Wednesday, 15 April 2020

लांगुलचालन आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी


लांगुलचालन आणि आपण : पत्रकार हेमंत जोशी 
नो मेकअप नो रंगरंगोटी नो पार्लर्स नथिंग त्यामुळे ललनांचे नेमके रूप स्वरूप यादिवसात बघायला मिळते. सांताक्रूझला या दिवसात लोणच्यासाठी कैऱ्या फोडून देणाऱ्या बायकांसारख्या माझ्या खिडकीतून दिसणाऱ्या मिसेस शेठ यांना बघून मी स्वतःच भर उन्हाळ्यात गार झालो. अलीकडे काहीही घडले तरी आधी जात कोणती हे बघितल्या जाते. सध्या राजीव खांडेकर विषय चवीचा आणि चघळण्याचा आहे. एका ब्राम्हण पत्रकाराचा फोन आला, म्हणाला, राजीव ब्राम्हण ना रे, निदान चेहऱ्यावरून बोलण्यावरून तरी ब्राम्हण वाटतो, तो म्हणाला. चेहऱ्यावरून जात ठरत असेल तर सुशीलकुमार शिंदे, जितेंद्र आव्हाड, मधुकर पिचड इत्यादींना कोकणस्थ ब्राम्हण म्हणावे लागेल किंवा उदय तानपाठक, यदु जोशी इत्यादी पत्रकार कोणत्या अँगल ने ब्राम्हण वाटतात? वास्तविक याआधी किंवा यापुढेही जातीपातीवरून लढायचेच असेल तर पाक विचारांचे जे बहुसंख्य मुसलमान सध्या उतमात करताहेत त्यांच्याविरुद्ध आम्ही समस्त मराठींनी एकत्र येऊन लढले पाहिजे आणि ज्यांना हा देश मनापासून आवडतो अशा काही मुस्लिमाना हुडकून काढायला पाहिजे त्यांना उघड पाठिंबा समर्थन ताकद  देऊन त्यांच्याच माध्यमातून भरकटलेल्या बहुसंख्य मुस्लिमांचे विचारमंथन  करून त्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात कसे आणले जाईल त्यावर विचार व्हायला हवा, हे तसे मुश्किल काम आहे पण नामूमकिन नाही...

१४ तारखेला विशेषतः बांद्रा आणि मुंब्रा परिसरात घडलेला प्रकार पूर्वनियोजित आणि निंदनीय होता हे नक्की आहे आणि हा कट शिवसेनेला बदनाम आणि कमकुवत करण्यासाठी रचल्या गेला काय त्यावर उद्धव ठाकरे आणि अन्य शिवसेना नेत्यांनी विचारमंथन करून कोरोना संकट संपले म्हणजे योग्य दिशेने पाऊल उचलायला हवे तसे त्यांनी कठोर निर्णय घ्यायला हवेत. शरद पवार किंवा त्यांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेस च्या माध्यमातून अतिशय कल्पकतेने बहुसंख्य पाक विचारांचे मुसलमान या राज्याच्या सत्तेत चोहो बाजूंनी येऊन बसले आहेत किंबहुना त्यांनी आपल्याला मोठ्या खुबीने घेरले आहे, म्हटल्यास वावगे ठरू नये. भाजपा आणि शिवसेना युती संपल्यानंतर तुटल्यानंतर यापुढे मराठी माणूस अधिकाधिक गावगाड्यातून किंवा शहरांमधून देखील कमकुवत होत गेल्याचे आणि पुन्हा एकवार तो पाक विचारांच्या असंख्य मुसलमानांना घाबरून राहत असल्याचे चित्र नजीकच्या काळात झपाट्याने बघायला मिळेल याची मला खात्री आहे. कोरोनोचे संकट असो किंवा अन्य कोणतेही संकट असो, पाक विचारानं हे तरुण आणि मुसलमान दरदिवशी मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि हाच विचार मांडतात कि हिंदूंचे खच्चीकरण कसे केल्या जाईल..

www.vikrantjoshi.com

या राज्यात सर्वसामान्य लोकांचे संकटातले तारणहार म्हणजे शिवसैनिक, विशेषतः मुंबईत तर समस्त शिवसैनिकांचा मराठींना मोठा आधार असतो पण जसा कोरोना बोकाळला तसे मुसलमानांचे विविध गट ज्या मोठ्या प्रमाणावर मुंबईच्या रस्त्यांवरून धुडगूस घालतांना बघायला मिळताहेत तसे विविध उपक्रम राबवून मराठींना धीर देणारे शिवसैनिक मात्र कुठेही दिसत नसल्याचे चित्र जागोजाग पाहायला मिळते आहे. सत्तेच्या खुर्चीला गालबोट लागायला नको म्हणून शिवसैनिकच जर घाबरून रस्त्यावर न उतरणे त्यासी प्राधान्य द्यायला लागले तर या पोकळीचा मोठा गैरफायदा पाकड्या विचारांचे मुसलमान नक्की घेतील, १४ एप्रिल रोजी बांद्र्यात घडलेला प्रकार भविष्याची नांदी होती म्हटल्यास वावगे ठरू नये. शिवसैनिक हा कायम राग उफाळून बाहेर पडणारा लढवय्या असतो पण आपल्या उद्धव साहेबांना उगाच त्रास होऊ नये नजर लागू नये म्हणून जर हा शिवसैनिक मुंबई किंवा राज्यातील प्रत्येक गावाला शहराला चारी बाजूंनी घेरलेल्या धुडगूस घालणाऱ्या बहुसंख्य पाक विचारांच्या मुसलमानांना धुडगूस घालण्यास अप्रत्यक्ष पाठिंबा देत असेल तर हे चित्र नक्की भयावह आहे. नफरत पाक विचारांच्या मुसलमानांविषयी ठेवायला हवी त्यांच्यात जे हिंदुस्थान प्रेमी मुसलमान आहेत त्यांच्याकडे  मात्र कायम आदराने प्रेमाने बघायला वागायला पाहिजे...अत्यंत महत्वाचे म्हणजे रस्त्यावर उतरणारा शिवसैनिक हाच बाळासाहेबांचा जणू प्रेसरिलीज होता, असायचा, मीडिया रिलेशन असायचा. आता उद्धव ठाकरेंच्या प्रतिमा संवर्धनाचे भरपूर प्रयत्न होताहेत, पण शिवसेनेची प्रतिमा लोकांच्या हृदयात ठसवणारा शिवसैनिक यावेळी नेमका दिसेनासा झालाय. असे का होते आहे आणि ते कसे दुरुस्त करता येईल, याचा विचार व्हायला हवा.... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment