Sunday, 31 May 2020

पवार बोले उद्धव डोले : पत्रकार हेमंत जोशीपवार बोले उद्धव डोले : पत्रकार हेमंत जोशी 
माझ्या पुढल्या वाक्यावर तुमच्यातले काही मला शिव्या हासडतील शिवीगाळ करतील दोष देतील टोमणे हाणतील शिव्याशाप देतील वेडा म्हणतील गाढव ठरवतील. माझे वाक्य असे कि उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख म्हणून दिवंगत बाळासाहेबांपेक्षा अधिक यशस्वी आहेत, बाप से बेटा सवाई आहे, बाळासाहेब हे सेनेतले दिलीपकुमार होते पण उद्धव हे अमिताभ आहेत, बाळासाहेब हे सचिन तेंडुलकर होते पण उद्धव तर थेट विराट कोहली आहेत ते धोणीच्याही पुढे निघून गेले आहेत म्हणून सेनेतील जो तो बुजुर्ग किंवा राज्याच्या राजकारणातला जो तो अनुभवी अगदी बेंबीच्या देठापासून ज्याला त्याला हेच सांगत सुटलाय कि उद्धव सेनाप्रमुख म्हणून अधिक योग्य अधिक उजवे त्यांनी मंत्रालयात कधीही पाय ठेऊ नये, याउलट अख्खे मंत्रालय उद्धव यांच्या एका हाकेवर मातोश्रीवर धावत पळत यावे. पुढले  वाक्य तर आणखी डेंजरस आहे त्या वाक्याने कदाचित माझ्या घरावर मोर्चे निघतील मला तोंड लपवत रस्त्याने फिरावे लागेल किंवा बेमालूम वेषांतर करून एखाद्याला भेटायला जावे लागेल किंवा कुठेतरी लपून बसावे लागेल थोडक्यात तोंड लपवत पुढले काही दिवस जगावे राहावे लागेल....

वाक्य असे कि, पत्रकारितेत मी अगदीच ज्युनियर होतो तेव्हापासून अगदी लहान वयात असतांना मी पत्रकारितेत आलो आणि अंतुले ते ठाकरे सारेच्या सारे मी ओळखत होतो म्हटल्यापेक्षा मला अंतुले  ते ठाकरे सारेच्या सारे मुख्यमंत्री जवळून ओळखत होते माझी पत्रकारिता ते जवळून पाहत आले किंवा  न्याहाळत आले, अंतुले ते ठाकरे यादरम्यान जे जे मुख्यमंत्री झाले त्यांच्यात सर्वाधिक यशस्वी सवाई पराक्रमी मुख्यमंत्री म्हणून कोण असे मूल्यमापन करणे नक्की शक्य नाही अशक्य आहे सांगणे कठीण आहे, काही अयशस्वी कोण होते कदाचित एखाद्याला सांगताही येईल पण माझी भीती फार वेगळी आहे याक्षणी माझा पत्रकारितेतला प्रदीर्घ अनुभव निदान माझ्या मनाला वारंवार हेच सांगतो आहे कि आजवर अंतुले यांच्यासहित ठाकरे यांच्यापर्यंत जे जे मुख्यमंत्री झाले त्यात सर्वाधिक अपयशी फेल्युअर मुख्यमंत्री  असा ठप्पा असा कायमस्वरूपी नापास शेरा उद्धव ठाकरे यांना बसू शकतो निदान आजतरी असेच नेमके  त्यांच्याबतीतले चित्र आहे जे त्यांना समस्त शिवसैनिकांना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम मराठी बंधू व भगिनींना धक्का देणारे अस्वस्थ करून सोडणारे आहे. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री होणे त्याचे वर्णन नेमक्या एका वाक्यात सांगायचे झाल्यास कावळा बसला आणि नेमकी त्याचवेळी फांदी तुटली... 

www.vikrantjoshi.com

एखाद्या बागेत प्रेमी युगुलांनी झाडाच्या आड चुंबन घेण्यासाठी ओठाचा चंबू करावा आणि त्याचवेळी पाठीमागून पोलिसांनी त्यांच्या कानात शिट्टी फुंकावी किंवा मागच्या दाराने प्रियकराने दबकत दबकत प्रेयसीच्या घरात प्रवेश करावा नेमका त्याचवेळी पुढल्या दराने तिच्या बाउंसर असलेल्या नवऱ्याने घरात प्रवेश करावा तसे उद्धव यांना मुख्यमंत्री होणे महागात पडले आहे अजिबात ध्यानी मनी नसतांना कोरोना व्हायरस ने उद्धव यांना मोठा दगा दिला त्यांच्या जणू मानगुटीवर येऊन बसला आहे अशाप्रकारे हनिमूनला निघालेल्या जोडप्याच्या जणू गाडीचे चाक हॉटेल येण्यापूर्वीच रस्त्यात पंचर झाले आहे. अलीकडले आघाडीचे आपापसात लागलेले भांडण किंवा उद्धव यांच्या विरोधातले बंड केवळ वरकरणी शांत झाले आहे अशी माझी खात्री आणि माहिती आहे. एवढेच सांगतो, काका पहेलवानांनी या पिटुकल्या बंडाच्या माध्यमातून थोडक्यात सांगायचे झाल्यास एकाच दगडात अनेक पक्षी तेही काँग्रेसच्या खांदयावर बंदूक ठेऊन अनेक शिकारी केल्या आहेत. पुण्याचे भोसले आणि मंत्रालयातले मेहता तुम्हा दोघांना मी याक्षणी हेच सांगतो यापुढे तुम्ही दोघे नव्हे तर शरद पवार सांगतील आणि उद्धव हो अशी मान डोलावतील... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Friday, 29 May 2020

From here & there....


From here & there...

This blog is aptly titled...There are various subjects. Here & there...

Will begin with introduction of a company which will be extremely helpful to IT professionals or for those in love with this field. Presently, it is in *beta* [till 31-5-2020] and it has a very robust free plan [with 10 boards + limited resources]. This SaaS platform is presently free for all during *BETA* phase.  This product competes with SaaS giants like Trello & Asana.  It has better features and on the price- front, it costs just about a small fraction of the competitors. [less than one $ per user in business plan.] BoardBell is presently trending in beta lists. It is a versatile project management & *work-from-anywhere* tool for focused teams. Kindly also read the blog on boardbell website for greater insights into the kanban-task-boards. Boardbell has a great offer ($100 credit) for those who join in Beta and convert to business plan. To know more click, www.boardbell.com
 • Read-RaGa called upon Thackeray's to sort out his statement which he made on an interview. Now the joke--He called on their landline, as even he knew, Ghar pe hi honge 😂😂. Jokes apart, I can understand as to why CM Uddhav Thackeray is at home because of his health, but what that has to do what Minister Aditya Thackeray? Why is he not seen as frequently as his counterpart Aslam Sheikh on the road? Someone make him understand he is 30 and his immune system is much better equipped to handle the pandemic than the most, if he gets it (God forbid). But at least one Thackeray should be seen on the road. Then see how Sainik's and your Shakha's perform! And for God sake, please someone tell Aaditya, he is a Minister for the entire state--not for Mumbai. When other guardian Ministers (I have forgotten half of their names till now....) and Shakha Pramukh's have given up on helping and are chilling at home, it will be him who can lead the fight from the front. Imagine the praise he will earn at this age.  Believe me, he should take a cue from HM Anil Deshmukh. Boss, this Home Minister whose term began with lot of controversies, is not resting even for 1 minute. He is continuously on the move from one city to another. He has also visited Dharavi. One day if he is Jalgaon , the next he is in Chandrapur. And no-not by any helicopter at all, he is doing it all by the road. Meeting SP's, collectors, giving motivation and so on...Hats off, Anilbabu...
 • Speaking of HM Deshmukh, has our "Gangs of Wassepur" officers-along with their favourite IAS--ran off to Himalayas or what? From the incident of Palghar to Bandra to this Covid, have not seen even one of them on the road or on the TV or releasing any statement.  And they are heading the state..haha...Believe me, CM Thackeray will hire a special charter from Bhosale (obviously he will ask some top officer only to coordinate) if anyone of you wish to come back  to address the issues of our city/state.
 • Moving on, Where is the great IPS Manoj Sharma? Heard he had developed 99 ka fever and boy, from that day to today--everyone below him is searching for Sharma. I thought he must be resting somewhere in Bandra, planning his next book, "How to impress"  but no--he is not even there. Past 2 days one WhatsApp about him was circulating in the Mumbai police. Instead of beating round the bush, I am directly telling you sir, everyone is angry. Sitting in AC chambers, and realising orders is not done....They are demanding at least ONCE in 20 days you should be on the field. Rest 19 days, books, meetings, planning chalega....😹
 • Now, everyone I knew in Mantralaya kept sending me messages to ask if the proposal to give another extension to CS Ajoy Mehta gone to the Centre. My only reply to them was--leaving his friends in the bureaucracy, every one from the Cabinet Ministers to the IAS lobby, everyone  means absolutely everyone will sit on a 'Dharna' not caring about the heat & Covid outside Mantralaya, if he gets the extension. Yes, there is a lot of growing displeasure amongst everyone about Mehta. Reason simple, no bull-shit is tolerated by him and he does not sign what pleases you! But again no one is ready to speak against this growing displeasure as everyone fears he/she might be singled out. But then one man spoke. Files were not getting cleared. And when he speaks, it is game over for many, almost all. Even, CM Thackeray had to agree to this man when he spoke. I heard in a close door meeting of Pawar-Thackeray-Raut few days back, Ajoy Mehta was discussed. Some firm decisions were taken as I'm told even the senior Pawar was beginning to get helpless. Don't be surprised, if a Sakal or Lokmat or even Times have some few interesting stories coming up. But friends, don't underestimate Mehta. He might come back at the CMO after his retirement with powers equivalent to that of Cabinet Minister. Sitaram Kunte in front for CS in June!
www.vikrantjoshi.com
 • Our favourite Jitendra Awhad is back after facing Corona. Sir, want to share something! Once when you were lying in the bed at the hospital, the doctors had almost given up hope and the same concern was shared to your party head, Sharad Kaka and to CM Thackeray. The news obviously spread. Do you know even in this period, who according to you was lobbying hard to get your portfolio first without even showing any remorse?? None other than your 'muslim' friend in your party, sir. It was almost decided that he will take this responsibility as a Minister Housing. But then you recovered. BTW, ask Jayant Patil, he will tell you what all happened...I'm telling you--everyone in the Housing Department right from Mhada to the SRA to the peon and even the officer you abused,--prayed, "Eh Khuda!, Dede Humari dua ka Jawaab, Humko Nahi Chahiye Nawab"😹
 • Wow speaking of other cities, heard in Akola and Jalgaon the situation is worst. In Akola, heard promotee Collector Jitendra Papalkar is dangerous. He does what pleases him. The city, which has less population as compared to other major cities in Vidharbha, the increase in terms of cases is really alarming. Collector after few days of lockdown opened everything which lead to the pandemic spread and today Akola is seeing red because of this foolish decision. No one in the city even during the lockdown cares about anything. No discipline nothing! The figure has crossed 400 by now... Papalkar, ask bureaucrats who have served Akola. It is easy to make them fall in love with you, but next to impossible to stop them once they are angry!
 • Similarly Jalgaon. Here only one man runs the show....No not Sureshdada Jain, Eknath Khadse or a Girish Mahajan or a Ishwar babu Jain or Collector Avinash Dhakne. It is the Dean of Government Medical College Dr. B S Khaire who along with the Municipal Commissioner is calling the shots. It is as per his wishes & whims city is functioning. Many prestigious families who are fighting Covid collectively, had called everyone to complain against this Dean, but of no use. Time for a change in the GMC for Jalgaon....
Vikrant Hemant Joshi 

Tuesday, 26 May 2020

राज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी


राज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी 
शिवसेनाप्रमुख  उद्धव ठाकरे कि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, मी जे ते मुख्यमंत्री झाल्या झाल्या अगदी सुरुवातीला सांगितले होते तेच आज तुमचेही सांगणे म्हणणे असेल कि ठाकरे कुटुंबीयांनी यावेळी जो काय स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला तो पुरेसा आहे निदान यापुढे तरी त्यांनी कधीही सत्तेचा मोह बाळगू नये त्या मंत्रालयाचे तोंड देखील बघू नये. राजाने कधीही प्रधान व्हायचे नसते, वाघाने कधीही माकडिणीला डोळा मारायचा नसतो, सिंहाने कधीही हजामत करायला सलून मध्ये जाऊन न्हाव्यासमोर मान झुकवायची नसते आणि एखाद्याने कधीही गाढवाच्या ढुंगणाची पप्पी घ्यायची नसते. उद्धव ठाकरे हे कायम राजाच्या भूमिकेतच शोभणारे, त्यांनी मातोश्रीवर बसून रुबाब करायचा असतो प्रसंगी समोरचा कोणीही भलेही राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असो अथवा पंतप्रधान होण्यास इच्छुक असो इच्छुकाने यांच्या कडे जायचे असते, यांच्यावर त्यांच्याकडे जाण्याचा, बाहेर बाकावर बसून वाट पाहण्याचा वाईट प्रसंग येत असेल तर सारे संपले म्हणून समजावे. उद्धव यांना अवदसा आठवली, त्यांनी झक मारली आणि ते व त्यांचे चिरंजीव सत्तेत घुसले खुर्चीवर जाऊन बसले. अजूनही खूप काही बिघडले असे नाही, उद्धव व आदित्य या दोघांनीही मंत्रालयातून बाहेर पडावे आणि या राज्यातल्या ज्याला त्याला त्याची जागा दाखवून दयावी...

कोरोना चे गांभीर्य माझ्या लक्षात येत होते, उद्या अगदी रस्त्यावर हजारो माणसे मारून पडतील ढिसाळ  पद्धतीने सारे नियोजन केल्या जात होते म्हणून मी हे तेव्हाच सांगितले होते, नेमके आता तेच घडते आहे, परिस्थिती एवढी गंभीर आहे कि प्रेतं ठेवायला जागा उरणार नाही. यात उद्धव यांची फारशी चूक नाही, अननुभवी उद्धव खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांच्यावर व जनतेवर हे गहिरे गंभीर घोर संकट ओढवले आहे. खुद्द शिवसैनिकांना देखील यादिवसात कळत नाही कि रस्त्यावर उतरून आंदोलन करावे कि जे काय या कठीण दिवसात घरात बसून आहोत तेच चालू ठेवावे. यादिवसात संघ स्वयंसेवक सोडले इतर कोणीही फारसे सामाजिक बांधिलकी जपताना रस्त्यावर येऊन मदत सहकार्य करतांना दिसत नाहीत. जे असंख्य विशेषतः सोशल मीडियावर किंवा गावागावात होर्डिंग्स लावून स्वतःला वाघ सिंह दादा नेता समाजसेवक म्हणून घ्यायचे, कर्तृत्वाचा कमी जातीचा अधिक आधार घेऊन फुक्काची शान मारत बापाने घेऊन दिलेल्या मोटार बाईकवर बसून गावाबाहेर भरपेट दारू ढोसून घरी त्याच घाणेरड्या तोंडाने येऊन स्वतःच्या बायकांवर शारीरिक व मानसिक अत्याचार करायचे ते सारेच्या सारे कोणत्या बिळात लपून बसले आहेत वर त्यांचे तोंड देखील बघायला मिळत नाही एवढे ते त्या पोलिसांच्या दांडक्यांना घाबरलेले आहेत. संकट मग ते कितीही भयावह असो आजतागायत शिवसैनिक रस्त्यावर उतरून मराठी माणसाचे तारणहार ठरले नाहीत असे कधीही याआधी घडले नाही, शिवसैनिकांचे आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणे व संघ स्वयंसेवकांचे नियोजनपूर्वक धावून जाणे हे मराठी माणसाला नेहमीचेच वेड लावणारे काम, पण साहेब तिकडे सहाव्या माळ्यावर जाऊन बसल्याने आपल्या समस्त शिवसैनिकांची काहीशी गोची नक्की झालेली आहे. वाईट याचे वाटते कि उद्धव मुख्यमंत्री म्हणून नको त्या एक दोन बदमाशांच्या हातचे बाहुले ठरले आहे झपाट्याने ठरताहेत, दुबळे शिवसेनाप्रमुख हे दृश्य समस्त महाराष्ट्राला अस्वस्थ करून सोडणारे आहे. जी अगदी उघड व्यथा सांगण्याची सुरुवात पृथ्वीराज चव्हाण व राहुल गांधी यांनी केली आहे त्यातून हे आघाडीचे पडलेले भोक कोणत्याही ठिगळाने जोडल्या जाईल असे अजिबात वाटत नाही, मोठी दरी शंभर टक्के निर्माण झाली आहे. आम्हाला असल्या सत्तेत रस नाही हेच जणू अगदी उघड काँग्रेसने सांगून टाकले आहे... 

www.vikrantjoshi.com

अत्यंत महत्वाचे म्हणजे ही ती वेळ नाही उद्धव यांची खुर्ची खेचून घेण्याची आणि हे देवेंद्र फडणवीस चांगले जाणून आहेत कारण त्यांना हे पक्के माहित आहे कि जर असे काही विशेषतः भाजपाकडून केल्या गेले तर त्यांचा निदान या राज्यातला तरी मिळविलेल्या लोकप्रियतेचा ग्राफ झपाट्याने खाली येऊन त्याचा मोठा फायदा विशेषतः शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना होईल, सेनेला त्यातून जनतेची सहानुभूती मिळेल, त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होऊपर्यंत या राज्यात सत्तेची कोणतीही उलथापालथ होणार नाही जरी राष्ट्रवादी आणि भाजपा यांना एकत्र येऊन सत्तेत यायचे असले तरी आणि याच संधीचा नेमका फायदा उचलणारा गडकरी सारखा एखादा नेता जर पुढे आला आणि अशा नेत्याने जर भाजपा व उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय
घडवून आणला तर पुन्हा एकवार शिवसेना भाजपा हि मराठी हि हिंदू युती बेरजेच्या राजकारणाला सुरुवात करून समस्त हिंदूंना दिलासा देऊ शकते. अगदीच एक दोन दिवसांच्या फरकाने २५-२६ मे दरम्यान आधी उद्धव आणि नंतर देवेंद्र दूरदर्शनच्या माध्यमातून जनतेसमोर आले त्यात देवेंद्र उजवे ठरले आणि उद्धव यांना शाळेतले मूल भाषण लिहून देते कि काय, बघणाऱ्या अनुभवींना ते वाटले. आणि हेच नेमके घडता कामा नये, या दोघांच्या भांडणात मानसिक बळी समस्त मराठींचा जाऊन या राज्याशी फारसा संबंध नसलेले सत्तेत बसल्याने माजोर्डे होताहेत जे अतिशय गंभीर आहे. एकमेकात सामंजस्य आणि गहिरी दोस्ती मैत्री हे महाजन मुंडे आणि बाळासाहेब कॉम्बिनेशन पुन्हा एकवार उद्धव देवेंद्र यांच्या रूपाने बघायला मिळावे. अन्यथा तो दिस फार दूर नाही कि सत्तेत बसल्याने ठाकरे कुटुंबीयाने त्यांचे व शिवसेनेचे मोठे नुकसान करवून घेतले. शरद पवार एकदा का घरातून बाहेर पडले कि समजून घ्यावे कि काहीतरी राजकारण बिघडले आहे आणि पवारांनी त्यामुळे वेगळी पावले उचलायला सुरुवात केली आहे. पुन्हा सांगतो पुढल्या काही महिन्यात भाजपा-राष्ट्रवादी आघाडी बघायला मिळाल्यास अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नये...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी
Monday, 25 May 2020

गायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी

गायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी 
नितीन गडकरी यांनी मुंबई पुणे जलदगती महामार्ग उभा केला आणि बघता बघता पुण्याचा महाकाय महापालट झाला. दुर्लक्षित मराठवाडा आणि विदर्भाचे खऱ्या अर्थाने प्रगत पुणे करायचे असेल तर हे काम पुन्हा एखाद्या विदर्भवीरानेच हाती घेणे जरुरी होते, परमेश्वर कृपेने ते घडले गडकरी यांच्यानंतर राज्याचे लक्ष देवेंद्र फडणवीसांनी वेधून घेतले आणि त्यांनीही समृद्धीचे आव्हान स्वीकारले, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर आत्तापर्यंत समृद्धीचे काम जवळपास संपत देखील आले असते अर्थात या कामात आघाडीने विशेषतः मुख्यमंत्री ठाकरे यांनी खोडा घातला असे अजिबात कोठेही घडले नाही याउलट त्यांनी समृद्धी महामार्ग काम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आवश्यक ते फंड्स उपलब्ध करून दिले. समृद्धी चे आव्हान जसे फडणवीसांनी स्वीकारले त्याच ताकदीने हि जबाबदारी प्रशासकीय अधिकारी कामातला वाघ माणूस राधेश्याम मोपलवार यांनीही स्वीकारली. मी तर असे म्हणतो जोपर्यंत समृद्धी महामार्ग पूर्णतः दृष्टीक्षेपात येत नाही तोपर्यंत राधेश्याम मोपलवार आणि त्यांचे सहकारी बांधकाम खात्याचे सचिव अनिल गायकवाड या दोघांनाही तेथून हटवू हलवू नये. अर्थात गायकवाड मोपलवार या दोघांच्या कामाची ताकद मंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांनी अतिशय जवळून न्याहाळली आणि बघितली असल्याने ते उद्धवजींना चुकीचा निर्णय घेऊच देणार नाहीत आणि उद्धव ठाकरे देखील तशी चूक नक्की करणार नाहीत...

जसे समृद्धी चे काम गायकवाड आणि मोपलवार हि जोडगळी लीलया पूर्णत्वाकडे घेऊन जाईल तोच विश्वास मला जेव्हा याच अनिल गायकवाड यांनी दिल्लीत ज्या महाप्रचंड महाराष्ट्र सदनाची जबाबदारी स्वतःकडे घेतली, तेव्हाही मी भुजबळांना तेच म्हणालो होतो जे मोपलवार यांना गायकवाड समृद्धी साठी त्यांच्याकडे रुजू झाले तेव्हा कि माझा हा अतिशय लाडका मेहनती बुद्धिमान दिलदार मितभाषी कवी मनाचा एकपाठी मित्र जे काम हाती घेतो ते तो लीलया पूर्ण करतो यशस्वी करूनच दाखवतो सांगितले होते ते तसेच भुजबळांना देखील मी म्हणालो होतो कारण जसे मी राधेश्याम मोपालवारांना चांगला मित्र आणि प्रगल्भ अधिकारी म्हणून त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीच्या कारकिर्दीपासून जसे अगदी जवळून बघतो ओळखतो ते तसेच अनिल गायकवाडांना देखील मी एक मित्र म्हणून आणि यशस्वी अभियंता म्हणून ओळखतो बघतो, पुढे नेमके तेच घडले. शरद पवार आणि छगन भुजबळ यांचे महाकाय स्वप्न म्हणजे दिल्लीतले महाराष्ट्र सदन उभे करण्यात गायकवाड यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले. पण नको त्या तक्रारी त्यांच्याविरुद्ध तयावेळी करण्यात आल्या आणि खऱ्या अर्थाने चोर सोडून त्यावेळी संन्याशाला सजा झाली, गायकवाडांना २०१५ मध्ये लाचलुचपत खात्याने कुठल्याशा प्रकरणी अडकवले, खरे दोषी सहीसलामत दूर राहिले आणि गायकवाड यांना काही काळ निलंबित करण्यात आले...

www.vikrantjoshi.com

अगदी अलीकडे अनिलकुमार गायकवाड यांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष म्हणून सिद्ध केले आहे हे एका अर्थाने चांगले घडले पण सार्वजनिक बांधकाम खात्यातील जो मुख्य अभियंता या राज्याचा केव्हाच सचिव म्हणून नावारूपाला आला असता त्या अनिलकुमार यांच्या आयुष्यातले तब्बल पाच वर्षे न्यायालयाचे उंबरठे झिजविण्यात आणि नको ते अपमान सहन करण्यात गेले. देवाकडे देर आहे पण अंधेर नाही त्यामुळे खिशातला शेवटचा आणा संपेपर्यंत लोकांना अनेकांना हजारोंना मदत करणारा विशेष म्हणजे घरात राजकीय प्रभावी पार्शवभूमी असतांना देखील अन्यायग्रस्त ठरलेला हा कित्येकांचा दुवा मिळविणारा कलंदर शेवटी नेमका न्यायालयाने योग्य न्याय देऊन लोकांसमोर आणला. छगन भुजबळ यांचा बांधकाम मंत्री म्हणून कार्यकाळ आणि त्यांचा सर्वार्थाने गैरफायदा घेणारे मलाईवर ताव मारून मोकळे झाले कुठेही सापडले नाहीत पण अनिलकुमार गायकवाड बळीचा बकरा ठरले. त्यांनी मनात आणले असते तर न्यायालयापुढे खऱ्या दोषी मंडळींना ते उभे करू शकले असते पण येथेही ते मैत्रीला आणि अंगच्या दिलदार वृत्तीला जागले आणि पुढे पाच वर्षे अन्याय अपमान कोर्ट कचेऱ्या सहन करीत गेले. देवाने आणि न्यायालयाने त्यांना सच्चाईचे बक्षीस दिले आहे. गायकवाड आता लवकरच अधिकृतरीत्या राज्याचे बांधकाम खात्याचे सचिव म्हणून पुढल्या कामगिरीवर पुन्हा निघतील, रुजू होतील..
तूर्त एवढेच : हेमंत जोशी


Saturday, 23 May 2020

उद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी


उद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी 
अत्यंत महत्वाचे सांगतो, शिवसेनेत राज्य नेमके कसे चालवावे याचे नेमके प्रशिक्षण असलेले फारसे कोणीही नाही, आघाडीतले इतर घटक पक्ष नेमका आणि योग्य सल्ला उद्धवजींना द्यायला कोणीही तयार नाही थोडक्यात शासनातले सिक्रेट्स सांगायला राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले अजिबात तयार नाहीत म्हणून उद्धवजी बरेचसे राज्याच्या मुख्य सचिवांवर म्हणजे अजोय मेहता यांच्यावर अवलंबून आहेत त्यामुळे अजोय मेहता आणि पुण्याचा भोसले बंद दरवाज्याआड जे ठरवितात ते तसे उद्धव यांना सल्ला देऊन मेहता मोकळे होतात, उद्धवजींचे मन यादिवसात मेहता पूर्णतः जिंकण्यात यशस्वी ठरले आहेत जे अयोग्य आहे असे मी अजिबात म्हणणार नाही कारण मेहता हा शासन व प्रशासनातील नक्की बाप माणूस आहे फक्त अडचण तेवढीच आहे कि तो भोसले हाच १९९५ ते आजतागायत भिंती आड राहून त्याला हवे तसे हे राज्य शेकाटतो आहे मग सत्तेत कोणत्याही विचारांचे कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरी. उद्धवजींच्या बाबतीत हा अत्यंत कठीण परीक्षेचा काळ आहे, लग्न व्हावे आणि पुढल्या चार दिवसातच एखादी तरुणी विधवा व्हावी तसे उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत घडले आहे. दुर्दैवाने एकतर विधान सभा निवडणूक आटोपल्यानंतर सुरुवातीचे चार महिने काहीच घडले नाही, मंत्रिमंडळ विना हे राज्य कसेबसे चालले होते नंतर उद्धव मुख्यमंत्री झाल्या झाल्या हे कोरोना संकट आले उद्धवजींच्या बाबतीत सांगायचे झाल्यास ऐन मधुचंद्राच्या रात्रीलाच नववधूला पुढे सात आठ दिवस टिकणारी मासिक पाळी आली....

काही माणसे चांगले नशीब घेऊनच मला वाटते जन्माला येतात. विशेषतः या राज्यातल्या बहुसंख्य हजारो निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत तसे याठिकाणी हमखास सांगता म्हणता बोलता येईल. एकतर बहुसंख्य शासकीय प्रशासकीय अधिकारी आयुष्यभर प्रचंड वरकमाई करतात नंतर ते निवृत्त झाले तरी सरकारी निवृत्ती वेतन त्यांना पुढे त्यांच्या पत्नीला अखेरच्या श्वासापर्यंत मिळतच राहते असते. येथपर्यंत ठीक आहे पण उद्धवजींच्या नजरेत येथे या कठीण दिवसात एक अतिशय
महत्वाचा असा पुरावा मी आणू इच्छितो, तो असा कि असे कितीतरी शासकीय प्रशासकी अधिकारी या राज्यात त्यांच्या निवृत्ती नंतर देखील आजही अमाप समाप कमाई करताहेत. विशेषतः सध्याच्या या गंभीर परिस्थितीत हे राज्य या मंडळींनी लुटणे गंभीर असा प्रकार आहे ज्यात मुख्यमंत्र्यांनी अतिशय तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. असे अनेक कर्मचारी आणि अधिकारी आहेत जे सेवानिवृत्त झाल्या नंतर देखील कित्येक वर्षे थेट पुन्हा शासकीय सेवेत विविध महामंडळांवर प्रतिनियुक्त केल्या गेले आहेत. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे हे जे कर्मचारी किंवा अधिकारी जेव्हा केव्हा शासकीय सेवेत होते त्यातले जवळपास ९९ टक्के त्यांच्या वरकमाई साठी कुप्रसिद्ध होते थोडक्यात अतिशय भ्रष्ट होते नेमक्या त्याच कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांनी याच साठी प्रति नियुक्ती वर घेतले आहे कि येथे देखील त्यांनी तेच पूर्वीचे वरकमाईचे काम करावे आणि आपण स्वतः खावे व वरिष्ठांना कमावून द्यावे...

www.vikrantjoshi.com

प्रतिनियुक्ती झालेले बहुसंख्य कर्मचारी अधिकारी त्यांच्या निवृत्ती आधी एकतर राजकीय दृष्ट्या मोठे प्रभावी होते विशेषतः हे सारे मंत्रालयाशी या ना त्या कारणाने संबंधित असल्याने प्रतिनियुक्ती करवून घेतांना त्यांना कसलीही अडचण भासली नाही आली नाही. विशेषतः या राज्यात म्हाडा, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, एमटीडीसी, परिवहन महामंडळ, मेट्रो सारखे बहुसंख्य मलिदा देणारे महामंडळे आणि मंत्री आस्थापना किंवा तत्सम सरकारी कार्यालये हेच या निवृत्त भ्रष्ट बदमाश भामट्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे टार्गेट असते आणि ते मोठ्या खुबीने आपले राजकीय प्रशासकीय शासकीय लागेबांधे वापरून निवृत्तीनंतर थेट पुढली दहा दहा वर्षे प्रतिनियुक्ती वर अतिशय लाभाचे मोठे पद अधिकार मिळवून त्यावर जाऊन बसतात आणि जेवढी वरकमाई  आधी केलेली असते तेवढीच निवृत्ती नंतर देखील करवून घेतात. लबाड हलकट बेशरम हरामखोर थर्डग्रेड नीच पाजी दलाल संधीसाधू कुठले. ना त्यांना जनाची वाटते ना मनाची. इकडे निवृत्तीनंतरचे सारे आर्थिक लाभ तर सरकारकडून उकळायचेच वरून लाभाच्या प्रतिनियुक्त्या मिळवून सरकारला अखेरच्या श्वासापर्यंत पुनःपुन्हा लुटत राहायचे. अत्यंत घृणास्पद म्हणजे सरकारी नोकरीत असतांना ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप होते नेमके असेच बहुसंख्य प्रतिनियुक्तीवर येऊन बसलेले आहेत हे विशेष...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Friday, 22 May 2020

वाहवा ! आता काय तर उद्धवा : पत्रकार हेमंत जोशी


वाहवा ! आता काय तर उद्धवा : पत्रकार हेमंत जोशी 
निदान पुढले आणखी काही महिने, त्यांना काम करू द्या, त्यांच्या कामाची पद्धत तर बघा, अगदीच फेल्युअर ठरले वाटले तर त्यांच्या नावानेही मग खडे फोडायला सुरुवात करा, आमची काहीही हरकत नसेल. होय, उद्धवजींच्याही नावाने बोंबाबोंब करणे सुरु झाले आहे कि त्यांना पोलिटिकल आणि कोरोना दोन्हीकडे अपयश येते आहे. इट्स टू अर्ली, एवढेच मी तुम्हाला सांगू शकतो कारण तुमचे कोणाचेही तोंड दाबणे धरणे माझ्या हातात नाही. कोरोना या जीवघेण्या महामारीमध्ये कोण मुख्यमंत्री म्हणून अधिक योग्य ठरले असते अशी चर्चा सध्या सर्वत्र सर्हास ऐकायला मिळते आणि उत्तर असते, अर्थात देवेंद्र फडणवीस. याउलट माझे मत त्यावर एकदम वेगळे आहे, कोरोना महामारी योग्य रीतीने त्या नारायण राणे यांनी अधिक हाताळली असती त्यानंतर माझा अर्थात प्रेफरन्स आहे नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि पृथ्वीराज चव्हाण यांना. सध्या कोणीही कोणाचे ऐकत नाही हि जी शासन आणि प्रशासनात अस्वस्थता आहे त्यावर या तिघांनी नक्की चांगला तोडगा काढून लगेचच हाती चाबूक घेतला असता. उद्धवजी नवीन आहेत मान्य आहे, अननुभवी आहेत, एकदम मान्य आहे पण ते लेचेपेचे आहेत असे जर तुमचे म्हणणे असेल ते मला तरी अजिबात मान्य नाही कारण जेव्हा केव्हा त्यांची सटकते ना तेव्हा याच उद्धव सारखा खतरनाक नेता मी बघितलेला नाही, हा नेता प्रसंगी एवढा खतरनाक ठरतो कि अशावेळी ते शरद पवार देखील त्यांच्यासमोर थेट बालक मंदिरात जाणारे पिटुकले इवलेशे कुकुलु बाळ ठरतील वाटतील... 

या कोरोना महामारीच्या दिवसात समजा तुम्हाला शासनाचा प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव असेल तर उद्धव यांना अवश्य सूचना करा उद्धव यांची चांगली सवय आहे कि ते केलेल्या सूचनांचा आदर करतात प्रसंगी कठोर निर्णय घेऊन ते नक्की मोकळे होतील. तुमच्या मनात त्यांना सूचना करायचे नक्की असेल तर फक्त आणि फक्त या पत्त्यावर पत्र पाठवून मोकळे व्हा.  श्री मिलिंद नार्वेकर, मातोश्री बांगला, साहित्य सहवास, बांद्रा पूर्व, मुंबई. इतर कोणी " शहा " जोग दलाल सांगून मोकळे होत असतील कि यादिवसात बढत्या बदल्या किंवा वर्गण्या इत्यादीसाठी आम्ही उद्धवजींचे उजवे हात आहोत तर त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेऊ नये, ती तुमची शुद्ध फसवणूक ठरेल. अलीकडे मला काही उद्योगपती व्यापारी व्यवसायिक मित्रांनी फोन करून सांगितले कि काही शहाजोग मंडळी त्यांच्यासारख्यांना फोन वरून किंवा प्रत्यक्ष बोलावून सांगताहेत कि उद्धवजींना या महामारी दरम्यान दररोज अनेकांना जेवण द्यायचे असते किंवा आर्थिक मदत करायची असते त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. त्यावर साऱ्या मित्रांना एवढेच सांगितले कि उद्धव यांना जेवढे मी ओळखतो तेवढे मला नाही वाटत फार कोणी ओळखलेले असेल. अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्धव असे चिप काम करायला कधीही कोणाला सांगत नाहीत सांगणार नाहीत उद्या  एकनाथ शिंदे अनिल परब संजय राऊत यांचे जरी तुम्हाला उद्धव यांच्या नावाने असे फोन आलेत तरी विश्वास ठेऊ नका, सीझन्ड सेना नेते असे वागणार देखील नाहीत अर्थात एखादा नवखा दलालच अशा चुका करू शकतो, इतर सेना नेते नक्की कधीही असे करणार नाहीत, याउलट तुम्ही हे असे वाईट गलत काम करणाऱ्याचे नाव थेट उद्धव यांनाच सांगून मोकळे व्हा, अशा भामट्या शहाजोग मंडळींची मग क्षणार्धात हजेरी घेऊन अशांना मातोश्रीवरून नोव्हेअर केले जाते...

www.vikrantjoshi.com

एखादा दलाल मातोश्रीच्या जवळ आहे असे भासविण्याचा प्रयत्न करण्यासाठी अनेकदा सेनाभवनाचा आसरा घेऊन मोकळा होतो, सेना भवन ते मातोश्री मानसिकदृष्ट्या फार मोठे अंतर आहे किंवा जे सेना भवनात बसतात त्यांना मातोश्रीवर मानाचे स्थान असते असे नसते त्यातला एखादाच हर्षल प्रधान असतो ज्याचा थेट कुटुंबातल्या इतरांशी नव्हे तर फक्त उद्धवजींशी संपर्क असतो आणि जे हर्षल यांच्यासारखे सावध राहून तेथे त्या वर्तुळात मेहनत घेतात त्यांनाच पुढे चांगली फळे त्या संजय राऊत यांच्यासारखी खायला मिळतात, बदमाशी करणाऱ्यांचा निभाव लागत नाही त्यांचा कचरा होतो, संजय निरुपम होतो, कालांतराने अशांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो. आजतागायतच्या ठाकरे घराण्यातले सर्वाधिक कणखर ठरले दिसले आहेत ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे, तुम्ही सामान्य वाचक,  त्यांना तुम्ही अजिबात जवळून बघितलेले नाही, त्यांना तुम्ही फारसे ओळखून नाहीत, माझ्यावर विश्वास ठेवा, या माणसाची एकदा का सटकली कि त्याच्यासारखा खतरनाक नेता मी आजतागायत बघितलेला नाही. यादिवसात उद्धव नक्की नेमके लक्ष ठेऊन आहेत कि शासन प्रशासनातले नेमके कोण कोण त्यांना फसवते आहे, एकदा का त्यांना खात्री पटली कि मग बघा उद्धव कसे आक्रमक ठरतील ते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी  

खडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


खडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
सत्ता हि पिंजरा सिनेमातल्या मास्तर सारखी अवस्था करते. सत्तेचा कैफ भल्याभल्यांचा पिंजरा सिनेमातला मास्तर करतो, सत्तेच्या व्यसनापायी मग हा नेता त्या मास्तर सारखा काहीही करतो आणि स्वतःचे वाटोळे करून घेतो. सत्तेत बसल्यानंतर आपोआप होणाऱ्या घडणाऱ्या चुका या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीसारख्या हे कळत असूनही कि पुढे त्यात सत्यानाश आहे तरीही चुका भानगडी करतात  कारण सत्ता हि चीज अशीच आहे कि ज्याला सत्तेचे व्यसन जडले आणि सत्तेतून जो मोह उत्पन्न होतो मोह वाढीस लागतो त्या नेत्याला त्या त्या व्यक्तीला मग दुसरे काहीही सुचत नाही, समाजसेवा लोकसेवा गरिबांची सेवा राज्याची प्रगती या साऱ्या केवळ अफवा असतात ठरतात. राज्याच्या राजकारणावर सुरुवात करण्यापूर्वी एकनाथ खडसे हा विषय येथे संपवून मोकळा होतो. खडसे आणि कुटुंबाला चढलेला सत्तेचा कैफ हाच त्यांच्या राजकीय अस्ताचे कारण ठरणार आहे. बघा, चार दिवसात खडसे शांत झाले आणि खडसे हा विषय भाजपा व त्यांच्या नेत्यांसाठी जवळपास संपलेला आहे. ज्यांनी पक्षांतर्गत आदळआपट केली त्यांचे पुढे फार भले झाले असे कधी घडले नाही आणि एकनाथ खडसे यांच्यासमोर तर सुरेशदादा जैन हे त्यासाठी उत्तम उदाहरण होते. कायम सतत आदळआपट करीत राहिल्याने जे सुरेशदादा आणखी खूप काही मिळवून मोकळे झाले असते उलट त्यांच्या त्या आक्रस्ताळ्या स्वभावातून  त्यांच्या राजकीय आयुष्याचा शेवट दुर्दैवाने तुरुंगात झाला, राजकारणातला जळगाव जिल्ह्यातला हा वटवृक्ष गर्व झाल्याने उन्मळून पडला...

एकनाथ खडसे यांच्याही बाबतीत नेमके तेच घडते आहे किंवा घडले आहे निदान यापुढे तरी त्यांनी त्यांच्याच पक्षश्रेष्ठींपुढे नरमाईचे धोरण स्वीकारून तुम्हाला यापुढे पुन्हा पूर्वीचा किंवा पूर्णतः बदललेला एकनाथ दिसेल सांगून मोकळे व्हावे त्यातच त्यांचे व त्यांच्या पाठी त्यांच्या कुटुंबाचे अधिक भले आहे. जसे एकेकाळी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरेशदादा जैन अनभिषिक्त सम्राट म्हणून गाजले नावाजले तदनंतर त्यांची जागा एकनाथ खडसे यांनी घेतली, आज फारसे वेगळे चित्र नाही खडसे यांचाही सिनेमातला राजेश खन्ना होतो आहे, जिल्ह्यातला राजेश खन्ना नंतरचा सुपरस्टार जसा अमिताभ बच्चन होता तसा तेथे तो राजकीय सुपरस्टार सध्या गिरीश महाजन आहे, मधेच एखादा सलमान खान मोठा होऊ शकतो कारण सत्तेत टिकून राहण्यासाठी आधी पाय जमिनीवर असणे अत्यावश्यक आवश्यक गरजेचे असते. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे सत्तेत इतरांनाही सहभागी करून घ्यायचे असते, पैसे आणि सत्तेतली सारी महत्वाची पदे फक्त माझ्या कुटुंबासाठी म्हणजे कधी पत्नीसाठी तर कधी एकुलत्या एक मुलासाठी कधी विधवा सुनेसाठी तर कधी लाडक्या मुलींसाठी, त्यापलीकडे एकनाथ खडसे यांना मला वाटते दुसरे जग असते, विसर पडल्याने त्यांच्या या स्वकेंद्रित सत्ताकेंद्राचा त्यांना तोटा झाला आणि ज्याला त्यांनी तोवर दाबून ठेवले होते तो तडतड्या गिरीश महाजन अचानक उफाळून वर आला व केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातला यशस्वी मोठा नेता म्हणून नावारूपाला आला....

www.vikrantjoshi.com

गिरीश महाजन यांना मी त्यांच्या अगदी तरुण वयापासून बऱ्यापैकी जवळून बघत आलो, माणूस एकदम खूप खट्याळ आणि मस्तीखोर आहे म्हणजे एकदा का त्याने ठरविले कि अमुक व्यक्तीला बिलगून कवटाळून मिठीत घट्ट पकडून जवळ घेऊन पटापट मुके घेऊन मोकळे व्हायचे कि मग तो त्यात यशस्वी होऊनच बाहेर पडतो, त्याचे हे घट्ट बिलगून राहणे म्हणजे मैत्रीला जगणे विशेषतः चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही प्रभावी पक्ष नेत्यांना मनापासून आवडले भावले, मग त्यांनीही महाजन यांना मिठीत घेतले कुरवाळले, इश्य आणि गोंजारले देखील, तोपर्यंत एकनाथ खडसे यांची राजकीय मिठी सैल पडली होती ढिली पडली होती, त्याचा नेमका फायदा महाजन यांना झाला आता निदान खान्देश पंचक्रोशीत तरी भाजपा पक्ष श्रेष्ठींना महाजन प्रभावी ठरल्याने खडसे यांची तेवढी गरज उरलेली नाही. उद्या समजा चुकून खडसे भाजपातून बाहेर पडले असते तर याच जळगाव जिल्ह्यात जे ११ आमदार विधान सभेवर आहेत त्यापैकी एकही त्यांच्या संगतीने बाहेर पडला नसता, अगदी ज्या आमदार संजय सावकारे यांना खडसे यांनी मोठी राजकीय ताकद देऊन भुसावळ मधल्या वादग्रस्त चौधरी बंधूंना राजकीय अडगळीत नेऊन सोडले ते संजय सावकारे देखील एकनाथ खडसे यांच्या सोबत बाहेर पडले नसते, एकेकाळी जळगाव जिल्ह्यातले ताकदवर ठरलेले गुजर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते देखील आता खडसे यांच्यापासून केव्हाच दूर गेले आहेत कारण या समाजाला त्यांचे रावेर चे नंदू महाजन हे विधान सभेला उमेदवार म्हणून हवे होते पण खडसे यांनी तेथेही रोहिणीला म्हणजे पोटच्या पोरीला पुढे केले, गुजर समाज खडसे यांच्यावर रुसला आणि रोहिणीच्या विधान सभेला पराभव झाला. त्याचवेळी अशाप्रकारे एकनाथ खडसे संपत गेले किंवा संपत चालले आहेत त्यांनी आता तरी सावध व्हावे. खडसे यांच्यावर आणखीही व्यापक पुढे केव्हातरी कधीतरी नक्की लिहिता येईल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Thursday, 21 May 2020

Yes, that is Victory! Government Caps Treatment charges at Pvt. Hospitals!!


Yes, that is Victory! Government Caps Treatment charges at Pvt. Hospitals!!

RS. 9000 per day for an ICU bed with ventilator, 
Rs.7500 for an ICU bed without ventilator and
Rs. 4000 for isolation in a routine ward at any Private Hospital now....
Medicines to be made available at MRP.

Dr. Praveen Pardeshi, ex BMC chief, it was his idea to cap the bed rates of private hospitals. In a "PROPOSAL" no EHO/1081, dated 03.05.2020, the notification is self explanatory. It was 19.03.2020 order also wherein (point no 11) it was said for any Covid-19 patients, it will be charged 50% of ICU charges or bed charges of Rs. 4000/- which ever is lesser...It was Pardeshi who had conceived the idea, but we all know why it wasn't implemented by the state. Order singed by Pardeshi was not as elaborate as the new one now, that was issued yesterday. The IAS cold war between top two bureaucrats has resulted in such delay. Even if the state has passed an order now, tell me how many of us would have benefited had this order of Pardeshi been implemented? I am told, the state government was against including not a single private hospital under any kind of "STRESS" but it was Pardeshi who went against the tide. We all know what happened to him.

Couple of Days ago, on my Facebook page I had mentioned as to how Private Hospitals are just into looting business. Lakhs are being charged from the patients in these private hospitals in the name of treatment rates against Covid-19.  Charity Hospitals where there are 89% vacant beds were hoarding and were not ready to accept Covid-19 patients. I had also written as to how such data with facts was presented to the BMC but nothing concrete was done. Be it of any political party & caste, that day my Facebook showed record number of likes, comments and shares. Here comes the good news!

State Government in a revised notification in a respite to uninsured patients too, yesterday, has capped treatment charges for Covid-19 and nearly 200 non Covid-19 procedures. As per the order the capped rates will apply to 80% of hospital beds, while the management can charge their own prices for the remaining 20%. This is effective till 31st August 2020. 

Crux of this order  it is Applicable throughout Maharashtra and applicable to all clinics, nursing homes, corporate as well as charitable hospitals. These 80% of hospital beds would be regulated which means admission rights are with the District Collectors and Municipal Commissioners. About the rates no hospital can charge a Covid-19 patient more than RS. 9000 per day for an ICU bed with ventilator, Rs.7500 for an ICU bed without ventilator and Rs. 4000 for isolation in a routine ward. Medicines will be available at MRP. For Non Covid Patients If hospital has agreements with GIPSA/PPN/TPA/ they will have to follow those rates fo lowest slab irrespective of category of beds occupied by patient.

If no such agreement then follow rates as per Annexure A (ask me for the order will send if you need it) Rates slab wise for districts depending on beds in hospitals. Also doctors and nurses and all support staff have to provide services. Any non cooperation to Hopsitals will result strict action against them .The action will be under ESMA.

www.vikrantjoshi.com

Now some inside information. Had written that someone top at the BMC was not too happy to punish these Private Hospitals even if they were making a lot of money till now. But then, CM Uddhav Thackrey, CS Ajoy Mehta, Health Minister Rajesh Tope, Dr. Pradeep Vyas, and Dr. Sudhakar Shinde (CEO-Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojna) had something else in mind. CM Uddhav Thackeray understood this & 10 days ago called all these top Private Hospitals Owners/bosses for a meeting. It was going very smoothly, but just then when the Government kept this 80% bed proposal, all of this community attending the meeting straight away said NO. And look at the arrogance--in front of the Govt's top bosses and the CM they say if Government follows this these hospitals won't be in a condition to pay a single penny to their staff as salary. But this CM, Ajoy Mehta, Pradeep Vyas and Shinde were very well prepared. They immediately had their papers ready as to how much monies these trusts of all private hospitals hold. E.g. In the meeting it was announced that Nanavati has Rs. 400 crores, Bombay Hospital had 2000 crores, and so on...the government in the meeting said, boss if no co-operation at these times--it will leave a very and taste in everyone's mouth. The top Medical fraternity agreed immediately and thats how this order was made. Dr. Sudhakar Shinde on his own prepared the draft yesterday (no PA or no staff), went to all the places (self drive) and his bosses for getting this order signed. I want to tell these people, even if I had raised this issue, real credit and blessings will go to people like Shinde, CS & CM, Tope & Vyas. Well done, Maharashtra Government. Finally, Covid-19  treatment will be affordable to a common man. 

One small request, in stead of 31st August 2020, can we really put pressure on these hospitals for a lifetime? 

Vikrant Hemant Joshi 

Tuesday, 19 May 2020

घराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी


घराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी 
लोकांना आता ठोस काहीतरी ऐकायचे आहे त्यांना मोदी आणि ठाकरे तुमच्याकडून बुढी के बाल खायला नको आहेत म्हणजे खाताना तेवढे गॉड गॉड एकदा तोंडात विरघळले कि ना चव राहते ना भूक भागते. असे आता यापुढे त्यांना तुमच्याकडून काहीही नको आहे अन्यथा तुमचे वाहिन्यांवर येऊन बोलणे एक मजाक बनके राहेगा, मोदीजी भारतीय तुम्हाला आणि ठाकरेजी राज्यातले तुम्हाला अशाने यापुढे अजिबात सिरीयस न घेता विशेषतः सोशल मीडियावर तुम्हा दोघांची सारे नेटकरी खिल्ली मजाक टिंगल उडवून मोकळे होतील. १८ मेला सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा विविध वाहिन्यांवर आले जनतेला ते आज नक्की काहीतरी वेगळी घोषणा किंवा आश्वासक निर्णय घेऊन सांगून मोकळे होणार आहेत वाटले होते म्हणून त्यादिवशी झाडून सारे मधुचंद्राच्या राती जसे घरातले तरुण सदस्य नवपरिणीत जोडप्याच्या खोलीजवळ कान टवकारून आणि डोळे फाडून लक्ष ठेवून असतात कि निदान आज तरी पलंग जोरजोरात हलण्याचा, जागेवरून काहीतरी उंचच उंच उडण्याचा आवाज येईल तसे सारे त्यापद्धतीने दूरदर्शन संचासमोर बसलेले होते पण कसले काय नि कसले काय, चक्क पाऊण तास ठाकरे तुम्ही बोलत होते पण ठोस काहीही निघाले नाही तोच नेहमीचा टाइम पास तेच तुमचे नेहमीचे प्रत्येकाच्या तोंडात बुढी के बाल किंवा पिटुकली लिम्लेटची गोळी कोंबण्यासारखे झाले म्हणजे जोपर्यंत गोळी चघळतो तोपर्यंत बरे वाटते, एकदा का गोळी विरघळली कि ना पॉट भरणे ना कुठले समाधान. एक घरगुती साधा सरळ मुख्यमंत्री अशी तुम्ही बेमालूम आपल्या राज्यात मिळविलेली प्रतिमा, अशाने घालवून बसाल, जनता फ्रस्ट्रेट आहे, त्यांना काहीतरी ठोस हवे आहे. तुमचे हे तर भाषण असे झाले कि सोशल मीडियावर झळकणारी इकडली तिकडली वाक्ये तुम्हाला हर्षल प्रधान यांनी एकत्र जोडून दिलीत आणि तुम्ही ती वाक्ये जशीच्या तशी शाळेतल्या निबंध वाचून दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी पाठ म्हणून दाखवलीत, असे कृपया पुन्हा घडू नये,  कदाचित इतर हुजरे तुम्हाला फॅक्ट सांगणार नाहीत, मला मात्र गप्प बसणे शक्य नाही, शक्य नव्हते...

त्याआधी एबीपी माझा वर कोरोना मधून सहीसलामत बाहेर पडलेले मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत अशीच सर्वांनी कान टवकारून ऐकली. मी तर तुम्हाला आधीच सांगितले होते, आव्हाड लढवय्ये आहेत ते हि जीवघेणी ठरलेली ठरणारी लढाई देखील नक्की जिंकून येतील, नेमके तेच घडले, बरे वाटले आव्हाड मृत्यूच्या दारातून बाहेर पडले, सहीसलामत आले. त्यांनी आपल्या मुलाखतीमधून जे विदारक सत्य मांडले आज तेच चित्र अमाप पैसे आणि प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या प्रत्येकाच्या घरातले आहे विशेषतः पुढारी पोलीस पत्रकार प्रशासन शासन दलाल व्यापारी इत्यादी साऱ्यांच्यायच घरातले ते दृश्य आहे जे आव्हाड यांनी मनापासून मांडले. ज्याला आपण उपरती होणे असे म्हणतो ते आव्हाड यांच्या बाबतीत घडले आणि हे असे, मी आव्हाड यांना माजलेला नेता असे नक्की म्हणणार नाही पण प्रत्येक माजलेल्या आणि बरबटलेल्या व्यक्तींच्या घरातून नेत्यांना साऱ्यांना उपरती व्हावी. बायको कुठे मुले कुठे आणि आपण कुठे फिरतोय पैसे मिळविण्याच्या हे राज्य विकण्याच्या नादात यात सहभागी असलेल्या कोणाचेही लक्ष नाही. अगदी संध्याकाळचे जेवण देखील एकत्र होत नाही कारण नवरा त्याच्या गर्लफ्रेंड बराबर जेऊन येतो, मुले मुली कुठेतरी पब मध्ये पडलेले असतात आणि बायका एकतर आपल्या शौकिन मैत्रिणींबरोबर मजा मस्ती करण्यात गुंतलेल्या असतात किंवा त्यांना देखील त्यांचे बॉय फ्रेंड असतात. ज्यावेगाने काळा पैसे अनेकांच्या घरातून आला आहे त्याच वेगाने तो त्या त्या कुटुंबाची विल्हेवाट लावण्यात गुंतलेला आहे आणि हेच नेमके सत्य आहे जे तुम्हाला आणि मला देखील अमान्य करून चालणार नाही, आव्हाड बोलले, सत्य तेवढे त्यांनी अगदी मनातून मांडले इतर बोलत नाहीत बोलणार नाहीत एवढाच काय तो फरक...

तुम्हाला सत्य तेच सांगतो, कोरोना लॉक डाऊन घोषित होण्याआधी गेली कित्येक वर्षे मी फार कमी घरी जेवत असे कारण घरात तीन तीन बायका म्हणजे सुना किंवा पत्नी असतांना या तिघींना स्वयंपाक तरी येतो किंवा नाही येथपासून माझी तयारी होती. स्वयंपाकाला येणाऱ्या मावशी एकदम प्रोफेशनल त्यामुळे समोर अगदी ताजे व गरम अन्न आले तरच  खावेसे वाटे, टिफिन नेला तर दुपारी आपण माती खातोय कि अन्न, नेमके कळत नसे पण कोरोना ने चमत्कार केला आज माझ्या घरातला माझ्यासहित प्रत्येक सदस्य विशेषतः माझ्या दोन्ही सुना आणि धाकटा विनीत ज्यापद्धतीने प्रत्येक पदार्थ समोर मांडतात, आईशपथ, असे चवदार अन्न फूड जेवण तत्पूर्वी मी जगातल्या  कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात कधी देखील खाल्ले नव्हते. धन्यवाद कोरोनाला ज्याने घराला घरपण दिले....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Sunday, 17 May 2020

खडसे भी खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी

खडसे भी खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी 
काल मला कोणीतरी म्हणाले कि एकनाथ खडसे ब्राम्हण द्वेष्टे आहेत. नाही, खडसे हे ब्राम्हण द्वेष्टे नाहीत फार तर ते डॉ. राजेंद्र फडके द्वेष्टे आहेत आणि हो अगदी उघड सान्गायचे झाल्यास एकनाथ खडसे हे अतिशय देवेंद्र फडणवीस द्वेष्टे आहेत, खडसेंना फडणवीस जळी स्थळी दिसतात व्हिलन वाटतात अमरीश पुरी प्रेम चोप्रा मदन पुरी गुलशन ग्रोव्हर सारखे भासतात. जळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर कित्येक वर्षे दिवंगत डॉ. अशोक फडके यांनी  त्यावेळचा जनसंघाचा किल्ला एकट्याच्या खांदयावर अनेकदा लढविला त्या डॉ फडके यांच्या भाजपमय चिरंजीवाला मात्र एकनाथ खडसे यांनी कधीही फारसे मानाचे स्थान मिळवू आणि मिळवून दिले नाही, म्हणाल तर आजही राजेंद्र फडके किंवा त्यांची तिसरी पिढी सौरभ फडके सर्वसामान्य नेत्यासारखे या पक्षात जगताहेत त्यांनी आपल्या भाजपानिष्ठा जपल्या आहेत. निखिल हा एकुलता एक मुलगा अकाली गेल्यानन्तर वास्तविक खचलेल्या एकनाथ खडसे यांनी जिल्ह्याच्या राजकरणात, राज्य पातळीवर भाजपमध्ये अंतर्गत सर्वांशी जुळवून घ्यायला हवे होते, मिळून मिसळून राहायला हवे होते तसे त्यांनी केले असते तर अधिक बरे झाले असते, खडसे त्यातून आजही भाजपा नेतृत्व म्हणून चर्चेत राहिले असते. पण आतून खचलेले एकनाथ खडसे उगाचच उसने अवसान आणून आणि त्यांनी अनेक गंभीर चुकांचे पुरावे काहींच्या हातात असतांनाही दुर्दैवाने खडसे वरचढ वागत गेले चुकत गेले त्यातूनच ते आता संपत आले आहेत...

मी नेहमीच सांगतो कि वर्गातला हुशार पण शांत गंभीर सुस्वभावी विद्यार्थी वर्ग शिक्षकांचा आणि वर्गातील इतर विद्यार्थ्यांचा आवडता असतो आणि छान छान दिसणाऱ्या वर्गातल्या मुलींचा तर तो हिरो असतो त्याला वर्गात डिमांड असते कारण त्याची स्वतःच्या स्वभावावर कमांड असते. पण जर वर्गातला हुशार विद्यार्थी आगाउ असेल त्याला वाईट संगती असतील वाईट सवयी असतील, तो बोलायला  उद्धट आणि वागायला उर्मट असेल तर सुरुवातीची काही वर्षे भलेही त्याचे ऐकून घेतले जाते पण त्याची लोकप्रियता पुढे रसातळाला जाऊन वर्गातले सारे त्याचा द्वेष करायला लागतात, मग ते त्याला मुद्दाम टाळतातही. जळगाव नावाच्या राजकीय वर्गात असेच चार अत्यंत हुशार विद्यार्थी होते, दिवंगत बाळासाहेब उर्फ मधुकरराव चौधरी, सुरेशदादा जैन, प्रतिभाताई पाटील आणि एकनाथ खडसे या चौघांच्या सोबतीला आणखी दोन विद्यार्थी होते ते सामान्य दर्जाचे होते पण या चौघांच्या धावपळीत त्या दोघांनी त्यांच्या राजकीय वर्गात मजा मारून घेतली, त्यातले एक होते जीवराम तुकाराम महाजन जे आता हयात नाहीत आणि दुसरेही महाजानच आहेत त्यांचे नाव गिरीश महाजन .

मोठ्यांच्या भांडणात छोट्यांचा मस्त फायदा होतो, सुरेशदादा जैन बाळासाहेब चौधरी आणि प्रतिभा पाटील या तिघांच्या जीवघेण्या राजकीय स्पर्धेचा एकेकाळी नेमका फायदा घेतला तो जी तू महाजन यांनी ते शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात परिवहन गृह इत्यादी महत्वाच्या खात्यांचे राज्यमंत्री होते. हे असेच गिरीश महाजन यांच्याही बाबतीत घडले, एकनाथ खडसे विरुद्ध पक्षश्रेष्ठी व एकनाथ खडसे विरुद्ध सुरेशदादा जैन या नेमक्या जीवघेण्या राजकीय युद्धाचा द्वेषाचा भांडणाचा फायदा उचलला तो गिरीश महाजन यांनी , एरवी नेते म्हणून एकेकाळी अगदीच सर्वसामान्य भासणारे गिरीश महाजन जैन आणि खडसे यांना हूल आणि भूल देऊन मंत्री झाले यशस्वी ठरले....पहिल्या बेंचवर अनेक वर्षे बसणारे खडसे आणि जैन हे मागच्या बेंचवर केव्हा फेकल्या गेले त्यांना स्वतःला देखील ते चटकन ध्यानात आले नाही, ध्यानात आले तेव्हा वेळ निघून गेली होती, उशीर झाला होता आणि सर्वात मागच्या बेंचवर कायम हसत बसणारा काहीसा खोडकर सदा हसतमुख विद्यार्थी गिरीश महाजन पहिल्या बेंचवर केव्हा येऊन बसला भल्या भल्या जळगावकरांच्या ते लक्षात आले नाही. अर्थात जळगाव जिल्ह्याची सध्याची राजकीय घडी आणि परिस्थिती केवळ या लेखात संपविणे मला शक्य नाही पण एक मात्र नक्की आहे कि एकनाथ खडसे अजिबात शंभर टक्के भाजपा सोडून अन्यत्र जाणार नाहीत ते आपले स्वतःचे मोठे राजकीय नुकसान करवून घेणार नाहीत...
क्रमश: हेमंत जोशी.

अशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

अशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
जी माणसे सार्वजनिक जीवनात विशेषतः कुठल्याही ग्लॅमरस क्षेत्रात असतात त्यांनी आपण आत बाहेर जसे आहोत तसेच लोकांना सामोरे जावे असे माझे विशेषतः मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्यांना कायम सांगणे असते पण दुर्दैवाने तसे फारच कमी लोकांच्या बाबतीत हे घडते, मीडिया मध्ये काम करणाऱ्यांचा चेहरा आणि मुखवटा संपूर्णपणे वेगळा असतो. गिरीश कुबेर यांच्या बाबतीत नेमके तेच घडले किंवा कायम घडत आलेले आहे कि ते इकडले तिकडले लिखाण किंवा संदर्भ जसेच्या तसे उचलून लिखाण करतात थोडक्यात मराठी वाचकांना ते उल्लू बेवकूफ येडे समजतात आणि मोठमोठाली वाक्ये फेकून स्वतःची विनाकारण लाल करून घेतात पण कुबेर यांना हे कदाचित माहित नसावे कि मराठी माणसाचे जेवढे मराठी हिंदी किंवा इंग्रजी भाषेतून अफाट वाचन असते हि अशी चांगली सवय इतर फार कमी भारतीयांना असते असे माझे ठाम मत आहे म्हणूनच जेवढे समृद्ध लिखाण मराठीतून होते तेवढी भाषा समृद्धी मला कधीही हिंदीत आढळली नाही म्हणून चुकूनही मी कधीही गिरीश कुबेर यांच्यासारखे इकडले तिकडले उचलून किंवा बघून लिखाण करत नाही किंवा ते करण्याचा आगाऊपणा कुठल्याही मान्यवर लेखक लेखिकेने करू नये. पानिपतकार विश्वास पाटील सकाळी सकाळी अनेकदा जुहू चौपाटीवर मला फिरतांना भेटले कि मी त्यांना गंमतीने म्हणतोही कि जेवढी समृद्धी तुमच्या लिखाणातून जाणवते तेवढी तुमच्याशी बोलतांना ते जाणवत नाही त्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यांच्या सख्या भावाने त्यांच्यावर केलेले आरोप नकळत खरे वाटू लागतात...

येथे मला स्वतःची लाल करवून घ्यायची नाही पण माझा सर्वात मोठा नातू आर्यवीर जोशी जेमतेम १३ वर्षांचा आहे आता तो आठवीला गेला आहे पण तो तिसऱ्या इयत्तेत होता तेव्हापासून त्याला वेगवेगळ्या विषयांवर इंग्रजी भाषेतली पुस्तके वाचण्याची एवढी सवय आहे कि तो जेवतानाही हाती पुस्तक घेऊन वाचत असतो. आजतागायत त्याने शेकडो पुस्तके वाचून हातावेगळी केलेली आहेत आणि हि अशी पिढी बहुसंख्य मराठींच्या घरातून जन्माला येत असते, असल्याने कुबेर सारख्या मान्यताप्राप्त लेखक लेखिकांनी असला वाङ्मय चौर्य करण्याचा मुर्खपाणा करू नये. अशा चौर्य काम करणाऱ्यांना मराठी माणूस हलकट नजरेने मग कायम बघायला लागतो. काही मंडळी तर कुबेरांच्या पुढे असतात म्हणजे इतरांकडून पैसे मोजून लिहून घेतात आणि स्वतःच्या नावाने छापून मोकळे होतात. एका गुजराथी पत्रकाराला तोडके मोडके मराठी येत असतांनाही तो दरवर्षी नियमित मराठी भाषेतली पुस्तके लिहून मोकळा होत असे. शेवटी मी नेमका शोध घेतला असता आमच्यातलाच एक अत्यंत लोभी हलकट दलाल आणि पैशांना हपापलेला पत्रकार त्या गुजराथ्याला पैसे घेऊन अशी विविध राजकीय विषयांवर नेत्यांवर पुस्तके लिहून देत असे. याउलट त्या गुजराथी व्यक्तीने त्याच्या मातृभाषेतून अशी पुस्तके लिहून एखाद्या पत्रकाराने ती मराठीमध्ये अनुवादित केली असती तर अधिक दर्जेदार पुस्तके बाहेर आली असती कारण त्या मराठी पत्रकारापेक्षा अनुभवाने व
डोक्याने तो गुजराथी कितीतरी अधिक पटीने हुशार तल्लख आहे असे माझे आजही मत आहे... लिखाणाचे वैशिष्ट्य असे कि जो लेखक असतो तो जसे बोलतो तसेच लिहीत असतो, ज्या लेखकाचे बोलणे आणि लिहिणे पूर्णतः  भिन्न आहे किंवा असते खात्रीने सांगतो अशी मंडळी एकतर गिरीश कुबेर यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जाणारी असते किंवा दुसऱ्यांकडून लिहून घेणारी असते आणि पैसे मोजून दुसऱ्यांकडून लिहून घेणारे मान्यवर जागोजाग आढळतात किंबहुना मला अशी अनेक माणसे माहित आहेत. लहानपणी आमची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने कधीतरी एखाद्या श्रीमंत घरातल्या मित्राचा शर्ट मी घालून गेलो कि बघणार्यांच्या ते लगेच लक्षात यायचे तसे या लिहून घेणाऱ्यांचे असते म्हणजे त्यांचे बोलणे आणि लिखाण यात एवढी तफावत असते कि वाटते एखाद्या उच्चविद्याविभूषित मान्यवराने थेट एड्स झालेल्या रांडेशी जणू लग्न केले आहे. प्रत्येक मान्यवर लेखकाची स्वतःची अशी स्वतंत्र भाषा असते उदाहरण द्यायचे झाल्यास समजा उद्या अनिल थत्ते यांनी एखाद्याला असे आपले लिखाण विकले तर हे लिखाण अमुक एखाद्या उचल्याचे नसून ती भाषा समृद्धी बघून हे लिखाण हमखास अनिल थत्ते यांचेच आहे हे क्षणार्धात लोकांच्या लक्षात येईल किंवा येते, चोरी मग ती कोणतीही असो, केव्हाही वाईट...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Friday, 15 May 2020

हिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी

हिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी 
मेल पाठवणारे कोठून तरी अनेकदा तुमच्या आमच्या विषयी काहीतरी चुकीची माहिती जमा करतात आणि दिवसभरात नको नको ते मेल पाठवत बसतात. मध्यंतरी म्हणे मासिक पाळी पूर्वी होणाऱ्या पोटदुखीवरच्या गोळ्यांविषयीची माहिती देणारे जाहिरात करणारे मेल सतत त्या जयंत पाटलांना यायचे किंवा आजही म्हणे दादा भुसे यांना तशी अजिबात आवश्यकता नसतांना खोयी हुयी जवानीकी ताकद का इलाज असे सांगून कोणत्यातरी तेलाची जाहिरात पाठविण्यात येते. उद्या, तुमच्या बाळंतपणासाठी आमची विमा पॉलिसी काढा असेही मेल एखाद्या अविवाहित संघ प्रचारकाला पाठविलेले जातील किंवा मुल्ला मौलवीला आमच्याकडून रामायणाच्या ग्रंथावर खास सवलत पद्धतीचे मेल पाठविले जातील. बहुतेक ९९ टक्के आलेले मेल किंवा फोन्स तद्दन फसवे असतात विशेष म्हणजे कितीतरी मराठी अनेकदा कित्येकदा फसविले गंडविले जातात. असे समजायचे कि कोरोनाचे हे घरात काढल्या जाणारे दिवस मनन चिंतन करण्यास भाग पाडणारे आहेत. या दिवसात ज्यांनी काम क्रोध लोभ चिंता खर्चिक वृत्ती निद्रा भय स्वभाव व्यसने दुस्वास लावालाव्या लबाडी फसवाफसवी भ्रष्ट वृत्ती इत्यादी मोजक्या दुर्गुणांवर मात केली तोच या आधुनिक जगातला अर्जुन म्हणावा आणि तीच आधुनिक झाशीची राणी ठरावी. साक्षात मृत्यू किंवा तत्सम संकट दारात उभे असतांना देखील आपल्यातले हे तमो गूण तमाम अवगुण शारीरिक दोष शरीराबाहेर उत्सर्जित केल्या गेले नसतील बाहेर काढल्या फेकल्या जात नसतील तर अशांची तुलना आधुनिक राक्षसांशीच केल्या जावी...

गम्मत बघा माझ्या आजवरच्या अतिशय आवडत्या मुख्यमंत्र्यांमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस यांची मी जेव्हा केव्हा उघड ठाम बाजू घेतो जगातले माझे लाखो वाचक मी भाजपाचा कसा टीका करून मोकळे होतात पण जेव्हा केव्हा फडणवीस यांच्या बरोबरीन माझ्या आणखी एका आवडत्या आदर्श भन्नाट माजी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतो तेव्हा मात्र एकही वाचक मला काँग्रेसधार्जिणा कसा, ठरवून मोकळा होत नाही आणि वास्तव असे कि मी आजतागायत कधीही भाजपाचे काम केले नाही किंवा भाजपाचा मी कधी साधा कार्यकर्ता देखील नव्हतो पण याच काँग्रेसच्या विद्यार्थी सेलचा म्हणजे एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचा जळगाव जिल्ह्याचा सतत पाच वर्षे मी अध्यक्ष होतो किंबहुना मी अध्यक्ष होण्यापूर्वी ज्या जळगाव जिल्ह्याला काँग्रेसची फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे त्या जिल्ह्यात एनएसयूआय कशाशी खातात हे देखील माहित नव्हते पण बाहेरच्या जिल्ह्यातून मी ब्राम्हण तरुण या जळगाव जिल्ह्यात आलो आणि बड्या नेत्यांच्या नाकावर टिच्चून विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झालो, पुढे राजकीय पत्रकारितेत रमल्याने राजकारणात न उतरण्याचे ठरविले तो भाग वेगळा. येथे काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण हे विषय यासाठी कि अलीकडे चव्हाण म्हणालेत कि मंदिरात जमा असलेले सोने सरकार दरबारी जमा करून कोरोनामुळे  बिघडलेल्या आर्थिक स्थितीवर प्रभुत्व मिळवा. आणि त्यातून चव्हाण यांना टीकेला सामोरे जावे लागते आहे...

देशातल्या अनिरुद्ध बापूंसारख्या लबाड बुवांकडे किंवा विविध देवस्थानांकडे जे सोने नाणे जमा करण्यात आलेले आहे ते सरकारने जप्त करून त्याचा उपयोग कोरोनामुळे उद्भवणाऱ्या उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यास चव्हाण म्हणतात नक्की करण्यात यावा, चव्हाण हे कधीही बेजाबदारीने वक्तव्य करणारे नेते नाहीत, त्यांचे सांगणे शंभर टक्के योग्य आहे पण त्याचवेळी मुल्ला मस्जिद किंवा देशातले पाद्री आणि चर्च यांच्याही कडे जी अमाप संपत्ती विनाकारण सडते आहे किंबहुना आपल्या या हिंदुस्थानात यांच्याकडे बाहेरून किंवा देशातून येणाऱ्या या अफाट संपत्तीचा विशेषतः धर्मांतर करण्यात हिंदूंना बाटविण्यात किंवा लव्ह जिहाद सारखे देशद्रोही प्रकल्प राबविण्यात जो खर्च केल्या जाऊन देशातले हिंदू संकटात सापडतात,
चर्च आणि मस्जिद मधले असे पैसे देखील शासनाने सरकारने त्वरेने तडफेने जप्त करून त्या पैशांचा योग्य विनियोग या आर्थिक संकटात करून घेणे तेवढेच गरजेचे आहे. फार दूर नाही तुम्ही मुंबईकर कधीतरी त्या माटुंग्याच्या डॉन बास्को शाळेची आणि तेथल्या मिश्नर्यांची जरा माहिती तर काढा तुमच्या ते सहज लक्षात येईल कि या अशा मिशनऱ्यांच्या शाळांमधून बाहेरून येणाऱ्या पैशांचे पुढे नेमके काय केले जाते. ना मोदींचे तिकडे लक्ष आहे ना उद्धव ठाकरे किंवा मोहन भागवत यांच्यासारख्या हिंदू मासिहांचे. इस्लाम कसला खतरे में, कोरोना असो कि धर्मांतर खरे तर हिंदूच हिंदुस्थानात खतरेमे आहेत तिकडे सर्वांनी लक्ष द्यावे घालावे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Wednesday, 13 May 2020

अशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी

अशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 
मीडिया क्षेत्रात काम करताना राजकीय पत्रकारिता करतांना यात रमलेले अनेक कधी अगदी जवळून तर कधी लांबून बघितले. मीडियातल्या बहुतेकांची इत्यंभूत कुंडली पण जमा केली आणि त्या कुंडलीच्या आधारेच मीडियात करिअर करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला. आबा  माळकर, उदय तानपाठक, अभय देशपांडे, अभिजित मुळे उदय निरगुडकर सारख्या काही पत्रकारांना कायम सख्य्या भावासारखे किंवा मुलासारखे मानले पहिले बघितले. आणि ज्याला मी पत्रकार केले किंवा पत्रकारितेत आणले त्या सख्य्या भावानेच जेव्हा मला लाथाडले तेव्हा सुरुवातीला काहीसे आश्चर्य वाटले पण नंतर लक्षात आले कि तो त्याच्या मूळ स्वभावाला जागला. प्रवीण बर्दापूरकर जेव्हा माझ्या लिखाणातली जेथल्या तेथे चूक काढून मोकळे होतात माझे लक्ष त्यांच्या पायाकडे जाते कारण असे लिखाणातले महर्षी मनात सतत गुरुस्थानी असतात. कधी दिल्ली गाजवून सोडणाऱ्या अशोक वानखेडे यांचा अघळपघळ स्वभाव भावतो तर कधी उत्तुंग ज्ञानी उदय निरगुडकर किंवा निखिल वागळे आणि अनिल थत्ते यांचे या क्षेत्रातले शापित वास्तव्य मला अस्वस्थ करून सोडते. अगदी सहज शक्य असतांना कुमार केतकर कधीही पैशांच्या मागे लागले नाहीत अन्यथा आज ते पत्रकारितेत पैशांच्या बाबतीत दर्डा यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकले असते पण दर्डा यांनी तत्वे गुंडाळून ठेवलीत म्हणून त्यांच्याकडले काही अतुल कुलकर्णी नको पत्रकारितेचा नेमका गैरफायदा घेऊन मोकळे झाले. कदाचित कुमार केतकर यांच्या भूमिका आम्हा अनेकांच्या नावडीच्या नावडत्या असतील पण या राज्यातले जांभेकर टिळक अत्रे तोरसेकर यांच्याच पंक्तीतले एक कुमार केतकर देखील...

लहानपणी एक कथा होती, भूक लागली कि जावे आजीकडे मग ती डब्यातला लाडू काढून देते तसे त्या दीर्घ अनुभवी अभ्यासू मेहनती हसतमुख कायम जमिनीवर राहणाऱ्या अभय देशपांडे याचे, हातचे काहीही राखून न ठेवता न टाळता लिखाणात अमुक एखाद्या ठिकाणी अडचण आली कि जावे अभयकडे म्हणजे लावावा फोन त्याला केव्हाही, तो तुम्हाला नेमके संदर्भ देऊन मोकळा होतो तुमचे काम सोपे होते. अभय आणि पत्रकार पत्नी हायमा दोघेही भिन्न, हा मराठी ब्राम्हण तर ती परप्रांतीय हिंदी भाषीक दोघेही नक्की महत्वाकांक्षी आणि नावाजलेले देखील, पण दोघांमधले ट्युनिंग, त्यावर करावे तेवढे कौतुक कमी ठरावे.
अर्थात अभय याचे आडनाव तसे गोडबोलेच असायला हवे होते अर्थात त्याचे प्रसंगी तापट निखिल वागळे किंवा हरफनमौला अनिल थत्ते यांच्याशी जरी लग्न झाले असते तरी अभयने छान निभावून नेले असते. मस्त संसार करून तो मोकळा झाला असता. उदय तानपाठक पत्रकारिता का करतोय तेच कळत नाही त्याच्या जागी मी असतो तर ज्यांच्या आयुष्यातले हसू हरविले आहे अशांचे हसू परत आणण्याचे क्लासेस मी सुरु केले असते आणि शरद उपाध्ये यांच्यासारखे लबाडीने करोडो रुपये कमावून मोकळा झालो असतो. खाजगी आयुष्य कमालीचे गूढ अस्वस्थ किंवा एकांतात डोळ्यात आसवे गाळणारे पण लोकांसमोर येताच आपले दुःख लपवून लोकांचे दुःख टेन्शन अगदी सहज हसवून दूर करणारा कदाचित उदय असेल किंवा मी देखील असू शकतो, म्हणून उदयकडे कायम कौतुकाने बघतो...

अनेक अति भ्रष्ट पोलिसांच्या किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या पलीकडे पैसे खाण्यात एक हलकट जमात या राज्यात या देशात फार मोठ्या प्रमाणात फोफावली आहे ज्या जमातीचे उदंड पीकच या राज्यात कानाकोपऱ्यात विशेषतः मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे ती नीच राज्यद्रोही जमात आहे मीडियाची, फार कमी सुसंस्कृत सुविचारी आहेत किंवा अल्पसंतुष्ट आहेत भाऊ तोरसेकर यांच्यासारखे, मीडिया मग त्या विविध वाहिन्या असतील किंवा वृत्तपत्रे, अनेकांचे पगार मूठभर पण त्यांची वरकमाई मात्र अचंबित करणारी अनेकांना करोडपती करणारी. खरेतर या मंडळींना आयकर खात्याकडे सोपवायला हवे, जेथे काम करतात तेथले पगार म्हणजे त्यांच्यातल्या अनेकांचा दररोजचा तोही बाहेरचा बाहेरख्याली खर्च असतो किंबहुना जसे काही शासकीय अधिकारी  किंवा पोलीस जसे सांगतात कि आम्हाला पगार नको फक्त आम्ही सांगतो तेथे आमचे पोस्टिंग करा तेच मीडिया मध्ये काम करणाऱ्या अनेकांचे, तुम्हाला वाटते कि पत्रकारांनी त्या जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्यांवर तुटून पडावे पण मिंध्या पत्रकारांना ते शक्य नसते त्यांच्यातले फार कमी प्रसाद काथे असतात...
क्रमश: हेमंत जोशी 

Saturday, 9 May 2020

Avinash Bhosale for CM of Maharashtra !!

Avinash Bhosale for CM of Maharashtra !!

Before coming to any judgements regarding the title of my blog, I'm listing some key pointers. Read them, absolutely understand them-the underlining meaning and then once you understand it, you will agree with me. No, this is not Journalistic news or gossip, this is my own personal thought. It is a hard political fact and for those who don't understand this blog, read it for the second time or better get yourself updated. Mere reading papers and watching news channels does not make you a political connoisseur! But this is the need of the hour. No Avinash Bhosle, then who? But is there anyone better than him since last 25 years? Answer is a NO! 

So to begin with, why Avinash Bhosale should be made the Chief Minister of Maharshtra with immediate effect ....


 • We all are facing toughest battle of our life in form of Corona. Even during such testing times, none of our political parties have shown any understanding or maturity to understand the concept or act--we should be ONE in such times. Everyone is trying to outplay each other. BJP tried to bring down the Sena by playing the Governor card later relented, NCP is leaving no stone unturned to down Sena's image (Bandra incident, Awhad incident) and Congress is as good as a mere spectator. Who would have been a man in the middle of all 4 major ruling parties who has excellent relations with every party heads? It is AB...Had all 4 party heads come & discussed in his presence he would have resolved everything amicably. Though in the beginning Kaka Pawar taunted AB when he reached (right after MVA was born) Silver Oaks for not answering calls in last 5 years, AB has compensated by visiting Silver Oaks regularly. Also the MVA government wouldn't want anyone else to play cupid amongst themselves rather than age old trusted friend in AB. Though AB would not have done anything better than what is happening to Mumbai, my point here is--had he been the CM--the internal fights would have been stopped and firm Government would have been showcased. This government appears fragile to me.  
 • Secondly, our state has become a joke for the public inside and for the one's living outside. Bureaucrats don't listen to Ministers and Ministers don't understand policies. Flip Flops be it Government Resolutions is common, or any particular decision taken in cabinet, either the bureaucrat does not implement/listen nor any important file which the bureaucrat has got , Minister signs without demanding "moolah" or wanting to meet the party first. Who has excellent relations with all the top bureaucrats of the state? It is AB. Just imagine AB role & significance. You talk about ease of business --I have given the solution. 
 • As to why I say bureaucrats are AB's friends--tell me with all honesty-We all know what AB means to every top bureaucrat of our state and city. Every IAS or even a Class 3 bureaucrat knows AB personally, if you were fortunate to work with him/for him. I know many bureaucrats  cabin whom AB has the power to just enter without prior appointment, for whom I have to wait for weeks to meet.  How did this develop? Any file which AB is involved in, leave it now, but for many years like Mangal Prabhat Lodha, AB himself took all the files to every table and has maintained relations .So bureaucracy which NEVER EVER any political party has been able to take control , AB has shown it, done it single handedly...Don't you agree that if relations improve within the government a lot can be achieved? And it's OK if one or two hate you AB, it does not matter....
 • Have you ever been to any of AB's offices or any 5 star hotels he owns? Just see the way he has built them and managed them. This shows he has qualities like discipline, vision, mission and if he decides to built something he will do it...Not like our Sarkar...When will memorial of Shivaji Maharaj will come, when will we have Babasaheb's memorial at Indu Mill, I don't see it happening quickly. 
 • Now, most importantly our state needs big financial assistance. We all must be aware of many politicians and bureaucrats having their monies invested or parked with AB. Now I have just heard this for a long time now.. But yes, have heard how offices get cleared and employees are asked to leave at IndiaBulls Centre when he and Sameer Gehlot use to meet a top bureaucrat at their Lower Parel building. AB can have his own amnesty scheme. Instead of just investing all this 'black money' in building line how about he gets full power to utilise this money in all sectors? They say in Maharashtra- if the top 5 political families-just decide to donate their black money, Maharshtra's loan crises can be far from over. Again who better than AB to approach these families, and believe me no one will say no. As they say, AB is a man of his words. No investment will ever go down the drain? Plus it will yield interest... You tell me--once you control the system everything is as smooth as silk, isn't it? 
 • Now what are Ministers & bureaucrats most worried of? To find a 'dalaal' or a contractor who can 'vouch' for the deal and take it through. As it is AB is in almost every department in regard to supplies of anything. Either he is there or his friends are there. Just imagine we media guys, and everyone in the system--we will be free of every supplier & dalaal. Ministers & Bureaucrats can too be assured for no taping or meeting here & there to collect 'parcels'. Everything will be formalised and systemised.
 • Acha, as said earlier, AB has excellent relations with all parties & their bosses. So in this case say CM Uddhav Thackeray faces a tough situation in the Assembly over a LAQ or a question what does CM do? He will send a message via his Ministers either to the person raising the question or he will walk out. Imagine situation if AB is CM. LoP Devendra Fadnavis is also his close friend as when Fadnavis was CM, apart from Sumit and Prasad Lad, no one other person than AB had frequented Varsha. Later they say, he himself moved back. In short, no tension of opposition or Dharna or andolan's. Cops can breathe easy and actually do their job well. 
 • See we cannot rule out corruption from system. It was, is and will be there in our blood. Everyone wants a share of the pie. If AB is made the CM, everything will be organised. I use to like this ex PWD minister who is known to build bridges. What he use to do, say a bridge costs Rs. 100. This minister would actually get the work done for Rs. 90, raise the bill to Rs. 120 and pocket the Rs. 30. Who does not want this? People are like--boss eat as much you want, but show the work at least...Not like the irrigation scam where crores were siphoned off and forget dams, not even a single pipe was at the site. So AB is a crude businessman. I'm sure he believes in development. He can regularise a lot of liasion work and he can also legalise what is legalised in the UK--Lobbying. (I'm sure many journalist will be happy to read this)
 • OK, we all know any bureaucrat be the topmost is at ABs mercy when it comes to crucial transfers. Just take all the top posts of Maharshtra be it IAS/IPS and see whose stamp you can see on it. So what happened with Pravin Pardeshi will also be avoided, as he will be the sole dictator. And believe me no one can change his mind & heart. Bureaucrats can breathe a little easy. Once AB gives them one posting, until your 3 years are completed, he won't move you...Why? Coz he might have faced similar problems during his struggle days as when a bureaucrat shook hands with him to do some work, Government had changed him/her before they completed the term. Again the whole new exercise to befriend a new bureaucrat and again new packet to get the same file move ahead!
 • Also only AB can fulfil PM Modi's wish of having smart cities. I remember how AB has spent hours and hours over DP with Mumbai & Pune DP team to get the work done. Similarly with SRA. Also he does care for the poor. Similarly for Mhada. He is everywhere!
 • AB is well travelled has excellent corporate friends who are stinging rich and his company's credit history is super. If he gets Maharashtra's access, forget funds from the Centre, he can introduce funds or I shall go a step further--if he gets good back up even World Bank is not out of his reach.
 • Plus AB is fit. Not unlike other CM's who have had weight issues or has stents in heart who don't even get down from their bunglow 1st floor to ground floor. AB is well versed with languages, knows his subject better than the bureaucrat sometimes and is extremely helping if he likes the person. He has competition in Vivek Jadhav or small time dalaal's here & there.....But let me tell you...if these dalaal's roam in their Benz's he has a bloody chopper! That is the difference. 
 • Not many know (even I don't i'm assuming) AB must be a philanthropist too...So when people die in accidents or say natural calamities, he is the one who will take care of their entire family too...it can be through various insurance policies or some schemes. I'm told once you work for ABIL even if you die, you need to worry for your family. And here our Government still believes a human life is all about handing over Rs, 5 lakhs or 10 lakhs or bloody setting up CM Relief Fund which in turns out to be another scam. So why not we have AB instead. 
 • Plus being a businessman, AB will do what none of us have been able too..He can work his way of fighting casteism. For a businessman, if you are worth something, you be a Brahmin or a Dalit, it does not matter. Merit will prevail. 
 • He might have a small disadvantage in the Education department. But for that when will son-in-law Vishwajit will come handy? 
These are some advantages as what I see to have a neutral CM. Instead of him funding numerous candidates, I feel AB should himself contest now independently and keep one condition-I will be the CM. My father who has been in Journalism since 1980 has told me---since 1995 AB comes to Mantralaya. Not a single person is there in Maharshtra who has been able to get as big as him in liasoning and contracting work. It is only AB to whom even Kaka has surrendered, and as for the rest he does not care and is nor does he even look too...He might appear a bit shrewd, but hello! Isn't he No 1 in Maharshtra when it comes to everything else....Don't we say, kiski bhi sarkaar, Bhosle dikhe har baar....I feel we in Maharshtra need someone like a Donald Trump. My Donald Trump is Avinash Bhosale!!

A proud Maharashtrian!

Vikrant Hemant Joshi 

PS: My condolences to the migrant workers who expired on the railway tracks 

लेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी

लेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी 
मी तर तसे जाहीर सांगितलेच आहे कि कोरोना काळात एखाद्या अडचणीत किंवा संकटात सापडलात तर माझ्याशी अवश्य संपर्क साधावा त्यात मी पडलो राजकीय पत्रकार त्यामुळे लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक गमतीशीर देखील फोन आलेत, अदयाप तसे मी त्यांना माझ्या स्वभावानुसार उत्तर दिलेले नाही पण देणार नाही याची आता मला माझीच शाशवती वाटत नाही.  माझा एक मित्र आहे विशेष म्हणजे तोही बऱ्यापैकी नावाजलेला पत्रकार आहे आणि त्याला नको त्या बायकांकडे जाण्याचा सुरुवारीपासून नाद आहे, अर्थात हा नाद अनेक पुरुषांना असतो त्यांत नवल ते कसले ? नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी देखील असे घडू शकते अगदी माझ्या कार्यालयाशेजारच्या इमारतीमध्ये जे मसाज पार्लर आहे तेथे हॅप्पी एंडिंग करून घ्यायला कोण कोण येते तुम्हाला नावे सांगितलीत तर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोटे घालाल कारण या बड्या मंडळींना त्याठिकाणी घेऊन जाणारा मंत्रालयातील एक दलाल तो देखील माझ्या परिचयाचा असल्याने मला अगदी सहज नावें समजलीत. तर तो पत्रकार मित्र जगात कोठेही गेला तरी सर्वात आधी त्या त्या ठिकाणचे रेड लाईट एरिया नेमके कसे आणि कोठे याची सर्वात आधी माहिती घेऊन मोकळा होतो...

फार पूर्वी हा पत्रकार मुंबईत फोर्ट परिसरात त्याकाळी असलेल्या एका अशा बदनाम मसाज पार्लर मध्ये नियमित जात असल्याने तेथल्या एका मणिपाल वरून आलेल्या तरुणीचा त्याच्यावर जीव जडला. एवढा जीव जडला कि हा तिला टीप सुद्धा चेकने देत असे. हा जेव्हा केव्हा तिच्याकडे जायचा ती त्याला हमखास त्याचे व्हिजिटिंग कार्ड मागायची आणि हा चतुर पत्रकार उगाच पुढल्या भानगडी नको म्हणून कार्ड द्यायला टाळाटाळ करीत असे. शेवटी एक दिवस तिने खूप हट्ट केल्याने याने खिशातून एक कार्ड काढले आणि तिच्या हाती सोपवून मोकळा झाला कारण त्यानंतर त्याला तेथे जायचे नव्हते त्याने दुसरे पार्लर शोधून
ठेवलेले होते. पुढले अत्यंत महत्वाचे म्हणजे ते त्याचे व्हिजिटिंग कार्ड नव्हते ते मंत्रालायात सुंदर तरुण पत्नीला कायम सोबत ठेवून मोठी दलाली करणाऱ्या, एका स्वतःला बडा नेता म्हणवून घेणाऱ्या दलालाचे ते कार्ड होते, त्या दलालाचा नेमका पेशा मला येथे सांगायचा नाही त्यामुळे ते नाव अनेकांच्या लगेच लक्षात येईल. या पत्रकाराचे तिच्याकडे जाणे बंद झाल्याने ती त्या कार्ड वर असलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधून त्या दलालाशी हा पत्रकार मित्र समजून नको नको ते फाजील बोलायची...

स्वतःच्या बायकोला मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे पुढे करणारा हा दलाल का म्हणून अशा पार्लर्स मध्ये जाईल, तो तिच्या फोनमुळे अस्वस्थ होत असे, शेवटी एक दिवस त्याने तिला सरळ सरळ सांगून टाकले कि जेथे मलाच माहित नाही कि माझ्या बायकोला झालेली मुले माझी आहेत किंवा नाहीत तेथे मी का म्हणून तुझ्याकडे येईल, पुढे एक दिवस ती अचानक या पत्रकाराला कुठेतरी भेटली आणि घडलेला किस्सा तिने त्याला सांगितला. अर्थात हेच ते बाहेरख्याली पुरुष ज्यापद्धतीने साळसूदपणे आपापल्या बायकांसमोर सारे काही वाईट धंदे करून आदर्श पती म्हणून पाठ थोपटवून घेतात. मूळ मुद्द्याकडे आता वळतो. यादिवसात अनेकांचे नको त्या कामांसाठी जेव्हा फोन येतात मला वाटते आता मी देखील तेच करतो त्या पत्रकारासारखे, असे गमतीदार दूरध्वनी क्रमांक देऊन मोकळा होतो. एकाला पूजेसाठी भटजी हवा आहे त्याला भट ब्राम्हणांची नफरत करणार्याचा नंबर देऊन मोकळा होतो. अनेकांना दारू हवी असते, मला ज्या पद्धतीने ते सांगतात जसे काही मी हातभट्टी चालवणारी आंटी आहे. ज्यांनी उभ्या आयुष्यात दारूचा थेम्ब पण तोंडात घेतला नाही मला वाटते अशा काही मित्रांचे नंबर देऊन मोकळे व्हावे. दारूची दुकाने सुरु होऊन पुन्हा बंद होणार हे दारू विक्रेत्यांना नेमके माहित असल्याने अलीकडे दुकाने सुरु होताच जी झुंबड उडाली त्यात प्रामुख्याने दारू विक्रेत्यांचीच माणसे उत्पादन शुल्क खात्याला हाताशी धरून उभी करण्यात आली होती आता त्याच बाटल्या दहा पट किमतीने विकल्या जाणार आहेत यात तिळमात्र शंका नाही. ज्यांना हातभट्टी किंवा देशी दारू शिवाय काहीही चालत नाही अशा गरिबांनी त्या दोन तीन दिवसात सुटकेस पोती इत्यादी भरून जी लाखो रुपयांची दारू विकत घेतली तो मोठा दारू घोटाळा झाला एवढेच याठिकाणी सांगतो, त्यावर विस्तृत नक्की पुढे कधीतरी...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Friday, 1 May 2020

शिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी


शिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी 
या लॉक डाऊनच्या दिवसात राज्यातल्या अनेक मान्यवरांचे सूक्ष्म निरीक्षण करता करता असे लक्षात येते, जसे मंत्री उदय सामंत यांनी ज्या पद्धतीने दाढी वाढवली आहे बघून वाटते कि त्यांच्या प्रेयसीला महेश सामंत पळवून गेलाय कि काय ? अर्थात असे होणार नाही वाटल्यास उलट घडेल किंवा गृहमंत्री अनिल देशमुख असे काही तयार होऊन बाहेर पडतात कि त्यांना चार पाच ठिकाणी कांद्यापोह्यांचा कार्यक्रम आहे. मिलिंद नार्वेकर असे काही ड्रेसअप होऊन राज्यपालांना भेटायला गेले जणू काही नोकरीसाठी मुलाखत आहे. शरद पवार असे घरात बसले आहे जसे त्यांना शाळेतून काढून टाकले आहे आणि देवेंद्र फडणवीस ज्यापद्धतीने यादिवसात बोलतात बघून वाटते कि त्यांची प्रेयसी जर्मनीत अडकली आहे आणि हे इकडे कासावीस होऊन तिच्याशी बोलताहेत. राधेशाम मोपलवार यांनी ज्यापद्धतीने भ्रमणध्वनी बंद करून ठेवलाय जसे काही किराणा दुकानदार उधारी वसुलीसाठी त्यांच्या मागे तगादा लावतो आहे. जेव्हा बघावे तेव्हा आमचे नेहमीचे उदाहरण  उदय तानपाठक स्वयंपाकात असे गर्क जणू जोशीकाकू दहा घरी जेवणाचे डबे पाठवतात. अजितदादा असे गायब जसा काही त्यांना नववा महिना लागलाय आणि कळा सोसत नाहीत. राजेश टोपेंचे बोलणे बघून व ऐकून वाटते कि यांची पाळी अद्याप आलेली नाही आणि पोटात तर दुखते आहे. भुजबळांचा चेहरा बघून तर असे वाटते रेशन दुकानदाराने आधार कार्ड रेशन कार्ड दाखवूनही त्यांना महिन्याचे रेशन भरून दिले नाही. उद्धव ठाकरे अधून मधून टीव्हीवर जे बोलतात बघून वाटते सिनेमातला शशी कपूर सुहाग राती नवोदित पत्नीला मनवतोय विनवतोय कि काही होणार नाही, जवळ ये ना...

काही दिवसांपूर्वी मी जेव्हा शिव भोजन थाळी संदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच या खात्याच्या अधिकाऱयांना काही टॉन्ट्स मारले. त्यावर लगेच भुजबळांचा मला दोन वेळा फोन आला पण मी तो यासाठी घेतला नाही कि तुमचे त्यांच्याविषयी काहीही मत असो बट, आय रिस्पेकट भुजबळ. मला त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा फोनवरूनही वाद घालणे किंवा त्यांच्या तोंडोतोंडी येणे कदापिही शक्य नाही. भुजबळांचे आधी जे चुकले तीच चूक ते आजही करताहेत त्यांच्या सभोवताली अतिशय थर्ड ग्रेड लोकांचा गराडा असतो आणि एवढी मोठी अद्दल घडल्यानंतर आताही भुजबळ नेमकी तीच चूक पुन्हा करताहेत, पुन्हा एकवार त्यांच्या सभोवताली परदेशी सारख्या अतिशय वाईट वृत्तीच्या अधिकाऱ्यांनी घेराव केला आहे आणि यावेळीही हे असे नालायक भुजबळांचा गैरफायदा घेऊन पुन्हा एकवार त्यांना प्रचंड बदनाम करून बाजूला होतील, वाईट फळे मग भुजबळ यांनाच भोगावी लागतील ज्याची मला काळजी भीती चिंता वाटते. राज्याचे एक बुजुर्ग सीझन्ड बॅलन्स्ड सचिव महेश पाठक यांचाही मला त्या लिखाणासंदर्भात फोन आला, आणि याच शिवभोजन थाळी संदर्भात मला येथे काही सांगायचे आहे...

महेश पाठक असे म्हणालेत कि जर रेल्वेच्या खानपान विभागाने आम्हाला म्हणजे महाराष्ट्र शासनाला शिवभोजन थाळी संदर्भात ऍप्रोच केला तर आम्ही नक्की त्यांचे प्रपोजल विचारात घेऊ. यावर माझे असे शासनाला भुजबळांना सांगणे आहे कि त्यांच्या ऍप्रोचची वाट कशाला ती बघायची, पियुष गोयल तुम्हा सर्वांच्या परिचयाचे आहेत, महाराष्ट्राचे आहेत आणि केंद्रात रेल्वे मंत्री आहेत, थेट गोयल यांना जरी कोणीही सूचित केले तरी ते महाराष्ट्र शासनाचे हे काम क्षणार्धात करून मोकळे होतील म्हणजे आज जी शिवभोजन थाळी शासनाला खाजगी कंत्राटदारांकडून ५० रुपयात मिळते आहे उगाच फार मोठा भुर्दंड शासनाला पडतो आहे उद्या जर अधिक दर्जेदार शिवभोजन थाळी केवळ १५ रुपयात उपलब्ध झाली तर महाराष्ट्र शासनाचे कितीतरी पैसे वाचतील पण असे काहीही दूरदूरपर्यंत घडतांना दिसत नाही. अत्यंत महत्वाचे म्हणजे ह्या शिवभोजन थाळ्या राज्यात कुठे केव्हा किती वाटप केल्या जातात त्याचा थांगपत्ता नेमका हिशेब जनतेला लागलेला नाही, लोकांसमोर आला नाही. विशेषतः विविध वाहिन्यांना जर शासनाने नेमकी माहिती दिली तर त्यांचे प्रतिनिधी शिवभोजन थाळी वाटप होतांनाची दृश्ये जनतेला दाखवून मोकळे होतील. शिवाय अनेकांना जो संशय आहे कि थाळ्या समजा पंचवीस हजार वाटल्या गेल्या तर कागदोपत्री त्या किमान एक लाख वाटल्या गेल्या असे कानावर पडते, त्यातले कंत्राटदारांचे लुबाडणे आणि लागेबांधे नेमका त्यावर प्रकाशझोत पडेल. दूध का दूध पानी का पानी पद्धतीने नेमके सत्य जर जनतेसमोर आले तर भविष्यात शासनाकडे संशयाने पाहिल्या जाणार नाही, बघा कसे जमते ते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी