Thursday, 26 September 2019

फीर अबकी बार सुधीर मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशी


फीर अबकी बार सुधीर मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशी 
दीड दोन वर्षांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांची प्रकृती कुठल्याशा कारणाने बऱ्यापैकी काळजी करण्यासारखी ठीक नव्हती, शस्त्रक्रिया करावी लागली, डॉक्तरांनी शस्त्रक्रियेनंतर काही महिने त्यांना बोलण्यावर आणि धावपळ करण्या मनाई केलेली होती पण सुधीरभाऊंनी फारसे मनावर घेतले नाही, मला आठवते ८-१० दिवसातच ते असे काही बोलायला लागले,काम करायला लागले कि जणू काही गंभीर घडलेच नाही. कुठून येते हि एनर्जी, केवळ परमेश्वराचे आशीर्वाद त्यावर हे फारतर म्हणता येईल. स्वस्थ बसायचेच नाही, म्हणणारे उगाच म्हणतात, आम्ही विदर्भातले पक्के आळशी नि तंबाखू चोळत टाईमपास करणारे, मुनगंटीवार, फडणवीसांचे आराम न करणे बघून मी तर गमतीने असे म्हणेल कि पश्चिम महाराष्ट्रातले शंभर पुरुष मिळून जेवढे काम होत असेल तेवढे तर एकटे सुधीरभाऊ करतात त्यामुळे आमच्या विदर्भात शंभर घरांमागे एका जरी पुरुषाने काम केले तरी ते पुरेसे असते, एवढी प्रचंड गती सुधीरभाऊंसारखे विकासकामांना देत असतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराथी आहेत, गुजराथी जसा त्यांचा व्यापार तोलूनमापून करतात तशी एखाद्याची स्तुती देखील त्यांच्या मनाला पटले तरच करून मोकळे होतात. मन कि बात मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या वृक्ष लागवडीचे तोंड भरून कौतुक केले ते उगाच नव्हे, आकडेवारी आणि वृक्षरोपणाचे पुरावे बघून म्हणे त्यांनी जातीने कार्यक्रम आयोजकांना सांगितले कि त्यांना मन बात मध्ये त्यांच्या लाडक्या सुधीरचे तोंडभरून कौतुक करायचे आहे. वाईट हे वाटते कि जे आजपर्यंतच्या वनमंत्र्यांना सुचले नाही ते महान कार्य सुधीरभाऊंनी केले त्यांनी भूक तहान विसरून या पाच वर्षात त्यांच्या वन खात्यातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करवून देऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात अफाट वृक्षलागवडीचे काम केले जे पुरावे बघून त्यांचे कार्य लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदविल्या गेले, असे वनमंत्री विधानसभेत जायला हवेत कि वाईट प्रवृत्तीने पाठिंबा दिलेले उमेदवार राज्य राष्ट्र पोखरण्यासाठी विधानसभेत जायला हवेत, हे तुम्हीच आता ठरवायला हवे... 

www.vikrantjoshi.com

आधी हाडाचे संघ स्वयंसेवक नंतर ऐन तारुण्यात भाजपा कार्यकर्ता म्हणून विविध आंदोलनात स्वतःला झोकून देणारे, त्यांचे काम कार्य त्यांची जिद्द तडफ बघून त्यांचा उत्साह त्यांच्यातले नेतृत्व गुणविशेष बघून विविध पदांवर त्यांची नेमणूक होणे म्हणजे अगदी तरुण वयापासून सुधीरभाऊ केवळ चंद्रपूरपुरते मर्यादित न राहता अख्ख्या राज्याला नवा उमदा धडाकेबाज नेता म्हणून माहित होणे, त्यांचे लहान वयात भाजपा सारख्या बलाढ्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होणे, कमी वयात आधी राज्यमंत्री नंतर थेट राज्याचे अर्थमंत्री होणे, मला वाटते सामाजिक जाणिवेतून , सततच्या समाजपयोगी कार्यातून व्यासपीठावरील आपल्या विचारातून, लाभलेल्या अलौकिक बुध्दीमत्तेतून त्यांना हे यश मिळत गेले, त्यांच्यावर जरी गडकरी यांचे कार्यकर्ते असा शिक्का 
बसलेला असला तरी जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे उभरते नेतृत्व म्हणून जसे ग्रीप घेते झाले, सुधीरभाऊंनी इगो किंवा सिनियर आहे, अशा भ्रामक कल्पना बाजूला ठेवून फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फडणवीसांना प्रत्येकवेळी मानसन्मान देत त्यांना 
आपले नेते मानले, पाच वर्षे त्यापध्दतीनेच मुनगंटीवार वागले...

जसा राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रत्येक खात्याचा सखोल अभ्यास करावा लागतो, माहिती पाठ असावी लागते त्याखालोखाल अर्थमंत्र्यांना देखील प्रत्येक खात्याची अतिशय बारीकसारीक माहिती ठेवावी असावी लागते. अत्यंत महत्वाचे काम म्हणजे शासकीय पैशांचे वाटप जे फक्त आणि फक्त त्यांच्या हाती असते आणि देवेंद्र फडणवीसांनी तर मुनगंटीवार यांना पूर्णतः स्वतंत्र दिले होते, विश्वास ठेवून त्यांच्यावर अर्थ खात्याची जबाबदारी सोपविली होती, तुम्हाला एकदा तरी असे या पाच वर्षात आठवते का कि अर्थमंत्री म्हणून भाऊंच्या नावाने बोंबाबोंब आहे, असे कधीही घडले नाही, फडणवीसांनंतर राज्यातील प्रत्येक विभागाची सखोल माहिती घेणारे, प्रत्येक खात्याचा अभ्यास असणारे, अभ्यास करणारे, विविध खात्यांवर पकड ठेवणारे ते अर्थमंत्री आहेत त्यातून त्यांनी नेमक्या अडचणी आणि समस्या आधी जाणून घेतल्या शिस्तीत पैसे वाटप केले, कौतुकास पात्र ठरले...
क्रमश: हेमंत जोशी

No comments:

Post a comment