Monday, 4 November 2019

पुणे प्लस मायनस २ : पत्रकार हेमंत जोशी

पुणे प्लस मायनस २ : पत्रकार हेमंत जोशी 
काही माणसे काही संस्था केव्हा बुडतील किंवा केव्हा बुडवतील याच नेम नाही, नेम नसतो. भय्यू महाराजांनी अनेकांना आधी बुडवले नन्तर ते स्वतःच बुडाले तसे मुंबईतले अनिरुद्धबापू किंवा नाणीज चे नरेंद्र महाराज देखील त्यांच्या भक्तांना सध्या बुडवताहेत लुबाडताहेत पण त्यांना बुडवणारा एखाद्या खमक्या जेव्हा जन्माला येईल तो दिवस महाराजभोळ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा. अलीकडे अनिरुद्धबापूच्या बेंचवर बसणारा एक डॉक्टर त्याची ओळख झाली त्याने अनिरुद्ध बापूचे मेडिकलला असतानाचे जे वर्णन केले ते ऐकून पुन्हा एकवार खात्री पटली कि दिवंगत भय्यू महाराज आणि अनिरुद्ध बापू दोघात फारसा फरक नाही दोघेही एकाच माळेचे मणी म्हणजे भक्तांना लोकांना फसविणे हा एकमेव धंदा. आम्ही भारतीय कोणत्याही भामट्यांना देव मानून मानून मोकळे होतो...

खरेच काही लोकांवर विश्वासच बसत नाही सतत त्यांच्याविषयी संशय असतो जो पुढे नेमका खरा ठरतो. आजही मुंबईतल्या विठ्ठल कामत किंवा दुबईतल्या धनंजय दातार किंवा कॅनडाच्या डॉ. विजय ढवळे इत्यादींवर त्यांच्या बडबडण्यावर कितपत विश्वास ठेवावा त्याविषयी कायम मनात गोंधळ असतो अर्थात असे या जगात कितीतरी बोलघेवडे मी बघितलेले, खरेच या मंडळीवर विश्वास ठेवणे जड जाते पण रस्त्यात चुकून हि अशी माणसे कुठेतरी भेटतात मग त्यांची दखल  घ्यावीच लागते. अगदी अलीकडे बीव्हीजी ग्रुपचे सर्वेसर्वा उत्तम आणि यशस्वी उद्योजक हनुमंत गायकवाड यांच्या पुण्यातल्या बंगल्यावर जाणे झाले, त्यांनी उत्तम जेवूही घातले, एखाद्या ब्राम्हणाला आणखी काय हवे. हे खरे आहे कि ब्राम्हणाकडून काम करून घ्यायचे असेल तर आधी त्याला जेवू घालावे नंतर काम सांगावे आणि मुसलमानाकडून आधी काम करून घ्यावे मग त्याला जेवू घालावे. गायकवाडांकडे उत्तम डिनर झाले, त्यांच्या प्रेमात पडलो. गायकवाड हे कामत किंवा दातार इत्यादींच्या रांगेतले नसल्याने मनापासून त्यांच्यावर लिहावेसे वाटले...

हनुमंत गायकवाड हे नाव आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे विशेषतः जगातला असा एकही मराठी माणूस नसावा ज्याला बीव्हीजी ग्रुप आणि हनुमंत गायकवाड माहित नसावेत. मोठा उद्योगपती पण पाय जमिनीवर, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारतांना मजा आली. पुण्यातले सर्वाधिक यशस्वी आणि श्रीमंत म्हणजे मराठमोळे अविनाश भोसले त्यांच्या बंगल्याच्या अगदी अलीकडे यांचा तो बाणेर परिसरातला बंगला. अविनाश भोसले किंवा हनुमंत गायकवाड हि माणसे  प्रचंड मोठी पण गर्व नाही, भेटलेत कि आपुलकीने बोलतील, काहीतरी छान माहिती देऊन मोकळे होतील, गायकवाड यांच्या समवेत मी दोन अडीच तास होतो, एरवी मी बोलतो आणि जमलेले ऐकतात त्यांना माझे किस्से आनंद देतात पण गायकवाडांकडे वेगळेच घडले म्हणजे ते बोलत होते आणि मी कान देऊन शांतेतेने ऐकण्याचे काम करीत होतो. बोलण्याच्या ओघात त्यांनी त्यांच्यावर कॅनडाच्या डॉ. विजय ढवळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाची एक  प्रत मला भेट केली म्हणून येथे वर डॉ. ढवळे यांचे नाव निघाले, एरवी डॉ. ढवळे यांच्यावर कधी चांगले लिहावे असे वाटले नाही, कारणे फार वेगवेगळी आहेत. पण यावेळी चुकून माकून डॉ. ढवळे काहीसे भावले कारण त्यांनी योग्य मराठी माणसावर लिहिले, हनुमंतराव हे अजब रसायन आहे, तरीही डाऊन टू अर्थ आहेत...

माझी हनुमान गायकवाड या ग्रेट उद्योगपतींशी दिलदार वृत्तीच्या यशस्वी व्यावसायिक, समाजसेवकाशी ज्याने ओळख करून दिली तो पुण्यातला सचिन इटकर असाच पुणेकरांना शोभणारा म्हणजे सतत काही तरी वेगळे करणारा हरहुन्नरी समाजसेवक आणि व्यावसायिक देखील. सचिन इटकर यांना म्हणाल तर एक चांगली सवय आहे किंवा षौक आहे कि ते अनेकांना एकत्र आणतात त्यांची एकमेकांशी ओळख करून देतात आणि काहीही अपेक्षा न ठेवता बाजूला होतात म्हणून सचिन इटकर पुणेकरांना मनापासून आवडतात आणि जगभरातल्या त्यांच्या मित्रांनाही ते सतत सभोवताली हवे असतात, हवेहवेसे वाटतात. पुण्यातले रामदास फुटाणे असोत वा नागपूरसातले गांधी, गिरीश गांधी असोत, सचिन इटकर भेटले नाहीत तर आम्हाला चुकल्यासारखे वाटत राहते...
क्रमश: हेमंत जोशी 

No comments:

Post a comment