Tuesday, 14 July 2020

Why Maharashtra needs Devendra Fadnavis again?


Why Maharashtra needs Devendra Fadnavis again? 

People are quite judgemental when it comes to following political ideologies. But for me or, my father (Hemant Joshi), we would always report as to what is right. All said & done, tell me right now who is that one leader in Maharashtra in this crisis situation has the guts to come out of his home & think for the people of our state? Yes, there are Rajesh Tope & Anil Deshmukh in form of Ministers who are doing a splendid job, but then why take away credit from a certain Devendra Fadnavis? Boss, neither is he scared of Corona, nor the rains are damping his spirits. He is touring Maharashtra even today. We need such leaders, don't we who are at ground zero & taking facts. Why do I say so ? No, it does not have to do anything by me being a Brahmin or my grandparents being in RSS all their lives. I'm a journalist & for those who think this the other way-- check my /baba blogs (www.vikrantjoshi.com) how I have ripped the BJP-Sena govt when they were in power. 

We do have stalwarts in Sharad Pawar but friends, he is aging now & he has proved us far too many times what is he capable of. Let's move on from SP.  Those who had vision like Mahajan, Munde, Vilasrao are all gone... Gadkari is not interested in coming here. Rather PM Modi won't let him get any more "bigger"...I had my hopes on Ajit Pawar as he is an excellent administrator, superb leader but his own people are behind him to tame him down now. Narayan Rane, another one who has the guts to lead form the front even today, is yet again sidelined. So currently the one who is in the forefront, who has excellent control over bureaucrats, (these days bureaucrats control the MVA govt) apt knowledge to handle any situation and bring remote "roadmap of progress" somewhere in Maharashtra, no one comes even remotely close to Fadnavis ...

Although I say, he is apt, but even he ain't perfect. There were scams during his tenure too, there were 'stalwarts' like Khadse & others who were almost confined to their Taluka's but my only question is, then who else? Many might say, he does Naatak, but friends, naatak toh koi aur bhi kar ke dikhaye?

If you don't agree, Show me, one leader, today, in these times, in Maharashtra who thinks for Maharashtra even for a minute? We can have a friendly debate...

Till then, Hats off Devendra Fadnavis!!! 

 *Vikrant Hemant Joshi*

ठाकरी डंख छाटले पंख : पत्रकार हेमंत जोशी

ठाकरी डंख छाटले पंख : पत्रकार हेमंत जोशी
एक दोन तीन पाच दहा कितीही वर्षांपूर्वीचे माझे लिखाण आपण पुन्हा एकवार वाचून काढा त्यातले संदर्भ खोटे व चुकीचे निघाले असे दिसून येणार नाही कारण प्रत्येक शब्द पुराव्यांनिशी सुपार्या न घेता खराखुरा मला लिहायचा असतो, एखादे वाक्य चुकीचे माझ्याकडून लिहिल्या जाऊ शकते पण लिहिलेला अख्खा लेख चुकीचा खोटारडा सुपारीबाज असे ना कधी घडले ना कधी घडेल. बघा, याआधीच मी एकदा नव्हे तर चक्क दोनदा लिहून ठेवले आहे कि उद्धव ठाकरे यांना कोणीही अगदी देवेंद्र फडणवीस व शरद पवार अशा राज्याच्या टॉपमोस्ट नेत्यांनीही अंडरएस्टीमेट करू नये त्यांना अजिबात कमी लेखू नये कारण उद्धव यांना मी जेवढा अचूक ओळखतो मला नाही वाटत त्यांना त्यापद्धतीने कोणी विशेषतः बाहेरचे म्हणजे त्यांचे कुटुंब सदस्य सोडून कोणी एवढे आतबाहेर अचूक ओळखत असेल हे असे जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हाही त्यांच्या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्माण करण्यात आले होते किंवा त्यांच्या पक्षातले पण हेच सांगत सुटायचे कि फडणवीसांना काय कळते आपण नाचवू तसे ते नाचतील अगदी नागीन डान्स पण करून दाखवतील केवळ मी एकमेव असा होतो कि अगदी जाहीर तेही लेखी सांगून मोकळा होत असे कि फडणवीसांना अजिबात कमी लेखू नका त्यांनाही मी अगदी त्यांच्या लहान वयापासून ओळखतो पण सुरुवातीच्या वर्षभरात अनेकांनी अगदी त्यांच्या नागपुरातल्या सुद्धा काही अति शहाण्या पत्रकार मित्रांनी अंडर एस्टीमेट केले पुढे मात्र मी जे लिहीत होतो हुबेहूब तेच घडले फडणवीस 
थेट शरद पवार उद्धव ठाकरे गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन विलासराव देशमुख इत्यादी येथल्या आजवरच्या तद्दन टॉप मोस्ट जिवंत दिवंगत नेत्यांच्या रांगेत येऊन बसले आणि हे माझ्यानंतर जेव्हा फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या त्यावेळी लक्षात आले त्यांनी त्यानंतर आजतागायत फडणवीसांना एवढा मानसिक त्रास दिला जेवढा त्रास त्यांनी इतर सार्या विरोधकांना एकत्रित दिलेला नसेल तरीही पवारांच्या अगदी नाकावर टिचून फडणवीस ताठ मानेने जीवाची पर्वा चिंता काळजी न करता आजही लोकप्रियतेच्या बाबतीत सर्वांच्या म्हणजे शरद पवारांच्याही खूप पुढे आहेत कारण त्यांना जे काय करायचे असते ते सारे फक्त आणि फक्त जनतेसाठी लोकांच्या भल्यासाठीच करायचे असते. तुम्हाला म्हणून सांगतो जेव्हा केव्हा जीवाची पर्वा न करता या अतिशय कठीण दिवसात गावोगाव देवेन्द्रजी फिरतात असे कितीतरी कुटुंब सदस्य जे प्रसंगी विरोधी विचारांचे असून देखील फडणवीसांच्या  या सेवा व कार्यावर अक्षरश: अश्रूंना वाट मोकळी करून देताहेत....

www.vikrantjoshi.com

अजूनही वेळ गेलेली नाही तुम्हा सर्वांना अगदी जाहीर सांगतो उद्धव ठाकरे यांना देखील अनेक मूर्ख नेत्यांनो आणि भानगडी करणाऱ्या काही नालायक मंत्र्यांनो राज्यमंत्र्यांनो अधिकाऱ्यांनो त्यांना अंडरएस्टिमेट करू नका उद्धव यांना काय कळते, समजू नका त्यांना बावळट समजून आपले वर्तन त्यांच्यासमोर आणि त्यांच्या माघारी अतिहुशारीचे ठेऊ नका कारण जेव्हा केव्हा उद्धव यांची सटकते समोरचा कितीही ताकदवान असेल ते त्याला चारी मुंड्या चीत व चिट करून मोकळे होतात आपण केव्हा व कसे उल्लू बनलो मग संपलेल्या भल्याभल्या नेत्यांचाही लक्षात येत नाही. ज्यांना ज्यांना उद्धव यांनी आपल्यापासून दूर केले ते आज कुठे आहेत बारकाईने त्यावर अभ्यास करा इतिहास आठवा तुमच्याही अंगाचा थरकाप उडेल. माणूस आहे तसा किरकोळ नाजूक प्रकृतीचा वडील आणि आजोबांसारखा पण पराक्रमाच्या बाबतीत त्यांच्याच हुबेहूब पावलावर पाऊल ठेऊन,या महिन्याभरात उद्धव यांनी काय हो केले तुमच्या ते लक्षात तरी आले का? अहो, त्यांनी त्यांच्या मूळ घातक डेंजरस स्वभावाला वाट मोकळी करून दिली आणि क्षणार्धात त्यांनी शरद पवार अजित पवार अनिल देशमुख इत्यादी अनेकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आर्थिक व्यवहारातून केलेल्या पोलीस उपायुक्तांच्या बदल्या त्यांनी एका फटक्यात आधी रद्द केल्या नंतर मनासारख्या त्याच बदल्या केवळ तीन दिवसात पुन्हा केल्या त्यानंतर हे असे अजिबात चालणार नाही हा थेट निरोप अजित पवारांना देऊन राष्ट्रवादीत गेलेल्या पारनेरच्या  त्या पाचही नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत परत आणले तसेच अत्यंत महत्वाचे म्हणजे अलीकडे शिवसेनेचे मंत्री राज्यमंत्री व आमदार उद्धव यांना भेटून म्हणाले कि काँग्रेस व राष्ट्रवादीचे मंत्री राज्यमंत्री आमच्या कामांकडे साफ दुर्लक्ष करून मोकळे होतात. आज त्या मंत्र्यांना जरा विचारा कि त्यांची हे असे करण्याची यापुढे हिम्मत असेल का आहे का, मी सांगतो ते म्हणतील हेच सांगतील, आता आमच्यात ती हिम्मत उरलेली नाही. अर्थात हा गंभीर विषय येथेच संपत नाही असे कितीतरी गुपिते नजीकच्या काळात मी तुम्हाला सांगून मोकळा होईल. तूर्त एवढेच लक्षात घ्यावे ज्यांना उद्धव किरकोळ बोका वाटले प्रत्यक्षात ते वाघोबा आहेत म्हणजे ते सिमला मिरची नव्हेत तर ढुंगणाला आग आग आणणारी घाटावरची तिखट मिरची आहेत. आणि तसेही राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे कॉम्बिनेशन शंभर टक्के टिकणारे नाही आता प्रश्न एवढाच शिल्लक आहे कि भाजपाची युती नेमकी राष्ट्रवादीशी होणार आहे कि सेनेशी, त्यावर देखील नेमके नक्की लिहून मी मोकळा होईल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

अस्वस्थ अपयशी शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी


अस्वस्थ अपयशी शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी  
शरद पवारांना राजकारणातल्या चार गोष्टी समजावून सांगणे म्हणजे कसे धावायचे व जिंकायचे हे पी.टी.उषाला विशाखा सुभेदारने समजावून सांगण्यासारखे किंवा पवारांना राजकारणातले ज्ञान पाजणे म्हणजे मशिदीत जाऊन एखाद्या मौलवीला आम्हाला येथे रामरक्षा म्हणू द्याल का असे विचारण्याससारखे किंवा राजकारण ते तसे नव्हे हे असे खेळायला हवे हे असे पवारांच्या कानात जाऊन सांगणे म्हणजे पत्रकार  मित्र विवेक भावसार याने एखाद्या उंटिणीच्या ओठांचा किस घेण्यासारखे इम्पॉसिबल टास्क तरीही येथे एक आगाऊपणा करावासा वाटतो आहे म्हणजे सिंहाच्या डोळ्यात मला प्रेमाने का होईना फुंकर मारून बघायची आहे किंवा वाघिणीला डोळा मारून आती क्या खंडाला विचारायचेच आहे. अजितदादा मंत्री नव्हते केवळ बारामतीच्या स्थानिक राजकारणात होते तोपर्यंत त्यानंतर पहिल्यांदा मंत्री म्हणून शपथ घेईपर्यंत हाच माझा राजकीय वारसदार असे शरद पवार खाजगीत सांगायचे आणि जाहीर ते तसेच भासवायचे तेव्हा विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या कन्या सुप्रिया हिस राजकारणात आणण्याचे उतरवण्याचे त्यांच्या अजिबात मनातही नव्हते पण ज्या पुतण्याला डोक्यावर घेतले ते अजितदादा आपल्यानेतृत्वालाच भविष्यात आव्हान देऊन मोकळे होतील, सु सु करून मोकळे होतील हे जेव्हा शरदरावांच्या ध्यानात आले त्यांनी मग एक दिवस हळूच सुप्रिया सुळे यांना येथे राज्यात आणून तिचे राजकारणातले महत्व आणि अस्तित्व त्यांनी वाढवायला घडवायला सुरुवात केली....

वास्तविक शरद पवारांना त्यांच्या कन्येला जय ललिता मायावती ममता बॅनर्जी इत्यादी महत्वाकांक्षी आणि यशस्वी महिला नेत्यांच्या रांगेत आणून बसवायचे होते पण सुप्रिया यांच्याबाबतीत हिंदी सिनेमासारखे झाले घडले तेही दस्तुरखुद्द शरद पवार पाठीशी असतांना म्हणजे काही तरुणी माधुरी दीक्षितसारख्या शेवटपर्यंत सिनेमात टॉपच्या अभिनेत्री किंवा लीड रोल मधेच टिकून राहतात काहींचे आगमन दणक्यात होते पण पुढे लवकरच त्यांचा शोमा आनंद, अंजली वळसंगकर, अरुणा इराणी होतो त्या कुठेतरी कमी पडतात आणि दुय्यम भूमिका स्वीकारायला लागतात. सुप्रिया सुळे यांचे पवारांना त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर हे असे होऊ द्यायचे नसेल तर  सध्या जे राज्यात कानाकोपऱ्यात मराठा विरुद्ध मराठेतर हि आग प्रत्येकाच्या मनात धुमसते आहे हि पडलेली फूट तातडीने स्वतः लक्ष घालून तसे वारंवार जनतेला आव्हान करून आणि कृतीतून देखील तसे दाखवून पडलेली दरी जोडण्याची फार मोठी गरज आहे अन्यथा पवारांच्या पाठी सुप्रिया यांना राज्यात मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल सुप्रिया यांचा विनायक मेटे शशिकांत पवार पुरुषोत्तम खेडेकर अजिबात होता कामा नये. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेऊ नका पण सुप्रिया यांची  राजकारणातली सोलो अभिनेत्री न होणे हि शरद पवारांची मोठी खंत आणि फार मोठी काळजी आहे. सभा जिंकणे राज्यातल्या तरुण महिलांना एकत्र आणून राष्ट्रवादीत व्यस्त ठेवणे किंवा बचत गटांच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना मोठी आर्थिक ताकद देणे इत्यादी सारे तसे सुप्रिया यांना झक्कास जमलेले आहे पण मराठा व मराठेतर हि दरी निर्माण करण्यात जे पवारांकडे बोट दाखवले जाते त्यात राजकीय नुकसान सुप्रिया यांचेच होणार आहे...

www.vikrantjoshi.com

मराठा आणि ब्राम्हण किंवा मराठा आणि सवर्ण मराठेतर अशी दरी मराठा आरक्षणाच्या आधी या राज्यात कधीही नव्हती सर्वत्र अतिशय सलोख्याचे वातावरण असायचे विशेष म्हणजे मराठा समाज हाच आपला कप्तान आहे पद्धतीने सारेच मराठ्यांकडे बघायचे आणि त्यांना मोठा मान द्यायचे, गावातला प्रमुख पाटील हाच गावकऱ्यांना मोठा आधार वाटायचा त्याच्या पाठीशी गावकरी ठाम उभे राहायचे पण मूठभर नेत्यांनी हे वातावरण विनाकारण दूषित करून वादाची अस्वस्थतेची मोठी दरी आता या राज्यात निर्माण केलेली आहे व हे कलुषित दूषित वातावरण निर्मल स्वच्छ करण्याची मोठी जबाबदारी फक्त आणि फक्त शरद पवारच पार पाडू शकतात अन्यथा त्यांच्या पाठी त्यांच्या निवृत्तीनंतर राज्यातली जनता जातीय द्वेषाच्या राजकारणात नक्की होरपळून निघेल आणि त्याची नाराजी सुप्रिया यांनाच भोवण्याची दाट शक्यता आहे. पार्थ अजित पवारांना हवा तसा राजकीय पाया अद्याप रोवता आलेला नाही हि अजितदादांची मोठी काळजी व खंत आहे पण सुप्रिया यांच्या पेक्षा आजच म्हणजे शरदरावांच्या देखतच रोहित व अजित पवार सुप्रियाच्या रांगेत येऊन बसलेले आहेत, काही कालावधीनंतर सुप्रियाला सोडून स्वतःच्या हिमतीवर ते राजकारणात यशस्वी ठरतील आणि हे शरदरावांना नेमके माहित असूनही त्यांनी सत्तेच्या जवळ जाण्यासाठीचा क्षणिक विचार करून मराठेतर समाजाची मोठी नाराजी नक्की ओढवून घेतलेली आहे म्हणजे शरद पवार हे केवळ पश्चिम महाराष्ट्रातील लालची नेत्यांचे आणि केवळ विशिष्ट समाजाचे नेते हाच विचार कोकण मराठवाडा खान्देश व विदर्भातील जनतेच्या डोक्यात असतो पण आज पवार सत्तेत आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याची कोणाची हिम्मत नाही पण या अशा वागण्यातून पवार यांच्या नंतर त्यांच्या मनातली एकमेव वारसदार बाजूला फेकल्या जाण्याची दाट शक्यता आहे एका महान मोठ्या लोकमान्य लोकप्रिय नेत्याच्या बाबतीत हे घडणे मोठे दुर्दैव ठरेल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी  


नालायक तुम्ही आम्ही : पत्रकार हेमंत जोशी

नालायक तुम्ही आम्ही : पत्रकार हेमंत जोशी 
मी जातीयवादी नाही पण हिंदुत्ववादी शंभर टक्के आहे आणि मी काबुल करायलाच हवे कि मला ब्राम्हण कमी ब्राम्हणेतर हिंदूंनी घडतांना वाढतांना कमावताना भरभरून सहकार्य केले. मित्रांचा माझ्यावसरील हा आरोप देखील तेवढाच खरा आहे कि मी आडनाव बघून अमुक एखाद्याला सहकार्य करतो किंवा मैत्रीचा हात पुढे करतो जेथे मुल्ला मौलवींकडून मी वस्तू विकत घेत नाही तेथे मैत्रीचा हात पुढे करणे मला कदापि शक्य नाही पण पाक विचारांचे नसलेले मुस्लिम मात्र माझे मित्र होतात मित्र असतात, इतर हिंदूंनी देखील हि अशी कणखर भूमिका घेऊनच जगायला पुढे जायला हवे. तुम्हाला धर्मांमधला फरक बघायचा असेल तर एखाद्या मॉल मधल्या टॉयलेट मध्ये सार्वजनिक मुतारी मध्ये एक तास घालवा बारीक निरीक्षण करा, तुमच्या लक्षात येईल कीं कोणताही हिंदू तरुण फारतर एखादा पेपर नॅपकिन हात तोंड पुसण्यासाठी घेईल राष्ट्रप्रेमी मुस्लिम देखील हेच करेल पण ज्या मुस्लिमांना या देशाबद्दल प्रेम नाही असे मुस्लिम गरज नसतांना पटापट खूप सारे पेपर नॅपकिन्स चुराडा करतील. उद्देश हाच कि नुकसान कुठल्यातरी हिंदूंचे होणार आहे ते करून मोकळे व्हायचे, कधी या वृत्तीमध्ये बदल घडणार आहेत परमेश्वर जाणे. तुमच्या सभोवतालची माणसे नेमकी कोणत्या वृत्तीची आहेत ओळखणे हे असे सोपे आहे असते...

जसे कोणतीही स्त्री जर समोर आल्यानंतर पुरुष तिच्या छातीकडे आधी बघून नंतर चेहरा बघत असेल ताडकन ओळखते महाशय स्त्रीलंपट आहेत. स्त्रीच्या छातीकडे विकृत कटाक्ष टाकणे खरे तर हा तिचा मोठा अपमान असतो अशा पुरुषांनी हे लक्षात ठेवले पाहिजे कि जे ते करताहेत नेमके तसे त्यांच्या घरातील तरुण स्त्रियांच्या बाबतीतही घडू शकते. बहुतेक भारतीय घरी चहात एक चमचा साखर घालत असतील तेच भारतीय बाहेर मात्र नेहमीपेक्षा अधिक साखर घालतात किंवा हॉटेलात जेवायला गेल्यानंतर विशेषतः सहलीला गेल्यानंतर हातात जे जे पडेल खिशात घालतात मग त्या दात कोरण्याच्या काड्या असतील किंवा रूम्स मधल्या विविध वस्तू अगदी टॉवेल्स पर्यंत त्यांची हातचलाखी सुरु असते कारण आम्हा भारतीयांना भ्रष्ट वृत्तीच्या रोगाने जखडलेले आहे. घरी जेवढे जेवतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी आपण जेव्हा कोणीतरी बिल भरणारा असतो किंवा अमुक कुणाच्या घरी जेवायला जातो तेव्हा गरजेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी हासडून मोकळे होतो याला लुटारू आणि लालची वृत्ती म्हणतात जी भारतीयांच्या वृत्तीत ठासून भरलेली असते. रांग मोडून नजर चुकवून पटकन पुढे जाणे न शोभणारे हीच वृत्ती नेत्यांची असते म्हणजे अगदी जवळच्या माणसाला पण प्रसंगी बाजूला ढकलून पटकन पुढे निघून जाणे यालाच सत्तेचा गैरवापर म्हणतात, असे फारच कमी भारतीय आहेत ज्यांना सत्तेचा गैरवापर टाळणे जमते....

मी ज्या इमारतीमध्ये राहतो तेथे सारेच श्रीमंत आणि सुशिक्षित आहेत पण अगदी आत्ता आता पर्यंत असे घडायचे कि कोणाचे लक्ष नाही बघून अनेक रहिवासी कबुत्तरांना कुठे धान्य टाक  कुठे फरसाण टाक किंवा खिडकीतून सिगारेटचे थोटके टाक थोडक्यात वाट्टेल ते टाकायचे, एक दिवस जेव्हा कोणीतरी वापरलेले कंडोम टाकले मग मात्र माझी सटकली आणि संशयितांची मग मी जेव्हा आई बहीण घेतली तेव्हा जरा हे प्रमाण बऱ्यापैकी थांबले. हीच सवय तुमचीही असेल तर तुम्ही शिक्षण घेऊनही अतिशय असंस्कृत आणि नालायक आहात हाच यातून अर्थ निघतो. अगदी अलीकडे मी जे तुम्हाला सांगितले होते ते तर विकृतीचे नीच उदाहरण आहे कि तुमची बायको जर तुमच्यासारखी व्यसनी नसेल म्हणजे सिगारेट दारू गुटका तंबाखू विडी ड्रग्स इत्यादी व्यसनांच्या आहारी गेलेली नसेल पण तुम्ही मात्र तिच्याशी संभोग करतांना आपले तद्दन घाणेरडे ओठ तोंड तिच्या ओठात तोंडात देत असाल तर तुम्ही तुमच्या बायकोकडे केवळ वापरण्याची वस्तू म्हणून बघता तुमचे तिच्यावर काडीचेही प्रेम नाही असाच त्यातून खरा अर्थ निघतो. नवरा बायको दोघेही समसमान व्यसनी असतील त्यातून यापद्धतीने एकमेकांना जवळ घेत असतील तर हरकत नाही पण व्यसनी नवरा बायको हे वाक्य म्हणजे त्या त्या कुटुंबाचा सर्वनाश नजदिक येऊन ठेपलेला आहे असाच त्यातून एकमेव अर्थ निघतो. व्यसनांचे समर्थन करणारे स्त्री पुरुष म्हणजे नालायक आणि निर्लज्ज वृत्तीचे हलकट उदाहरण हाच अर्थ त्यातून काढावा आणि वाद न घालता अशा जोडप्यापासून दूर निघून जावे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Tuesday, 7 July 2020

राज ठाकरेंचा हनुमंत : पत्रकार हेमंत जोशी


राज ठाकरेंचा हनुमंत : पत्रकार हेमंत जोशी 
सोसाट्याचा वारा त्यात पाऊस आणि प्रचंड वादळ अशा दिवसात रस्त्यावर जागोजाग जसे महाकाय वृक्ष कोलमडून पडलेले असतात तसे या कोरोना महामारीत विशेषतः राज्यातल्या महानगरातून आणि मुंबई टेरेटरी मध्ये घडते आहे दरदिवशी कितीतरी कोरोना बाधित कित्येक कुटुंबातले महावृक्ष किंवा कुटुंब सदस्य धडाधड जमिनीवर कोसळताहेत देवाघरी निघून जाताहेत, अमीर खानचा लगान सिनेमा आठवा त्या सिनेमात पाऊस न आल्याने माणसे हतबल होतात आणि देवाचा धावा करतात धावून येण्यासाठी, आताही तुम्हा आम्हा सर्वांच्या हातात तेवढेच उरले आहे परमेश्वरी चिंतनात वेळ घालविणे आणि या जगात असेलच कुठेतरी तो देव तर धावा करून करून त्याला एवढेच आता विनवायचे आहे कि देवा आतातरी आम्हाला पाव आणि या महासंकटातून बाहेर काढ. राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांचे आपापसात वागणे सावत्र भावांसारखे आणि आपल्या या मुख्यमंत्र्यांकडे अनुभवाची वानवा सारे कसे अतिशय कठीण होऊन बसले आहे, भोपाळ गॅस दुर्घटनेसारखे काही कळायच्या आत माणसे कोरोना महामारीत धाड्कन जमिनीवर कोसळताहेत अनेक कुटुंब उध्वस्त होताहेत, आता असेलच परमेश्वर तर त्या देवाने आम्हाला या जीवघेण्या ठरलेल्या संकटातून बाहेर काढावे....

साऱ्याच नेत्यांचे उजवे डावे हात असतात पण त्यातले हनुमंत कमी नारद अधिक असतात आणि हे उजवे डावे नारदच त्या त्या नेत्यांचे पुढे वाटोळे करून ठेवतात. फार कमी नेते चतुर असतात जे या अशा उजव्या डाव्या नारदांचे उजव्या कानाने ऐकतात आणि डाव्या कानाने जे आवश्यक नाही ते सोडून देतात. शरद पवार उद्धव ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस असे अलीकडले फार कमी नेते ज्यांचा सभोवताली वेटोळे करून बसलेल्या नारदांवर फारसा विश्वास नसतो असे फारच कमी नेते आहेत कि जे ऐकतात नारदांचे करतात आपल्या मनाचे. नेत्यांच्या सभोवताली नारद अजिबात नसावेत हनुमंत असावेत जे नेत्याने सांगताच थेट लंकेला सुद्धा आग लावून मोकळे होतात. विशेष म्हणजे नारद नेत्यांच्या संकटात गायब असतात पण सत्ता समोर दिसताच पुन्हा सर्वांच्या आधी त्या त्या नेत्यांना बिलगून झोंबून पाय पकडून मोकळे होतात हनुमंत मात्र तसे नसतात ते त्या त्या नेत्यांच्या अडचणीच्या संकटाच्या काळातही पाठीशी भिंत करून उभे असतात. मनसे नेते संदीप देशपांडे हे राज ठाकरे यांचे नारद नव्हेत हनुमंत आहेत, जेथे कमी तेथे आम्हीच त्यांनी हे राज ठाकरे यांना सांगूनच ठेवले आहे त्यामुळे मनसे संकट आंदोलन असे समीकरण आले रे आले कि तेथे संदीप देशपांडे हजर नाहीत उपस्थित नाहीत सर्वात पुढे नाहीत असे आजवरच्या त्यांच्या व राज यांच्या एकत्रित राजकीय वाटचालीत कधीही घडलेले नाही... 

कुटुंबाची अगदी लहान वयात अंगावर पडलेली जबाबदारी त्यात कुटुंबाचे बिघडलेले आर्थिक गणित संदीप कुटुंबाचे त्यांच्या अगदी तरुण वयात एकमेव आधारस्तंभ वरून हा असा सुरुवातीपासून चळवळ्या दुसऱ्यांना थेट अंगावर घेण्याचा स्वभाव प्रत्यक्षात संदीप यांना बघितले तर तुम्हाला तसे अजिबात वाटणारही नाही कि किरकोळ शरीरयष्टीचा संदीप वेळ आली कि राज यांचा हनुमंत होऊन थेट रावणाला आव्हान देऊन मोकळा होतो भल्याभल्या विरोधकांच्या नाकात दम आणतो. मित्रहो, दादरमध्ये राहून मनसेचा प्रसंगी एकट्याने किंवा चिल्यापिल्यांना घेऊन किल्ला लढविणे कसे व किती कठीण काम आहे हे त्या दादर परिसरात राहिल्याशिवाय कळत नाही पण एकेक दिग्गज जेव्हा राज ठाकरेंना सोडून जात होते तेव्हापासून तर आजतागायत सतत संदीप कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता राज यांनी केलेला हुकूम एक हनुमंत या नात्याने शिरसावंद्य मानून लढाई लढा आंदोलन मग ते कितीही अडचणीचे अशक्य असले तरी मोहिमेवर निघतात सोपविलेली जबाबदारी पार पाडून मोकळे होतात अगदी मनसेचा प्रसंगी प्रवक्ता म्हणूनही ठिकठिकाणी बुद्धिमान बोलक्या विरोधकांच्या नाकात दम आणतात आरे ला कारे ने तेथल्या तेथे जीवाची पर्वा न करता संदीप देशपांडे यांनी उत्तर दिले नाही असे कधी घडलेच नाही त्यामुळे तुरुंगात जाणे असो अथवा हाती दगड घेऊन रस्त्यावर थेट उतरणे असो संदीप कायम आघाडीवर असतात कधी कधी तर असे वाटते संदीप आणि राज हे दोघेच अख्य्या विरोधकांना पुरून उरतात. आजही आणि आधीही दूरदूरपर्यंत मनसे सत्तेच्या जवळ नाही सतत फक्त आणि फक्त संघर्ष करते आहे आणि या खडतर कालखंडात देखील राज व मनसेच्या पाठीशी जीवाची काळजी न घेता कायम लढा देणार्या संदीप देशपांडे नावाच्या या जिगरबाज नेत्याला मनापासून सलाम...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Saturday, 4 July 2020

लायक नालायक आणि मीडिया : पत्रकार हेमंत जोशी


लायक नालायक आणि मीडिया : पत्रकार हेमंत जोशी 
स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून पद्धतीने मला वागणे आवडत नाही आपण आपल्या गुण दोषांसहित सार्वजनिक जीवनाला सामोरे जायला हवे पण असे आपल्याकडे  खचित क्वचित घडते. सध्याच्या या कोरोना महामारीत मीडिया विशेषतः वृत्तपत्रात काम करणारे फार मोठ्या संकटाला आणि समस्येला तोंड देताहेत, याआधीही मी त्यावर लिहिले आहे तोच विषय येथे कंटिन्यू करतो आहे. काही अकार्यक्षम वार्ताहरांना वाहिन्या व वृत्तपत्रात विविध पदांवर काम करणाऱ्या कामचुकार आळशी अडाणी मंडळींच्या हाती मीडिया मालकांनी नारळ दिला असता तर ते फारसे मनाला लागले नसते पण आपल्या या महाराष्ट्रात वृत्तपत्रे विविध मीडिया मध्ये काम करणाऱ्या काही हजार कर्मचाऱ्यांना तशी अजिबात त्या मालकांना आर्थिक चणचण नसतांना एकतर तडकाफडकी काढून टाकले आहे आणि उरलेल्यांचे वेतन या मालकांनी निम्म्यावर आणून ठेवले आहे त्यातून वृत्तपत्रात मीडियामध्ये काम करणाऱ्यांना फार मोठे नैराश्य आले आहे या सर्वांच्या घरात अतिशय चिंताजनक वातावरण आहे त्यांचे कुटुंब व ते प्रचंड तणावाखाली आहेत ज्यामुळे अनेकांच्या घरात काहीही वाईट घडू शकते अनेकांना नैराश्येचे झटके येताहेत त्यांना त्यातून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो आहे विशेष म्हणजे मालकधार्जिणे सरकार या मालकांना घाबरून मीडिया क्षेत्रातून अचानक काढून टाकलेल्या किंवा ज्यांच्या वेतनात कपात केली आहे त्यांची बाजू घ्यायला बाजू समजावून घ्यायला तयार नाही थोडक्यात लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला सरकारने आणि मालकांनी आज वाऱ्यावर सोडले आहे जे अतिशय चिंताजनक आहे... 

आता मी माझी माझ्या कुटुंबाविषयी वस्तुस्थिती सांगतो. अचानक तडकाफडकी एकदम मार्च महिन्याच्या मध्यावर कोरोनाचे संकट येथे उफाळून वर आले आणि ज्या व्यवसायावर माझे माझ्या कुटुंबाचे मोठे आर्थिक स्रोत उभे आहे त्या व्यवसायाला टाळे लावावे लागले उत्पन्न झिरो झाले मी व माझी दोन्ही कमावती मुले या उद्भवलेल्या संकटात दिग्मूढ भयभीत अस्वस्थ अशांत निराश झालो त्याचे परिणाम लगेच घरात दिसायला लागले, एकत्र कुटुंब त्यात सारे चोवीस तास एकत्र साऱ्यांची चिडचिड अस्वस्थता वाढली आणि घरात मोठे वाद निर्माण होऊन माझे हे जोपासलेले स्वप्न दुभंगते कि काय असे मला सुरुवातीचे महिनाभर झाले सुदैवाने सतत अनेक संकटांची आपत्तीची मला सवय असल्याने माझ्या डोक्यावर बर्फ असतो आणि जिभेवर साखर असते. मी, विक्रांत व विनीत दोघांनाही विश्वासात घेऊन एकच सांगितले कि मी आणि विक्रांतने आपल्या तलवार रुपी कलमा घरात काढून हे घर उध्वस्त करायचे आहे कि समाजातल्या वाईट प्रवृत्तीवर आम्ही तुटून पडायचे आहे, घराचं वाटोळे करायचे असेल तर मी एक लेख लिहून मोकळा होतो कि माझे कौटुंबिक स्वास्थ्य ठीक नसल्याने मी माझी लेखणी आजपासून खाली ठेवतो आहे, अशी आर्थिक संकटे व्यावसायिकांना येत जात राहतील अशावेळी कौटुंबिक स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य तेवढे जपणे अतिशय महत्वाचे असते आपण सारेच एकमेकांच्या हातात हात घेऊन ठाम उभे राहू सारे काही चांगले होईल त्यानंतर मात्र माझ्या उच्चशिक्षित कुटुंब सदस्यांनी विशेषतः विक्रांतने हे घर अतिशय छान सांभाळून घेतले आहे....

आमचे फार फार मोठे प्रचंड असे या कोरोना महामारीत आर्थिक व्यावसायिक नुकसान नक्की झालेले आहे.नेमके हेच मला आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यातल्या काही घरी बसलेल्या काही कमी वेतन मिळणाऱ्या भावा बहिणींना सांगायचे आहे कि महासंकट आले आहे हे नक्की आहे पण हीच ती वेळ कि डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून डोके भनकू न देता तुम्हाला मार्ग काढायचे आहेत मी तुम्हाला सांगतो कि तुमच्यातले शेकडा 75% वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर काम करणारे लिखाणात आणि बोलण्यावर प्रभुत्व राखून आहेत यापुढे नोकरीच्या भरवशावर अजिबात न राहता स्वतःचे साप्ताहिक किंवा यु ट्यूब वाहिनी सुरु करा त्यासाठी ओळखीच्या सधन मंडळींकडून आर्थिक सहकार्य घ्या आणि नोकरीत जे कमावले मिळविले नसेल त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळवून मोकळे व्हा आणि या दोन्ही क्षेत्रात उतरतांना जर तुम्हाला काहीही कोणताही सल्ला लागला त्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध आहे, एक दिवस तुमचेही माझ्यासारखे नरिमन पॉईंटला स्वतःच्या मालकीचे कार्यालय असायलाच हवे. इच्छा ठेवा मार्ग नक्की सापडेल. माझ्या या उभ्या अनुभवी आयुष्यात मीडिया क्षेत्रात मी कितीतरी तरुण मित्र आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या मोठे होतांना बघितले आहेत तेच आता तुम्हीही करायलाच हवे कोणत्या शेटजींची या क्षेत्रात मक्तेदारी हे चित्र आता तुम्हालाच पुसायचे आहे. मृत्यूला संकटाला अजिबात घाबरू नका बदनामीला वचकू नका हळूहळू पुढे पुढे जात राहा पण कुटुंब उध्वस्त होईल असे कृपया काहीही करू नका जेथे म्हणून शक्य आहे मी तुमच्या पाठीशी नक्की उभा आहे...
क्रमश: हेमंत जोशी महाप्रतापी लोकप्रतिनिधी : पत्रकार हेमंत जोशी

महाप्रतापी लोकप्रतिनिधी : पत्रकार हेमंत जोशी 
एखाद्याच्या हातून चांगले काम घडले तर विरोधक देखील कौतूक करतात. अलीकडे ठाणे मुलुंड मधून म्हणजे कुठूनतरी मला एका पत्रकार मित्राचा फोन आला होता. त्याने माझ्याचबाबतीत घडलेला एक किस्सा सांगितलं. म्हणाला, एकदा आम्ही काही पत्रकार मित्र आणि तुमचे एक जवळचे नातेवाईक गप्पा मारत असतांना तुमचा विषय निघाल्यावर त्या नातेवाईकाने तुमच्याविषयी वाट्टेल ते आणि तसे वाईट वाईट आम्हाला सांगितले. नंतर तो निघून गेला नेमके तुम्ही आम्हाला दिसलात मग आम्ही अगदी ठरवून तुम्हाला बसवून घेतले आणि मुद्दाम त्या नातेवाईकाचा विषय काढताच पुढला अर्धा तास तुम्ही त्याचे कौतुक करून मोकळे झालात असे का? मी म्हणालो, त्यात विशेष ते काय, मी वाईट माणूस आहे म्हणून त्याने तसे सांगितले. माझे एखाद्याशी मनभेद मतभेद असू शकतात याचा अर्थ त्याचे गुण न सांगता मी एखाद्याविषयी विनाकारण वाईट बरळणे योग्य नाही. संघर्षातून मोठ्या कष्टातून एखादा नातेवाईक यशाचे शिखर गाठतो आणि मी वाईट हेतूने एखाद्याविषयी सांगायचे हे असे  वागणे बोलणे कधीही योग्य नसते. अलीकडे मी ठाणे ओवळा माजिवडा विधान सभा मतदारसंघातले कायमस्वरूपी निवडून येणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांच्याविषयी चार चांगले वाक्यें लिहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या लिखाणावर मला एका मोठ्या भाजपा नेत्याचा फोन आला. ते म्हणाले, सरनाईकयांनी या कोरोना महामारीत त्यांच्या मतदसरसंघात जे काम केले आहे, एखाद्या आमदाराने जीवघेण्या संकटात मतदारांच्या पाठीशी कसे उभे राहायचे असते त्याचे प्रतापजी हे या राज्यातले सर्वोत्तम उत्तम असे उदाहरण आहे, माझा त्यांना सलाम...

www.vikrantjoshi.com

एखाद्या मंत्र्याची पहिली बायको थेट कशी सांताक्रूझला आणि दुसरी पुण्यात राहायला असते ते तसे हुबेहूब प्रताप सरनाईक यांच्या विधानसभा परिघाचे मतदारसंघाचे आहे म्हणजे त्यांच्या मतदारसंघातील एक भाग ठाण्यातील ओवळा माजिवडा आहे तर दुसरे टोक थेट मीरा भायंदर आहे थोडक्यात विस्कळीत असा हा मतदारसंघ असूनही कोरोना महामारीत केंद्राने आणि राज्याने जनतेसाठी ज्या योजना केवळ जाहीर केल्या किंवा बिचकत बिचकत कशातरी एकदाच्या सुरु केल्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या संपूर्ण योजना तेही स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आमदार प्रताप सरनाईक यांनी सरकारी मदतीची अजिबात वाट न बघता त्यांच्या मतदारांसाठी राबविल्या अमलात आणल्या. म्हणजे तुम्ही राज्य किंवा केंद्र सरकारची मला कोणतीही योजना सांगा ती ती प्रत्येक योजना कोणत्याही शासकीय आर्थिक मदतीची वाट न पाहता सरनाईक राबवून मोकळे झाले. सरनाईक म्हणतात कोरोना महामारीचे संकट संपेपर्यंत माझे हे कार्य सुरूच राहणार आहे मग ते मतदसरसंघातल्या सोसायट्यांचे सॅनिटायझेशन असेल किंवा गरिबांना जेवण असेल, अन्नधान्य पुरवठा असेल किंवा मास्क पुरविण्याचे महत्वाचे काम असेल आणि महत्वाचे म्हणजे माझ्या विधानसभा मतदारसंघातली शिवसेनेची प्रत्येक  शाखा मी छोटेखानी इस्पितळात त्यांचे रूपांतर केले आहे आणि रांग लावून माझे मतदार या इस्पितळांचा लाभ घेताहेत. योग्य उपचार आणि मतदारांना उपाशीपोटी न राहू देणे याची मी शपथ  घेतली आहे, माझे सैनिक कार्यकर्ते दिवसरात्र राबून माझ्या मतदारांना चिंताविरहित ठेवण्याचे मोठे काम करताहेत....

आजकाल कंगाल लोकप्रतिनिधी अभावाने आढळतात बहुतेक लोकप्रतिनिधी नवश्रीमंत गडगंज श्रीमंत आहेत असतात पण नेमके मन मोठे असायला हवे आणि मतदारांचे भले करण्याची मानसिकता असायला हवी जी सरनाईक यांच्यासारखी अभावाने आढळते. दुर्दैवाने प्रताप सरनाईक महापराक्रमी नेते असूनही त्यांना कायम शिवसेनेत किंवा मातोश्रीवर महाभारतातल्या कर्णासारखी वागणूक मिळाली. सरनाईक नक्की या अशा कायमस्वरूपी सावत्र वागणुकीतून अस्वस्थ होत असावेत पण कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता ठाणे जिल्ह्यातली शिवसेना अधिकाधिक बळकट कारण्याचे काम ते करीत आले आहेत आणि ते तसेच नक्की कंटिन्यू ठेवतील, मला त्यांचा तो कष्टाळू स्वभाव माहित आहे, उद्धवजींना मात्र काही केल्या या बाळाच्या बाबतीत पाझर फुटत नाही, हे बाळ स्वतःशी आसवे गाळत तसेच दररोज झोपी जात असावे....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Thursday, 2 July 2020

IAS Tukram Mundhe & sexual harassement !!


IAS Tukram Mundhe & sexual harassement !!

Yes, there is an allegation against IAS Tukaram Mundhe of sexual offence. The complaint letter is of 2019. Is this a way an honest officer will be "silenced"? IS Mundhe innocent or guilty? Why did such an old letter come out now? Whom has Tukaram rubbed the wrong way? Why is Tukaram Mundhe calling up the CM & the CMO and asking for transfer from Nagpur since last 2 days? Why is Mundhe also calling ACS Pravin Pardeshi for a backdated letter? Are Nitin Gadkari, Sandip Joshi & all the Thackre's (Of Nagpur) & Kukreja's that innocent and clean? I'm stunned, but had to write....

To get Tukaram Mundhe heading the Nagpur Municipal Corporation as Commissioner was a master stroke by this state government. Nagpur, our state's second capital, is 'covertly' ruled by the BJP waala's. In particular, power centres are Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Anil Deshmukh, Nitin Raut, Chandrashekhar Bawankule, Sandip Joshi, Vivek Thakre and rest of them. HQ of the RSS is also based here. If Devendra Fadnavis during his CM stint had 'disturbed' Sharad Pawar in his home turf and 'broken' his home, (he took away Ajit Pawar, and by the way one more powerful 'young' brigade Pawar can come anytime to the BJP fold), it was obviously payback time for this government to do the same when they formed the MVA government. Attack the home turf! What better way to send Tukaram Mundhe to Nagpur? 

What should I say about Tukaram Mundhe? A very good officer but a cynical one. Not liked by many in his cadre, nor liked by the politicians where he takes postings. His first & foremost job wherever he takes charge is to break the syndicate and finish the 'mafia' involved. That's his modus-operandi! Yes, he is non-corrupt. Yes, he is a disciplinarian and result-oriented too. Tell me in all honesty, which Municipal Commissioner during this lockdown in this pandemic would have thought to utilise manpower and no crowd zones, to clean a river? Tukaram did so in Nagpur. Then, he started putting his hands to finish the mafia in the Nagpur Municipal Corporation. Everything was going very smooth....till then only the Mayor Sandip Joshi and others like Vivek Thackre & Vicky Kukreja were getting disturbed. But then Tukaram put his hands in Smart City Project. That's where Union 'heavyweight' Minister Nitin Gadkari had to step in as thats his pet project. Now right from Sandip Joshi to Vivek Thackre to Nitin Gadkari everyone have filed an FIR and reached Centre to challenge state government's decision on Mundhe's appointment on a Corporation. I'm sure they will have it their way....

Mundhe's alleged "unlawful" appointment as the CEO of Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited (NSSCDCL) is one of the main reasons for Gadkari to fume. Munde canceled a lot of tenders and contracts. He canceled Transfer Station tender and announced Bio Mining Tender. Mundhe says, all this was done after speaking to the Chairman, Pardeshi. Their main contention is, this appointment has to be done by the Board of Directors of NSSCDCL. In the meantime, CEO Ramnath Sonwane also resigned, and Mundhe got himself appointed as CEO.On top of that, is also giving statements to Media that Chairman of NSSCDCL, Pravinsingh Pardeshi, has appointed him the CEO via 'telephone'. Will Pardeshi ever do that? No, never! He has been too long in service to do this. Now OFF THE RECORD, what I know, Tukaram is asking Pardeshi every day for the letter of appointment "BACKDATED". That means, something is not correct!

At the same time now there is a letter of 2019 resurfaced about Tukaram allegation him of sexual harassment. I remember 2 years ago, another young IAS who was not ready to accept bribes and his counter parts wanted him out, he was similarly trapped in sexual harassment case. Till now, no charges against him are proved. I hope so, and pray so, officers like these shouldn't be "silenced". You know a simple allegation of corruption on any officer, what effect does it have in the family? Also these IAS/IPS stay in buildings which have other senior/junior/officers and families living together. Just imagine the condition of the wife/kids when they must be meeting for get togethers. Many times people might not say, but their eyes speak a lot. How embarrassing it must be for the family. Sexual harassment is one notch higher. If Tukaram has done this, it is a shame! I would have rather accepted him if he was 'mildly' corrupt & casteist, then being a sexual predator. By the way, I'm in possession of the letter from the Maharshtra State Commission For Women!

Anyway, long back when Tukaram was shunted out Navi Mumbai Municipal Corporation I happened to meet him outside Dr. Nitin Kareer's cabin. We spoke in the lobby for good 30 minutes. He had tears in his eyes along with frustration. He said Vikrant, where did I go wrong, if I'm doing my job diligently? Why am I transferred again & again? I told him, "Mundhe saab, those who contract jaundice, for them everything seems and looks yellow". It means not everyone who enters your cabin for work or if he is refereed to you by the CM or anyone, has come to you with malafide intentions. You need to go on merit of the file and if positive you should clear the file. You think anyone who enters your cabin has come to either loot the government or bribe the system. Not everyone is like this.... He just nodded and left...

What's up nowadays with Bureaucracy & Dictatorship?

Vikrant Hemant Joshi 


Wednesday, 1 July 2020

Bureaucracy and much more....


Bureaucracy and much more....


Had shared a very interesting quote on my Instagram story yesterday, it goes like this: 
"You will never understand the damage you did to someone until the same thing is done to you. That's why I Am here-Karma"

See, no one is indispensable here. If anyone ever thought that I will rule the roost for the longest time, he was taught a lesson by Karma. Who had ever thought that the NCP would ever be 'stopped'. But then Prithviraj Chavan came na in 2010? Do you all recollect how Ajit dada, Tatkare and even Sharad Pawar were literally frustrated by then CM Chavan...Then who would have thought the most daring/giant personalities Suresh dada Jain or even Eknath Khadse will have such tough times during their last political stint? Ok, coming nearer, who would thought in the wildest dream that the most 'loved' Chief Minister Devendra Fadnavis even after getting 104 seats would kept away from the CM post and also not been  power? Who had thought that the mighty Pravin Pardeshi would be insulted in such a way? Had you all thought? So why does anyone feel he is indispensable? By the way, why Am I talking like this? Just for information--Ajoy Mehta hasn't got the Cabinet rank even after being Principal Advisor to CM (But the proposal is very much on the cards) ; ACS Sitaram Kunte got GAD + Home against the wishes of top-- and SVR Srinivas who was in literal sense thrown out of BMC by then Municipal Commissioner due to Rs. 350 road scam gets Housing as Additional Charge. And by the way, it was almost confirmed either it will be Manukumar Shrivastava or Sujata Saunik's as ACS Home, but then God knows...Has the role of Karma already begun? 

Now, I don't know who spreads all these jokes around. They say nowadays in bureaucracy Jamana Additional Charges ka hai. Kunte got Home, Srinivas got Housing, even Sanjay Kumar and Iqbal Chahal  they say have additional charge only... 😅 Actual mein ek hi boss hai....

You know friends, in the bureaucracy one person has helped me when he was power and I was a nobody. It was to save one organisation form injustice and it was his hand at the BMC. This top boss did it only on merit and cross my heart, I will never forget how he took on so many just to protect what was right. I respected his decision then and will continue to do so. Yes, we needed an iron hand during this epidemic, but Mehta has created too many unhappy souls whilst dealing with Corona. Some of his decisions were excellent and need of the hour, whereas some were to ponder upon. Might be some may say, during such Epidemic we need to be ruthless! . Bhushan Gagrani can assume UD1 if & after Pardeshi leaves. Ashish Kumar Singh was thought of placing at GAD. But now again what happens to Rajiv Jalota & Gagrani is yet again a mystery.

A senior bureaucrat told me what Mehta is behaving in Uddhav Thackeray's regime is the same way what Pardeshi did when CM was Fadnavis. But then he also reminded me, that Vikrant when Fadnavis was the CM, he was accessible too to other bureaucrats who did not see eye to eye with Pardeshi then. Fadnavis many times calmed the tension between PP and others or helped the other naraaz bureaucrats  in some other way or found an alternate solution. Now, since CM Uddhav himself is inaccessible, how does one bureaucrat remove his frustration or communicate or get help? CM does not meet anyone. Even if bureaucrats meet him, there are in a group. So no one gets those 15 minutes as how they got at Varsha. It made sense to me. Also for those who are scratching their heads as to how come some 'not liked by Mehta' got super posts in last 15 days, it is arrangement friends. Just like how Sumit Mullick & Pardeshi had. 

Now coming to some other topics-Yesterday our Cabinet Minister Aaditya Thackeray along with his parents visited Pandharpur. And then the whole story began that he left the Puja in the middle and went and sat in the car to attend some calls. I too tweeted about it. But then Aaditya came up with his 'wasn't feeling well' reason. But to tell you friends, a lot has been said about Aaditya and his friend circle he is keeping these days. No, not the young MLA's who posed several selfies. His friendship with actor Dino Morea and a certain "Gomes" is inviting eyeballs even to the actors Bungalow in Bandra. Then they say some Parekh (best & childhood friend) and cousin Varun Sardesai (can be made MLC) and some girl called Urvashi have been often seeing hanging out with our Cabinet Minister. Hearsay is, these young brigade friends of Aaditya, are the main reasons as to why we have Body bags scams, PPE Kit scams, Shivbhojan thaali vegetable purchase--scams are coming to our ears. Be careful Aaditya! What an opportunity you have got!! Keep all these 'Moh Maya' at bay buddy and work brother without any expectations. Believe me, I have a black tongue, you have a bright future and you are a CM material in making. Just don't go wasted as many of the politicians son's do...It's an opportunity of a lifetime you have there. 

In the BMC, all the 4 Additional Commissioner's are doing a fabulous job. My one very influential journalist who covers the BMC beat for a leading Mumbai daily has some dangerous stories about the MC and his single point agenda. I have asked him for more details. He says Vikrant file RTI's on this Jumbo Isolation Facilities the purchases in these isolation centres, purchases, and STP set ups you will have a lot to write too...I remember someone telling me how a phone call went from the MC office to an SRA builder the first day he came to the BMC. By the way---check today's Mumbai Mirror. 

Then in the PWD a big scam of JJ revamp I'm looking to put my foot in. A revamp which was estimated for Rs. 298 crores in September 2019 in 2 months the tender was awarded to Capacite Infra projects for Rs. 407 crores. Who is Ketan Kadam and does Ashok Chavan even know how much was 'exchanged' very soon on that...How the cost was inflated and why was Ahluwalia of Delhi (contractor who made the BKC) asked not to participate? Who did it, very soon....

Last but not the least. CS Kumar ji, please order a diktat to all the secretaries of every department to call for a list of employee's who have LEFT the headquarters without prior permission of the government? In June as per the GR, it is known that employee has to come for a day out of the week. But no one is allowed to leave the HQ as they have to be available if service demands it. But sir, everyone leaves the HQ (goes out of Mumbai) without any permission. Request to get this data match with their mobile CDR's and do not pay a single penny to them. It is an insult to other employees who are toiling hard.

Vikrant Hemant Joshi 
Tuesday, 30 June 2020

नाराज मराठी, निराश मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी


नाराज मराठी, निराश मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
या मास्कमुळे मोठी पंचाईत झाली आहे. अलीकडे एकाने त्याच्या प्रेयसीच्या घराचा पत्ता थेट आपल्या बायकोलाच विचारला विशेष म्हणजे त्यावेळी त्याची बायको तिच्या प्रियकराबरोबर होती पण मास्क लावूनच त्यामुळे ती बाल बाल वाचली. मागच्या पंचवार्षिक योजनेत एकही दिवस नव्हता अशी एकही संधी ज्याला असूयेची दुर्गंधी म्हणा विरोधकांनी सोडली नाही ज्यादिवशी माझ्या पाहण्यातला आजवरच्या केवळ चार दोन सर्वोत्तम सर्वांगसुंदर विचारांच्या प्रजेचा विचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी एक  फडणवीस यांना मागच्या पंचवार्षिक योजनेत छळले नाही मानसिक त्रास दिला नाही सासुरवास केला नाही. फडणवीस यांची मानसिक कोंडी कुचंबणा अवहेलना करण्यात विरोधक आणि मित्र दोघांतही एकप्रकारे स्पर्धा लागली होती कि फडणवीसांना सर्वाधिक कोण छळून मोकळे होते ते. आणि तेच कालचे वटवट करणारे आज आम्हा साऱ्यांना अक्षरश: ज्यांनी मृत्यूच्या दाढेत आणून ठेवले आहे त्यांना कोणतेही दूषण द्यायला त्यांचे दोष चुका काढायला पुढे येत नाही. पाकिस्थांनची निर्मिती करून त्यावेळेच्या नेत्यांनी जशी कायमस्वरूपी हिंदी मुस्लिम द्वेष अशी जी खोल दरी  निर्माण करून ठेवली आहे ते तसेच येथे आज या राज्यात घडले आहे, फडणवीसांच्या सुविचारांचे नेते आणि इतर असे जातीचे पद्धतशीर गणित महाराष्ट्राची भविष्यातली चिंता केवळ सत्ता मिळविण्याच्या नादात काही दुष्ट नेत्यांनी वाढवून ठेवली आहे मोठी दरी  त्यातून निर्माण झाली आहे ज्यामुळे सुविचारी पण काहीशा दुबळ्या म्हणजे टगेगिरीत मागे असणाऱ्या नेत्यांना लोकांना कार्यकर्त्यांना मतदारांना त्याचा फार मोठा त्रास होणार आहे, मानसिक त्रास वाढत जाणार आहे. भुजबळ आणि ठाकरे यांनी निदान एकदा तरी या राज्यात वाहिन्यांच्या माध्यमातून जनतेला दाखवून द्यावे कि शिवभोजन थाळ्यांचे कंत्राट कोणाला देण्यात आलेले आहे आणि किती थाळ्यांचे कसे वाटप होते ते....

केंद्र आणि राज्य सरकारमध्ये फारसा समन्वय नाही आणि येथे या राज्यात ऑडीट नसलेली फार मोठी रक्कम कोविड वर खर्च न होता अधिकाऱ्यांच्या नेत्यांच्या दलालांच्या मंत्र्यांच्या घरात खरेदीच्या नावाने जाते आहे जमा होते आहे हीच वस्तुस्थिती आहे थोडक्यात या महामारीत देखील सत्तेशी संबंधित संधीसाधू प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यात मग्न आहेत हीच वस्तुस्थिती आहे, पुन्हा तेच हतबल ठरलेल्या उद्धव ठाकरे यांनी राजाचे सिंहासन सोडून पंतप्रधानकी स्वीकारली आणि तेथेच सारे बिनसले, मी म्हणतो तेच खरे ठरले आहे कि वाघाने शेळीचे कपडे घालायचे नसतात दिलीपकुमारने अलोकनाथच्या अभिनयाची नक्कल करायची नसते मुकेश अंबानीने अंटालिया च्या खाली चहाची टपरी लावून निताबाईंनी भजी तळायची नसतात संदीप जोशींनी तुकाराम मुंडेंवर शिंतोडे उडवायचे नसतात साऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन कुर्निसात करायचा असतो तेथे बसलेल्या सिंहाधिपतीने कधीही इतर क्षुल्लक सिंहासनावर आरूढ व्हायचे नसते, सारेच गणित या राज्याचे बिघडले आहे सेना भाजपा दुराव्यामुळे राज्याचे फार मोठे नुकसान झाले आहे याचा अर्थ काँग्रेस राष्ट्रवादी वाईट असा होत नाही पण कॉम्बिनेशन चुकले सेनाप्रमुख चुकीच्या पंक्तीला जाऊन बसले म्हणजे विहीणबाई त्यांच्या पंक्तीला न बसता बुफेच्या रांगेत जेवणासठी उभ्या आहेत असे ठाकरेंच्या बाबतीत घडले. प्रबोधनकार असोत कि बाळासाहेब आणि उद्धव असोत कि आजचा आदित्य, आम्हा निदान मराठींना तरी हे सहन होणारे नाही कि राजा इतरांसमोर झुकतो आहे म्हणजे उद्धव आणि आदित्य यांनी प्रबोधनकार व बाळासाहेबांची गादी पुढे चालवावी त्यांनी कैकयी होऊन रथाच्या खाली उतरू नये, मोठे नैराश्य मराठी माणसांमध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये या दिवसात पसरलेले आहे... 

www.vikrantjoshi.com

राज्यकर्त्यांच्या जीवघेण्या सत्ता स्पर्धेत विशेषतः आम्ही मुंबई आणि ठाणेकर वस्तुस्थिती सांगतो मृत्यूचे तांडव सहन करतो आहे, कोरोना संपता संपता तुम्ही आम्ही एकमेकांना बघणार तरी आहोत का असे आज या मुंबई टेरेटरी मध्ये भयावह धोकादायक चिंताजनक काळजी करण्यासारखे वातावरण नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयातून निर्माण झाले आहे त्यात केवळ राज्याची नव्हे तर राष्ट्र हाकणाऱयांची पण मोठी चूक आहे, राज्यकर्त्यांनी कोरोना महामारीत घेतलेले चुकीचे निर्णय मित्रांनो एवढेच लक्षात ठेवा आपल्या साऱ्यांचे प्राण कंठाशी आहेत केव्हा कोणाकडे काय घडेल सांगता येत नाही असे बिघडलेले वातावरण या राज्यात विशेषतः मुंबई टेरेटरीमध्ये आहे. काही पुरावे मांडून मला तुम्हाला आणखी आणखी घाबरवून सोडायचे नाही पण एकही क्षण बेसावध न राहता कोरोनाशी आपण स्वतःच मुकाबला करायचा आहे सरकारी सहकार्य तुटपुंजे आहे त्या भरवंशावर फारसे विसंबून न राहता आपणच आता आपले रक्षण करावे. अलीकडे मला काँग्रेसचे एक फार मोठे नेते जे म्हणाले ते ऐकून काँग्रेसच्या मनात गोटात देखील मोठी खदखद आहे जी अधून मधून बाहेर पडत असते किंबहुना या खदखदीचा एक दिवस नक्की स्फोट होणारच आहे. ते म्हणाले आमच्या व सेनेच्या मंत्र्यांची आणि राज्यमंत्र्यांची अवस्था या सरकारमध्ये एखाद्या चपराश्यासारखी झालेली आहे हे राज्य अजोय मेहता व त्यांचे  भोसले छाप साथीदार आणि शरद पवार जे ठरवतील त्यापद्धतीने हाकले जाते आहे जे चित्र अत्यंत निराशजनक आहे पण कोरोना महामारीत उघड विरोध करणे त्यातून आमचे मोठे राजकीय नुकसान होईल म्हणून आम्ही मूग गिळून गप्प बसलो आहोत. माझे त्यावर असे म्हणणे आहे कि निदान शंभर टक्के तरी शरद  पवार अजोय मेहता यांनी कोरोना महामारीत हाती छडी घेऊन हे राज्य हाकावे कारण कोणत्याही संकटात पवार कमी पडणारे नाहीत हे या राज्याने अनेकदा अनुभवलेले आहे आणि मेहता यांची देखील अत्यंत वाकबगार प्रशासकीय अधिकारी म्हणून ख्याती आहे. पवार मेहता कॉम्बिनेशन अजिबात वाईट नाही पण त्या दोघांमध्ये तरी तणावाचे संबंध नसावेत आता निदान त्यांनी आम्हाला वाचवावे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 
Monday, 29 June 2020

विधवा सरनाईक घटस्फोटित गाडगीळ व वांझ पवार : पत्रकार हेमंत जोशी

विधवा सरनाईक घटस्फोटित गाडगीळ व वांझ पवार : पत्रकार हेमंत जोशी 
मित्र म्हणाला या दिवसात मी एवढा घाबरलोय कि प्रेयसीशी किंवा मैत्रिणींशी तेही भ्रमणध्वनीवर बोलतानाही मास्क घालून बोलतो वास्तिवक दोघांच्यामध्ये मोठे अंतर आणि भ्रमणध्वनी असतांना देखील मास्कविना बोलण्याची हिम्मत होत नाही. कोरोना येण्याआधी भारतीय पुरुषांनी विशेषतः मुस्लिमांनी नको त्या अवयवाला मास्क लावला असता तर लोकसंख्या वाढीचे संकट भारतावर कधीही ओढवले नसते. जाऊ द्या लोकसंख्या वाढीचे आपण हिंदूंनी संकट म्हणून न बघता त्याकडे संधी म्हणून बघायला हवे आणि हिंदूंनी अधिकाधिक लोकसंख्या वाढीचे टार्गेट ठेवून त्यापद्धतीने वाटचाल करायला हवी कारण अख्य्या जगात आता हिंदुस्थान तेही नावापुरते एकमेव हिंदुराष्ट्र उरले आहे, नेपाळींना चिन्यांनी केव्हाच लालूच दाखवून त्यांच्या धर्मात आणून ठेवले आहे. जेमतेम नेपाळीच आता कट्टर हिंदू म्हणून उरले आहेत. या देशात या राज्यात आम्हा ब्राम्हणांचे तर पारशी समाजासारखे एक दिवस नक्की होणार आहे, एकापेक्षा अधिक नको हि गांडू संकल्पना ब्राम्हणांना संपवते आहे जे अतिशय वाईट घडते आहे.... 

चार दशके तेही न थांबता सतत राजकीय पत्रकारिता करतांना काही नेत्यांना त्यांच्या आणि माझ्याही मनासारखे यश न मिळाल्याने मला अनेकदा त्याची खंत वाटते म्हणजे अनंत गाडगीळ निदान एकदा तरी मंत्री आणि त्यांच्या पत्नी मेधा या मुख्य सचिव म्हणून निवृत्त व्हायला हवे होते असे वारंवार वाटते. आता तर अनंत गाडगीळ यांची विधान परिषद सदस्य म्हणूनही मुदत संपत आलेली आहे. हि इज असेट टू काँग्रेस पार्टी, प्रचंड अभ्यास स्पष्ट स्वभाव आणि भ्रष्टाचारापासून कोसो दूर, असे नेते अतिशय विरळ असतात किंवा असे नेते फारतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शोभतात पण गाडगीळ काँग्रेस मध्ये आहेत आणि पिढीजात गाडगीळ कुटुंब काँग्रेस आणि गांधी घराण्याशी अतिशय निष्ठा राखून आहे, निदान असे नेते तरी काँग्रेसने विधान परिषदेत अनेकदा रिपीट करायलाच हवे, बघूया काय घडते ते. वाईट तर मला ठाण्यातल्या शिवसेनेच्या कायम आमदारकीला आणि त्या आधी अख्खे कुटुंब नगरसेवक म्हणून निवडून आणणार्या प्रताप सरनाईक यांच्याविषयी पण वाटते. प्रताप यांची अवस्था त्यांच्याच शिवसेनेतल्या काही नेत्यांनी आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या विरोधकांनी शत्रूंनी दाट लोकवस्तीच्या मुस्लिम वस्तीत हिंदू मुलीला पळवून नेल्यासारखी करून ठेवली आहे म्हणजे प्रताप यांनी आवाज उठवण्याचा अवकाश एकतर त्यांच्या तोंडात बोळा कोंबण्यात येतो किंवा त्यांचे हातपाय बांधून ठेवण्यात येतात....

www.vikrantjoshi.com

प्रताप सरनाईक यांचे एक चांगले आहे कि त्यांना जेव्हा अपमानित करण्यात येते डावलण्यात येते दुर्लक्ष करण्यात येते कमी लेखण्यात किंवा अपमानित करण्यात येते तेव्हा सरनाईक हे तोंडाची वाफ न गमावता विविध कामांवर अधिक जोर देतात आणि सत्कृत्यातून आपण नेता आणि नेतृत्व म्हणून कसे उत्तम मातोश्री वर व विरोधकांना ते दाखवून देतात निदान लोकांमधले मतदारांमधले स्थान तरी ते त्यातून अबाधित राखतात. आणखी दोन अभागी दुर्दैवी कमनशिबी नेत्यांचा येथे मला उल्लेख करायचा आहे त्यापैकी एक आहेत मनसेचे माझे अत्यंत लाडके संदीप देशपांडे आणि भाजपाचे डोंबिवली कल्याण भागातले माजी आमदार नरेंद्र पवार. भाजपाने नरेंद्र पवार यांच्यावर फार मोठा अन्याय केला त्यांना पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची उमेदवारी मिळाली नाही ते अपक्ष उभे राहिले, पराभूत झाले पण त्यांनी भाजपाशी आपली नाळ तोडली नाही. नरेंद्र पवार मला वाटते या राज्यातले असे एकमेव पराभूत उमेदवार असावेत जे पराभवानंतर न खचता हताश नाराज निराश न होता थेट दुसरे दिवशीपासून पुनःश्च लोकसेवेला लागले आश्चर्य म्हणजे तेथे आजही निवडून आलेला आमदार  जेवढा लोकसेवेत व्यस्त नसतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी नरेंद्र पवार लोकांसाठी धावून जातात सर्वजनिक कामात आणि उपक्रमात कायम व्यस्त असतात हसतमुख व सकारात्मक राहून मतदारांसाठी विविध उपक्रम राबवून मोकळे होतात त्यातून नक्की भाजपा श्रेष्ठींना कायम खजील झाल्यासरखे नक्की वाटत असेल कि आपण आपल्या सद्गुणी मेहनती पराक्रमी लोकमान्य लोकप्रिय नेत्यावर अन्याय केला आहे. जागेअभावी मित्रवर्य लोकसंग्रही संदीप देशपांडे यांच्यावर येथे लिहिणे शक्य झाले नाही, लवकरच देशपांडे कसे तुम्हाला मला नक्की सांगायचे आहे. 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Saturday, 27 June 2020

दादागिरी आणि काकाजी : पत्रकार हेमंत जोशी


दादागिरी आणि काकाजी : पत्रकार हेमंत जोशी 
सार्वजनिक ठिकाणी, ऑफिसेस मध्ये चार मित्र एकत्र आले कि बायका एकत्र जमल्या कि चार टाळकी एकत्र आलीत कि आता सॅनिटायझरचे तंबाखू घुटका माव्यासरखे झाले आहे म्हणजे खिशातून काढायचा अवकाश चार हात लगेच पुढे येतात. विशेषतः भारतीय म्हणे कोरोनामुळे नव्हे तर वाढलेल्या थकलेल्या उधारीमुळे मास्क लावून फिरताहेत. अलीकडे एका मित्राची बायको त्याच्याबरोबर दारावर बसायला म्हणे यासाठी गेली नाही कारण तिला वेळेवर मॅचिंग मास्क सापडला नाही. भारतीय आपल्या गाड्यांच्या मागे काय लिहून मोकळे होतील सांगता येत नाही. सासूची कृपा, काकांचा आशीर्वाद, अमुक देवाची पुण्याई, तमुक बुवा किंवा बाबांचा हात असे काय काय म्हणून आम्ही भारतीय आपापल्या घरांवर गाड्यांवर लिहून मोकळे होतो. उद्या समजा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी आपापल्या खुर्च्यांच्या मागे आई किंवा बाबांचा आशीर्वाद अथवा पुण्याई असे लिहायचे ठरविले तर मला वाटते बहुतांश नेत्यांना हे असे लिहून मोकळे व्हावे लागेल कारण आपल्या देशातली हि तर मोठी विकृत मानसिकता आहे कि आधी आपापल्या कुटुंब सदस्यांचे भले करायचे साधायचे त्यातून चुकून उरले तरच इतरांच्या अंगावर भिकारी, किंवा रस्त्यावरच्या कुत्र्यासारखे उरले सुरले भिरकवायचे, मलिदा तेवढा आपल्याला आणि कार्यकर्ते सतरंज्या उचलायला...

या दिवसात शरद पवार यांची सर्वाधिक भीती कोणाला वाटते आहे किंवा सर्वाधिक परेशान कोण आहे किंवा सर्वाधिक धास्तावलेला घाबरलेला हादरलेला केविलवाणा कोण असावा असे तुम्हाला वाटते किंवा जळी स्थळी शरद पवार कोणाला एखाद्या चवताळलेल्या वाघासारखे  किंवा भुकेल्या सिंहासारखे दिसत असावेत असे तुम्हाला वाटते. देवेंद्र फडणवीस अजिबात नाहीत, उद्धव ठाकरे दुरदुरपर्यंत नाहीत, जयंत पाटील ते फक्त तसा विनाकारण चेहरा करून फिरतात, दिलीप वळसे पाटील त्यांचा चेहरा तर त्यांच्या मधुचंद्राला पण असाच धास्तावलेला दिसत होता, हेमंत टकले ते तर बोलतांना हसताहेत कि नेमके हुंदके देताहेत हेच कळत नाही, जितेंद्र आव्हाड तो तर गब्बर चा अरे ओ सांभा असल्याने उनको पवारमियाँ का डर नाही लागत है, सुप्रिया सुळे त्या या दिवसात मेकअप शिवाय असल्याने त्यांचा चेहरा असा व्याकुळ ओढलेला थकलेला वाटतो म्हणजे नेमके त्यांच्या कडे बघून वाटते कि नवऱ्याचा चार महिन्यांपासून पगार झालेला नाही आणि उधाऱ्या तर खूप थकलेल्या आहेत. सुनील तटकरे त्यांचा तसाही चेहरा नेहमी मुळव्याध ग्रस्त आणि एखाद्या बाईला नेहमीच्या होणाऱ्या बाळंतपणाने त्रस्त असा दिसतो. छगन भुजबळ ते कायमच लग्नाआधी प्रियकरामुळे पाळी टळल्याच्या मुड मध्ये असतात. जाऊ द्या तुमची उत्सुकता फार ताणून धरत नाही. या दिवसात शरद पवार यांच्यामुळे अशांत अस्वस्थ परेशान डिस्टरब आहेत ते फक्त अजितदादा... 

www.vikrantjoshi.com

जसा कोरोनाचा लॉक डाऊन कालावधी इकडे सुरु झाला तिकडे अजित पवार यांचा थेट जादूगार रघुवीर किंवा गुप्तहेर राजू झाला म्हणजे ते त्यानंतरच्या दिवसात नेमके कुठे आहेत कसे आहेत काय करताहेत हेच कळत नाही. नाही म्हणायला सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना छानपैकी कडेवर घेऊन  नंतर डोक्यावर पण घेतले नंतर असे वाटायला दिसायला लागले कि याच उद्धव यांनी त्यांना आधी डोक्यावर घेऊन कौतुक केले पण लवकरच अजितदादांचा थेट बोळवायला आणलेला गणपती बाप्पा केला. उद्धव यांच्याकडून दादांच्या बाबतीत घडले आहे घडते आहे ते खरे आहे कारण तशा  सूचनाच म्हणे शरद पवार यांनी उद्धव सारख्या संबंधितांना अप्रत्यक्ष दिल्या आहेत कि दादांचे स्तोम महत्व यापुढे फारसे वाढता कामा नये. वास्तविक अजितदादा अतिशय नियमित नेहमीप्रमाणे त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात येऊन बसतात पण त्यांचा आमच्या शाळेतल्या मानस्कर सरांसारखे झाले आहे म्हणजे मानस्कर सर निवृत्तीनंतरही शाळेतल्या टीचर्स रूममध्ये नुसतेच येऊन बसायचे आणि जमलेल्या इतर शिक्षकांचे छान मनोरंजन करमणूक करून मोकळे व्हायचे. हे सारे येथे अर्थात गमतीने घेण्याचे नाही, मॅटर सिरीयस आहे निदान अजितदादांनी अतिशय सिरियसली घेण्यासारखे आहे आणि थेट राजकारणातल्या बलाढ्य काकांशी दोन हात करायचे असतील तर अजितदादांनी जी चूक मागे केली ती निदान यावेळी तरी करू नये, निदान स्टाफ तरी लुच्चा भामटा लफंगा भ्रष्ट हरामखोर नीच असू नये. अशा थर्ड ग्रेड अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना चार हात लांब ठेवावे. चहापेक्षा किटली अधिक गरम असे या पद्धतीने दादांच्या सभोवतालचे कार्यालयातले वागायला लागले आहेत जे धोकादायक वाटते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Thursday, 25 June 2020

जिद्दी आणि हट्टी ठाकरे : पत्रकार हेमंत जोशी

जिद्दी आणि हट्टी ठाकरे : पत्रकार हेमंत जोशी 
बहुसंख्य माणसे मोठी जिद्दी असतात, फायदा तोटा नफा नुकसान बरबादी आबादी इत्यादी विविध परिणाम दुष्परिणामांचा अशी माणसे विचार न करता मनाला येईल किंवा मनात आले तसे वागून मोकळे होतात. आमचा एक पत्रकार मित्र आहे त्याने अगदीच दोन आवश्यक लोकांना सोबतीला नेऊन कोर्ट मॅरेज केले पण पुढे काही महिन्यानंतर एक दिवस अचानक त्याच्या मनात आले कि लग्नाचा दणक्यात स्वागत समारंभ घडवून आणावा वास्तविक तेव्हा त्याची बायको सहा महिन्यांची गरोदर होती तरीही त्याने हेका हट्ट सोडला नाही, बायको ठेंगणी लठ्ठ त्यामुळे पॉट एकदम पुढे आलेले पण त्याने स्वागत समारंभ उरकलाच किंवा लाड आडनावाचा पूर्वी एक वादग्रस्त पत्रकार होता तो तर मुलगी वयात आल्यानंतर हनिमून साजरा करण्यासाठी मुलीसहित काश्मीर ला गेला होता. मला हे आठवले आपल्या मुख्यमंत्र्यांमुळे, तेही असेच जिद्दी आणि कमालीचे हट्टी त्यांच्या जे मनात येते ते करून मोकळे होतात अशावेळी सांगणारे त्यांच्यासमोर हात टेकतात पण उद्धव घेतलेल्या अमुक एखाद्या भूमिकेवरून निर्णयावरून मागे न फिरणारे मागे न हटणारे आहेत म्हणजे त्यांच्या मनात अमुक एक आले कि रश्मीवाहिनी पण हतबल असमर्थ ठरतात. जो विरोध प्रसंगी थेट घरातून मिलिंद नार्वेकर यांना झाला किंवा आजही होतो, काढून टाका असा अनेकांनी जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान बाबतीत उद्धवजींकडे अनेकदा आग्रह धरला, उपयोग अशा अनेकांच्या बाबतीत शून्य टक्के झाला आणि नेमके हे असेच आता अजॉय मेहता यांच्याबाबतीत देखील घडते आहे किंवा घडले आहे... 

मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर मेहता यांना आता थेट सहाव्या माळ्यावर उद्धवजींनी त्यांच्या अगदी शेजारी अजॉय मेहता यांना बसवून घेतले आहे तुम्हाला काय वाटते याआधी मेहता यांचे ऐकू नये त्यांना एवढे अति महत्व देऊ नये म्हणून काय कमी दबाव किंवा लावालाव्या उद्धव यांच्याकडे थेट करण्यात आल्या नाहीत, असे अजिबात नाही याउलट मेहता विरोधातून उद्धव यांच्याकडे त्यांचे महत्व अधिकाधिक वाढत गेले आणि अनेक असंख्य विरोधक हात चोळत बसले, मेहता का त्यांना नको आहेत त्याची अनेक कारणे आहेत पण एकदा का आले उद्धवजींच्या मना तेथे थेट ब्रम्हदेवाचेही चालेना हि अशीच त्यांच्याबाबतीत वस्तुस्थिती आहे. माझे सांगणे कदाचित येथे आगाऊपणाचे ठरेल पण प्रसंगी उद्धव यांना अडचणीच्या ठरणाऱ्या नस्त्या त्यांनी त्या अगदी पवारांच्या मर्जीतल्या असल्या तरी क्लिअर करू नयेत या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना सावध करणाऱ्या मेहता यांना थेट शरद पवार यांचाही या निवृत्तीनंतरच्या नेमणुकीला आणि ते मुख्य सचिव म्हणून देखील विरोध होता पण प्रसंगी उद्धव जेथे रष्मीवहिनी किंवा आदित्य यांच्या सांगण्याला धुडकावून लावतात तेथे पवार यांचे सांगणे आणि ऐकणे फार दूर राहते त्यामुळे मेहता यांच्या निवृत्त होण्याआधीच त्यांच्या निवृत्ती नंतरच्या केबिनचे सहाव्या माळ्यावर तेही अशोक चव्हाणांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने काम सुरु केले होते. फार कमी नेते असे बघायला मिळतात जे चांगल्या वाईट परिणामांची फिकर चिंता पर्वा न करता घेतलेल्या निर्णयांवर ठाम असतात त्यात उद्धव यांचा पहिला नम्बर लागतो....

www.vikrantjoshi.com

1985 नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले राजकारण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्णतः बदलवून व हादरवून सोडले म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात घडायचे असे कि बाप काँग्रेसमध्ये आणि नेत्यांची पुढली पिढी शिवसेनेत महत्वाचे म्हणजे या गदारोळात काँग्रेस नेते घरी  बसले आणि त्यांची मुले तेही शिवसेनेतून पुढे आले अर्थात तेव्हा पवारांचे स्वतंत्र असे अस्तित्व नव्हते त्यांची स्वतंत्र राजकीय पार्टी अस्तित्वातही आली नव्हती. 1980 नंतरची पिढी काँग्रेसपासून फार मोठ्या प्रमाणात दूर गेली त्यातले बहुसंख्य शिवसेनेत गेले पण रथयात्रा आणि भाजपाचे बदललेले धाडसी रूप त्यातून अनेक भाजपामध्ये पण काम करू लागले ज्याचा मोठा फटका राज्यात पवारांच्या नेतृत्वाला व काँग्रेसच्या राजकारणाला नेतृत्वाला देखील बसला. इतर विसरले पण शरद पवारांना हा फटका हा झटका चांगलाच झोंबला होता त्यातून तेव्हापासून त्यांनी पद्धतशीर आखणी करून ती कसर भरून काढली त्यात त्यांनी मुस्लिम मराठा इत्यादी कार्ड्स चा मोठ्या खुबीने उपयोग करून  घेतलाआणि पुन्हा एकदा अनेक वर्षांनी तरुण पिढी पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडे खेचून आणली आकर्षित केली ज्याचा काही प्रमाणात काही ठिकाणी फायदा काँग्रेस पण झाला ज्याकडे मला वाटते उद्धव ठाकरे यांचे निदान आजतरी अजिबात लक्ष नाही त्यांना सध्या मुख्यमंत्रीपद अधिक महत्वाचे वाटते आहे. आजची तरुण पिढी बऱ्यापैकी आपल्यापासून दूर गेली आहे हे भाजपाच्या देखील लक्षात आले आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकवार रा. स्व. संघाच्या माध्यमातून दुरावलेल्या तरुण तरुणींना आपलेसे करण्याचा विशेषतः ब्राम्हणेतर तरुण पिढीत पुन्हा एकवार कुठे मुंढे खडसे दिसतात का त्यावर चाचपणी आणि प्रयत्न सुरु केलेले आहेत... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

गंदा है पर धंदा है : पत्रकार हेमंत जोशी

गंदा है पर धंदा है : पत्रकार हेमंत जोशी 
सलून ओस पडले कारण पार्लर्स चे महत्व वाढले आहे. सलून पेक्षा काय तर जरा उत्तम दर्जा पण त्यासाठी पार्लर्स कितीतरी ज्यादा पैसे वसूल करतात. समजा अमुक एखाद्याला केसांचा कलर करायचा आहे त्यासाठी तो घरून शॅम्पू करून गेला तरी त्यांना चालत नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या दिवशी ग्राहक केस कलर करतो त्यादिवशी म्हणजे केस कलर केल्यानंतर ते लगेच नव्हे तर दुसरे दिवशी शॅम्पू लावायचा असतो कलर केल्यानंतर केस केवळ पाण्याने धुवायचे असतात पण पार्लर्स लुटायलाच बसले असल्याने ते लगेच शॅम्पू करून मोकळे होतात ज्यामुळे वास्तविक केसांचा कलर ज्यादा टिकत नाही ग्राहकाला पुन्हा लगेच काही दिवसात पार्लरमध्ये जावे लागते आणि हे सिक्रेट मला एका पार्लर चालविणाऱ्यानेच सांगितले आहे. बोलायचे झाल्यास न्हावी समाज केस कर्तनालयापासून दूर जातो आहे आणि न्हावी नसलेलेच हजामत करायला लागले आहेत. उद्या ते कसाई पण होतील काहीच सांगता येत नाही....

पूर्वी कुठे हो होते हे पार्लर चे फॅड तरीही आमचे शिक्षक एखाद्या हिरोसारखे दिसायचे कि, म्हणजे आमचे कोल्हटकर सर खलनायक मनमोहन सारखे दिसायचे सुरेश कुलकर्णी सरांना आम्ही जॉय मुखर्जी तर गोविंद देशपांडे सरांना विश्वजीत तर दूरदूरपर्यंत हि मंडळी सेम टू सेम नसायची तरी माझ्या वडिलांना विद्यार्थी दिलीपकुमार म्हणायचे. हे असे केवळ त्या त्या शिक्षकांच्या हेअर स्टाईल वरून म्हटल्या जायचे. माझ्या वर्गातली जी मुलगी मला साक्षात आशा पारेख आणि आणखी एक मुलगी थेट झीनत अमान वाटायची, आज त्या मुलींना तुम्ही चुकून बघितले तर मला नक्की एखाद्या झाडाला बांधून पोकळ बांबूचे फटके द्याल. तुम्हाला तर मी हे सांगितलेच आहे कि माझ्या ओळखीचे एक शासकीय अधिकारी बायकोला जवळ घेतल्यानंतर म्हणायचे कि मला तुझ्यात शेजारच्या इमारती मधली मिसेस साळुंखे दिसते मग त्यांची बायको पण एक दिवस त्यांना म्हणाली कि मला पण तुमच्यात हेमंत जोशी दिसतो. एक सूचना तर तुम्हाला विशेषतः चावट पुरुषांना मी कायम करत आलोय कि तुम्ही फेस बुक वर टाकलेल्या फोटोंवर फिदा होऊन एखादीच्या मागे लागू नका फजिती हमखास होते...

जी फेस बुक वर साक्षात दीक्षितांच्या माधुरीसरखी वाटते दिसते प्रत्यक्षात तिच्यापेक्षा एखादी युगांडाची मुलगी बरी म्हणायची वेळ तुमच्यावर नक्की येते. माझा एक मित्र जुहू चौपाटीवर फिरतांना एक दिवस अचानक पळायला लागला काय तर त्याला पुढे पळणारी तरुणी खूप खूप देखणी चिकणी आणि एकदम षोडशा असावी असे वाटले. याला धाप लागली तरी हा पळत होता शेवटी त्याने तिला गाठलेच, मित्रहो येथे नाव सांगत नाही पण ती पाठमोरी सेक्सी खूबसूरत वाटणारी किशोरी चक्क जख्खड म्हातारी आणि एके काळची मराठी  सिनेमातली गाजलेली नटी निघाली जी म्हाताऱ्या पण आडदांड नवऱ्याला कायम घेऊन वॉकला येत असते. आमच्या सांताक्रूझ परिसरात रात्रीच्या अंधारात त्या पवन हंस जवळ हिडीस मेकअप आणि उत्तान कपडे घालून काही बायका उभ्या राहतात, पिणारे पुरुष त्यांना रात्री एकदा  का झिंगले कि पिकअप करतात,  उतरल्यानंतर आणि खिशातले पैसे काढून घेतल्यानंतर या आंबट शौकिनांच्या ते लक्षात येते कि स्त्रीवेषातले तेही पुरुषच असतात, मग काय, सारे लुटल्यानंतर ग्राहक आल्या पावली आरडा ओरड करत अक्षरश: पळत सुटतात. कशाला म्हणून अशा सवयी लावून घ्यायच्या आम्ही पुरुषांनी...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Tuesday, 23 June 2020

Jaane Bhi Do Mehta ji....


Jaane Bhi Do Mehta ji....

There is a joke doing the rounds. Looking at the way CS Ajoy Mehta is transferring IAS officers around, heard Thackrey, Pawar & Thorat have re-looked into their agreement of formation of MVA government. Some of them are doubting that if Ajoy Mehta finds any discrepancy, only he has the power to bring down this MVA government 😜 ...

But will this power be restricted or remains the same after June 30th, (his retirement date) or will it be even MORE if he comes in the CMO with a "PA" (Principal Advisor) tag? Time will say and what order and powers does CM Uddhav Thackeray confer upon Mr. Mehta. If he gets Principal Advisor with a cabinet rank, will the new CS report to PA Ajoy Mehta & then the file goes to the CM or will it be some other way? Everything now depends on what CM Thackeray has in his mind. But what I know Mehta, he will just not accept anything 'meaningless' coming his way. It has to be bigger than what he is doing now & more importantly, it has to be result oriented!

It came as a big surprise as to why so many Municipal Commissioners were transferred in such a haste.  Mumbai, Thane, Navi Mumbai, Bhiwandi, Mira Bhayander and so on....Observe closely friends! Majority of all the officers transferred from these MC posts, 'promotee' officers have been kept in mind. CS Ajoy Mehta is a man of principals. He does not believe in state cadre being able to run the show with equal zest the way direct recruits do. My guess says, he feels Promotee's have seen everything right from being a Deputy Collector to being IAS today, and majority of them have already milked the system enough. They are influenced easily by the politicians and vice-versa and also they are known to everyone since day 1. This might be a reason playing on Mehta's mind, when he shunted all of these pormotee's. As for direct recruit, couldn't come to a conclusion. ACS Pravin Pardeshi, we all know Mehta didn't share the vibe with him, and as far as Vijay Singhal goes, it's better to remain silent. Vijay, once a favourite of Mehta and today Mehta is so angry that he has gone against the wishes of Aaditya Thackeray too by transferring Vijay Singhal. Again, then I see the names of Collectors posted in the same MMR where Municipal Commissioner's were transferred. Majority of them are Promotee's. Mumbai (both Suburban & Greater), Thane and so on...Hence, the mystery continues....

www.vikrantjoshi.com

The transfer of Manisha Verma to Filmcity from the 'famous' and 'ready to be milked' Tribal Department did come as a surprise. But then, why am I forgetting this is department where 'dalaal's' run the show! I mean, Verma was doing such a fabulous job, but the Jadhav's & others wanted a change in face, it seems. (From Fabulous Job, I meant, nowadays many bureaucrats believe in self promotion of their works on social media when so called mainstream Media is only interested in "scams" and "scandalous" news from them). But, now life will not be easy for Vinita Singhal, the new Tribal boss. There were some strong oppositions to her name from the beginning-- from the top! Singhal also shouldn't forget Verma is in good books of many ACS's too. But then what was the reason of Verma's transfer? My source, says, just meet the Minister. So it is said, K C Padvi was so infuriated with Verma, that he made her transfer a prestige issue with both Ashok Chavan & Balasaheb Thorat who then went to the CM and got it done. Heard one or two dalaal's and biggest suppliers of this department did accompany too...Now waiting for some "Express" news as the reporter was doing the rounds of the floor on the day of Verma's transfer. 

In all of this, if an if Mehta gets promoted to the CMO with Cabinet rank, what happens to senior IAS officers like Ashish Kumar Singh & Vikas Kharge? Any which ways, heard their power and their works have been restricted to that of an ordinary PA since the time they have resumed office at the CMO. And now if Mehta comes here, I'm worried, unkaa "Gagrani" naa ho jaye...

Also, I feel this government is acting a bit tough on some good IAS officers. OK, in IAS there is a very stupid rule, that you won't get your salary if you are not posted anywhere. But this government, ACS Sitaram Kunte fought for it in the Cabinet and now any IAS officers will get paid even if they aren't posted anywhere. BTW, in this battle Rajiv Jalota who wasn't posted anywhere since months had to forego his salary. Now after the new rule, he might get the arrears, but ultimately he will have to forego some part. A punishment for an upright officer, who does not have any other avenues to sustain like others....

The number in 'restless' souls in IAS is showing an upward trend in the bureaucracy of Maharshtra against CS Ajoy Mehta. If you ask me personally, he is a great officer. A go-getter! But, but, but...he has taken some calls which weren't appreciated by 99% , he has some strong opposition in IAS/IPS lobby and the Congress & NCP , yet, even today his call is final. CM Uddhav Thackeray just cannot function without him. A man who has retired 6 months ago, who himself is on extension, now if he goes, should leave with everyone praising him and not "bitching" behind him...I know, many calls what Mehta has taken might be great in the longer term, but at the end this is no anarchy, sir ! Every officer, big or small, is living in fear, which is not good especially during these testing times when bureaucracy should have been united! 
Hence the title sir, "Jaane Bhi Do Mehta ji...."

Last but not the least--the PWD debacle of Rs. 350 crore tender is back to haunt the Government...Be careful, Mr. Manoj Saunik!!! You might be made a scapegoat here....Next CS? Heart says Kunte or Pardeshi but 'my business' mind says Sanjay Kumar. 

Vikrant Hemant Joshi 
Monday, 22 June 2020

फीर एक बार शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी


Felt like sharing a very important information:

There has been demolition going on the 6th floor of Mantralaya right next to CM's cabin. No, not to accommodate Aaditya! It is made to make a huge cabin for a soon to be appointed PA. 'PA' can be Principal Advisor or a Private Assistant!! But we all know who the Private Assistant of CM Uddhav Thackeray is....Now, no price for guessing who will be taking this post with Cabinet status very soon...

Vikrant Joshi.

फीर एक बार शरद पवार : पत्रकार हेमंत जोशी 
 जे करतो तेच सांगतो, या दिवसात मी जे करतो आहे ते तुम्हीही करा.वाचकहो, दररोज काही ओळखीच्यांना मित्रमैत्रिणींना फोन करून फोन वरून खुशाली विचारत चला, या दिवसात ज्याला त्याला प्रत्येकाला कदाचित आर्थिक नसेल पण मानसिक आधार देण्याची नितांत गरज आहे, फोन करणे जमत नसेल साधा मेसेज करा पण ओळखीच्यांना त्याची खुशाली विचारा, त्यातून कोणीतरी आपल्या पाठीशी आहे अशी भावना निर्माण होते आणि आलेले येणारे नैराश्य दूर पळून जाण्यास त्यातून आपली इतरांना मदत होते. अगदी अलीकडे काँग्रेसच्या डॉ. गजानन देसाई यांचा फोन आला होता तेव्हा मला कळले कि आमच्याच ग्रुप मधले एक मित्र जितेंद्र गोस्वामी एक दीड महिन्यापूर्वीच गेले, तसे ते अपघातानंतर वर्षे दीड वर्षे विकलांग अवस्थेत अंथरुणावरच पडून होते आता गेले. मित्र वर्तुळातील एक जातो आणि आपल्या कळत नाही हे असे सध्या खूप होते आहे अलीकडे पितृतुल्य वसंतराव कुलकर्णी गेले त्यांच्या अंत्यदर्शनाला ना मला जाता आले ना त्यांच्या पोटच्या एकुलत्या एक लाडक्या मुलाला आपल्या अत्यंत लाडक्या बापाच्या अखेरच्या दर्शनासाठी, सारेच कठीण होऊन बसले आहे, दुष्ट चिन्यांनी शेवटी डाव साधलाच पण आपण भारतीय अजूनही निर्लज्ज आहोत चिनी उत्पादने सोडायला तयार नाही, प्रत्येकाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालावा... 

कोण होते जितेंद्र गोस्वामी आणि कोण आहेत डॉ. गजानन देसाई. सुरुवात शरद पवारांपासूनच करूया म्हणजे या दोघांविषयी सांगणे सोपे जाईल. शरद पवार यांचे वागणे किंवा जवळच्यांना खुश करणे तिरुपतीच्या न्हाव्यांसारखे आहे, तिरुपतीचे न्हावी अनेक ग्राहकांना एकाच रांगेत आधी बसवतात मग प्रत्येक ग्राहकाची अर्धी अर्धी भादरवुन ठेवतात त्यातून ग्राहकाला आनंद होतो कि मेरा नंबर आ गया पण त्याला तेथून धड उठताही येत नाही कारण अर्धीच भादरवुन ठेवलेली असते.म्हणजे ग्राहक कंटाळून उठून बाहेर समजा पडले तर हास्यास्पद तेच ठरते कापणारा नाही त्यामुळे वाट पाहत बसण्यापलीकडे त्या ग्राहकाच्या काहीही हाती उरलेले नसते. अमुक एखादा जेव्हा राज्याच्या राजकारणात झिरो असतो पण पुढे जाण्यासाठी जेव्हा धडपडत असतो एकदा का तो पवारांच्या नजरेत पडला कि झाला त्याचा तिरुपतीचा केस कापून घेणारा ग्राहक. म्हणजे शरण आलेल्याला त्यांच्या राजकीय कळपात सामील झालेल्याला पवार नक्की आर्थिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या मोठे करतात पण त्या नेत्याला कार्यकर्त्याला त्याच्या जे मनात असते ते मिळवून देतांना त्याची अवस्था तिरुपतीच्या केस कापून घेणाऱ्या ग्राहकांसारखी करून ठेवतात जे नेमके डॉ. गजानन देसाई किंवा दिवंगत जितेंद्र गोस्वामी किंवा बाप्पा सावंत दिनकर तावडे दिवंगत गोविंदराव आदिक इत्यादी बहुतेक साऱ्यांचे झाले. असाच एक अस्वस्थ पवारप्रेमी जितेंद्र गोस्वामी म्हणाल तर आर्थिक सुबत्ता पण म्हणाल तर भंगलेली राजकीय अँबिशन येथेच सोडून गेला, आमच्या या मित्राला श्रद्धांजली वाहतो व पुढल्या लिखाणाला लागतो....

www.vikrantjoshi.com

सांगलीचे  जयंत पाटील आज देखील गुढग्याला बाशिंग बांधून तयार आहेत मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना कानात जाऊन सांगा वाट पहा म्हणून. यात नेमकी चूक कोणाची तर पवारांची नक्की नाही. घाई त्या त्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना नडते. जे चतुर असतात ते शांत राहतात आणि आपला जितेंद्र आव्हाड करून घेतात मोठा राजकीय आर्थिक सामाजिक साराच मोठा फायदा करून घेतात, घाई करणाऱ्यांचा अजितदादा होतो कारण मी तर तुम्हाला आधीच सांगितले आहे कि पवारांच्या पुढून कधीही जायचे नसते त्यांना राजकारणात कधीही ओव्हर टेक अजिबात करायचे नसते, आहे तेथेच थांबायचे असते अन्यथा पवार अशावेळी जाम चिडतात त्यांचा सिनेमातला संतापलेला चिडलेला रागावलेला धर्मेंद्र होतो आणि ते ज्याच्यावर चिडले त्याचा भास्कर जाधव बबनराव पाचपुते करून मोकळे होतात. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात स्वतःला चोवीस तास झोकून दिले तरच तुम्हाला त्या त्या क्षेत्रातले राजा होता येते पवार यांचे असेच सतत या वयातही झोकून देणे आहे त्यांच्यानंतर हे असे एवढे झोकून देणे मी देवेंद्र फडणवीसांचे बघितले आहे त्यामुळे आजही राज्यातल्या सर्वाधिक बातम्या आणि चर्चा फडणविसांच्याच असतात. शरद पवार किंवा देवेंद्र फडणवीस असे फार कमी राजकारणातले सत्तेत, नसले तरी सुपर स्टार ठरलेले आहेत. दिवंगत जितेंद्र गोस्वामी असतील, नागपूरचे गिरीश गांधी किंवा त्यांच्यातलेच अनेक डॉ. देसाई यांच्यासारखे ज्यांना पवारांनी मोठी ताकद सर्वार्थाने दिली पण त्यांचा तिरुपतीचा केस कापून घेणारा ग्राहक करून ठेवला त्यातले मग काही शरद पवार यांच्यावर चिडले आणि त्यांच्यातून बाहेर पडले पण पुढे त्यातले कोणीही मोठे झाले नाही त्यापेक्षा ते जेथे होते तेथेच त्यांनी पवारांना घट्ट बिलगून मस्त चिपकून राहायला हवे होते फायदा कदाचित झाला नसता म्हणजे स्वप्नपूर्ती कदाचित झालीही नसती पण राजकीय आर्थिक नुकसान मात्र टळले असते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


Saturday, 20 June 2020

बायकांनो बिघडू नका : पत्रकार हेमंत जोशी


बायकांनो बिघडू नका : पत्रकार हेमंत जोशी 
आमच्या कुटुंबात एक ओळखीची विवाहित गुजराथी तरुणी आहे ती उत्तम फॅशन डिझाइनर आहे याच व्यवसायात तिचे उत्तम भागायचे पण कोरोना महामारीत व्यवसाय करणाऱ्या बहुतेकांची जशी धूळधाण उडाली आहे त्यातून बहुतेकांची चांगलीच फाटली आहे तिचेही नेमके तेच झाले व्यवसाय पूर्ण ठप्प झाला पण ती हिम्मत हरली नाही तिने या तीन महिन्यात शांत न बसता घाबरून न जाता फूड इंडस्ट्री मध्ये पाऊल टाकले, मला एक चांगली सवय आहे, मी मुंबई पुणे महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही गेलो तर त्या त्या ठिकाणची उत्तम लोणची शोधून काढतो आणि विकत घेतो, कधी एखाद्या सुग्रण कुटुंबात गेलो तर तेथून निघतांना त्यांच्या घरी तयार केलेली लोणची मुद्दाम पॅक करून घेतो, वृत्तीने आणि जातीने भटजी वरून पत्रकार आहे त्यामुळे दारूच्या बाटलीऐवजी लोणचे मागतांना मला मागायला लाज वाटत नाही थोडक्यात आजतागायत मी अनेक उत्तमोत्तम लोणच्याचा स्वाद घेतला असेल पण अलीकडे आमच्या या गुजराथी तरुण स्त्रीने सॅम्पल म्हणून पाठवलेले लोणचे, तुम्हाला म्हणून सांगतो, आजपर्यंत एवढे अप्रतिम स्वादिष्ट चवदार लोणचे माझ्या खाण्यात आलेले नाही, मुलाचे पाय पाण्यात, ती या क्षेत्रात देखील नक्की यशस्वी होईल आणि कुटुंबाला पुन्हा हातभार लावेल....

कोरोना महामारीत अनेक विशेषतः मराठी कुटुंब रस्त्यावर येणार आहेत कारण अनेकांना व्यवसाय फटका बसला आहे बसणार आहे तर कित्येकांच्या नोकऱ्या जाणार आहेत पण हे संकट म्हणजे चालून आलेली संधी म्हणून त्याकडे बघा आणि हसत खेळत नवीन काहीतरी सुरु करून त्यातही मोठे व्हा यश संपादन करा विशेषतः तरुण मराठी स्त्रियांनी या आर्थिक मंदीच्या संकटात आपला पाय घसरणार नाही याची मोठी काळजी घ्यावी कारण आमच्यातले विकृत तुमच्या मजबुरीकडे बारीक लक्ष ठेऊन आहेत, महत्वाचे म्हणजे ज्यांना मजबूर स्त्रियांचे शरीर हवे असते त्यांना अशा तरुण स्त्रियांसाठी नक्की काहीही करायचे नसते मदत सहकार्य करण्याचा विकृतांचा केवळ एक बहाणा असतो. यापुढे एकाचवेळी उत्पन्नाची अनेक साधने हि संकल्पना ध्यानात घेऊन ठेवूनच मराठी कुटुंबांना नोकरीत किंवा व्यवसायात राहायचे जगायचे आहे हे यापुढे साऱ्यांनी पाठ करून ठेवावे, म्हणजे कठीण प्रसंगातही आपले आर्थिक गणित फारसे बिघडणार नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे व्यवसाय बुडाला किंवा नोकरी गेली म्हणून विशेषतः मराठी तरुण जोडप्यांनी व्यसनांना जवळ करून आपले उर्वरित आयुष्य उध्वस्त करून घेऊ नये, तुम्हाला बिघडवायला माणसे आतुर असतात कृपया अशा मंडळींपासून चार हात लांब राहा आणि हिम्मतीने कामाला लागा... 

www.vikrantjoshi.com

भले भले कोरोना महामारीनंतर पूर्णतः बदलले दिसतील विशेषतः हिम्मत न हरता तुमचे आमचे अनेक मित्र उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी नक्की काहीतरी चांगले करतील म्हणजे उद्या उदय तानपाठक मुलुंड चेक नाक्यावर बुढीके बाल विकतांना दिसेल किंवा कैलास म्हापदी टेंभी नाक्यावर खारे शेंगदाणे विकतांना दिसू शकतो किंवा मंदार फणसे चार घरी जाऊन इंदोरी साड्या घ्या म्हणून आग्रह करतांना दिसेल किंवा आशिष मोहदरकर पुण्यातल्या पान टपऱ्यांवर जाऊन कंडोमचे प्रमोशन करतांना दिसेल किंवा प्रल्हाद जाधव कुठेतरी चायनीज ची गाडी लावून नूडलस करतांना दिसतील किंवा भली भली माणसे एखाद्या मॉल मध्ये मॉलिश तेलाचे प्रमोशन करतांना दिसतील किंवा एखाद्या  मेडिकल स्टोअर्स बाहेर उभे राहून गर्भनिरोधक गोळ्या विकतांना दिसतील अगदी सुकृत खांडेकर पण तुम्हाला माहीमला सुके बोंबील विकतांना दिसू शकतात. मित्रहो, कदाचित माझीही एखाद्या नाक्यावर कॉफीची टपरी असेल आणि माझ्या शेजारी माझा पत्रकार भाऊ भजी तळताना दिसेल, या महामारीत काहीही घडू शकते अगदी टीना आणि अनिल अंबानी तुम्हाला हातगाडीवर भाजी विकतांना दिसू शकतात पण तुम्हाला हेच सांगायचे आहे कि आयुष्याच्या अखेरच्या श्वासापार्यंत हिम्मत हरायची नसते, मार्ग शोधून परिस्थितीवर मात करून पुढे पुढे जायचे सरकायचे असते. कोरोना महामारी मध्ये आधी आपला जीव वाचणे महत्वाचे आहे कारण राज्य सरकारला हि परिस्थिती फारशी सांभाळता आलेली नाही त्यामुळे वातावरण गंभीर आहे उद्या प्रेत ठेवायला जागा नाही असे बोर्ड लागलेले तुम्हाला दिसलेत तर  त्यात फारसे आश्चर्य वाटून घेऊ नका...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Wednesday, 17 June 2020

मीडियाची ऐसीतैसी : पत्रकार हेमंत जोशी


मीडियाची ऐसीतैसी : पत्रकार हेमंत जोशी 
महाराष्ट्र टाइम्सचा अतुल आंबेरकर अचानक गेला, अलीकडे वृत्तपत्रातून अनेकांना तडकाफडकी कोरोना महामारीत काढल्या जाते आहे अशा काढणाऱ्यांच्या यादीत आपले नाव असल्याचे अतुलला कळले असावे म्हणून त्याला हा धक्का सहन झाला नाही का त्यावर अर्थात पत्रकार सुशील आंबेरकर व्यापक सांगू बोलू शकतील. ज्यांच्या भरवशावर आपण मोठे झालो गब्बर झालो त्याच स्टाफला मीडिया मालक अशी रांडेची ट्रीटमेंट देतात कारण त्यांना एक काढला तर अनेक पर्याय उपलब्ध असतात. आमच्याकडे जय महाराष्ट्र हि बातम्या देणारी वाहिनी दिसणे बंद झाल्यावर ती वाहिनी बंद पडली कि काय त्यामुळे छातीत क्षणभर धस्स झाले नाही तर या वाहिनीचा मोठा आधार अतिमोठा आदर्श तडफदार वाक्य वाकबगार प्रसाद काथे आम्हाला दिसणार नाही म्हणून मन अस्वस्थ झाले जसे लोकमत किंवा झी वरून उदय निरगुडकर किंवा निखिल वागळे यांच्या अचानक गायब होण्याने आमचे डोके भणाणले होते. अतुल मानसिक धक्क्याने गेला लोकमत मधल्या 750 लोकांना या महामारीत काढल्यानंतर तेही जिवंत असून मेल्यागत झाले आहेत. ज्यांच्या भरवशावर शेठजी कमावून मोकळे झाले आहेत त्यांना त्यांनी चार पाच महिने सांभाळू नये, पुढारी सकाळ दैनिकाने फक्त ४०% वेतन देणे किंवा देशोन्नती सारख्या शेठजींच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या दैनिकाने देखील ५०% वेतन देणे म्हणजे वृत्तपत्र मालक किती व कसे हलकट हरामखोर हिडीस असतात त्यावर हि उदाहरणे...

मी एक बघितले आहे कि शासनात जो कोणी असतो ते सारेच वृत्तपत्र मालकांना मीडियाला विनाकारण फार घाबरून असतात त्यातूनच विविध मान्यवर वृत्तपत्रे माहिती आणि जनसंपर्क विभागाला अक्षरश: ब्लॅकमेल करून ज्या दरदिवशी मोठ्या रकमेच्या जाहिराती उकळतात अप्रत्यक्ष अशी वृत्तपत्रे जनतेच्या पैशांची गेली कित्येक वर्षे लूट करताहेत त्याविरोधात आवाज उठविणे किंवा शासनाच्या जाहिरातींसंबंधात शासनाला व जाहिराती लुबाडणार्या वृत्तपत्रांना न्यायालयात खेचणे अत्यंत आवश्यक व गरजेचे आहे, है कोई हिम्मतवाला माय का लाल ? आपले हात बरबटलेले नसतील तर मीडियाला घाबरण्याचे काहीही एक कारण नसते पण या देशातले या राज्यातले सत्तेशी संबंधित जवळपास सारेच खूपच बरबटलेले असल्याने मीडिया विशेषतः विविध वृत्तपत्रे या मंडळींना ब्लॅकमेल करून वर्षानुवर्षे देशाला राज्याला लूट लूट लुटताहेत. ठिकठिकाणी खुबीने आवृत्त्या काढायच्या मोठे खप दाखवायचे व महागड्या शासकीय जाहिराती ढापायच्या वृत्तपत्रांचा हा मोठा खोटा धंदा, त्याविरोधात एकही नेता अधिकारी समाजसेवक मंत्री आमदार खासदार कोणीही बोलायला तयार नाहीत हि अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कोरोना महामारीत विविध दैनिकांच्या ठिकठिकाणी निघणाऱ्या अनेक आवृत्त्या बंद करण्यात आलेल्या आहेत अत्यंत महत्वाचे म्हणजे नेहमीपेक्षा वृत्तपत्रांचे खप खूपच खाली आलेले आहेत, शासकीय जाहिरातींची मोठी रक्कम हि आवृत्त्या आणि खपावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते त्यामुळे आवृत्त्या बंद होणे आणि खप खाली येणे त्यावर आता शासनाने देखील वृत्तपत्रांच्या जाहिरातीच्या रकमेत कपात करणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे कारण शासनाकडे निधीची मोठी अडचण आहेच.... 

www.vikrantjoshi.com

मित्रहो, अजिबात गरज नसतांना विविध वृत्तपत्रांनी ज्यांना काढले त्यातल्या अनेकांनी माझ्याकडे विविध वृत्तपत्रांचे मीडियाचे मालकांचे संपादकांचे जी काय प्रकरणे दिलेली पाठविलेली आहेत ती वाचून मला प्रचंड मानसिक धक्का बसला म्हणजे माझ्याकडे आधी जे पुरावे होते ते अक्षरश: हिमनगाचे टोक होते, बघूया, संधी चालून आली कि असे पुरावे मी नक्की तुमच्यासमोर मांडेन. अलीकडे लोकमत दैनिकाने हे असेच  महाराष्ट्रातून तेही थेट दिल्लीत पाठवलेल्या नितीन नायगावकर या प्रतिनिधीला तडकाफडकी काढून टाकले त्याने आम्हाला जे नेमकी व्यथा सांगणारे पत्र पाठविले आहे ते वाचल्यानंतर हृदय पिळवटून निघते. रडू कोसळते. तो लिहितो, पत्रकारिता बेभरवशाची आहे आणि या क्षेत्रातील नोकरीच्या भरवशावर स्वप्न बघणे आणि कुटुंबाला दाखविणे हा स्वतःवर अन्याय आहे. दहा वीस पन्नास हजार पगार असलेल्यांना नोकरीवरून काढण्याचा सल्ला जे मालकांना देतात ते स्वतः मात्र लाखो रुपयांचे पॅकेजवर ठाण मांडून बसले असतात. असे बिलंदर लाखो कुटुंब उध्वस्त करण्यात विकृत आनंद मानतात. मी वयाने खूप लहान असलो तरीही पत्रकारितेकडे करिअर म्हणून बघण्याची चूक नव्या मुलांनी करू नये. मेहनत करायची तयारी असेल तर अनेक क्षेत्र आहेत इथे मेहनतीच्या भरवशावर नोकऱ्या टिकवता येत नाहीत हेच सत्य आहे. अर्थात नितीन नायगावकर चे ते लांबलचक पत्र येथे संपूर्ण देणे शक्य नाही पुन्हा त्यावर एकदा लिहिता येईल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी