Thursday, 31 October 2019

पुणे प्लस मायनस :पत्रकार हेमंत जोशी


पुणे प्लस मायनस :पत्रकार हेमंत जोशी 
पुण्यात पब्जचे जेवढे फॅड आहे, पीक आले आहे तेवढे मुंबईत किंवा इतरत्र भारतात कोठेही नाही. आधी जीवाची मुंबई किंवा रात्रीची मुंबई बघायला एन्जॉय करायला देशभरातून अनेक यायचे, अलिकडल्या काही वर्षात अशा आंबटशौकिनांचे पाय पुण्याकडे वळू लागले आहेत, अत्यंत महत्वाचे म्हणून माझे कितितरी आंबटशौकीन मित्र इकडे तिकडे न भटकता वीकएंडला पुण्यात  जाणे पसंत करतात. शुक्रवारी निघतात सोमवारी सकाळी लवकर परतून कामाला लागतात. पुण्यातल्या पब्जनी केव्हाच मुंबईला  मागे टाकले आहे, पुण्यातल्या पब्जची तुलना आता बँकॉक न्यूयॉर्क सारख्या गाजलेल्या माजलेल्या गजबजलेल्या नाव बदनाम असलेल्या शहरातील पब्जशी केली जाते जे चित्र मराठी माणसाच्या दृष्टीने भयावह आहे, लाजिरवाणे व लज्जास्पद आहे, जगात ख्यातनाम ठरलेल्या पुण्यातले मराठी जर बँकॉक च्या रांगेत बसविल्या जात असतील तर त्यासारखे लाजिरवाणे दुसरे काहीही नाही...

www.vikrantjoshi.com

माझ्या काही जवळच्या तेही मराठी मित्रांच्या मालकीचे पुण्यात पब्ज आहेत, पूर्वी कधीही असे नव्हते कि घरंदाज घराण्यातले मराठी या अशा व्यवसायात असायचे उतरायचे पण आता ते तसे काहीही राहिलेले नाही, पुणे जसे आजही नामवंत मराठी माणसांचे शहर आहे तसे ते आता या पद्धतीच्या मराठी माणसांचे शहर म्हणून देखील ओळखले जाऊ लागले आहे. माझा अतिशय जवळचा मराठी मित्र ज्याचे पुण्यात पब्ज आहेत, या पब्जमध्ये केव्हाही जा वेटिंग असते कारण तो म्हणतो एरवी स्वतःला चांगल्या घरातल्या म्हणवून घेणाऱ्या तरुण मुलींचे किंवा स्त्रियांसाठी पब्ज हे पिकअप सेंटर म्हणून ओळखल्या जाऊ लागले आहे म्हणूनच देशभरातले किंवा मुंबईतले आंबटशौकीन मुंबई ऐवजी पुण्यात वीकएंड साजरा करणे पसंत करू लागले आहेत, बुद्धिमान बुजुर्ग पुणेकरांनी आपापली कुटुंब वाचविण्यासाठी यापुढे तातडीने कठोर पावले उचलणे मला वाटते अत्यावश्यक ठरते आहे, गरजेचे आहे...

माझे वाक्य आजच लिहून ठेवा, ज्या ज्या घरात आलेल्या पैशाच्या माजातून पार्टी कल्चर घुसते ते घर ते कुटुंब उध्वस्त व्हायला सुरुवात झाली आहे असे समजावे. उभ्या राज्यात मग ते नागपूर असेल पुणे असेल मुंबई असेल मोठा जनसंपर्क असल्याने अनेक घरात माझे जाणे येणे असते, ज्या ज्या कुटुंबात पार्टी कल्चर घुसलेले आहे त्या त्या घरांना कुटुंबांना उतरती कळा लागली असल्याचे माझ्या लक्षात येते. पार्टी कल्चर म्हणजे आधी दारूची सवय त्यानंतर हळूच ड्रग्स व त्यानंतर लैंगिक विकृती हे आपोआप येते आणि कुटुंबात आपोआप आधी दुफळी माजायला सुरुवात होते तदनंतर या दुफळीचे शंभर टक्के घटस्फोटात रूपांतर होऊन डिपेन्डन्ट पिढी त्यातून वाममार्गाला लागते, व्यसनी होते. मुलांना कांही कळत नाही या भ्रमात तरुण आंबटशौकीन जोडपी राहतात, मुलांना म्हाताऱ्या आई वडिलांसंगे ठेवून पार्ट्या झोडतात पण लहान मुले फक्त झोपेचे सोंग घेतात, किलकिल्या डोळ्यांनी मायबापांचे धिंगाणे बघतात, मोठे झाले कि बिघडलेल्या मायबापाचे न ऐकता स्वतः बरबाद होऊन मोकळे होतात हेच पब्जसंस्कृती जपणाऱ्या प्रत्येक घरातले  दृश्य आहे त्यास वेळीच आवर घाला अन्यथा एक दिवस तुमच्या आमच्या घरात देखील राहुल महाजन जन्माला आलेले असतील, असे घडता कामा नये...
क्रमश: हेमंत जोशी

No comments:

Post a comment