Thursday, 7 November 2019

लैंगिक समस्या व विकृती ४ : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक समस्या व विकृती ४ : पत्रकार हेमंत जोशी 
हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे कि कोणाच्याही परिस्थितीकडे बघून हसू नये, देव तीच वेळ एक दिवस मग तुमच्यावर देखील आणतो. हे जसे तुम्हाला माहित आहे तसे मला देखील माहित असतांना मी एक दिवसाआड नरिमन पॉईंट परिसरात ज्यांच्या व्यावसायिक कार्यालयांचे भरभक्कम कार्यालये उभे आहेत कधी त्या सुनील तटकरे यांच्याकडे बघून हसतो तर कधी मुकेश अंबानींकडे बघून हसतो, कधी डॉ. निरंजन हिरानंदानींकडे बघून हसतो तर कधी अजितदादांकडे बघून हसतो. असो, यातला गमतीचा भाग सोडा पण आम्हा भारतीयांची हि वाईट खोड आहे कि आम्ही स्वतःचे झाकून ठेवतो आणि दुसऱ्याचे अगदी वाकून वाकून बघतो नंतर इतरांकडे दुसऱ्यांच्या भानगडींचा प्रपोगंडा करीत फिरतो, जे अत्यंत वाईट आहे, असते. अहो, जेव्हा तुम्ही इतरांच्या दोषांवर बोट ठेवता दाखवता तेव्हा उरलेली तीन बोटे तुमच्या स्वतःकडे असतात हे कायम लक्षात ठेवले म्हणजे जेव्हा केव्हा आपले काही तरी चव्हाट्यावर येते तेव्हा इतरांची नक्की सिम्पथी मिळते...

माझ्या एका मित्राने आता तो हयात नसल्याने सांगतो, एक दिवस काळजीच्या सुरात मला येऊन सांगितले कि त्याच्या पेनिसवर खूप दिवसांपासून लाल रंगाची बारीक बारीक फोडे आलेली आहेत, हिम्मत करून तो गल्लीतल्या डॉक्टरांकडे गेला देखील पण जखम बरी होत नसल्याने लाजेखातर त्याला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे सांगितले. मी लगेच त्याला त्वचा आणि गुप्तरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेलो, त्यांनी पाच मिनिटात निदान केले कि हा गुप्तरोग वगैरे नाही तर त्याला मधुमेह असल्याने हे असे झाले आहे आणि पुढल्या दोन दिवसात त्यांनी त्याला बरे देखील केले. थोडक्यात बहुतेकवेळा लैंगिक समस्या फारशा गंभीर नसतात पण आम्ही भारतीय तद्न्य डॉक्टरांकडे जायला लाजतो घाबरतो त्यातून अशी संकटे विनाकारण ओढवून घेतो. पूर्वी केव्हातरी एकदा माझ्या एका मित्राचे आम्हा दोघांनाही आवडणाऱ्या मुलीवर प्रेम बसले तो माझ्यापेक्षा सरस आणि पोरगी गटविण्यात पटविण्यात एक्स्पर्ट त्याने तिला खुबीने पटविले पण जेव्हा ते खूप जवळ आल्यानंतर त्याच्या  लक्षात आले, तिच्या तोंडाला अतिशय घाणेरडा वास येतोय त्याला तिचे कोणतेही चुंबन घेणे शक्य नाही त्याने त्या न पटणाऱ्या पोरीला सोडण्याचे ठरविले, मग मीच त्याला सांगितले कि डेंटिस्ट कडे ताबडतोब जा, तिला सिगारेट आणि ती दररोज नियमित मांसाहार करते तो सोडायला सांग, दोघांनीही माझा सल्ला ऐकला, आता त्यांना दोन मुले आहेत. माझे तर हे ठाम मत आहे कि सिगारेट ओढणारे, दारु पिऊन आल्यानंतर कित्येक तास बायकोच्या ओठांचे चुंबन घेणारे एकप्रकारे दररोज आपल्या बायकोवर शारीरिक अत्याचार करतात जे अत्यंत लांछनास्पद आहे, बहुतेक भारतीय स्त्रिया एकपतिव्रत असल्याने त्या हे खपवून घेतात पण ते करणाऱ्या पुरुषांना आपल्या गलिच्छ तोंडाची लाज वाटायला हवी... शर्ट बदलवावा तसे आजकालच्या कार्पोरेट क्षेत्रात वावरणाऱ्या स्वतःला विनाकारण हायफाय समजणाऱ्या मुली नवऱ्यांना बदलतात कारण बहुतेकवेळा कारण हेच असते कि त्यांना खूप खूप वेळ दररोज नवऱ्याकडून दीर्घकाळ लैंगिक सुख हवे असते, नवर्यात नेमकी विविध चुकांनी विविध कारणांनी शिथिलता आलेली असते मग या मुली एकतर नवऱ्याला घटस्फोट देतात किंवा त्या शारीरिक सुख मिळण्यासाठी तगडा बॉयफ्रेंड ठेऊन घेतात ज्यामुळे पुढे त्यांच्या आयुष्यात त्यातून अनेक वादळें येतात, निर्माण होतात. त्यापेक्षा अशा जोडप्यांनी थेट त्यातल्या  तद्न्य डॉकटरांना गाठावे, औषधोपचार करवून घ्यावेत, समस्या नक्की दूर होते. केवळ शारीरिक शिथिलतेमुळे जेव्हा आपली बायको शारीरिक सुखासाठी अमुक एखाद्याकडे जाते, नवऱ्याला कळते, त्यासारखे त्या पुरुषाला तेव्हापासून दुसरे दुःख नसते, असा बिनधास्तपणा चांगला नाही, नसतो...
हेमंत जोशी.

No comments:

Post a comment