Thursday, 7 November 2019

लैंगिक विकृती व समस्या ३ : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक विकृती व समस्या ३ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे विक्रोळीला राहणारे एक ओळखीचे सद्गृहस्थ मंत्रालयात भेटले. त्यांची कहाणी हि सर्वसामान्य किंवा गरिबांच्या घरातली सत्य आणि किव करावीशी वाटणारी आहे. ते म्हणाले, पीएमसी बँकेत मी पै पै एकत्र करून रक्कम यासाठी जमा केली कि त्यातून माझ्या नवविवाहित मुलासाठी बदलापूर भागात वन रूम किचन घ्यायचे होते पण आता दूरदूरपर्यंत आशा मावळल्या आहेत. होते काय, घरात मी, पत्नी, तरुण मुलगी आणि नवपरिणीत दाम्पत्य. माझेही वय फारसे नाही म्हणजे मी ४७ आणि पत्नी ४४ वर्षे वयाची पण मुलगी अगदीच शेजारी झोपते त्यामुळे आम्ही इच्छा झाली तरी एकाच अंथरुणावर एखाद्या बहीण भावासारखे नाते जपतो, तिकडे केवळ पडदा टाकून मुलगा आणि सून असते, झोपते. सांगायला कसेसेच वाटते पण त्या दोघांचे रात्री बेरात्री निघणारे चित्कार फुत्कार आवाज ऐकून इकडे आम्ही तिघे लाजेने एकमेकांकडे मान वळवून झोपेचे सोंग घेतो. पहेलवानांची कुस्ती रंगात आल्यासारखे ते दृश्य आणि आवाज असतात. त्यांना नवपरिणीत असल्याने थांबवू शकत नाही आणि इकडे त्यांचे प्रणय आम्हाला सहन होत नाहीत पण त्यांना काही सांगताही येत नाही. नवपरिणीत दाम्पत्याचा प्रणय आवाजाविना म्हणजे दिवाळीतले फटाके आवाजविना किंवा झक्कास रस्सा जमून आलेली भाजी मिठाशिवाय खाण्यासारखे, हे असे हुबेहूब अनेकांच्या घरातले विदारक दृश्य आहे...

भ्रमणध्वनी, संगणके इत्यादींमुळे नको त्या वयातली मुले आणि मुली म्हणजे त्यांना तारुण्य काय नेमके, समजायला लागल्यापासून विशेषतः मुली फार लहान असतांना वयात येतात, अनेकांचे बहुतेकांचे आई वडील एकदा का बाहेर पडले किंवा या मुलामुलींना एकांत मिळाला रे मिळाला कि ते अगदी सर्हास ब्ल्यू फिल्म्स बघतात. कधी मुलगा मुलगी एकत्र बघतात किंवा अनेकदा त्यांचा ग्रुप जमतो मग दारू सिगारेटचा आस्वाद घेता घेता त्यांचे ब्ल्यू फिल्म्स बघणे सुरु होते त्यातूनच मग विकृती जन्माला येते. अलीकडे अतिशय लहान वयातल्या मुली आपले सर्वस्व अर्पण करून बसल्या असतात. अत्यंत वाईट प्रकार जो हमखास पाश्चिमात्य किंवा फार ईस्ट कंट्रीज मध्ये कायम नेहमी बघायला मिळतो तो असा कि वयाच्या १३-१४ व्या वर्षी अनेक घरातूनच मायबाप आपल्या मुला मुलींना दारूची चव बघायला सांगतात म्हणे काय तर त्यांनी आमच्यापासून काहीही लपवून ठेवता कामा नये, हे कसले हिंदू संस्कार. अगदी पर्वा माझी पुण्यातली मैत्रीण मला हेच सांगत होती कि तिच्या मुलास तिने कशी बिअर पाजली आणि त्याने ती कशी एन्जॉय केली. सर्वाधिक थर्ड ग्रेड मायबाप कोण असतील तर जे शाळेत शिकणाऱ्या पोटच्या मुलांना दारू एन्जॉय करायला सांगतात. माझ्या एका मैत्रिणीला मी हेच म्हणालो, वयात येणाऱ्या मुलीसमोर जो कधीही तुझा होणार नाही अशा बॉय फ्रेंड ला का आणतेस, उद्या तुझी मुलगी शिक्षण संपण्याआधी गर्भपात करून आली तर वाईट वाटून घेऊ नकोस...

हिंदू संस्कृती नुसार स्त्री आणि पुरुष ज्या पारंपारिक पद्धतीने लैंगिक सुखाचा आनंद घेता घेता मूल जन्माला घालतात मला वाटते या अशा शारीरिक संबंधातून जन्माला आलेले मूल देखील चांगले संस्कार घेऊनच जन्माला येते. पण विशेषतः अर्धवट दाम्पत्य जेव्हापासून ब्ल्यू फिल्म्सच्या आहारी गेले आहेत तेव्हापासून परंपरा सोडून विशेष म्हणजे ब्ल्यू फिल्म्स चा आदर्श समोर ठेवून शारीरिक संबंध ठेवू लागले आहेत घृणास्पद म्हणजे जे ब्ल्यू फिल्म्स मध्ये दाखविल्या जाते ते तसे करण्याकडे अलीकडे अनेक दाम्पत्याचा विशेषतः प्रियकर प्रेयसीचा कल असतो. एकाचवेळी एक नव्हे तर अनेक सोबतीला सेक्स करतांना हि विकृती मोठ्या प्रमाणात ब्ल्यू फिल्म्स बघण्याने बळावली आहे अशी माझी खात्री आहे, आपण भारतीय हिंदू देखील याचा सरळ अर्थ असा कि, रसातळाला चाललोय, जे धोक्याचे आहे...
क्रमश: हेमंत जोशी. 

No comments:

Post a comment