Saturday, 30 November 2019

Apologies...

Dear Readers,
SO last night at 2100 hrs my phone rang and it displayed the number 23515222. I answered and the operator said, Shri Sharad Pawar saheb would like to speak to you. Won't give the details of conversation but yes, the veteran sounded very upset with my yesterday's blog in which he thought the content was very delicate and personal. But through this blog of mine, as I promised Pawar, if and only if the alleged information which I had written is false, I regret & apologise for the same with folded hands. There was no intention to hurt such a senior and veteran politician and I do extend my apologies to his family and to everyone who were hurt by my writing. But readers, the information was neither clarified nor denied!
PS: As a mark of respect, I have removed the said blog from my website and Facebook page too...

Vikrant Hemant Joshi 

महाराष्ट्राची हास्य जत्रा : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


महाराष्ट्राची हास्य जत्रा : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 
सत्ता हि फेव्हिकॉल सारखी असते एकदा सत्तेची खुर्ची ढुंगणाला चिकटली रे चिकटली कि ती विरोधकांकडून काढता काढल्या जात नाही त्यामुळे महाआघाडी फार काळ टिकणार नाही या तुमच्या आमच्या म्हणण्याला फारसा किंवा अजिबात अर्थ नाही. हे तर असे म्हणणे झाले कि त्या दोघांचे भांडण झाले कि ती माझ्याकडे नक्की येणार आहे, त्यांचे पटणारच नाही असे माजी प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या आणि तिच्या नवर्याच्या बाबतीत म्हणण्यासारखे आहे. राज्याच्या राजकीय  घडामोडीत यावेळी वेगळे खूप काहीतरी घडणार आहे, अत्यंत महत्वाचे म्हणजे शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना पोटच्या मुलासारखे सांभाळून घेतील, सत्तेतल्या साऱ्या क्लुप्त्या शिकवतील, काय करायचे काय करायचे नाही हेही पवार मुख्यमंत्र्यांना नेमके समजावून सांगतील आणि पवारांच्या सांगण्यात काहीतरी स्वार्थ आहे डावपेच आहेत असे उद्धव यांना अजिबात वाटणार नाही ते खाली मान घालून एखाद्या  चतुर हुशार विद्याथ्यासारखे पवारांचे ऐकून घेतील, शरद पवार यांना मनातल्या मनात राजकीय गुरु मानून मोकळे होतील...

माझे अख्खे लिखाण तुम्ही संग्रही ठेवत चला आणि मी लिहिलेले जसेच्या तसे घडले नाही तर माझी टर खेचून मोकळे होत चला. यापुढे यशस्वीतेवर नेमकी कशी मात करायची याबाबतीत विशेषतः सतर्क सावध राहायचे आहे ते काँग्रेस व काँग्रेसच्या नेत्यांना मंत्र्यांना, अजित पवार यांना आणि भाजपा व देवेंद्र फडणवीस यांना. जे आमदार अजित पवार यांचे नेतृत्व मानणारे आहेत ते आजही त्यांच्यापासून फार दूर गेलेले आहेत असे अजिबात नाही कारण आमदारांनी अजितदादांचे म्हणणे ऐकले नाही आणि ते दादांनी बंड केल्यानंतर लगेचच शरद पवारांकडे निघून आले हे जे तुम्ही बघितले त्यातही फारसे तथ्य नाही त्यामागचे नेमके डावपेच मी नक्की कधीतरी पुरावे मांडून तुम्हाला सांगणार आहे पण एक नक्की घडणार आहे कि यापुढच्या पाच वर्षात दादा गटाचे आमदार दादांपासून कसे कायमचे दूर जाऊन दादांचे राजकीय भवितव्य खिळखिळे करण्याचा मोठा प्रयत्न होऊ शकतो, मला वाटते अगदी शपथविधीपासून तसे घडायला सुरुवात झालेली आहे. यावेळी शरद पवार यांनी आखलेली रणनीती अशी दिसते कि त्यांना शिवसेनेसोबत  सत्ता स्थापन करतांना शिवसेनेशिवाय इतरांची गरज पडू नये...

www.vikrantjoshi.com

ससा आणि कासवाच्या कथेतले यावेळी शरद पवार हे जिंकणारे कासव ठरले आहेत हे आता सर्वांना मान्य करायलाच हवे. पवारांचा राष्ट्रीय नेता म्हणून या साऱ्या गोंधळात ग्राफ उंचावला असल्याने मला तर असे वाटते या उंचावलेल्या ग्राफचा ते फायदा करवून घेतील कदाचित राष्ट्रवादीला काँग्रेस मध्ये आणून सोडतील वेगळी क्रांती घडवून आणून मोकळे होतील, फडणवीसनंतर मोदी आणि शहांच्या नाकात ते नक्की दम आणतील, नेमके हेच अमित शाह यांच्या लक्षात आले नाही आणि त्यांनी गरज नसतांना विनाकारण चुकीचे निर्णय घेऊन फडणवीस यांचे दोर कापले, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे घुमणारे वाक्य अमित शहा यांना लागले आणि त्यांनी राज्यातल्या भाजपाचे मोठे नुकसान करवून घेतले वरून स्वतःच्या पायावर देखील धोंडा मारून घेतला. राज्यातली भाजपा आज जिंकून देखील हरलेली आहे, इतर कोणीही नाही फक्त आणि फक्त भाजपाला पवारांनी अलगद जाळ्यात पकडून मोठी शिकार केलेली आहे. आकडे लावणारे कसे दिवसभर चांगली कमाई करतात आणि संध्याकाळी घरी परततांना सारी कमाई आकडयांवर लावून कंगाल होतात, भाजपाचे आकडे लावणाऱ्या मंडळींसारखे झाले आहे.  एक मात्र नक्की आहे जर पवारांना काँग्रेस मध्ये जायचे नसेल तर राज्यातल्या काँग्रेसने देखील आपला देवेंद्र फडणवीस आणि भाजपा होणार नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्याला हवे तसे वापरून घेतले आणि शिवसेना राष्ट्रवादी हे नाते अधिक घट्ट करून आपल्याला वाऱ्यावर  सोडले आहे, जर उद्या काँग्रेस नेत्यांना वाटून घ्यायचे नसेल तर त्यांनी राजकारणात अतिशय धूर्त खेळी खेळून यश मिळविणाऱ्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर बारकाईनर लक्ष ठेवायला हवे. एक नक्की आहे, भाजपाला पुन्हा एकवार यश संपादन करण्यासाठी मोठी मेहनत आणि कसरत करावी लागणार आहे, वाईट वाटते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Thursday, 28 November 2019

महाराष्ट्राची हास्य जत्रा : १: पत्रकार हेमंत जोशी

महाराष्ट्राची हास्य जत्रा : १: पत्रकार हेमंत जोशी 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असे अनेकदा घडते कि ते युद्धात हरतात पण तहात जिंकतात. विधानसभा निवडणुकीच्या खरे पाहता युद्धातही ते हरले होते पण तहात मात्र ते जिंकले त्यांची तीच हातोटी आहे आणि फडणवीसांच्या बाबतीत मात्र नेमके उलटे घडले, ते युद्धात जिंकले पण तहात हरले. भलेही महाआघाडीचे सरकार सत्तेत आलेले असेल पण या राज्यातले असे एकही घर नाही ज्या घरात फडणवीस यांचे बाबतीत वाईट वाटले नाही किंवा डोळ्यात अश्रू आले नाहीत. विदर्भात तर सुतक असल्यासारखे वातावरण आहे, जणू आपल्या घरातले कोणी गेले पद्धतीचे तेथे घरोघरी वातावरण आहे, ज्याचे त्याचे डोळे अश्रूंनी थबथबलेले आहेत. जे घडले ते अत्यंत वाईट घडले पण यापुढे तरी राज्याचे आणखी वाईट होऊ नये याची निदान मुख्यमंत्री ठाकरे यांनी जरी काळजी घेतली तरी देव पावला असे म्हणता येईल. पवारांकडून अपेक्षा ठेवणेच चुकीचे. अहो, ज्या मंडळींचे लुटणे व लुबाडणे राज्याच्या जनतेला असहाय्य्य झाले होते त्याच मंत्र्यांना तुम्ही रिपीट करताहात यापेक्षा आणखी वाईट आणि वाटोळे या राज्याचे काय होऊ शकते ?

www.vikrantjoshi.com

शरद पवार म्हणजे दगाबाजी पवार म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे पवार म्हणजे धोका पवार म्हणजे सिनेमातल्या खलनायकासारखे दगाबाज हे जे शरद पवार यांच्याविषयी सतत अगदी उघड बोलले सांगितले म्हटले जायचे तो डाग पवारांनी आयुष्याच्या संध्यकाळी साफ धुवून टाकला कारण भाजपाने अनेक प्रयत्न करूनही पवारांनी ना ठाकरे यांना धोका दिला ना त्यांनी काँग्रेसला फसविले. केवळ पवार होते आणि त्यांनी अगदी सुरुवातीला काँग्रेस व शिवसेनेला जे वचन दिले होते केवळ त्यामुळेच महाआघाडीचे सरकार अस्तित्वात आले आणि उद्धव मुख्यमंत्री झाले. त्यामुळे सतत महिनाभर पवार यांच्याविषयी ज्या अफवा मुद्दाम अनेकांनी पसरविण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न तर पवारांनी हाणून पाडलाच पण त्यांना जो मोठा डाग आजपर्यंत लागलेला होता तो देखील यानिमीत्ते पुसल्या गेला म्हणून पवारांना आता एकच सांगावेसे वाटते आणि त्या काँग्रेस च्या श्रेष्ठींना देखील हेच ओरडून सांगावेसे वाटते कि झालेल्या चुका कृपया पुन्हा करू नका, डागलेले डागाळलेले भ्रष्ट दुष्ट थर्डग्रेड लुटारू डाकू स्वभावाचे नेते आमदार त्यांना राज्याचे मंत्री राज्यमंत्री करू नका...

आज मला लगेच येथे फारसे काही शपथ घेतलेल्या मंत्र्यांविषयी वाईट सांगायचे लिहायचे नाही पण पुढले मंत्रिमंडळ देखील याच पद्धतीने शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस निवडणार असेल तर भाजपाला पुन्हा एकदा सुगीचे दिवस यायला फारसा वेळ लागणार नाही कारण आजच अचानक काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेत येण्याने येथील प्रत्येक माणूस मग तो कोणत्याही विचारांचा असेल अत्यंत मनातून अस्वस्थ आहे कारण त्याला आठवते आहे युती सत्तेत येण्यापूर्वी १९९९ ते २०१४ दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येक मंत्र्याने आणि राज्यमंत्र्याने या राज्याला लुबाडून ओरबाडून कसे नागडे केले होते ते, पण आघाडीचे नशीब जोरदार त्यांना पवार आडनावाचा फिनिक्स पक्षी भेटला आणि ते सत्तेत आले पुन्हा. मिळालेली सत्ता पुढले दहा वर्षे टिकवायची असेल तर याच शरद पवारांनी सर्वांना अक्षरश: दम भरायला हवा, खबरदार माझ्या राज्याला लुटले लुबाडले तर. शरदरावजी एक डाग तर तुम्ही पुसून काढला आता दुसराही डाग आयुष्याच्या संध्याकाळी  पुसून काढा, पैसे न खाणारे मंत्री आणि मंत्रिमंडळ, हे काम आता तुम्हीच करून दाखवा...
क्रमश: हेमंत जोशी 

Tuesday, 26 November 2019

सहज सुचलं म्हणून : पत्रकार हेमंत जोशी

सहज सुचलं म्हणून : पत्रकार हेमंत जोशी 
उद्या पैसे मोजून तुम्ही कदाचित बिपाशा सारख्या एखाद्या महागड्या तारिकेच्या कुशीत पडून तिला तुमच्या केसांवरून बळे बळे हात फिरवायला भाग पाडाल पण अगदी साध्या सरळ  सिम्पल बायकोची सर तिला नक्की येणार नाही कारण बायकोच्या बाहुपाशात प्रेम असते आणि पैसे मोजून करवून घेतलेल्या प्रेमाला केवळ व्यवहाराची जोड असते. आज माझ्याजवळ कितीतरी महागड्या कार्स आहेत पण माझ्या लहानपणी खेड्यातल्या रस्त्यावरून सायकलचे टायर हाताने गोल गोल फिरवितांनाची त्या कार्स मध्ये मजा नाही. आज स्वयंपाकघरात चिंचेचे ढीग पडलेले असतात पण लहानपणी झाडावर दगड मारून पाडलेल्या खाल्लेल्या चिंचांची आज मजा चाखता येत नाही, वयानुपरत्वे आज चिंचांकडे बघितले तरी दात आंबायला होतात. तारुण्यात एका रात्रीतून चार चार वेळा शारीरिक सुख घेणारे जेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी चार दिवसातून एकदाही नाही म्हणतात अशावेळी बायकोचे छद्मी हसणे सहन करण्यापलीकडे हातात काहीही नसते...

ज्या वयात जे मिळायला हवे ते त्या वयात निदान थोडेथोडके तरी मिळायला हवे. आमच्या लहानपणी ऐन महालक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी देखील जेव्हा फटाके फोडायला नसायचे तेव्हा केवळ झुरुन रडणे आमच्या हातात असायचे, आज मात्र मनात आणले तर लाखभर रुपयांचे फटाके फोडणे शक्य असतांनाही इच्छा होत नाही हे तर असे झाले कि जेव्हा उत्तेजक औषधे प्राशन केल्याशिवाय काहीही उपयोगाचे होत नाही, शरीरातली तलवार वार करण्याच्या परिस्थितीत नाही नेमकी एखादी उफाडी तुम्हाला खुणेने जवळ बोलावते आहे. पूर्वी जत्रेत तंबूच्या भोकातून तासन तास उभे राहून सिनेमा बघावा लागे कारण तिकीट काढायला चार आणे देखील खिशात नसायचे, अलीकडे मी न्यूयॉर्क मधल्या थिएटर मध्ये सिनेमा पाहता पाहता ढाराढूर झोपलो होतो. जत्रेतली पत्र्याची शिटी वाजवण्याची मजा काही और असायची, आज दरदिवशी कितीतरी मित्रांचे पंचतारांकित हॉटेलात जेवणाचे निमंत्रण असते पण जाणे होत नाही,  तिथे गेले तरी खाणे होत नाही पण ऐन तारुण्यात वडिलांच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडत असतांना एक दिवसाआड मिळालेले जेवण स्वर्गसुख देऊन जात असे...

मोहोल्ल्यातल्या वर्गातल्या शाळेतल्या मुलींबरोबर लगोऱ्या लंगडी आईबाबा आईबाबा विटी दांडू लपाछपी डॉक्टर डॉक्टर खेळण्यात जी मजा होती आता केवळ आठवणींमध्ये आनंद घ्यावा लागतो, मनात आले, आणले तरी यातले काहीही शक्य नाही, नसते. कोणताही पदार्थ खातांना तोंडाचा मोठ्यांदा आवाज आनंद देऊन जायचा आता मिटक्या मारणे होत नाही कारण खाण्या पिण्याचे वयानुपरत्वे आकर्षण राहिलेले नाही. पूर्वी आवडणाऱ्या मुलीच्या बापाने साधे बघितले तरी चड्डीत मुतायला व्हायचे आज ती वेळ मुलींच्या बापावर येते कारण आमच्यातल्या विकृत पुरुषांची तरुणींच्या बापांना धास्ती असते भीती वाटते. मित्रांनो, पैसे खूप मिळविले पण लहानपणी देवाघरी गेलेली माझी आई, मला पुन्हा कुठेही विकत घेता आली नाही. मित्रांची आई जेव्हा त्यांच्या केसांवरून मायेने हात फिरवते, मन गलबलुन येते. जेव्हा लाल डब्याच्या एसटीतून कुठेतरी जावे वाटे पैशांअभावी ते शक्य नसे, आज जगात कुठेही केव्हाही बिझिनेस क्लासने फिरतो तेव्हा हाच विचार मनात येतो ज्या वयात जे हवे होते ते देवाने मला का नाही दिले जसे वयाच्या दहाव्या वर्षी आईचे छत्र त्यानेच हिरावून नेले, सारे सोसायला आम्हाला एकटे सोडले...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

गुड बाय मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

गुड बाय मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
अलिकडल्या महिन्याभरात म्हणजे विधान सभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर जे काय घडले ते महाभयंकर होते, विविध चर्चा आणि अफवांना एवढे उधाण आले होते कि वाटायचे कदाचित हेही कानावर येईल उदय तानपाठक यांना हेमंत जोशी यांच्यापासून दिवस गेले आहेत, पत्रकार अभय देशपांडे बाळंतपणासाठी रजेवर गेले आहेत, निखिल वागळे यांचेदिवस भरत आल्याने त्यांना घाटीच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे काहीही कानावर पडण्याची येण्याची दाट शक्यता होती कारण जो तो स्वतःला राजकारणातला तद्न्य समजायला लागला होता. त्या संजय राऊत यांच्याविषयी तर नको नको ते बोलले जात होते, त्यांनीच शिवसेना भाजपा युतीचे शरद पवार यांच्या सांगण्यावरून वाटोळे केले हे तर मला वाटते जो तो ज्याला त्याला सांगत होता याचे कारण एकच कि मुख्यमंत्री होऊ घातलेले उद्धव ठाकरे नेमके कसे हे आजपर्यंत कोणाला फारसे कळलेच नाही याचे कारण म्हणजे उद्धव यांचा पेहराव आणि त्यांचे वागणे बोलणे ज्या पद्धतीचे आहे त्यावरून उगाचच बहुतेकांना वाटते कि त्यांना राजकारणातले फारसे कळत नाही, ते सल्लागारांच्या सांगण्यावरून आपले निर्णय घेत असतात आणि येथेच लोकांची फसगत होते...

जसजसे दिवस पुढे जातील तेव्हा लोकांना आता नेमके कळेल कि उद्धव ठाकरे कसे आहेत कारण पहिल्यांदा ते मातोश्री च्या बाहेर खऱ्या अर्थाने पडून जेथे कॉमन माणसाचा सतत संबंध येणार आहे, अधिकाऱ्यांशी सतत संबंध येणार आहे तेथे त्यांना आता यापुढे बसावे लागणार आहे त्यानंतर मित्रहो, तुम्हाला उद्धव नेमके कसे राजकारणी कळणार आहे, तो दिवस आता फार दूर नाही. मी मात्र त्यांचा जो अतिशय बारकाईने अभ्यास आजतागायत करीत आलो आहे, एवढे खात्रीने सांगतो त्यांच्यासमोर प्रसंगी शरद पवार देखील टरकून दबकून घाबरून वचकून असतील. आणि केलेल्या अभ्यासाच्या आधारे आणि घेतलेल्या नेमक्या माहितीच्या आधारे, विधान सभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार पत्रकार संजय राऊत जे सतत बोलत सुटले होते ते तसे बोलण्यासाठी ना त्यांनी आपली स्वतःची अक्कल वापरली ना त्यांनी मित्र शरद पवार यांचा आधार घेतला. या कालावधीत संजय राऊत जे जे बोलले ते ते सारे प्लॅनिंग आणि फिडींग फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचे होते. फक्त मधल्या काळात केव्हातरी एक दिवस राऊत काहीबाही मनाचे सांगून जेव्हा मोकळे झाले त्यानंतर उद्धव यांनी त्यांचे दोन दिवस फोन घेतले नाही त्यानंतर झालेली चूक राऊत यांनी मान्य केली नंतर सारे सुरळीत झाले, पार पडले...

www.vikrantjoshi.com

वास्तविक मी पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत कधीही अमुक एखाद्या सत्ताधाऱ्यांच्या मोहपाशात अडकलो असे कधीही झाले नाही. प्रत्येकाच्या बाबतीत जो चुकला मग तो कोणीही असो त्याला शब्दांतून धो धो धुतला आणि चांगल्या कामात एखाद्याचे कौतुक करतांना त्यात आपला फायदा काय व किती कधीही बघितले नाही. पण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत ज्यांना मी गमतीने सेवेंद्र म्हणतो माझे त्यांच्यावर प्रेम यासाठी उफाळून वर आले कि पहिल्यांदा असे घडत होते कि कोणीतरी विदर्भाच्या भल्यासाठी विशेषतः तेथील मजबूर शेतकऱ्यांसाठी झटत होते अर्थात ते देवेंद्र होते. तुम्हाला हे माहित नाही कि मी स्वतः शेतकरी आहे माझ्याकडे २३-२५ एकर ओलिताची शेती असूनही गेले दहा वर्षे सतत मला त्यातून कवडीची उत्पन्न नाही एवढे भीषण वास्तव विदर्भातील साऱ्याच शेतकऱ्यांचे आहे, आम्हा शेतकऱ्यांचे भले करणारा पहिला खरा मसीहा म्हणून या देवेंद्र वर मनापासून एक नेता म्हणून प्रीत जडली, आता ते सत्तेत नसतील तरीही त्यांच्यावर प्रेम तसूभर देखील कमी होणार नाही,  काही मिळण्याचे बंद झाले कि दूर व्हायचे अशी इतर अनेकांसारखी माझी पत्रकारिता नाही म्हणून जेव्हा फडणवीसांचा वर्षा बंगल्यावर शेवटचा दिवस मुक्कामी होता, मी आणि विक्रांत आवर्जून त्यांना भेटायला गेलो, छान गप्पा मारून परतलो, येतांना कारमध्ये डोळ्यात नक्की अश्रू होते, चालायचेच राजकारणात वर खाली होतच असते....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Sunday, 24 November 2019

काका चतुर पुतण्या आतुर : पत्रकार हेमंत जोशी

काका चतुर पुतण्या आतुर : पत्रकार हेमंत जोशी 
कालपर्यंत तुम्ही मला सतत मिठीत घेतले मुठीत ठेवले कुशीत घेतले कितीतरी कधी अगदी उघड तर कधी अंधारात पटापट मुके घेतले तर कधी भर चौकात झोंबले आणि कित्येक रात्री पलंगावर लोळवले, मला स्वप्ने दाखवलीत वचने दिलीत आश्वासने दिलीत गिफ्ट दिल्या कधी माझ्या मांडीवर डोके ठेवून आठवणीत रमलात  तर कधी माझे डोके तुमच्या खांदयावर घेऊन मला तुम्ही प्रेमाने कुर्वाळलेत, मला वाटले आता माझे सारे आयुष्य सुखासमाधानाने तुमच्या सोबतीने जगणे पण कसचे काय ती माझ्यापेक्षा सरस आणि सेक्सी तरुणी तुमच्या आयुष्यात आली आणि लग्न करणे तर दूर पण मला आता तुम्ही जवळून गेली तरी ओळखेनासे झाला आहात, हे असे आठवण व्याकुळतेने सांगणाऱ्या प्रेयसीसारखे शरद पवारांनी त्या राज ठाकरे यांचे करून ठेवले आहे कारण विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या राजकीय आयुष्यात राज पेक्षा काहीशा अधिक प्रभावी उद्धव ठाकरे यांनी प्रवेश केला आहे. कालपर्यंत अतिशय जवळ असलेल्या सख्य्या पुतण्याला अजितदादा यांना त्यांनी राजकीय जगणे मुश्किल करून टाकले नंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतण्यावर देखील तीच वेळ त्यांनी आणली, यापुढे फारसे आश्चर्य वाटणार नाही जर याच शरद पवार यांनी श्रीकांत ठाकरे यांच्या पुतण्याला देखील राज आणि अजित यांच्या पंक्तीला आणून बसविले भलत्याच, तिसऱ्याच नेत्याच्या एखाद्या प्रभावी पुतण्याला जवळ घेतले तर...

www.vikrantjoshi.com

लोकसभा निवडणुकी दरम्यान राज ठाकरे यांच्या गर्दी होणाऱ्या भाषणांचा विशेषतः त्यांच्या लावा रे तो व्हिडीओ, या लोकप्रिय ठरलेल्या भाषणातल्या फितींचा आपल्या विरोधकांना नामोहरम करण्या पवारांनी नेमका उपयोग करवून घेतला हे त्यावेळी राजकीय जाणकारांच्या फारसे लक्षात आलेले नव्हते पुढे मात्र ते बिंग फुटले आणि शरद पवारांनी मग अगदी उघड राज ठाकरे यांच्यावर असलेले प्रेम साऱ्यांना सांगितले. पुढे विधानसभा निवडणूक आली, या निवडणुकीत राज ठाकरे लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक प्रभावी ठरतील, भाजपाचे फार मोठे नुकसान करणारे असतील हे चाणाक्ष दिल्लीकरांच्या लक्षात आले आणि पवार राहिले बाजूला ईडीच्या चौकशीला ज्यांच्या खांदयावर पवारांनी बंदूक ठेवली होती ते राज ठाकरे सामोरे गेले त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत काहीसे अस्वस्थ राज ठाकरे लावा रे तो व्हिडीओ एकदाही म्हणू शकले नाहीत आणि त्यांची भाषणे लोकसभा निवडणुकीच्या माननाने जरी प्रभावी ठरली नाहीत तरी त्यांच्या प्रचाराचा फार  मोठा फायदा भाजपा सेनेचे उमेदवार पाडण्यात आणि राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यात शरद पवारांना झाला...

मीडिया च्या बाबतीत एरवी अतिशय सावध जागरूक असलेले भाजपा नेते विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत गोंधळात मात्र काहीसे गाफील राहिले आणि प्रत्येक बातम्यांच्या वाहिनीवर इतर कोणत्याही म्हणजे ना फडणवीसांची ना मोदींची ना उद्धव ठाकरे यांची भाषणे सतत दररोज खूप वेळ दाखविल्या रिपीट केल्या गेलीत ना हॅमर केल्या गेली, सतत दरक्षणी प्रत्येक बातम्यांच्या वाहिनीवर विधानसभा निवडणूक प्रचार दरम्यान भाषणे दाखविल्या गेली हॅमर केल्या गेली ती फक्त आणि फक्त राज ठाकरे यांची, हे कसे आणि कोणी घडवून आणले त्याची नेमकी माहिती जर मोदी शाह यांनी घेली तर मोठे बिंग फुटेल आणि ज्या वाहिन्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजपा विरोधकांकडून आर्थिक फायदा करवून घेतला त्यांना मोदी शहा यांच्याकडून वठणीवर आणणे सोपे जाईल. जाऊ द्या, याठिकाणी मला फक्त हेच सांगायचे आहे कि राजकारणात चालू प्रियकरासारखे नेते कायम आढळतात, कालपर्यंत जेथे राज यांचे मुके घेतले जायचे आज ती जागा उद्धव यांनी घेतलेली आहे, उद्या तेथे नक्की वेगळे कोणीतरी असेल, हे त्यांच्याबाबतीत इतिहास सांगतो. कालपययंत पवारांच्या संगतीने राज यांचा बोलबाला होता आता ती जागा उद्धव यांनी घेतली आहे. या दिवसात राज कोठेही नाहीत त्यांना अडगळीत जणू टाकल्या गेले आहे कारण आता त्यांना उद्धव महत्वाचे वाटू लागले आहेत जे उद्धव यांना अजिबात लक्षात आलेले नाही, त्यांनाही पुढे धोका आहे...आहे
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Friday, 22 November 2019

लाज वाटते : पत्रकार हेमंत जोशी

लाज वाटते : पत्रकार हेमंत जोशी 
काही पत्रकारांना काही समाजसेवकांना काही डोळस अभ्यासू नागरिकांना हे सतत वाटत असते कि या राज्यात प्रत्येक विविध राजकीय पक्षात जे डाकूंच्या रूपात आणि वेशात बहुसंख्य नेते सरकारी शासकीय प्रशासकीय अधिकारी दलाल पत्रकार मीडिया पर्सन नेते आमदार खासदार या मंत्री इत्यादी वावरताहेत त्यांचा येनकेनप्रकारेण खात्मा व्हावा किंवा असे काहीतरी घडावे कि त्यांना कायमची जरब बसावी पण असे कलियुगात अजिबात घडत नसते, कलियुगात मला वाटते केवळ भारताला मिळालेला तो मोठा शाप आहे. लाज वाटते घ्रुणा  येते त्या नागरिकांची मतदारांची कि जे डाकूच्या वेशात आवेशात भूमिकेत सदैव असणाऱ्या वावरणाऱ्या  नेत्याना अधिकाऱ्यांना मंत्र्यांना पाठीशी घालतात, त्यांच्या पाठीशी राज्यातले देशातले सारेच अंध नागरिक उभे राहतात. अमुक एक नेता आमचे भले करतो भलेही  तो राज्याचे देशाचे वाटोळे करणारा असेल हे तर असे झाले कि माझा नवरा रात्री अंथरुणावर मला बिलगून झोपतो ना मग भलेही तो बाहेर दिवसभर चार बायकांसंगे संभोग करून येत असेल, म्हणणाऱ्या बायकोसारखे...

पार पडलेल्या विधान सभा निवडणुकीत नेमके काय घडले तर आपले उमेदवार कसे निवडून येतील हे केवळ राज्यातल्या भाजपाचे  लक्षात आले नाही, त्याचा फायदा इतर साऱ्याच पक्षातल्या उमेदवारांना झाला त्या त्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी करवून घेतला. मला हे नक्की माहित आहे कि एकनाथ खडसे यांना नेमके सहकार्य करणे शेवटी शेवटी देवेंद्र फडणवीसांच्या देखील हाती उरले नसावे, भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींपुढे लोटांगण घालून देखील किंवा त्यांना सॉरी म्हणून देखील किंवा माझ्या हातून झालेल्या चुका नक्की पुन्हा होणार नाहीत हे सांगून देखील जळगाव जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर असलेल्या लेवा पाटील समाजाचे लाडके नेते एकनाथ खडसे यांचे काहीही सांगणे, मागणे त्यांच्या पक्षश्रेठींनी अजिबात ऐकले नाही त्यामुळे एकनाथ खडसे यांचे वैयक्तिक किती राजकीय नुकसान झाले त्यावर येथे फारसे महत्व न देता किंवा फारशी त्यावर तुम्हाला माहिती न देता मी एवढेच सांगतो कि खडसे यांना अडगळीत टाकणे त्यातून जळगाव पंचक्रोशीत भाजपाचे मोठे नुकसान झाले, पुढे काही वर्षे भरून न येणारे मोठे नुकसान झाले...

www.vikrantjoshi.com

अशा अनेक बायका असतात कि त्यांना जरा जरी घरात कोणी किंवा नवऱ्याने रागावले तर त्या थेट रस्त्यावर येऊन गोंधळ घालतात परिणामी घर आणि आपण स्वतः बदनाम होऊन मोकळ्या होतात. भाजपा श्रेष्ठींचे एकनाथ खडसे यांना टाळणे त्यांना डावलणे त्याचवेळी एकनाथ  खडसे यांचे एखाद्या गोंधळ  घालणाऱ्या बाईसारखे मीडिया समोर येऊन तोंडसुख घेणे त्यातून घडले असे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या खडसे समर्थकांनी विशेषतः  लेवा पाटील ज्ञातीने भाजपाला जळगाव पंचक्रोशीत अजिबात सहकार्य केले नाही मतदान केले नाही त्यामुळे काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर यांच्या मेव्हण्याला मलकापूर मतदार संघात म्हणजे मुक्ताईनगरला लागून असलेल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लेवा पाटलांनी मतदान केले आणि सतत निवडुणन येणाऱ्या उमेदवाराला म्हणजे भाजपचे चैनसुख संचेती यांना पराभूत केले. जातीय समीकरणानंचा नेमका फायदा फुंडकरांच्या मेव्हण्याने घेतला वरून त्यांना लेवा पाटलांनी मनापासून मतदान केले आणि निवडून आणले. जर एकनाथ खडसे यांना त्या परिसरात मोठेपणा देउन अपमानित न करता प्रचारात उतरविले असते तर वेगळे चित्र उभे राहिले
असते....

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांचे आपापसातील मोठे वैर त्यामुळे भाजपाचे अगदी सहज निवडुन येऊ शकणारे रावेर मतदारसंघातून हरिभाऊ जावळे पराभूत झाले तसेच या दोघांच्या वादात व समस्त गोंधळात स्वतः रोहिणी खडसे पराभूत झाल्या आणि चैनसुख संचेती तर धक्कादायक पद्धतीने पराभूत झाले. भाजपा संघाची माणसेच उमेदवारांना घेऊन बुडाले...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

शिरीष पै यांच्याविषयी : पत्रकार हेमंत जोशी


शिरीष पै यांच्याविषयी :  पत्रकार हेमंत जोशी 
माणसाने हे असे संकुचित होत जावे म्हणजे सर्वप्रथम त्याचे राष्ट्रावर प्रेम असावे तदनंतर ज्या राज्यात आपण राहतो त्यावर प्रेम असावे तदनंतर ज्या मुलुखातून आपण आलोय म्हणजे विदर्भ, मराठवाडा इत्यादी त्यावर नितांत प्रेम असावे तदनंतर आपल्या जिल्ह्यावर प्रेम करावे तदनंतर ज्या गावातून आलोय त्यावर प्रेम असावे तदनंतर आपल्या जातीवरही आपले प्रेम असावे इतरांनी आपल्या जातीला हिणविलें तर पेटून उठावे तदनंतर आपल्या कुटुंबावर आपले प्रेम असावे, अशा उतरत्या क्रमाने प्रेमाची परिभाषा असावी. शनिवार १६ नोव्हेंबर च्या लोकसत्ता चतुरंग पुरवणीत आचार्य अत्रे यांचे नातू आणि शिरीष पै यांचे चिरंजीव माझे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व राजेंद्र पै यांचा शिरीष पै यांच्यावर लिहिल्या गेलेला, शुभंकर मार्दव हा दीर्घ लेख हे अतिसुंदर अप्रतिम लिखाण वाचल्यानंतर मनाशी एवढेच म्हणालो कि राजेंद्र पै यांना अत्युत्तम लिखाणाचा वारसा मिळालेला असतांना आपण एका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाला का मुकलो आहोत म्हणजे हा राजेंद्र पै यांचा हलगर्जीपणा कि साहित्य वर्तुळातील दिग्गजांचे त्यांच्याकडे झालेले दुर्लक्ष...

ज्या अत्रे पद्धतीने म्हणजे काहीही न लपविता राजेंद्र पै यांनी अत्रे व पै कुटुंबाविषयी शुभंकर मार्दव मध्ये लिहिले आहे ते वाचून शिरीष पै, राजेंद्र पै विशेषतः व्यंकटेश पै यांच्याविषयी अनेक पैलू समोर येतात जे तुम्हा आम्हाला दूरदूरपर्यंत माहित नाहीत, ज्यांचे आचार्य अत्रे आणि शिरीष पै यांच्यावर प्रेम आहे त्यांनी हे लिखाण नक्की वाचावे आणि लेख संग्रही ठेवावा. कदाचित राजेंद्र पै यांना वाईट वाटेल पण मीही मनातले सांगतो किंवा जे इतर तुमच्या पाठी बोलतात ते सांगतो कि मराठी माणसाला जसे अत्रे यांचे काही स्वभावगुण आवडत नसत तशी त्यांना राजेंद्र पै यांच्या वडिलांविषयी फार मोठ्या प्रमाणावर नफरत होती, मनात यासाठी राग होता कि व्यंकटेश पै यांनी अत्रे यांना मानसिक छळले आणि शिरीष पै यांना तर  आयुष्याच्या अखेरपर्यंत सर्वोतपरी अतिशय त्रास दिला ज्यामुळे शिरीष पै यांचे मोठे नुकसान झाले...अत्यंत महत्वाचे म्हणजे जे मधुकर भावे यांच्यासारखे आजही अनेक पै कुटुंबियांशी सलोखा जवळीक घरोबा राखून आहेत किंवा दिवंगत काकासाहेब पुरंदरे तर कायम माझ्याशी गप्पा मारतांना हेच म्हणायचे कि आचार्य अत्रे यांना बुडविण्यात आणि मराठा दैनिक संपविण्यात कायम व्यंकटेश पै आघाडीवर होते...

अर्थात येथे तोंडे किती लोकांची धारावीत कारण व्यंकटेश पै यांच्याविषयी फार कमी चांगले सांगणारे मला येथे मुंबईत भेटलेत पण व्यंकटेश पै नेमके कसे होते हे जे राजेंद्र पै त्यांचे उच्चशिक्षित चिरंजीव अधिकाराने सांगू शकतात ते इतर कोणीही सांगणे अशक्य, नेमके या प्रदीर्घ अफलातून लेखात राजेंद्र पै यांनी जे व्यंकटेश पै यांच्याविषयी लिहिलेले आहे, वाचून आपले आजपर्यंतचे व्यंकटेश पै यांच्याविषयीचे सारे गैरसमज दूर होतात आणि ज्या पद्धतीने राजेंद्र आणि त्यांचे धाकटे बंधू उत्तम घडले वाढले हे लिखाण वाचल्यानंतर हेच लक्षात येते कि शिरीषताई आणि व्यंकटेश पै यांचे एकमेकांवर असलेल्या जीवापाड प्रेमातून त्यांच्यावर उत्तम संस्कार झालेले आहेत. या लेखातील शेवटच्या परिच्छेदात राजेंद्र पै यांनी त्यांच्या दोन पत्नी आणि मुलांविषयी काहीही न लपविता जे लिहिले आहे त्यात आचार्य अत्रे यांची झलक दिसते कारण अत्रे कायम आपल्या गुण दोषांसहित साऱ्यांना कायम सामोरे गेले, ना त्यांनी कधी आपले दोष लपविले ना त्यांच्या बऱ्या वाईट सवयी, म्हणून मी सतत अत्रेंना फॉलो करतो, स्वतःचे काहीही न लपविता लोकांना सामोरे जातो. अख्खे लिखाण वाचल्यानंतर जशा शिरीष पै आपल्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहतात त्याचवेळी हेही जाणवते कि राजेंद्र पै यांनी लिखाणात अत्रे व शिरीष पै यांचा वारसा चालवायला हवा होता जे दुर्दैवाने घडले नाही, आपण एका उत्तम लेखकाला नक्की मुकलो आहोत, अत्यंत महत्वाचे म्हणजे व्यंकटेश पै कसे होते हेही कळते...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Monday, 18 November 2019

पवारांचे घराणे : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे घराणे : पत्रकार हेमंत जोशी 
कुठल्याशा वाहिनीवर रोहित पवारांची मुलाखत बघितली आणि तेव्हाच सांगितले कि हे पोरगं राजकारणात नक्की पुढे जाणारं आहे नंतर तेच घडले थेट राम शिंदे यांच्या मतदार संघात घुसून रोहित यांनी त्यांना पराभूत केले. माझे भाकीत खरे ठरले. पवारांच्या घरात अजितदादा यांच्या बाजूने ऑफ कोर्स पार्थ पवार आहेत आणि आज तरी सुप्रिया सुळे व रोहित यांच्यात एकी आहे, अजित दादा यांच्यापेक्षा सुप्रिया व शरद पवार यांचे रोहित यांच्याशी विशेष अधिक सख्य आहे. पण शरद पवारांना हेही पक्के माहित आहे कि जर रोहित यांना अधिक प्राधान्य दिले मुभा दिली स्वातंत्र्य दिले मोकळीक दिली तर ते प्रसंगी भविष्यात म्हणजे शरदरावांच्या राजकीय निवृत्तीनंतर सुप्रिया यांना बाजूला सारून सिंहासन बळकावतील पण तो स्वभाव अजितदादांचा नसल्याने जरी शरदराव आणि अजितदादा या दोघात काही मतभेद मनभेद असलेत तरी दादांचा नेमका दिलदार स्वभाव आणि सुप्रिया यांच्यावर असलेले प्रेम सत्तेच्या सिंहासनावर बसविताना शरदराव कायम अजितदादा यांनाच प्राधान्य देतील...

www.vikrantjoshi.com

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि त्यानंतरही रोहित पवार यांची शरद पवार यांच्या सभोवतालची लुडबुड वाढलेली जेव्हा पवारांच्या हे लक्षात आले त्यांनी म्हणे अलीकडे रोहित यांच्या लुडबुडीवर काहीसे निर्बंध घातल्याचे माझी पक्की माहिती आहे. त्यांनी तसे खडे बोल रोहित पवारांना सुनावल्याचेही कानावर आले आहे. रोहित यांचे आजोबा म्हणजे शरद पवार यांचे सख्खे मोठे भाऊ दिवंगत आप्पासाहेब हे देखील तसे रोहित पद्धतीने राजकीय महत्वाकांक्षा राखून होते पण त्यांनाही शरद पवारांनी त्यापासून रोखले आणि बारामतीच्या समाजकार्यात तेवढे मर्यादित ठेवल्याचे मला पक्के आठवते. रोहित यांच्या स्पर्धेत राजकारणात उतरलेला पार्थ अजित पवार तसा म्हणाल तर काहीसा कच्चा लिंबू इनोसंट प्रेमळ आणि मनाने बापासारखा व शरद पवारांसारखा एकदम दिलदार, तो उदार भोळाभाबडा, तारुण्याचा मनमुराद आनंद घेणारा धमाल माणूस. बापावर नितांत प्रेम आणि बापाला घाबरणाराही म्हणजे अजितदादांचा आदर  ठेवणारा. विशेष म्हणजे पार्थ यास आपल्या राजकीय मर्यादा नेमक्या माहित असल्याने तो सतत दादांच्या मागे मागे सावलीसारखा राहून नेमके राजकारण समजावून घेतोय...

पार्थ पवार राजकारणात कदाचित रोहित यांच्या तुलनेत काहीसे हळूहळू आपले पाय रोवतील पण रोवलेले पाय घट्ट असतील आणि अजितदादा त्यांच्याकडून राजकारणातली नेमकी तालीम करवून घेतील हेही नक्की आहे. रोहित यांची आणखी जमेची बाजू म्हणजे त्यांच्या पाठीशी उभे असलेले त्यांचे सासरे म्हणजे पुणे जिल्ह्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक मगर कुटुंबीय, जसे विश्व्जीत पतंगराव कदम हे स्वतः मोठे आहेतच पण दुधात साखर म्हणजे जगश्रीमंत अविनाश भोसले यांची कन्या त्याची पत्नी असल्याने त्याला दुधात साखर जसे म्हटले तर वावगे ठरणार नाही तेच रोहित पवार यांच्याही बाबतीत म्हटल्यास योग्य ठरावे. एक मात्र नक्की शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीनंतर जर सुप्रिया यांनी रोहित यांच्याऐवजी अजितदादा यांचा मोठा भाऊ या नात्याने घट्ट हात हातात धरला तर ते त्यांच्या दृष्टीने नक्की फायद्याचे ठरणारे असेल अर्थात आज तरी सुप्रिया यांचा अधिक ओढा रोहित यांच्याकडे असल्याने आणि ते लक्षात आल्याने मध्यंतरी अजितदादा अज्ञातवासात निघून गेले होते, तसे पुन्हा घडू नये अन्यथा पवारांच्या घरी राजकीय फूट शरदरावांच्या राजकीय निवृत्तीनंतर पवार घराण्याचे मोठे नुकसान करणारी ठरेल,असे घडता कामा नये, रोहित पवार यांनी सत्तेची फार घाई करू नये...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

गोंधळी भाजपा वेंधळी सेना : पत्रकार हेमंत जोशी


गोंधळी भाजपा वेंधळी सेना : पत्रकार हेमंत जोशी 
बुद्धीची देवता आपल्यावर प्रसन्न आहे समजणाऱ्या राज्यातल्या भाजपा नेत्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमत लोकमत आपल्या बाजूने फारसे नाही हे अजिबात लक्षात आले नाही याचे आश्चर्य वाटते. राजकारण किंवा निवडणूक हा काय हिंदी सिनेमा कि शरद पवारांना म्हणे चंद्रकांत पाटलांना हे दाखवून द्यायचे होते  कि ते कोल्हापुरातून नव्हे तर पवारांच्या पुणे जिल्ह्यातून म्हणजे बालेकिल्ल्यातून निवडणूक जिंकून येऊ शकतात. केवळ या हट्टापायी राज्याचा एका प्रमुख पक्षाचा तेही फडणवीसांनंतर प्रभावी ठरलेला प्रदेशाध्यक्ष केवळ एका अशा मतदारसंघात अडकून पडतो जेथे मेधा कुलकर्णी अगदी सहज निवडून येणे शक्य होते, मेधा कुलकर्णींविषयी मतदार संघात नक्की नाराजी होती पण त्या पराभूत होणे अशक्य होते, झाले काय चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असूनही पुण्यात अडकून पडले साहजिकच त्यांना ना राज्यात फिरता आले प्रचाराला जाता आले ना त्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात त्यांना ठाण मांडून बसता आले...

चंद्रकांत पाटील पुण्यात अडकून पडलेले मग प्रदेशाध्यक्ष ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान कोण, भाजपा नेते जेव्हा या गोंधळात अडकलेले आहेत जेव्हा हे फडणवीसांच्या लक्षात आले, त्यांनी मग एक केले आपले विश्वासू साथीदार प्रसाद लाड यांना भाजपा कार्यालयात अप्रत्यक्ष प्रदेशाध्यक्ष म्हणून आणून बसविले. जरी प्रसाद लाड एक आमदार किंवा युवा नेते म्हणून काहीसे अनुभवी असले तरी नवख्या भाजपा मध्ये त्यांना विधानसभा निवडणूक सांभाळणे नक्की जड जाणार होते, नेमके तेच घडले, प्रसाद लाड यांनीं प्रचंड मेहनत घेतली पण चंद्रकांत पाटलांची बरोबरी करणे त्यांना शक्य नव्हते, भाजपाकडून हे असे बेशिस्त नियोजन अपेक्षित नव्हते. असे वाटते फडणवीसांनी पार पडलेली विधानसभा निवडणूक फार मोठ्या प्रमाणावर तेही अगदीच कच्च्या लिंबूंना घेऊन अंगावर घेतली आणि स्वतःचे मोठे नुकसान करवून घेतले. असे नाही कि देवेंद्र फडणवीस आता राजकारणातून संपले, नेव्हर, ते संपणारे नेते नाहीत याउलट ते यापुढे अधिक सावध पवित्रा घेत नक्की पुढे जातील, पुन्हा राज्यात किंवा त्यांच्या पक्षात भल्याभल्यांना मागे टाकतील...

आता काय फडणवीसांचे महत्व संपले आहे, व्हा त्यांच्यापासून बाजूला असा क्षणिक स्वार्थी विचार करणारे नेते किंवा मित्र नक्की पुढे पश्चाताप करतील याची खात्री बाळगावी. जत्रेत कमावलं नि तमाशात गमावलं अशी मात्र आज भाजपाची या राज्यातली अवस्था आहे कारण सतत पाच वर्षे फडणवीस यांना प्रत्येक ठिकाणी राजकीय दृष्ट्या यश मिळत गेले पण अगदी शेवटच्या टप्प्यात त्यांना हुशार शरद पवारांनी मागे खेचले, खिंडीत गाठून जनमत शरद पवारांनी मोठ्या खुबीने आपल्या बाजूला नेले. विशेषतः अनेक योजना आणूनही राज्यातली ग्रामीण जनता फडणवीसांच्या बाजूने उभी न राहता त्यांनी पुन्हा पवारांना जवळ केले. ज्या फडणवीसांकडे आम्ही उद्याचे देशाचे नेते केंद्रातले महत्वाचे अधिकारी म्हणून बघत होतो ते या क्षणी नक्की काहीसे मागे पडले आहेत पण मला शंभर टक्के खात्री आहे कि फडणवीस हे अतिशय सच्चे नेते असल्याने, त्यांचे सारे हेतू प्रामाणिक असल्याने ते नक्की पुन्हा एकवार फिनिक्स पक्षाच्या भूमिकेत शिरून भरारी घेतील, पुढे जातील. विधानसभा निवडणुकांपूर्वी जसे जनमत फडणवीसांच्या भाजपाच्या विरोधात गेले होते आज तीच वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर येऊन ठेपलेली आहे, त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीला जाऊन बिलगणे मिठी मारणे राज्यातल्या एकालाही आवडलेले नाही, उद्धव यांनी आपली लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर गमावलेली आहे. एक मात्र बरे घडले पवारांच्या तोडीस तोड नेता त्यांना जेरीस आणू शकणारा नेता फडणवीसांच्या रूपाने या राज्यात आता तयार झाला आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

Saturday, 16 November 2019

गदर्भ विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी

गदर्भ विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी 
विदर्भावर विदर्भाच्याच लोकांचे मतदारांचे प्रेम नाही अशी माझी अलीकडे खात्री पटलेली आहे. तुम्हाला हे माहित आहे किंवा नाही कि मी एकटा गेली कित्येक वर्षे लिखाणातून इतरांची आय बहीण घेत असतांना अतिशय हिमतीने विदर्भाची बाजू यासाठी घेत असतो कि माझा जन्म विदर्भातला आहे माझे जेमतेम शिक्षण विदर्भातच झाले आहे म्हणून विदर्भाच्या मातीशी बेईमानी करायची नाही मी अगदी सुरुवातीलाच ठरविलेले आहे. समोर साक्षात मृत्यू आला काय किंवा कोणताही हरामखोर गुंड तगडा नेता उभा राहिला काय, डगमगून जायचे नाही हेही मी ठरविलेले आहे. जात पात मी मानत  नाही जरी माझ्या ब्राम्हण या जातीचा मला अभिमान असला तरी, त्यामुळे समोरचा कोणत्याही जातींधर्माचा असला तरी अजिबात घाबरून पळून जायचे नाही हे देखील मी ठरविले आहे. विदर्भातल्या तमाम मंडळींना मी येथे यासाठी गदर्भ म्हटले आहे कि त्यांनी यावेळी विधान सभा निवडणुकीत शेण खाल्ले जे पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांनी न खाता ते सारेच्या सारे शरद पवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले...

जसे यावेळी मशिदीतून त्यांच्या मतदारांना सांगितले गेले कि महाराष्ट्रात इस्लाम खतरेमे है, तसे यावेळी संघवाले स्वयंसेवक एकत्र आले नाही तर मुस्लिम मतदार एकत्र आले आणि आपले गट तट विसरून त्यांनी त्या त्या ठिकाणच्या आपापल्या उमेदवारांना अतिशय नियोजनपूर्वक निवडून आणले. उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाकडून उभा असेल पण मुस्लिम असेल तर त्यांनी आपले एकही मत फुटू न देता त्या त्या ठिकाणच्या मुस्लिम उमेदवाराला मतदान केले भरघोस मतांनी बहुसंख्यने निवडून आणले म्हणजे मराठवाड्यातून अब्दुल सत्तार थेट शिवसेनेतर्फे उभे होते, मोगलांसाठी शिवाजी महाराज जसे काफर होते तेच मुस्लिमांचे शिवसेनेच्या बाबतीत म्हणणे असते तरीही मुस्लिमांनी अब्दुल सत्तार यांना एक गठ्ठा मतदान केले निवडून आणले. कालपर्यंत अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे काँग्रेसी अब्दुलभाई तेथून बाहेर पडले आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत आले तरीही निवडून आले कारण तेथील मुस्लिम मतदारांनी आमच्या विदर्भातल्या मतदारांसारखी घोडचूक केली नाही जी केलेली चूक आज फडणवीसांना भोगावी लागते आहे...

ज्या विदर्भ विकासासाठी शेतकऱ्यांसाठी सामान्य मतदारांसाठी जनतेसाठी देवेंद्र फडणवीस सतत पाच वर्षे झटत  होते त्या देवेंद्र फडणवीसांना आमदारांच्या रूपात विदर्भ मतदारांनी गिफ्ट देऊन युतीच्या  विशेषतः भाजपच्या उमेदवारांना निवडून आणून देवेंद्र फडणवीसांचीही मान उंचवायला हवी होती पण तसे अजिबात घडले नाही, जातीपातीच्या राजकारणात आजही अडकलेले वर्हाडी मतदार फडणवीसांचे भाजपचे उमेदवार पाडून मोकळे झाले त्यांनी केवळ विदर्भातले भाजपाचे उमेदवार पाडले नाही तर थेट नागपूर जिल्ह्यात नागपूर शहरात देखील भाजपाला धोका दिला, भाजपाचे उमेदवार पराभूत केले आणि जे निवडून आले तेही काठावर जेमतेम मतांनी निवडून आले. ज्या नितीन गडकरी किंवा देवेंद्र फडणवीसांनी राज्यात देशात नेतृत्व करतांना अगदी उघड कायम विदर्भाची बाजू घेतली आणि आपल्यावर कायम दादागिरी करणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या तगड्या पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांना जेरीस आणले, मुख्यमंत्रीपद आणि विविध मोठमोठ्या विकासाच्या योजना अक्षरश: खेचून आणल्या त्या फडणवीसांच्या किंवा गडकरींच्या मागे आम्ही वर्हाडी मतदारांनी उभे न राहणे म्हणजे बेईमानी करणे आणि गाढवासारखे वागणे आहे असे मी येथे जाहीरपणे सांगतो आहे. जसे राज्यातले मुस्लिम एकत्र आले तसे जर फडणवीसांसाठी  वर्हाडी मतदार एकत्र आले असते तर आज जी विदर्भाला फडणवीसांना मान खाली घालावी लागते आहे तसे अजिबात घडले नसते...
क्रमश: हेमंत जोशी. 

उद्धव चुकलेच : पत्रकार हेमंत जोशी

उद्धव चुकलेच : पत्रकार हेमंत जोशी 
वाईट वाटते जेव्हा तुमची गत आयुष्यातली प्रेयसी तिच्या नवऱ्याला खेटून चिटकून चिपकून  बसलेली असते आणि तुम्ही मात्र एकटेच समोरच्या सोफावर तिच्या आठवणीत व्हिस्कीचा  सिप मारत बसलेले असतात. वाईट वाटते एखाद्या तरुणीला देखील जेव्हा ती तुमच्या  आठवणीत एकाकी जीवन जगत असते आणि तुम्ही मात्र बायकोचा हात हातात घट्ट पकडून  मधेच तिला लाडाने जवळ घेत, त्या प्रेयसीकडे  पाहून न पाहिल्यासारखे करता. आयुष्यातले  चुकीचे निर्णय तुमचे आमचे आयुष्य निरर्थक करून सोडतात. राजकारणातला प्रदीर्घ अनुभव  मला सांगतो आहे कि राजकीय दृष्ट्या एक नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे  किमान हि पंचवार्षिक योजना तरी मागे आले आहेत, त्यांचे मोठे नुकसान होते आहे. जेव्हा  एखाद्याला माहित असते कि बिळात हात घातल्यानंतर नक्की विंचू चावणार आहे तरीही तो  ते तसे करत असेल तर सांगणारा सल्ला देणारा प्रेम करणारा मूर्ख ठरतो... 

हा अंक हाती पडेपर्यंत कदाचित शिवसेनेचा एखादा नेता मुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेला  असेल तरीही उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे मोठे नुकसान करवून घेतले आहे हे येथे ठामपणे  सांगावेसे वाटते. शिवसेना हि उद्धव यांच्या अलीकडच्या धोरणामुळे नक्की नुकसान करवून  घेते आहे. उद्धव यांच्या आघाडीला बिलगण्याच्या मिठीत घेण्याच्या भूमिकेवर केवळ भाजपा आणि संघवाले नाराज झाले असते तर एकवेळ आपण त्याकडे दुर्लक्ष केले असते पण ज्यांना मराठी म्हणून हिंदू म्हणून अभिमान आहे असे या राज्यातले सारे मग ते कोणत्याही विचारांचे असतील उद्धव यांच्यावर त्यांच्या भूमिकेवर अतिशय नाराज आहेत त्यात मग शिवसैनिकही आले. उद्धव यांचे हे तर असे वागणे झाले कि घरच्या बायकोला ठेंगा दाखवायचा आणि माहिजीच्या बाईला ती नाचत असतांनाच तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचे. कदाचित फडणवीस किंवा भाजपा नेते चुकले असतील पण त्याची शिक्षा थेट शत्रूंना घरी राहायला जागा देणे, या टोकाला द्यायची नसते... 

शिवसेना आणि भाजपाने त्यांना इतिहास माहित असतांनाही १९९९ ची पुनरावृती केली, त्यांनी थेट पुन्हा एकवार पवारांना रान मोकळे करून दिलेले आहे त्यामुळे मला फारसे आश्चर्य वाटणार नाही जर पुढे १०-१२ वर्षे शरद पवार यांची सत्ता येथे बघायला मिळाली. देवेंद्र फडणवीस किंवा भाजपा फार भाग्यवान असेल तरच युतीच्या बाबतीत यापुढे राज्यात काही चांगले त्यांच्या बाबतीत घडू शकते अन्यथा उद्धव ठाकरे यांनी आघाडीला आपणहून उघडून दिलेले दरवाजे विशेषतः सेनेलाही आणि अर्थात भाजपाला बऱ्यापैकी महागात पडणारे हे घडते आहे. घडलेले आहे. शरद पवारांच्या बारीक सारीक हालचालींवर लक्ष ठेवावे घालावे लागते तेव्हा ते नेमके काय करताहेत आपल्या ध्यानात येते. मुख्यमंत्री निवडीच्या धामधुमीतही जेव्हा शरद पवार उठले नि थेट नागपूरला दौऱ्यावर आले हे दिसते तेवढे साधे राजकीय गणित नाही तर ज्या विदर्भाने  पवारांना मधल्या काळात साथ दिलेली नाही त्या विदर्भावर पुन्हा पकड मिळविण्यासाठी पवार नागपुरात दाखल झाले आहेत हे लक्षात घ्यावे, मोठी चूक उद्धव ठाकरे आणि भाजपाच्या हातून घडलेली आहे, शरद पवार केव्हा या साऱ्यांना उल्लू बनवून मोकळे झाले हे यांच्या म्हणजे युतीच्या लक्षातही आले नाही, विशेष म्हणजे आम्ही काहीतरी चूक करतोय हे आजही अद्यापही उद्धव ठाकरे मानायलाच तयार नाहीत, मतदार, मराठी माणूस शंभर टक्के ठाकरेंवर यावेळी मनातून चिडला आहे, प्रचंड नाराज आहे... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Thursday, 14 November 2019

वाईट वाटले : पत्रकार हेमंत जोशी

वाईट वाटले : पत्रकार हेमंत जोशी 
मला वाईट वाटलं जेव्हा नवाकोरा साबण तेही अंघोळ करता करता टॉयलेट मध्ये पडला होता, जेव्हा एका अत्यंत महत्वाच्या मीटिंग मध्ये माझ्या पॅन्ट ची झीप उघडी राहिली होती, जेव्हा माझा टॉवेल मित्र भेटीला आले असतांना त्यांना मी बाथरूम मधून बाहेर येऊन शेकहँड केला नि टॉवेल अचानक गळून पडला होता तेव्हा, हायवे वर लघवी करतांना जेव्हा पोलिसांनी हटकले होते तेव्हा, नेमके सुचत देखील नव्हते कि त्यांच्याकडे पाहावे कि खाली वाकून पाहावे तेव्हा, मला वाईट वाटले जेव्हा ऐन मंडपात माझ्या मित्राने बोहल्यावर चढण्यासाठी म्हणून नेसलेले पितांबर भावी सासूच्या समोर गळून पडले तेव्हा, मला नेहमीच वाईट वाटते जेव्हा नेमका एखादा पदार्थ मनापासून आवडलेला असतो किंवा खूप भूक लागलेली असते आणि नेमका पहिल्या दुसऱ्या घासालाच भला मोठा केस निघतो तेव्हा, अनेकदा तर हेही लक्षात येत नाही कि केस नेमका कोणाचा आहे किंवा कुठला आहे, तोंड वाकडे करणे एवढेच आपल्या हाती असते. मला वाईट वाटले जेव्हा माझा अतिशय जवळचा मित्र शेवंता मोलकर्णीशी प्रेमाने गप्पा मारत बसला असतांना अचानक त्याची संशयी बायको स्वतःच लॅच उघडून आत शिरली तेव्हा...

आणि मला मनापासून वाईट वाटले जेव्हा भाजपाने पूर्वानुभव असतांना किंवा मी त्यांना त्याची कल्पना दिलेली असतांनाही त्यांनी जेव्हा २००० दरम्यानची अवस्था ओढवून घेतली तेव्हा. त्यांना त्यांच्या नेत्यांना आणि वाचकहो तुम्हालाही सांगितले होते कि समोर शरद पवार आहेत फडणवीस किंवा भाजपा सेनेच्या नेत्यांनी अजिबात बेसावध राहता कामा नये कारण नारायण राणे मुख्यमंत्री झाले नि लगेच काही महिन्यात जेव्हा विधानसभा निवडणूक लागल्या तेव्हा देखील सेना आणि भाजपा दोघांनाही वाटायचे कि पुढल्यावेळी आपणच पुन्हा सत्तेत येणार आहोत पण तेच नेमके घडले समोर शरद पवार होते त्यानंतर पुढे सतत पंधरा वर्षे त्यांनी युतीला सत्ता दिली नाही २०१४ मध्ये युतीला सत्ता मिळाली पण आता २०१९ मध्ये तेच घडले म्हणजे शरद पवार नडले आणि त्यांनी युतीचे विशेषतः भाजपाचे वाटोळे केले. सत्तेत कदाचित उद्या शिवसेना असेलही पण उद्धव ठाकरे असोत  अथवा देवेंद्र फडणवीस, सत्तेच्या राजकारणात दोघेही आणि त्यांचे पक्ष खूप मागे पडले आहेत...

वास्तविक सेना आणि भाजपाने युती करण्याची अजिबात गरज नव्हती, दोघांनीही विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या लढविणे अत्यंत अत्यंत गरजेचे होते आवश्यक होते पण ते त्यांनी केले नाही, आणि आता बसले आहेत भांडत. हे तर असे झाले कि सुस्वरूप बायकोचे नवऱ्याशी भांडण व्हावे आणि शेजारी राहणार्याने नर्वस झालेल्या शेजार्याच्या बायकोला पटवावे. दोघांनीही पार आपापले थेट वाटोळे नुकसान करून घेतले. युती केली खरी पण सेना आणि भाजपाने प्रत्येक मतदारसंघात जेथे त्यांचा विनाकारण पराभव झाला आहे तेथे प्रत्येक ठिकाणी एकमेकांचे उमेदवार पाडले, भलेही त्यांनी एकमेकांचा त्या त्या ठिकाणी निवडणूक प्रचारादरम्यान उघड किंवा जाहीर प्रसार प्रचार केला नसता तरी चालले असते पण जे घडले ते महाभयंकर घडले, एकमेकांचा प्रचार करणे तर फार दूरची गोष्ट, पण त्यांनी जे केले ते करायला नको होते, भाजपा उमेदवार कसा पडेल हे स्थानिक सेना नेत्यांनी बघितले आणि भाजपा नेत्यांनी कार्यकर्त्यांनी देखील तेच केले, त्याचा फायदा शरद पवार यांनी अतिशय खुबीने करवून घेतला. वाचक मित्रहो, अत्यंत महत्वाचे म्हणजे पवारांनी केवळ त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणले नाहीत तर काँग्रेस उमेदवार निवडून आणण्यात देखील त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली, सर्वोतपरी पवारांनी  काँग्रेसच्या नेत्याना, उमेदवारांना देखील सहाय्य केले.  एखाद्या हिंदी चित्रपटात म्हातारा अमिताभ कसा पेटून उठलेला दाखवतात, राजकारणातले यावेळचे म्हातारे पेटून उठलेले अमिताभ शरद पवार ठरले...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.Tuesday, 12 November 2019

My Views on the current Dance of Democracy in Maharashtra

My Views on the current Dance of Democracy in Maharashtra

1. Shivsena "talks" with NCP & Congress on the Common Minimum Programme will not materialise as there will be huge trust factor. Sonia Gandhi does not trust Sharad Pawar and Uddhav Thackrey too has trust issues. But, if and when the Common Minimum Programme works out in everyone's favour, Shivsena will make the government having support of NCP & Congress, but the question will be how long will it last? Now that these people have 6 months to talk & negotiate, it is extremely dangerous to give a party like BJP, who has Centre in their hand, this period of comfort. They will be upto something. If they cannot leave a small state like Manipur from their clutches, you think they will let go off Maharashtra so easily?

2. Main game is now--If you observe Narayan Rane's statement yesterday, he said BJP will now active to stake a claim to form Government. Whom will it approach? Of course NCP. I feel repeat of 2014 will happen. NCP will declare outside support to the BJP (after all the circus with SS is over) and fearing this immediately SS will return back to the BJP to form government that will be on the "dictated terms" of the BJP. So if you are feeling why didn't Sharad Pawar give letter of support to the SS on the day SS could form government, and why did he ask the congress to hold, is simple --He does not trust Shivsena at all rather than vice-versa.

3. As per top sources in Shivsena--I have heard now the Corporate world has got into this mess and top industrialists houses are hell on ShivSena to join the BJP.

4. Everyone means everyone will agree to this--In the near future, if and when BJP & SS form the government--I have my doubts if we will see Devendra Fadnavis back as the CM. As already, Amit Shah is upset and he is reluctant to budge on his stand. But you never know, PM Modi might have the final say in all this.

Vikrant Hemant Joshi.

Friday, 8 November 2019

राजकारण गेलं चुलीत, नेते गेले उडत : पत्रकार हेमंत जोशी

राजकारण गेलं चुलीत, नेते गेले उडत : पत्रकार हेमंत जोशी 
विधानसभा निवडणूका दिवाळीआधी आटोपल्या पण नेत्यांचे एकमेकांच्या ढुंगणाखाली फटाके लावणे अद्याप सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात राज्याच्या विकासाचे अजिबात कोणाला काही पडलेले नाही. यावेळी काही नग असे निवडून आलेले आहेत कि त्यांची तुलना फक्त वसुली दादांशी करता येईल. निवडून येणाऱ्या अनेक बहुतेक उमेदवारांचे हिंदी सिनेमातल्या डाकुंसारखे असते म्हणजे अनेक ठिकाणी दरोडे टाकायचे लुटपाट करायची त्यातले थोडेसे आपल्या गावात वाटून मोकळे व्हायचे म्हणजे मग त्या गावात डाकू देखील मसीहा ठरतो, गावकरी त्याला देव मानतात, देवघरात ठेवतात, निवडून येणाऱ्या अनेक आमदारांचे तसेच असते. जे निवडून आले नाहीत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होते ते देखील डाकूंच्याच पंक्तीतले फक्त त्यांचे वाटप चुकले किंवा फारतर कमी पडले असे म्हणता येईल. लोकांच्याच कार्यकर्त्यांच्याच घरी जेऊन निवडून येणारे अलीकडे असे फार कमी आहेत दिवंगत सुदाम देशमुखांसारखे...

पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला हवे तसे यश मिळालेले का नाही त्याची नेमकी कारणे फारशी कुठे वाचण्यात आलेली नाहीत, जी करणे मी तुम्हाला सांगणार आहे त्यावर साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे. जसे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क खात्याचे अत्यंत यशस्वी लोकप्रिय आणि खालची मान वर न करता येणाऱ्या प्रत्येकाला सहकार्य मदत करणारे असे मंत्री होते. ज्यांना हमखास उमेदवारी मिळेल ते शंभर टक्के निवडून येतील व पुन्हा मंत्री होतील असे बोलले जायचे किंवा त्यांना स्वतःला देखील तेच वाटायचे, उमेदवारी जाहीर करतांना असे काहीच त्यातले घडले नाही म्हणजे ना त्यांना भाजपाने उमेदवारी दिली ना बावनकुळे यांनी सहज शक्य असतांना पक्षाशी गद्दारी केली. उलट त्यांच्यावर पक्षाने आणि नेत्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराची जी अनेक मतदारसंघाची जबाबदारी टाकली होती अजिबात खचून न जाता बावनकुळे सतत त्यादिवसात धावपळ करतांना दिसले...

चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी का मिळाली नाही त्याची काही करणे आहेत जी मला उघड करायची नाहीत कारण ते माझे मित्र आहेत मित्र होते. पण थेट दिल्लीतून बावनकुळे यांना जेव्हा उमेदवारी न देण्याच्या सूचना येथे मुंबईत आल्या तेव्हापासून तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मनापासून प्रयत्न केले,  अमित शाह यांना गळ घातली, अगदी विनवण्या देखील केल्या पण त्यांनी शेवटपर्यंत गडकरी आणि फडणवीसांचे देखील ऐकले नाही, बावनकुळे किंवा त्यांच्या पत्नीला देखील उमेदवारी दिल्या गेली नाही. फक्त एकच मोठे गुपित याठिकाणी उघड करतो कि मी चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे उजवे हात विश्वास पाठक यांना काही मंडळींच्या बाबतीत त्यांना जवळ करू नका वारंवार सांगत होतो तसेच काही निर्णय घेतांना कमालीची सावधगिरी बाळगावी जीव तोडून सांगत होतो पण ज्यांनी ज्यांनी माझे ऐकले नाही त्या सर्वांचा विनोद तावडे झालेला आहे ज्याचे मला तीव्र दुःख आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे राज्यात मोठ्या प्रमाणावर तेली समाज आहे, त्या तेली समाजाने बावनकुळे  यांना भाजपा ने उमेदवारी न दिल्याने मोठ्यांप्रमाणावर विरोधात जाऊन मतदान केले ज्याचा फार मोठा फटका आणि झटका भाजपा उमेदवारांना सोसावा लागला आहे. बावनकुळेंच्या बाबतीत त्यांच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको होती, येथे या राज्यात विशेषतः नागपुरातही त्यामुळे भाजपा उमेदवारांचे मोठे नुकसान झाले...
हेमंत जोशी. 

राजकारण गेलं चुलीत : पत्रकार हेमंत जोशी

राजकारण गेलं चुलीत : पत्रकार हेमंत जोशी 
विधान सभा निवडणूक पार पडल्यानंतर आज कितीतरी दिवसांनी मी नेहमीप्रमाणे राज्याच्या राजकीय घडामोडींवर लिहायला घेतले आहे. निदान मला तरी राजकारणात राज्यात पुढे काय घडणार आहे नेमके लक्षात येते कळते कारण गेली ३९ वर्षे सतत हे बघत आलोय त्याचा त्या अनुभवाचा फायदा होतो आणि नेमके कळते. मतदान पार पडले आणि दुसरे दिवशी माझा मूड गेला कारण तेच पुढे काय निकाल हाती येणार आहेत लक्षात आले होते पण यासाठी येथे लिहिण्याचे टाळले कि ज्या दोघांवर माझे अतिशय उघड थेट पूर्ण प्रेम आहे त्या माझ्या विदर्भाची आणि विदर्भ मराठवाड्याचे भले व्हावे असे ज्या देवेंद्र फडणवीसांना मनापासून वाटते त्या फडणवीसांची वाट लागणार असल्याचे माझ्या लक्षात आले नि अक्षरश: रडायला आले. जे फडणवीसांच्या बाबतीत घडणे निकाल येणे अपेक्षित होते ते घडणार नाही त्यामुळे मी प्रचंड अस्वस्थ झालो आणि राजकीय घडामोडींवर लिहिण्याचा मूड गेला...

तुमच्यांत लक्षात आले असेल कि मी राजकारणावर सोडून सेक्स किंवा इतर विषयांवर लिहिणे म्हणजे माधुरी दीक्षित ने अभिनय सोडून सुईणबाईचे काम पत्करण्यासारखे किंवा निखिल वागळे यांनी नाक्यावर वडापावची गाडी लावण्यासारखे किंवा अजित पवारांनी राजकारण सोडून फरसाण तळण्याचे काम सुरु करण्यासारखे पण जेथे काही राजकारणावर लिहावे असे वाटत
नव्हते तेथे उगाच डोके लावून बसण्यात अर्थ नव्हता. उमेदवारीचा अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस तोपर्यँत मावळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतून निवडून आलेले सुनील शेळके हे माझ्या सतत यासाठी संपर्कात होते कि त्यांना भाजपातर्फेच विधानसभा लढवायची होती. वास्तविक तेथे पराभूत झालेले माजी मंत्री बाळा भेगडे माझ्या जुन्या परिचयाचे, जवळचे मित्र देखील पण ते यावेळी मावळ मधून शंभर टक्के पराभूत होतील पण सुनील शेळके जर उभे राहिले तर मोठ्या फरकाने निवडून येतील माझी तशी पक्की माहिती होती खात्री होती पण खूप प्रयत्न करूनही सुनील शेळके यांना भाजपाने उमेदवारी दिली नाही, शेळके उठले आणि त्यांनी थेट अजित पवारांना गाठून अगदी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी घेतली, मोठ्या फरकाने बाळा भेगडे पराभूत झाले जवळपास नव्वद हजारांपेक्षा अधिक मते घेऊन शेळके निवडून आले....

सहकारी मंत्री आणि भाजपाचा हाडाचा कार्यकर्ता या नात्याने फडणवीसांचे बाळा भेगडे यांच्यावर असलेले प्रेम बघून मी एवढेच सांगितले कि पुढे मंत्री भेगडे यांनाच करा त्यासाठी त्यांना विधान परिषदेवर निवडून आणता येईल पण उमेदवारी मात्र शेळके यांनाच बहाल करा, असे एक ना अनेक किस्से मी तुम्हाला सांगणार आहे. वाईट फक्त यासाठी वाटते कि विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच विशेषतः विदर्भाचे आणि काहीशा दुर्लक्षीत मराठवाड्याचे पहिल्यांदा भले जर कोणी अतिशय
मनापासून मुख्यमंत्री म्हणून केले असेल तर ते एकमेव देवेंद्र फडणवीस आहेत पण पुन्हा एकदा त्यांचीच राजकीय दैन्यावस्था होणार असेल त्यासारखे आमचे दुसरे दुर्दैव नाही. सतत पंधरा वर्षे शरद पवार व त्यांच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी आमदारांनी खासदारांनी आणि मंत्र्यांनी  मराठवाड्याला विशेषतः विदर्भाला केवळ रखेलीच्या नजरेने बघितलेले आहे ते यापुढे देखील तेच करणार आहेत म्हणून वाईट वाटते. अन्यथा सत्तेत कोण, याची व्यक्तिगत मला ना कधी चिंता असते ना कधी काळजी असते ना कधी भीती असते ना कधी पर्वा असते. लेखणी सलामत तो सलाम पचास, भल्याभल्यांना झुकायला लावणारी देशभक्त पत्रकारांची लेखणी त्यामुळे ठोकायचे यांनाही असते आणि ठोकायचे त्यांनाही असते शब्दातून..
क्रमश: हेमंत जोशी.

Thursday, 7 November 2019

Dance of Democracy : Vikrant Joshi

Dance of Democracy: Vikrant Joshi 

As one of my Guru Praveen Bardapurkar ji declared since everyone and anyone is writing on Politics and the outcomes as to who will be in power in Maharshtra, even I had decided not to write for all these days. But now today being the 15th day, and people like me who have direct access and information from the horse's mouth, if I don't put down my views, it will be bit unethical to my profession. So let me pen down some happenings and what are the possible scenario's that are going to happen in Maharshtra. 

First & foremost, it will not be Gadkari, but our very own CM Devendra Fadnavis who will be sworn-in as the Chief Minister of our state. Today, Governor will invite the single largest party and in a very small & minuscule way, the swearing-in ceremony will be conducted at Raj Bhavan. Shiv Sena like 2014 what I presume, will not be a part of the swearing-in, but no one needs to hassle, they will give us a strong and balanced government once the day of floor test comes. ShivSena will come with the BJP. See, please write it somewhere--this is the last time BJP & ShivSena have come together. Henceforth, be it legislative or any Municipal elections, the ties will be severed. Both parties will be officially divorced and but keeping in mind the funda of keeping Cong-NCP away form power, they will be together but individually. 

Secondly, again note down somewhere--Maharshtra will undergo another legislative elections in a year and a half or two. As Shivsena will come to power only if BJP will promise something substantial. And as the time will come to hand-over power to SS, again the same circus. But of all this ruckus in 15 days, one person who really got "out of hand" even of Uddhav Thackrey was Sanjay "Pawar"..oops...Sanjay Raut. See, the deal between Shivsena and NCP was far from over. They had already decided to come in power. Now in front of Shivsena (SS) and NCP's maestro Sharad Pawar (SP)--these people had two challenges to overcome, if they have to come in power. One was Congress and other one was NCP belonged but a close friend of Devendra Fadnavis--AJIT PAWAR. Yes, I'm 200% correct when I say people like Ajit Pawar and Eknath Shinde are very close to Devendra Fadnavis nowadays. Shall explain...Tell me a week ago, Ajit Pawar at a Press Conference read out an SMS sent by Sanjay Raut. Why was the need to do so? Who told Sanjay Raut to do so? No it wasn't Uddhav, but it was Sharad Pawar who wanted to know if and when NCP and SS come in power, will Ajit Anant Pawar support them or no? Ajit has once already by resigning and leaving the house has emabrased Sharad Pawar when the later was served ED notice. On whose instance did Ajit Pawar resigned and walked out of home--no need to guess...Fadnavis, the great!

Now the second one to convince Sharad Pawar and Sanjay Raut challenge was Congress. But, but..Congress's Sonia Gandhi from day 1 was against the alliance of SS & NCP. Immediately Ahmed Patel walked into Gadkari home and declared that NCP & SS will not get support from Congress at any cost. The compromise what I have heard, is P Chidambaram, is their main concern. Don't be surprised now if in coming months Chiddu gets bailed out soon. As had Congress supported them, next in line to be behind the bars was Robert Vadra and following trouble would be hovering on Sonia Gandhi herself too. Now second interesting twists in the events happened when Yashomati Thakur voiced her opinion about her support to "join" the Government and make SP the CM. I have heard a group of young MLA's under her leadership are wanting to be a part of Government now...Don't be surprised, if on the floor test day, Devendra Fadanvis gets support from any corner of parties, claims a veteran journalist and Party President Waddetivar too expressed this fear of BJP trying to woo their MAL's. And when Sharad Pawar understood the above two factors are against him coming to power, and day before he declares that public has given us Mandate to sit on opposition benches. What a player? At 80, if my brain and this spirit is alive, bloody hell, I will bring the house down too...

www.vikrantjoshi.com

Uddhav is upset. I mean, what I know when the discussion was on at Matoshri during Loksabha 2019 behind closed doors, only Uddhav Thackrey, Aditya Thackrey, Amit Shah, Devendra Fadnavis and Chandrakant Patil were present. Now the big part--Amit Shah had asked both Devendra and Patil to stay out of the room  and the promises to share power were made. Hence Fadnavis is hellbent on the statement--that the CM's post to be shared was not done in front of me. But then at the Blue Sea Press Conference during Loksabha 2019 if you observe the wordings more carefully no where it was said by anyone that CM ship will be shared. Hence, Amit Shah is the gamer--He has not come to solve the issue of Maharshtra in last 15 days, as he knows, what he had promised Uddhav!

Now the stand of BJP...What are Chandrakant Patil and Sudhir Mungantiwar saying in all their appearances in front of camera? "WE" (Mahayuti) has been given the Janadesh, right? Now they are hell bent on only one thing--Shivsena should break the alliance, which they will as for nothing, BJP will part from the CM post. So who becomes the villain in common public's eyes? ShivSena right? Now write it down somewhere again. If ShivSena does not compromise today or on the floor test day--it is again a grave mistake of SS !! Can't Uddhav see what has happened to Raj Thackrey when he cozied-up with Pawar? Is Uddhav actually taking the shots or is it Vahini? As the reason why Shivsena is stretching so much is that they know--this is the last chance we can come in Power and demand CM'ship. As from now on, never ever SS and BJP will have an alliance. They might come together but Shivsena will be restricted to 50 to 60 seats everytime and will be in no position to bargain either to come in power or demand anything. Hence the last effort!!! 

Vikrant Hemant Joshi 


लैंगिक समस्या व विकृती ४ : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक समस्या व विकृती ४ : पत्रकार हेमंत जोशी 
हे तुम्हाला चांगल्या प्रकारे ठाऊक आहे कि कोणाच्याही परिस्थितीकडे बघून हसू नये, देव तीच वेळ एक दिवस मग तुमच्यावर देखील आणतो. हे जसे तुम्हाला माहित आहे तसे मला देखील माहित असतांना मी एक दिवसाआड नरिमन पॉईंट परिसरात ज्यांच्या व्यावसायिक कार्यालयांचे भरभक्कम कार्यालये उभे आहेत कधी त्या सुनील तटकरे यांच्याकडे बघून हसतो तर कधी मुकेश अंबानींकडे बघून हसतो, कधी डॉ. निरंजन हिरानंदानींकडे बघून हसतो तर कधी अजितदादांकडे बघून हसतो. असो, यातला गमतीचा भाग सोडा पण आम्हा भारतीयांची हि वाईट खोड आहे कि आम्ही स्वतःचे झाकून ठेवतो आणि दुसऱ्याचे अगदी वाकून वाकून बघतो नंतर इतरांकडे दुसऱ्यांच्या भानगडींचा प्रपोगंडा करीत फिरतो, जे अत्यंत वाईट आहे, असते. अहो, जेव्हा तुम्ही इतरांच्या दोषांवर बोट ठेवता दाखवता तेव्हा उरलेली तीन बोटे तुमच्या स्वतःकडे असतात हे कायम लक्षात ठेवले म्हणजे जेव्हा केव्हा आपले काही तरी चव्हाट्यावर येते तेव्हा इतरांची नक्की सिम्पथी मिळते...

माझ्या एका मित्राने आता तो हयात नसल्याने सांगतो, एक दिवस काळजीच्या सुरात मला येऊन सांगितले कि त्याच्या पेनिसवर खूप दिवसांपासून लाल रंगाची बारीक बारीक फोडे आलेली आहेत, हिम्मत करून तो गल्लीतल्या डॉक्टरांकडे गेला देखील पण जखम बरी होत नसल्याने लाजेखातर त्याला आत्महत्या करावीशी वाटत असल्याचे सांगितले. मी लगेच त्याला त्वचा आणि गुप्तरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेलो, त्यांनी पाच मिनिटात निदान केले कि हा गुप्तरोग वगैरे नाही तर त्याला मधुमेह असल्याने हे असे झाले आहे आणि पुढल्या दोन दिवसात त्यांनी त्याला बरे देखील केले. थोडक्यात बहुतेकवेळा लैंगिक समस्या फारशा गंभीर नसतात पण आम्ही भारतीय तद्न्य डॉक्टरांकडे जायला लाजतो घाबरतो त्यातून अशी संकटे विनाकारण ओढवून घेतो. पूर्वी केव्हातरी एकदा माझ्या एका मित्राचे आम्हा दोघांनाही आवडणाऱ्या मुलीवर प्रेम बसले तो माझ्यापेक्षा सरस आणि पोरगी गटविण्यात पटविण्यात एक्स्पर्ट त्याने तिला खुबीने पटविले पण जेव्हा ते खूप जवळ आल्यानंतर त्याच्या  लक्षात आले, तिच्या तोंडाला अतिशय घाणेरडा वास येतोय त्याला तिचे कोणतेही चुंबन घेणे शक्य नाही त्याने त्या न पटणाऱ्या पोरीला सोडण्याचे ठरविले, मग मीच त्याला सांगितले कि डेंटिस्ट कडे ताबडतोब जा, तिला सिगारेट आणि ती दररोज नियमित मांसाहार करते तो सोडायला सांग, दोघांनीही माझा सल्ला ऐकला, आता त्यांना दोन मुले आहेत. माझे तर हे ठाम मत आहे कि सिगारेट ओढणारे, दारु पिऊन आल्यानंतर कित्येक तास बायकोच्या ओठांचे चुंबन घेणारे एकप्रकारे दररोज आपल्या बायकोवर शारीरिक अत्याचार करतात जे अत्यंत लांछनास्पद आहे, बहुतेक भारतीय स्त्रिया एकपतिव्रत असल्याने त्या हे खपवून घेतात पण ते करणाऱ्या पुरुषांना आपल्या गलिच्छ तोंडाची लाज वाटायला हवी... शर्ट बदलवावा तसे आजकालच्या कार्पोरेट क्षेत्रात वावरणाऱ्या स्वतःला विनाकारण हायफाय समजणाऱ्या मुली नवऱ्यांना बदलतात कारण बहुतेकवेळा कारण हेच असते कि त्यांना खूप खूप वेळ दररोज नवऱ्याकडून दीर्घकाळ लैंगिक सुख हवे असते, नवर्यात नेमकी विविध चुकांनी विविध कारणांनी शिथिलता आलेली असते मग या मुली एकतर नवऱ्याला घटस्फोट देतात किंवा त्या शारीरिक सुख मिळण्यासाठी तगडा बॉयफ्रेंड ठेऊन घेतात ज्यामुळे पुढे त्यांच्या आयुष्यात त्यातून अनेक वादळें येतात, निर्माण होतात. त्यापेक्षा अशा जोडप्यांनी थेट त्यातल्या  तद्न्य डॉकटरांना गाठावे, औषधोपचार करवून घ्यावेत, समस्या नक्की दूर होते. केवळ शारीरिक शिथिलतेमुळे जेव्हा आपली बायको शारीरिक सुखासाठी अमुक एखाद्याकडे जाते, नवऱ्याला कळते, त्यासारखे त्या पुरुषाला तेव्हापासून दुसरे दुःख नसते, असा बिनधास्तपणा चांगला नाही, नसतो...
हेमंत जोशी.

लैंगिक विकृती व समस्या ३ : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक विकृती व समस्या ३ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे विक्रोळीला राहणारे एक ओळखीचे सद्गृहस्थ मंत्रालयात भेटले. त्यांची कहाणी हि सर्वसामान्य किंवा गरिबांच्या घरातली सत्य आणि किव करावीशी वाटणारी आहे. ते म्हणाले, पीएमसी बँकेत मी पै पै एकत्र करून रक्कम यासाठी जमा केली कि त्यातून माझ्या नवविवाहित मुलासाठी बदलापूर भागात वन रूम किचन घ्यायचे होते पण आता दूरदूरपर्यंत आशा मावळल्या आहेत. होते काय, घरात मी, पत्नी, तरुण मुलगी आणि नवपरिणीत दाम्पत्य. माझेही वय फारसे नाही म्हणजे मी ४७ आणि पत्नी ४४ वर्षे वयाची पण मुलगी अगदीच शेजारी झोपते त्यामुळे आम्ही इच्छा झाली तरी एकाच अंथरुणावर एखाद्या बहीण भावासारखे नाते जपतो, तिकडे केवळ पडदा टाकून मुलगा आणि सून असते, झोपते. सांगायला कसेसेच वाटते पण त्या दोघांचे रात्री बेरात्री निघणारे चित्कार फुत्कार आवाज ऐकून इकडे आम्ही तिघे लाजेने एकमेकांकडे मान वळवून झोपेचे सोंग घेतो. पहेलवानांची कुस्ती रंगात आल्यासारखे ते दृश्य आणि आवाज असतात. त्यांना नवपरिणीत असल्याने थांबवू शकत नाही आणि इकडे त्यांचे प्रणय आम्हाला सहन होत नाहीत पण त्यांना काही सांगताही येत नाही. नवपरिणीत दाम्पत्याचा प्रणय आवाजाविना म्हणजे दिवाळीतले फटाके आवाजविना किंवा झक्कास रस्सा जमून आलेली भाजी मिठाशिवाय खाण्यासारखे, हे असे हुबेहूब अनेकांच्या घरातले विदारक दृश्य आहे...

भ्रमणध्वनी, संगणके इत्यादींमुळे नको त्या वयातली मुले आणि मुली म्हणजे त्यांना तारुण्य काय नेमके, समजायला लागल्यापासून विशेषतः मुली फार लहान असतांना वयात येतात, अनेकांचे बहुतेकांचे आई वडील एकदा का बाहेर पडले किंवा या मुलामुलींना एकांत मिळाला रे मिळाला कि ते अगदी सर्हास ब्ल्यू फिल्म्स बघतात. कधी मुलगा मुलगी एकत्र बघतात किंवा अनेकदा त्यांचा ग्रुप जमतो मग दारू सिगारेटचा आस्वाद घेता घेता त्यांचे ब्ल्यू फिल्म्स बघणे सुरु होते त्यातूनच मग विकृती जन्माला येते. अलीकडे अतिशय लहान वयातल्या मुली आपले सर्वस्व अर्पण करून बसल्या असतात. अत्यंत वाईट प्रकार जो हमखास पाश्चिमात्य किंवा फार ईस्ट कंट्रीज मध्ये कायम नेहमी बघायला मिळतो तो असा कि वयाच्या १३-१४ व्या वर्षी अनेक घरातूनच मायबाप आपल्या मुला मुलींना दारूची चव बघायला सांगतात म्हणे काय तर त्यांनी आमच्यापासून काहीही लपवून ठेवता कामा नये, हे कसले हिंदू संस्कार. अगदी पर्वा माझी पुण्यातली मैत्रीण मला हेच सांगत होती कि तिच्या मुलास तिने कशी बिअर पाजली आणि त्याने ती कशी एन्जॉय केली. सर्वाधिक थर्ड ग्रेड मायबाप कोण असतील तर जे शाळेत शिकणाऱ्या पोटच्या मुलांना दारू एन्जॉय करायला सांगतात. माझ्या एका मैत्रिणीला मी हेच म्हणालो, वयात येणाऱ्या मुलीसमोर जो कधीही तुझा होणार नाही अशा बॉय फ्रेंड ला का आणतेस, उद्या तुझी मुलगी शिक्षण संपण्याआधी गर्भपात करून आली तर वाईट वाटून घेऊ नकोस...

हिंदू संस्कृती नुसार स्त्री आणि पुरुष ज्या पारंपारिक पद्धतीने लैंगिक सुखाचा आनंद घेता घेता मूल जन्माला घालतात मला वाटते या अशा शारीरिक संबंधातून जन्माला आलेले मूल देखील चांगले संस्कार घेऊनच जन्माला येते. पण विशेषतः अर्धवट दाम्पत्य जेव्हापासून ब्ल्यू फिल्म्सच्या आहारी गेले आहेत तेव्हापासून परंपरा सोडून विशेष म्हणजे ब्ल्यू फिल्म्स चा आदर्श समोर ठेवून शारीरिक संबंध ठेवू लागले आहेत घृणास्पद म्हणजे जे ब्ल्यू फिल्म्स मध्ये दाखविल्या जाते ते तसे करण्याकडे अलीकडे अनेक दाम्पत्याचा विशेषतः प्रियकर प्रेयसीचा कल असतो. एकाचवेळी एक नव्हे तर अनेक सोबतीला सेक्स करतांना हि विकृती मोठ्या प्रमाणात ब्ल्यू फिल्म्स बघण्याने बळावली आहे अशी माझी खात्री आहे, आपण भारतीय हिंदू देखील याचा सरळ अर्थ असा कि, रसातळाला चाललोय, जे धोक्याचे आहे...
क्रमश: हेमंत जोशी. 

लैंगिक समस्या व विकृती भाग २ : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक समस्या व विकृती भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 
 मी नेहमीच तुम्हाला सांगत आलोय कि आयुष्यात सारे काही अविचाराने केले तरी चालते पण लग्न मात्र अतिशय विचारपूर्वक करावे. विशेषतः जाती धर्माच्या पलीकडे जाऊन अनेक तरुण तरुणी भावनेच्या भरात जातीबाहेर किंवा धर्माबाहेर जाऊन प्रेमविवाह करतात पण बहुतेक अशा विवाहातून प्रेम कमी शारीरिक आकर्षण आणि लैंगिक विकृतीचा भाग अधिक असतो. नागपुरात माझ्या एका ओळखीतल्या देखण्या उफाड्या मुलीने ऐकले नाही आणि धर्माबाहेर जाऊन मुस्लिम तरुणाशी लग्न केले, लग्न होताच तशी अट नसतांना कि त्या दोघात ठरलेले असतानाही त्याने सर्वप्रथम तिचे धर्मांतर केले नंतर प्रेम राहिले बाजूला तिला त्याच्याकडून दररोज अनेकदा अक्षरश: बलात्कार सहन करावा लागे, लागतो. लग्नानंतर पहिल्या महिन्यातच तिला दिवस गेलेत आणि तुला मी दाटीवाटीच्या काहीशा गलिच्छ मुस्लिम वस्तीत कधीही लग्नानंतर ठेवणार नाही असे जे त्याने वचन दिले होते ते सर्वप्रथम मोडले आणी तिला तो कायमस्वरूपी त्या वस्तीतल्या छोट्याशा घरातल्या एकत्र कुटुंबात राहायला घेऊन गेला आहे. रडण्यापलीकडे लग्नानंतर केवळ काहीच महिन्यात तिच्याहाती काहीही उरलेले नाही....

नैरोबीला माझ्या ओळखीचे एक व्यावसायिक कुटुंब राहत असे. चांगला १५-१६ वर्षांचा संसार, आफ्रिकेत सुद्धा तेच, आपल्या हिंदू मुलींना स्त्रियांना सर्वच दृष्ट्या ताकदवान आफ्रिकन पुरुष मंडळींपासून दुर ठेवावे लागते कारण जर त्यांना लैंगिकदृष्ट्या हिंदूंपेक्षा अधिक ताकदवान आफ्रिकन पुरुषांची शारीरिक सुखाची सवय लागली तर त्या पुढे पुढे हिंदू नवऱ्यांना हात देखील लावू देण्याचे टाळतात. त्या दोघांचा पुढे याचसाठी घटस्फोट झाला कारण हि अतिशय देखणी स्त्री कुठेतरी आफ्रिकन पुरुषाच्या संपर्कात आली. मी स्पष्ट मते मांडतो कारण काहीही न लपवता मला नेमक्या पुढल्या पिढीसमोर मांडून ठेवलेल्या समस्या सांगायच्या असतात. या विषयांवर जाहीर सतत समुपदेशन होणे राज्यात अत्यंत गरजेचे आहे.  मुंबई पुण्यात विशेषतः कार्पोरेट क्षेत्रातल्या किंवा श्रीमंत घरातल्या कित्येक मुलींना स्त्रियांना एकदा का दारू आणि सिगारेटची सवय लागली, त्या  आहारी गेल्या कि बाहेरच्या पुरुषांकडून लैंगिक भूक भागवून घेण्याची देखील त्यांना आपोआप सवय लागते, ठरवून जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न होते, कृपया जोपर्यंत त्या मुलामुलींची नेमकी व्यसने कळत नाहीत, पुढले पाऊल टाकू नये, आपण ते करत नाही त्यामुळे अलिकडल्या वीस वर्षात कोणत्याही कुटुंब न्यायालयात पाय ठेवायला देखील जागा नसते....

घटस्फोटातून दोघांचेही फार चांगले झाले आपल्याकडे, हिंदू संस्कृतीमध्ये सहसा बघायला मिळत नाही. व्यसनाधीनता आणि खुळखुळणारा पैसा त्यामुळे पुरुष वेश्यांचे प्रमाण येथे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे विशेषतः आफ्रिकन किंवा मुस्लिम तरुण पुरुषांना मोठी मागणी असते, त्यांना वाट्टेल तेवढे पैसे मोजले जातात. मोठ्या प्रमाणात तगडे तरुण पुरविणारे दलाल येथे मुंबई पुण्यात आणि आता तर नागपूर सारख्या शहरातूनही दिसायला लागले आहेत. आपली मुले मुली काय करतात हे सतत पैशांच्या मागे लागलेल्या पालकांनी ध्यानात घेणे अत्यावश्यक आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्यांच्या घरात ड्रग्स घुसले ते अख्खे कुटुंब उध्वस्त होते कारण ड्रग्सच्या अधीन गेलेल्या तरुण आणि तरुणींना बाहेरचे थर्डग्रेड विविध माध्यमातून खूप खूप छळून घेतात. होते काय, आपल्यातलेच अर्धवट तरुण आधी आपापल्या बायकांना एकत्र पार्ट्यांमध्ये आधी हौशेने घेऊन जातात, पुढे मध्यवर्गीय घरातून आलेल्या या तरुणींना त्याची चटक लागते आणि तेथेच ते कुटुंब उध्वस्त होते, अर्धवट विचारांच्या तरुणांची जी हिंदू पिढी बरबाद होते आहे त्यात एकत्र येऊन पार्ट्या झोडणे सर्वात प्रमुख कारण आहे, कधीतरी गंमतीजंमत म्हणून ठीक आहे त्यापेक्षा घरी बसावे आणि मुलांकडून शुभम करोति म्हणून घ्यावे...
क्रमश: हेमंत जोशी

लैंगिक विकृती व समस्या : पत्रकार हेमंत जोशी

लैंगिक विकृती व समस्या : पत्रकार हेमंत जोशी 
भारतीयांना सिनेमा सेक्स आणि राजकारणावर अगदी मनापासून ऐकायला बघायला वाचायला बोलायला आवडते. सेक्स सिनेमा आणि राजकारण हे विषय निघाले रे निघाले कि तो बालक असो वा पालक स्त्री असो अथवा पुरुष, सर्वांचे कान टवकारतात आणि डोळे वटारतात. तिन्ही विषय सर्वांना सदासर्वकाळ मनापासून चघळायला आवडतात. याठिकाणी मला तुमच्या अति आवडत्या विषयावर म्हणजे लैंगिक समस्या चाळे आवड विकृती इत्यादींवर काही सांगायचे आहे. मराठवाड्यातल्या नांदेड सारख्या दुर्गम भागातून "उद्याचा मराठवाडा" नावाने पत्रकार राम शेवंडीकर दरवर्षी संग्राह्य असा अप्रतिम दिवाळी अंक काढतात. यावेळचा मराठवाडा हा काम जीवनाला लैंगिक समस्यांना वाहून घेतलेला आहे त्यातले काही संदर्भ आणि माझे या विषयावर असलेले तोकडे ज्ञान हि सरमिसळ करून तुम्हाला वेगळे काहीतरी येथे सांगायचे आहे. लैंगिक  समस्या नाही किंवा लैंगिक विकृती नाही असे आपल्याकडे घडत नाही, प्रत्येकाला एकतर सेक्स विषयी आकर्षण आहे किंवा विकृती आहे किंवा अज्ञान आहे त्यामुळे स्त्री आणि पुरुष सतत लैंगिक गोंधळात सापडलेले असतात भलेही काही मान्य करतील किंवा काही कदाचित मान्यही करणार नाहीत...

लैंगिक समस्येवर येथे माझे होणारे लिखाण फार तोकडे पडणारे आहे पण व्यापक माहितीसाठी जर शक्य झाले तर उद्याचा मराठवाडा हा दिवाळी अंक मिळवा आणि अख्खा वाचून पाठ करा, त्यानंतर मला नाही वाटत लैंगिक ज्ञानावर तुमचा हात पकडणारे कोणी सापडेल, त्यानंतर तुम्ही जमले तर लैंगिक विकृती आणि समस्या या विषयावर गावोगावी प्रवचन करा आणि स्त्री तसेच पुरुषांना ज्ञान देऊन पाजून मोकळे व्हा, राजन भोसले व्हा, तद्न्य म्हणून त्यावर काम करा. मी तुमचा जाहीर सत्कार घडवून आणेल. सर्वात आधी प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला हे समजावून सांगा कि दोघांनाही जर लैंगिक जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्यांनी एकत्र येण्यापूर्वी आपण आत बाहेर म्हणजे कपडे आणि शरीरातील प्रत्येक अवयवांसहित अतिशय क्लीन स्वच्छ आहोत किंवा नाही हे आधी बघितले पाहिजे तद्नंतरच एकमेकांशेजारी पहुडले पाहिजे, स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी एक जरी अस्वच्छ असेल त्यांच्या कपड्यांना किंवा शरीराला घाणेरडा वास येत असेल तर त्या दोघांमध्ये एकजण कायमस्वरूपी शारीरिक अत्याचार सहन करतात असे नक्की समजावे....

अत्यंत महत्वाचे म्हणजे उद्याचा मराठवाडा हा संपूर्ण अंक लैंगिक समस्या विषयाला वाहून घेतला असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण पान जाहिरात देऊन एकप्रकारे या आवडत्या विषयास जणू उचलून धरले आहे असे वाटते. राम शेवंडीकर यांना आणखीही अशा काही नेत्यांकडून किंवा मंत्र्यांकडून नक्की जाहिराती मिळाल्या असत्या जशी त्यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून देखील जाहिरात मिळालेली आहे. लैंगिक विकृतीवर मास्टरी असलेल्या पुढाऱ्यांना वास्तविक राम शेवंडीकर यांनी गाठले असते तर जाहिराती देउन त्या पुढाऱ्यांनी उद्याचामराठवाडा या दिवाळी अंकाला डोक्यावर घेतले असते. दोन पुरुषांमधले शारीरिक संबंध, दोन स्त्रियांमधले शारीरिक संबंध आणि असे स्त्री पुरुष कि ज्यांना दोन्हीकडे शारीरिक संबंध ठेवायला आवडतात, लैंगिक विकृती वाढीस लागल्यानंतर स्त्री पुरुष असे पारंपारिक संबंध सोडून काही नको त्या विकृतीकडे वळतात आणि आयुष्याचे वाटोळे करून घेतात, सखोल ज्ञान शास्रोक्त पद्धतीने घेणे मिळविणे हा वास्तविक त्यावर उत्तम उपाय पण त्याकडे फारसे भारतात लक्ष दिले जात नाही, त्यातूनच घरोघरी मोठ्या प्रमाणावर लैंगिक विकृती फोफावलेली दिसते. असे घडता काम नये, नेमके ज्ञान तरुण होणाऱ्या पिढीला मिळायलाच पाहिजे जणू त्यांचा तो अधिकार आहे...
क्रमश: हेमंत जोशी. 

Monday, 4 November 2019

सोशल मीडिया आणि तुम्ही आम्ही : पत्रकार हेमंत जोशी

सोशल मीडिया आणि तुम्ही आम्ही : पत्रकार हेमंत जोशी 
फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा यावर मी अतिशय ठाम आहे. अगदी अलीकडे माझ्या बाबतीतले एक उदाहरण देतो. येथे मुंबईत माझे असे काही अमराठी मित्र आहेत ज्यांना मराठी कुटुंबातला दिवाळीत तयार केल्या जाणारा विविध वेगळ्या पदार्थांचा फराळ आवडतो मग मी काय करतो दरवर्षी दिवाळीला या अशा काही मित्रांकडे दर्जेदार फराळ अगदी मुबलक पाठविण्याची व्यवस्था करतो त्यासाठी मुद्दाम पुण्याला जातो, तेथे विकत घेतो आणि येथे मुंबईत येऊन अमराठी मित्रांच्या घरी पाठवून देतो. यावर्षी दिवाळी दरम्यान राजकीय घडामोडीमुळे ना परदेशात जाणे जमले ना पुण्यात जाणे शक्य होते मग मी एक काम केले मला दर्जेदार दिवाळी फराळ विकत पाहिजे या आशयाचे निवेदन माझ्या काही मोजक्या महिला फेसबुक फ्रेंड्सला पाठविले, आश्चर्य म्हणजे त्यावर प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, माझे काम सोपे झाले, दर्जेदार फराळ मला अमराठी मित्रांकडे पाठविणे सहज शक्य झाले. हा असा सकारात्मक सोशल मीडियाचा उपयोग तर करून बघा, चांगले मित्र मैत्रिणी त्यातून नक्की जोडले जातील, अर्थात उद्या लंगोट विकत हवे आहेत पद्धतीचे आवाहन सोशल मीडियावर करून आपला बावळटपणा सिद्ध करू नका...

कृपया मी पुढे जे लिहिणार आहे ते माझ्या घरातल्या महिला सदस्यांना वाचून दाखविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. असे नाही कि माझ्या घरी दिवाळी दरम्यान फराळ आपल्या हातांनी तयार करण्याचा प्रयोग केल्या जात नाही पण विशेषतः माझ्या घरातले विविध पदार्थ जेथे माझी खाण्याची हिम्मत होत नाही तेथे मी ते कसे काय या अमराठी मित्रांकडे पाठवून त्यांच्याशी कायमचा वाईटपणा घेऊ शकतो, शक्य नाही. अर्थात हा विचार नक्की डोक्यात असतो कि काही मित्रांचा बदला घेण्यासाठी त्यांना दिवाळीत घरी फराळाला बोलवावे पण कदाचित आमच्या घरी तयार करण्यात येणाऱ्या फराळाची महती या मित्रांच्या आधीच कानावर गेली असावी कारण अनेकदा आग्रह करूनही ज्यांचा मला खुबीने बदला घ्यायचा होता ते अनिल थत्ते, उदय तानपाठक, डॉ. उदय निरगुडकर, पत्रकार अशोक वानखेडे, पत्रकार अभय देशपांडे इत्यादी मित्र आले नाहीत, दिवाळी दरम्यान काही मित्र कदाचित याच कारणासाठी माझा फोनही घेत नाहीत...

याठिकाणी माझ्या सहनशीलतेची तुम्ही दाद द्यायलाच हवी कारण आमच्याकडले शंकरपाळे हे कायम पोस्टमार्टेमसाठी आणलेल्या दीर्घकाळ पडून असलेल्या प्रेतासारखे निपचित एखाद्या भांड्यात समोर आणून ठेवले जातात, चकली आणि अडकित्ता एकाचवेळी मी घेऊन बसतो कारण अडकित्त्याशिवाय आमच्याकडच्या चकलीचे लहान लहान तुकडे होत नाहीत. एकदा मी आमच्या घरी तयार केलेल्या अनारशाला शेगाव ची कचोरी समजून तोंडात टाकले अनारसे मी खूपवेळ कुत्रे हाडे चघळतात पद्धतीने रवंथ करीत बसलो होतो. करंजीचा आकार तर एवढा वेगळा असतो कि बघणार्याला वाटावे गांडूळ वेटोळे करून तुमच्यासमोर ठेवलेले आहे. लहानपणी ज्यांनी मला बघितले आहे त्यांना नेमके ठाऊक आहे मी एवढा वातड होतो जेवढा आमच्याघरातला चिवडा, हा चिवडा चावून खाणे शक्य नसल्याने मी शक्यतो गिळतो, वरून मार टाळण्यासाठी, वा काय मस्त चिवडा झालाय असे मला वा, गिरीश महाजन कित्ती लहान दितात, पद्धतीचे खोटे खोटे सांगावेच लागते अन्यथा फटाके अंगणात नव्हे तर माझ्या ढुंगणाखाली लावल्या जातील. मुले लहान असतांना घरातल्या घरात दिवाळीच्या सुट्टीत आमच्याकडच्या लाडूंनीच क्रिकेट खेळून धमाल मस्ती करायचे. माझा एक दात कृत्रिम का आहे, वेगळे सांगण्याची गरज आहे का ? कारण लाडू मलाच कंपलसरी खावे लागायचे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

बुवा आणि बाबा : पत्रकार हेमंत जोशी

बुवा आणि बाबा : पत्रकार हेमंत जोशी 
मागेही एकदा मी लिहिले आहे कि मला कधीही ज्या बाबा बुवा महाराजांवर मी टीका करतो त्यांची भीती कधीही  वाटत नाही कारण त्यांच्यात कुठलेही देवत्व सत्व अजिबात नाही. ज्या बुवा बाबांवर टीका करतो ते सारे भामटे लबाड लुबाडणारे आहेत पण खूप भीती वाटते त्यांच्या फॉलोअर्स म्हणजे भक्तांची. याआधीच्या लेखातून मी भय्यू अनिरुद्ध किंवा नरेंद्र या बुवांवर नेमकी टीका केल्यानंतर देखील तेच झाले हे असे भामटे  बिघडवू शकत नाहीत पण त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते दुखावतात त्यांची होणारी टीका मात्र मला सहन करावी लागते. कोणताही बुवा कधीही मोठा नसतो मोठे असतात त्यांचे फॉलोअर्स. कारण त्यांना या भामट्यांमध्ये देव दिसत असतो आणि एखाद्याच्या देवाला शिवी हासडणे जगभरात सहन न केल्या जाणारे पण ते सहन करावे लागते या भामट्यांच्या भक्तांना वस्तुस्थिती समजावून सांगायची असते म्हणून...

त्या अनिरुद्ध बापूने स्वतःला तर देव म्हणवून घेतलेच पण पुढे जाऊन नरेंद्र आणि अनिरुद्ध यांनी आपल्या मित्रांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये देखील कसा परमेश्वराचा वास आहे ठेवा आहे त्यांच्या भक्तांवर हॅमर करून पुढल्या पिढीचीही सोय करून ठेवलेली आहे. इतर महाराजांवर धाडी पडल्या तशा यांच्यावर एक दिवस पडल्या कि भक्तांना कळेल ते किती लबाड बुवांच्या मागे लागलेले होते. या देशात अंधःश्रद्धेविरुद्ध वातावरण तयार होते आहे आणि विविध महाराजांचे बिंग फुटते आहे लक्षात येताच तुमच्या हे लक्षात आलेच असेल कि या राज्यातल्या साऱ्या भामट्या बुवांनी अवडंबर माजविणे बंद करून छुप्या पद्धतीने आपली बुवाबाजी सुरु ठेवलेली आहे. पुन्हा एकवार सांगतो कि थेट परमेश्वर आणि सामान्य माणसात विचारांचा दुवा साधण्यासाठी बुवा बाबांची या समाजाला नक्की गरज आहे, मनशांती साठी तशी आवश्यकता आहे पण तो बुवा तो महाराज निस्वार्थी असावा, दिवंगत भय्यू महाराजनसारखा लबाड भामटा लुटारू नसावा. बुवांनी सर्वसामान्य लोकांना नेमकी ती अदृश्य शक्ती रुपी देवाची महती समजावून सांगावी थोडक्यात या महाराजांनी एखादया कीर्तनकार किंवा प्रवचनकाराचे कर्तव्य पार पाडावे पण ते राहते बाजूला आणि हे भामटे स्वतःला व आपल्या कुटुंब सदस्यांना थेट देव असल्याचे भक्तांना भासवून त्यांना चक्क फसवितात व लुबाडतात...

मागेही एकदा मी तुम्हाला सांगितले होते कि माझ्या दोन मुलांपैकी एकाने महाराज व्हावे आणि आम्हाला खूप खूप श्रीमंत करावे, मला वाटायचे.  महाराज होण्यासाठी फारसे काही करावे लागत नाही, सर्वप्रथम अनिरुद्धबापू किंवा भय्यू महाराजांसारखे व्यसनी व्हावे लागते नंतर अध्यात्मावर उपलब्ध असलेली पुस्तके वाचून त्यात दिलेले विचार आधी चोरायचे नंतर लोकांना प्रवचनातून सांगण्याची कला अवगत करावी नन्तर काही महिने कलकत्याला जाऊन जादूचे प्रयोग शिकावे लागतात म्हणजे ढुंगणातून काखेतून प्रसाद पेढा कुंकू धागे दोरे गंडे इत्यादी काढून भक्तांना खाऊ घालण्याची देण्याची कला अवगत करावी लागते, वाचकहो, एकदा का तुम्ही बुवा बाबा महाराज म्हणून नावारूपाला आलात कि नंतर आयुष्यभर तुमची, तुमच्या कुटुंबाची कित्ती कित्ती मजा असते विशेष म्हणजे मस्त मस्त बायका तुमच्या अंगा खांद्याभोवती कायम घुटमळत असतात, सारी रेलचेल असते, दागदागिने सोनेनाणे, पैसे तर खोकेच्या खोके मिळविता येतात पण माझ्या मुलांना ते पटले नसावे अन्यथा त्या दोघातल्या एकाला मी नक्की नरेंद्र भय्यू अनिरुद्ध म्हणून नावारूपाला आणले असते. असे नाही कि कोणीही आजतागायत उत्तम काम यात केले नाही, अनेक आहेत आणि होते जसे कलावती देवी, गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, प्रल्हाद महाराज, किंवा गाडगे महाराज, तुकाराम महाराज, संत तुकडोजी महाराज असे अनेक, पण त्यांचे कार्य समाजाला सतत
घडविण्याचे होते, लुबाडण्याचे नव्हते, भक्तांनो सावध राहून महाराज निवडावे, अन्यथा फसवणूक होते...
तूर्त एवढेच  : हेमंत जोशी. 

पुणे प्लस मायनस २ : पत्रकार हेमंत जोशी

पुणे प्लस मायनस २ : पत्रकार हेमंत जोशी 
काही माणसे काही संस्था केव्हा बुडतील किंवा केव्हा बुडवतील याच नेम नाही, नेम नसतो. भय्यू महाराजांनी अनेकांना आधी बुडवले नन्तर ते स्वतःच बुडाले तसे मुंबईतले अनिरुद्धबापू किंवा नाणीज चे नरेंद्र महाराज देखील त्यांच्या भक्तांना सध्या बुडवताहेत लुबाडताहेत पण त्यांना बुडवणारा एखाद्या खमक्या जेव्हा जन्माला येईल तो दिवस महाराजभोळ्या लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरावा. अलीकडे अनिरुद्धबापूच्या बेंचवर बसणारा एक डॉक्टर त्याची ओळख झाली त्याने अनिरुद्ध बापूचे मेडिकलला असतानाचे जे वर्णन केले ते ऐकून पुन्हा एकवार खात्री पटली कि दिवंगत भय्यू महाराज आणि अनिरुद्ध बापू दोघात फारसा फरक नाही दोघेही एकाच माळेचे मणी म्हणजे भक्तांना लोकांना फसविणे हा एकमेव धंदा. आम्ही भारतीय कोणत्याही भामट्यांना देव मानून मानून मोकळे होतो...

खरेच काही लोकांवर विश्वासच बसत नाही सतत त्यांच्याविषयी संशय असतो जो पुढे नेमका खरा ठरतो. आजही मुंबईतल्या विठ्ठल कामत किंवा दुबईतल्या धनंजय दातार किंवा कॅनडाच्या डॉ. विजय ढवळे इत्यादींवर त्यांच्या बडबडण्यावर कितपत विश्वास ठेवावा त्याविषयी कायम मनात गोंधळ असतो अर्थात असे या जगात कितीतरी बोलघेवडे मी बघितलेले, खरेच या मंडळीवर विश्वास ठेवणे जड जाते पण रस्त्यात चुकून हि अशी माणसे कुठेतरी भेटतात मग त्यांची दखल  घ्यावीच लागते. अगदी अलीकडे बीव्हीजी ग्रुपचे सर्वेसर्वा उत्तम आणि यशस्वी उद्योजक हनुमंत गायकवाड यांच्या पुण्यातल्या बंगल्यावर जाणे झाले, त्यांनी उत्तम जेवूही घातले, एखाद्या ब्राम्हणाला आणखी काय हवे. हे खरे आहे कि ब्राम्हणाकडून काम करून घ्यायचे असेल तर आधी त्याला जेवू घालावे नंतर काम सांगावे आणि मुसलमानाकडून आधी काम करून घ्यावे मग त्याला जेवू घालावे. गायकवाडांकडे उत्तम डिनर झाले, त्यांच्या प्रेमात पडलो. गायकवाड हे कामत किंवा दातार इत्यादींच्या रांगेतले नसल्याने मनापासून त्यांच्यावर लिहावेसे वाटले...

हनुमंत गायकवाड हे नाव आता जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे विशेषतः जगातला असा एकही मराठी माणूस नसावा ज्याला बीव्हीजी ग्रुप आणि हनुमंत गायकवाड माहित नसावेत. मोठा उद्योगपती पण पाय जमिनीवर, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारतांना मजा आली. पुण्यातले सर्वाधिक यशस्वी आणि श्रीमंत म्हणजे मराठमोळे अविनाश भोसले त्यांच्या बंगल्याच्या अगदी अलीकडे यांचा तो बाणेर परिसरातला बंगला. अविनाश भोसले किंवा हनुमंत गायकवाड हि माणसे  प्रचंड मोठी पण गर्व नाही, भेटलेत कि आपुलकीने बोलतील, काहीतरी छान माहिती देऊन मोकळे होतील, गायकवाड यांच्या समवेत मी दोन अडीच तास होतो, एरवी मी बोलतो आणि जमलेले ऐकतात त्यांना माझे किस्से आनंद देतात पण गायकवाडांकडे वेगळेच घडले म्हणजे ते बोलत होते आणि मी कान देऊन शांतेतेने ऐकण्याचे काम करीत होतो. बोलण्याच्या ओघात त्यांनी त्यांच्यावर कॅनडाच्या डॉ. विजय ढवळे यांनी लिहिलेल्या पुस्तकाची एक  प्रत मला भेट केली म्हणून येथे वर डॉ. ढवळे यांचे नाव निघाले, एरवी डॉ. ढवळे यांच्यावर कधी चांगले लिहावे असे वाटले नाही, कारणे फार वेगवेगळी आहेत. पण यावेळी चुकून माकून डॉ. ढवळे काहीसे भावले कारण त्यांनी योग्य मराठी माणसावर लिहिले, हनुमंतराव हे अजब रसायन आहे, तरीही डाऊन टू अर्थ आहेत...

माझी हनुमान गायकवाड या ग्रेट उद्योगपतींशी दिलदार वृत्तीच्या यशस्वी व्यावसायिक, समाजसेवकाशी ज्याने ओळख करून दिली तो पुण्यातला सचिन इटकर असाच पुणेकरांना शोभणारा म्हणजे सतत काही तरी वेगळे करणारा हरहुन्नरी समाजसेवक आणि व्यावसायिक देखील. सचिन इटकर यांना म्हणाल तर एक चांगली सवय आहे किंवा षौक आहे कि ते अनेकांना एकत्र आणतात त्यांची एकमेकांशी ओळख करून देतात आणि काहीही अपेक्षा न ठेवता बाजूला होतात म्हणून सचिन इटकर पुणेकरांना मनापासून आवडतात आणि जगभरातल्या त्यांच्या मित्रांनाही ते सतत सभोवताली हवे असतात, हवेहवेसे वाटतात. पुण्यातले रामदास फुटाणे असोत वा नागपूरसातले गांधी, गिरीश गांधी असोत, सचिन इटकर भेटले नाहीत तर आम्हाला चुकल्यासारखे वाटत राहते...
क्रमश: हेमंत जोशी