, as again if none of you all have noticed, they are sidelined yet again. My basic question here is : How did Shahid Balwa know that the order of Deepak Kapoor is done? See if the order of such high level bureaucrat is done, only the CS and ACS and GAD and the CM and the Minister concerned are aware. But CS does not receive phone calls of Ministers, due to covid (please don't misunderstand) handling, ACS Housing/Home from Monday has all of a sudden gone to Pune-- CM does not know anything as to what happens in bureaucracy, so that leaves us to the Minister Housing and GAD. Please rattle your brain here as to who must have taken the supari of Deepak Kapoor, I can't....

www.vikrantjoshi.com

If in IPS the war between 2 groups is based on Kayasth & Marathi, in IAS the war has begun-- Punjabi versus the Marathi officers. Just as when the certain Kayasth officers were reigning in the Devendra Fadnavis regime in the IPS lobby, I had written about them. What had happened, not the big fishes, but the small fishes in the pond of IPS were hampered as the Maharashtrian's ruling the Mantrlaya had taken their ire on small fishes of Kayastha lobby. Till now I feel apologetic towards them. But thats collateral damage when you take on 'mafia' of officers. Now I feel similar situation is going in the IAS. Ajoy Mehta is a Punjabi. So is MC Iqbal Chahal and so is CP Parambir Singh. Marathi IAS officers are doing anything but to finish this dominance. Then in last two days these Maharashtrian officers got news printed in Maharshtra Times that, Congress has come on the same page and won't let Ajoy Mehta get an extension. But Mr. Mehta, I will tell you, this news wasn't planted by any Maharashtrian IAS officer. Dig further, it was done by one your own...mIght be from your batch too! Ya so, when in the IPS, lower rank officer got the axe of being a Kayasth, I feel Deepak Kapoor's future holds nothing different. Being Punjabi, he has been categorised as same as Ajoy Mehta, Chahal and Parambir, whereas he is not. Just look at this work, and tell me has SRA come into any controversy for past 2.5 years? The answer is a NO. And since the Maharashtrian lobby can't do jack shit anything about the top 3 bureaucrats, people like Kapoor will continue to suffer. Mr. Kapoor, don't be surprised if information of third grade people like Balwa comes true....

BTW, one good news!! MSRDC Chief Engineer Anil Gaikwad was set free by the court against all the allegations which couldn't be proved. Bhujbal was the Minister then, when Maharshtra Sadan scam was out and Gaikwad was zerod down to be made a scapegoat. He fought and won...Now he is due to become the Secretary of the PWD in place of CP Joshi. He is another example of being the victim of the Minister and his nephew's money eating tactics. But good days are here again Mr. Gaikwad. But be careful, you have another Ashok Chavan to handle. 

To the conclusion, the ladies in the "Yashodhan" Building are crying foul due to this "Mission Begin Again". They won't get their avocados, their zucchini and their favourite wine bottles delivered as they got for all 3 months of lockdown, at their door step. I have heard there were parties organised on the terrace of "Yashodhan" every single evening with the wives and husbands making merry whilst we commoners, died for a single piece of bread, during all 3 months of lockdown. And these "privileged" people, didn't allow their staffs drivers and home staff to go to their natives, as I can't imagine an ACS to do Zhadu Pota while the wife cures her hangover...So these helpers were sent to get things from markets everyday or were sent to their 'business partners' homes to get their stocks of bottles. ...Covid had to enter. Problem is "abb, Tandoor kaun serve karega ?"  

Vikrant Hemant Joshi 


वृत्तपत्रे वाहिन्या आणि वाह्यातपणा : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


वृत्तपत्रे वाहिन्या आणि वाह्यातपणा : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
यवतमाळ पासून धंदेवाईक पत्रकारितेला सुरुवात झाली आणि आपल्या या राज्यात मराठी अमराठी असा भेदभाव न राहता अगदी उघड सऱ्हास वृत्तपत्रे विविध मीडिया आणि वाहिन्यांच्या आडून तद्दन व्यावसायिक पत्रकारितेला सुरुवात झाली. तरुण भारत संचार किंवा वागळे यांची मालकी असतांना महानगर यासारखी काही वृत्तपत्रे वाहिनी किंवा इतर मीडिया आजही अगदीच टीचभर प्रमाणात नाही म्हणायला या क्षेत्राकडे सामाजिक दृष्टिकोन किंवा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून नक्की बघतात पण हे प्रमाण अत्यल्प आहे त्यासाठी भाऊ तोरसेकर यांच्यासारखे पत्रकारितेतले मीडियातले संत म्हणूनच जन्माला यावे लागते पण तसे अलीकडे फारसे घडत नाही किंबहुना स्वतःचा स्वतःच्या विविध व्यवसायाचा काळ्या  धंद्यांचा दबाव विविध स्तरांवर निर्माण करण्यासाठीच शेटजी या हलकट व नीच वृत्तीचे मराठी अमराठी मीडिया क्षेत्रात उतरल्याचे या राज्यात जिकडे तिकडे बघायला मिळते. तरुण भारत किंवा सामना सारखी वृत्तपत्रे आपल्या तत्वांशी यासाठी चटकून चिपकून राहिली आहेत कारण त्यांच्या पाठीशी शिवसेना किंवा भाजपा ठामपणे उभे आहेत किंबहुना आम्ही शिवसेनेचे किंवा आम्ही भाजपचे मुखपत्र आहोत असे त्यांनी आजतागायत कधी लपविले देखील नाही. नारायण राणे यांना मात्र त्यांच्या प्रहार दैनिकाचा तरुण भारत किंवा सामना सारखा प्रभावी उपयोग का करवून घेता आला नाही त्यावर पुढे मी नक्की लिहिणार आहे पण राणे यांचे या दैनिक नक्की मोठे आर्थिक नुकसान झाले आहे... 

शिवसेनेच्या सामना दैनिकाला जसे घवघवीत यश मिळाले दुर्दैवाने अत्यंत जहाल प्रखर व सत्य हिंदुत्व मांडूनही तरुण भारत ची अवस्था वारंवार घटस्फोट घेणाऱ्या होणाऱ्या दुर्दैवी तरुणीसारखी होत आली आहे म्हणजे थेट प्रमोद महाजन यांच्यापासून तर विश्वास पाठक किंवा नितीन गडकरी यांच्यासारख्या प्रभावी आणि आर्थिक गणिते जुळवून आणण्याची ताकद असणाऱ्या विविध मंडळींच्या हातात त्या त्या वेळी तरुण भारत सुपूर्द करण्यात आला पण यापैकी कोणालाही तरुण भारताला लोकमत दैनिक जन्माला येण्याआधी जे यश मिळायचे ते लोकमत च्या जन्मानंतर कधीच मिळाले नाही आणि पुढे पुढे तर आपल्या या  राज्यात कितीतरी वृत्तपत्रे प्रभावीरीत्या स्पर्धेत उतरल्याने तरुण भारत दैनिकांची वैचारिक दृष्ट्या हिंदूंना प्रचंड गरज अस्तानही या वृत्तपत्राला उठाव मिळाला नाही, तरुण भारत दैनिकाची नागपूर सारखे एखादे शहर वगळता अवस्था मुख्य नर्तिकेच्या मागे नाचणाऱ्या कोरस मधल्या एक्स्ट्रा नटासारखी कायम होत आली. व्यवसायासाठी वृत्तपत्रे किंवा बातम्या देणाऱ्या वाहिन्या हा एकमेव दृष्टिकोन समोर ठेऊनच अलीकडे दबाव निर्माण करणारे हे क्षेत्र तद्दन धंदेवाईक मंडळींच्या हाती स्थिरावले आहे, टिळक आगरकरांची प्रखर देशभक्तीची पत्रकारिता आपल्या या राज्यात अभावानेच आढळते. तुम्हाला पुढले वाचून  खूप आश्चर्य वाटेल, पुढले वाचल्यानंतर मला नक्की माहित आहे कि तुम्ही ते वाचून आश्चर्याने एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालून सभोवताली गिरक्या घेऊन नाचणार आहात, स्वतःच स्वतःला वाकुल्या दाखवून मोकळे होणार आहात. आजकाल वृत्तपत्रे वाचण्याची आवश्यकता किंवा गरज उरली आहे का त्यावर मला येथे तुम्हाला नेमके उदाहरण देऊन सांगायचे आहे... 

अचंबित करणारे माझे वाक्य असे कि अगदी आत्ता आत्ता पर्यंत म्हणजे मागल्या वर्षीपर्यंत मुंबईत माझ्या घरी मुंबईतून प्रसिद्ध होणारी लोकमत लोकसत्ता सकाळ पुढारी महाराष्ट्र टाइम्स किंवा टाइम्स ऑफ इंडिया सारखी मराठी इंग्रजी दैनिके साप्ताहिके थोडक्यात जवळपास 10-12 वृत्तपत्रे विकत घेऊन वाचून त्यातली महत्वाची कात्रणे कापून आणि चिटकवून ठेवत असे म्हणजे तुम्ही जर माझ्या माहीमच्या कार्यालयात अगदी अचानक जरी आलात तरी एक अख्खी खोली या कात्रणांनी तुम्हाला भरलेली दिसेल.नंतर मी वृत्तपत्रे विकत घेण्याचे प्रमाण कमी केले, केवळ महत्वाची  चार पाच वृत्तपत्रे घेऊन वाचायला  लागलो आणि लक्षात असे आले कि प्रमाण कमी केले तरी  पत्रकार असूनही फारसे काही अडले नाही,आता अलीकडले अति आश्चर्य म्हणजे लॉक डाऊन सुरु झाल्यापासून या तीन महिन्यात मी एकही वृत्तपत्र वाचले नाही कारण ती बंद होती मिळायची नाहीत आणि ऑन लाईन जाऊन वाचण्याची कधी गरजच पडली नाही कारण आवश्यक त्या बातम्या फेसबुक चाळले तरी वाचण्यात येतात, काम भागते. अगदी तशी गरज भासली तर बातम्या देणाऱ्या वाहिन्या असतातच तीच ती बकबक करतांना. आपल्या देशाचा देखील आता पुढल्या काही वर्षात अमेरिका किंवा तत्सम देश होणार का कि जेथे वृत्तपत्रे वाचल्या जात नाहीत आणि विकत
तर अजिबात घेतल्या जात नाहीत. माझ्यासारख्या चोवीस तास पत्रकारितेत असणाऱ्याला जर वृत्तपत्रे वाचली नाहीत तर फारसे काही अडले अडत नाही तर सर्व सामान्यांना तेथे कितीसा फरक पडेल आणि हे असे नक्की घडते आहे घडणार आहे कारण वृत्तपत्रांची विश्वासहर्ता संपत चालली आहे...
क्रमश: हेमंत जोशी 

Sunday, 7 June 2020

वाहिन्या वृत्तपत्रे आणि वाह्यातपणा : पत्रकार हेमंत जोशी


वाहिन्या वृत्तपत्रे आणि वाह्यातपणा : पत्रकार हेमंत जोशी 
एका मोठ्या वृत्तपत्राच्या वयस्क मालकाला बायकांचा मोठा नाद आहे हा षौक पूर्ण करण्यासाठी तो जगभर फिरतो अनेकदा माझे काही व्यवसायिक किंवा राजकारणातले बाईलवेडे मित्र त्याला हा षौक पूर्ण करतांना कंपनी देतात जी कंपनी त्या शौकीन फुकट्या मित्रांसाठी फायद्याची ठरते. घडते असे कि सत्तरीच्या पुढला हा शेटजी लैंगिक दृष्ट्या आता फार दुबळा झाला आहे पण कामवासना मात्र त्याला सतत उत्तेजित करीत असते, जेव्हा केव्हा हे महाशय महागड्या कॉलगर्ल्सला बोलावून घेतात थोडावेळ दारू ढोसून नंतर विकृत लैंगिक चाळे करून महागड्या कॉलगर्ल्सला सोबीतला असणाऱ्या मित्रांच्या रूम मध्ये ढकलून मोकळे होतात. हे उदाहरण येथे यासाठी कि आमच्या वृत्तपत्र आणि अन्य मीडिया क्षेत्रात याचपद्धतीने या क्षेत्रात काम करणारे चेकाळले आहेत म्हणजे समजा विपुल नावाचा एखादा इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारा पत्रकार जर शासन दरबारी आपल्या मालकाची मलिदा देणारी पाच कामें करवून आणत असेल तर त्यात तो स्वतःचे देखील एखादे काम करवून मलिदा मिळवून मोकळा होतो. अनेक वाहिन्या वृत्तपत्रे किंवा मीडिया क्षेत्रातून अशी दलाली करणारे भडवे जागोजाग आढळतात ज्यांना मिळणारे वेतन म्हणजे त्यांच्यासाठी पिनटस सारखे असते.... 

अलीकडे जय महाराष्ट्र हि बातम्या देणारी वाहिनी बंद पडलेली दिसते, आर्थिक गणिते बिघडली कि या वाहिन्यांचे बंद पडणे आपसूक असते. वाहिन्यांचे तर असे असते कि समजा बातम्या अर्ध्या तासाच्या असतील तर त्यात बारा मिनिटांच्या किमान जाहिराती हव्यात शिवाय त्या बातम्यांमध्ये पण जाहिराती लपलेल्या असाव्यात सध्या या अशा जाहिरातींच्या बाबतीत मराठीमध्ये एबीपी माझा केवळ यशस्वी आहे इतर वाहिन्यांची अवस्था तशी बिकटच आहे पण साम किंवा लोकमत यांना नेमके आर्थिक गणित कसे जुळवून आणायचे हे अनुभवाने माहित असल्याने या वाहिन्या बंद पडतील असे निदान आज तरी चित्र नाही. वृत्तपत्रे असोत अथवा बातम्या देणाऱ्या वाहिन्या या दोन्हीकडे बातम्या लेख मुलाखती इत्यादी माध्यमातून पैसे मोठ्या प्रमाणावर मिळविण्याची एक बेमालूम बदमाशी असते त्यात नवाकाळ हे दैनिक निळूभाऊंच्या काळातच उघडे पडल्याने त्याचा एकेकाळचा सहा लाख खप वाचकांनी मग काही हजार आणून ठेवला, इतरांची बदमाशी तितकीशी लक्षात न आल्याने इतर वृत्तपत्रे आणि वाहिन्या खोऱ्याने काळा पैसा कायम खेचत असतात हि वस्तुस्थिती आहे....

www.vikrantjoshi.com

बातम्या लेख मुलाखती इत्यादी माध्यमातून पैसे खेचून आणणारे असे पैसे मालकांना पोहचवून त्यांना खुश ठेवणारे बहुतेक वृत्तपत्रे वाहिन्या आणि मीडिया क्षेत्रात असे प्रतिनिधी आहेत त्यांची नोकरी त्याच भरवशावर टिकून असते त्याशिवाय शासन दरबारी लिखाणातून आपला स्वतःचा दबाव निर्माण करून मालकांच्या आणि स्वतःच्या मलिदा मिळवून देणाऱ्या नस्त्या क्लिअर करवून घेणारे भडवे प्रतिनिधी तर शासकीय कार्यालयातून मंत्रालयातून जागोजाग दिसले कि त्यांच्या पुढ्यातच त्यांच्या तोंडावर ओकारी करावीशी वाटते. ज्या प्रतिनिधींकडे या अशा भडवेगिरीतून प्रचंड माया जमा झालेली आहे त्यांच्याबद्दल वाईट वाटत नाही पण ज्यांचे पॉट केवळ प्रामाणिक नोकरीवर अवलंबून असते अशा मीडियामध्ये काम  करणाऱ्या प्रतिनिधींना जेव्हा मालकांनी या कोरोना महामारीत कामावरून काढून टाकले किंवा ज्यांना केवळ निम्म्या वेतनावर काम करावे लागते आहे ते ऐकून बघून तळपायाची आग मस्तकात पोहोचते कारण बहुतांशी मीडिया मालक हे आर्थिक दृष्ट्या प्रचंड श्रीमंत गब्बर आहेत त्यांनी आपल्याकडे काम करणाऱ्या प्रामाणिक स्टाफला या तीन महिन्यात कामावरून न काढता पूर्ण वेतन दिले असते तर त्यांचे काहीही कुठेही अजिबात बिघडले नसते पण आपल्याकडे काम करणाऱ्या प्रतिनिधींकडे एखाद्या रांडेसारखे बघण्याची या मालकांची वृत्ती असल्याने त्यांनी मीडिया क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रतिनिधींवर फार मोठे आर्थिक संकट उभे केले आहे जे अतिशय नीच असे कृत्य त्यांनी केले आहे...
क्रमश: हेमंत जोशी 


Friday, 5 June 2020

आघाडीतून बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी

आघाडीतून बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी 
आमच्या ओळखीतले एक कुटुंब होते त्या कुटुंबात मोठ्या मुलाचे लग्न झाले नवी सून त्या कुटुंबात आल्या आल्या तिसरेच दिवशी सासू बाथरूममध्ये पाय घसरून पडली पुढले सहा महिने सासू अंथरुणावरून उठली नाही, दिराची नोकरी गेली, मोठी नणंद विधवा होऊन कायमची माहेरी आली  धाकट्या नंणंदेचा चौथा लागला असताना गर्भपात झाला सासर्यांना वेड लागून ते कायम गाव सोडून निघून गेले नवरा पैसे घेतांना रंगेहात पकडल्या गेला तिलाही कधी नव्हे ते फिट्स यायला लागल्या हे सहन न झाल्याने कि काय धडधाकट आजेसासू पातळ दोरीवर वाळत घालता घालता गेल्या विशेष म्हणजे त्यांच्या शेजारची नलिनी पण समोरच्या अहमद बरोबर पळून गेली वरच्या माळ्यावर राहणारे गोविंदराव पायरांवरून घसरून गडगडत खाली आल्याने वयाच्या चाळिशीतच त्यांची नसबंदी करावी लागली तर हे सहन न झाल्याने त्यांची बायको खालच्या माळ्यावर राहणाऱ्या श्यामच्या प्रेमात पडली आणि श्यामची बायको ते बघून कायमची माहेरी निघून गेली....

सध्या काही काम नाही घरातल्या खोलीत एकटाच पडून असतो आणि भिंत हीच प्रेयसी अशी मनाची समजूत घालून भिंतीशीच तासनतास प्रेमविलाप करीत बसतो. कधी रफीची रडकी गाणी ऐकतो तर कधी बाबूजींची गाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो, शेजारचे मग रागाने दार बंद करून घेतात तो भाग वेगळा. आज असाच आढ्याकडे बघत आघाडी सरकार विशेषतः उद्धवजी यांच्या मुख्यमंत्री होण्याचा विचार करीत होतो आणि उद्धवजींवरून मला माझ्या त्या ओळखीच्या कुटुंबाचा किस्सा आठवला. उद्धव मुख्यमंत्री झाले आघाडी सरकार सत्तेत बसले त्याआधीपासूनच अपशकुनांची जी मालिका सुरु झाली ती संपता संपत नाही विशेष म्हणजे कोरोना महामारीने तर जगाला संकटाच्या खाईत नेऊन सोडले आहे, आघाडीचा पायगुण वर सांगितलेल्या नव्याने घरात आलेल्या सुनेसारखाच आहे. पण ज्या तरुण पिढीला किंवा या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला उद्धव यांच्याविषयी नेमके जे माहित नाही ते येथे मी तुम्हाला सांगून चकित करणार आहे, ते ऐकून तुमचे ज्ञान वाढणार आहे आणि मनोरंजन देखील होणार आहे. उद्धव किंवा ठाकरे कुटुंबीय बाहेरच्यांना फारसे माहित नाही कारण सारे ठाकरे कुटुंबाकडे यायचे ठाकरे यांना अमुक एखाद्याकडे जाण्याची कधी वेळच आलेली नव्हती आणि तोच त्यांचा मोठा प्लस पॉइण्ट होता...

एक महत्वाच्या मुद्दयांवर तुम्हाला नेमके सांगायचे झाल्यास जेव्हा जेव्हा या राज्यातील सत्तेशी शिवसेनेशी संबंधित नेत्यांनी दलालांनी अधिकाऱ्यांनी मीडियाने विशेषतः उद्धव यांना जेव्हा केव्हा अपयशी ठरविले, अंडर एस्टीमेट केले, उद्धव राजकारणात नादान आहेत कमकुवत आहेत असे हिणविलें म्हटले तेव्हा तेव्हा प्रत्येकवेळी उद्धव त्या त्या प्रसंगी मग ती निवडणूक असो किंवा त्यानंतर  राजकारणात पदार्पण असो किंवा बाळासाहेबांचे जाणे असो किंवा शिवसेनेतली फाटाफूट असो  एखाद्या महत्वाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव असो, त्या त्या प्रसंगी सारेच्या सारे जेव्हा केव्हा हेच म्हणायचे कि आता उद्धव संपले आणि शिवसेना खलास झाली त्या त्या वेळी असे कधीही घडले नाही याउलट उद्धव आणि शिवसेना उफाळून व उसळून जोमाने जोरात जोशात वर आले यशस्वी ठरले नेमके नेहमीप्रमाणे यावेळी देखील मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकवार त्यांच्याबाबतीत हे असे यशाचे गणित जमून येऊ शकते, आज जे त्यांना हे जमत नाही असे अनेक म्हणताहेत ते पुन्हा एकवार  तोंडावर पडू शकतात त्यांची फजिती होऊ शकते कारण मराठी माणूस इतर साऱ्या नेत्यांना लाथाडून केव्हा उद्धव यांना आलिंगन देऊन मोकळा होईल लोकांच्या मनातले काहीच सांगता येत नाही....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Tuesday, 2 June 2020

फसलेले गणित : पत्रकार हेमंत जोशी


फसलेले गणित : पत्रकार हेमंत जोशी 
पहिल्यांदा गर्भार असलेली तरुणी माहेरी बाळंतपणाला आली कि बाहेरचे पुरुष तिच्या बापाला भेटायला आलेत कि हि लाजून पटकन आत पळते. गावातल्यांची रस्त्याने ती फिरतांना तिच्या पोटावर साधी नजर जरी पडली तरी हि लाजून लाजून चूर होते लगेच आईच्या पाठी लपते तसे आपल्या अजितदादांच्या सध्या झाले आहे, एकतर ते डोळ्याने दिसता दिसत नाहीत चुकून दिसले तर लाजून असे काही गोरे मोरे होतात कि जणू ते वयात आलेले तरुणी आणि गावचा तरणा आडदांड पाटील त्यांच्याकडे चहा पोह्यांसाठी म्हणजे पोरगी बघायला आला आहे. कोरोना लॉक डाऊन सुरु होण्यापूर्वी संघ भाजपच्या वर्तुळातून आघाडीतले कोणकोणते अस्वस्थ आमदार  बाहेर पडू शकतात त्यावर चाचपणी नक्की सुरु करण्यात आली होती पण कोरोना महामारीचे हे महासंकट ओढवल्यानंतर त्यांनी तशी चाचपणी करणे सुद्धा बंद केले जे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही दृष्टीने अतिशय योग्य पाऊल उचलल्या गेले एवढेच मी सांगतो..

अलिकडल्या काही दिवसात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या वाचक लोकप्रियतेचा ग्राफ झपाट्याने खाली आला, लिखाणातून मोठमोठाले संदर्भ देणारे कुबेर हे अभ्यासातून नव्हे तर थेट उचलेगिरीतून मी लोखणांत कसा दर्जेदार दाखवण्याचा प्रयत्न करतात वाचकांच्या लक्षात आले नि येथेच सारे बिघडले. थोडक्यात उचलेगिरी हि अशी एखाद्याला मारक ठरू शकते एखाद्याची लोकप्रियता झटक्यात संपवू शकते म्हणून हा उचलेगिरीचा आगाऊपणा भाजप किंवा संघाने केला नाही कारण फोडाफोडीचे राजकारण या गंभीर वातावरणात त्यांना मोठ्या प्रमाणावर भोवले असते महत्वाचे म्हणजे समजा त्यांना सत्ता जरी मिळाली असती तरी भाजपाची या राज्यातली आजची अतिप्रचंड लोकप्रियता क्षणार्धात रसातळाला आली असती. कोरोना महामारीचे संकट पूर्णतः ओसरे पर्यंत भाजपा सत्तेत येण्यासाठी अगदी धडपड देखील करणार नाही कोणतेही डावपेच आखणार नाही हे माझ्याकडून लिहून घ्या... 

www.vikrantjoshi.com

यादिवसात नाही म्हणायला तशा कंड्या अधून मधून पिकवल्या उठवल्या जातात कि भाजपा, आघाडी मध्ये फूट पाडण्याचा आटोकाट करतेय त्यावर एवढेच सांगतो कि आघाडीला आपला प्रचंड घसरलेला लोकप्रियतेच्या ग्राफची मोठी काळजी असल्याने त्यांच्याकडूनच या अशा अफवा कंड्या मुद्दाम जाणून बुजून पिकवल्या उठवल्या जाताहेत. कोरोना महामारीचे विशेषतः राज्यातील विविध मोठ्या शहरातून वाढलेले संकट जो तो म्हणजे प्रत्येकजण हेच म्हणतोय कि या अशा संकटात फडणवीस मुख्यमंत्री म्हणून हवे होते. का कोण जाणे उद्धव यांचे प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याच आघाडीतल्या मित्रांकडून आणि मित्रांशी लॉयल असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांकडून हाणून पाडले जात आहेत म्हणजे उद्धव यांना मुद्दाम किंवा जाणूनबुजून कमकुवत केले जात आहे जे त्यांना एक सक्षम नेता म्हणून आणि शिवसेना एक अति प्रभावी पक्ष म्हाणून कमकुवत केल्या जातो आहे आणि हीच खरी वस्तुस्थिती आहे. माझे एक ब्राम्हण वकील मित्र होते त्यांची अतिशय देखणी मुलगी थेट झोपडपट्टीतल्या मुसलमान तरुणाच्या प्रेमात पडली तिने त्याच्याशी लग्न करू नये म्हणून आम्ही तिला सर्वोतपरी समजावून सांगितले, हेही म्हणालो कि आज तुला हे बरे वाटते आहे पण नंतर शंभर टक्के पस्तावशील, तिने ऐकले नाही, पुढे तेच झाले, पश्चातापातून ती दररोज ढसाढसा रडायची. शिवसेनेचे आघाडी करून त्या ब्राम्हण तरुणीसारखे झालेले आहे, उद्धव यांना नक्की मनस्ताप आणि पश्चाताप होतो आहे पण याक्षणी त्यांना बाहेर पडणे आता शक्य नाही...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Monday, 1 June 2020

विस्कटलेली घडी :पत्रकार हेमंत जोशी


विस्कटलेली घडी :पत्रकार हेमंत जोशी
मुख्यमंत्री सहाय्यता निधी जनतेच्या अडीअडचणीच्या काळातला अत्यंत उपयोगी असा निधी अर्थातच  हा निधी देण्याचा वाटण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना असतो आणि या निधीचा खऱ्या अर्थाने विशेषतः औषधोपचारावर विविध व्याधी उपचारांवर फार फार मोठ्या प्रमाणात उपयोग करवून घेतला तो देवेंद्र फडणवीसांनी त्यात त्यांना अतिशय मनापासून सहकार्य केले दिले ते त्यावेळेचे मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचा सहाय्यक रामेश्वर तसेच या निधीचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये यांनी आणि नेमके हेच सेवा कार्य इतरही मुख्यमंत्र्यांच्या हातून घडले तर त्यासारखे दुसरे पुण्य नाही अर्थात यातही गैरप्रकार घडतात घडलेले आहेत म्हणजे काही अत्यंत नालायक नेते ज्यांना अजिबात आर्थिक मदतीची गरज नसते त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून आपला उल्लू सिधा करवून घेतात या अशा नेत्यांपेक्षा रांडा बर्या, म्हणावे लागेल. हा विषय येथे यासाठी कि या कोरोनाच्या महामारीत याच मुख्यमंत्री सहाय्यता निधी ची जनतेला वारंवार गरज भासते आहे म्हणून अनेक दानशूर या निधीमध्ये स्वतःकडले दान टाकायला तयार आहेत पण माझ्या काही व्यावसायिक मित्रांचा वाईट अनुभव असा, त्यांनी लाखो रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये दान केले असतांनाही त्यांना प्रत्यक्ष बोलावून किंवा किमान फोनवरून आभाराचे दोन शब्द तर  दूरच पण साधे दोन ओळींचे पत्र  देखील अद्याप त्यांना माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाले नाही.  आपण केलेल्या सत्पात्री दानाची साधी दखल देखील जर घेतल्या जात नसेल तर असे दानशूर इतरांनाही सांगून मोकळे होतील कि दान इतरत्र करा पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला काहीही देण्याचे टाळा... 

www.vikrantjoshi.com

घरोघरी मातीच्या चुली विशेषतः या लॉकडाऊन च्या दिवसात अनेकांच्या घरातले प्रेम बिंग फुटले त्यातून  बहुतेक घरातून आपापसात मोठी भांडणे लागलेली आहेत. विद्याताई चव्हाण किंवा रावसाहेब दानवे याच्या घरातल्या भानगडी रस्त्यावर आल्या जगजाहीर झाल्या इतरांचे बिंग बाहेर फुटले नाही एवढाच काय फरक.दुर्दैव कसे बघा ज्या भानगडी विरोधात राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण रस्त्यावर उतरून भानगडी करणाऱ्यांन किंवा महिलांना त्रास देणाऱ्यांना जाब विचारायच्या आज त्याच विद्या चव्हाण यांच्या थेट घरातच त्यांनास्वतःला जाब विचारायची वेळ आलेली आहे कि नेमकी चूक कोणाची म्हणजे त्यांच्या सुनेची मुलाची कि त्यांची स्वतःची...

व्हाट्सअप हे अलीकडले भानगडींचे मोठे माहेरघर या काळात अनेकांची प्रेमप्रकरणे त्यामुळेच उजेडात आली.  चव्हाण यांचे वाद न्यायालयात असल्याने त्यावर फारसे भाष्य करता येणार नाही पण विद्याताईंच्या मुलाचे त्याच्या पत्नीशी मुळात भांडण उजेडात आले तेही या व्हाट्सअप मुळेच, लॉक डाऊन मुळे दोघेही सतत घरात एकमेकांच्या कायम संपर्कात समोरासमोर त्यामुळेच म्हणे आपल्या पत्नीच्या नको त्या भानगडी मुलाच्या लक्षात आल्या व तेथून त्यांच्यातले वाद वाढले मग सुनेने देखील चव्हाण कुटुंबावर जे आरोप केले ते ऐकून याच का त्या विद्या चव्हाण घडी विस्कटलेल्या महिलांच्या मसीहा असा प्रश्न माझ्यासारख्यांना पडला... सुनेकडे घरातल्यांनी दुर्लक्ष केले अन्याय केला म्हणून तिचे वाकडे पाऊल पडले कि त्या सुनेलाच या अशा चंचल सवयींची आवड विकृती होती त्यावर नेमका विचार होणे गरजेचे आहे. म्हणून माझे नेहमी हेच सांगणे असते, प्रदीर्घ वाईट अनुभवातून हेच म्हणणे असते कि सारे काही अविचाराने केले तर मला नाही वाटत  आयुष्यात फारसे काही बिघडते पण ज्याने त्याने प्रत्येकाने लग्न मात्र अतिशय विचारांती करावे आपली पुढे भविष्यात फसवणूक अडवणूक लुबाडणूक होणार नाही याचा अभ्यास करूनच सर्वांनी लग्नाच्या बेडीतअडकणे गरजेचे आहे अन्यथा विवाह संबंध एकदा का आपापसात घरात कुटुंबात बिघडले कि त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते आणि परिणाम पुढल्या पिढीवर निश्चित होतो. चव्हाण किंवा दानवे हा विषय येथेच संपत नाही...
क्रमश: हेमंत जोशी