Tuesday, 8 October 2019

विरोधक आणि अळवणी : पत्रकार हेमंत जोशी


विरोधक आणि अळवणी : पत्रकार हेमंत जोशी 
मुंबईतील विलेपार्ले या काहीशा पुणेकरी खूपशा बुद्धीवादी विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ऍडव्होकेट पराग अळवणी असणे म्हणजे हि जागा आजच भाजपाने जिंकली आहे हे सांगणे किंवा मतदानाआधी निवडणुकीपूर्वीच पेढे वाटणे. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात स्वतः पराग अळवणी जरी आमदार असलेल्या पराग अळवणी विरोधात उभे ठाकले तरी ते पराभूत होतील एवढे प्रचंड तेथे परागजींना नेते म्हणून लोकमान्यता आहे. पराग अळवणी बरेचसे उद्धव ठाकरे यांच्या सारखे दिसतात त्यामुळे अमुक एखाद्या प्रचार सभेला उद्धव ठाकरेंना जाणे जमत नसेल किंवा एकाचवेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सभा घ्यायच्या असतील तर त्यातल्या एका ठिकाणी पराग अळवणी यांना पाठवावे कारण त्यांना तसेही येथे त्यांच्या मतदार संघात यासाठी प्रचार करण्याची गरज नाही कारण पराग अळवणी हे वेळेवर अभ्यास करून काठावर पास होणारे विद्यार्थी नाहीत...

आमदार ऍडव्होकेट पराग अळवणी हे जसे कार्य सम्राट आहेत तसे ते कार्यक्रमसम्राट देखील असल्याने उत्सवप्रिय विलेपार्ले विधानसभा परिक्षेत्रात अख्ख्या मतदारसंघात पराग अळवणी यांचे कार्य उदघाटनाचे, विविध कार्यक्रमाचे सतत उत्सव पार पडत असतात. या विलेपार्ले मतदारसंघात विविध उत्सवांची मग ते गणपती असतील किंवा गरबा खेळणे अगदी १३ हजार मतदार असलेले मुस्लिम सुद्धा पराग अळवणी यांच्या संगतीने ईद साजरी करतात आणि आम्ही सार्या जातींधर्माचे कसे उत्सवप्रिय आहोत, जगाला दाखवून देतात. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील अळवणी यांच्या विले पार्ले विधानसभा मतदारसंघातील गणेशोत्सव प्रत्यक्ष पाहण्याचा मोह न आवरल्याने यावेळी अगदी वेळेवर त्यांनी तसे येण्याचे फडणवीसांना सांगितले आणि पुढल्या २४ तासात ते पार्ल्यातला गणपती पाहायलाही आले नि अळवणी यांचे कौतुक करून निघून गेले...

www.vikrantjoshi.com

विविध क्षेत्रातले जगमान्य मान्यवरांचे निवासस्थान प्रामुख्याने पराग अळवणी यांच्या विधानसभा मतदार संघात आहे त्यांच्याशी त्याच लेव्हलच्या दर्जेदार गप्पा हे पराग आणि नगरसेविका असलेल्या ज्योती अळवणी या दाम्पत्याचे प्रमुख वैशिष्ट्य. आणि हे असे सतत साऱ्यांना भेटत राहणे हा या दाम्पत्याचा आवडता विषय असल्याने मी जे वर सांगितले आहे कि पराग अळवणी यांना वेळेवर कोणत्याही निवडणुकीची तयारी करावी लागत नाही. त्यांचा अभ्यास एखाद्या हुशार नियमित विद्यार्थ्यांसारखा आधीच तयार असतो त्यामुळे निवडणुकांच्या वेळेवर काहीतरी थातुरमातुर करून दाखवायचे आणि आम्ही हे केले, केविलवाणे तेही बुद्धिमान विलेपार्ले मधल्या जागरूक मतदारांना सांगायचे, तशी कधी या दाम्पत्याला गरज भासत नाही कारण त्यांचे सतत काहीतरी या मतदारसंघात चांगले काम हाती घेऊन ते पूर्ण करणे सुरु असते. मतदारांना फसवावे, त्यांना टाळावे त्यांना उल्लू बनवावे पराग किंवा ज्योती यांच्या ते रक्तातच नसल्याने दोघे जरी पतिपत्नी असले तरी त्यांचे सारखे सारखे विचार सख्य्या बहीणभावांसारखे आहेत...

पराग अळवणी म्हणतात तेच खरे आहे कि मनुष्य तितकेच कार्य करू शकतो जितके सामर्थ्य, त्या मनुष्याच्या ठायी असते परंतु सर्व सामर्थ्यानिशी जर त्याने उत्तम कार्य केले तर तो समाधानाने रात्री झोपी जाऊ शकतो व तितक्याच ऊर्जेने दुसर्या दिवशी नव्या कामांचा प्रारंभ करू शकतो. हो, पराग हे जे म्हणतात ते तसेच वागतात, आपण आमदार म्हणून या परिसरातले तिस्मारखा आहोत, ग्रेट आहोत, काहीतरी वेगळे आहोत असे ना त्यांचे कधी वागणे असते ना बोलणे असते कि तसा पेहराव असतो. नेता म्हणून काही वेगळे घालायचे, सत्तेचा माज लोकांना दाखवायचा असे कधीही अळवणी यांचे वागणे नसल्याने तेविलेपार्ल्यातल्या विविध वयोगटातल्या मतदारांमध्ये सर्वसामान्यांमध्ये अगदी सहज मिसळतात त्यांच्यातलेच एक होऊन विविध उत्सव धुमधडाक्यात साजरे करतात...
क्रमश : हेमंत जोशी

No comments:

Post a comment