Wednesday, 29 January 2020

राधेशाम मोपलवार : पत्रकार हेमंत जोशी


राधेशाम मोपलवार : पत्रकार हेमंत जोशी 
मुंबई पुणे जलदगती महामार्ग सुरु झाल्या झाल्या पुढल्या केवळ काही वर्षात पुण्याने मुंबईची बरोबरी केली, गाठली किंबहुना  बांधकामासारख्या काही  क्षेत्रात तर पुण्याने मुंबईला देखील मागे टाकले थोडक्यात पुणे हे मुंबईच्या बरोबरीने जगाच्या नकाशावर चर्चेत आले. त्याकाळी मुंबई पुणे जलदगती महामार्गाच्या साथी संगतीने जर शासनकर्त्यांनी त्याचवेळी मुंबई गोवा जलदगती महामार्ग जर उभा केला असता तर शंभर टक्के कोकणाने राज्यातल्या इतर भागांना पुण्यासारखे मागे टाकले असते पण ते दुर्दैवाने घडले नाही, तेव्हा युती सरकार सत्तेत आले बरे झाले असे म्हणायचे कारण विदर्भातले असूनही फडणवीसांनी आधी मुंबई गोवा जलदगती महामार्गाचे काम सुरु केले नंतर त्यांनी मुंबई नागपूर समृद्धी जलदगती महामार्ग हा भव्यदिव्य प्रकल्प हाती घेतला. एकदा का या दोन्ही जलदगती महामार्गाचे काम पूर्ण झाले कि राज्याचे चित्र बदलायला त्यानंतर फारसा वेळ लागणार नाही. महाआघाडी शरद पवार यांनी सत्तेत आणल्याने एक भीती हे सरकार सत्तेत आल्यानंतर अशी वाटली होती कि पवारांच्या मनात विदर्भाविषयी आकस म्हटल्यापेक्षा फारसे प्रेम नसल्याने पवार समृद्धी महामार्गाचे काम तातडीने थांबवायला सांगतात कि काय, भय वाटले होते मात्र देवाची आणि पवारांनीही कृपा वरून उद्धवजींचे आशीर्वाद सुदैवाने ते तसे घडले नाही...

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आल्या आल्या जेव्हा समृद्धी महामार्गाचे नव्याने त्यांच्या वडिलांच्या नावे नामकरण करून करवून घेतले आमचा जीव तेव्हाच भांड्यात पडला कि चला, निदान समृद्धी चे काम थांबणार नाही, सुरु आहे त्याच वेगाने सुरु राहील. आणखी एक चांगला निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला त्यांनी समृद्धी साठी साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली, पैसे पदरात पाडून घेण्यासाठी त्यानंतर लगेच ठाकरे आणि प्रभावी मंत्री नेमके सार्वजनिक बांधकाम उपक्रम खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी जलदगती महामार्गाचा खडान्खडा माहिती असलेले, त्यातले म्हणाल तर तरबेज प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची बदली न करता एकनाथ शिंदे यांनीही कोणत्याही संकुचित विचारांना थारा न देता वरून उद्धव ठाकरे यांना समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यासाठी मोपलवार दीर्घकाळ तेथे असणे कसे आवश्यक पटवून देण्याची जी महत्वाची कामगिरी पार पाडली, मनातले सांगतो समृद्धी महामार्गाशी संबंधित राज्यातल्या अशा प्रत्येक व्यक्तीने शिंदे पवार आणि ठाकरे यांना मनापासून धन्यवाद दिले...

www.vikrantjoshi.com

उद्धव ठाकरे यांनी साडेतीन हजार कोटी रुपयांची मोठे मन ठेवून तरतूद केली खरी पण त्यानंतर खरी परीक्षा आहे ती राधेश्याम मोपलवार यांचीच, विविध बँकांच्या खिशातून साडेतीन हजार कोटी रुपये काढणे तेवढे सोपे काम नसते, नाही त्यासाठी आणि समृद्धी महामार्गाची जबाबदारी आल्यानंतर  मला नाही वाटत श्रीमान मोपलवार कधी रात्री दोनच्या आधी झोपले असावेत. समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण करणे सुरु ठेवणे म्हणजे कामांध झालेले गाढव अंगावर घेण्यासारखे, राधेश्याम मोपलवार आणि त्यांचे तेथले उजवे हात बुद्धिमान सचिव व मुख्य अभियंता अनिल गायकवाड या दोघांनीही पुरुष असतांनाही हे कामांध  गाढव अंगावर घेऊन एकप्रकारे स्वतःचा करण जोहर करून घेतला आहे. अर्थात पुन्हा एक मांजर आडवे आले आहेच, नेमके फेब्रुवारी अखेर मोपलवार प्रशासकीय सेवेतून निवृत्त होताहेत आणि त्यांना जर त्यानंतर पुन्हा सेवेत ठेऊन घेतले नाही तर मला माहित आहे त्यांच्या जागी येणाऱ्या कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला समृद्धीचे अतिशय कटकटीचे काम पुर्णत्वाकडे नेणे  शंभर टक्के अवघड ठरणार आहे. पण समृद्धी च्या कामातले माहितगार मंत्री एकनाथ शिंदे हि चूक नक्की होऊ देणार नाहीत ते आग्रहाने पवार व ठाकरेंना सांगून या जलदगती  महामार्गाची जबादारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे ठेवण्यात यशस्वी ठरतील....

जाता जाता : पुणे मुंबई टोल वसुली आधी वीरेंद्र म्हैसकर यांच्या आयआरबी कंपनीकडे गेली कित्येक वर्षे होती अलीकडे त्यांची मुदत संपल्यानंतर जी निवेदा काढण्यात आली त्यात तिघांनी भाग घेतला होता, पंतप्रधानांचे लाडके अदानी आणि शरद पवारांचे लाडके वीरेंद्र म्हैसकर तसेच त्यांचे धाकटे बंधू एमइपी चे जयंत म्हैसकर यांनी पैकी हे कंत्राट पुन्हा वीरेंद्र म्हैसकर यांनाच मिळणार आहे अशी माझी माहिती आहे आणि खात्री आहे कारण शरद पवारांसारख्या बुजुर्गांच्या सांगण्यावरून जयंत म्हैसकर
यांना कंत्राट मिळविणे सहज शक्य असतांनाही त्यांनी नाव मागे घेऊन मोठे मन कसे असते ज्येष्ठ बंधूंना दाखवून दिले आहे आणि अदानी थेट नरेंद्र मोदी यांच्या गोटातले त्यामुळे त्यांचे नाव आपसूकच मागे पडले आहे उरले केवळ वीरेंद्र म्हैसकर...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment