Thursday, 23 April 2020

जितेंद्र आव्हाड : पत्रकार हेमंत जोशी

जितेंद्र आव्हाड :  पत्रकार हेमंत जोशी 
करू नका हाड हाड, मथळ्याखाली अलीकडे जेव्हा मी जितेंद्र आव्हाड यांच्यावर लिहिले, त्यांचा मला  फोन आला, त्यांचे बोलणे नेहमीसारखे नव्हते त्यात ती नेहमीची मस्ती नव्हती त्यामुळे त्यादिवशी  आमची नेहमीसारखी जुगलबंदी रंगली नाही पण काही वेळ बोलणे सुरु होते. म्हणाले, एक मी पत्र  मीडियाला उद्देशून लिहिले आहे, पाठवतो. पत्र आले वाचले पण पत्रातल्या पहिल्या आणि शेवटच्या ओळी अस्वस्थ करून सोडणाऱ्या होत्या. सुरुवात होती, मला माफ करा, मी हरलो आणि शेवट होता,  जन पळभर म्हणतील, हाय हाय, मी जातां राहील कार्य काय? कारण आव्हाडांच्या ते लक्षात तेव्हाच  आले असावे कि ते कोरोना ने घेरल्या गेले आहेत. आता याक्षणी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल  केले आहे आणि माझे वाक्य लिहून घ्या, जितेंद्र कमालीचा जिद्दी आणि लढवय्या त्यामुळे ते १००% तेथून सुखरूप परततील. मोठे नेते आहेत ते, त्यामुळे शंभर माणसे जेव्हा त्यांचे वाईट चिंतत  असतात त्याचवेळी पाचशे माणसे त्यांना दुवा देणारे देखील असतात. शरद पवारांचे जेव्हा अनेक  माझ्याकडे वाईट चिंतित असतात तेव्हाही माझे त्यांना हेच उत्तर असते कि पवारांचे तुमच्या वाईट  चिंतण्याने काहीही होणार नाही कारण ते भरपूर जागावेत अशी त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणारे तुमच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने पवार फॅन्स आहेत.... 

पण तरीही कमी प्रमाणात का असेनात, लोकांचे शिव्या शाप शक्यतो घेऊ नयेत,  एखादा माणूस  शिव्या शाप घेऊन देखील खूप जगत असेल पण अनेक व्याधी किंवा दुःख झेलून त्याचे जगणे सुरु असेल तर त्या जगण्याला अर्थ नसतो. एकदा मी आणि जितेंद्र नागपूरला अधिवेशनासाठी जाण्या विमानात एकत्र होतो. मला त्यांनी विचारले, तुमची राहण्याची काय व्यवस्था आहे, मी म्हणालो, नारायण राणे दरवर्षी माझ्यासाठी त्यांच्या हॉटेलात एक रूम ठेऊन देतात. काळजी नाही. पण जे आव्हाड अगदी दरवर्षी मीडियाची नागपूरला सेंटर पॉईंट हॉटेल मध्ये राहण्याची किंवा इतरहीवेळी त्यांना मोठी आर्थिक मदत करायचे आज तेच मीडियावाले त्यांच्यावर उलटले तेव्हा आव्हाड अस्वस्थ झाले. पुढारी पोलीस पत्रकार आणि पाक विचारांचे मुसलमान हे चार प कधीही कोणाचे नसतात, कधीही कोणाचे होत नाही म्हणून निदान मी तरी या मंडळींना कायम त्यांची जागा दाखवत आलो आहे. मीडियातले भ्रष्ट विनाकारण फडफड करायला लागले कि त्यांची अशी लेखणीतून उतरवतो कि त्यांना जिवंतपणी नर्क दर्शन घडते. ज्यांच्याकडून पैसे खायचे त्यांचीच पुढे आई बहीण घेऊन मोकळे व्हायचे, असले काही थर्ड ग्रेड मीडियावाले सुरुवातीपासूनच माझ्या मस्तकात जातात आणि हे तर मला माहित आहे कि मॉरली संपलेला माणूस जगातला सर्वाधिक गांडू माणूस असतो... 

जितेंद्र आव्हाड नेहमी जी उघड उघड कायम मुसलमानांची विशेषतः गोंधळ घालणाऱ्या मुसलमानांची बाजू घेतात त्यांचे हे वागणे साहजिकच हिंदूंना मग ते कोणत्याही राजकीय विचारांचे पक्षाचे असतील हि बाजू घेणे बहुतेकांना आवडत नाही. शिवाय त्यांच्या वागण्या बोलण्यात एकप्रकारची टपोरेगिरी लोकांना जाणवते, तेही लोकांना अतिशय खटकते. पण आव्हाड असे का वागतात हे बहुतेकांच्या लक्षात न आल्याने ते आव्हाडांच्या बाबतीत नाक मुरडून मोकळे होतात. एकनाथ शिंदे असोत कि अन्य शिवसेना भाजपा नेते किंवा आव्हाडांच्या पक्षातले दिवंगत वसंत डावखरे, हे सारेच तसे जितेंद्र आव्हाडांच्या राजकीय आयुष्यावर पेटून उठलेले, आव्हाडांना राजकारणातून संपवायचे याच मुद्दयांवर ठाणे जिल्ह्यात सारेच्या सारे नेते एकत्र असायचे, एकत्र यायचे जमायचे म्हणून आव्हाडांनी मग निवडून येण्यासाठी वादग्रस्त मुंब्रा परिसर निवडला आणि तेथल्या बहुसंख्य मुसलमान मतदारांची मने केवळ जिंकण्यासाठी आव्हाड हे असे कायम मुसलमानांचे लांगुलचालन करत आले आहेत त्यात त्यांची मोठी चूक आहे असे निदान मला तरी वाटले नाही.  जाऊद्या आव्हाडांना सहीसलामत बाहेर पडू द्या, मी त्यांची अनेक गुपिते तुम्हाला सांगून मोकळा होईल. जेव्हा केव्हा आव्हाड तुम्ही बाहेर याला तेव्हा ठरवून टाका कि शाप मग ते हिंदूंचे असोत वा अधिकाऱ्यांचे किंवा अन्य कुठल्याही समूहाचे, घेणे वाईट असते, यापुढे असे वागणे शक्यतो टाळावे... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

No comments:

Post a comment