Tuesday, 8 October 2019

भाजपाची भरारी भाजपाला उभारी : पत्रकार हेमंत जोशीभाजपाची भरारी भाजपाला उभारी : पत्रकार हेमंत जोशी 
जसे सुंदर शरीराचा मूर्ख पुत्र पोटी जन्माला येऊन उपयोगाचे नसते किंवा नऊ महिने भरल्यानंतर मृत बालकाला जन्म देणे क्लेशकारक असते तसे एखाद्या राजकीय पक्षाला जन्म दिल्यानंतर आपल्या हयातीतीच त्याची वाट लागणे त्याचे दुःख मोठे असते जे शरद पवारांच्या नशिबी आले आहे कारण कोणतेही तत्व आणि सत्व उराशी न बाळगता केवळ सत्ता संपादन करणे त्यावेळी एवढेच पवारांच्या मनात असल्याने देशभक्ती देश्प्रेमातुन त्यांचे कार्यकर्ते उभे राहिले नाहीत, संधीचे अक्षरश: सोने करणे आणि लुटले भाग चलो हेच त्यांचे तत्व उद्देश असल्याने पक्षाचा वटवृक्ष झाला नाही, ज्या झाडाची झपाट्याने वाढ होते ते झाड त्याच वेगाने उन्मळून देखील पडते हे असे पवारांच्या राष्ट्रवादीचे झाले. आधी संघ मग जनसंघ जन्माला आला, विशेष म्हणजे संघाचे स्वयंसेवक विशिष्ट तत्व हिंदुत्व नजरेसमोर ठेवून जगभर संघ आणि जनसंघ बांधण्यात गुंतले आणि सत्ता संपादन करायची असेल तर अधिक व्यापक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे त्यांच्या लक्षात आल्याने हळूच भारतीय जनता पक्षाची घोषणा किंवा निर्मिती करण्यात आली...

पहिले मूल कोडकौतुकाचे विशेष लाडके असते. नाही म्हणायला १९९५ मध्ये भाजपा सत्तेवर पहिल्यांदा आला पण त्यावेळी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे होते, आधी पंत नंतर राणे मुख्यमंत्री झाले, हे कसे एखादे मूल दत्तक घेण्यासाखे होते पण २०१४ मध्ये याच भाजपाला तब्बल १२३ जागांवर यश प्राप्त झाले आणि राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष असे त्याचे नामकरण झाले. ज्यांनी अनेकांनी सुरुवातीला अगदीच पोरकट अननुभवी शामळू म्हणू ज्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बघितले, पुढे जेव्हा हेच देवेंद्र राजकारणातले थेट इंद्रदेव ठरले, तेव्हा लोकांना कळले नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी किती परफेक्ट होती, फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा ग्रामीण किंवा शहरी भागात विशेषतः विदर्भ फारतर मराठवाडा सोडून या पक्षाची पाळेमुळे फारशी खोलवर रुजलेली नव्हती त्यामुळे शरद पवार राज्यातल्या भाजपाला विशेषतः देवेंद्र फडणवीसांना तर कच्च लिंबू समजायचे त्याच पद्धतीने ते फडणवीसांची खाजगीत तर कधी थेट जाहीर देखील खिल्ली उडवायचे...

www.vikrantjoshi.com

ज्याला सुरुवातीला दर्शक आणि सहकारी स्टार लल्लूपंजू समजायचे तो पुढे सुपरस्टार अमिताभ बच्चन झाला सेम तेच फडणवीसांचे झाले त्यांना राज्यातले विरोधी नेते अगदी सुरुवातीला जे जेमतेम समजले होते पुढे लवकरच, फडणवीस राजकारणातले सुपरस्टार म्हणजे अमिताभ बच्चन झाले. विरोधक गार झाले, पवार तर थेट निपचित पडले कारण आता तेच फडणवीस ठरवताहेत कि कोणत्या नेत्याने कुठल्या पक्षात जायचे आणि कुठल्या पक्षातून अमुक एखाद्याने निवडणूक लढवायची. अलीकडे तर मला राहून राहून हेच वाटते कि फडणवीसांना विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीची कीव येत असावी म्हणून त्यांनी अनेकांना त्यांच्यातल्या सांगितले आहे कि सध्या तेथेच राहा नंतर ठरवूया तुम्ही नेमके आमच्याकडे यायचे कि शिवसेनेत जायचे. स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, महापालिका, ग्रामपंचायती, विविध सहकारी बँका कारखाने किंवा सहकारी संस्था जेथे जेथे आधी अगदी आत्ताआत्तापर्यंत राष्ट्रवादीची किंवा काँग्रेसची पकड होती सत्ता होती शरद पवारांचा धाक किंवा दबदबा होता ते सारे सरले आणि भाजपाने कधी सिंगल तर कधी मित्रपक्षांच्या मदतीने कब्जा मिळविला.भाजपा कार्यकर्त्यांना संघ स्वयंसेवकांना हे सारे यश तसे अनपेक्षित होते किंवा हे यश एवढ्या लवकर मिळेल वाटले नव्हते पण फडणवीस आले आणि चित्र पूर्णतः पालटले...

संघ स्वयंसेवक त्यानंतर घरातले जनसंघाचे वातावरण, फडणवीसांना कणखर नेतृत्वाचे गूण प्रतिकूल राजकीय परिस्थितीतून प्राप्त होत गेले. हा माणूस थेट मुख्यमंत्री म्हणून कोणतेही हिताचे निर्णय घेतांना अजिबात विचलित होत नाही, कोणतेही राजकीय संकट समोर उभे असले तरी घाबरून जात नाही, हार पत्करत नाही याउलट यांच्यावर जेव्हा केव्हा काही कठीण प्रसंग उद्भवलेले असतात त्यादरम्यान त्यांना भेटावे तर आपण हागवणीने त्रस्त आहोत,  पद्धतीचा चेहरा त्यांच्यासमोर घेऊन जावा तर ते मात्र तुमच्याशी भेटणाऱ्यांशी जणू काही घडले नाही, पद्धतीने हसून तुमचे स्वागत करतात, तुमचे सांगणे नेहमीच्या शांत चित्ताने ऐकून घेतात, तेथल्या तेथे निर्णय घेऊन मोकळे होतात. भीती, दहशत, चिंता इत्यादी काळजीचे शब्द जणू त्यांच्या शब्दकोशातच नाहीत असे त्यांना कायम जवळून बघणारे मला अनेकदा सांगतात. विशेषतः सुरुवातीला काही शासकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना एक अननुभवी मुख्यमंत्री म्हणून लाइटली घेण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा फडणवीसांचे आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्व त्यांच्या तोंडाला फेस आणायला लागले तेव्हा एक उत्तम प्रशासक म्हणून देवेंद्र कसे डेंजरस, सर्वांच्या ते लक्षात आले, भीतीने आदराने अनेक भामट्या अधिकाऱ्यांची गाळणउडाली आणि ते सुतासारखे सरळ झाले, फडणवीसांचे काम मग सोपे झाले...
क्रमश: हेमंत जोशी.

No comments:

Post a comment