Tuesday, 24 September 2019

राजेंद्र धर्मेंद्र जितेंद्र तसे देवेंद्र : पत्रकार हेमंत जोशी

राजेंद्र धर्मेंद्र जितेंद्र तसे देवेंद्र : पत्रकार हेमंत जोशी 

एकदा मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काही माहिती घेण्यासाठी गेलो असतांना तेथे मला आमच्या विदर्भातले एक बुजुर्ग लोकप्रिय नेते भेटले तेही त्यांच्या तरुण मुलास्नी घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्याशी गप्पा मारत असतांना आतून त्यांना फडणवीसांचे बोलावणे आले ते आत गेले, काही वेळाने जसे बाहेर आले तसे ते मला एका कोपऱ्यात घेऊन गेले आणि बाप बेटे माझ्याशी बोलतांना अक्षरश: डोळ्यात अश्रू आणते झाले कारण काय तर हे जेव्हा वडीलकीच्या नात्याने देवेंद्र फडणवीसांना म्हणाले कि मी लवकरच ऍक्टिव्ह राजकारणातून निवृत्ती घेतोय तेव्हा फडणवीस जागेवर उठले आणि यांच्या आपल्या खांदयावर वडिलांचे मित्र या नात्याने प्रेमाचा हात ठेवत म्हणाले, आपण काळजी करू नका, एकदम निश्चिन्त रहा, अखेरच्या श्वासापर्यंत मी तुमच्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल...

अमुक एखाद्या नेत्याला उभे राज्य कुठलाही राजकीय हेतू मनात न ठेवता उगाचच असे डोक्यावर घेऊन नाचत नाही त्यासाठी आश्वासक शब्दांचा नेता व्हावे लागते, भूक तहान कुटुंब प्रकृतीस्वास्थ्य सारे काही विसरून जनतामय व्हावे लागते, फडणवीसांना 
मी एवढ्याच साठी मानतो कि ते दिलेला शब्द पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करतात. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि पवार म्हणताहेत कि ईडीला घाबरले म्हणून त्यांचे व काँग्रेसचे सारे मोक्याचे महत्वाचे नेते पक्ष सोडून गेले. मला असे वाटते कि ते पवारांना किंवा काँग्रेस मधल्या राज्यातील व देशातील भरकटलेल्या दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून त्यांनी पक्षांतर केले त्याहीपुढे जाऊन मी तर असे म्हणेन, त्या साऱ्यांनी फडणवीसांच्या कामाची नेतृत्वाची वृत्तीची वागण्याची पद्धत जवळून बघिली आहे त्यात त्यांना नक्की वाटले असावे कि येथे आपले नेतृत्व अबाधित राहील आणि फडणवीस किंवा उद्धव ठाकरे हे दोघेही त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला बेदखल न करता आपल्यातल्या नेतृत्वाची कदर करतील म्हणून ते थेट पवारांना किंवा काँग्रेसच्या निपचित पडलेल्या नेतृत्वाला कंटाळून सेना किंवा भाजपामध्ये आलेले आहेत...

देवेंद्र फडणवीसांशी या ना त्या माध्यमातून मी वाद यासाठी घालतो कि त्यांनीही काही चुकीचे अधिकारी मोक्याच्या जागी आणून बसविलेले आहेत. त्यावर त्यांचे असे सांगणे कि मलाही माहित आहेत कि हे अधिकारी कोणत्या थराला पोहोचलेले आहेत पण त्यांनाही कुठेतरी पोस्टिंग देणे आवश्यक ठरते मात्र मी त्यांना तंबी देतो कि हि तुम्हाला शेवटची संधी, आजपर्यंत तुम्ही तुमची बुद्धी स्वतःच्या भल्यासाठी वापरली आता यापुढे जनतेच्या चांगल्या कामांसाठी सेवेसाठी वापरली नाही तर तुम्हाला माहित आहे कि जेव्हा माझी सटकते तेव्हा वाईट लोकांचे काही खरे नसते, त्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मते या सरलेल्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक चांगली कामें करवून दाखवलेली आहे. मान गाये उस्ताद फडणवीसजी, चोरांच्या हाती थेट किल्ल्या देऊन तुम्ही जे त्यांना थेट वाल्मिकी व्हायला शिकविले आहे, मुख्यमंत्री तुस्सी ग्रेट हो...

आमच्या लहानपणी माझ्या एका जिवलग मित्राच्या आईला मी अतिशय जवळून बघत असे न्याहाळत असे, तिचे यासाठी कौतुक वाटे कि ती एकाचवेळी मोठे खटले असलेल्या त्या एकत्र कुटुंबात दिवसभरात जे जे काय करून दाखवायची त्याचेच मला भारी कौतुक वाटायचे, असायचे म्हणजे एकतर ती तिला दरवर्षी एक याप्रमाणे झालेल्या १०-११ मुलांकडे जातीने लक्ष घालायची. मित्राचे वडील शेतकरी, त्यामुळे ते जवळपास सतत घरीच असायचे त्यामुळे तिला रात्री आणि दिवसातून दोन वेळा 
तरी त्यांना कंपनी देणे भाग पडायचे अर्थात त्यामुळेच त्यांना दरवर्षी एक याप्रमाणे झटपट सतत मुले झाली. एक रांगायला लागला कि लगेच त्यांचे पॉट पुढे आलेले असे शिवाय ती स्वयंपाकघरात किंवा शेतीच्या कामात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची 
सरबराई करण्यात कायम पुढे असायची, हे सारे ती उत्साहात करायची कारण घर चांगले ठेवणे तिचे पॅशन होते, फडणवीसांचे देखील मित्राच्या त्या आईसारखेच, त्यांचे घर म्हणजे हे राज्य महाराष्ट्र, त्यांना ते चारही बाजूंनी चांगले ठेवायचे असते,त्यांचे त्यातून माझ्या या मित्राच्या आईसारखे होते म्हणून त्यांच्या तब्बेतीची कायम काळजी वाटते, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा कायम ठणठणीत असावा राहावा हीच देवाकडे प्रार्थना आणि मागणे...

केवळ या पाच वर्षात ज्यावेगाने आपल्या या राज्यात महिला बचत गट पुढे आले, कमावते झाले, पुढे गेले ते बघून कौतुक याचे कि ग्रामीण किंवा शहरी महिलांना दोन वेळेच्या जेवणाची किंवा जगण्याची भ्रांत असे त्या हजारो महिलांना शासनाने केवळ प्रोत्साहन देऊन नव्हे तर पाठीशी उभे राहून त्यांची जी आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर नीट बसवून दिली हे सारे बघून कौतुकाने आपोआप फडणवीसांकडे बघणे पाहणे क्रमप्राप्त होते. अत्यंत महत्वाचे म्हणजे बहुतेक ग्रामस्थ सावकारी पाशात जे अडकलेले होते त्यांना या मुख्यमंत्र्यांनी आधी बाहेर काढले तदनंतर त्यांना आर्थिक सहकार्य करून ज्यापद्धतीने कर्जमुक्त केले, आज त्या ग्रामस्थांच्या घरातले वातावरण थेट वर्षभर दिवाळी साजरी करण्यासारखे जे निर्माण झालेले आहे,त्याचे मोठे श्रेय जाते ते फक्त आणि फक्त फडणवीस सरकारला, एक डोळस पत्रकार म्हणून मी याकडे बघतो म्हणूनच कौतुक करतो. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गावात विशेषतः विदर्भ मराठवाड्यातले स्थानिक गुंड वृत्तीचे जे सावकार होते त्यांचे ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने कंबरडे मोडले ते बघून त्यांना लाख लाख सलाम...
क्रमश: हेमंत जोशी.

No comments:

Post a comment