Tuesday, 8 October 2019

चंद्रपूरचा चमत्कार नेता कर्तबगार : पत्रकार हेमंत जोशीचंद्रपूरचा चमत्कार नेता कर्तबगार : पत्रकार हेमंत जोशी 

सुधीर मुनगंटीवार एकदा बोलण्याच्या ओघात मी का निवडून येतो विषयी म्हणाले, रा. स्व. संघांचे कट्टर आणि व्यवसायाने डॉक्टर माझे वडील सच्चीदानंद मुनगंटीवार कायम एक डॉक्टर आणि संघ स्वयंसेवक म्हणून रमले ते सामान्य लोकांमध्ये म्हणजे 
सर्वसामान्यांना परवडणारे डॉक्टर अशीच त्यांची ख्याती आहे ख्याती होती त्यांना अमापसमाप नक्की कमावता आले असते पण तो त्यांचा पिंड नाही, नव्हता नेमके तेसामान्यांसाठी काहीही करण्याचे बाळकडू मला मिळाले पुढे त्याच संस्कारातून संघ जनसंघाची गोडी लागली घरातले आणि संघातले संस्कार मनात असे काही भिनले कि ते निघणे निदान याजन्मी तरी शक्य नाही. मी मुंबईत अर्थमंत्री म्हणून किंवा नेता किंवा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यात कुठेही कमी पडलो नाही पण रमलो रमतो कायम माझ्या मतदारसंघात चंद्रपुरात, चंद्रपूर जिल्ह्यात. तिथल्या सामान्य लोकांचा अघळ पघळ स्वभाव बोलका एकमेकांचे सुखदुःख जाणून घेऊन एकमेकांसाठी धावून जाणारा स्वभाव माझ्यात भिनला रुजला आहे, भेटणार्याच्या ते नक्की लक्षात येते, 
मी चंद्रपूरचा रांगडा सर्वसामान्य नेता आहे....

अमुक एखादा माणूस नेमका कुठला हे साधारणतः आपल्या लक्षात येते अर्थात असेही नसते कि प्रशांत हिरे नाशिकचे आहेत हे ओळखता येते कारण काय तर त्यांच्या अंगाला अत्तराचा नव्हे तर कांद्याचा वास येतो असे असेल तर अमर काळे यांच्या अंगाला दारूचा वास यायला हवा कारण ते वर्धा जिल्ह्यातले आहेत आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी असून देखील राज्यात सर्वाधिक दारू तेथेच विकली जाते किंवा डॉ. विनय नातू यांच्या अंगाला आंब्याचा किंवा ढेकर देतानाही तोच वास यायला हवा कारण ते रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत असे असते तर आमच्या अनिल गावंडे यांच्या अंगाला वेगळाच वास आला असता कारण त्यांच्या अकोल्यात डुकरांचा कायम सुळसुळाट असतो पण राज्याचे अर्थमंत्री थेट विदर्भातल्या ग्रामीण भागातले आहे हे त्यांच्याशी पहिल्यांदा भेटणार्याच्या देखील लगेच लक्षात येते कारण ते त्या चंद्रपूरातल्या ग्रामीण जनतेशी जुळलेली ती गावठी नाळ काही केल्या तोडायला तयार नाहीत त्यांना आपण चंद्रपूरातले आहोत याचा सार्थ अभिमान आहे आणि त्यापद्धतीने साधे सरळ एखाद्या सामान्य साध्या गावकऱ्यासारखे वागतांना बोलतांना ते त्यांच्यात सतत जाणवत राहते त्यांना ते तसेच सतत जगायचे असते. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाला प्रत्येक सामान्य मतदाराला मुनगंटीवार हे आजही आपल्यातलेच एक आहेत जे वाटत राहते तेच सुधीरभाऊंचे मोठे यश आहे...

सुधीरभाऊ कायम हेच सांगतात, पाचशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा, समृद्ध वनसंपदा आणि नैसर्गिक ऐश्वर्य बहाल झालेला माझा हा चंद्रपूर जिल्हा आणि मतदारसंघ देखील, उद्या मी असेलही किंवा नसेलही पण कोणी असे म्हणता कामा नये कि मी जंगले कापून खाणारा वनमंत्री होतो म्हणून या पाच वर्षात झपाटल्यागत माझ्या जिल्ह्यात, उभ्या राज्यात झाडे लावत गेलो झाडे जागवत गेलो कोणत्याही अमिषाला प्रलोभनाला अजिबात बळी न पडता. चंद्रपूर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात विकासापासून वंचित दुर्लक्षित पीडित राहू नये यासाठी सुरुवातीपासून माझा कटाक्ष होताच पण पाच वर्षे मी अर्थमंत्री असल्याने त्या पदाचा नक्की विशेष अधिक फायदा मला करवून घेता आला आहे. विविध लोकोपयोगी योजना मी आणल्या राबविल्या, यशस्वी केल्या, आज मी खुश आहे, आणखी आणखी करायचे आहे त्यासाठी काही वेळ मला अजून द्यावा लागणार आहे, चंद्रपूर राज्यात नंबर वन मला करून दाखवायचे आहे...

www.vikrantjoshi.com

कृषी, सिंचन, शेतीवर आधारित उद्योग, व्यवसाय प्रशिक्षण, पर्यटन विकास, रोजगार निर्मिती या घटकांना लक्षात घेऊन मी आमदार नामदार नात्याने पावले उचलली लोकांची अन्य नेत्यांची मला साथ दाद मिळत गेली उत्साह वाढत गेला, आता मला छान वाटते पण एवढ्यावरच थांबणे कसे शक्य आहे आम्हाला जगाच्या स्पर्धेत टिकायचे आहे त्यामुळे जिल्ह्याचे आधुनिकीकरण, नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होऊ न देता, आणखी आणखी करायचे आहे. आम्ही पुढे जातो आहे. आणलेल्या प्रत्येक योजनेचे योग्य परिणाम आता दिसू लागल्याने आम्ही मजेत आहोत खुश आहोत आनंदी आहोत. मित्रहो, महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अतिपूर्वेकडील हा चंद्रपूर जिल्हा मागासलेला आणि नक्षल प्रभावित जिल्हा म्हणूनच कायम ओळखल्या जायचा. मात्र २०१४ च्या सत्ता परिवर्तनानंतर राज्यातील या मागास भागांच्या समतोल विकासासाठी सरकार पुढे आले त्याआधी आघाडी सरकार मध्ये या जिल्ह्याचे भले व्हावे भले करावे असे दुर्दैवाने कोणाला वाटलेच नव्हते पण आम्ही सत्तेत आलो त्याचा परिपाक म्हणजे सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी चांदा ते बांदा योजना सुरु करण्यात आली. मला आणखी पाच वर्षे मिळालीत तर आणखी वेगळे चित्र बघायला मिळेल हि काळ्या दगडावरची रेघ आहे...

चंद्रपूरचे उमेदवार भाजपाचे ज्येष्ठ नेते युतीचे मार्गदर्शक माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री सुधीर मुनगंटीवार हे असे सतत यासाठी बोलू शकतात कारण त्यांनी विकासकामे स्वतः राबून झिजून केलेली असल्याने त्यांना प्रत्यक्ष अहवाल मुखोद्गत असतो. दुरून गम्मत बघणारे ते मंत्री नाहीत लोकप्रतिनिधी नाहीत म्हणून अमुक एखाद्याने त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यांचे हक्काचे सारे मतदार विरोध करणाऱ्याच्याच अंगावर धावून जातात, सुधीरभाऊ आमची गरज आहे, आमचे तेच एकमेव नेते आहेत, टीका करणाऱ्याला मतदार सांगून मोकळे होतात...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

No comments:

Post a comment