Sunday, 8 December 2019

उद्धव ठाकरे नेमके कसे : पत्रकार हेमंत जोशी


उद्धव ठाकरे नेमके कसे : पत्रकार हेमंत जोशी 
मराठी माणसांचे काही फंडे अंदाज आराखडे विचित्र असतात, त्यांना साऱ्याच बाबतीत फार घाई असते अगदी बायकोला देखील पलंगावर घेतल्या घेतल्या त्यांना वाटते तिने गर्भार रहावे म्हणजे तेथेही घाई लगेच पाठ करून झोपण्याची,  सत्य सांगितले कि तुमचे म्हणणे असते हेमंत जोशी तुमचे लिखाण अधून मधून अश्लील असते. एखादी हसली म्हणजे फसली हे तर त्यांना कायम वाटते किंवा फेसबुकवर एखादीने लाईक केले म्हणजे ती तुमच्या प्रेमात पडली असे होत नसते. मग मला तर जगभरातल्या माझ्या मराठी वाचक स्त्रिया लाईक करतात त्यात माझं कौतुक करणेअसते त्याचा अर्थ त्या माझ्या प्रेमात पडल्या असा जर मी काढला तर मला कायमस्वरूपी संघ प्रचारकासारखे जगभ्रमंतीसाठी निघावे लागेल. काही मराठी पुरुष थेट आय लव्ह यु म्हणून मोकळे होतात तर काहींचे हळूहळू आडून पाडून त्याच मुद्द्यावर येणे होते. समजा एखादी तुमच्या प्रेमात पडली विवाहित मराठी पुरुषांनो तर असते का तुमच्यात ती हिम्मत तिचा हात हातात घेऊन तिला आधी आपल्या कुटुंबासमोर नेण्याची नंतर जगासमोर आणण्याचे धाडस. अजिबात नाही, अशावेळी तुमच्यासारखा गांडफट्टू या जगात नसतो, प्रेमात पडणाऱ्या स्त्री किंवा पुरुषांची फसवणूक करू नका, ज्यांची फसवणूक होते त्यांच्या आयुष्याची वाट लागते...
www.vikrantjoshi.com

नव्याने मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत देखील लगेच आपले अंदाज आराखडे सांगून मोकळे होऊ नका. मला शंभर टक्के खात्री आहे तुमच्यापैकी अगदी बोटावर मोजण्याइतक्या लोकांना ते नेमके कसे हे ठाऊक आहे त्या मोजक्या मंडळींमध्ये पुन्हा मंत्री झालेले सुभाष देसाई. शिवसेनेचे आतल्या गोटात ठरलेले होते कि विधान परिषदेवर निवडून गेलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान देणे नाही, असे असतांनाही सर्वात आधी सुभाष देसाई यासाठी कि उद्धव ठाकरे यांचा तो स्वभाव आहे म्हणजे एखाद्याशी मैत्री मग त्याच्यासाठी वाट्टेल ते आणि एखाद्याशी दुश्मनी घेतली रे घेतली कि तो एके काळी भलेही अतिशय जवळचा असेल पण प्रसंगी अतिशय ते निष्ठुर होतात व लाडक्यांची देखील थेट शिवाजी पार्कला रवानगी करतात, कोणत्याही परिणामांची काळजी चिंता पर्वा न करता. सुभाष देसाई यांना अगदी सुरुवातीपासून मातोश्रीवर अगदी किचनपर्यंत प्रवेश होता. १९९५ च्या दरम्यान त्यांच्या असे लक्षात आले कि ठाकरे कुटुंब सदस्यांऐवजी भलतीच स्वार्थी बदमाश बिलंदर मंडळी बाळासाहेबांच्या भोवताली कोंडाळे करून आहेत आणि बाळासाहेबांच्या नंतर कोण, त्यात थेट दूर दूर पर्यंत त्यांना कोणी दिसत नव्हते. विशेष म्हणजे तोपर्यंत उद्धव यांच्याकडे एक मवाळ साधे सिम्पल काहीसे अपरिपकव व्यक्तिमत्व म्हणून बघितले जात असे...

कमी बोलणे पण अत्यंत चतुर देसाईंच्या नजरेने मात्र उद्धव यांना हेरले आणि उद्धव यांचे व्यवस्थित ब्रेन वॉश करून त्यांना जर मार्गदर्शन केले तर त्यांच्यात बाळासाहेबांची जागा घेण्याची नक्की कुवत आहे हे सुभाष देसाईंच्या लक्षात आले आणि ते कामाला लागले त्यांनी प्रथम बाळासाहेबांना छान विश्वासात घेतले, कसे पुढे जायचे हे वेळोवेळी उद्धव यांना वडीलकीच्या भावनेतून सतत समजावून सांगितले आणि एक दिवस तेही बाळासाहेबांच्या हयातीतच, उद्धव पुढे आले, बघता बघता त्यांनी बाळासाहेबांचे पुढले वारसदार म्हणून स्वतःला शाबीत केले अर्थात हा ताजा इतिहास तुमच्यासमोर आहे, वेगळे काही सांगण्याची येथे त्यावर गरज आहे मला वाटत नाही. ज्या सुभाष देसाई यांचा उद्धव यांच्यां जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे, महत्वाचे म्हणजे ज्या देसाई यांनी  मालकाच्या म्हणजे बाळासाहेब व उद्धव यांच्या पुढे जाण्याचा कधीही प्रयत्न केला नाही ते देसाई आपोआप उद्धव यांच्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवून मोकळे झाले. हे असेही उद्धव आहेत जे आपली नेमकी मर्यादा ओळखून शिवसेनेची मनापासून सेवा करतात त्यांना ते असे कुवत असो अथवा नसो मोठे पद देऊन मोकळे होतात. सुभाष देसाई मंत्री होणे काळ्या दगडावरची रेघ होती...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

No comments:

Post a comment