Saturday, 15 February 2020

अण्णा सामंत : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


अण्णा सामंत : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
माझ्या आवडत्या सिनेमांपैकी राजेश खन्ना आणि शबाना आझमी यांचा अवतार हा सिनेमा. पोटची मुले या जोडप्याला नोव्हेअर करतात त्यानंतर त्या वृद्धवस्थेतही राजेश खन्ना स्वतःच्या व्यवसायाचे मोठे जाळे उभे करून मुलांना अद्दल घडवितो, आणखी एक आवडता सिनेमा अमिताभ आणि हेमाचा बागबान त्याचेही कथानक अवतार शी मिळते जुळते. अण्णा उर्फ रवींद्र द्वारकानाथ सामंत  फेब्रुवारी १७ तारखेला वयाची ७५ वी पार करताहेत, अण्णा यांचे असेही नाही कि पोटची  मुले नालायक निघाली कि त्यांना विचारात नाहीत. व्यावसायिक किरण आणि मंत्री उदय दोघेही कर्तबगार हुशार मेहनती गुणवान बुद्धिमान तडफदार दूरदर्शी थोडक्यात सर्वगुणसंपन्न तरीही अण्णा सामंत अवतारच्या राजेश खन्नाची किंवा बागबान च्या अमिताभ बच्चन ची पदोपदी क्षणोक्षणी आठवण  करून देतात किंबहुना प्रत्यक्षातले अवतार किंवा बागबान म्हणजे अण्णा सामंत. कवडीची आज त्यांना काम करण्याची गरज नाही, उठावे आणि सरळ या जोडप्याने तीर्थयात्रेला निघून जावे पण तसे या जोडप्याच्या मनातही येत नाही, अण्णा म्हणतात त्यापेक्षा मी येथे बसून जी लोकपूजा लोकसेवा करतो ते कोणत्याही तीर्थयात्रेपेक्षा कितीतरी मोठे असे काम आहे....

वयाच्या साठीनंतर या वृद्ध तरुणाने व्यवसायातली आणखी हौस भागवून घेतली आहे. किरण व उदय उत्तम व्यवसाय सांभाळू लागल्यानंतर अण्णांनी आपले लक्ष थेट शेतीकडे वळविले आज त्या अवतार बागबान सारखे हेच अण्णा अख्ख्या कोकणातले नामवंत यशस्वी उत्तम शेतकरी म्हणून नावारूपाला आले आहेत. आमच्या विदर्भातल्या अनेक आळशी शेतकऱ्यांनी अण्णा सामंतांच्या पायाचे तीर्थ पिऊन मोकळे व्हावे. अण्णांना मुलांच्या पैशांची आजपर्यंत गरज पडलेली नाही पण उदय आणि किरण दरक्षणी अण्णांचा सल्ला घेतल्याशिवाय त्यांचा कोणत्याही निर्णयात ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय कधीही पुढे जात नाहीत. अलीकडे उद्योगपती किरण सामंत यांच्या पत्नी वर्षा सामंत म्हणाल्या, जेव्हा मी आदित्यच्या वेळी गर्भार होते तेव्हा माझ्या मनात हेच कायम असायचे कि माझे जन्माला येणारे मूल सासरे अण्णा सामंतांची कॉपी असावी, म्हणजे दुसऱ्या घरातून आलेल्या सुनेला देखील हेच वाटले कि तिचे मूल दुसरे अण्णा सामंत असावे निघावे एवढे यशस्वी आणि कर्तबगार अण्णांचे आयुष्यमान परिपूर्ण भरलेले आहे...

www.vikrantjoshi.com

उच्च व तंत्र हिक्षण मंत्री उदय सामंत उत्तम राजकारणी आहेत यशस्वी व्यावसायिक आहेत त्यांना अभिनय येत, गाणे येते ते गावातले महाविद्यालयातले नावाजलेले खेळाडू आहेत पण उदय यांचा लिखाणाचा लेखणीचा संबंध नाही गंध नाही. उदय यांनी लिखाणात उतरणे म्हणजे उदय तानपाठक यांनी अभिनयात उतारण्यासारखे म्हणावे लागेल किंवा न हसणाऱ्या जयंत पाटलांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये रोल मिळविल्यासारखे ते ठरेल पण वडिलांच्या कर्तबगारीवर फिदा होऊन उदय महाशय पुढल्या वर्षभरात, बाप हा बाप असतो, हे बापावर म्हणजे रवींद्र उर्फ अण्णा सामंत यांच्यावर पुस्तक लिहून काढून मोकळे होताहेत. म्हणजे उदय आता आमच्यासारख्या लेखकांवर पत्रकारांवर उपासमारीची वेळ आणून ठेवतात कि काय असे आता अनेकांना वाटू लागलेले आहे कारण उदय ज्या क्षेत्रात उतरतात बाप अण्णांसारखे पहिले स्थान मिळवून मोकळे होतात. त्यामुळे त्यांनी लिहिलेले वडिलांवरचे आयुष्यकथन उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक असेल हे सांगायला येथे कोणत्याही भविष्य कथन करणाऱ्याची गरज नाही आवश्यकता नाही. उदय सामंतांचे पार वृद्धत्वाकडे झुकलेले आईवडील आजही स्वतःला वृद्ध मानायला तयार नाहीत. अण्णा म्हणतात, मनात कायम सकारात्मक विचार आणले ठेवले म्हणजे संकटातही यश मिळते आणि आयुष्यात सर्व काही चांगले घडते. अण्णा सामंत प्रचंड यशस्वी आहेत, दोन्ही कर्तबगार मुलांच्या आजही कितीतरी पुढे आहेत...
क्रमश: हेमंत जोशी 

अण्णा सामंत : पत्रकार हेमंत जोशी

अण्णा सामंत : पत्रकार हेमंत जोशी 
अण्णा सामंत आणि अण्णा नायक दोघेही एकदम डेंजरस दोघेही दाट कोकणातले. रात्रीस खेळ चाले मधल्या अण्णांना बघून जशी भल्याभल्यांची फाटते ते तसेच पाली रत्नागिरीचे अण्णा सामंत, यांचाही वयाच्या पंचाहत्तरीनंतर देखील तोच धाक तसाच दरारा. भल्याभल्ल्यांची याही अण्णा सामंतांसमोर अण्णा नायकासारखी फाटते, अण्णा सामंत एकदम फटकळ पण तेवढेच प्रेमळ. त्यामुळे अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यत अण्णा सामंतांचा प्रचंड आदरयुक्त दरारा. त्याची दोन्ही मुले तसे त्यांच्या क्षेत्रात एकदम टगे पण चाळीशी उलटून गेलेली मुले अण्णा सामंतांसमोर मात्र आजही काही चुकीचे सांगायला किंवा बोलायला असलेल्या प्रेमापोटी आदरापोटी घाबरतात. अण्णा नायक हे पात्र खुनी आणि विकृत त्याच्या नेमके उलटे अण्णा सामंत ते विकृत तर कधीही नव्हते आणि जेथे पोटच्या दोन्ही मुलांना त्यांनी रागाने कधी चापटी मारली नाही तेथे खुनाखुनी कोसो दूर. एक मात्र शंभर टक्के खरे आहे कि अण्णा सामंत यांचा आजही या वयातही प्रचंड धाक आणि दरारा आहे कारण या वृद्धावस्थेत देखील ते स्वतः थांबायला थकायला तयार नाहीत, सतत आजही कार्यव्यस्त त्यामुळे त्यांना भेटणाऱ्यांकडून देखील नेमके काम नेमके उत्तर त्यांना हवे असते...

अण्णा उर्फ रवींद्र सामंत हे रत्नागिरीतले, यशस्वी कंत्राटदार बांधकाम व्यावसायिक किरण सामंत व शिक्षण मंत्री उदय सामंत या दोघा दिग्गजांचे पिताश्री. उदय सामंत हे खासदार विनायक राऊत यांचे प्रचंड विश्वासू आणि उजवे हात त्यामुळे राऊतांचे मतदार हमखास सांगतात आम्हाला कायम वाटते जणू आम्हाला एकाच लोकसभा मतदार संघांत दोन दोन खासदार मिळालेले आहेत तोच बोलबाला तेच बोलणे अण्णा सामंत, किरण सामंत आणि उदय सामंत या तिघांच्याही बाबतीत. हे तिघेही स्वतःचे
व्यवसाय कामधंदे सोडून ज्यापद्धतीने जनताभिमुख झाले आहेत जो तो म्हणून तेच सांगत सुटलाय, आम्हाला एक नव्हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात एकाचवेळी तीन तीन आमदार लाभले आहेत. अण्णा उर्फ रवींद्र सामंत, किरण सामंत आणि उदय सामंत हे तिघे एकाचवेळी एकाच मतदार संघात आमदार असल्यासारखे रत्नागिरीकरांना फील येते. हे तर पुराणातल्या महाभारतातल्या द्रौपदीसारखे झाले आहे ऐकून वाटत राहते....

हे माझ्या एकट्याचे यश आहे असे उदय सामंत स्वप्नातही म्हणणे अशक्य कारण सतत चार टर्म त्यांची आमदारकी, आणि तीन वेळा नामदारकी. हे प्रचंड यश नक्की माझ्या एकट्याचे नाही, मी किरण भैय्या आणि अण्णा एकत्र आहोत, एकमेकांच्या घट्ट हातात हात घेऊन आहोत म्हणून सतत मी आमदार आहे आज नामदार आहे यशस्वी नेता आहे, उदय ज्यालात्याला प्रत्येकाला हे हमखास सांगत सुटतात असतात. मित्रांनो, या घराला त्या तटकरे मुंडे यांच्या घरासारखी घराण्यासारखी दृष्ट न लागो. जसे तटकरे घराणे एकमेकांवर आज सूड उगवायला आसूड ओढायला उत्सुक अधीर असते ते कधीही सामंतांकडे न घडो. एकत्र यशाची चव चाखण्यासारखी असते, थोडेफार वाद होत असतात पण भूमिका निस्वार्थी असली कि घराण्याचा तटकरे होत नाही. एक गम्मत सांगतो, मला वाटायचे ज्या एका मुद्द्यावर उदय सामंत यांच्याशी कधीतरी प्रेमातून वादावादी होते तो मी एकमेव असावा पण असे काही नाही. जी तक्रार माझी नेमकी तीच तक्रार किरण सामंत यांचीही म्हणजे जेव्हा नेमके एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावर अनेकांना आम्हाला उदय यांच्याशी भ्रमणध्वनी वरून बोलायचे असते तेव्हा ते तो हाती घेऊन त्यावेळी बोलतील, अजिबात शाश्वती नसते आणि जे किरण सारख्या अति महत्वाच्या घरातल्या व्यक्तीच्या बाबतीत घडते ते तुमच्या आमच्या बाबतीत घडणे सहज शक्य आहे आणि याचे महत्वाचे कारण म्हणजे अनेकदा उदय सामंत यांची अवस्था एकाचवेळी पाच पाच पिल्लांना जन्म देणाऱ्या फिमेल प्राण्यासारखी असते, त्यांना एकाचवेळी अनेकांनी असेकाही घेरलेले असते कि अशावेळी उदय सारेकाही विसरतात आणि त्या घोळक्यातले एक असतात आणि एकमेव असतात. जवळच्या अनेकांची अवस्था मात्र त्यांच्याबातीत सहन होत नाही आणि सांगताही येत नाही...
क्रमश: हेमंत जोशी 

Thursday, 13 February 2020

Kuch To Log Kahenge...I'm with you Sanjay Barve!!


Kuch To Log Kahenge...I'm with you Sanjay Barve!!

So, folks back to writing after a good break of more than week! Yes, like you, neither was I interested in this state's political scenario nor did I even step into the Mantralaya since a week. Why should I come to Mantralaya? I find everything into a mess. All the time every floor is filled with more than 500 people even if you come at 11am. Neither any Minister nor any bureaucrat has time to even take a break for even an hour if they wish too, such is in flow of public. On one hand if Chief Minister Uddhav Thackeray is still figuring out as to how gain the grip of his government, on the other hand DCM Ajit Pawar seems to be on a roll. He is actually working day in day out to bring home, what was lost! Then the second most busy person is our Chief Secretary followed by our only good looking and 'available' 24/7 Housing Minister Jitendra Awhad. But of all, one bureaucrat is dam pissed with what is going on. He is our ACS Housing & who is also having Addl responsibility of Home since last 10 months. Heard he so tired of running around Mantralaya  for meetings of either Home or Housing Department's that he indeed has lost some weight, but he surely hasn't lost his sight for grabbing the CS chair which is up after a month & a half. Jitendra Awhad is hell bent on making him the CS (baat ho gayi haaiii😉), & yes with the same aggression Awhad is also keen on bringing firebrand Sanjeev Jaiswal as Housing Secretary. Forget it, I'm waiting for last list of postings...then will do the math & dissect it completely as to who played what and how much was exchanged in what favour and who was responsible for postings...Watch our for this space!

Yesterday read in the papers about how CP Barve's son, Sumukh, his company got awarded a particular contract to digitalise Mumbai Police records. Then read one communication from the ACS  office to Sumukh Sanjay Barve that ACS Home had accepted the offer for Notesheet Plus to be introduced in the offices of Mumbai Police on pro-bono basis for a period of 5 years. Now for the one's who don't know, or those who tend to know and for those who know but act unknown--here is a fact....There is absolute no rapport left between our Comissioner of Police & his superiors. Yes, on the face CP's detractors can't even touch him 1%, so they depend on these stupid tricks to malign his image and when, when his retirement is just 15 days away! Sigh! To top it, Home Minister Deshmukh in his press conference clearly walked over these baseless allegations. 

www.vikrantjoshi.com

Now, imagine if a Journalist like me knows where these babus sit & hatch their plans, imagine what all CP knows.. My best wishes to Barve's detractors, but bosses, can I be that one person who will give you an advice even when it is not needed? Actually it is a big secret which I will let out today...Now listen and read this carefully--Tell me what was the only decision that was taken by CM Uddhav & passed by Home Minister Amit Shah within 48 hours? and yes, in spite of CP's detractors trying every trick in the book to stop this decision? It was CP Barve's 2nd extension when he had retired in October 2019. How did it happen? See we all know, that not even this BJP government at the Centre cares a rats ass if you are straight forward and non-corrupt. Then why was Barve given extension ? What might be the reason of such "blessings". No, no Fadnavis is no where close to your guess...

It is because, what I ASSUME after scratching my BRAINS-- this current Commissioner of Police might be sharing an excellent rapport with our Home Minister Mr. Amit Shah. Now the person who has this equation with Amit bhai, I wouldn't even dare to even shake my hands with him, forget rubbing him the wrong way. So, my dear whosoever has that "masti" in their backside to get our CP in trouble, please may I request you in your language---"Bad Bad jana dahail jaas, Gadha poonche katna paani" which means-Great Men drowned, and Donkey is asking the depth of the water.... This is Amit Shah--He knows it all--who flipped when Fadnavis went and Uddhav came...and believe me, he is not a person on whose bad side you want to be...not at least till 2024...And coming back to the contract awarded to Barve's son...Boss it is free of cost--As the police department gets motorcycles & helmets free, why can't a person just digitalise your data free of cost to the Government? I mean, he will have to bear the cost of servers & all right? Lets not get families involved here especially when it is a family like a straight forward officer like Barve, else if a Journalist like me knows whose brother takes monies & builds empires in Delhi NCR, imagine what all Barve & Amit Shah must be knowing of you guys...In simple words, let him retire with grace & dignity--you have till 2022 to rule the roost. Oh before I sign off, come March and our new Dabang CP can be either Param Bir Singh or Sadanand Date. Both of them, will have to again fight this same battle with the superiors as Barve did. Yes, they aren't even Param Bir's ....he is a Jat right? 

Vikrant Hemant Joshi 

Wednesday, 12 February 2020

भानगडी आणि लेखणी : पत्रकार हेमंत जोशी

भानगडी आणि लेखणी : पत्रकार हेमंत जोशी 
तुमच्या लिखाणावर टीका होणे आणि धमक्या येणे यात नक्की मोठा फरक आहे जसे पोटच्या पोरीला बाप प्रेमाने कवटाळतो तोच पुरुष प्रेयसीला मात्र करकचून बाहुपाशात घेतो हा असा फरक टीका आणि धमक्यांमध्ये आहे असतो. तुम्ही अमुक एकासाठी तमुक एकाला लिखाणाच्या माध्यमातून तेही सुपारी घेऊन संपविणार असाल तर तुम्हाला मला धमक्या येणे क्रमप्राप्त आहे माझ्यावर मात्र आजतागायत टीका केल्या जाते धमक्या दिल्या जात नाहीत कारण राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षातल्या डॉन मंडळींना हे तंतोतंत माहित आहे जरी हेमंत जोशी कडवा हिंदू असला तरी तो कोणत्याही राजकीय पक्षाची सुपारी घेऊन काम करीत नाही लिखाण करीत नाही. यावेळी तर महाआघाडीने पार लाज सोडली आहे तेही थेट कडवे हिंदू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना या महाआघाडीने मंत्रिमंडळात एक नव्हे तर चार चार तेही अस्लम शेख सारखे वादग्रस्त मुसलमान नेते मंत्रिमंडळात घेतले आहेत, मराठी माणसाच्या मतदाराच्या अस्वस्थतेचे हे एक मोठे कारण आहे, उद्धव यांच्या मुख्यमंत्री होण्याचा आनंद मुसलमानांना राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे महत्व दिल्याने कोठल्या कोठे पळून गेला आहे. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतदानासाठी महाआघाडीने एवढे लाचार होणे त्यातून तुम्ही भलेही सत्ता हासील करून मोकळे झालात पण आम्हा मराठींचे हिंदूंचे त्यातून नक्की मोठे वाटोळे होणार आहे...

जसे मुंबई पोलीस टग्या मुसलमानांसमोर हतबल ठरले आहेत तसे सध्याचे राज्यकर्ते देखील मुस्लिम नेत्यांसमोर गुढगे टेकून मोकळे झाल्याचे दृश्य समोर दिसते आहे. एखादा मुसलमान मंत्रिमंडळात म्हणजे या राज्याचा राजा म्हणून आम्ही हिंदूंनी नक्की सहन केले असते पण हे काय आमच्यावर तुम्ही तेही अब्दुल सत्तार यांच्यासारखे तोंडफळ मंत्री बिनभरवंशाचे मुसलमान मंत्री लादले, काय हो तुम्ही हे केले, आम्हाला मनातून मनापासून अस्वस्थ अशांत करून सोडले. तुम्हाला हे तंतोतंत माहित आहे कि हेमंत जोशी याच्या लिखाणात अजाणतेपणे चूक होऊ शकते पण खोटे लिहिणे त्याच्या स्वभावात नाही, म्हणून मी अनेकांचा आग्रह असतांना आत्मचरित्र लिहीत नाही लिहिणार नाही कारण खोटे लिहिणे जमणार नाही आणि खरे लिहिले तर अनेकांचे काही खरे नाही. बहुतेक आत्मचरित्र खोटे असतात, चांगले तेवढे लिहितात आणि आयुष्यातल्या खऱ्या प्रसंगांना फाट्यावर मारतात. एका तरी पुरुषाने त्याने आयुष्यात पहिले हस्तमैथुन केव्हा केले लिहिलेले आहे का, नेव्हर. कारण आत्मचरित्र तद्दन खोटे असतात त्यांना आयुष्यातल्या भानगडी लपवून ठेवायच्या असतात, चांगले घडलेले तेवढे सांगायचे, लिहायचे असते....

माझे लिखाण जहरी असते प्रसंगी ते कोणालाही झोडपणारे असल्याने मला आणि समोरच्या बहुतेक बड्या मंडळींना आमच्यातली जिवलग मैत्री उघड करायची नसते. जसे मला माहित आहे कि कोणत्या मंत्र्याला त्याची बायको फारकत घटस्फोट शंभर टक्के देणार होती पण दिवंगत भय्यू महाराजांनी त्या दोघात समेट घडवून आणली आणि पुन्हा ते दोघे एकत्र आले. माझ्या बहिणीला यांच्यापासून मूल झालेले आहे असा त्या मंत्री पत्नीने आरोप केला होता, तो खरा कि खोटा त्यावर आज येथे चर्चा नको म्हणून मला आत्मचरित्र लिहिणेही नको. अगदी अलीकडे एका आजी का माजी मंत्र्याने, त्याने दुसरे लग्न केल्याचे मला सवर्णन सांगितले, त्याने ज्या विश्वासाने सांगितले कारण त्याला माहित आहे उद्या चुकून त्याचे व माझे एखाद्या मुद्दयांवर मतभेद झाले तरी मी त्यातले काहीही उघड करणार नाही, आणि याच माझ्या वृत्तीचा मला आयुष्यात मोठा फायदा झाला आहे, काही नाजूक प्रसंग आयुष्यात कधीही किंवा काहीही झाले तरी उघड करायचे नसतात. ज्या मंत्र्याने दुसरे लग्न केले ते जिच्याशी केले त्यावर मला वाईट वाटले कारण त्या मंत्र्याच्या शहरातली माझी एक अतिशय देखणी मैत्रीण मला हेच म्हणाली होती अरे त्याने हे काय केले, लाखात सुंदर मी एक, प्रसंगी मी देखील त्याच्याशी तो विवाहित असतांनाही लग्न केले असते. काही माणसे मोठ्या विश्वासाने त्यांचे सिक्रेट्स तुमच्याकडे उघड करतात ते आयुष्यभर मनातच ठेवायचे असतात आणि त्या सिक्रेट्सचा गैरफायदा देखील घ्यायचा नसतो. असो, म्हणून मी आत्मचरित्र लिहीत नाही...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Tuesday, 11 February 2020

ब्राम्हण द्वेष भाग दुसरा : पत्रकार हेमंत जोशी


ब्राम्हण द्वेष भाग दुसरा : पत्रकार हेमंत जोशी  
माझ्या आयुष्याची जी सत्यकथा आहे ती तशीच हुबेहूब जवळपास महाराष्ट्रातील साऱ्याच समस्त ब्राम्हण वर्गाची आयुष्य गाथा आहे असावी. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हे तालुक्याचे ठिकाण, सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले हे माझे मूळ गाव. मी केवळ ९-१० वर्षांचा असेन तेव्हा आई गेली त्यानंतर वडिलांनीच आम्हाला कसेबसे वाढविले. वडील शिक्षक होते रा.स्व. संघाचे कट्टर स्वयंसेवक पदाधिकारी होते त्याकाळी शिक्षकांना अगदीच जेमतेम पगार असायचा, आमचे कुटुंब मोठे त्यामुळे वडील गावगाड्याची भिक्षुकी करायचे, गावातल्या ब्राम्हणांनी त्यांना क्वचित खचित पूजापाठ सान्गण्यासाठी थोडक्यात भिक्षुकी करण्यासाठी बोलावले असेल कारण उघड होते, आम्ही सारे विशेषतः वडील फारसे ब्राम्हणत्व पाळत नसू कारण आईविना तेही गावातल्या ब्राम्हणांच्या भरवशावर घरातली चूल पेटणे अशक्य होते, दरिद्री ब्राम्हणांकडे येऊन ब्राम्हण स्त्रीने स्वयंपाक करून खाऊ घालणे शक्य नव्हते, बारी समाजाच्या स्त्रीने आम्हाला लहानाचे मोठे केले स्वयंपाक करून खाऊ घातले, आमची काळजी घेतली. नेमके हेच कारण असते कायम माझ्या सतत अस्वस्थ राहण्याचे होण्याचे कि आम्हाला ब्राम्हणेतर वर्गाने लहानाचे आजपर्यंत साऱ्या अर्थाने मोठे केले असतांना जेव्हा माझ्यासारख्या बहुसंख्य असंख्य ब्राम्हणांचा ब्राम्हणेतर द्वेष दुस्वास राग करतात, आपली नाळ एवढी जुळलेली असतांना हे असे का...?

आता अत्यंत महत्वाचा कळीचा मुद्दा, मला सांगा, आजपर्यंत आजतागायत एकही मुस्लिमाने ब्राम्हणांचा द्वेष केला राग केला दुस्वास केला एखादे उदाहरण दाखवा, कदाचित औषधालाही सापडणार नाही. म्हणजे ज्या मुस्लिमांचा समस्त ब्राम्हणांनी सतत कायम दुस्वास केला विरोध केला पाक धार्जिण्या असलेल्या काही मुस्लिमांना कायम अगदी सुरुवातीपासून अंगावर घेतले त्यांच्याशी उघड पंगा घेतला त्या मुस्लिमांनी कधीही उघड राज्यातील कानाकोपऱ्यातल्या समस्त ब्राम्हणांचा अजिबात राग केला नाही, असे पाकधार्जिणे मुस्लिम हिंदू विरोधी आहेत पण कधीही ते एकट्या ब्राम्हण वर्गाच्या विरोधात नव्हते नाहीत म्हणजे ज्यांनी खऱ्या अर्थाने समस्त हिंदूंना कायम मुस्लिम विरोधात उभे केले ते मुस्लिम मात्र कधीही एकट्या ब्राम्हणांच्या विरोधात रस्त्यावर  उतरले कधीही ऐकलेले नाही कानावर पडले नाही पण ज्या ब्राम्हणेतर हिंदूंनी आम्हाला पोटाशी धरायला हवे तेच ब्राम्हणेतर हिंदू या राज्यात आमच्या का मागे लागलेले आहेत, डोक्याला मनाला झिणझिण्या आणणारे वेदना देणारे हे जातीयवादाचे अजब महाभयंकर अस्वथ करणारे जीव नकुसा करणारे समीकरण...

www.vikrantjoshi.com

कुठेतरी हे थांबायला पाहिजे विशेष म्हणजे फक्त सार्वजनिक व्यासपीठावरच ब्राम्हण विरोध आहे, व्यक्तिगत आयुष्यत जर ब्राम्हणेतर आमच्या पाठीशी ठामपणे उभे ठाकले नसते तर आजपर्यंत अनेक ब्राम्हणांना भीका मागाव्या लागल्या असत्या. फार कमी ब्राम्हण आपल्यातल्या गरजू गरीब ब्राम्हणांच्या पाठीशी उभे असतात उलट बहुतेकांना एखाद्या ब्राम्हण कुटुंबाची चाललेली फरफट बघून मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात अशावेळी ब्राम्हणांच्या पाठीशी हमखास ब्राह्मणेतर अतिशय ठामपणे उभे राहतात असतात. मला मुंबईत धुळ्याच्या रोहिदास पाटलांनी घर दिले नसते आणि बारामतीच्या शरद पवारांनी कार्यालय तेही विकत घेऊन दिले नसते तर मला हे आजचे यश कधीही बघायला मिळाले नसते. राज्यातले समस्त बहुसंख्य मराठे माझ्या पाठीशी कायम उभे राहिले त्यातूनच मला पुढे जाता  आले आणि हीच कथा असते बहुतेक ब्राम्हणांच्या घरातली, हे तर असे झाले कि एखाद्या तरुणीवर चार भिंतीच्या आड ओसंडून प्रेम करायचे आणि चार चौघात मात्र जणू ती ओळखीचीच नाही असे दाखवायचे, नका असा विचित्र राग मनात धरून, आमच्याशी नका वागू समस्त ब्राम्हणेतर हिंदूंनो, लढा द्यायचा असेल तर आम्हाला साथ द्या जात्यंध पाकधार्जिण्या मुस्लिमांच्या विरोधात लढायला नेहमीप्रमाणे आजतागायत...
क्रमश: हेमंत जोशी.

Sunday, 9 February 2020

ब्राम्हण द्वेष :पत्रकार हेमंत जोशी

ब्राम्हण द्वेष :पत्रकार हेमंत जोशी 
ज्या ब्राम्हणेतरांना सार्वजनिक ठिकाणी ब्राम्हणांना शिव्या हासडायच्या असतात विरोध करायचा असतो त्यांना व्यक्तिगत खाजगी जीवनात मात्र ब्राम्हणांशीच मैत्री करायला आवडते ब्राम्हणांशी कौटुंबिक संबंध ठेवायला जोडायला मनापासून आवडतात. जे सार्वजनिक ठिकाणी ब्राम्हणांच्या नावाने शिमगा साजरा करतात त्यांचे आवडते शिक्षक आवडते साहेब आवडते मित्र आवडत्या मैत्रिणी गावातले शेजारचे आवडते कुटुंब मात्र हटकून ब्राम्हण असतात. प्रत्येकाला बायको एकतर ब्राम्हण हवी असते, बामणासारखी हवी असते. जेवण असो कि विचार, राहणीमान असो कि कौटुंबिक वातावरण ब्राम्हणेतर हमखास मुलांना सांगतात अरे त्या देशपांडे जोशी गोडबोल्यांसारखें जरा वागत चला आणि आमच्यासारखे तुमचे सारे असावे म्हणून आम्ही ब्राम्हण अगदी पोटतिडकीने तुमच्याकडून हे सारे करवून घेत असतो म्हणून तुमचा जवळचा मित्र मैत्रीण शिक्षक कोण, तर ते हमखास मूठभर ब्राम्हण असतात. मग का रे असे सार्वजनिक ठिकाणी आम्हाला त्रास देण्यात परेशान करण्यात टोमणे मारण्यात लिखाण करण्यात असा विकृत आनंद मानताहेत तुम्ही बहुतेक सारे ? कोणा नथ्थुराम गोडसेने ती चूक केली आणि त्यानंतर भोगले कोणी तर समस्त ब्राम्हण कुटुंबांनी,  सिंधी समाजाने जसे अंगावरच्या कपड्यानिशी पाकिस्थान सोडले ते तसे गांधी वधानंतर त्यावेळी कित्येक ब्राम्हणांनी नेसत्या कपड्यानिशी आपले खेडे सोडले आणि ते शहरात आले किंवा अनेक देशाबाहेर देखील गेले...

शिखांचा खलिस्तान साठी एकत्रित सार्वजनिक संघर्ष होता त्यातून त्यातल्या एका शिखाने इंदिरा गांधी यांची हत्या केली त्यानंतर पुढे काही वर्षे शिखेतर समाजात शीखांविषयी आग धुमसत होती हे एकवेळ आपण समजू शकतो पण ब्राम्हणांचा ब्राम्हणेतर लोकांविरुद्ध असा कोणताही संघर्ष नाही वाद नाही मग तरीही आमच्या नशिबी केवळ आपल्याच या राज्यात हे अपमानाचे जीणे का, एखादा देवेंद्र फडणवीस पेटून उठतो काहीतरी चांगले करायला जातो त्याचे पडसाद अख्य्या ब्राम्हणांना सोसावे लागताहेत त्यांना अप्रत्यक्षरीत्या वाळीत टाकल्यासारखी वागणूक मिळते आहे एवढे का ब्राम्हण वाईट आहेत जरा स्वतःच्या मनाला एकदा तर विचारून बघा आणि उत्तर जर वाईट नाहीत असे आले तर शिकवणाऱ्यांचे कृपया न ऐकता आजपासून तुमचे आमच्याविषयीचे कलुषित मन आरशासारखे एकदा स्वच्छ पुसून मोकळे व्हा. ज्यांनी त्यांना जवळून बघितले अनुभवले त्या प्रत्येक ब्राम्हणेतर व्यक्तीला फडणवीसांविषयी त्यांचे मत काय, विचारून तर बघा, उत्तर शंभर टक्के पॉझेटिव्ह येईल. पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे जगात दीड कोटी मराठी वाचक आहेत त्यांना किंवा आम्हाला सतत कायम दडपणाखाली आणण्याचा प्रयत्न केल्या जातोय कारण फक्त हेच कि शरद पवारांच्या किंवा त्यांच्या काही मूठभर बेधुंद उजव्या डाव्यांचा आम्ही शब्दांतून समाचार घेतो, हे काय आमच्या वैयक्तिक फायद्यासाठी लिहिणे असते, नाय नो नेव्हर, राज्याचे वाटोळे होऊ नये म्हणून आमचे किंवा भाऊ तोरसेकरांचे सततचे लिहिणे असते सांगणे असते. एवढेच सांगतो शाळेतल्या कडक ब्राम्हण शिक्षकांचा जसा मार सहन केला ज्यामुळे पुढे उत्तम आयुष्य घडले तसे हे आमचे शब्दांचे मार तुम्ही नीट ध्यानात घेतले तर तुमचा राग नक्की कुठल्या कुठे पळून जाईल आणि सार्वजनिक ठिकाणी देखील तुम्ही तुमचे शंभर टक्के ब्राम्हणांवरील प्रेम व्यक्त करून मोकळे व्हाल...

www.vikrantjoshi.com

रानडे आडनावाच्या ब्राह्मणाशिवाय सचिवाशिवाय शरद पवारांचे पान हलत नाही किंवा धनंजय मुंडे जाहीर सांगतात दररोज तोंडाला फेस येईपर्यंत काम करणारा प्रशांत जोशी जर माझा स्वीय सहाय्यक नसता तर मला मिळालेले आजचे यश कदाचित आणखी लांबणीवर पडले असते हे असेच वातावरण आजही जेथे तेथे त्या ब्राम्हणांच्या बाबतीत पण काही विकृतांकडून ब्राम्हणांचा त्याग इतिहास सारा काही कचऱ्यात फेकल्या जातोय आणि आपल्यातल्याच एका मराठी ज्ञातीला समाजाला काही ताकदवान विकृत मराठी नामोहरम करण्यात आनंद मानताहेत. उभे आयुष्य केवळ मराठ्यांच्या भल्यासाठी राब राब राबणाऱ्या विनायक मेटे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्यांना सर्वाधिक जवळची आवडती कोण तर सतत त्यांच्या पाठीशी एखाद्या रणरागिणीसारखी उभी असलेली ती भारती लव्हेकर नावाची ब्राम्हण आमदार स्त्री. उगाच नाही मेटे यांनी तब्बल दोन वेळा याच भरतीसाठी उमेदवारी पारड्यात पाडून घेतली. मित्रांनो, थांबवा कुठेतरी सततचे सार्वजनिक ठिकाणी फक्त ब्राम्हणांना त्रास देणे...
क्रमश: हेमंत जोशी

Wednesday, 5 February 2020

बाळ उद्धव कि उद्धव बाळ : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी


बाळ उद्धव कि उद्धव बाळ : भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 
ते शरद पवार आहेत त्यांचे काहीही चुकलेले नाही कारण त्यांची स्वतःची राजकीय पार्टी आहे त्यामुळे ते तुमचे वाटोळेच करायला बसले आहेत, तुम्ही ते ठरवायचे आहे कि वाटोळे कितीमी करून घ्यायचे किंवा वाटोळे करवून घ्यायचे किंवा नाही. जसे त्यांनी जाळ्यात ओढून राज ठाकरे यांचे वाटोळे केले उद्या त्यांना तेच क्रमाक्रमाने शिवसेना काँग्रेस आणि भाजपाचे करायचे आहे. राज ठाकरे आणि भाजपा अशी युती होण्याआधी जर पुन्हा शिवसेना आणि भाजपाची युती झाली तर ते शंभर टक्के त्या दोघांनाही फायद्याची ठरणार आहे पण युती झाली नाही तर नुकसान भाजपाचे नव्हे शिवसेनेचे होणार आहे कारण शिवसेना भाजपा एकत्र आले नाहीत तर भाजपासमोर जो पर्याय पुढे आला आहे तेच घडेल म्हणजे भाजपा मनसेशी युती करून मोकळी होईल. त्यानंतर भाजपा म्हणजे शरद पवार नव्हेत कि राज ठाकरे यांना आधी वापरून घेतील नंतर त्यांना दूर करून मोकळे होतील. असे कधीही घडणार नाही, एकदा का भाजपने या राज्यात मनसेशी युती केली तर त्याचा फायदा मनसे आणि भाजपाला होईल, आघाडी मध्ये राहून शिवसेना आणि उद्धव ठाकरे व ठाकरे घराण्याचे फार भले होईल हे दूरदूरपर्यंत दिसत नाही...

www.vikrantjoshi.com

आता तर हे असे झाले कि तुझ्या प्रेयसीला, बायकोला माझ्याकडे पाठवून दे म्हणजे मी तिचे मुके घेतो लाड करतो पप्प्या घेतो नंतर तिला तुझ्याच घरी सोडून येतो. हे असे चालले आहे त्या काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीचे. म्हणजे शरद पवार किंवा अजित पवार काँग्रेस आणि सेनेच्या मंत्र्यांना बोलावून घेतात, उद्धव दुरून गम्मत बघतात त्यांचे त्यातून हसे होते आहे आणि पवारांची राजकीय पॉवर झपाट्याने वाढते आहे. विचार तर खरे त्या एकनाथ शिंदे यांना ते का संतापलेत अलीकडे जेव्हा त्यांना थेट शरद पवार यांनी बोलावून घेतले वरून त्यांच्याशी दोन तास चर्चा केली, ठाणे जिल्ह्यातील विविध कामांचा आणि त्यांच्याकडील खात्यांचा आढावा घेतला. आणि हे असे सतत घडते आहे कारण उद्धव ठाकरे यांनीच तशी मोकळीक काका व पुतण्याला देऊन ठेवलेली आहे. म्हणजे मंत्री  उदय सामंत उद्धव यांच्यासमोर कमी आणि अजित पवारांसमोर अधिक हजेरी देत असतील तर उद्धव यांनी लक्षात घ्यावे कि सततच्या सहवासाने जर आकर्षण निर्माण झाले तर उफाडी मुलगी बापाच्या मित्राशी देखील लग्न करून मोकळी होते. नेमके नाजूक तब्बेतीचे कारण आहे कि शासन चालविण्याचा अनुभव गाठीशी नसल्याने उद्धव असे वागताहेत कळत नाही पण सध्या तरी त्यांचे मुख्यमंत्री म्हणून काम करणे आणि आदित्य यांचे मंत्री म्हणून काम करणे, एखाद्या पुणेकराला शोभावे असे आहे म्हणजे दुपारी वामकुक्षी सकाळी उशीरा  कामांना सुरुवात आणि रात्री घरी जाण्याची घाई....

पत्रकारांना कोणताही पक्ष नसतो त्यामुळे सत्तेत कोण यासी आम्हाला फारसे देणेघेणे नसते फक्त एकच वाटत राहते कि पुनःपुन्हा राज्याचे वाटोळे करणारे सत्तेत नसावेत, नेमके तेच सुरु झाल्याने पोटतिडकीने लिहितो आहे, पुन्हा पूर्वींसारखी हिशेबाची टक्केवारीची गणित जोमाने जोराने सुरु झालेली आहेत कारण उघड आहे कि यातल्या प्रत्येकाला माहित आहे आपले काही खरे नाही त्यामुळे टाळूवरचे जेवढे लोणी खाता येईल तेवढे खाऊन मोकळे होणे हे एवढेच उद्देश ध्येय समोर ठेऊन मंत्रालय सुरु आहे, मंत्र्यांना नेहमीच्याच बदमाश अधिकाऱ्यांची मनापासून साथ आहे. हीच ती वेळ आणि संधी भाजपाला या राज्यावर सत्तेत पुन्हा पकड घेण्याची पण त्यांच्यातला उत्साह निघून गेल्यासारखे दिसते आहे त्यातून इकडे लक्ष घालण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांसारखे बडे नेते तिकडे दिल्लीत पत्रके मतदार याद्या वाटण्यात स्वतःला धन्य समजताहेत. आजही सांगतो उद्धव आणि देवेंद्र यांचे मनसे फारसे बिनसले नाही पण मोहन भागवत किंवा नितीन गडकरी यांच्या सारख्या मान्यवर बुजुर्ग मंडळींनी मध्यस्थी करून वाद मिटविणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा नेमके तेच घडेल जे मराठी माणसाला नको आहे कि मोठे राजकीय नुकसान शिवसेनेचे होईल कारण मनसे भाजपा त्यांचे तर ठरलेले आहे एकत्र येण्याचे. एकच सांगतो सध्या जे राजकीय चित्र दिसते रंगते आहे ते फारसे चांगले नाही, सामान्य लोकांचे नुकसान करणारे आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Tuesday, 4 February 2020

बाळ उद्धव कि उद्धव बाळ : पत्रकार हेमंत जोशी


बाळ उद्धव कि उद्धव बाळ : पत्रकार हेमंत जोशी 
क्या चल रहा है, फॉग चल रहा है, पद्धतीने कोणी मला विचारलेच तर हेच सांगेल, राज्यात फक्त व फक्त अजितदादा राज चल रहा है, बघावे तेथे दादा आणि ऐकावे तेथे दादा, उद्धवजी म्हणजे उरलो आता केवळ नावापुरता, पदापुरता, मिरवून घेण्याकरिता मिरवून आणण्याकरिता म्हणजे हे तर असे झाले सार्वजनिक गणपती मंडपात दोन मुर्त्यांची स्थापना केली जाते पैकी मोठी मूर्ती फक्त लोकांना बघण्यासाठी असते आणि काम खरे लहान मूर्तीचे असते म्हणजे गणपती विसर्जन करेपर्यंत जी काय पूजा केली जाते किंवा मानसन्मान दिल्या जातो तो लहान मूर्तीलाच मिळतो. सध्या या राज्यात उद्धव ठाकरे म्हणजे मोठी मूर्ती कारण जे काय कोडकौतुक केल्या जाते किंवा करवून घेतल्या जाते ते फक्त आणि फक्त अजितदादा पवार यांचेच त्यामुळे पुढल्या पंधरा दिवसांनंतर तर मी तुमच्यासमोर फक्त एवढेच मांडणार आहे कि दिवसभरात अजित पवार यांनी काय केले त्याचवेळी उद्धव ठाकरे कुठे होते आणि काय करत होते, सध्या अजितदादा बोले आणि मंत्रालयाशी सत्तेशी संबंधित जो तो प्रत्येक डोले असेच त्यांच्याविषयी म्हटल्या जाते....

निष्कलंक कामसू उत्साही धडाकेबाज याऐवजी निष्क्रिय मुख्यमंत्री हा डाग उद्धव ठाकरे स्वतःला लावून घेणार नाहीत अशी आजही शंभर टक्के खात्री वाटते. पण आज मात्र तेच चित्र आहे तशीच हवा आहे तसेच वातावरण आहे, मंत्रालयात भल्या पहाटे पासून सारेकाही फक्त आणि फक्त अजितदादा बघतात, प्रत्येकाच्या तोंडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नव्हे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच एकमेव नाव असते त्यांच्यासमोर सारे फिके म्हणजे राज्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकारी देखील. सारे काही अजितदादाच सांगतात आणि मुख्यमंत्री व एकजात साऱ्याच पक्षाचे मंत्री फक्त आणि फक्त अजितदादांचेच आदेश ऐकतात नव्हे त्यांना ऐकावेच लागतात त्यामुळे विशेषतः शरद पवार गटाचे जयंत पाटील जितेंद्र आव्हाड असोत कि शिवसेनेचे किंवा काँग्रेसचे मंत्री राज्यमंत्री आणि आमदार देखील मनातून मनापासून अतिशय अस्वस्थ आहेत चिडलेले आहेत अगदी चार दोन मंत्री किंवा राज्यमंत्री सोडले, इतर कोणालाही कधीही अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करायचे नव्हते पण उद्धव तुम्ही हे का हो भलते सलते करून ठेवले आहे, एकजात साऱ्यांनाच अजित पवार यांचेच आदेश पाळावे लागताहेत अशाने उद्धवजी तुमची पकड नाही किंवा पकड अगदी सुरुवातीलाच ढिली पडलेली आहे हे जो तो म्हणतो आहे जे चुकीचे घडते आहे...

                                                                www.vikrantjoshi.com
लोकांना मतदारांना हे असले राज्य म्हणजे काका पुतण्याचे राज पुढे काही वर्षे नको होते पण नेमके जे नको होते तेच जर उद्धवजी तुमच्या दुर्लक्षामुळे घडणारे असेल तर त्याचे दूरगामी परिणाम पुन्हा एकवार शरद पवार अजित पवार यांना फायद्याचे ठरणारे आणि तुमचे तुमच्या पक्षाचे फार मोठे म्हणजे भरून न येणारे नुकसान होणार आहे हे माझे वाक्य आजच अधोरेखित करून ठेवा. यासाठी का लोकांनी आमदारांनी नेत्यांनी साऱ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला कि हे राज्य काका पुतण्याच्या हाती सोपवायचे आणि पुन्हा एकवार राज्याचे मोठे वाटोळे करून ठेवायचे. फडणवीस मुख्यमंत्री असतांनाही तुम्ही नको त्या भ्रष्ट हलकट मंडळींना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री केले आणि आपले आपल्या पक्षाचे मोठे नुकसान करवून घेतले, यावेळी तर तुम्ही स्वतः मुख्यमंत्री झाले पण तुमच्या मंत्रिमंडळावरून एकदा तुम्ही डोळ्यात तेल घालून जर नजर टाकली तर तुमच्या हेच लक्षात येईल तुमचा पुन्हा एकवार मोठी संधी चालून आल्यानंतर देखील पराभव झाला आहे. तुमच्या एकंदर १३ मंत्र्यांपैकी तुमच्या हिताचे आणि राज्याला फायद्याचे मंत्री कोण व किती, तुमच्या हे नक्की लक्षात येईल कि तुमचा तो पहिला पराभव झाला आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, चित्र असे दिसायला हवे कि काका पुतण्या तुमचे ऐकतो आहे आणि आदेश तुम्ही देताहेत, सध्यातरी चित्र नेमके उलटे आहे जे तुमच्या व राज्याच्या हिताच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही...
क्रमश: हेमंत जोशी