Tuesday, 24 December 2019

जुहू चौपाटी : पत्रकार हेमंत जोशी


जुहू चौपाटी : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे मी जुहू चौपाटीवर सकाळी सकाळी फिरतांना जे समोर बघितले ते बघून कमालीचा अस्वस्थ झालो, जे स्वतःच्या डोळ्याने बघितले ते किळस आणणारे दृश्य काही केल्या डोळ्या समोरून हलेना एवढे ते दृश्य मनाला अस्वस्थ करून गेले. एक जोडपे आणि त्यांचे तीन चार वर्षांचे लहान मूल आमच्या पुढे पुढे चालत होते, मधूनच ते लहान मूल दुडू दुडू धावायचे मग त्याच्यापाठी त्याचे आई किंवा बाबा धावायचे असे त्यांचे सुरु असतांना मधेच ते मूल थांबले आणि त्याने रेतीवर पडलेले काहीतरी हाती घेतले, एकाचवेळी आमचे आणि त्याच्या आई वडिलांचे त्याकडे लक्ष गेले आणि आम्ही अस्वस्थ झालो कारण त्या मुलाने वापरलेले कंडोम हाती घेऊन त्यासी खेळायला त्याकडे कुतूहलाने बघायला सुरुवात केली होती, मी पटकन जवळ गेलो आणि त्याच्या हातातली घाण दूर फेकून चालायला लागलो...

www.vikrantjoshi.com

जुहू चौपाटीवर सकाळी फिरतांना वापरलेले आणि इतस्ततः पसरलेले विखुरलेले कंडोम्स बघणे आता आम्हा सर्वांना नित्याचेच झाले आहे. नारायण राणे यांच्या भव्य निवासापासून आम्ही फिरायला सुरुवात करतो, तेथपासून तर जुहू चौपाटी संपेपर्यंत शेकडो कंडोम्स दर दिवशी आम्हाला तेथे बघायला मिळतात. एका भेळ विक्रेत्याकडून मी माहिती घेतली असता, असे समजले कि रात्री चौपाटीवरची गर्दी ओसरली कि पोलिसांच्या साक्षीने कितीतरी जोडपी त्याठिकाणी येतात आणि सेक्स करून मोकळे होतात विशेष म्हणजे या जोडप्यांना तेथे अर्धा तास वेळ दिल्या जातो आणि चटया देखील भाड्याने दिल्या जातात. तेथे पेरलेले दलाल पैसे घेतात आणि जोडप्यांची वेळ संपली कि भाडे वाढवून मागतात किंवा  तेथून जायला सांगतात. जुहू चौपाटीच्या मध्यावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी पोलीस चौकी आहे विशेष म्हणजे पोलीस सतत चौपाटीवर कधी पायी कधी सायकलवर तर कधी जीप मध्ये गस्त घालतात, वेगळे सांगायला नको, हा फ्लोअर शो पोलिसांच्या आशीर्वादाने चालतो...

जेथे सर्हास रात्री बारा नंतर सेक्स केल्या जातो त्या हद्दीत सामान्य माणसाला अजिबात प्रवेश नसतो, पोलीस हाकलून लावतात. फ्लोअर शो बघायला थायलंडला जाण्याची गरज नाही, जुहू चौपाटी पुरेशी आहे. सर्वश्री पोलीस आयुक्त संजय बर्वे, आमदार अमित साटम, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, समाजसेवक राजेश सर्वद्न्य, आमदार आशिष शेलार इत्यादी जुहू चौपाटीशी संबंधित बड्या मान्यवरांना हात जोडून विनंती, कृपया यापुढे दरदिवशी जुहू चौपाटीवर फिरणाऱ्या कुटुंबियांना जनतेला लोकांना जगभरातल्या भेटी देणाऱ्यांना असे अश्लील किळसवाणे दृश्य बघण्याची नौबत येऊ नये याची काळजी घ्यावी, अतिशय लाजिरवाण्या अशा या प्रकाराला यापुढे तरी लगाम घालावा. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे मुंबईत खेळण्यासाठी अनेक मैदाने असतांना दर दिवशी याच जुहू चौपाटीवर भल्या पहाटेपासुन अनेक टगे तरुण गटा गटाने क्रिकेट फूटबॉल हॉली बॉल सारखे आक्रमक देशी विदेशी खेळ खेळतांना दिसतात. त्यांच्या जीवघेण्या खेळांमुळे अनेक आबाल वृद्धांना पर्यटकांना किंवा चौपाटीवर येणाऱ्या साऱ्याच मंडळींना अनेकदा इजा होते, या टग्यांची तेथे दहशत असल्याने त्यांना काहीही सांगणे उपयोगाचे नसते....

जगातल्या पर्यटकांचे अतिशय आवडते ठिकाण म्हणजे आमची जुहू चौपाटी पण पोलिसांच्या साक्षीने सहकार्याने जर पर्यटकांची तेथे लूट होत  असेल, लैंगिक विकृतीला अगदी उघड चालना मिळत असेल, तर आमच्यासारखे गांडू आम्हीच असे म्हणावे लागेल....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment