Monday, 30 March 2020

स्त्री पुरुष तुलना आणि फरक : पत्रकार हेमंत जोशी

स्त्री पुरुष तुलना आणि फरक : पत्रकार हेमंत जोशी 
स्वयंपाक अधिक चवदार रुचकर कोण बनवतं स्त्रिया कि पुरुष त्यावर माझे उत्तर आहे कि आम्ही पुरुष तुम्हा स्त्रियांपेक्षा कितीतरी पटीने अधिक स्वादिष्ट भोजन तयार करू शकतो म्हणून जगात कुठेही नजर टाका म्हणजे थेट पंचतारांकित हॉटेल्स पासून तर रस्त्यावरच्या ढाब्यापर्यंत अत्र तत्र सर्वत्र तुम्हाला पुरुषांचीच मक्तेदारी याही क्षेत्रात बघायला मिळेल मिळते. हाच प्रश्न मला कायम लिखाणाच्या बाबतीतही पडलेला असतो कि अधिक उत्तम लिखाण कोणाचे म्हणजे स्त्रियांचे कि आम्हा पुरुषांचे, येथे मी अधिक गूण स्त्रियांना देऊ इच्छितो. शब्दरचना स्त्रियांच्या खूप प्रभावी असतात पण स्त्रियांना विविध विषयांवर लिहितांना मोठी मर्यादा येते त्यामुळे आम्ही पुरुष अधिक वाचनीय ठरतो कारण आजही केवळ मराठी स्त्रियांचे येथे उदाहरण घेतले तर त्यांना चौकटीत राहूनच लिखाण करावे लागत असल्याने अनेकदा ते वाचनीय नसते पण पुरुषांना लिखाणाच्या ना चौकटी आहेत ना मर्यादा आहेत त्यामुळे कुठेही भटकून ते विविध प्रत्यक्षदर्शनी विषयांवर लिहून मोकळे होतात. वाचकमित्रहो, पुरुषांचे शब्द प्रभावी ठरत नसले तरी विषय प्रभावी ठरतात त्यामुळे ते वाचनीय असतात....

पत्रकार भाऊ तोरसेकर आणि त्यांच्या पत्नी स्वाती तोरसेकर दोघेही पट्टीचे लेखक किंबहुना स्वाती शब्दांशी वाक्यांशी खेळतांना अधिक प्रभावी वाटतात पण  घराच्या चौकटीत राहून त्यांना लिखाण करायचे असते आणि भाऊंचा संपर्क जनसंपर्क भटकंती साराच आवाका भला मोठा त्यामुळे भाऊ अधिक प्रभावी ठरले आणि लिखाण अतिशय उत्तम असून स्वातीवहिनींना नक्कीच भाऊंच्या एवढी मान्यता लोकप्रियता मिळाली नाही. कवितांच्या बाबतीत देखील असे का घडते कळत नाही पण आधी आणि आजही कवयत्री पेक्षा कवी लोकप्रियतेच्या बाबतीत खूपच पुढे निघून गेलेले दिसतात असतात. मी तर त्याहीपुढे जाऊन असे म्हणेन कि जेव्हा शंभर नामवंत कवी पुढे निघून जातात तेव्हा कुठेतरी एखादी शांता शेळके किंवा बहिणाबाई चौधरी जन्माला येते नामवंत ठरते. अनेकदा असे वाटते कि चौकटीच्या मर्यादा तोडून जर आजची स्त्री लिखाण करू लागली तर त्यांच्यातही अनेक राही भिडे, रोहिणी निनावे बघायला मिळतील. गिरिजाबाई किर हयात असतांना एकदा मी त्यांना हेच म्हणालो होतो कि तुम्ही शेकडो पुस्तके लिहिलीत पण लक्षात राहील असे लिखाण कधी तुमच्या हातून घडले नाही मात्र तुमच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या वपु काळे यांची सारी पुस्तके मुखोद्गत असलेले कितीतरी मराठी वाचक या जगात आहेत...

www.vikrantjoshi.com

माझे १४००० हजाराच्या आसपास फेसबुक फ्रेंड्स आहेत त्यात जगातल्या राज्यातल्या अशा अनेक स्त्रिया आहेत कि ज्यांचे लिखाण मला मंत्रमुग्ध करते. अगदी मनातले सांगतो कि या स्त्रियांच्या लिखाणाची ताकद जर माझ्या शब्दांमध्ये असती तर मला खात्री आहे आणखी कित्येक कोटी रुपये मी त्या भरवशावर मिळवून मोकळा झालो असतो. शेवटी तेच कि या निष्णात फेसबुक महिला फ्रेंड्सचे केवळ शब्द किंवा भाषा तेवढी प्रभावी आहे असते पण त्यांचे विषय प्रभावी प्रॅक्टिकल नसल्याने त्यांना हवी तेवढी लोकप्रियता मिळत नसावी. विशेषतः स्त्रियांच्या कवितांचे विषय आणि शब्द यात एवढे साम्य असते कि वाचणाऱ्याला वाटावे एकाच कवयित्रीने वेगवेगळ्या नावांनी कविता काव्य तयार केले असावे. कदाचित रोहिणी निनावे ला वाईट वाटेल पण तिच्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी माझ्या कितीतरी महिला फेसबुक फ्रेंड्स काव्य रचण्यात अधिक प्रभावी आहेत पण स्वतःला घराच्या समाजाच्या विशिष्ट चौकटीत त्यांनी जखडून ठेवलेले असावे त्यामुळे त्यांना रोहिणी निनावे होता आले नाही किंवा तिच्यापुढे जाता आले नाही. रोहिणी मात्र प्रसंगी वैवाहिक जीवन किंवा सरकारी नोकरीवर लाथ मारून तिन लिखाणात स्वतःला झोकून दिले तो सारा तिचा इतिहास माझ्यासमोर आहे. बघा, तुमच्यातल्या कोणाला शांताबाई शेळके रोहिणी निनावे होता आले तर...
क्रमश: हेमंत जोशी 

अग्ग्बाई ! असे केले तर होईल का ? पत्रकार हेमंत जोशी


अग्ग्बाई ! असे केले तर होईल का ? पत्रकार हेमंत जोशी 
एकदा माझा मित्र सांगत होता कि त्याने फेसबुकवर त्याचा फोटो टाकला तेव्हा ६० लाईक्स आले आणि ७ कमेंट्स आल्या, नंतर त्याने त्याचा व पत्नीचा फोटो टाकला तेव्हा ३०० लाईक्स आले आणि ४० कमेंट्स आल्या, त्यानंतर त्याच्या बायकोने किंचितसा पदर ढळलेला फोटो टाकला, गेले सहा महिने झाले आजही त्या फोटोला लाईक्स येतात आणि कमेंट्सचा तर पाऊस पडतोय. ह्याला म्हणतात भारतीय पुरुषांची लैंगिक, विकृत मानसिकता त्यामुळे अमुक एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवतांना स्त्री मग ती १६ वर्षांची असो अथवा ६० वर्षाची शंभर वेळा तरी विचार करते कारण तिला हे नेमके माहित आहे कि काही थेट विचारतील आणि काही वेळ घेतील पण भारतीय पुरुषाचा विषय शंभर टक्के लैंगिक विकृतीवरच येऊन ठेपतो. आज करोना व्हायरस मूळे आपण सारेच मृत्यूच्या दारात उभे आहोत, सारे घरात बसून आहेत त्यामुळे काही स्त्रियांना तुम्हा पुरुषांकडे एखादे महत्वाचे काम पडू शकते, अडचण येऊ शकते पण अमुक एका ओळखीच्या पुरुषाची मदत घ्यावी किंवा नाही त्यावर त्या खूप विचार करून तुम्हा पुरुषांकडे अप्रोच होतील हे नक्की आहे...

कोणत्याही प्रकारचे सहकार्य लागले तर या कठीण दिवसात मी आपल्या पाठीशी आहे असे आव्हान मी माझे भ्रमणध्वनी देऊन केले होते त्याला छान रिस्पॉन्स मिळाला, अप्रोच होणारे सुरुवातीला मला पण भीत भीतच अप्रोच झाले असावेत पण माझा हेतू निर्मल आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते बिनधास्त त्यांच्या अडचणी सांगून मोकळे झाले. त्यातले जवळपास
पाच काहीसे वयस्क स्त्री पुरुष तर एकटे असल्याने त्यांना टेन्शन घालवायचे होते, माझ्याशी सतत गप्पा मारण्यातून त्यांचे मन बऱ्यापैकी हलके झाल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक अनेक वादग्रस्त विषय लिखाणासाठी माझ्याकडे पेंडिंग आहेत पण आपण थेट मृत्यूच्या दारात उभे असल्याने, विरोधात लिखाण करून अमुक एखाद्याचे मन दुखवावे, वाटत नाही तेव्हा माझे नेहमीचे तिखट वात्रट जहाल लिखाण हे करोना संकट संपल्यानंतरच तुम्हाला वाचायला मिळेल....

परवा एका पत्रकार मित्राचा नाशिक वरून फोन आला तो म्हणाला कि त्याच्या जवळचे एक जोडपे भोपाळला अडकले आहे आणि त्यांचा लहान मुलगा येथे नाशिक मध्ये म्हाताऱ्या आजी आजोबांबरोबर आहे त्यामुळे त्यांना कोणत्याही परिस्थितीत नाशिकला पोहोचणे गरजेचे आहे. पण महाराष्ट्रात त्यांनी प्रवेश केल्या केल्या त्यांना धुळे जिल्हा पोलीस नक्की अडवतील. त्याला डिटेल्स मला व्हाट्सअप करायला सांगितले, नंतर त्याने पाठविलेला व्हाट्सअप मी जसाच्या तसा हेमा आणि अनिल गोटे दाम्पत्याला धुळ्याला फॉरवर्ड केला आणि त्या जोडप्याचे काम झाले, ते वेळेत सुखरूप नाशिकला पोहोचल्याचा मला मित्राचा फोन आला. यादिवसात अशी छोटी छोटी पण त्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची कामे अडून  पडतील, किमान या संकटात तरी मला अमुक केले तर काय मिळेल, हा नेहमीचा स्वभाव विकृती बाजूला ठेवून या अतिशय गंभीर कठीण प्रसंगी इतरांसाठी धावून जावे. विशेषतः जे घाबरले आहेत त्यांचे समुपदेशन करणे आपले कर्तव्य आहे, समजून काम करावे, सहकार्य करावे...

छान वाटते बघितले किंवा कानावर आले कि जसे पत्रकार अभय देशपांडेने भाजी कापताना त्याचा फोटो फेसबुक वर असा काही पोज देऊन टाकला आहे कि जणू काही याआधी त्याला घरी कधी अशी कामे करावीच लागली नाहीत. लब्बाड कुठला, गणपतीच्या दिवसात घरी येणाऱ्यांना देण्यासाठी चिवडा असो कि वहिनींच्या कपड्यांना इस्त्री, हैमावहिनींच्या केवळ एका इशाऱ्यावर झटपट सेवा देणारे हे महाशय उगाचच असा खोटा खोटा फोटो टाकून मोकळेझाले आहेत. थांबा थोडे, अजितदादा पोळ्या लाटताहेत, छगन भुजबळ वरण  भाताचा कुकर लावताहेत, राधेश्याम मोपलवार झाडू पोछा करताहेत असे अनेक विविध फोटो तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहेत...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Friday, 27 March 2020

ईश्य ! काय करावे कसे करावे केव्हा करावे : पत्रकार हेमंत जोशी

ईश्य ! काय करावे कसे करावे केव्हा करावे : पत्रकार हेमंत जोशी 
पत्नी अकाली गेल्यानंतर व.पु. काळे अनेकदा साहित्य सहवास मध्ये त्यांचा घरी एकटेच असायचे. मुलीचे आणि मुलाचे लग्न झालेले, घर तसे लहान त्यामुळे व.पु एकटे असायचे. एकदा ते मला म्हणाले, कधी कधी एकटेपण खायला उठते त्यामुळे मीच मला माझ्याच हातांनी थोपटवून घेतो. मला देखील आयुष्यात विविध कारणांनी अनेकदा जेव्हा केव्हा एकटे राहण्याचा प्रसंग आला मीच माझे अश्रू पुसले किंवा स्वतःशी बोलत बसे त्यामुळे मन आपोआप मोकळे व्हायचे, हलके व्हायचे. कदाचित सध्या हा प्रसंग तुमच्यापैकी अनेकांवर येऊन ठेपलेला असेल. कधी सखा म्हणून तर कधी वडीलधारे म्हणून कधी जिवलगा म्हणून तर कधी कुटुंबातला एक सदस्य म्हणून केव्हाही मला फोन करा, छान छान गप्पा मारूया पण आपण एकटे आहोत किंवा वयस्क असतांना दोघेच घरी आहोत, असे कोणतेही निराशेचे विचार मनात आणू नका, झटकून टाका...

आपल्याकडे नेमके घडते असे कि एखादी स्त्री पुरुषाकडे मन मोकळे करायला गेली कि ती प्रेमात पडली आहे असा अर्थ आपण काढून मोकळे होतो. कृपया निदान या दिवसाततरी असले विकृत कामांध विचार सोडून द्या. आपण सारे साक्षात मृत्यूच्या दारात उभे आहोत त्यातून अनेकांना नैराश्येने ग्रासले जाऊ शकते. आता माझे माझ्या कुटुंबाचे माझ्या व्यवसायाचे पैशांचे मालमत्तेचे काय होईल कसे होईल हे जे अनेकांना वाटते आहे तसे वाटून घेणे त्यातून नैराश्याला जवळ करणे अजिबात आवश्यक नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी मला प्रकृती अस्वास्थ्यामुळे ४-५ महिने घरी बसावे लागले होते त्यादरम्यान एखादा प्रचंड निराश झाला असता, स्वतःची आणखी तब्बेत त्याने बिघडवून घेतली असती. मी मात्र स्वतःच्या मनाची स्वतःच समजूत काढत होतो आणि जेव्हा काही महिन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली, पुढल्या केवळ एक दोन वर्षात, आयुष्यभराची कमाई करून मोकळा झालो. थोडक्यात, घरी बसलो म्हणून सारे संपले, असे समजायचे नसते...

आजच्या अडचणीत आजच्या संकटात उद्याचा उष:काल आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. अनेकांची पहाडासारखी पोटाची मुले अचानक देवाघरी जातात. माझ्या मोठ्या बहिणीला वयाच्या केवळ ३० व्या वर्षी वैधव्य आले होते ज्यावेळी तिला शाळेतही न जाणारा मुलगा व मुलगी होते. समोर प्रचंड अडचणींचा डोंगर पण तरीही ती खचली घाबरली मागे हटली नाही. त्वेषाने जिद्दीने तडफेने तिने सरकारी नोकरी केली, मुलांना उत्तम संस्कार दिले त्यांना घडविले वाढविले मोठे केले. निराशेवर मात करावीच लागते जेव्हा केव्हा आपण एकटे एकाकी आहोत किंवा सारे संपले आहे असे वाटते. अर्थात दुसऱ्यांना ज्ञान पाजणे सोपे असते, स्वतःवर आलेले प्रसंग निभावणे मात्र अत्यंत कठीण असे काम असते. हेही दिवस नक्की निघून जातील. पुढले काही दिवस निराशेचे आहेत पण त्यानंतर दुपट्टीने कामाला लागून आधीची सारी कसर भरून काढता येईल आणि पुन्हा एकवार पूर्वीचे सुगीचे दिवस येतील. आज मात्र हातपाय गाळून बसणे म्हणजे कुटुंबाला उध्वस्त करण्यासारखे ते ठरावे. पत्रकार अभय देशपांडे, पत्रकार अभिजित मुळ्ये, पत्रकार भाऊ तोरसेकर पत्रकार कैलास म्हापदी किंवा संपदा केजकर यांच्यासारख्या माझ्या काही मित्र मैत्रिणींशी बोलून त्यांच्याशी तुम्हाला सुसंवाद साधता येईल का, त्यावर मी विचार करतो आहे. लवकरच त्यांचे भ्रमणध्वनी तुम्हाला शेअर करता येतील...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

करोना करोना : पत्रकार हेमंत जोशी

करोना करोना : पत्रकार हेमंत जोशी 
ज्यांच्या घरी हिंदी बोलले जाते किंवा जे हिंदी बोलतात उगाचच नागपूरकरांसारखे त्या समस्त पुरुषांना त्यांच्या  बायकांनी किंवा प्रेयसीने एवढ्या वर्षात जेवढे करोना करोना म्हटले नसेल त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या दिवसात जो तो करोना करोना सारखे म्हणतोय देवाचा जप केल्यासारखा. खरे टेन्शन पुढे आहे म्हणजे एकदा का करोना चे संकट टळले कि पुढले संकट अचानक वाढणाऱ्या लोकसंख्येचे असणार आहे हे नक्की, या दिवसात एखादी पन्नाशीची स्त्री जरी पोटुशी राहिली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण घरी आणि बाहेर दोन्हीकडे सारखे करोना करोना म्हणे कानावर पडते आहे. भारतीय पुरुषांना इतर काही उद्योग नसले कि हे उद्योग नेमके सुचतात म्हणून भीती वाटते आहे कि लोकसंख्येच्या बाबतीत आपण लवकरच चीनला मागे टाकू...

जे स्वतःला अतिहुशार अतिशहाणे समजत असतील आणि ज्यांना आपली पुढली पिढी आपल्याच हाताने मारून टाकायची असेल त्यांनीच या दिवसात बाहेर पडावे किंवा असे कुटुंबे या दिवसात बाहेर पडत असावेत ज्यांना थोडीफार अक्कल असेल आहे ते हा असा बाहेर क्षणभर देखील पडण्याचा आगाऊपणा नक्की करणार नाहीत. जे वाक्य सध्या सोशल मीडियावर फिरते आहे ते गंमतीने घेऊ नका सिरियसली घ्या. वाक्य आहे, घरी आपली किंवा आपल्यामुळे आपल्या बायकोची ढेरी या दिवसात वाढली सुटली तरी चालेल पण बाहेर पडून आपले ढुंगण सुजवून घेऊ नका तशी वेळ पोलिसांना तुमच्यावर आणू देऊ नका. याउलट ज्यांना मुलबाळ होत नसेल त्यांनी या दिवसात शांत डोक्याने, लगे रहो २४ तास...

तुम्हाला हे कदाचित माहित नसेल कि माझ्यासारख्या काही मूठभर मीडिया मध्ये काम करणाऱ्यांना महाराष्ट्र शासन विशिष्ट ओळखपत्र देत असते त्याला मराठीत अधिस्वीकृती पत्र  किंवा इंग्रजीत ऍक्रिडिएशन कार्ड असे म्हणतात जे दाखवून मी किंवा माझा पत्रकार मुलगा विक्रांत अगदी बिनधास्त बाहेर पडू शकतो पण मी घरात यादिवसात अक्षरश: धमकावले आहे कि जर बाहेर पडलात तर मी हे घर कायमचे सोडून जाईन आणि मी दिलेली धमकी खरी करतो हे त्यांना पक्के ठाऊक आहे. त्यादिवशी शरद पवार व त्यांच्या कुटुंब सदस्यांनी तसेच उद्धव आणि त्यांच्या कुटुंबाने जेव्हा टाळ्या वाजविल्या आपल्या साऱ्यांचे उर आनंदाने अभिमानाने भरून आले पण ज्यांनी जनता कर्फ्यू नंतर एकत्रित येऊन निवडणुका जिंकल्यासारखा उत्सव साजरा केला ते कोण होते कोणत्या विचारांचे होते ते समस्त मनातून तर उतरलेच पण त्यांनी आपल्या नेत्याला म्हणजे नरेंद्र मोदी यांना देखील विनाकारण बदनाम करून सोडले, कृपया अति आगाऊपणा करून देशाचे स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे नाव खराब करवून घेऊ नका आणि आयुष्य उध्वस्त करून सोडू नका. कृपया काहीही झाले तरी बाहेर पडू नका. पुन्हा एकवार सांगतो कि घरी बसून तुमची ढेरी आणि बायकोचे पोट पुढे आले तरी चालेल पण बाहेर पडून स्वतःचे ढुंगण सुजवून घेण्याचा अविचार मनातही आणू नका...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

अन्न हे पूर्णब्रम्ह :पत्रकार हेमंत जोशी

अन्न हे पूर्णब्रम्ह :पत्रकार हेमंत जोशी 
मी खादाड नाही पण थोड्याथोड्यावेळाने मला थोडे थोडे खायला आवडते. आता वेळ मिळत नाही म्हटल्यापेक्षा अलिकडल्या १५ वर्षात मला स्वयंपाक घरात जायची फारशी गरज पडली नाही. अन्यथा मला आयुष्याच्या अतिशय महत्वाच्या टप्प्यावर जवळपास २० वर्षे स्वयंपाक करावा लागला कदाचित ती एनर्जी तो वेळ वाचला असता तर मला खूप पुढे जाता आले असते पण जे आज मिळाले त्यातही मी पूर्णतः समाधानी आहे. किंबहुना तुमची पुढली पिढी चांगली निपजणे, कुटूंब धडधाकट निरोगी असणे आणि व्यसनी नसणे तसेच कुटुंब सदस्य दीर्घकाळ सलामत जगणे, हेच अतिशय गरजेचे ठरते बाकीचे सारे झूठ आहे मला वाटते. ज्यांच्या घरात वाम मार्गाने पैसे आले ते आपले कुटुंब सुख मात्र घालवून बसले हेच मला नवश्रीमंतांच्या घरात बहुतेकवेळा बघायला मिळते. ज्या सुखांची मला अपेक्षा होती ती अनेक सुखे माझ्यापासून दुरावलीत का, त्यावर जेव्हा केव्हा किंवा अनेकदा विचार करतो तेव्हा हेच लक्षात येते कि कळत नकळत जी अनेक पापकृत्ये माझ्या हातून घडली त्याचे ते फळ मला देवाने दिले आणि नेमके तेच सत्य आहे, हेच जीवनाचे नेमके सार आहे...

श्रीमान प्रमोद देव नावाचे उत्तम प्रशासकीय अधिकारी होते, आता ते निवृत्तीचे जीवन जगताहेत, त्यांची पत्नी ते नोकरीत असतांना बाहेरच्या देशात कि राज्यात मोठ्या पदावर असल्याने पहेलवान प्रमोद देव घरी स्वतःच्या हाताने बहुतेकवेळा स्वयंपाक करायचे, त्यांनी एकदा मला छान सांगितले कि झटपट आणि तोही चविष्ट स्वयंपाक कसा करायचा, मी तो त्यांच्याकडून शिकलो ज्याचा पुढे मला अतिशय फायदा झाला. पोळ्या मात्र मी कधीच लाटल्या नाहीत पण इतर चारीठाव स्वयंपाक मी आजही केवळ अर्ध्या तासात करून मोकळा होतो. स्वयंपाक करतांना त्यात मन ओतले नाही तर तो चवदार होणे अशक्य. आमच्या स्वयंपाकीणबाई स्वयंपाक करून जातात पण त्यावर तुटून पडावे असे खचित घडते. महत्वाचे म्हणजे स्वयंपाक करतांना जे अव्हेलेबल आहे त्यावर प्रयोग करून तो स्वयंपाक ज्याला रुचकर करता येतो तो खरा उत्तम शेफ असे माझे मत आहे. काल माझ्या घरात चण्याची उसळ उरलेली होती माझे जेवण बाकी होते मग मी काहीही वेगळे केले नाही ती पुन्हा पॅन फ्राय मध्ये टाकली त्यात पाणी टाकले उकळी फुटल्यावर त्यात मॅगी नूडल्स आणि टोमॅटो सॉस टाकला, बेत झक्कास जमला...

जसे भजी विविध प्रकारची करता येतात म्हणजे कांद्याची, वांग्याची, गिलक्याची, मश्रुम किंवा पनीरची, पालकाची, मेथीची, इत्यादी तेच मॅगी नूडलसचे आहे तुम्हाला त्या किमान शंभर प्रकारे बनवून मुलांना किंवा घरातल्याना खुश करता येते. घरातली उरलेली भाजी आणि फ्राय कांदा एकत्र करून त्यात नूडलस टाका, सॉसेस योग्य प्रकारे टाका कि झाल्या त्या झटपट केवळ पाच मिनिटात तयार. कोशिंबिरी असोत कि चटण्या, भाज्या असोत कि विविध प्रकारे पिठले किंवा फोडणीला वरण, तुमच्या फ्रिज मध्ये काय काय आहे ते नीट बघून घ्या, घरातल्यांना उत्तम जेऊ घालायचे आहे, तेवढे मनावर घ्या आणि स्वयंपाकाला लागा, पोळ्या सोडून केवळ अर्ध्या तासात तुम्हाला  उत्तमप्रकारे साऱ्यांना जेऊ घालता येते. मॉर्निंग ब्रेकफास्टचे देखील तसेच, नेमके काय खाऊ घालायचे आहे त्याचे आधी नियोजन केले आणि जे करायचे आहे ते मनापासून, हे ठरविले असॆ कि घरातले सारे सदस्य त्यावर तुटून पडतात पण आळशी आणि चिडचिडी वृत्ती त्यातून अनेक घरातून उत्तमोत्तम खाण्याची वानवा  आहे असते असे माझे ठाम मत आहे, स्त्रियांच्या पाककलेच्या बाबतीत अनेकदा असलेल्या हलकट प्रवृत्तीतूनही अनेक घरातला आनंद हिरावल्या जातो असे माझे ठाम मत आहे.

टीप : माझ्या समस्त स्त्री वाचकांनो माझ्या या लिखाणावर तुमचे विस्तृत मत मला नेमके जाणून घ्यावेसे वाटते....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Friday, 20 March 2020

अविनाश देशपांडे : कृषी उत्पन्न बाजार समिती: पत्रकार हेमंत जोशी


अविनाश देशपांडे : कृषी उत्पन्न बाजार समिती: पत्रकार हेमंत जोशी 
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती गुंडागिरीचे आणि भ्रष्टाचाराचे आगर आहे तेथे शासनाला, शेतकऱ्यांना लुटले जाते लुबाडले जाते फसविले जाते नागविले जाते म्हणून हा तेथल्या काही वाईट प्रवृत्तीविरुद्ध आमचा लढा. सध्या एमएमआरडीए मध्ये कार्यरत असलेले पण त्याआधी कित्येक वर्षे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तळ ठोकून कोट्यवधी रुपयांचा मलिदा जमा करणारे कार्यकारी अभियंता रमेश खिस्ते असोत, सध्याचे अधीक्षक अभियंता विलास बिरादार असोत अथवा विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून अलीकडे सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांकडे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून वर्ग झालेले अट्टल दरोडेखोर अविनाश देशपांडे असोत,या अशा तद्दन खादाड अधिकाऱ्यांच्या मागे लागणे येऱ्यागबाळ्याचे हे काम नव्हे कारण साम दाम दंड भेद सारे काही तोंडपाठ असणाऱ्या या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या मंडळींची धाव अगदी एखाद्याला खतम करण्यापर्यंत देखील जाऊ शकते आणि आम्हाला सुदैवाने कोणतीही कसलीही भीती कधीही शिवत नसल्याने या मंडळींना प्रसंगी पोलिसात किंवा आयकर खात्याकडे सुपूर्द करणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो, लढा आता सुरु झाला आहे...

वास्तविक अविनाश देशपांडे यांचे दिवंगत पिताश्री माणिकराव एकेकाळी परभणी चारठाणा म्हणजे मराठवाड्यातले मोठे प्रस्थ होते, मला वाटते माणिकराव कधीकाळी चारठाणा भागातून जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आले होते आणि त्याच ओळखीतून त्यांनी जयप्रकाश दांडेगावकर या माजी राज्यमंत्र्याला सांगून अविनाश यासी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चिटकवून घेतले होते. पुढे अविनाशने अचानक हि नोकरी सोडली आणि औरंगाबाद च्या लोकमत दैनिकात नव्याने पुन्हा नोकरी सुरु केली पण जयप्रकाश मुंदडा पुढे सहकार मंत्री झाले व वादग्रस्त मार्गाने अविनाश पुन्हा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नोकरीमध्ये घुसले. अविनाश यांनी सख्खा भाऊ शेतकरी रवी देशपांडे असो अथवा त्यांचे इतर देशपांडे नातेवाईक, अविनाश रग्गड पैसे आल्यानंतर देखील कधी या मंडळींच्या मदतीला धावून गेले नसल्याने सारे देशपांडे त्यांच्यावर दात खाऊन असल्याचे मला आढळून आले पण पत्नी जयश्रीच्या भावाला म्हणजे सुनील कायंदे किंवा परिवहन महामंडळात कार्यरत असणाऱ्या साडूला  अविनाश देशपांडे यांनी बऱ्यापैकी आर्थिक गैरव्यवहारात जवळ केल्याचे मला मालमत्तेच्या काही कागदपत्रांवरून आढळून आले आहे...

www.vikrantjoshi.com

जयश्री यांचे माहेरघर आमच्या बुलढाणा जिल्ह्यातले, लोणार जवळचे गुंधा त्यामुळे काही गुंतवणुकी व आर्थिक व्यवहार अविनाश यांनी त्या भागात केले आहेत का, त्यावर नक्की लिहिणार आहे. अविनाश यांचा जेमतेम पगार किती तर लाखाच्या आसपास मग त्यांची मोठी आर्थिक आर्थिक गुंतवणूक काही कुटुंबियांच्या नावे तर काही जवळच्या व्यापारी मित्रांच्या नावे डोळे दिपवून टाकणारी नक्की आहे. त्यांचे नव्या मुंबईतले भगवान अपार्टमेंट मधले प्रचंड महागडे घर किंवा चिरंजीव अजिंक्य याचे पुण्यात मॅरियट हॉटेलात लागलेले लग्न, या लग्नातली महागडी खरेदी, सारे प्रकार अचंबित करून सोडतात. आयकर खात्यातर्फे केवळ अविनाश देशपांडे यांचीच नव्हे तर त्यांच्या कटुंबीयांची काही नातेवाईकांची मित्रांची चौकशी करवून घेणे त्यांत आवश्यक असे काम आहे. अविनाश देशपांडे त्यांच्या पत्नी मुलगा सून या काही कुटुंब सदस्यांचे परदेश प्रवास कसे कुठे व किती झाले एवढे जरी शोधले तरी मला खात्री आहे, देशपांडे आणि कुटुंबीय खडी फोडायला शंभर टक्के जाऊ शकते. मरणाची ना भीती आम्हा, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या आजी माजी मंडळींच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे वेशीवर टांगणे नक्की गरजेचे आहे, आवश्यक आहे. समजा देशपांडे यांनी काही आर्थिक नोंदी शेतीतून येणाऱ्या उत्पन्नावर आधारित दाखविल्या असतील तर त्यावर रवी देशपांडे नेमके स्पष्टीकरण नक्की देऊन सांगून मोकळे होतील...
क्रमश: हेमंत जोशी.

Thursday, 19 March 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : बाळासाहेब पाटील: पत्रकार हेमंत जोशी


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : बाळासाहेब पाटील: पत्रकार हेमंत जोशी 
श्रीमान बाळासाहेब पाटील असे कसे हो तुम्ही सहकार मंत्री कि जणू आल्या आल्या तुम्ही दाखविले सुचविले आहे कि तुम्हाला देखील सहकार मंत्री म्हणून नेमके या राज्याचे कसे वाटोळे करायचे आहे. ते कसे त्यावर आधी एक चुटका तुम्हाला येथे सांगायलाच हवा. एकदा भूतलावर एकाचवेळी तीनअतिशय तरुण सुंदर स्त्रियांचा मृत्यू झाल्यानंतर यम त्या तिघींनाही थेट देवतांचा राजा इंद्रासमोर उभे करतो. त्यातल्या प्रथम आलेल्या तरुणीला इंद्र विचारतात, भूतलावर कसे ग तुझे आयुष्य होते. देवा, येथे येईपर्यंत मी कौमार्य सांभाळून सतत देवीदेवतांचे ध्यान करण्यात मग्न असे तरुणी सांगते. अरे कोण आहे रे तिकडे, या तरुणीची रवानगी लगेच सुवर्णनगरीत जेथे सारी उत्तमोत्तम सुखे उपलब्ध आहेत तेथे करा. नंतर ते दुसऱ्या तरुणीकडे वळून तेच विचारतात, तुझे आजपर्यंत कसे आयुष्य होते. ती म्हणते, देवा सुरवातीच्या आयुष्यात माझ्या काही चुका झाल्या त्यावेळी काहीशी तापट रागीट देखील होते नंतर मात्र मी पूर्णतः बदलले आणि सन्मार्गाला लागले अनेक पुण्याची कामे केली. देव त्यावर आज्ञा करतात, अरे या स्त्रीला त्या द्वितीय क्रमांकाच्या सुखनगरीत सोडून या. शेवटी ते जेव्हा तिसऱ्या काहीशा मादक प्रचंड आकर्षक तरुणीकडे वळतात तोच ती त्यांना आधी करकचून डोळा मारते, सेक्सी आळोखे पिळोखे देऊन म्हणते, डिअर इंद्रा, मी मात्र आयुष्यभर मज्जा केली. डिस्को पब ड्रिंक्स आणि रंगिल्या राती, असे माझे धम्माल आयुष्य होते. त्यावर परमेश्वर आज्ञा करतात, या तरुणीला माझ्या महालात आत्ताच्या आता सोडून या...

सहकार मंत्री बाळासाहेब, तुम्ही संतोष पाटील यांच्यासारखा एखादा अपवाद सोडल्यास तुमचे हे स्टाफच्या बाबतीत निर्णय घेणे देवाने त्या तिसऱ्या तरुणीच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयासारखे दिसते. तेच सिद्ध होते. सभोवतालच्या कंपनीवरून माणूस कसा नेमके म्हणे कळते तेच तुमचे झाले आहे कारण मंत्री आस्थापानेवर तुम्हाला हे पक्के माहित होते कि अविनाश देशपांडे सारखे एड्स झालेल्या वेश्येसारखे काही अधिकारी काही कर्मचारी तुमच्याकडे येण्याचा आग्रह धरून आहेत आणि नेमके तुम्ही तेच केले एकप्रकारे एड्स झालेल्या रांडांना जणू तुम्ही थेट आपल्या शयनगृहात आणून ठेवले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे थेट भ्रष्टाचाराचा महाअड्डा जेथे एखादा प्रभू पाटील अन्याविरुद्ध पेटून उठतो आणि इतर सारे केवळ अविनाश देशपांडे, सुधीर तुंगार किंवा शशिकांत शिंदे असतात थोडक्यात गरीब शेतकऱ्यांना लुटून फक्त आपले आणि आपल्या कुटुंबाचे
भले साधण्यात मग्न असतात. अविनाश देशपांडे यांच्यावर मी याआधी लिहिल्यानंतर आश्चर्य म्हणजे त्यांच्या मूळ गावातल्या, परभणीतल्या, मराठवाड्यातल्या त्यांच्या स्टाफमधल्या, कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या कार्यरत विविध मंडळींनी जे त्यांच्याविषयी उत्स्फूर्त पुरावे मला आणून दिले, वाचून, एक ब्राम्हण एवढ्या खालच्या थराला जाऊन भ्रष्टाचार करतो बघून मी ब्राम्हण आहे याची मला माझीच लाज वाटली...

www.vikrantjoshi.com

रमेश रावसाहेब खिस्ते आणि अविनाश देशपांडे या जोडगळीने शशिकांत शिंदे यांच्यासारख्या काही बलाढ्य पण पैशांसाठी वखवखलेल्या नेत्यांना हाताशी धरून अनेक वर्षे नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जो प्रचंड गोंधळ आणि धुमाकूळ घातला पुरावे वाचून वाईट वाटले. या बोटावर मोजक्या मंडळींनी मग ते आयकर खात्याचे अधिकारी असोत किंवा एकेकाळी अजित पवारांच्या कार्यालयातले अजित देशमुख असोत अशा काही बड्या धेंडांना केवळ खुश करण्यासाठी लाखो
रुपयांचे हापूस आंबे गिफ्ट करून अप्रत्यक्ष या मंडळींना त्यांनी आजपर्यंत खिशात घातले आणि अनेक भानगडी दाबल्या, आर्थिक फायदे करवून घेतले. आजपर्यंत अविनाश देशपांडे यांच्या ज्या मालमत्तेची गुंतवणुकीची माहिती माझ्याकडे आलेली आहे अंदाजे ती मालमत्ता ९५ कोटी रुपये एवढी आहे आणि हा आकडा येत्या काही दिवसात नक्की वाढत जाणार आहे. अविनाश आणि त्यांच्या काही कृषी उत्पन्न बाजार समितीशी संबंधित मंडळींनी भागीदारीत केल्या जाणारे व्यवसाय व गुंतवणूक ईडी किंवा आयकर खात्याला ला नक्की आव्हान ठरणारे आहे...
क्रमश:  हेमंत जोशी

Wednesday, 18 March 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
बाळासाहेब पाटील नवे सहकार मंत्री आहेत, मंत्री झाल्या झाल्या त्यांना सहकार खाते मिळणे तसे भाग्याचे लक्षण, बाळासाहेब भाग्यवान आहेत पण सहकार मंत्री म्हणून त्यांना स्वतःच्या नावाचा पदाचा कचरा करवून घ्यायचा नसेल तर त्यांनी सावध असावे पण ते  सावध असावेत वाटत नाही कारण ज्या कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची तुलना थेट रस्त्यावर उभे राहून वेश्याव्यवसाय करणाऱ्या रांडांशी व्हावी, केल्या जावी असे काही कर्मचारी अधिकारी बाळासाहेब पाटलांनी थेट आपल्या कार्यालयात म्हणजे मंत्री आस्थापनेवर नेमल्याने, नजीकच्या काळात बाळासाहेब पाटलांना तेही सहकार मंत्री म्हणून स्वतःचे नाव खराब करवून घ्यायचे आहे कि काय असे दिसायला वाटायला लागले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा धनाढ्य नालायक भ्रष्ट हलकट पापी हरामखोर नीच उलट्या काळजाचा बेधुंद माजोरडा छांदिष्ट मतिभ्रष्ट नवश्रीमंत पाताळयंत्री अधिकारी, भामटा अविनाश देशपांडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी थेट आपल्या कार्यालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमल्याने ज्यांना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधले आतबट्ट्याचे व्यवहार माहित आहेत त्यांना या नालायक अविनाश देशपांडे याची तेही थेट सहकार मंत्र्यांच्या कार्यालयात महत्वाच्या पदावर नेमणूक होणे म्हणजे बाळासाहेब पाटलांनी माकडाच्या हाती कोलीत दिलेले आहे असे जो तो म्हणू लागलेला आहे...

ज्या रामप्रसाद बोर्डीकर यांनीं ते  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असतांना अविनाश देशपांडेला थेट परभणीतून येथे आणले नोकरीत चिटकवले त्या बोर्डीकर यांच्याकडे पाठ फिरवणारा हा अविनाश देशपांडे, माझे वाक्य आजच लिहून ठेवा, बाळासाहेब पाटलांचा जणू सूड उगविण्यासाठी पाठविलेला राक्षस आहे हे त्यांना स्वतःला देखील नजीकच्या काळात नक्की लक्षात येईल कारण केवळ सतत पैसे खाणे हाच ज्याचा प्रमुख हेतू आहे तो अविनाश देशपांडे येथे बाळासाहेब पाटील यांच्या कार्यालयात देखील तेच नीच काम करणार आहे जे तो आजपर्यंत करीत आला आहे. हाच हलकट देशपांडे १९९२ दरम्यान साधा सहाय्यक सचिव म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये रुजू झाला नंतर या भामट्याने १९९४ मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा दिला पण १९९५ दरम्यान त्याच्याच परिसरातले जयप्रकाश मुंदडा जेव्हा सहकार खात्याचे मंत्री झाले, सारे नियम बाजूला ठेऊन हरामखोर अविनाश देशपांडे बेकायदेशीर पुन्हा सेवेत नोकरीत रुजू झाला, विशेष म्हणजे मुंदडा यांच्या आशीर्वादाने त्याला सेवेमधली ज्येष्ठता पूर्ववत लाभली, देण्यात आली. पुढे हाच देशपांडे २००२ दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उपसचिव झाला, आज गेली कित्येक वर्षे त्याने तेथल्या काही मंडळींना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची
मालमत्ता जमा केलेली आहे...

www.vikrantjoshi.com

अविनाश देशपांडे यासी अलीकडे सोडून गेलेल्या त्याच्या एका खाजगी कर्मचाऱ्याने मला देशपांडे याच्या कुटुंबाच्या नावे असलेली राज्यातली राज्याबाहेरची मालमत्ता आणि बेनामी संपत्ती, तो साराच प्रकार मी यथावकाश नक्की तुमच्यासमोर मांडणार आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे देशपांडे आणि कुटुंबाच्या पारपत्रकांच्या म्हणजे पासपोर्ट मधल्या परदेशी जाण्या येण्याच्या नोंदी बघून तर एक ब्राम्हण कर्मचारी एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो कसा, राहून राहून आश्चर्य वाटले. मुलाचे परदेशी शिक्षण आणि देशपांडे कुटुंबाचे सतत परदेशात येणे जाणे, सामान्य  माणसाला नक्की वेड लागेल. या अविनाश देशपांडे यासी निवृत्त होण्यास केवळ दोन वर्षे शिल्लक असतांना हा हरामखोर करप्ट अधिकारी एकप्रकारे बेकायदेशीर कसा काय मंत्री आस्थापनेवर रुजू झाला आहे, बघून आश्चर्य वाटते. अनेक वरिष्ठांच्या हुबेहूब सह्या करण्यात वाकबगार असलेला अविनाश देशपांडे नजीकच्या काळात जर बाळासाहेब पाटलांच्या सह्या करून मोकळा झाला तर खुद्द बाळासाहेब पाटलांनी फारसे आश्चर्य वाटून घेउ नये...
क्रमश: हेमंत जोशी 

Tuesday, 17 March 2020

एबीपी गाढव माझा :पत्रकार हेमंत जोशी


एबीपी गाढव माझा :पत्रकार हेमंत जोशी 
ज्यांना उद्धव ठाकरे नीटसे समजलेले नाहीत त्यांनी उगाच त्यांच्याशी मस्ती करू नये. उद्धव यांना जो कमी लेखतो अंडरएस्टिमेट करतो पुढे त्याला शंभर टक्के पश्चाताप होतो त्यावर याठिकाणी मी तुम्हाला अगदी संजय राऊत सहित आणि पुराव्यांसहित किमान शेकडो उदाहरणे अगदी सहज देईल. वास्तविक अनेकांना माहित असते कि उद्धव यांचे मारुतीच्या बेंबीसारखे आहे म्हणजे बोट घातल्यानंतर बेंबीच्या आत विंचू आहे तरीही अनेक नको ती मस्ती उद्धव यांच्याशी करायला जातात नंतर आरडाओरड करीत बाहेर पडतात, नेमकी हि अवस्था मंगळवार दिनांक १७ रोजी उद्धव यांनी एबीपी माझा वाहिनीची आणि वाहिनीच्या प्रमुखांची म्हणजे राजीव खांडेकर यांची अतिहुशारीतून झाली. नको तो आगाऊपणा त्यांना १७ तारखेला नक्की भोवला कारण खांडेकरांना उद्धव समजलेले नाहीत तसे ते अद्याप या मीडिया मधल्या अनेकांना समजलेले नाहीत त्यांचाही उद्धव नक्की राजीव खांडेकर संजय राऊत राजेश टोपे करून सोडतील. तमाम मंत्र्यांना राज्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांना आणखी येथे अतिशय महत्वाचे सांगतो कि कोणीही गाढवाच्या मागून आणि उद्धव ठाकरे यांच्या  पुढून जाण्याचा प्रयत्न करू नये, उद्धव दिसतात आणि आहेत नाजूक पण ते एकदा का मनातून एखाद्यावर चिडले कि त्यांच्या बसणाऱ्या लाथेमध्ये अचानक शंभर हत्तींचे बळ येते आणि ते ढुंगणासारख्या नेमक्या नाजूक अवयवावर लाथ मारून मोकळे होतात...

एकतर विशेषतः मुंबई आणि पुणेकर यादिवसात करोनामुळे प्रचंड अस्वस्थ आहेत पॅनिक झालेले आहेत त्यात त्यांचे मनोबल खचण्यास सर्वाधिक कारणीभूत विविध मराठी बातम्या देणाऱ्या वाहिन्या आहेत, या वाहिन्यांना सतत २४ तास टिआरपी च्या नादात करोनाविषयी जणू दुसऱ्या बातम्याच उरलेल्या नाहीत, येता जाता तेच ते आणि तेच ते, बघवत नाहीत या वाहिन्या. त्यात एबीपी माझा आणि राजीव खांडेकरांनी मंगळवारी नको तो आगाऊपणा करून ठेवला, खांडेकरांनी ट्विट केले आणि एबीपी माझा ने सांगून टाकले कि ट्रेन बंद होताहेत आणि शासकीय व निमशासकीय कार्यालये एक आठवड्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. कशासाठी आणि कोणाचा हा या वाहिनीवर आगाऊपणा, अहो, ते काय उद्धव ठाकरे यांच्या हाती आहे असते का मुंबईतल्या लोकल ट्रेन बंद करण्याचे आदेश देण्याचे, हे खांडेकर आणि एबीपी माझा चे अशा सडकछाप टुक्कार बातम्या देणे अजिबात योग्य नाही. जोपर्यंत केंद्र सरकार ठरवीत नाही तोपर्यंत केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या खात्यांमध्ये मुख्यमंत्री या नात्याने उद्धव काहीही करू शकत नाहीत हे निदान खांडेकर यांना चांगले माहित असतांना त्यांनी तिकडे मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक सुरु असतांना इकडे आपल्या वाहिनी वर नको तो आगाऊपणा करून मुंबईकरांना पॅनिक करण्याचे मोठे पाप केले...

www.vikrantjoshi.com

आता पुढे जाऊन विशेषतः आरोग्य मंत्री राजेश टोपे किंवा विविध बातम्या देणाऱ्या वाहिन्यांना सांगतो कृपया, मीडिया माझ्या बापाचा पद्धतीने निदान त्या उद्धव ठाकरे यांच्याशी तरी खाजवू नका, तुम्हालाच खरूज होईल, त्यांचे काहीही जाणार नाही, उलट संध्याकाळी घरी गेल्या गेल्या ते आणि रश्मीवाहिनी सोफ्यावर बसून आधी पोट  धरून धरून हसून घेतील. अलीकडे एका इंग्रजी दैनिकाचा अतिअगाउ अतिउद्धट अतिकरप्ट सध्या असलेला कि नसलेला वार्ताहर देखील असेच काहीतरी अनेकांकडे बरळत होता कि हे महाआघाडी सरकार त्याच्यामुळे सत्तेत आले आहे. वाटते एखाद्या गाढवाला कि अख्खी बैलगाडी तोच पुढे पुढे ढकलतो आहे, त्याचे नेहमीचे हे असे काहीबाही बरळणे  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कानावर जर गेले तर ते दोघेही किमान दिवसभर तरी पॉट धरधरून हसतील. किमान निदान शंभर वेळा तरी मी सांगितले असेल कि उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र कुटून तयार झालेले खतरनाक रसायन आहे, एखाद्याने ते खतरनाक रसायन स्वतःच्या ढुंगणावर मुद्दाम ओतून घेऊ नये, ढुंगण भाजते, आग आग होते, जी आग १७ तारखेला एबीपी माझा आणि खांडेकरांची झाली, ना मंत्रालय बंद पडले ना लोकल ट्रेन बंद झाल्या, बावळट कुठले...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Thursday, 12 March 2020

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : पत्रकार हेमंत जोशी


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती : पत्रकार हेमंत जोशी 
जत्रेत कमावलं आणि तमाशात गमावलं तसे शिवसेना नेते आणि माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या बाबतीत घडले आहे. शिवसेना घडविण्यात वाढविण्यात जोपासण्यात कठीण प्रसंगी शिवसेना सांभाळण्यात दिवाकर  रावते यांचा मोठा वाटा किंबहुना सिंहाचा वाटा. पण ज्या दिवाकर रावते यांनी जत्रेत कमावलं म्हणजे नेता म्हणून नाव जोपासलं राखलं होतं त्याच रावते यांचे नाव मंत्री झाल्यानंतर शिवसेना वर्तुळात बऱ्यापैकी रसातळाला गेल्याचे मला जाणवते आहे त्याची  नेमकी कारणे आणि पुरावे देखील मला ठाऊक आहेत पण रावते माझ्या राज्यातल्या आवडीच्या नेत्यांपैकी एक, त्यामुळे मागल्या पाच वर्षात विशेषतः परिवहन महामंडळाचे परिवहन खात्याचे जे बारा वाजले त्यावर मला सारे काही तंतोतंत माहित असतांना ठाऊक असतांना मी लिहिणार नाही आणि तसेही साऱ्यांचे सारेच दोष लिहिण्याचा मी काही ठेका घेतला नाही. पण ज्या दिवाकर रावते यांना अगदी सुरुवातीला म्हणजे ते मंत्री झाल्यानंतर मी निक्षून सांगितले होते कि सुधीर तुंगार नावाच्या सहकार खात्यातील भ्रष्ट व बदमाश अधिकाऱ्याला तुम्ही दूर ठेवा, रावते यांनी माझे ऐकले नाही आणि थेट सतत पाच वर्षे याच तुंगार यांनी रावते यांना हाताशी धरून परिवहन खात्याची तसेच दिवाकर रावते यांच्या राजकीय वाटचालीची वाट लावली, नशीब माझ्यासारखे रावते यांचे मित्र असल्याने त्यांची परिवहन खात्यातली प्रकरणे अद्याप बाहेर आलेली नाहीत. सुधीर तुंगार अत्यंत बुद्धिमान अधिकारी तो रावते यांचा खाजगी सचिव म्हणून सहजासहजी हाती सापडणे तसे कठीण काम होते पण सतत पाच वर्षे कोणीतरी चिडलेला रावतेप्रेमी तुंगार वर बारीक नजर ठेऊन होता त्यातूनच मला तेथल्या अनेक भानगडींचा नेमका उलगडा मला झाला आहे...

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची वाट लावण्यात जी दोन नावे प्रामुख्याने घेतली जातील त्यातले एक शशिकांत शिंदे आणि दुसरे नाव प्रामुख्याने सुधीर तुंगार यांचेच घेतल्या जाईल. तसे बोरीकर, पहिनकर असे अनेक सहकार खात्यातले आणखी काही नावे मी टप्प्याटप्प्याने नक्की घेणार आहे पण जे सुधीर तुंगार आता थेट मिलिंद नार्वेकर यांना हाताशी धरून सिडको मध्ये महत्वाचे पोस्टिंग घेण्यासाठी धडपडताहेत अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना विशेषतः उद्धव ठाकरे यांनी दूर ठेवलेले बरे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शशिकांत शिंदे आणि गॅंग ने जो हैदोस मागल्या अनेक वर्षांपासून घातला आहे तो डोक्याला झिणझिण्या आणणारा आहे. आणि या भ्रष्टाचाराविरुद्ध जे दोघे अगदी मनापासून लढा देताहेत त्यातले एक कोकणातले प्रभु पाटील आडनावाचे सद्गृहस्थ शशिकांत शिंदे आणि गँगच्या दुर्दैवाने अलीकडे झालेल्या त्यांच्या निवडणुकीत पुन्हा एकवार तेथे निवडून आले आहेत. प्रभू पाटील यांनी वास्तविक कमालीचे सावध असावे कारण कृषी उत्पन्न बाजार समिती मधल्या भ्रष्टाचारी संचालकांना आणि अधिकाऱ्यांना जाब विचारणाऱ्याला प्रसंगी खुनाची थेट धमकी दिल्या जाते किंवा प्रसंगी एखाद्याचा खून देखील होतो आणि अशा खुन्यांची मला कधीही भीती वाटत नसल्याने मी तर ठरविले आहे कि मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भानगडी प्रसंगी ईडी किंवा आयकर खात्याला कळवून मोकळे व्हायचे वरून त्यांना ऍक्शन घेण्यास भाग पाडायचे...

www.vikrantjoshi.com

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या अनेक भ्रष्ट हलकट थर्डग्रेड संचालकांविरुद्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध सतत लढा देणाऱ्या ऍडव्होकेट संतोष यादव यांचाही येथे प्रामुख्याने मला उल्लेख करावा लागेल. संतोष यादव यांचा इतिहास त्यांचे आजतागायतचे तारुण्य आणि बेधडक लढा हा एखाद्या चित्रपटातल्या हिरोसारखा आहे. संतोष लहान असतांना त्यांच्या कुटुंबाचे तेथे एक उपहार गृह होते विशेष म्हणजे तेच त्यांच्या वडिलांच्या काकांच्या एकत्रित कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन होते, दुर्दैवाने शशिकांत शिंदे यांच्यासारख्या काही अपप्रवृत्तीनी यादव आणि कुटुंबाला सतत त्रास देऊन शेवटी ते उपहार गृह यादवांना बंद करावे लागल्यानंतर संतोष यादव यांनी वयाच्या ३४ व्या वर्षी कायद्याचा अभ्यास केला आणि ते वकील झाले, त्यांनी मग मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा सखोल अभ्यास केला तेथल्या नेमक्या घडणाऱ्या भानगडींचा अभ्यास केला आणि आता धाडसी संतोष यादव या अशा हलकट अधिकारी कर्मचारी आणि संचालकांविरुद्ध एकाकी न घाबरता हिम्मत न हरता सतत लढा ते देताहेत. असे एक ना अनेक किस्से, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रकरणे वरपर्यंत धसास लावणे नितांत गरजेचे आहे, आवश्यक आहे...
क्रमश: हेमंत जोशी 

मागे वळून पाहतांना : पत्रकार हेमंत जोशी


मागे वळून पाहतांना : पत्रकार हेमंत जोशी 
१० मार्च माझा वाढदिवस, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून सोशल मीडियावर विविध माध्यमातून अनेकांनी आप्तांनी मित्रांनी मैत्रिणींनी नातेवाईकांनी कित्येकांनी अनेकांनी हजारोंनी मला शुभेच्छा दिल्या त्या साऱ्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत, एवढेच सांगतो, मन भरून आले. गदगदून आले. ज्या पद्धतीने ज्या शब्दात ज्या उत्साहाने ज्या कित्येकांनी मला शुभेच्छा दिल्या, त्यांच्या बोलण्यातून लेखांतून लिखाणातून हेच जाणवले कि जणू काही त्यांच्याच एखाद्या कुटुंब सदस्याला ते अगदी मनापासून शुभेच्छा देताहेत. गत आयुष्याचा मी अनेकदा विचार करतो त्यामुळे माझे पाय कायम जमिनीवर असतात कारण वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत तर मला दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असायची आणि आश्चर्य म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी माझ्याकडे स्वतःची पहिली कार होती आणि अशा काळी जेव्हा कि ब्राम्हणांच्या मुलांकडे त्याकाळी स्वतःच्या हिमतीवर सायकल विकत घेण्याची देखील कुवत ताकद  नसायची. माझ्या बाबतीती सांगायचे झाल्यास हा सारा ईश्वरी चमत्कार आणि अगदीच लहानपणी देवाघरी गेलेल्या आईचे स्वर्गातून पाठबळ आणि आशीर्वाद...

आपण कायम चिरतरुण असावे दिसावे असे जर तुम्हालाही वाटत असेल तर जे मी केले तेच तुम्ही केले तर चिरतरुण राहणे दिसणे असणे सहज शक्य आहे असते. माणसाने घेतलेल्या निर्णयावर कायम ठाम असावे डोक्यात सतत इतरांच्या बाबतीत सकारात्मक पॉझेटिव्ह विचार ठेवून आपण वागावे जगावे. डावपेच खेळत, डोक्यात इतरांच्या बाबतीत ईर्ष्या जेलसी राग द्वेष बदला ठेवून जर तुम्ही जगात असाल तर इतरांचे प्रसंगी वाटोळे होईल पण सर्वाधिक आपले स्वतःचेच अधिक नुकसान त्यातून होते. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या बाबतीत समोर एक आणि मागे एक अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊन कधीही जगू नये. काही माणसे माझ्या तोंडावर माझ्याविषयी अतिशय छान बोलतात पण तीच माणसे माझ्याविषयीच पाठीमागे मात्र अतिशय वाईट बोलतात, अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचे आयुष्य कधीही सुखाने जात नाही. एकदा मी एका मोठ्या व्यक्ती कडे त्याला भेटायला गेलो, त्याने माझ्या बायकोकडल्या एका नातेवाईकाचा उल्लेख केल्यावर मी त्या नातेवाईकाविषयी खूप भरभरून बोललो त्यावर तो मित्र म्हणाला,  तू ज्याच्या विषयी मला कौतुकाने सांगतो आहेस तोच तुझा नातेवाईक अगदी अलीकडे तुझ्याविषयी मात्र अतिशय वाईट बोलत होता, त्यावर मी एवढेच म्हणालो, अरे मी वाईट माणूस आहे म्हणून त्याची तसे वाईट सांगण्याची बोलण्याची इच्छा झाली असावी...

व्यसनांपासून कोसो दूर, रात्रीचे जागरण, डोक्यात इतरांविषयी असूया राग आणि नकारात्मक विचार न ठेवणे, शक्यतो मांसाहार न करणे, नियमित व्यायाम, सतत हसत राहणे इतरांना हसविणे आणि डावपेच खेळून इतरांना संपविण्याची वृत्ती अंगी न ठेवणे, मला वाटते आयुष्यात जे मिळाले आहे ते जसेच्या तसे स्वीकारले आणि सतत स्वतःला कामात जुंपून घेतले कि वृद्धत्व आपोआप दूर पळते. आपले अमुक एखाद्याने वाईट केले आहे किंवा वाईट चिंतिले आहे त्यावर विचार करीत बसू नका उलट आपल्याला कसे आणखी आणखी पुढे जाता येईल, स्पर्धेत टिकून राहणे कसे शक्य होईल, त्यावर कायम सकारात्मक भूमिका घेऊन जगावे, आयुष्य चांगले जाते. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या दारूच्या पार्ट्या, सिगारेट्स आणि जागरणे त्यातून तुमच्या शरीरात नको ते रोग अगदी लवकर शिरकाव करणार आहेत हे नक्की लक्षात ठेवावे. मी पत्रकार असूनही रात्रीचे नको ते
आयुष्य कधीही जगत नाही, त्यातून जगण्याची मजा येते. पर्यटन मात्र मला खूप आवडते. पुन्हा एकवार तुमचे आभार मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.


Monday, 9 March 2020

Bura Na Mano, Holi Hai !!


Bura Na Mano, Holi Hai !!

1. Who is Hanuman to CM Uddhav Thackeray I don't understand. Please help.

A. Harshal Pradhan.
B. Milind Narvekar
C. Anil Parab.
D. Retired from the BMC yet posted at the CMO, Sudhir Naik.
E. New entrant Satish Geete, who was at the MC office till yesterday, now as OSD to the CM.

2. Whom does Sharad Pawar trusts blindly?
A. No one
B. MLC & Treasurer of the party, Hemant Takle
C. Minister Jayant Patil
D. Ex CM Devendra Fadnavis

3. IPS & CP of Mumbai Parambir Singh  
A. Is a lion hearted man
B. Keeps a distance from all the IPS groupings, but yet very close to everyone.
C. is Kabir Singh's (Shahid Kapoor) cousin.
D. will get an extension, just like Sanjay Barve his predecessor did, for 6 months when he retires in 2022.

4. Ajit Pawar loves
A. Working from 6am to 11pm
B. to take his morning walks around Anti Corruption Bureau at Worli and winks whenever he sees the watchmen.
C. Playing 'political' hide-n-seek with uncle Sharad Pawar
D. Ignoring what his friend Jayant Patil speaks behind his back.

5. Minister Jayant Patil is proud of
A. His younger son Rajwardhan's political maturity.
B. He swore from the NCP as the 1st Minister ahead of Ajit Pawar, thus showing his importance in the party.
C. His height.
D. 'Friend from Sangli' Sanjay Bajaj's presence in Vidhan Bhavan everyday nowadays.

6. Who is the angry young man of ShivSena but out of the race now. 
A. Sunil Prabhu
B. Dr. Deepak Sawant.
C. Ramdas Kadam
D. Diwakar Raote

7. Guess what brightens Minister Vishwajit Kadam's face
A. When his car touches Pune after finishing the Munbai-Pune expressway
B. When his friend "Himanshu Shah" brings him goodies to eat at Vidhan Bhavan everyday.
C. When father-in-law Avinash Bhosale gifts him Rs. 1100/- as a blessing on Diwali in an envelope.
D. When he sees progress of Satyajit Tambe.

8. In bureaucrats, currently, (IAS) whom does the department fear the most?
A. Deepak Kapoor.
B. Jayshree Bhoj.
C. Radhyesham Mopalwar
D. Rajesh Narvekar.

9. What amuses CS Ajoy Mehta
A. To call Bhushan Gagrani and ask him to buy something from Harrods, London, every time he visits there.
B. When someone asks him what he is going to do after 31st March 2020
C. When Minister Nitin Raut begs for 'his people' to be posted as Secretary/MD/CEO in his Department
D. When someone asks him why is he wearing Blue coloured shirt all the time.

10. Which Jouralist(s) according to you is "having time of his life" in the MVA government
A. The English print media wallah's...
B. Atul Kulkarni
C. Abhay Deshpande
D. All those who have clicked photos with the CM and posted on Facebook
E. None of the above.

11. Who inspite of being 'snubbed' is to be seen enjoying the new posting?
A. IAS Pravin Darade
B. IAS Manisha Mhaiskar
C. IAS Rajiv Jalota
D. IAS Sitaram Kunte

12. Sharad Pawar smiles when
A. Minister Anil Deshmukh wears a cap & makes him understand Home Department's problems
B. Minister Hasan Mushriff says," From tomorrow I will be on weight loosing spree"
C. Praful Patel confides of not being able to earn much in life.
D. Supriya Sule gets random awards at the Parliament

13. When did you see last ACS Housing Sanjay Kumar content.
A. When he was told by "Bunty" that he will be the next Chief Secretary come what may.
B. When his friend "Hiren Patel" visits his house with bags full of goodies
C. When he watches Bihari movies
D. When he speaks fluent Marathi.

14. Minister Yashomati Thakur is really good at
A. Giving instructions to a contractor what all is needed in the kitchen on daily basis at her bunglow.
B. selecting sari's in a shop.
C. Giving interviews in English.
D. Still maintaining old friendship with her mother like figure (retired) Shraddha Belsarey of the Publicity Department.

15. Who in spite of making few bucks the wrong way and being caught, still walks in and out of Mantralaya with head held high. 
A. Santosh Singh Pardeshi (Bhujbal's PS)
B. MLA Prashant Thakur
C. Rajendra Ahirwar (AMC--at Thane Municipal Corp)
D. All of them mentioned above

www.vikrantjoshi.com

16. Which according to you is "not understood" strategy of Minister Aditya Thackeray?
A. Promoting night life.
B. Not partying or chilling with his "young MLA friends". He is surely maintaining distance with them.
C. Moving here & there like Ram Lakhan with Zeeshan BABA Siddique.
D. Appointing 'controversial RDC--Bandra' Borkar as his Private Secretary.

17. Whom can you often find at Starbucks/MaCafe at Inox (CR2) chilling even when the Budget /Monsoon session is ON?
A. Ranjit Singh Mohite-Patil
B. Dr. Nitin Kareer & his few IAS friends
C. that PA of ex cmnPrithviraj Chavan, who colours his hair jet black, the colour oozing out of his side-locks even after 3 days, Gajabhau.
D. Dr. Iqbal Chahal & his Gujarat batchmates.
E. Mr. Darade drives from Pune to meet his wife Pallavi there.

18. Who according to you is the "Gully Boy" of Maharshtra Politics?
A. Prithviraj Chavan
B. MLC Anant Gadgil
C. Jitendra Ahwad
D. Speaker Nana Patole

19. The other day Ram Kadam was talking on "Philosophy of life" near the steps of Vidhan Bhavan. What should we do?
A. Believe him.
B. I should have seen which businessman was standing nearby. He is known to make impression even with his chubby boy looks.
C. Sign a petition to confer him Padma Bhushan.
D. Inform RSS.

20. What must be going through IAS Sanjeev Jaiswal's mind whilst he meditates as we read this.
A. Ye duniya pathar di....
B. Next time around, I will never help any of my staff's working below me.
C. I should have gone to the CMO or UD 2 years back when Fadnavis was CM.
D. Who are the people who are spreading the news, I don't earn in per sq. feet, but in per square inch.

21. What is being considered in IPS department's think tank these days.
A. To reinstate with a respectable posting to Brijesh Singh.
B. How to bring Sadanand Date at the ACB now.
C. Whom to go for postings? CM, Milind Narvekar, Ajit Pawar, Anil Deshmukh or straight Silver Oaks or a Dilip Thacker?
D. How to teach every IPS officer to write a book and win many hearts just like how Manoj Sharma did.

22. If there are Marathi's, Bihari's, Punjabi bureaucrats we have South Indians too,  now tell me who comes across as the most loveable person as he/she actually is...
A. Shaila A
B. P. Anbalgan
C. Dr. Venugopal Reddy
D. E. Ravindran
E. B. Radhakrishnan.
F. All of them.

23. Which appointment of IAS was a shocker for all of us?
A. Sonia Sethi at MMRDA
B. Vinita Singhal at Filmcity
C. Ranjit Singh Deol at the MMRCL
D. P. Velarasu at the BMC as AMC.

24 Which bureaucrats/politician/contractor's son/daughter wedding made everyone go back to their young age hobby of "painting" after seeing the richness and celebrities in attendance. 
A. Manukumar Shrivastav
B. Suresh Kakani
C. Contractor Ujjwal Pagariya
D. Ex-Minister Sudhir Mungantiwar.

25. Ex CM Devendra Fadnavis should
A. Get back to be friendly and alter his ego with Khadse, Tawde, Pankaja & Ashish Shelar.
B. Sideline Vikhe Patil's immediately.
C. Start a side business, to earn more than wife Amruta.
D. Make Narayan Rane his second most trusted man after Girish Mahajan.

Wishing you & your family a Very Happy & Colourful Holi,

Vikrant Hemant Joshi 

Sunday, 8 March 2020

ब्राम्हण वाद कि ब्राम्हण द्वेष :पत्रकार हेमंत जोशी

ब्राम्हण वाद कि ब्राम्हण द्वेष :पत्रकार हेमंत जोशी 
ना चुकले शरद पवारांचे ना चुकले नरेंद्र मोदी यांचेही मात्र त्यातून मोठे नुकसान नरेंद्र मोदींच्या भाजपचे या राज्यात झालेले आहे हि वस्तुस्थिती आहे. विधान सभा निवडणुका पार पडल्यानंतर राज्यात सरकार बनविण्याच्या दृष्टीने जेव्हा शरद पवार नरेंद्र मोदी यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी मोदी यांना एवढेच सांगितले कि मी आणि तुम्ही मिळून नक्कीच महाराष्ट्रात आपली सत्ता आणायची आहे मात्र मला देवेंद्र फडणवीस व्यतिरिक्त इतर कोणतेही मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचवा, फक्त माझी एवढीच अट आहे. त्यावर नरेंद्र मोदी म्हणाले कि आमचे तर ठरलेले आहे आम्हाला पुन्हा फडणवीसांनाच मुख्यमंत्री करायचे आहे. येथेच सारे बिनसले, पुढला इतिहास ताजा आहे जो जसाच्या तसा तुम्हाला आम्हाला तोंडपाठ आहे. शरद पवार यांच्या मनात फडणवीसांविषयी एकप्रकारे निर्माण झालेली नफरत त्यात मोठी चूक आपल्या राज्यातल्या समस्त ब्राम्हणांची आहे, ब्राम्हणांनी यावेळी भाजपाचे, फडणवीसांचे आणि राज्याचे कसे  मोठे नुकसान केले त्यावर मला नेमके सांगायचे आहे. आणि ब्राम्हणांचे हे असेच वागणे सुरु राहिले तर सध्या ब्राम्हण विरुद्ध मराठा वाद एवढ्यावरच थांबणार नाही तर इतरांच्याही मनातून ब्राम्हण उतरतील, पुन्हा मागल्यासारखे स्वतःचे मोठे नुकसान करवून घेतील... 

माझे अतिशय आवडते नेते देवेंद्र फडणवीस यांना मी आत बाहेर नेमके ते कसे जेवढे ओळखतो तेवढे त्यांना मला नाही वाटत फार कोणी ओळखणारे असतील अनेकांना त्यांचे अनेक गुण किंवा काही दोष तेवढे माहित असतील पण देवेंद्र नेमके समजावून घेणे कठीण असे काम आहे आणि ते काम मला नक्की जमलेले आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मनात त्यांच्या जातीविषयी शंभर टक्के आदर होता प्रेम होते पण त्यांना आपल्या जातीचे राजकारणात म्हणजे सत्तेत आलो आहोत म्हणून कधीही अवडंबर अजिबात माजवायचे नव्हते, ते वातावरण काही मूठभर ब्राम्हणांनी निर्माण केले. संघातले काही ब्राम्हण आणि राज्यातल्या बहुतेक साऱ्या विविध ब्राम्हण संघटनांनी त्यावर अतिरेक केला, ज्यामुळे खुद्द फडणवीस आणि त्यांच्यांभाजपाचे मोठे नुकसान झाले आहे. कधी मोर्चे काढायचे विशेषत: सोशल मीडियाने मोठा घात केला, फडणवीस फक्त कसे ग्रेट आणि इतर कसे नालायक पद्धतीने जे काय सोशल मीडियावरून समस्त ब्राम्हणांनी गोंधळ घातला त्यांनी पुन्हा स्वतःचे तर मोठे नुकसान करवून घेतले आहेच पण एका सर्वगुणसंप्पन्न नेत्याला विनाकारण अडगळीत जावे लागलेले आहे. ब्राम्हणांना,  केवळ संघाला स्पेशल ट्रीटमेंट असे फडणवीसांच्या मुख्यमंत्री म्हणून कधीही संकुचित पद्धतीने मनात नव्हते, कायम ते खालची मान वर न करता म्हणजे पुढ्यात कोण कोणत्या पक्षाचा किंवा कुठल्या जातीचा न बघता ज्याला त्याला मदत आणि मनापासून सहकार्य करायचे....

राज्यातल्या ब्राम्हणांनी चांगले काम करायचे असेल तर त्यांनी पाच टक्क्यावरून दहा टक्क्यांकडे कसे जाता येईल म्हणजे आपली संख्या आपला जन्मदर कसा वाढविता आधी ते बघावे, तेथे मात्र आम्ही सर्वात मागे, बहुतेक जोडप्यांना एकच मूल, तेथे आधी लक्ष घाला अन्यथा बहुतेक ब्राम्हण परदेशात निघून गेले आहेत आणि उरले सुरले जर एकच मूल हवे पद्धतीने वागले तर तो दिवस फार दूर नाही जेव्हा आमची देखील तुलना पारशी समाजाशी केली जाईल. फडणवीसांच्या ना कधी मनात होते ना कधी मनात असेल कि ते केवळ ब्राम्हणांचे नेते आहेत किंवा संघातल्या मूठभर ब्राम्हणांचे ते नेते आहेत. चूक फडणवीसांची नाही, सोशल मीडियावर त्या पाच वर्षात दर दिवशी घाण करणाऱ्या त्या समस्त ब्राम्हणांची आहे ज्यातून शरद पवारांना किंवा काही मराठ्यांना आज उघड आपल्याला विरोध करावा लागतो आहे. मुख्य प्रवाहात स्वतःला झोकून देणे हेच आज योग्य ठरणारे आहे, आम्ही कसे वेगळे यापद्धतीने जर पुन्हा ब्राम्हणांनी आपले वर्तन सुरु ठेवले तर आपल्याविषयी द्वेष नफरत राग नक्की वाढत जाईल. तावून सुलाखून कसे तरी आपण समस्त ब्राम्हण विशेषतः गांधी वधानंतर त्यातून बाहेर पडलो होतो, इतरांच्या मनातला राग काढून आपण त्यांच्यातलेच एक म्हणून वावरायला लागलो होतो. मध्येच हे असे फडणवीसांच्या काळात माज आल्यासारखी काही मूठभर मंडळींनी विनाकारण चूक केली ज्यातून पुन्हा पूर्वीचे दिवस आपल्यावर कोसळलेले आहेत, असे वागू नये. आम्ही फक्त वेगळे कसे असे आगाऊ प्रदर्शन करू नये...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Saturday, 7 March 2020

मंत्री आणि मंडळी : पत्रकार हेमंत जोशी


मंत्री आणि मंडळी : पत्रकार हेमंत जोशी 
पवारांनी माजी राज्यमंत्री दीपक केसरकारांवर नेम धरला आणि गेम केला, फायदा उदय सामंतांना झाला ते थेट मंत्री झाले भास्कर जाधव आणि दीपक केसरकर आता निदान पाच वर्षांसाठी तरी राजकीय अडगळीत पडले सापडले. उद्धव ठाकरेंशी लॉयल्टी ठेवण्याची बक्षिशी दीपक केसरकर यांना मिळाली नाही त्यामुळे ते अस्वस्थ आहेत नाखूष आहेत नाराज आहेत पण केसरकारांचा गेम करण्यात उदय सामंत यांचा कुठेही कोणताही हात नाही नव्हता, वास्तविक सिंधुदुर्ग जिल्ह्यातले दीपक केसरकर व रत्नागिरी जिल्ह्यातले उदय सामंत आणि भास्कर जाधव हि तिघेही माजी राज्यमंत्री तसे शरद पवारांचे एकेकाळचे लाडके आणि राष्ट्र्वादीतले रीतसर नेते देखील होते पण काळाच्या ओघात तिघेही शरद पवारांना सोडून राष्ट्रवादीचा त्याग करून उद्धवजींना झोंबून बिलगून मोकळे झाले थोडक्यात तिघेही शिवसेनेत आले. शिवसेनेत आल्यानंतर उदय सामंत यांनी जरी लॉयल्टी मातोश्रीशी ठेवली तरी त्यांनी त्यांचे पूर्वीचे काही व्यवसायिक संबंध पवार कुटुंबियांशी तोडले नाहीत त्यामुळे या ना त्या निमित्ताने ते सतत अनुक्रमे अजितदादा, सुप्रियाताई आणि थेट शरद पवार यांच्या कायम संपर्कात असायचे....

www.vikrantjoshi.com

माझा एक मित्र आहे  तो सरकारी अधिकारी आहे, त्याने अलीकडे पहिल्या बायकोशी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले आहे तरी तो अधूनमधून चेंज म्हणून पहिल्या बायकोच्या संपर्कात असतो. इकडे पप्पी आणि तिकडे मुका घेतो. उदय यांचे हे असे नेमके झाले आहे म्हणजे त्यांनी जरी राष्ट्रवादीशी फारकत घेतलेली आहे आणि सेनेशी नवा घरोबा केला आहे तरी ते अधून मधून राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून येतात यायचे त्यामुळे उदय सामंतांचा गेम पवारांनी केला नाही, सामंत अगदी सहज मंत्री झाले. राष्ट्रवादीतून बाहेर पडणे भास्कर जाधव व दीपक केसरकर या दोघांनाही चांगले हा महागात पडले. माझी नेमकी तंतोतंत खरी माहिती अशी, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांच्या घरातून जरी हाक मारली तरी ती गोव्यात ऐकायला जाते एवढा त्यांचा विधानसभा मतदारसंघ गोव्याला लागून आहे किंबहुना त्यांच्या मतदारसंघात बहुसंख्य मतदारांचे नातेवाईक गोव्यात स्थायिक आहेत आणि दर  दिवशी जवळपास केसरकारांचे पाच हजार मतदार गोव्यात नोकरी व्यवसायानिमीत्ते जाणे येणे करतात, या अशा घरोब्यातून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी तेही थेट पंतप्रधानकाकडे केसरकर यांना नेऊन भाजपामध्ये येण्याची गळ घातली होती, कॅबिनेट मंत्री करण्याचे त्यांनी तसे सांगितले देखील होते विशेष म्हणजे तोपर्यंत नारायण राणे यांना भाजपा मध्ये प्रवेशासाठी वेटिंगवर ठेवण्यात आले होते...

दीपक केसरकर राज्यमंत्री होते त्यांना तेही भाजपामध्ये कॅबिनेट दर्जा मिळणार होता पण केसरकर यांनी लॉयल्टी जपली ती थेट उद्धव ठाकरे यांच्याशी, त्यांनी शिवसेना न सोडता म्हणजे मोहाला बळी न पडता पंतप्रधानांना सेने सोडणार नाही, सांगितले पण पुढे मात्र त्यांच्या बाबतीत नेमके विपरीत घडले. पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भाजपा युती असतांना देखील श्री नारायण राणे आणि भाजपा नेत्यांनी केसरकारांचा वचपा काढण्यासाठी बदला घेण्यासाठी स्थानिक प्रभावी नेते राजन तेली यांना अपक्ष उभे करून पूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली तरीही दीपक केसरकर विजयी झाले, पुन्हा आमदार झाले. मी केवळ शिवसैनिक व उद्धवजींच्या लॉयल हे दाखवून दिले मात्र त्यांना त्यांच्या लॉयल्टीचे यावेळी फळ मिळाले नाही. जाधव व केसरकर यांना बाजूला ठेवावे तसे म्हणे थेट पवारांनीच उद्धव ठाकरे यांना सुचविले होते. अर्थात सारे काही उदय सामंत यांच्या मनासारखे झाले असेही नाही, त्यांच्याही बाबतीत खासदार विनायक राऊत यांनी मोठा घोळ निर्माण करून ठेवलेला आहे. त्यांनी उदय सामंत यांच्याकडे त्यांच्या रत्नागिरीचे पालकमंत्रिपद न देता त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी टाकून सामंत यांचे वर्चस्व कसे कमी करता येईल ते बघितले आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्रिपद अनिल परब यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. थोडक्यात जाधव, केसरकर आणि सामंत तिघेही आपल्याजागी सुखी आणि समाधानी नाहीत, सारेच मनातून अस्वस्थ आहेत...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.  

पवारांचा गेम पवारांचा नेम : पत्रकार हेमंत जोशी


पवारांचा गेम पवारांचा नेम : पत्रकार हेमंत जोशी 
एखाद्या पुरुषावर  बायको तर प्रेम करतेच  त्याच्यावर त्याची मेव्हणी पण मरत असते जेव्हा कि त्या मेव्हणीला हे पक्के माहित असते कि जावई आपल्याला फक्त वापरून घेतोय. आणखी एक उदाहरण, एखाद्या डिमाण्डेड तरुणाचे कॉलेजातल्या अमुक एका मुलीवर प्रेम आहे हे माहित असतानाही त्याच्यावर एखादी दुसरीच तरुणी भाळलेली असते, मरत असते. राज ठाकरे शरद
पवार आणि उद्धव ठाकरे या त्रिकोणी प्रेम प्रकरणावरून मला हे नेहमीचे आढळणारे उदाहरण आठवले. शरद पवार गावातला देखणा तरुण, या तरुणाचे उद्धव नामक नेत्याशी छान सूर जुळले असतांना, उद्धव त्यांच्या आकंठ प्रेमात पडलेले असतांना आणि पवार यांनी त्यांचे प्रेम उघड केलेले असतांना या दोघात आजही तिसरा राज डोकावतो आहे बघून सखेद आश्चर्य वाटते आहे अर्थात याचे जे कारण आहे ते राज ठाकरे यांना त्यांनी सांगून ठेवले असावे कि जेव्हा केव्हा मी मराठा दलित मुस्लिम मतदारांना व्यवस्थित सिंगलली हॅण्डल करून महायुतीतून बाहेर पडेल तेव्हा तोंडी लावण्यासाठी याने उरलेले मराठी मतदार आकर्षित करण्यासाठी तुम्हालाच नक्की जवळ घेईन, बिलगून मोकळा होईल. शरद पवारांचे हे असे हा ठरलेले आहे कारण त्यांचे तर स्वप्न आहे कन्या सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे, महाआघाडीतून योग्य वेळी बाहेर पाडण्याचे, प्रसंगी हे पाचही वर्षे महाआघाडी सोबत सध्या संसार करण्याचे नंतर घटस्फोट घेण्याचे...

आज तरी हेच दिसते आहे कि शरद पवार साऱ्यांना प्रसंगी पुतण्या अजित पवार यांनाही बाजूला सारून पुढे निघून जातील त्यातून अतिशय गाफील असलेल्या, केवळ सत्तेसाठी कॉम्प्रोमाइज केलेल्या काँग्रेसचे सर्वाधिक नुकसान होणार आहे जर त्यांनी महाआघाडीला सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे ठरविले नाही. काँग्रेसमध्ये नाही म्हणायला राज्यातल्या साऱ्या नेत्यांच्या लक्षात केव्हाच आले आहे पण त्यांचे नेते मंत्रिमंडळात आहेत आणि नेत्यांना सत्तेच्या नशेने ग्रासलेले आहे. त्यांना आता सत्तेची नशा सोडवत नाही, पक्ष नव्हे पैसे बहुतेक मंत्र्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरलेले आहे. पृथ्वीराज चव्हाण जरी उघड बोलत नसले तरी त्यांना पवारांचा हा नेमका नेम आणि पक्का गेम समजलेला आहे, त्यातून त्यांचे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या साऱ्या नेत्यांचे ब्रेन वॉशिंग करणे सुरु आहे पण त्यांना बाळासाहेब  थोरात वगळता साऱ्यांनी अगदी राहूल गांधींसहित एकत्रित एकटे पाडलेले असल्याने, त्यांचे म्हणणे सांगणे कोणी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस तिघांचाही नंबर एक शत्रू अर्थात भाजपा विशेषतः व्यक्तिगत नरेंद्र मोदी आहेत आणि महाघाडीला देवेंद्र फडणवीस तेवढे या राज्यात खूप खूप डोळ्यात खुपताहेत. दुर्दैवाने आपल्या या राज्यात नरेंद्र मोदी व त्यांची कुमक कमजोर पडली आहे, महाआघाडीचा हा सत्तेतला
करोना व्हायरस भाजपाला महागात पडलेला आहे...

शरद पवारांचे दलितांना बाबासाहेबांच्या स्मारकातून कुरवाळणे, विशेषतः मुस्लिमांचे लांगुलचालन आणि मराठा ब्राम्हण असा विनाकारण वाद वाढविणे त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करणे या प्रकारातून सहज सुलभ होणारे आहे पण जातीपातीची तेढ आणि पाक धार्जिण्या मुस्लिमांचे सतत लांगुलचालन, राज्याचे त्यातून भविष्यात मोठे नुकसान होणार आहे. मागल्या पाच वर्षात कंट्रोल्ड झालेले काही पाक विचारांचे मुस्लिम नेते आणि मुस्लिम आक्रमक तरुण त्यांनी भलतेच तोंड वर काढून दादागिरी सुरु केली आहे, हे पाप राज्याला खाली खेचणारे राज्याची बिहारकडे वाटचाल झपाट्याने करणारे नक्की ठरणारे आहे. पवारांचे उद्धव यांना मुख्यमंत्री करणे म्हणजे उद्धव यांना हतबल करून सोडणे हे उद्दिष्ट नक्की सफल झाले आहे. यापुढे दूरदूरपर्यंत सेना व भाजपा जवळ येणार नाहीत, त्यांची युती होणार नाही, त्यांची मते व मने जुळणार नाहीत तेवढी तेढ त्यादोघांत निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी ठरलेले आहेत. अजित पवारांना गृह खाते न देणे थोडक्यात त्यांनाही पवारांनी अलगद लंगडे लुळे करून सोडले आहे. रस्त्यात आलेले सारे काटे शरद पवारांनी यावयातही मोठ्या खुबीने बाजूला करून पुढल्या स्वप्नपूर्तीकडे त्यांनी यशस्वी घोडदौड सुरु केली आहे अपवाद आणि अडचण त्यांना केवळ राहुल गांधी हे आहेत, काँग्रेसने साथ मधेच सोडली, महाआघाडी तोडली तर मात्र पवार नेमके ध्येय गाठताना कमी पडतील...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Tuesday, 3 March 2020

नाराज हिंदू निराश मराठी : पत्रकार हेमंत जोशी


नाराज हिंदू निराश मराठी : पत्रकार हेमंत जोशी 
एक गाय असते ती आपल्या गोठ्यात सुखाने रहात असते. एक दिवस खूप जोराचा पाऊस आला आणि एक कुत्रा रात्रीच्या वेळी भिजत भिजत गोठ्यात आला आणि गाईला म्हणाला, गोमाते, मी तुझ्या गोठ्यात थोडावेळ आश्रय घेऊ का ? एका कोपऱ्यात मी पडून राहीन. दया येऊन गायीने त्याला अनुमती दिली. काही वेळाने तेथे एक साप आला बहुदा तो पावसात खूपवेळा भिजला होता सारखा वळवळ करीत होता. तो आसरा मागण्यासाठी गायीची परवानगी मागणार तेवढ्यात म्हणजे गायीने काही बोलण्या अगोदर कुत्रा मधेच म्हणाला, तू पण ये ना, गोठ्यात भरपूर जागा आहे. वास्तविक हे ऐकून गायीला खूप राग आला होता पण स्वभाव शांत त्यामुळे ती गप बसली. त्यानंतर तिथे हळूहळू विंचू आला, डुक्कर आणि गाढव तर एकाचवेळी आश्रयाला आले. भरीस भर माकड देखील सामील झाले. चित्रविचित्र प्राण्यांची खिचडी, गिचडी, गर्दी वास्तविक सगळ्यांनाच त्रास होऊ लागला. आपण गायीला नेहमीच बिच्चारी गरीब गाय म्हणतो, त्यामुळे आपल्याच गोठ्यात तिला त्रास होत असतांनाही ती गप्प होती, शांत बसली. पुढे काय होते, एका रात्री सगळे नकारात्मक विचारांचे हे शरणार्थी जनावरे एकत्र येऊन विचार करतात कि, सगळ्यात जास्त जागा गायीला लागते, आपण या गायीलाच गोठ्याबाहेर काढले तर ? आणि ते सर्वजण एकत्र येऊन मग गायीला तिच्या स्वतःच्या मालकीच्या गोठ्याबाहेर काढतात, निर्वासित करून सोडतात. मित्रहो, काही वर्षांनी आपल्या या देशात विशेषतः आपल्या या मुंबईत आपल्या या राज्यात समस्त हिंदूंची समस्त मराठी जनतेची अवस्था त्या गायीप्रमाणे झालेली असेल, वेळ निघून गेलेली असेल...

ज्यांना अक्कल आहे असे बहुसंख्य हिंदू म्हणजे मराठी मतदार या राज्यात आहेत त्यांना नेमकी हीच चिंता खूप भेडसावते आहे. आपलेच नेते कपाळकरंटे, त्यातून हे झपाट्याने घडते आहे, काळजी करण्याचे काळजी घेण्याचे समस्त नेत्यांचे वागणे आहे. ते भाजपावाले सभागृहात १०५ असून सत्ताधाऱयांसमोर शांत आहेत हतबल ठरलेले आहेत आणि ज्यांच्याकडून मराठी मतदारांची मोठी अपेक्षा होती अपेक्षा आहे ते समस्त मराठींचे तारणहार सरदार हिम्मतवार उद्धव ठाकरे जे नेते पाक धार्जिण्यांचे आजतागायत पालनहार तारणहार म्हणून गाजले तसेच  नावाजले आहेत त्यांच्या हातात हात घालून सत्तेची फळे चाखताहेत. सेनेला भाजपाने समजून घेतले नाही मागल्या पाच वर्षात सतत उल्लू बनविले चुत्या बनविले त्यातून शिवसेना विशेषतः सरदार
कप्तान उद्धव ठाकरेच भाजपापासून चिडून जाऊन आणि वैतागून दूर गेले ते भाजपावाले आता हात चोळत बसले आहेत आणि पसंत नसलेल्या तरुणाच्या गळ्यात वरमाला घालून इच्छा नसतांना इच्छा होत नसतांना शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर संसार थाटून मोकळी झाली आहे. खरा धोका पुढे आहे, तुम्हाला माहित आहे काय, अलीकडे डोळे दिपविणारा राष्ट्रवादी काँग्रेसचा, तोही मुंबईकर कार्यकर्त्यांचा जो भव्य दिव्य मेळावा पार पडला त्याचे आयोजन नियोजन कोणी केले होते, नसेल माहित तर सांगतो, त्याचे अत्यंत यशस्वी नियोजन आयोजन पार पाडले  मंत्री आणि मुस्लिमांचे वादग्रस्त मुस्लिमांचे प्रभावी नेते नवाब मलिक आणि त्यांच्या अनेक असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांनी...

www.vikrantjoshi.com
शरद पवार यांना दोष देऊन अजिबात फायद्याचे आणि उपयोगाचे ठरणारे नाही त्यांची ती सत्ता मिळविण्यासाठी अगदी सुरुवातीपासूनची पद्धती आहे कि जे जिल्ह्या जिल्ह्यात सुरेशदादा जैन किंवा गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्यासारखे फोड झोड आणि सत्ता मिळवा पद्धतीचे नेते आहेत ते एकत्र करायचे, गोळा करायचे आणि सत्ता मिळवायची, जे सुरुवातीला या राज्यात त्यांनी म्हणजे पवारांनी काँग्रेससंगे केले तीच नीती शरदरावांनी यावेळी देखील अवलंबिली आहे ज्याचा त्यांना त्यांच्या पक्षाला या मुंबईत या राज्यात झपाट्याने फायदा होतो आहे. उद्या याच शरद पवार यांचा चॉईस महत्वाचा नक्की ठरणार आहे कि नेमके कोणाला सोबत घ्यायचे आणि सत्तेत रमायचे अशावेळी ते प्रसंगी शिवसेनेला बाजूला सारून स्थान भाजपाला देखील देऊ शकतात. उद्धवजी, आम्ही मराठी या राज्यातले आम्ही तमाम हिंदू आई शपथ सांगतो, अक्षरश: नैराश्याकडे झपाट्याने वाटचाल
करू लागलो आहे आमच्या गोठ्यात आमच्या या मुंबईत आमच्या या राज्यात आम्हीच गरीब गाय म्हणून जगणार आहोत कि काय मनापासून प्रत्येकाला वाटते आहे, हे चित्र बरे नव्हे. शरद पवार यांनी नेमकी नस पकडलेली आहे त्यांना हे कळून चुकले आहे कि राज्यातला मुस्लिम त्यांच्यावर खुश आहे आणि इतर साऱ्यांवर नाराज आहे नेमका हाच धागा पकडून पवारांनी त्यांना जवळ घेतले आहे, मजीद मेमन यांच्यानंतर याच पवारांनी पुन्हा एकवार स्वसंगतीने मुस्लिमाला राज्यसभेत नेण्याचे ठरविलेले आहे, फौजिया खान हे ते नाव आहे. हसन मुश्रीफ, नवाब मलिक, श्रीमती फौजिया खान, मजीद मेमन असे प्रभावी मुस्लिम नेते त्यांचे  समर्थक आहेत, काळ झपाट्याने बदलतो आहे. आमची गरीब गाय होते आहे. पवारांचा त्यात अजिबात दोष नाही चूक हिंदुत्व मानणाऱ्या नेत्यांची होते आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.


Monday, 2 March 2020

भारतीय आणि विवाहबाह्य संबंध : पत्रकार हेमंत जोशी


भारतीय आणि विवाहबाह्य संबंध : पत्रकार  हेमंत जोशी 
क्या जमाना बदल गया, हो विशेषतः भारतीय जोडप्यांच्या बाबतीत अलिकडल्या १०-१५ वर्षात नक्की जमाना बदललेला आहे. तत्पूर्वी जोड्याला जोडा क्वचित शोभून दिसे, बहुतेक जोडपी म्हणजे चांगल्या झाडावरची माकडे पद्धतीने असायची दिसायची, पुढ्यात येईल ते स्वीकारण्याची चांगल्या आर्थिक परिस्थिती अभावी वेळ विवाहेच्छुकांवर येत असे, महत्वाचे म्हणजे आर्थिक सुबत्ता असेल तर माकडे देखील उठावदार दिसतात आणि आर्थिक परिस्थिती उत्तम नसेल तर ऐश्वर्याअभावी स्त्री पुरुषांचे सौंदर्य खुलून दिसत नाही. आता पूर्वीचे ते दिवस नक्की राहिलेले नाहीत, उत्तमोत्तम मेन वूमेन पार्लर्स आहेत, बहुतेकांना कपड्यांची नेमकी फॅशन कळते अपवाद शासकीय कार्यालयात आणि राष्ट्रीयकृत बँकेत कार्यरत असणाऱ्या स्त्रियांचा, त्यांचे ते ठरलेले पंजाबी कुर्ते व पायजमे बघून वाटते अख्ख्या देशातल्या महिलांचा एकच टेलर ठरलेला असावा जेथून त्या टिपिकल पंजाबी ड्रेस शिवून घेत असाव्यात. रस्त्याने फिरतांना निरीक्षण करा, उत्तमोत्तम जोडपी तुम्हाला पाहायला मिळतात. सौंदय आले पण लग्नानंतरच्या संसार करण्याचे विद्रुपीकरण झाले, मला तर असे वाटते असे एकही जोडपे नसेल ज्यांना आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत वाटावे कि आमचे लग्न कालच झाले. म्हणून एकच सांगणे कि सारे काही अविचाराने केले तरी चालेल पण लग्न मात्र अतिशय विचारपूर्वक करावे...

विशेषतः बहुसंख्य जोडप्यांचे असे असते कि ते सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक समारंभात अगदी सतत एकमेकांना ते खेटून असतात, गळ्यात गळे घालून फिरतात, एकदम रोमँटिक असतात पण त्यांच्या खाजगी जीवनात डोकावले तर असे दिसते कि दोघांचेही हमखास विवाहबाह्य संबंध आहेत. नेमका त्यावरच माझा आक्षेप आहे कि खोट्या प्रेमाचे निदान प्रदर्शन तरी करू नका, पटत नसेल तर एकमेकांना घटस्फोट देऊन मोकळे व्हा किंवा आमचे जमत नाही सांगून मोकळे व्हा. पेज थ्री लाईफ ज्यापद्धतीने अलीकडे बोकाळले आहे त्यात प्रामुख्याने हेच आढळते कि सुरुवातीला वीक एन्ड पार्टीज मध्ये जोडपे अगदी एकमेकांच्या गळ्यात पडून दारू ढोसतात, एकमेकांना घट्ट बिलगून डान्स करतात, काही दिवसानंतर बघावे कि नवरा दुसरीकडे बिलगलाय आणि बायको भलत्याच पुरुषाच्या बाहुपाशात पडून डान्स करते आहे आणि हे प्रकार केवळ पुणे मुंबईत अधिक असलेत तरी इतरत्र देखील चोरी छुपे जवळपास हेच चाललेले असते. अगदी अलीकडे एका उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्याला माझ्याकडून बदली करून घ्यायची होती. तो मध्यस्थांच्या ओळखीने माझ्याकडे आला, मी त्याला प्रयत्न करतो, म्हणालो. नंतरच्या काळात असे घडले कि हा देखणा त्याची बायको देखील अत्यंत देखणी, काहीही गरज नसतांना हा दररोज मला व्हाट्सअपवर त्याच्या बायकोचे विविध उत्तान फोटो पाठवायला लागला, माझ्या जागी एखादा नावात विनोद असलेला आजी किंवा माजी मंत्री असता तर त्याने केव्हाच तिला आत बाहेर खाऊन टाकले असते....

www.vikrantjoshi.com

अर्थात हे सत्ता आणि पैसे असणाऱ्यांना अगदी सहज उपलब्ध असते. आपण पाश्चिमात्त्य देशांना दोष देतो, व्यभिचार करण्यात आम्ही भारतीय खूप आघाडीवर आहोत. विशेषतः आम्ही पुरुष असे लबाड आहोत कि बहुतेक विवाहित पुरुष परस्त्रीच्या बाबतीत ती केव्हा आणि कशी उपलब्ध होईल त्यावर एकतर थेट बिचारून मोकळे होतात किंवा काही पुरुष मोठ्या खुबीने त्याच विषयावर येतात. परस्त्री म्हणजे निख्खळ मैत्री अशी भावना मनाशी ठेवणारे अगदी बोटावर मोजण्याइतके, बहुतेकांचे उद्देश सेक्स याच भावनेशी निगडित असतात. आधी मांसाहार नंतर दारू ड्रग्स आणि सिगारेट्स, आसपास केवळ नजर फिरवली तरी बहुतेक तरुणींच्या बाबतीत हेच घडतांना दिसते. दारू ड्रग्स व सिगारेट्स ज्या तरुणींच्या शरीरात घुसले त्यांनी आपल्या आयुष्याचे विशेषतः पुढल्या पिढीचे वाटोळे आजच करवून घेतले हे समजावे. मला पुण्यातली एक घटस्फोटित म्हणजे सिंगल पॅरेण्ट मैत्रीण म्हणाली कि माझ्या मुलीस तारुण्यातले बरे वाईट नेमके समजावे म्हणून मीच तिला मुद्दाम अधूनमधून माझ्याबरोबर बिअर प्यायला देते. मुलगी दहावीला आहे आणि हीच मुलगी नववीत असतांना तिच्या एका महाविद्यालयात शिकणाऱ्या मित्राबरोबर शरीररिक संबंध ठेवते म्हणून हिने माझ्याकडे एकदा चिंता व्यक्त केली होती. सांगायचे हेच आहे कि या पद्धतीचे  वातावरण जर तुमच्याही घरात असेल तर घराण्याचे वाटोळे आजच झाले, असे समजून पुढल्या कामाला लागावे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

How to control the 'lost' kids....


How to control the 'lost' kids....

This theory is applicable for children aged till 13. 

Nowadays it is embarrassing for a lot of parents whom I see around, often putting their heads down and quietly meeting the faculty of the school after the school is over for their child's unaccepted behaviour for which they have been called for. The teachers who are trying extremely hard to control the children's behaviour have often disclosed it to me, it is the parents who are responsible for this behaviour of their child outside HOME. This one sentence, "parents have spoilt the child" stuck to me and I began to examine some cases. I father of two, too, wanted some answers as to why these children behave in a certain way. Now after gathering a lot of reports & talks with child psychologists and talking to many parents of such 'mischievous' children I'm able to write this down and break the myth, as to what to do? Why are our children behaving rude, crude, often very violent, or even overpowering their fellow mates? 

The biggest reason, which you will agree, by the end, is that of missing of the 'fear-factor' in them. Now tell me parents in all honesty, doesn't stubbornness of your child at times makes us want to slap  them? But we don't right? Then what does stop us?  Now go back when you were about 5 years old. Remember our growing up years. We have been caned by our parent (s) whenever we went wrong or jumped out of a discipline box drawn which only we knew. In a way, we developed a fear for our one parent, be it mother or the father, and every time we crossed our limits whilst growing up, that one parent card was often used by all our family members to scare the daylights out of us. I was similarity scared of my father this way. The fear was such that even the mention of calling my father to school if I misbehaved, sent chills down my spine. Does your child have that fear, common accept it, you have bought your child up the way a prince or princess have been, showered them with all the possible 'materialistic' love, but where is the fear, my dear? You have never scolded, never slapped on their gravest mistake they did thinking they were kids & now when they are really young, you are finding psychologists to treat them . Not done! Similarly take the instance of a simple dinner... you have a son/daughter who does not eat food without having your phone in his/her hand, & at any cost you have to give in to their demands, as they are such stubborn characters-believe me they will not eat till you bow down. So go on, it's not late, with this-don't just start whacking the child, but install that fear of any one parent in the child's brain...and let the second parent be the loving one or the protector else whom will the child open up to if both of you remain strict?

Next most important aspect which I found out, was dependance of parents on their nanny/servants for everything of their child. In a metropolitan where in majority of the parents are a working couple, this dependance is absolutely necessary. But in the higher middle class when I see that the mother is a home-maker and is often seen at zumba class or at lunches, they yet are dependent on their servants to ferry the child to & fro from the school and ten thousand other classes, my heart melts. Do whatever you want to, you are an adult, but nothing should come in the way when it comes to your own child. Do the pick ups, get up early & prepare that Breakfast/Lunch for them, don't be dependant on outside food...Make that sacrifice parents, it really counts... Stop your dependance on these servants & work towards your child. I know there is a personal life too, but hey folks, remember your child was born out of your consent & not on dependance of servants availability! And all hell breaks loose, when the servants quits or goes to the village for 15 days. 

Third, the most important factor of what I'm observing is--stop drinking, smoking, and partying in front of your children. Howsoever small these lads & girls are, they pick up everything. It is you who get surprised when your toddler says cheers in front of grandparents or holds a straw and blows air from it, as if smoking, at family get togethers. 

Some listings I have noted, see if it appeals your minds...

 • It is important for you as a parent to show respect to your own parents who are the child's grandparents. Many times we just take our own parents for granted & treat them a piece of shit. Remember , your child is watching. He /She will not be wrong if they are rude to us once they grow up. 
 • Let the age old traditions like oiling the lamp in the evening, reading prayer book or even listening to bhajans or a Hanuman Chalisa/Quran /Bible recites which happened every evening when we were kids, continue...It is no harm to be God fearing. 
 • Never ever show your passbook or riches to your child. Roam in a Merc, but tell the child, it belongs to the grandfather. Believe me, this is not the age to show your child how powerful or rich you are! While you have the fanciest vacation abroad every year, do take them for some down-to-earth trips too during Diwali or Christmas. Your native place can be ideal. 
 • Spend less time on the screen at-least when the kids are awake or in front of you. Believe me, it works. They too shall start developing 'family bonding time' syndrome. 
 • Don't fight with your spouse in front of the child. 
 • Don't abuse anyone (rickshaw driver/bus drivers) in front of the child. 
 • Avoid talking bad about anyone especially when it is 'bitching'. Your child finds it OK to speak behind the back, a worst quality. In fact teach them, what is called confronting...
 • Refrain from partying when they are awake and at the mercy of grandparents or servants to  put them to sleep.
 • Let them be god-fearing and one-parent fearing. If they don't fear believe me once they approach teen age, it will be a nightmare for you. Make them understand the importance of listening when elders speak and not to argue. 
 • If you watch porn, make sure your phone does not reach your child's hand. Make sure you delete all those photos and videos as your child knows your phone password..
 • At the same time , be communicative rather, at times pull their legs on their crushes at school, this in a way will help you to know what is going on at what time. 
 • Sleep overs --I have my reservations but yet leave it to you. You are the better judge. 
 • Never shout at the servants. In fact tell them how hard these people work. Money does not come easy. Bring "Gratitude" in them. Make them understand, that everyone should be respected & thanked all the time. 
 • Be a devotee parent. Devote time to them. It won't matter if you miss one Friday night partying to spend and catch up on a movie with your child. 
 • We all know how rich & resourceful you are, but again & again don't brag about it in front of your child. It will teach them that to put someone lower than us down, is OK. 
At the end it is all about Continuity. Putting efforts is our duty as a parent, but imbibing correctness & truthfulness is too required and am sure your child will be your 'dream cum true'!!

Vikrant Hemant Joshi 


Sunday, 1 March 2020

वा उद्धवा तुमचे मजेशीर मंत्री : भाग १: पत्रकार हेमंत जोशी


वा उद्धवा तुमचे मजेशीर मंत्री : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 
स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे वगळल्यास इतर कोणत्याही मंत्र्याला राज्यमंत्र्याला रस्त्याने जातांना विशेषतः मुंबईत सुरक्षेची अजिबात आवश्यकता नाही गरज नाही याउलट उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातले असेच बहुसंख्य मंत्री आहेत खऱ्या अर्थाने ज्यांच्यापासून सर्वसामान्य मतदारांना जनतेला सुरक्षा हवी असते कारण अनेकांचे वागणे सिनेमातल्या खलनायकासारखे असते आहे. अर्थात गाव तेथे गुंड तसे प्रत्येक मंत्रिमंडळातच काही मवाली गुंड नीच हलकट वृत्तीचे मंत्री राज्यमंत्री असतात आणि अशा वृत्तीच्याच मंत्र्यांचा राज्यमंत्र्यांचा दुर्दैवाने अधिक बोलबाला असतो. काही मंत्र्यांची राज्यमंत्र्यांची दादागिरी मात्र हवीहवीशी असते जसे अगदी अलीकडे राज्यमंत्री दबंग बच्चू कडू छान म्हणाले कि गेली अनेक वर्षे त्याच त्या दलालांना ठेकेदारांना करोडो रुपयांचे ठेके का मिळतात वास्तवात इतर अनेक त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने लायक असतांना, कडू यांनी घेतलेला हा पवित्रा विशेषतः मंत्रालयातील दलालांमध्ये आणि सतत ज्यांना ठेके मिळतात अशा ठेकेदारांमध्ये खळबळ उडवून देणारा आहे पण बच्चू कडू यांनी हा प्रकार धसास लावून मूठभर दलाल आणि ठेकेदार मंडळींची मंत्रालयातील आणि राज्यातली विविध खात्यातली मोनोपली संपविणे गरजेचे आहे निदान बच्चू कडू यांच्याकडून तरी असे अपेक्षित नाही कि आधी बंड करायचे उठाव करायचा नंतर तोडपाणी करून आपले रेट ठरवून घ्यायचे, या पद्धतीने बच्चू कडू वागले नाहीत तर आहेत त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने मोठे होऊन विदर्भात पुढे अनेक वर्षे प्रथम क्रमांकाचे नेते म्हणून छाप पाडतील अन्यथा पुढे आले त्यापेक्षा दुप्पट वेगाने ते मागे येतील पडतील जर चुकीच्या पद्धतीने ते वागले...

आधीच आम्ही मुंबईकर रस्त्यांच्या आणि मेट्रोच्या कामांमुळे पार मेटाकुटीला आलो आहोत, सध्या प्रेयसीने दिलेल्या वेळेत तिला भेटायला न गेल्याने अनेकांची प्रेमप्रकरणे तुटताहेत त्यात नव्या मंत्री झालेल्यांची मोठी भर पडलेली आहे. पूर्वीचे वाईट  उद्धव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आणले आहेत. मध्यंतरी जरा बरे सुरु होते म्हणजे एकतर मंत्र्यांच्या गाडीवरचे लाल दिवे काढले होते आणि कर्णकर्कश सायरन्स देखील बंद करण्यात आले होते नव्हे न्यायालयाने ते कायद्याने बंद केले होते, पण नव्या मंत्रिमंडळाने भलताच घोर आमच्या मागे लावून ठेवलेला आहे म्हणजे अजिबात गरज नसतांना प्रत्येक मंत्र्यांच्या मागे आणि पुढे किमान तीन मोटारगाड्या असतात त्यात पुढे पोलिसांची सायरन वाजवणारी गाडी असल्याने कोणताही मंत्री रस्त्यावर उतरला कि ट्राफिक ची पार आई बहीण निघते आणि आम्हा मुंबईकरांचा त्यातून जीव अक्षरश: मेटाकुटीला येतो, वैताग येतो. असे करू नका, उगाच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरू नका, उद्धव आणि आदित्य सोडल्यास इतर कोणत्याही नेत्याला मंत्र्याला या मुंबईत कोणीही काहीही करणार नाही. हि असली सुरक्षा म्हणजे टपोरेगिरीचे मूर्तिमंत उदाहरण ठरते, असल्या सुरक्षेमुळे सारेच्या सारे मंत्री टपोरी गुंड मवाली आहेत कि काय सामान्य माणसाला तसे वाटत राहते, असे वागू नका. लोकांच्या जनतेच्या मतदारांच्या मनातून लगेच कायमचे उतरू नका असला आगाऊपणा करू नका...

www.vikrantjoshi.com

नेमके मंत्री आणि अख्खे मंत्रिमंडळ कसे तुम्हाला ते सांगायचे होते, सुरुवात करतो, कान देऊन ऐका. अलीकडे काही वर्षात नव्याने आलेले मुख्यमंत्री जे करायचे तेच उद्धव यांनी देखील पुढे सुरु ठेवणे निदान मला तरी असे वाटते ते गरजेचे होते पण उद्धव यांनी तसे केले नाही म्हणजे त्यांनी एकाच वेळी एका दमात शपथ देऊन मंत्र्यांचा कोटा पूर्ण केल्याने प्रचंड राजकीय गोंधळाचे वातावरण सध्या आहे म्हणजे यापुढे आपल्याला मंत्रिमंडळात स्थान नाही हे अनेक ताकदवान आमदारांच्या लक्षात आल्याने अनेक बहुतेक विधान सभा आणि विधान परिषद सदस्य मनातून मनापासून अस्वस्थ आहेत पण त्यांच्या या नेमक्या अस्वस्थतेचा कोणताही फायदा भाजपाला न उचलता येणे हे अत्यंत दुर्दैवी आहे असे या ठिकाणी मुद्दाम नमूद करावेसे वाटते. उद्धव यांनी हा चुकीचा निर्णय घेतला त्यांनी एका दमात साऱ्यांना मंत्री केले त्यात त्यांचे आणि इतर घटक पक्षांचे नक्की नुकसान होणार आहे कारण जे मंत्री झाले नाहीत त्यांना घेतलेल्या कष्टांवर पाणी फिरले असेच त्यांना वाटते आहे, भडका उडू शकतो. टप्प्याटप्प्याने उद्धव यांनी मंत्रिमंडळ वाढ व विस्तार करणे गरजेचे होते, आश्चर्य म्हणजे पवार देखील चुकले...
क्रमश: हेमंत जोशी 

भान हरविलेले भानावर आले : पत्रकार हेमंत जोशी

भान हरविलेले भानावर आले : पत्रकार हेमंत जोशी 
राज्यातल्या भाजपा नेत्यांना कार्यकर्त्यांना आमदारांना खासदारांना कार्यकर्त्यांना संघ स्वयंसेवकांना भानावर येणे गरजेचे होते, मंथली पिरियड्स गमावून बसलेल्या एखाद्या वृद्धेने, मला दिवस जाणार आहेत, सांगण्यासारखे सत्ता हातून गेल्यानंतर सत्ता हातून गमावल्यानंतर भाजपा संघातले पार पडलेल्या विधान सभा निवडणुकीनंतर बोलत सुटायचे बोलत सुटले, आणि त्यांच्या या बोलण्याला सांगण्याला फारसा अर्थ नव्हता पण अचानक एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रेताच्या घरातल्यांना तो मेला, कायमचा सोडून गेला यावर जसा काही काळ विश्वास बसत नाही तसे राज्यातल्या भाजपाचे झाले होते जे ऐकून ऐकून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची करमणूक व्हायची. अर्थात अद्यापही या धक्क्यातून भाजपा पूर्णतः सावरलेली नाही. अगदी अलीकडे भाजप ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे देखील पुन्हा हेच म्हणाले  कि महाआघाडी सरकार पुढल्या ११ दिवसात कोसळणार आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अलीकडेच जे जाहीर वक्तव्य केले ते मात्र अतिशय अर्थपूर्ण वाटले. ते म्हणाले यापुढे आमचे शिवसेनेशी कायमस्वरूपी संबंध संपले आहेत तुटले आहेत त्यामुळे आमची त्यांच्याशी पुन्हा युती, अशक्य आहे अजिबात शक्य नाही...

भाजपा नेत्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या असलेल्या युतीच्या जगण्याची मोठी आशा होती, उद्धव पुन्हा आपल्याकडे परततील अशी त्यांना आशा होती पण उद्धव यांचे घटस्फोट घेतलेल्या तरुणीसारखे झाले होते पुन्हा पूर्वीच्या नवर्याकडे परत न येता नवीन संसार थाटून लेकरबाळे होऊ द्यायची, पद्धतीचे उद्धव यांचे धोरण ठरलेले असल्याने पुन्हा सेना भाजपा युती होणार नाही. नेमके हे लक्षात आल्यानेच, शरद पवारांपासून  दुखावलेल्या दुरावलेल्या त्यांच्या नेहमीच्या स्वभावाला बळी पडलेल्या राज ठाकरे यांना विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी चुचकारायला सुरुवात केली त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले आहे, त्या दोघात म्हणजे मनसे आणि भाजपा मध्ये युती होण्याचीच आता अधिक शक्यता निर्माण झाल्याने पवार देखील काहीसे अस्वस्थ झाले आणि त्यांनी पुन्हा नेहमीच्या स्वभावानुसार जाहीर बोलून दाखविले, सांगून टाकले कि त्यांचे राज यांच्याशी बोलणे होते थोडक्यात त्यांचे आणि राज यांचे अद्याप राजकीय संबंध दुरावलेले नाहीत असेच पवारांना सुचवायचे होते पण पवार यांची हि राजकीय थाप राज ठाकरे आणि भाजप यांच्यात नक्की कटुता निर्माण करणारी नाही...

www.vikrantjoshi.com

उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिका पुन्हा हाती घ्यायची आहे पुन्हा त्यांना तेथे सत्ता मिळवायची आहे, त्यामुळे ते माआघाडीतून बाहेर पडणार नाहीत आणि पवारांचा तर प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यांना महाआघाडीतून बाहेर पडणारे या वयात या अवस्थेत परवडणारे नसल्याने त्यांनी राज्यात काँग्रेस आणि शिवसेनेच्या खांद्यावर मोठ्या खुबीने बंदूक ठेवून राष्ट्रवादीची पाळेमुळे अधिकाधिक खोलवर रुजविण्यास सुरुवात केली आहे, स्वतः शरद पवार, अजित पवार रोहित पवार आणि सुप्रिया सुळे पवार पायाला भिंगरी लागल्यागत राज्यातल्या कानाकोपऱ्यात फारसे इतरांच्या नजरेत येऊ न देता दिनरात एक करून आपला पक्ष बळकट करण्यात गुंतले आहेत. त्यामानाने शिवसेना विशेषतः काँग्रेस तर फार बेसावध आहे निदान माझ्या नजरेला तरी तसे जाणवते आहे. खुर्चीच्या मोहाला बळी न पडता जर काँग्रेस महाआघाडीतून बाहेर पडली तरच काँग्रेस महत्व आणि अस्तित्व वाढेल, कमी होणार नाही. काँग्रेसमध्ये एकटे पृथ्वीराज चव्हाण सोडल्यास इतर साऱ्या नेत्यांची मंत्र्यांची अवस्था ओवाळून टाकलेल्या बाईवर फिदा होणाऱ्या वेड्या माणसासारखी झालेली आहे. त्यांच्यातले विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण असे बोटावर मोजण्या इतके नेते ज्यांच्यां लक्षात आले आहे कि पवारांनी त्यांना मोठ्या खुबीने उल्लू बनविलेले आहे ज्यामुळे नजीकच्या काळात भविष्यात काँग्रेसचे स्वतःचे मोठे नुकसान होणार आहे. उद्धव सावध नाहीत असे भासवितात मात्र त्यांचे डावपेच प्रसंगी भल्याभल्यांना घाम फोडणारे असतात, उद्धव केवळ वरून शांत भासतात प्रत्यक्षात ते तसे अजिबात नाहीत, ते कोणाचीही विकेट पाडू शकतात एवढे जरी इतरांनी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी