Monday, 17 February 2020

भाजपाचा पाय खोलात : पत्रकार हेमंत जोशी


भाजपाचा पाय खोलात : पत्रकार हेमंत जोशी 
एकट्या सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीच्या भरवशावर मॅच जिंकण्याची स्वप्ने बघायची नसतात, मग एकदा तेंडुलकर किंवा विराट जर सुरुवातीलाच आऊट झाले कि सारे संपते. प्रेक्षक घरी परतायला सुरुवात करतात. राज्यातल्या भाजपमध्ये सध्या हे असेच वातावरण आहे म्हणजे एकटे देवेंद्र फडणवीस सत्तेतुन आऊट काय झाले काय साऱ्यांनीच हात गाळल्यासारखे तेथे वातावरण आहे दृश्य आहे. निदान भाजपासारख्या बलाढ्य देशव्यापी पक्षात असे घडायला नको, संपूर्ण टीम फडणवीसांच्या तोडीची त्यांनी उभी करायला हवी आपल्या इंडियन टिमसारखी पण तसे अजिबात दूरदूरपर्यंत राज्यातल्या भाजपमध्ये अजिबात घडतांना दिसत नाही. वर्हाडी भाषेत बोलायचे सांगायचे झाल्यास म्हाताऱ्या याने डंगऱ्या बैलजोडीच्या भरवशावर अख्खे शेत वखरल्या नांगरल्या जात नसते. अलीकडे नेमकी चूक भाजपाने केली त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष म्हणून आमदार मंगलप्रभात लोढा या दोघांनाही कंटिन्यू करून मोठी चूक केली आहे. मला चंद्रकांत पाटलांना कमी लेखायचे नाही अंडरएस्टिमेट अजिबात करायचे नाही पण वर जे म्हातारी बैलजोडीची उदाहरण दिले आहे ते तसे जे घडले त्यावर मला येथे नेमके सांगायचे आहे...

राज्यापेक्षा मुंबईमध्ये भाजपाने आव्हान टिकविणे भाजपा संघटनात्मक दृष्ट्या वाढविणे बलाढ्य करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण मुंबईतले मुसलमान एकजूट होऊन ज्यापद्धतीने राजकारण खेळताहेत व ज्या एकीने एकोप्याने महाआघाडीच्या संसाराचे रहाटगाडगे सुरु आहे, हातात हात घट्ट पकडून आहेत भविष्यात भाजपा आणि सेनेला आपले आव्हान टिकवितांना मोठी कसरत करावी लागेल त्यासाठी म्हणजे मुसलमानांचे महाआघाडीच्या तंगड्या विरोधकांचे आव्हान परतवून लावण्यासाठी आशिष शेलार यांच्यासारख्या दमदार दिलदार तडफदार मालदार धारदार खबरदार अनुभवी बुद्धिमान बेरकी उत्साही तेजतर्रार बोलक्या लोकमान्य लोकप्रिय स्पष्टवक्त्या उत्तम वक्त्यांची जेथे नितांत गरज होती तेथे मंगलप्रभात लोढा यांच्यासारख्या थकल्या भागल्या व्यवसायात अधिक रमलेल्या सकाळी वर्णावर फोडणी संध्याकाळी फोडणीवर वरण पद्धतीने सतत हिशेबी वागणाऱ्या काहीशा अबोल विशेषतः बऱ्यापैकी माणूसघाण्या नेत्याला ज्याला त्याचा विधानसभा मतदारसंघ सोडला तर नेता म्हणून फारसे कोणी मानायला ओळखायला वचकायला तयार नाही नाही, ज्याचे भाषण सुरु झाले कि लोकांचे फार दूर पण कार्यकर्त्यांनाही जांभया यायला सुरुवात होते, भाजपाने फक्त धनाढ्य मंगलप्रभात लोढा यांना तेही भाजपाच्या अडचणीच्या काळात आणि मुंबई महापालिका निवडणूक आव्हान म्हणून तोंडावर असतांना रिपीट का केले न समजणारे किंवा डोक्याला झिणझिण्या आणणारे हे भाजपा श्रेष्ठींनी  हे चुकीचे गणित मांडले माझे स्पष्ट मत आहे...

www.vikrantjoshi.com

श्रेष्ठींचा विशेषतः अमित शाह यांच्या सासरचा म्हणून लाडका असे ज्यांच्याबाबतीत बोलले जाते ते माजी मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या तारुण्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून रिपीट झाले असते तर नक्की वेगळे काहीतरी घडले असते कारण राज्यातली भाजपची विद्यार्थी परिषद वाढविण्यात घडविण्यात चंद्रकांत पाटलांचा मोठा सहभाग होता थोडक्यात त्यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य आहे पण पूर्वीचा तो उत्साह जोश जोम ताकद त्यांच्यात वयानुपरत्वे न राह्ल्याने वयाच्या ७५ व्या वर्षी एखाद्याला बोहल्यावर चढवून एखाद्याच्या त्याच्या मित्रांनी शेजाऱ्यांनी हनिमून चा उपभाग आणि आनंद घ्यावा तसे यावेळी चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष होण्याने भाजपामध्ये घडले आहे. आता ते पूर्वीचे उत्साही उत्सवी दादा राहिले उरले नाहीत त्यांचा शोले मधला म्हातारा गब्बर झाला असतांना वास्तविक त्याठिकाणी त्यांना रिपीट न करता राज्यात  भाजपाच्या अत्यंत खडतर कठीण काळात देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या तोडीचा एखादा धावपळ करून कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह निर्माण करणारा नवचैतन्य नवे बळ निर्माण करणारा प्रदेशाध्यक्ष हीच भाजपाची नितांत गरज होती नेमके ते तसे न घडल्याने भाजपाने पुन्हा आपल्या पायावर कुर्हाड मारून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय निवृत्तीची जणू वाट पाहायचे ठरविल्याचे सध्या तरी स्पष्ट चित्र दिसते आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

No comments:

Post a comment