Sunday, 1 March 2020

वा उद्धवा तुमचे मजेशीर मंत्री : भाग १: पत्रकार हेमंत जोशी


वा उद्धवा तुमचे मजेशीर मंत्री : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 
स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळल्यास इतर कोणत्याही मंत्र्याला राज्यमंत्र्याला रस्त्याने जातांना विशेषतः मुंबईत सुरक्षेची अजिबात आवश्यकता नाही गरज नाही याउलट उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातले असेच बहुसंख्य मंत्री आहेत खऱ्या अर्थाने ज्यांच्यापासून सर्वसामान्य मतदारांना जनतेला सुरक्षा हवी असते कारण अनेकांचे वागणे सिनेमातल्या खलनायकासारखे असते आहे. अर्थात गाव तेथे गुंड तसे प्रत्येक मंत्रिमंडळातच काही मवाली गुंड नीच हलकट वृत्तीचे मंत्री राज्यमंत्री असतात आणि अशा वृत्तीच्याच मंत्र्यांचा राज्यमंत्र्यांचा दुर्दैवाने अधिक बोलबाला असतो. काही मंत्र्यांची राज्यमंत्र्यांची दादागिरी मात्र हवीहवीशी असते जसे अगदी अलीकडे राज्यमंत्री दबंग बच्चू कडू छान म्हणाले कि गेली अनेक वर्षे त्याच त्या दलालांना ठेकेदारांना करोडो रुपयांचे ठेके का मिळतात वास्तवात इतर अनेक त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने लायक असतांना, कडू यांनी घेतलेला हा पवित्रा विशेषतः मंत्रालयातील दलालांमध्ये आणि सतत ज्यांना ठेके मिळतात अशा ठेकेदारांमध्ये खळबळ उडवून देणारा आहे पण बच्चू कडू यांनी हा प्रकार धसास लावून मूठभर दलाल आणि ठेकेदार मंडळींची मंत्रालयातील आणि राज्यातली विविध खात्यातली मोनोपली संपविणे गरजेचे आहे निदान बच्चू कडू यांच्याकडून तरी असे अपेक्षित नाही कि आधी बंड करायचे उठाव करायचा नंतर तोडपाणी करून आपले रेट ठरवून घ्यायचे, या पद्धतीने बच्चू कडू वागले नाहीत तर आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मोठे होऊन विदर्भात पुढे अनेक वर्षे प्रथम क्रमांकाचे नेते म्हणून छाप पाडतील अन्यथा पुढे आले त्यापेक्षा दुप्पट वेगाने ते मागे येतील पडतील जर चुकीच्या पद्धतीने ते वागले...

आधीच आम्ही मुंबईकर रस्त्यांच्या आणि मेट्रोच्या कामांमुळे पार मेटाकुटीला आलो आहोत, सध्या प्रेयसीने दिलेल्या वेळेत तिला भेटायला न गेल्याने अनेकांची प्रेमप्रकरणे तुटताहेत त्यात नव्या मंत्री झालेल्यांची मोठी भर पडलेली आहे. पूर्वीचे वाईट  उद्धव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणले आहेत. मध्यंतरी जरा बरे सुरु होते म्हणजे एकतर मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे काढले होते आणि कर्णकर्कश सायरन्स देखील बंद करण्यात आले होते नव्हे न्यायालयाने ते कायद्याने बंद केले होते, पण नव्या मंत्रिमंडळाने भलताच घोर आमच्या मागे लावून ठेवलेला आहे म्हणजे अजिबात गरज नसतांना प्रत्येक मंत्र्यांच्या मागे आणि पुढे किमान तीन मोटारगाड्या असतात त्यात पुढे पोलिसांची सायरन वाजवणारी गाडी असल्याने कोणताही मंत्री रस्त्यावर उतरला कि ट्राफिक ची पार आई बहीण निघते आणि आम्हा मुंबईकरांचा त्यातून जीव अक्षरश: मेटाकुटीला येतो, वैताग येतो. असे करू नका, उगाच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका, उद्धव आणि आदित्य सोडल्यास इतर कोणत्याही नेत्याला मंत्र्याला या मुंबईत कोणीही काहीही करणार नाही. हि असली सुरक्षा म्हणजे टपोरेगिरीचे मूर्तिमंत उदाहरण ठरते, असल्या सुरक्षेमुळे सारेच्या सारे मंत्री टपोरी गुंड मवाली आहेत कि काय सामान्य माणसाला तसे वाटत राहते, असे वागू नका. लोकांच्या जनतेच्या मतदारांच्या मनातून लगेच कायमचे उतरू नका असला आगाऊपणा करू नका...

www.vikrantjoshi.com

नेमके मंत्री आणि अख्खे मंत्रिमंडळ कसे तुम्हाला ते सांगायचे होते, सुरुवात करतो, कान देऊन ऐका. अलीकडे काही वर्षात नव्याने आलेले मुख्यमंत्री जे करायचे तेच उद्धव यांनी देखील पुढे सुरु ठेवणे निदान मला तरी असे वाटते ते गरजेचे होते पण उद्धव यांनी तसे केले नाही म्हणजे त्यांनी एकाच वेळी एका दमात शपथ देऊन मंत्र्यांचा कोटा पूर्ण केल्याने प्रचंड राजकीय गोंधळाचे वातावरण सध्या आहे म्हणजे यापुढे आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही हे अनेक ताकदवान आमदारांच्या लक्षात आल्याने अनेक बहुतेक विधान सभा आणि विधान परिषद सदस्य मनातून मनापासून अस्वस्थ आहेत पण त्यांच्या या नेमक्या अस्वस्थतेचा कोणताही फायदा भाजपाला न उचलता येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे असे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते. उद्धव यांनी हा चुकीचा निर्णय घेतला त्यांनी एका दमात साऱ्यांना मंत्री केले त्यात त्यांचे आणि इतर घटक पक्षांचे नक्की नुकसान होणार आहे कारण जे मंत्री झाले नाहीत त्यांना घेतलेल्या कष्टांवर पाणी फिरले असेच त्यांना वाटते आहे, भडका उडू शकतो. टप्प्याटप्प्याने उद्धव यांनी मंत्रिमंडळ वाढ व विस्तार करणे गरजेचे होते, आश्चर्य म्हणजे पवार देखील चुकले...
क्रमश: हेमंत जोशी 

No comments:

Post a comment