Thursday, 10 October 2019

मतदार आणि अळवणी : पत्रकार हेमंत जोशी

मतदार आणि अळवणी : पत्रकार हेमंत जोशी 
जर घरातले दूध फाटले असेल तर पांढरा धागा सूईत ओवून त्या सुईने दूध शिवून घ्या कुणाला कळणार नाही. जर तुमचे केस गळत असतील तर टक्कल करा केस गळायचे थांबतील. जर दात किडले असतील तर दोन तीन दिवस जेवण करू नका किडे भुकेने मारून जातील किड नाहींशी होईल. घसा दुखत असेल तर बायकोकडून दाबून घ्या, पुन्हा दुखणार नाही. रात्री झोप येत नसेल तर दिवसा झोपा. हात दुखत असेल तर हातोडीने पायावर मारून घ्या हाताचे दुखणे विसरायला होईल. दारू उतरत नसेल तर तिला शिडी द्या, तिला आणी तुम्हालाही उतरणे सोपे जाईल. पराग अळवणी पुन्हा निवडून यावेत विलेपार्ले विधानसभा मतदार संघातील मतदारांनी त्यांना विक्रमी मतांनी निवडून आणले अशी तुम्हाला पाठ थोपटवून घ्यायची असेल तर विरोधी उमेदवार प्रचारासाठी घरी आला रे आला कि त्याला भॉक करून मोकळे व्हा असे काही मतदारांनी केले कि तो घाबरून प्रचारालाच बाहेर पडणार नाही तुमचे काम सोपे होईल...

www.vikrantjoshi.com

विलेपार्ले विधानसभा मतदारसंघ सबसे हटके आहे. त्यात फक्त उच्चशिक्षित मराठी मतदार आहे म्हणून तो हटके आहे पुणेकरी भास तेथे होतो असे नाही कारण तेथे अगदी तळागाळातला मराठी माणूस  जसा आहे तसा श्रीमंत व्यापारी गुजराथी देखील या मतदारसंघात आहेत, मुस्लिम आहेत, खास करून फार पूर्वीपासून या मतदारसंघात उत्तर प्रदेश मधले मतदार देखील मोठ्या प्रमाणात असल्याने तुम्हाला आठवत असेल याच मतदारसंघातून भाजपाचे अभिरामसिंह हमखास निवडुन यायचे. हे सारे विलेपार्लेकर विविध कार्यक्रम आणि खेळ स्पर्धा भरविणारे त्यातून एकत्र येऊन मनमुराद  आनंद लुटणारे आहेत त्यामुळेच विलेपार्लेकर हिंदी किंवा गुजराथी भाषिक मराठी देखील असखल्लीत बोलतो. विलेपार्ले विधानसभा मतदारसंघातून फेरफटका मारणे आम्हा मुंबईकरांना यासाठी आवडते कि एकतर तेथे खाण्यापिण्याची रेलचेल आहे, मस्त मस्त हॉटेल्स आहेत आणि शॉपिंगसचा मनमूराद आनंद तेथे लुटायला मिळतो. पराग अळवणी आणी विलेपार्ले विधानसभा मतदार संघातली कोणतींही निवडणूक हे नाते अलिकडल्या काही वर्षांपासून विजयात परिवर्तित झाले यासाठी आहे कि विलेपार्लेकरांना आणि पराग अळवणी यांना एकमेकांशिवाय होत नाही करमत नाही...

मी नेता आहे मला नेता म्हणा मला निवडून आणा असे येथे काहीही होत नाही या चोखंदळ मतदारसंघात प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात घरच्यासारखे विश्वासाचे नाते निर्माण करावे लागतें त्यासाठी वर्षानुवर्षे व्यक्तिगत संबंध जोडावे लागतात. प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जावे लागते तेव्हा आपुलकीचे स्नेहाचे घरातले घरच्यासारखे नाते निर्माण होते पराग अळवणी यांनी आधी निर्माण केले नंतर जपले त्या नात्यामध्ये कृत्रिमता येऊ न दिल्याने अळवणी दांपत्याला साऱ्यांनी नेते म्हणून मान्य केले. दरवर्षी प्रचंड राबून आळवणी आणि त्यांचे कार्यकर्ते अतिशय अभूतपूर्व जो पार्ले महोत्सव भरवितात ते दिवस मतदारसंघातील प्रत्येक घरात अक्षरश: यासाठी मंतरलेले असतात कारण पार्ले महोत्सव माझ्या आपल्या घरातला असे ज्याला त्याला वाटते वाटत राहते आणि मला वाटते हे नेता म्हणून पराग अळवणी यांचे मोठे यश आहे...
क्रमश: हेमंत जोशी

No comments:

Post a comment