Friday, 27 March 2020

करोना करोना : पत्रकार हेमंत जोशी

करोना करोना : पत्रकार हेमंत जोशी 
ज्यांच्या घरी हिंदी बोलले जाते किंवा जे हिंदी बोलतात उगाचच नागपूरकरांसारखे त्या समस्त पुरुषांना त्यांच्या  बायकांनी किंवा प्रेयसीने एवढ्या वर्षात जेवढे करोना करोना म्हटले नसेल त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या दिवसात जो तो करोना करोना सारखे म्हणतोय देवाचा जप केल्यासारखा. खरे टेन्शन पुढे आहे म्हणजे एकदा का करोना चे संकट टळले कि पुढले संकट अचानक वाढणाऱ्या लोकसंख्येचे असणार आहे हे नक्की, या दिवसात एखादी पन्नाशीची स्त्री जरी पोटुशी राहिली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण घरी आणि बाहेर दोन्हीकडे सारखे करोना करोना म्हणे कानावर पडते आहे. भारतीय पुरुषांना इतर काही उद्योग नसले कि हे उद्योग नेमके सुचतात म्हणून भीती वाटते आहे कि लोकसंख्येच्या बाबतीत आपण लवकरच चीनला मागे टाकू...

जे स्वतःला अतिहुशार अतिशहाणे समजत असतील आणि ज्यांना आपली पुढली पिढी आपल्याच हाताने मारून टाकायची असेल त्यांनीच या दिवसात बाहेर पडावे किंवा असे कुटुंबे या दिवसात बाहेर पडत असावेत ज्यांना थोडीफार अक्कल असेल आहे ते हा असा बाहेर क्षणभर देखील पडण्याचा आगाऊपणा नक्की करणार नाहीत. जे वाक्य सध्या सोशल मीडियावर फिरते आहे ते गंमतीने घेऊ नका सिरियसली घ्या. वाक्य आहे, घरी आपली किंवा आपल्यामुळे आपल्या बायकोची ढेरी या दिवसात वाढली सुटली तरी चालेल पण बाहेर पडून आपले ढुंगण सुजवून घेऊ नका तशी वेळ पोलिसांना तुमच्यावर आणू देऊ नका. याउलट ज्यांना मुलबाळ होत नसेल त्यांनी या दिवसात शांत डोक्याने, लगे रहो २४ तास...

तुम्हाला हे कदाचित माहित नसेल कि माझ्यासारख्या काही मूठभर मीडिया मध्ये काम करणाऱ्यांना महाराष्ट्र शासन विशिष्ट ओळखपत्र देत असते त्याला मराठीत अधिस्वीकृती पत्र  किंवा इंग्रजीत ऍक्रिडिएशन कार्ड असे म्हणतात जे दाखवून मी किंवा माझा पत्रकार मुलगा विक्रांत अगदी बिनधास्त बाहेर पडू शकतो पण मी घरात यादिवसात अक्षरश: धमकावले आहे कि जर बाहेर पडलात तर मी हे घर कायमचे सोडून जाईन आणि मी दिलेली धमकी खरी करतो हे त्यांना पक्के ठाऊक आहे. त्यादिवशी शरद पवार व त्यांच्या कुटुंब सदस्यांनी तसेच उद्धव आणि त्यांच्या कुटुंबाने जेव्हा टाळ्या वाजविल्या आपल्या साऱ्यांचे उर आनंदाने अभिमानाने भरून आले पण ज्यांनी जनता कर्फ्यू नंतर एकत्रित येऊन निवडणुका जिंकल्यासारखा उत्सव साजरा केला ते कोण होते कोणत्या विचारांचे होते ते समस्त मनातून तर उतरलेच पण त्यांनी आपल्या नेत्याला म्हणजे नरेंद्र मोदी यांना देखील विनाकारण बदनाम करून सोडले, कृपया अति आगाऊपणा करून देशाचे स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे नाव खराब करवून घेऊ नका आणि आयुष्य उध्वस्त करून सोडू नका. कृपया काहीही झाले तरी बाहेर पडू नका. पुन्हा एकवार सांगतो कि घरी बसून तुमची ढेरी आणि बायकोचे पोट पुढे आले तरी चालेल पण बाहेर पडून स्वतःचे ढुंगण सुजवून घेण्याचा अविचार मनातही आणू नका...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

No comments:

Post a comment