Thursday, 10 October 2019

लाडावलेले नाही लाडके मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

लाडावलेले नाही लाडके मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
तुमच्या आमच्या घरात सेम असतं जे माझ्या एका मित्राच्या घरी घडतं म्हणजे तो आता सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्याने घरीच असतो, दाराची बेल वाजली कि दार उघडण्याचे काम त्याच्याकडे आहे, हो, हेही तसे महत्वाचे काम आहे ज्याचा आपल्याला प्रचंड आळस  असतो, अनेकदा मग बेल वाजवणारे आल्या पावली परततात जेव्हा एखाद्याच्या घरातले सारेच दरवाजा उघडायला आळस करतात. तर, माझा हा मित्र केवळ  बेलच्या आवाजावरून ओळखतो कोण आले आहे म्हणजे कारण नसतांना तीन चार वेळा उगाचच बेल वाजली कि त्याच्या लक्षात येते बायको आली आहे आणि तिला जोराची सूंसूं आली आहे. आधी मग तो त्याच्या लाडक्या मोलकरणीला आत जायला सांगतो नंतर दरवाजा उघडायला उशीर झाला कि बोलणी खातो किंबहुना केवळ बेलच्या प्रेमळ आवाजावरून त्याच्या लक्षात येते कि आवडती मोलकरीण कमला वेगवेगळ्या कामाला आली आहे हे असे अलीकडे माझ्या त्या मित्रासारखे राज्यातल्या जनतेचे झाले आहे म्हणजे अमुक एखादी लोकोपयोगी योजना वर्तमान पत्रातून वाचायला मिळाली कि लोकांच्या लगेच लक्षात येते हे काम त्यांच्या लाडक्या मुख्यमंत्र्याचे आहे आणि काही चांगले घडत असतांना त्यावर टीका आली कि हेही लोकांच्या लक्षात येते कि पवारांच्या पोटात दुखायला लागले आहे...

वास्तविक सतत २५ वर्षे केवळ पवारांच्या लाडक्या चेल्यांकडे विशेषतः नातेवाईकांकडे राज्याचे अत्यंत महत्वाचे असे जलसंधारण खाते होते पण या खात्याची वाट लावण्या पलीकडे म्हणजे आलेला पैसा घरी नेण्यापलीकडे या खात्याच्या विविध मंत्र्यांनी अजित पवार किंवा सुनील तटकरे सारख्या शरद पवार यांच्या चेल्यांनी दुसरे काहीही केले नाही. मागल्या पाच वर्षात जलसंधारण खात्याचे मंत्री म्हणून गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस राज्यात देशात गाजले नावाजले कारण त्यांनी या खात्याचे नियोजन केले. राज्यातील सर्व समस्यांचे मूळ म्हणजे पाणी, पिण्याच्या पाण्याचा शेतीच्या
पाण्याचा प्रश्न सुटला तर अन्य सर्व प्रश्नांवर मात करणे सोपे जाईल, हे अगदी सुरुवातीला फडणवीस यांनी महाजन यांना पटवून दिले आणि सारे जोमाने कामाला लागले. विचारपूर्वक पावले उचलून खर्चात कपात करून जलसंधारणाच्या विविध योजना अतिशय वेगाने राबविल्या गेल्या आहेत ज्याचे सुपरिणाम समृद्धी महामार्गासारखे पुढल्या पाच वर्षात बघायला मिळणार आहेत. फडणवीसांची इच्छशक्ती प्रबळ होती प्रबळ आहे, महत्वाचे म्हणजे त्यांना शेतकऱ्याच्या नेमक्या समस्या मुखोद्गत आहेत आणि पाणी नियोजन केलेले नसेल तर इतर कीतीही योजना आणल्या तरी उपयोग शून्य आहे त्यांना हे पक्के ठाऊक असल्याने त्यांनी जलसंधारण विभागात जातीने लक्ष घातले, पैसे कमी पडू दिले नाहीत, पैसे कोणीही आपल्या घरी पवारांच्या लाडक्या जलसंधारण मंत्र्यासारखे नेले नाहीत, उद्याचा शेतकरी आनंदी आहे, यापुढे नक्की राज्यात बघायला मिळणार आहे...
क्रमश: हेमंत जोशी 

No comments:

Post a comment