Monday, 27 April 2020

पोल खोल : पत्रकार हेमंत जोशी


पोल खोल : पत्रकार हेमंत जोशी 
वाचक मित्र मैत्रिणींनो, येथे आज मी तुम्हाला घाबरवत नाही पण सावध करतोय. तुम्हाला निराश करणार नाही पण आनंदही होणार नाही. मी तुम्हाला फ्रस्ट्रेट डिप्रेस करणार नाही पण जागच्या जागी तुम्ही आनंदाने उड्या माराल असेहींयेथे काही सांगणार नाही मी तुम्हाला आज हसवणारी नाही पण तुमचा चेहरा पुढले वाचून रडवलेला होऊ शकतो. हि तुमच्या आमच्यासाठी सुवार्ता नाही उलट टेन्शन  डिप्रेशन वाढविणारी हि माहिती आहे. २७ एप्रिलला पंतप्रधान मोदी आणि आपले मुख्यमंत्री या दोघात जी व्हिडीओ कॉन्फरन्स झाली त्याचा जसाच्या तसा रिपोर्ट ठाकरे यांच्याकडून आम्हा काही पत्रकारांना त्यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान यांनी पाठवला आहे, ते अशी त्यांची जबाबदारी नेहमीच बऱ्यापैकी पार पाडतात. हा रिपोर्ट म्हणाल तर निराशाजनक आहे म्हणाल तर अस्वस्थ करणारा आहे म्हणाल तर घाबरवून सोडणार नक्कीच आहे. त्यात भारतावरचे संकट अजिबात टळलेले नाही असे स्पष्ट म्हटले आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास शहरातले कोरोना थैमान अद्याप अजिबात थांबलेले नाही. खरी आकडेवारी निदान मला तरी असे वाटते सामान्यांपुढे उघड केल्या गेलेली नाही वरून विशिष्ट टपोरी पुरुष विशेषतः त्यांच्यातला तरुण वर्ग अद्याप सावध नाही, ऐकायला तयार नाही, लपून बसतो वरून पोलिसांना देखील प्रसंगी मारहाण करतो त्यामुळे पोलीस देखील काही ठिकाणी जायला टाळतात आणि घाबरतात. लॉकडाऊन कुठे कडक करायचे कुठे शिथिल करायचे हे आता राज्य सरकारला ठरवायचे आहे त्यामुळे लॉकडाऊन संपेल असे आजतरी दूरदूरपर्यंत चित्र दिसत नाही...

कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार आहे हे समजून आपली धोरणे ठरवा. दो गज दुरी हा आपल्या जीवनाचा मंत्र बनवा आन आत्मसात करा. मास्क, फेसकव्हर हे देखील आपल्या जीवनात खूप काळासाठी राहणार आहे हे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. लॉकडाऊन राहील आणि जीवनही सुरळीत सुरु असेल असे समतोल धोरण आखण्याचे त्यांनी ठाकरे यांना सुचविले आहे. राज्यातही रेड झोन्स ची संख्या मोठी आहे तेथल्या लोकांना तर विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. मित्रहो, मरण खूपच स्वस्त झाले आहे त्यामुळे कमालीची सावधगिरी घेणे आता अत्यावश्यक ठरले आहे. काही लोकांमध्ये कोरोना लपविण्याची जी गंभीर मानसिकता काहीशा कायद्याच्या भीतीपोटी निर्माण झाली आहे त्यामुळेही खरी आकडेवारी पुढे येण्यात मला वाटते अडचणी येताहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्यातली हि चर्चा अजिबात कुठेही समाधानकारक नाही, प्रचंड धोका वाढलेला आहे. परमेश्वर चिंतन आणि योग्य ती खबरदारी यावरच आपले पुढले भवितव्य अवलंबून आहे.

www.vikrantjoshi.com 

मित्रांनो, आता अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे मला वळायचे आहे. सध्या आपल्यापैकी अनेकांच्या डोक्यात आलेले आहे कि पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रक्कम दान करून मोकळे व्हावे. तुमच्या डोक्यातले हे विचार चांगले आहेत पण दान केल्या जाणारी रक्कम फार मोठी नसेल किंवा कर वाचविण्या त्यात उद्देश नसेल तर शक्यतो तुमच्याकडली रक्कम सरकार दरबारी जमा न करता आसपासच्या ज्या लोकांना खऱ्या अर्थाने यादिवसांत मोठी आर्थिक अडचण चणचण आहे त्यांना हुडकून काढून सहकार्य करा जसे अलीकडे आमच्या परिसरात अमीर खान या अभिनेत्याने केले. त्याने कित्येक कुटूंबाला १५ हजार अशी
मोठ्या रकमेची मदत करून त्यांचे दडपण ओझे कमी केले. कारण अनुभवावरून सांगतो कि सरकार मग ते कोणतेही असो, ओरबाडणे लुटणे हेच त्यांचे मुख्य काम ध्येय असते. जसे राज्य सरकारला रेल्वेच्या आयआरटीसी विभागाने लेखी कळविले होते कि शिवभोजन योजनेचे काम आमच्यावर सोपवा आम्ही केवळ १५ रुपयात तुम्हाला भोजन पुरविण्याची व्यवस्था करतो पण भुजबळ टीम ने त्याकडे दुर्लक्ष करून खाजगी कंत्राटदारांना प्रत्येक थाळीमागे थेट ५० रुपये मोजून शिवभोजन योजनेत देखील प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या या नालायक राजकीय आणि शासकीय अभद्र युतीने जबादारी सोपविलेली आहे. केवळ कल्पना केलेली बरी कि अशा गहन  संकटात देखील तुरुंगातून सुटून आलेले मंत्री अद्याप सुधारायला तयार नाहीत. आम्ही सत्य मांडले कि लिखाण ट्रोल करायचे किंवा जात आडवी आणायची. उद्धव ठाकरे या अशा मुद्यांवर या दिवसात प्रचंड अस्वस्थ आहेत पण संकटात सरकार चालवायचे आहे आणि टिकवायचेही आहे त्यामुळे
त्यांना नाईलाज आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment