Wednesday, 12 February 2020

भानगडी आणि लेखणी : पत्रकार हेमंत जोशी

भानगडी आणि लेखणी : पत्रकार हेमंत जोशी 
तुमच्या लिखाणावर टीका होणे आणि धमक्या येणे यात नक्की मोठा फरक आहे जसे पोटच्या पोरीला बाप प्रेमाने कवटाळतो तोच पुरुष प्रेयसीला मात्र करकचून बाहुपाशात घेतो हा असा फरक टीका आणि धमक्यांमध्ये आहे असतो. तुम्ही अमुक एकासाठी तमुक एकाला लिखाणाच्या माध्यमातून तेही सुपारी घेऊन संपविणार असाल तर तुम्हाला मला धमक्या येणे क्रमप्राप्त आहे माझ्यावर मात्र आजतागायत टीका केल्या जाते धमक्या दिल्या जात नाहीत कारण राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षातल्या डॉन मंडळींना हे तंतोतंत माहित आहे जरी हेमंत जोशी कडवा हिंदू असला तरी तो कोणत्याही राजकीय पक्षाची सुपारी घेऊन काम करीत नाही लिखाण करीत नाही. यावेळी तर महाआघाडीने पार लाज सोडली आहे तेही थेट कडवे हिंदू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना या महाआघाडीने मंत्रिमंडळात एक नव्हे तर चार चार तेही अस्लम शेख सारखे वादग्रस्त मुसलमान नेते मंत्रिमंडळात घेतले आहेत, मराठी माणसाच्या मतदाराच्या अस्वस्थतेचे हे एक मोठे कारण आहे, उद्धव यांच्या मुख्यमंत्री होण्याचा आनंद मुसलमानांना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे महत्व दिल्याने कोठल्या कोठे पळून गेला आहे. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानासाठी महाआघाडीने एवढे लाचार होणे त्यातून तुम्ही भलेही सत्ता हासील करून मोकळे झालात पण आम्हा मराठींचे हिंदूंचे त्यातून नक्की मोठे वाटोळे होणार आहे...

जसे मुंबई पोलीस टग्या मुसलमानांसमोर हतबल ठरले आहेत तसे सध्याचे राज्यकर्ते देखील मुस्लिम नेत्यांसमोर गुढगे टेकून मोकळे झाल्याचे दृश्य समोर दिसते आहे. एखादा मुसलमान मंत्रिमंडळात म्हणजे या राज्याचा राजा म्हणून आम्ही हिंदूंनी नक्की सहन केले असते पण हे काय आमच्यावर तुम्ही तेही अब्दुल सत्तार यांच्यासारखे तोंडफळ मंत्री बिनभरवंशाचे मुसलमान मंत्री लादले, काय हो तुम्ही हे केले, आम्हाला मनातून मनापासून अस्वस्थ अशांत करून सोडले. तुम्हाला हे तंतोतंत माहित आहे कि हेमंत जोशी याच्या लिखाणात अजाणतेपणे चूक होऊ शकते पण खोटे लिहिणे त्याच्या स्वभावात नाही, म्हणून मी अनेकांचा आग्रह असतांना आत्मचरित्र लिहीत नाही लिहिणार नाही कारण खोटे लिहिणे जमणार नाही आणि खरे लिहिले तर अनेकांचे काही खरे नाही. बहुतेक आत्मचरित्र खोटे असतात, चांगले तेवढे लिहितात आणि आयुष्यातल्या खऱ्या प्रसंगांना फाट्यावर मारतात. एका तरी पुरुषाने त्याने आयुष्यात पहिले हस्तमैथुन केव्हा केले लिहिलेले आहे का, नेव्हर. कारण आत्मचरित्र तद्दन खोटे असतात त्यांना आयुष्यातल्या भानगडी लपवून ठेवायच्या असतात, चांगले घडलेले तेवढे सांगायचे, लिहायचे असते....

माझे लिखाण जहरी असते प्रसंगी ते कोणालाही झोडपणारे असल्याने मला आणि समोरच्या बहुतेक बड्या मंडळींना आमच्यातली जिवलग मैत्री उघड करायची नसते. जसे मला माहित आहे कि कोणत्या मंत्र्याला त्याची बायको फारकत घटस्फोट शंभर टक्के देणार होती पण दिवंगत भय्यू महाराजांनी त्या दोघात समेट घडवून आणली आणि पुन्हा ते दोघे एकत्र आले. माझ्या बहिणीला यांच्यापासून मूल झालेले आहे असा त्या मंत्री पत्नीने आरोप केला होता, तो खरा कि खोटा त्यावर आज येथे चर्चा नको म्हणून मला आत्मचरित्र लिहिणेही नको. अगदी अलीकडे एका आजी का माजी मंत्र्याने, त्याने दुसरे लग्न केल्याचे मला सवर्णन सांगितले, त्याने ज्या विश्वासाने सांगितले कारण त्याला माहित आहे उद्या चुकून त्याचे व माझे एखाद्या मुद्दयांवर मतभेद झाले तरी मी त्यातले काहीही उघड करणार नाही, आणि याच माझ्या वृत्तीचा मला आयुष्यात मोठा फायदा झाला आहे, काही नाजूक प्रसंग आयुष्यात कधीही किंवा काहीही झाले तरी उघड करायचे नसतात. ज्या मंत्र्याने दुसरे लग्न केले ते जिच्याशी केले त्यावर मला वाईट वाटले कारण त्या मंत्र्याच्या शहरातली माझी एक अतिशय देखणी मैत्रीण मला हेच म्हणाली होती अरे त्याने हे काय केले, लाखात सुंदर मी एक, प्रसंगी मी देखील त्याच्याशी तो विवाहित असतांनाही लग्न केले असते. काही माणसे मोठ्या विश्वासाने त्यांचे सिक्रेट्स तुमच्याकडे उघड करतात ते आयुष्यभर मनातच ठेवायचे असतात आणि त्या सिक्रेट्सचा गैरफायदा देखील घ्यायचा नसतो. असो, म्हणून मी आत्मचरित्र लिहीत नाही...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

No comments:

Post a comment