Monday, 30 September 2019

पुन्हा एकवार फक्त आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशीपुन्हा एकवार फक्त आशिष शेलार : पत्रकार हेमंत जोशी 

मी ज्या सांताक्रूझ पश्चिम परिसरात राहतो, आमदार म्हणून आत्तापर्यंत नामदार आशिष शेलार प्रतिनिधीत्व करीत होते, या विधानसभेलाही ते पुन्हा एकदा येथे निवडून येतील आणि पुन्हा एकदा मंत्रीही होतील, हे आमच्या विधानसभा मतदार संघातले शेम्बडे पोर देखील सांगेल. आशिष नामदार झाल्यानंतर आणि आमदार होते तेव्हाही ते साऱ्या मतदारांच्या कायम टच मध्ये असायचे. आशिष शेलार हे कधीही एखाद्या निष्णात जादूगारासारखे वागले नाहीत आणि वागणारही नाहीत, कि विधानसभा आली म्हणजे मतदारांना भेटायचे दिसायचे हसायचे बोलायचे निवडणूक संपली कि गायब व्हायचे पुन्हा पाच वर्षेनंतर भेटण्यासाठी. त्यांना हे असे मतदारांपासून लांब पळणे घरी बसून दाराची काडी लावून शांत झोपायचे, नो, ना त्यांना कधी जमले म्हणजे अगदी विद्यार्थी परिषदेचे नेते होते तेव्हापासून किंवा आत्ता आत्ता मंत्री झाले तेव्हाही...

राज्यातल्या बहुतेक बहुसंख्य आमदारांच्या कामाची पद्धत मी बघत असतो असे बोटावर मोजण्याएवढे आमदार असतात ज्याच्या मतदारसंघात त्यांना तगडा, प्रभावी चर्चेतला विरोधक नसतो किंवा स्पर्धक नसतो त्यामुळे अमुक एखादे आमदार मतदारांना भेटले किंवा दिसले नाही तर मतदार थेट त्यांना जो आमदाराऐवजी पर्याय उपलब्ध असतो ते त्याच्याकडे जातात म्हणजे जळगाव जिल्ह्यात मतदारांना सुरेशदादा जैन उपलब्ध झाले नाहीत कि ते थेट एकनाथ खडसे यांना गाठायचे भेटायचे आणि अडलेले काम पूर्ण करून मोकळे व्हायचे. पुढे पुढे त्यांना कामाच्या व्यापात अडकलेले एकनाथ खडसे जेव्हा एखाद्यावेळी भेटायचे नाहीत आणि सुरेशदादा जैन तर तुरुंगात होते मग हे जिल्ह्यातले सारे जेव्हा केव्हा त्यांचे अमुक एखादे काम अडकले कि थेट गिरीश महाजन यांना गाठायचे भेटायचे पुढे मतदारांच्या जिल्ह्यातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहिल्याने घडले असे कि सुरेशदादा संपले एकनाथ खडसे मागे पडले आणि गिरीश महाजन झपाट्याने एवढे पुढे गेले कि आज या राज्यातले महत्वाच्या रांगेतले एक घटक आहेत...

www.vikrantjoshi.com

विषयांतर झाले, येथे आज मन त्या आशिष शेलार यांच्याविषयी मोकळे करायचे आहे, ज्या भावना गेली पाच वर्षे मनात दाटून ठेवल्या होत्या त्याच तुम्हाला येथे सांगायच्या आहेत. तर, आशिष शेलार हे आमच्या मतदार संघातले असे एकमेव नेते आहेत कि त्यांना आमच्या या बांद्रा पश्चिम विधानसभा मतदारसंघात कोणीही स्पर्धक नाही, एखादा तगडा विरोधक त्यांच्यासमोर तयार झाला नाही. कधीकाळी त्या बाबा सिद्दकीला काही मतदार भेटायचे पण तेथे त्याच्याकडे जेव्हा बिल्डर लॉबी पडीक असते किंवा आमच्या विधानसभा मतदारसंघात बाबा सिद्दीकी जेव्हा विशिष्ट समाजाचे तेवढे थोडेफार भले करतांना दिसायचे, लोकांनी बाबा सिद्दीकी यांचा नाद कायमसाठी सोडला, या तरुण तडफदार नेतृत्वाला कायम साथ देण्याचे ठरविले. यापुढे केवळ आशिष शेलार हेच आमचे प्रतिनिधी असतील, आमदार असतील ही मतदारांनी मनाशी शपथ घेऊन ठेवलेली आहे....

यावेळी नाही म्हणायला आशिष शेलार यांच्यासमोर बाबा सिद्दीकी यांचे त्यांच्याच पद्धतीने वागणारे चिरंजीव निवडणूक लढविणार आहेत पण मतदारांशी कवडीचाहीसंबंध नसलेले झिशान म्हणजे आमच्या परिसरात एकदम वरच्या वर्तुळात रमलेले उमेदवार, त्यांनी त्यांचे डिपॉझिट जरी वाचविले तरी आम्ही काही मतदार त्या डिपॉझिट वाचवण्यावर सत्यनारायणाची पूजा घालून मोकळे होणार आहोत. थोडक्यात आमच्या या मतदार संघात आशिष शेलार यांच्यासमोर तगडे आव्हान अजिबात कोणाचेही नाही, अमुक एखाद्याकडे शेलारांचा प्रतिस्पर्धी म्हणून बघावे असे कोणी तयार झाले नाही किंवा नजीकच्या भविष्यात त्यांना पर्याय ठरेल असे दूरदूरपर्यंत कोणीही दिसत नाही. म्हणून जेव्हा केव्हा मतदारांचे नागरिकांचे लोकांचे व्यक्तिगत किंवा अन्य सार्वजनिक स्वरूपाचे प्रश्न सोडवायचे असतात, हे सुद्न्य मतदार फक्त आणि फक्त आशिष शेलार यांना जाऊन भेटतात त्यांना अन्य इतर कोणालाही भेटायचे गाठायचे नसते.त्यांना फक्त आणि फक्त आशिष शेलार यांच्या कडूनच काम करवून घ्यायचे असते...

अत्यंत महत्वाचे म्हणजे अमुक एखाद्या मतदाराने तमुक एखादे काम आणले कि काम आणणाऱ्यालाच अंधारात ठेवून त्याच्या कामावर स्वतः डल्ला मारून दरोडा घालून मोकळे व्हायचे हा आधीच्या आमदाराकडून आलेला जो आम्हाला अत्यंत वाईट अनुभव होता, असे कर्नाऱ्यातले, हलकट स्वार्थी वागण्यातले आशिष शेलार अजिबात नसल्याने प्रश्न मग ते कोणत्याही स्वरूपाचे असोत, मतदार शेलारांकडे बिनधास्त बिनदिक्कतपणे आपले काम सांगून, मन मोकळे करून मोकळे होतात. शेलार यांच्या सभोवताली सतत जसा मराठी मतदारांचा गराडा पडलेला असतो त्याच विश्वासाने त्यांच्याकडे आमच्या या परिसरातल्या बहुसंख्य ख्रिश्चन आणि मुस्लिम मतदारांचा देखील कायम ओढा असतो. असे कधीही झाले नाही कि शेलार यांना भेटायला गेल्यानंतर मोठ्या संख्यने त्यांच्याकडे ख्रिश्चन किंवा मुस्लिम मतदार देखील गर्दी करून बसलेले नाहीत. हे असे मी माहीम परिसरात आमदार असतांना सुरेश गंभीर यांच्याबाबतीत बघितले आहे म्हणजे त्यांच्यासभोवताली जी मुस्लिम मतदारांची गर्दी जमायची, बघणारे चकित व्हायचे. हे असे शेलारांकडे गेले भेटले कि बघायला मिळते, तेथे कोणताही भेदभाव न करता समान न्याय देतांना, आम्हा सर्वांसाठी धावून जातांना आशिष शेलार यांना बघितलेले आहे...
क्रमश: हेमंत जोशी.

Sunday, 29 September 2019

यारोंका यार फिर एक बार : पत्रकार हेमंत जोशी


यारोंका यार फिर एक बार : पत्रकार हेमंत जोशी 
शिखर बँक प्रकरण अनेकांना अडचणीचे ठरणार आहे कारण काँग्रेसमधल्या एकमेव ना खाऊंगा ना खाने दूंगा संस्कारातून घराण्यातून आलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी ईडीकडे ते पाठवून दिलेले आहे. राजन पारकर नावाच्या आमच्या पत्रकार मित्राचे लग्न निदान याजन्मी होणे अशक्य कारण त्याने शपथ घेतली आहे जोपर्यंत वहिदा रहेमान किंवा आशा पारेख या दोनपैकी कोणीही एक बोहल्यावर चढणार नाही, मी लग्न करणार नाही. मकरंद अनासपुरे यांचे केस कधीही विस्कटलेले तुम्हाला दिसणार नाहीत कारण विग कधीही विस्कटत नसतो. ऍक्सिस बँक एकमेव अशी जी कधीही बंद पडणार नाही कारण तेथे अमृता फडणवीस कामाला आहेत आणि चंद्रपूर मतदारसंघात कायम भाजपा आमदार निवडून येणार आहे कारण त्या मतदार संघाचे आमदार व उमेदवार सुधीर मुनगंटीवार आहेत, असतात. नेहमीप्रमाणे सुधीर मुनगंटीवार हेच या मतदार संघातून उभे राहतील, यावेळीही विक्रमाधिक्याने निवडून येतील...

केसांचा विग वापरणाऱ्यांविषयी कुतूहल आहे, जिज्ञासेपोटी त्यांच्याकडून नेमके जाणून घ्यायचे आहे कि घरी गेल्यावर गावकरी जशी आपली टोपी खुंटीला टांगून ठेवतात तसे हे देखील डोक्यावरचा विग काढून खुंटीला टांगून ठेवतात का कि थेट रात्रीच बायकोच्या हाती झोपतांना काढून देतात, नेमके माहित नाही. विगचा भांग आधीच पाडल्या जातो कि विग डोक्यावर चढविल्या नंतर त्यांची बायको भांग पाडून देते. प्रेयसी किंवा पत्नी विग घालणाऱ्याच्या केसांवरून जेव्हा प्रेमाने हात फिरविते तेव्हा तो प्रेमाचा स्पर्श त्यांच्या शरीराला जाणवतो का कि शास्त्रक्रियापूर्वी क्लोरोफॉम दिल्याने पुढे जसे काही जाणवत नाही तसे विग घातलेल्या पुरुषांचे होते, असते. विग घालणाऱ्यांना खोबरेल तेल लावावे लागते का, आठवड्यातून किमान एकदा शाम्पू त्यांना करावा लागतो का, असे अनेक प्रश्न मला विग घालणाऱ्यांच्या बाबतीत पडलेले असतात..

www.vikrantjoshi.com

पुरुष केसांचा विग का वापरतात मला न उलगडलेले कोडे आहे याउलट केस नसलेले गळलेले म्हणजे टक्कल पडलेले पुरुष अधिक कर्तृत्वान बुद्धिमान आणि हो, सेक्सी असतात असे स्त्रियांना वाटते त्यामुळे विग घालून त्यांनी स्वतःचे हसे करवून घेऊ नये, विग वापरणारे पुरुष इतरांचा हमखास थट्टेचा टिंगलीचा विषय ठरतात, चिडविण्याचे खिजविण्याचे विषय असतात. विग घालणाऱ्या साऱ्या पुरुषांना हे उगाचच वाटत असते कि मी विग वापरतो ते कोणाच्याही लक्षात येत नाही, हा त्यांचा हमखास गैरसमज असतो. जेव्हा एखादी महिला विग वापरणाऱ्या पुरुषाचे केस धरून त्याला बाहेर काढते तेव्हा खरे स्वरूप क्षणार्धात बाहेर पडते. मी स्वतः विग वापरतो असेही अनेकींना वाटत असल्याने माझ्यावर हे प्रसंग कितींदातरी ओढवले आहेत. मला तर सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही संशय आहे कि तेही विग वापरतअसावेत, विचारण्यासाठी नो चान्स कारण सुधीर मुनगंटीवार एकपत्नीव्रत असल्याने म्हणजे ते पुढारी असूनही त्यांचे गाव तेथे कुटुंब नसल्याने त्यांच्या अमुक एखाद्या मैत्रिणीला जाऊन विचारावे कि भाऊंचे ओरिजनल आहेत कि तेही विग वापरतात म्हणून...

पत्रकार किशोर कुलकर्णी यांनी म्हटले आहे कि, भारावून जाणे हा सुधीरभाऊ नामें संवेदनशील नेत्याचा माणसाचा स्वाभाविक अविष्कार असावा, त्यामुळे जग्गी वासुदेव यांच्या जल व वन क्षेत्रातील कामांचा पुढाकार त्यांना प्रभावित करतो. श्रीश्री रविशंकर यांचे विचार त्यांचा सहवास त्यांना प्रभावित करतो. बाबा रामदेव यांनी निसर्गाच्या कुशीतून दिलेले आयुर्वेद म्हणजे त्यांची निसर्गा ची व्यवहाराशी घातलेली सांगड यांना कायम प्रभावित करते. जंगलावर प्रेम करणारा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यावर श्रद्धा ठेवणारा हा नेता, भन्नाट माणूस मधमाशीप्रमाणे समाजात राजकारणात मतदारसंघात राज्यात देशात वावरतांना विचिध व्यक्ती, संस्था, प्रसंग, अनुभव यातून अखंड मधू संकलन करतो आणि कृत्यातून त्याचा आनंद इतरांना देतो. बरे झाले ते मंत्री झाले व त्यांना त्यांच्या आवडीचे वन खाते मिळाले, त्यातून कोट्यवधी वृक्ष लागवडीची रोपणाची कल्पना जन्माला आली ज्याचे रूपांतर नजीकच्या काळात घनदाट वृक्षवेलींमध्ये झाल्याचे तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे...

मुनगंटीवार नेहमी सांगतात, मी राजकारणात यावे यासाठी ना कोणी आंदोलन ना उपोषण केले. त्यासाठी ना कोणी मोर्चे काढले वा धरणे धरले. राजकारण,त्याचबरोबर समाजकारण हा माझा आवडीचा प्रांत व घेतलेला स्वतःचा निर्णय. त्यामुळे संपूर्ण यशापयशाची जबाबदारी माझी स्वतःची असते. कधीतरी अमुक एखादयाठिकाणी अपयश आले कि त्याचे खापर सहकारी नेते व कार्यकर्त्यांवर फोडून अपयश झाकण्यातला मी पळपुट्या नेता अजिबात नाही. कायम जमिनीवर राहायचे, जामिनावर नाही असे माझे मत त्यामुळे विजयाने मी माजलो किंवा अमुक एखाद्या पराभवाने खचलो, असे कधी घडत नाही घडणार देखील नाही, कदाचित याला वडिलांकडून देशभक्तीचे मिळालेले कणखर बाळकडू कारणीभूत असावे. दीनदुबळ्या वंचित शोषित अनाथ अपंग धिक्कारलेल्या नाकारलेल्या अडगळीत पडलेल्या अडचणीत अपघातात सापडलेल्या शेतकरी शेतमजूर बेकार बेरोजगार लोकांसाठी जनतेसाठी मतदारांसाठी अपेक्षाविरहित काम करत राहायचे मी ठरविलेले आहे, त्यात बदल करणार नाही....
क्रमश: हेमंत जोशी

बार बार मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशीबार बार मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशी 
श्री शरद पवार यांना गेली ३९ वर्षे बऱ्यापैकी जवळून बघत आलो आहे, त्यांचे आजतागायत झालेले राजकीय अपमान किंवा इतर मानसन्मान मला पाठ आहेत ठाऊक आहेत ज्ञात आहेत पण त्यांचा २७ सप्टेंबरला झालेला अपमान मला वाटते मध्यंतरी दिल्लीत त्यांच्या थोबाडात ज्याने जाहीर ठेवून दिली होती त्यापेक्षा जहरी होता, असे येथे मुद्दाम सांगावेसे वाटते. अत्यंत महत्वाचे असे कि शरद पवार व्यक्तिगत वाईट नाहीत चांगले आहेत त्यांनी अनेक माणसे उभी केली वाढविली घडविली मोठी केली पण त्यांचे नेमके हे चुकले कि त्यांनी उभी केलेली नेत्यांची फळी अजिबात चांगली निवडली नाही, दहशत निर्माण करणारे भ्रष्ट गुंड प्रवृत्तीचे त्यांनी नेते म्हणून मोठे केले तेच आज त्यांच्या अंगलट आलेले आहे. चार दोन गुंड भ्रष्ट नीच वृत्तीचे नेते साऱ्याच पक्षात असतात पण पवारांनी रोहित पवार, आर आर पाटील किंवा अमोल कोल्हे यांच्यासारखे दुसऱ्या फळीतले नेते मोठ्या प्रमाणावर उभे न करता त्यांनी प्रफुल्लछाप नेत्यांची जी मोठी फळी उभी केली ते चांगले केले नाही जे त्यांना आता आयुष्यच्या संध्याकाळी भोवते आहे, भोवले आहे...

अजित पवार यांनी त्यांच्या पवार कुटुंबात कुटुंबाविरुद्ध विशेषतः काकांविरुद्ध आधी केलेले बंड नंतर मागे घेतलेले असले आणि बंड मागे घेतांना सांगितलेली कारणे स्पष्ट केलेली असली तरी अजितदादा यांनी अत्यंत नाजुकक्षणी शरद पवार यांच्याविरुद्ध पुकारलेले बंड नेमके कोणत्या कारणांसाठी हे न समजण्या इतकी जनता भोळी आहे असे समजण्याचे कारण नाही. शरद पवार तिकडे दिल्लीत रमलेले असतांना ज्या अजित पवार यांनी सतत दहा वर्षे अत्यंत यशस्वी पक्षाची धुरा डॅशिंग नेते म्हणून सांभाळली त्या अजितदादा यांना ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्या पद्धतीने प्रत्येक रथ यात्रेत किंवा अन्य प्रत्येक ठिकाणी दूर ठेवून आणि अमोल कोल्हे किंवा धनंजय मुंडे या कालच्या म्हणजे नवोदित नेत्यांना समोर करून अजितदादांना अपमानित करणे, त्यांनी केवळ या वैतागापोटी काकांपासून दूर जाण्याचे ठरविले होते अशी माझी माहिती आहे, त्यावर अधिक पुरावे मी पुढे नक्की सांगणार आहे. पण शरद पवारांच्या केलेली मोठी चूक लक्षात आली त्यांनी पुन्हा अशी चूक न करण्याचे दादांना वाचन दिले आणि सारे पुन्हा सुरळीत सुरु झाले...

www.vikrantjoshi.com
१९९५ च्या मंत्रिमंडळात नामदारकी, तदनंतर प्रदशाध्यक्षपद, अलीकडे पाच वर्षे राज्याचे वन आणि अर्थ या महत्वाच्या खात्यांचे मंत्री असूनही कुठे बदनाम झाले चारित्र्य गमावले, पैशांच्याच मागे लागले असे मुनगंटीवार यांच्याबाबतीत कधी घडले नाही कारण सामाजिक भान ठेवून आणि समाजाची भीती बाळगून उत्तम संस्कार राखून त्यांचे भाजपाचे बुजुर्ग नेते कामसू नेतृत्व म्हणून उत्तम चाललेले आहे. कोणत्याही वेळी सामान्य कार्यकर्त्याना अभ्यंगतांना सुधीरभाऊंना सहज भेटता येते त्यांच्याशी मनमोकळे बोलणे प्रत्येकाला सहज शक्य असते कारण ते कार्यकर्त्यांचे सामान्य मतदारांचे नेते आहेत, बऱ्यापैकी गप्पिष्ट आहेत अर्थात असे नाही कि ते टाईमपास नेते आहेत म्हणजे मुनगंटीवार हे च्युईंगगम नव्हेत कि चघळतांना तेवढे गोड वाटते आणि चघळण्यातला गोडवा संपला कि ना भूक भागते ना तोंडाला चव उरते, त्यांचे बोलणे जेवढे साधे सरळ असते तेवढे त्यांनी दिलेले शब्द आश्वासक असतात, एकदा ' हो करतो ' असे त्यांनी म्हटले कि आपले काम झाले असे त्यांना भेटणार्यांचे कायम सांगणे असते...

मला आठवते १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे सुधीर मुनगंटीवार हे केवळ डॉ. सच्चीदानंद मुनगंटीवार या आणीबाणीच्या काळात तुरुंगात गेलेल्या संघ नेत्याचे तडफदार चिरन्जीव म्हणून ओळखल्या जायचे पण कार्यकर्त्याचे पाय पाळण्यात ओळखणाऱ्या दिवंगत आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यादरम्यान म्हटले होते कि ये नौजवान आज चलकर बडा नेता बनेगा, असे म्हटले होते जे नेमके पुढे घडले. पुढे २०१० ते २०१४ दरम्यान त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम काम बघितले, त्यांचे काम फळाला आले, तब्बल पंधरा वर्षांनंतर २०१४ मध्ये लगेच सेना भाजपा युती सत्तेत आली. आता तेच सुधीर मुनगंटीवार थेट सहाव्यांदा यावेळी विधानसभेची निवडणूक लढताहेत विशेष म्हणजे याआधी ते सतत पाच वेळा विधानसभेत निवडून गेले आहेत, त्यांचे जे जे मतदार मला भेटले, यावेळी सुधीर मुनगंटीवार सर्वाधिक मतांनी निवडून जातील त्यांनी मला मुद्दाम निक्षून सांगितले. व्होटर्स आर कॉन्फिडन्ट....

अर्थात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येणे मुनगंटीवार यांना नवीन नाही, १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत ते विदर्भातून सर्वाधिक मताधिक्याने चंद्रपूर विधानसभेची निवडणूक जिंकली आहे. सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक घरी घरच्यासारखे म्हणजे प्रत्येकाचे जणू एक कुटुंबसदस्य म्हणून नावाजलेले आहेत, राज्यात गाजलेले आहेत. भाऊ हे नाते आदराचे असते, मोठ्या भावाचे नाते हे घरातल्या प्रत्येकाला आधाराचे प्रतीक असते. आपल्या नावापुढे राव पंत साहेब अशी कोणतीही बिरुदावली न लावता मी तुमचा मोठा भाऊ तुमचा लाडका दादा या नात्याने माझ्याकडे बघा आणि तुमचे काम अडले कि कुठल्याही वेळी माझ्याकडे येत चला हे मुनगंटीवार यांनी जपलेले आणि सांगितलेले नाते चंद्रपूर मतदारसंघात प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक मानल्या गेले आहे, वर्षानुवर्षे हे नाते जसेच्या तसे मतदारांनी आणि मुनगंटीवारांनी जपलेले आहे...
क्रमश: हेमंत जोशी

Friday, 27 September 2019

पवार वार आणि पवार वॉर : पत्रकार हेमंत जोशी


पवार वार आणि पवार वॉर : पत्रकार हेमंत जोशी 

शरद पवारांनी २७ सप्टेंबर जो जाणूनबुजून अभूतपूर्व गोंधळ घातला तो त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक बालिश क्षण होता त्यावर वास्तविक मतदारांनी हसण्या पलीकडे फारसे सिरियसली घेऊ नये. डॉक्टर दिसले रे दिसले कि लहान मुले दवाखान्यात जसे भोकांड पसरतात किंवा त्यानंतर डॉक्टरांच्या हातात इंजेक्शन दिसले कि हीच लहान मुले आकांडतांडव करतात ते तसे हुबेहूब पवारांचे २७ तारखेला झालेले होते, त्यांनी आधी भोकांड पसरले नंतर आकांडतांडव केले कारण समोर दिसणारे डॉ. ईडी आपल्याला सुधारण्याचे जहाल इंजेक्शन देऊन नंतरच बाहेर काढणार आहेत हे एव्हाना पवारांच्या लक्षात न येण्याएवढे ते वेडे किंवा खुळे नाहीत. मतदारांची सिम्पथी मिळविण्याचा पवारांचा हा बालिश प्रयत्न त्यांचा त्यातून त्याक्षणी हेतू थोडाफार निश्चित नक्की साध्य झालेला असला तरी नजीकच्या भविष्यात जेव्हा पवार आणि त्याचे ४० चोर विविध कारणांनी ईडीच्या जाळ्यात अडकतील, ओढले जातील तेव्हा पवारांचाही चिदंबरन किंवा शिवकुमार झालेला असेल, साधे कुत्रे देखील त्यांच्या पाठीशी उभे नसेल. काल परवा ज्या पवारांनी ईडी मध्ये अडकलेल्याला तुरुंगात गेलेल्या भुजबळ काका पुतण्याची बाहेरून गम्मत बघितली तीच वेळ शंभर टक्के एक दिवस त्यांच्यावर देखील ओढवणार आहे...

वाचकमित्रहो, अलीकडे जगभरात माझ्या मराठी वाचकांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढून ती आता जवळपास २० लाखांवर गेलेली आहे. तुम्ही, माझ्या प्रत्येक वाचकाने माझे लिखाण तुमच्या मित्रांकडे यासाठी आणखी आणखी यासाठी पोहोचवावे कि ते लिखाण किंवा पत्रकार भाऊ तोरसेकरांचे लिखाण, आम्ही त्याकडे एक मिशन म्हणून बघत असतो, डोक्यात २४ तास त्या लिखाणांचेच भूत एवढे सवार असते कि विचारू नका. त्यातल्या त्यात एक बरे आहे कि माझे नव्याने लग्न झालेले नाही अन्यथा पत्नी ऐवजी रोमान्स करतांना मी आयपॅडची पप्पी घेतली असती आणि जे मित्र माहिती देतात त्यांनाच मी पत्नीऐवजी मधुचंद्राला नेले असते. आम्ही जो जहाल विचार तुमच्या पर्यंत पोहोचवत असतो त्यामागे आईशपथ कोणत्याही जातीला कोणत्याही प्रांताला धरून कवटाळून ते लिखाण नसते तर १९९० ते आजतागायत पवार गॅंग आणि काँग्रेस मधले काही दरोडेखोरांना ताळ्यावर आणण्यासाठी हे मिशन राबविले जात असते. उद्या क्लीन मिशन पासून फडणवीस जरी विचलित झाले तर पुन्हा आईशपथ सांगतो, आम्ही, मी त्यांनाही सोडणार नाही...

www.offthetrecordonline.com

२७ सप्टेंबरला पवार जेव्हा ईडीच्या नावाने शिमगा साजरा करीत होते तेव्हा मी टीव्ही ९ च्या कार्यालयातील केबिन मध्ये एका बुजुर्ग पत्रकारांसंगे बसून टीव्हीवर त्यांचे धिंगाणे बघत असतांना अचानक मला जोरात हसायला आले असतांना त्या बुजुर्ग पत्रकाराने मला का हसलात विचारल्यावर मी म्हणालो, कशी गम्मत आहे ज्यांना राष्ट्रवादी सोडायची होती, नक्की सोडायची आहे ते जयंत पाटील, अनिल देशमुख, विद्या चव्हाण का कोण जाणे, पवारांची डिमांड वाढते आहे बघितल्या बघितल्या सर्वात समोर जाऊन उभे आहेत. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड एरवी फडणवीसांच्या समोर गुढगे टेकून उभे असतात ते आव्हाड मी बघा कसा पवारांचा त्यांच्या संकटातला सच्चा साथीदार म्हणून मिरवितांना दिसताहेत म्हणून मला हसू आवरत नव्हते. विद्या 
चव्हाण, अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड किंवा जयंत पाटील इत्यादी फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी पवारांचे पाठीराखे आज दिसणे म्हणजे त्याला म्हणतात संधी अभावी ब्रम्हचारी राहणे. अनिल देशमुख यांना उमेदवारीचे वचन मिळत असेल तर त्यांना कसे शिवसेनेत जायचे आहे त्यावर मिलिंद नार्वेकर तुम्हाला व्यापक सांगू शकतील, थोडक्यात काल जे पवारांच्या मागे उभे होते ते देखील उद्या तेथे उभे असलेलेदिसणार नाहीत हे शंभर टक्के खरे आहे...

स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा केव्हा महात्मा गांधी लोकमान्य टिळक किंवा अन्य नेते तुरुंगात जायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अन्य दुसऱ्या फळीतले नेते देखील इंग्रजांना सांगायचे एकटे बापू कशाला, आम्हालाही तुम्ही तुरुंगात टाका आणि आंदोलने करून तेही तुरुंगात जायचे. जे तेव्हा घडायचे ते आता पवारांच्याही बाबतीत घडलेच पाहिजे म्हणजे पवार जसे ईडीला ठणकावून सांगताहेत कि होऊन जाऊ द्या माझी ईडी चौकशी तसे मग ते अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, हेमंत टकले, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, धनंजय मुंडे इत्यादी जे पवारांकडे उरले आहेत त्या सर्वांनी ईडीला ठणकावून सांगितलेच पाहिजे कि होऊन जाऊ द्या आमचीही चौकशी. वाचकमित्रहो, मी पवारांच्या पुढे पुढे करणाऱ्या ज्या नेत्यांची नावे सांगतो, त्यातले रोहित पवार, अमोल कोल्हे इत्यादी चार दोन नवखे दुसऱ्या फळीतले नेते सोडले त्याव्यतिरिक्त एकाने जरी, होऊन जाऊ द्या आमचीही ईडी चौकशी, म्हटले तर मी माझी पत्रकारिता सोडून देईन आणि सरळ तुमच्या घरी येऊन तुमच्या घरातली लुगडी धुवायला सुरुवात करेल. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पवार सिम्पथी मिळविण्याचा प्रयत्न करीत होते जे त्यांना या ईडी निमित्ताने जमले, त्यांच्या परंपरागत मतांचा त्यांना या मिळालेल्या सिम्पथीमुळे काही प्रमाणात फायदा नक्की मिळेल निदान आज तरी तसे चित्र निर्माण झालेले आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

पुन्हा एकवार हेच शासन हेच सरकार : पत्रकार हेमंत जोशी


पुन्हा एकवार हेच शासन हेच सरकार : पत्रकार हेमंत जोशी 

जळगावातल्या माझ्या त्या भालेराव आडनावाच्या मित्राला जवळपास १३ भावंडे होती, ज्याच्या आईचे मी आधीच्या एका लेखात कौतुक केले आहे. या पिढीला मूल झाले कि दुसरे नकोसे वाटते त्याकाळी पाच सात मुले झाल्यानंतर देखील पुढले अपत्य जन्माला घालण्यासाठी जोडपी अशी तयार असायची जणू ते पहिल्यांदा हनिमून साजरा करण्यासाठी अंथरुणावर पहुडले आहेत. माझ्या या मित्राच्या घरात तर एक वेळ अशी आली होती कि बाळंतपणासाठी एकाच रांगेत तिघींच्या खाटा टाकलेल्या होत्या, मित्राच्या आईची, सुनेची आणि मोठ्या मुलीची. काही मुस्लिम देशात तर आजी आणि नातीची एकाचवेळी बाळंतपणे उरकली जातात. मित्राच्या आईवडिलांना जशी आपल्या १३ अपत्यांची नावे पाठ नव्हती तसे आज माझे याठिकाणी झाले आहे म्हणजे अनेक सांगताहेत कि फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात लोकोपयोगी निर्णय घेतले,त्यावर लिहा, तुम्हीच सांगा, कोणकोणते निर्णय लक्षात ठेवू आणि लिहू, लिहायला बसलो तर त्यावर एक कादंबरी लिहून काढावी लागेल...

आपले राज्य शेतीप्रधान आणि शेतकऱ्यांच्या समस्या जेवढ्या विदर्भातल्या फडणवीसांनी जवळून बघितलेल्या आहेत तेवढे काम आधीच्या सरकारमध्ये कधीही घडणे शक्य नव्हते कारण होरपळलेल्या शेतकऱ्यांचा विदर्भ आणि मराठवाडा आधीच्या सरकारमध्ये केवळ सहलीला अधून मधून जाण्याचे ठिकाण होते, माझे खोटे वाटत असेल तर शोध घ्यावा आणि मला सांगावे कि जयंत पाटलांसारखे बहुतेक मंत्री कितींदा विदर्भ मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात फिरले किंवा फिरकले, पैसे मोजण्यापुढे या मंडळींना ना कधी वेळ मिळालाना कधी त्यांनी सर्वसामान्यांसाठी वेळ काढला आहे म्हणून शब्दरूपी या मंडळींना मला कायम थोबाडात मारतांना अजिबात वाईट वाटत नाही. फडणवीस किंवा त्यांच्या मंत्र्यांनी कोणताही दुजाभाव न करता पायाला भिंगरी लागल्यागत ते सारे गावोगावी फिरले म्हणून त्यांना लोकांचे जनतेचे मतदारांचे नेमके दुःख कळले. फडणवीस सरकारने जवळपास सारे निर्णय ग्रामीण जनतेसाठी विशेषतः शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी घेतले आहेत,माझे खोटे वाटत असेल तर माहिती व जनसंपर्क खात्याच्या वेबसाईटवर आपण नक्की जावे आणि खात्री करून मला सांगावे. अत्यंत महत्वाचे म्हणजे केवळ निर्णय त्यांनी घेतले नाहीत तर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी देखील केली, करून दाखवली...

www.vikrantjoshi.com

१९८० ते आजतागायत मी सार्या मुख्यमंत्र्यांना आणि त्या त्या वेळेच्या त्यांच्या सहकाऱ्यांना अतिशय अतिशय जवळून बघत आलेलो आहे हे मला जवळून ओळखणाऱ्यांना सांगणे म्हणजे मुख्यमंत्री कॉफी लव्हर आहेत हे सुमित वानखेडे किंवा केतन पाठक यांना सांगण्या सारखे किंवा गोविंदराव आदिक त्यांच्या पाठी त्यांच्या मुलांसाठी ते शरद पवारांचे मित्र व सहकारी असूनही जेमतेम संपत्ती सोडून गेलेत हे तुम्हाला ओरडून सांगण्यासारखे. आदिक मला शेवटच्या भेटीत जे म्हणाले होते तेच त्रिवार सत्य आहे कि पवारांनी त्यांना आयुष्यात खुबीने फक्त वापरून घेतले. अलीकडे तरीही गोविंदरावांच्या अविनाशला जेव्हा मी शरद पवारांचे सारथ्य करतांना बघितले डोळ्यात पाणी आले, गोविंदरावांचा दगाफटका न करण्याचा स्वभाव अविनाशने देखील उचलला, बघून बरे वाटले. विषयांतर झाले, महत्वाचे असे कि जेवढे फडणवीसांनी राज्याचे भले करतांना जीवाचे रान केले निदान माझ्या तरी आठवणीत असे मुख्यमंत्री नाहीत, सुधाकरराव नाईक यांना देखील वेगळे काहीतरी करून दाखविण्याची जिद्द होती पण पवारांनी त्यांना त्याकाळी अजिबात सुचू दिले नाही जेव्हा सुधाकरराव राजकारणातून नोव्हेअर झाले तेव्हाच पवार गप्प बसले, मनातून उतरलेल्यांना संपविणे उध्वस्त करणे बदनाम करणे आयुष्यातून उठविणे एखाद्याचा दत्ता मेघे किंवा सुधाकरराव नाईक करणे हे काम मात्र पवारांना छान जमले म्हणून अनेकदा फडणवीसांची काळजी वाटते, त्यांनाही संपविण्यासाठी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यासाठी यांनी कमी का कुभांड रचले पण देवेंद्र फडणवीस असे पक्के आणि कणखर कि ते शरद पवारांना त्यांच्या क्लुप्त्यांना पुरून उरले...

एवढेच सांगतो जर राज्यातल्या सुजाण प्रत्येक मराठी माणसाला मतदारांना पहिल्यांदा नेमकी प्रगती साधणे म्हणजे काय असते हे खरोखरी बघण्याची अनुभवण्याची इच्छा असेल तर पुढली पाच वर्षे आपण फडणवीसांना कमीत कमी मानसिक त्रास द्यायला हवा. घरातला कर्ता पुरुष जेव्हा घराचे भले करण्यासाठी दरदिवशी बाहेर पडतो तेव्हा त्याची पत्नी आणि समजूतदार मुले जशी त्याची काळजी घेतात आणि त्याला अधिकाधिक शक्ती देवाने बहाल करावी अशी जी प्रार्थना ते सारे देवाकडे बेंबीच्या देठापासून करतात, निदान किमान पुढली पाच वर्षे तरी या देवेंद्र फडणवीसांना आपण आपल्या घरातला कर्तृत्ववान धीरोदात्त निधड्या पराक्रमी दूरदर्शी समाजपयोगी देशप्रेमी लोकसेवक युगपुरुष समजून त्यांना शुभेच्छा देत राहू आणि त्यांना त्यांच्या डोक्याला विनाकारण ताप मनस्ताप होणार नाही याची खबरदारी नक्की घेऊ, मी डोळ्यात तेल घालून तुम्हाला हे निक्षून सांगतो आहे कि त्यांना हे राज्य फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे, आपले फक्त एवढेच काम आणि जबाबदारी कि फडणवीसांना तुम्हा आम्हा सर्वांकडून मदत झाली नाही तर चालेले पण त्यांना त्रास देणे अजिबात नको...
क्रमश: हेमंत जोशी

Thursday, 26 September 2019

पवार ईडी आणि सिम्पथी : पत्रकार हेमंत जोशी


पवार ईडी आणि सिम्पथी : पत्रकार हेमंत जोशी 
जेव्हा केव्हा माझी चूक असते माझे चुकलेले असते तेव्हा मी समोरचा सामान्य गरीब घाबरट गांडू आंडूपांडु असला तरी त्याची माफी मागून मोकळा होतो किंवा पार गर्भगळीत झालेला असतो पण चूक नसेल तर समोर हत्तीचे बळ असलेला जरी उभा ठाकला तरी तसूभरही घाबरून जात नाही. त्या ईडीच्या चौकशीवरून मी हे तुम्हाला सांगतोय. कर नाही त्याला डर कशाला, कवडीचीही काळी कमाईकरून ठेवलेली नसेल तर ईडी असो कि बिडी किंवा तुमच्या आयुष्यात आलेली एखादी वेडी, घाबरून जाण्याचे काहीही कारण नसते. उद्या तुम्ही अमुक एखाद्या तरुणीला पोटुशी ठेवल्यानंतर जर घाबरणारे असाल तर मग अशी बेकायदेशीर कामें करायची तरी कशाला? या राज्यातले असे अनेक नेते अधिकारी मला अति जवळून ठाऊक आहेत कि त्यांनी अतिशय उथळ पद्धतीने व्यवहार करून ठेवलेले आहेत, मोदी हे कोणालाही न सोडणारे असल्याने आज ना उद्या त्या साऱ्यांना ईडी ला सामोरे नक्की जावे लागणार आहे... 

अमुक एखाद्या ठिकाणी भीती वाटणार नसेल तर त्या प्रसंगाचे भांडवल तरी का करायचे. समजा तुम्हाला हागवणीचा त्रास होत असेल तर त्याचे तुम्ही भांडवल करता का, मोठ्याने साऱ्यांना ओरडून सांगता का कि मला हागवणीचा त्रास होतो आहे, अजिबात नाही. गुपचूप डॉक्टरकडे जाऊन औषधे घेऊन मोकळे होता तद्वत सध्या चाललेल्या ईडी चौकशांचे, शरद पवार का आणि कशाला एवढे भांडवल करताहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर सिम्पथी तीही मतदारांकडून मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताहेत. पेरले तेच उगवते आहे. कालपर्यंत कटोरा हाती घेऊन दारोदार फिरणारे पवारांचे बहुतेक सवंगडी, अचानक अति नवश्रीमंत झाले असल्याने ईडीला त्यावर कुतूहल असणे गरजेचे होते, आवश्यक वाटले. माझ्याकडे जी माहिती आहे ती भयावह आहे, पवारांच्या प्रत्येक नवश्रीमंत झालेल्या सहकाऱ्यांना ईडीकडे नेमके सांगावेच लागणार आहे कि त्यांनी एवढी मालमत्ता संपत्ती कशी आणि कोठून जमा केलेली आहे. हो, अगदी सुप्रिया सुळे यांनाही नेमके उत्तर द्यावेच लागणार आहे. आजपर्यंत कोणत्याही परिणामांची चिंता काळजी फिकीर न करता जमा केलेल्या अफाट संपत्तीचे स्रोत सर्वांना सांगणे आवश्यक झाले आहे...

www.vikrantjoshi.com

सर्वसामान्य मतदारांना तर हिंदी सिनेमात जसे घडते आणि बघतांना आनंद होतो तो तसा आनंद व्हायला हवा कि कालपर्यंत आपल्या गावातले पवारांचे किंवा काँग्रेसचे अमुक एखादे नेते साध्या सायकल किंवा मोटारसायकलवर फिरायचे आणि अचानक पैसे आल्याने ते माजले पण मोदींच्या या राज्यात त्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागणे, यापेक्षा अधिक आनंद काय असू शकतो. ज्यांनी हे राज्य लुटले आज त्यांच्यामागे चौकशी फेरे लागले म्हणून त्यांना सिम्पथी आणि मतदान करून मोकळे व्हायचे म्हणजे हे राज्य लुटण्यासाठी पुन्हा त्यांच्या हाती सोपवायची, थोडक्यात ज्याने आपल्या आई बहिणींवर अत्याचार केले त्याच्याकडे रात्रीच्यावेळी पुन्हा आयाबहिणींना आपण पाठविण्यासारखी हि घोडचूक आहे. चोरांच्या हाती किल्ल्या देण्याचा तो प्रकार ठरावा. मतदारांनो, तुमचे हे असे वागणे असेल तर ते तद्दन चूक आहे असे मी ठामपणे येथे तुम्हाला सांगतो आहे. नेता किंवा अधिकारी मग तो कोणत्याही धर्माचा, जातीचा असो विचारांचा असो ज्याने म्हणून हे राज्य ओरबाडून खाल्ले त्याला अजिबात माफी नसावी, कोणतीही दयामाया त्यांना न दाखवण्याची आपली मानसिकता असावी, ज्यांनी ज्यांनी लुटले त्यांना योग्य धडा मिळायलाच हवा, शिक्षा झालीच पाहिजे...

माझ्या मित्राचे त्याच्या बायकोसंगे यासाठी भांडण होते कि ती म्हणायची तू लेडीजबार मध्ये जाऊ नको तर तो सांगायचा कि तेथे जाऊन तो पैसे उधळत नाही त्याचे मित्र त्याचा तेथे होणाऱ्या खाण्यापिण्याचा खर्च करतात. चूक मित्राची होती, ताडाच्या झाडाखाली बसलेल्याने म्हणायचे कि मी दारू पित नाही तसे त्याचे सांगणे होते. पवार कींवा अन्य ज्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे त्यांना माझे नेमके हेच सांगणे आहे कि या या राज्यात हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, पृथ्वीराज चव्हाण, आर आर पाटलांच्या आमदार पत्नी किंवा मुले असे कितीतरी असतांना, ईडीने नेमके तुम्हाला घेरलेले आहे कारण ईडीला नक्की हे ठाऊक आहे कि असे सारे ताडाच्या झाडाखाली केवळ बसलेले नसून त्यांनी मद्य देखील प्राशन केलेले आहे. एक साऱ्यांनी यापुढे ध्यानात ठेवावे कि तिकडे देशात नरेंद्र आणि इकडे राज्यात देवेंद्र या दोघांना ज्या मतदारांनी सत्तेत आणून बसविलेले आहे, पुनःपुन्हा आणून बसवणार आहेत, या नरेंद्र किंवा देवेंद्र यांच्या यापुढे नजरेतून वाईट माणसे सुटणे अशक्य असे काम आहे, जवाब देणे गरजेचे ठरणार आहे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

फीर अबकी बार सुधीर मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशी


फीर अबकी बार सुधीर मुनगंटीवार : पत्रकार हेमंत जोशी 
दीड दोन वर्षांपूर्वी सुधीर मुनगंटीवार यांची प्रकृती कुठल्याशा कारणाने बऱ्यापैकी काळजी करण्यासारखी ठीक नव्हती, शस्त्रक्रिया करावी लागली, डॉक्तरांनी शस्त्रक्रियेनंतर काही महिने त्यांना बोलण्यावर आणि धावपळ करण्या मनाई केलेली होती पण सुधीरभाऊंनी फारसे मनावर घेतले नाही, मला आठवते ८-१० दिवसातच ते असे काही बोलायला लागले,काम करायला लागले कि जणू काही गंभीर घडलेच नाही. कुठून येते हि एनर्जी, केवळ परमेश्वराचे आशीर्वाद त्यावर हे फारतर म्हणता येईल. स्वस्थ बसायचेच नाही, म्हणणारे उगाच म्हणतात, आम्ही विदर्भातले पक्के आळशी नि तंबाखू चोळत टाईमपास करणारे, मुनगंटीवार, फडणवीसांचे आराम न करणे बघून मी तर गमतीने असे म्हणेल कि पश्चिम महाराष्ट्रातले शंभर पुरुष मिळून जेवढे काम होत असेल तेवढे तर एकटे सुधीरभाऊ करतात त्यामुळे आमच्या विदर्भात शंभर घरांमागे एका जरी पुरुषाने काम केले तरी ते पुरेसे असते, एवढी प्रचंड गती सुधीरभाऊंसारखे विकासकामांना देत असतात...

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजराथी आहेत, गुजराथी जसा त्यांचा व्यापार तोलूनमापून करतात तशी एखाद्याची स्तुती देखील त्यांच्या मनाला पटले तरच करून मोकळे होतात. मन कि बात मध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या वृक्ष लागवडीचे तोंड भरून कौतुक केले ते उगाच नव्हे, आकडेवारी आणि वृक्षरोपणाचे पुरावे बघून म्हणे त्यांनी जातीने कार्यक्रम आयोजकांना सांगितले कि त्यांना मन बात मध्ये त्यांच्या लाडक्या सुधीरचे तोंडभरून कौतुक करायचे आहे. वाईट हे वाटते कि जे आजपर्यंतच्या वनमंत्र्यांना सुचले नाही ते महान कार्य सुधीरभाऊंनी केले त्यांनी भूक तहान विसरून या पाच वर्षात त्यांच्या वन खात्यातील अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करवून देऊन राज्यातल्या कानाकोपऱ्यात अफाट वृक्षलागवडीचे काम केले जे पुरावे बघून त्यांचे कार्य लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदविल्या गेले, असे वनमंत्री विधानसभेत जायला हवेत कि वाईट प्रवृत्तीने पाठिंबा दिलेले उमेदवार राज्य राष्ट्र पोखरण्यासाठी विधानसभेत जायला हवेत, हे तुम्हीच आता ठरवायला हवे... 

www.vikrantjoshi.com

आधी हाडाचे संघ स्वयंसेवक नंतर ऐन तारुण्यात भाजपा कार्यकर्ता म्हणून विविध आंदोलनात स्वतःला झोकून देणारे, त्यांचे काम कार्य त्यांची जिद्द तडफ बघून त्यांचा उत्साह त्यांच्यातले नेतृत्व गुणविशेष बघून विविध पदांवर त्यांची नेमणूक होणे म्हणजे अगदी तरुण वयापासून सुधीरभाऊ केवळ चंद्रपूरपुरते मर्यादित न राहता अख्ख्या राज्याला नवा उमदा धडाकेबाज नेता म्हणून माहित होणे, त्यांचे लहान वयात भाजपा सारख्या बलाढ्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होणे, कमी वयात आधी राज्यमंत्री नंतर थेट राज्याचे अर्थमंत्री होणे, मला वाटते सामाजिक जाणिवेतून , सततच्या समाजपयोगी कार्यातून व्यासपीठावरील आपल्या विचारातून, लाभलेल्या अलौकिक बुध्दीमत्तेतून त्यांना हे यश मिळत गेले, त्यांच्यावर जरी गडकरी यांचे कार्यकर्ते असा शिक्का 
बसलेला असला तरी जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे उभरते नेतृत्व म्हणून जसे ग्रीप घेते झाले, सुधीरभाऊंनी इगो किंवा सिनियर आहे, अशा भ्रामक कल्पना बाजूला ठेवून फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फडणवीसांना प्रत्येकवेळी मानसन्मान देत त्यांना 
आपले नेते मानले, पाच वर्षे त्यापध्दतीनेच मुनगंटीवार वागले...

जसा राज्याच्या मुख्यमंत्र्याला प्रत्येक खात्याचा सखोल अभ्यास करावा लागतो, माहिती पाठ असावी लागते त्याखालोखाल अर्थमंत्र्यांना देखील प्रत्येक खात्याची अतिशय बारीकसारीक माहिती ठेवावी असावी लागते. अत्यंत महत्वाचे काम म्हणजे शासकीय पैशांचे वाटप जे फक्त आणि फक्त त्यांच्या हाती असते आणि देवेंद्र फडणवीसांनी तर मुनगंटीवार यांना पूर्णतः स्वतंत्र दिले होते, विश्वास ठेवून त्यांच्यावर अर्थ खात्याची जबाबदारी सोपविली होती, तुम्हाला एकदा तरी असे या पाच वर्षात आठवते का कि अर्थमंत्री म्हणून भाऊंच्या नावाने बोंबाबोंब आहे, असे कधीही घडले नाही, फडणवीसांनंतर राज्यातील प्रत्येक विभागाची सखोल माहिती घेणारे, प्रत्येक खात्याचा अभ्यास असणारे, अभ्यास करणारे, विविध खात्यांवर पकड ठेवणारे ते अर्थमंत्री आहेत त्यातून त्यांनी नेमक्या अडचणी आणि समस्या आधी जाणून घेतल्या शिस्तीत पैसे वाटप केले, कौतुकास पात्र ठरले...
क्रमश: हेमंत जोशी

Tuesday, 24 September 2019

अर्थहीन कि अर्थपूर्ण अर्थमंत्री : पत्रकार हेमंत जोशी


अर्थहीन कि अर्थपूर्ण अर्थमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
ज्या सुधीर मुनगंटीवार यांनी या राज्याचे सलग पाच वर्षे अर्थमंत्रीपद भूषविले त्यांची कारकीर्द अर्थपूर्ण कि अर्थहीन त्यावर नेमके सांगणे गरजेचे आहे. जे सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारकीर्द गाजवून सोडली नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेत त्यांचेही नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणे स्वाभाविक होते ते घडलेही पण पुढे नाव मागे पडले किंवा फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणून यांनी आदळआपट सुरु केली, रुसवेफुगवे काढले, मित्रांकडे हंबर्डे फोडले किंवा धाय मोकलून एखाद्याच्या खांद्यावर डोके ठेवून रडले, त्रागा केला, असे फारसे काही किंवा पाच वर्षात कधीही घडले नाही, सुसंस्कृत सावध सुधीर मुनगंटीवारांच्या हातून तसे घडणे अपेक्षितही नव्हते...

महत्वाचे असे कि आपली ओळख नितीन गडकरी यांच्या गटातले अशी त्यामुळे वयाने अनुभवाने ज्युनियर असलेल्या पण अचानक एकदम जम्प घेतलेल्या फडणवीसांना बसता उठता त्रास द्यायचा असे त्यांच्या हातून घडले नाही, देवेंद्र फडणवीसांचीही सुदैवाने तशी वृत्ती तो स्वभाव नाही कि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतले एक म्हणून सुधीरभाऊंकडे दुर्लक्ष करायचे किंवा त्यांना त्यांच्या खात्यात काम करतांना मर्यादा आणायच्या, काम करू द्यायचे नाही, त्रास द्यायचा, नाही असे त्यांच्याकडूनही घडले नाही त्यामुळे वन खात्याचे मंत्री यानात्याने वृक्षारोपण वृक्ष लागवड त्यात सातत्य नेमकी चर्चा व मिळणारी, मिळालेली अफाट प्रसिद्धी मुनगंटीवार यांचे नाव राज्यात तर गाजले पण राष्ट्रांतही त्यांच्या या कार्याचे मोठे कौतुक झाले, मोठी दाखल विशेषतः वनक्षेत्रात काम करणाऱ्यांनी घेतली. पंतप्रधानांनीही पाठ थोपटली. सुधीरभाऊंच्या या कार्यात तोलामोलाची साथ मुख्यमंत्र्यांनी दिली हे विशेष...

www.vikrantjoshi.com

एक पाऊल मागे आणि मुख्यमंत्री पदाचा मान राखणे हे दोन्ही मुनगंटीवारांनी अगदी पाच वर्षे डोळ्यात तेल घालून पाळले, टाळी एका हाताने वाजत नाही, सुधीरभाऊंनी फडणवीसांना मिळालेले पद सकारात्मक पद्धतीने घेतले, अमुक एखाद्याला पुढे नेण्यात तर देवेंद्र माहीर आहेतच त्यांनी असा एकही प्रसंग नव्हता जेथे या नेत्याला म्हणजे सिनियर सुधीरभाऊंना सहभागी करवून घेतले नाही जसे फडणवीसांच्या तोंडात डोक्यात किंवा बोलण्याच्या कौतुक करण्याच्या ओघात चंद्रकांत पाटील चंद्रशेखर बावनकुळे गिरीश महाजन आशिष शेलार रणजित पाटील सुभाष देसाई दिवाकर रावते अशी इत्यादी काही नावे सतत असायची त्यात सुधीर मुनगंटीवार हेही प्रामुख्याने नाव आडनाव असायचे. अमुक एखाद्या स्पर्धेतल्या प्रभावी स्वयंस्फूर्त नेत्याला दाबून ठेवायचे, तोंड दाबून वरून बुक्क्यांचा मार द्यायचा असले घाणेरडे राजकारणानं खेळणारे फडणवीस नसल्याने सुधीरभाऊ मुनगंटीवारांना मुक्तपणे उदारहस्ते एक महत्वपूर्ण खात्याचा मंत्री म्हणून काम करणे सहज शक्य झाले...

तुम्हाला राजकारणात टिकायचे असेल सातत्य राखायचे असेल तर प्रसंग ओळखून निर्णय घेणे किंवा दोन पावले मागे येणे, ताठर भूमिका न घेणे, वाट्टेल तशी बडबड गडबड न करणे हे पाळावे लागते, जे मुनगंटीवारांना सहज जमले. फडणवीस पुढे गेले मुख्यमंत्री झाले त्यावर त्यांनी नोकरांकडून झंडू बाम लावून डोके चोळून घेतले नाही याउलट आपले महत्व मंत्री या नात्याने राखताना त्यांनी फडणवीसांना पुढे जाऊ देण्यात धन्यता मानली, हे नेमके खडसे यांना जमले नाही त्यांनी उगाचच त्रागा करून 
घेतला, मोठे राजकीय नुकसान करवून घेतले. अमुक एखादा आपल्या मागे होता आणि अचानक पुढे गेला म्हणून त्याविषयी मनात असूया आणि डोक्यात राग ठेवून वागायचे बोलायचे राजकारणात कधीही फायदेशीर नसते, दूरदर्शी सुधीरभाऊंनी मी पण स्पर्धेत होतो असे काहीबाही मनात ठेवून ते वागले बोलले नाहीत त्यामुळे त्यांचे पुढल्या येणाऱ्या मंत्रिमंडळातले स्थान आजच नक्की निश्चित झालेले आहे, सुधीर मुनगंटीवार विधानसभा निवडणुकीत निवडूनही येतील आणि नामदारही होतील...
क्रमश: हेमंत जोशी

आघाडी नव्हे बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी


आघाडी नव्हे बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी 
मला असे स्वप्नातही वाटले नव्हते कि दीक्षितांची माधुरी डॉ. नेने यांच्याशी लग्न करून मोकळी होईल, आईशपथ वाटले होते ती फक्त आणि फक्त हेमंत जोशी यांच्याच गळ्यात वरमाला घालून मी श्रीराम जोशांची सून जगाला सांगत सुटेल. चालायचेच, काही माणसांना सवय असते चुकीचे निर्णय घेण्याची. मला हेही कधी स्वप्नात देखील वाटले नव्हते कि जे तीन शब्द हेटाळणीचे टिंगल करण्याचे खिजविण्याचे, टवाळकी करण्याचे आहेत त्या, ब्राम्हण संघ आणि विदर्भ या तीन शब्दांभोवताली देखील वलय निर्माण होईल, कारण संघ आणि जनसंघ केवळ बामणांचे असे सतत कायम वर्षानुवर्षे चिडविले डिवचले जाई, जनसंघाचे उमेदवार अमुक एखाद्या आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुकीत दुपारी अनामत रक्कम जप्त झाली शब्द त्यांच्या कानावर पडले की संध्याकाळी तेच उमेदवार जणूकाही घडलेच नाही या अविर्भावात दक्ष आरम करायला संघस्थानावर उपस्थित राहायचे...

आमच्या जळगाव जामोद या गावात माझ्या वडिलांचे अजाबराव देशमुख नावाचे लंगोटीयार मित्र होते, जवळपास आयुष्याच्या अखेरपर्यंत ते अक्षरश: अंगावर कर्ज घेऊन येणारी प्रत्येक विधानसभा लढवायचे पराभूत व्हायचे नि पुढल्याक्षणी कोणतेही दुःख संकट चेहऱ्यावर न भासविता संघाच्या पक्षाच्या पुढल्या कामांसाठी तयार व्हायचे नवराष्ट्रनिर्माण याचा ध्यास घेतलेले विशेषतः आम्ही विदर्भातले ब्राम्हण किंवा सारेच संघावाले अवाढव्य काँग्रेस समोर न घाबरता तुटपुंज्या ताकदीनिशी लढत राहिलो आणि तो दिवस लाखोंच्या जनसमुदायासमोर उगवला, जेव्हा विदर्भातल्या एका संघाला वाहून घेतलेल्या घराण्यातला तरुण देवेंद्र फडणवीस लोकांच्या साक्षीने दिमाखात म्हणाला, मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईशवराच्या साक्षीने शपथ घेतो कि....

संघाला जनसंघाला किंवा ब्राम्हणांना गांधी वधानंतर जवळपास ६५-७० वर्षानंतर चांगले दिवस आलेत जेव्हा पहिल्यांदा त्यांना देशात राज्यात सत्तेत स्थान मिळाले अन्यथा दरवेळी प्रत्येकवेळी पवारांसारख्या बेरकी नेत्यांनी जातीयवादीची गांधीवधाची बाबासाहेब पुरंदरेंसारख्या ऋषितुल्य विषयांवर मुद्दाम ठिणगी टाकून आग लावून द्यायची नि महाराष्ट्र लचके तोडण्या ताब्यात घायचे हेच वर्षानुवर्षे चालले होते पण समोर हिम्मत न हारता विविध रूपात संघ भाजपावाले आंदोलने करून त्यांना उघडे पाडते झाले नि तो दिवस एकदाचा उगवला जेव्हा देश राज्य पोखरणाऱ्यांचे असली रूप उघडे पडले नि देशाने राज्याने रामराज्याचा दिशेने वाटचाल सुरु केली. मित्रहो, समोर खतरनाक जातीयवादी मीडिया, महाखतर्नाक नेते व अधिकारी पण त्यातील एकही हरामखोराला भीक न घालता मी एकटा लेखणीतून त्यांच्यावर जेव्हा तुटून पडत होतो तेव्हा माझ्या घरी प्रत्येकवेळी काळजाचा ठोका कायम चुकायचा पण मी मात्र सारे हसत हसत हे सहन करून आजपर्यंत पुढे पुढे आलो, सरपे कफन बंधनेवाले कभी मौतसे डरते नाही...

कालचा जनसंघ म्हणजे आजचा भाजपा केवळ पराभूत होण्यासाठी आणि विदर्भ मराठवाडा सहनशील सात्विक नेत्यांना वापरून घेण्यासाठीचा प्रदेश याचपद्धतीने सवतीच्या भूमिकेत आपल्यातले वावरले पण एक दिवस उकिरड्याचाही येतो हे सिद्ध झाले नि मूठभर बदमाश नेते गु सांडलेल्या गटारात पडले. बरे झाले. शिवसेना आणि भाजपवाल्यांनी माझ्या घरी फुकटात दुधाचा रतीब लावला आहे म्हणून मी त्यांची विधानसभा निवडणुकीनिमित्ते तारीफ स्तुती करत सुटलेलो आहे असे समजायचे अजिबात कारण नाही, त्यांच्यातले जे चुकतील चुकलेले, हि विधानसभा निवडणूक आटोपली, मी त्यांचीही लक्तरे वेशीवर टांगून मोकळा होईल पण हि ती त्यांची लफडी कुलंगडी काढण्याची वेळ नाही, येथे पुन्हा एकवार साऱ्या सुजाण जागरूक मतदारांनी न विसरता मतदानाला बाहेर पडायचे आहे नि पुन्हा एकवार युतीला म्हणजे सेनेला भाजपाला निवडून विधानसभेत दिमाखात पाठवायचे आहे...
क्रमश: हेमंत जोशी

राजेंद्र धर्मेंद्र जितेंद्र तसे देवेंद्र : पत्रकार हेमंत जोशी

राजेंद्र धर्मेंद्र जितेंद्र तसे देवेंद्र : पत्रकार हेमंत जोशी 

एकदा मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी काही माहिती घेण्यासाठी गेलो असतांना तेथे मला आमच्या विदर्भातले एक बुजुर्ग लोकप्रिय नेते भेटले तेही त्यांच्या तरुण मुलास्नी घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. त्यांच्याशी गप्पा मारत असतांना आतून त्यांना फडणवीसांचे बोलावणे आले ते आत गेले, काही वेळाने जसे बाहेर आले तसे ते मला एका कोपऱ्यात घेऊन गेले आणि बाप बेटे माझ्याशी बोलतांना अक्षरश: डोळ्यात अश्रू आणते झाले कारण काय तर हे जेव्हा वडीलकीच्या नात्याने देवेंद्र फडणवीसांना म्हणाले कि मी लवकरच ऍक्टिव्ह राजकारणातून निवृत्ती घेतोय तेव्हा फडणवीस जागेवर उठले आणि यांच्या आपल्या खांदयावर वडिलांचे मित्र या नात्याने प्रेमाचा हात ठेवत म्हणाले, आपण काळजी करू नका, एकदम निश्चिन्त रहा, अखेरच्या श्वासापर्यंत मी तुमच्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल...

अमुक एखाद्या नेत्याला उभे राज्य कुठलाही राजकीय हेतू मनात न ठेवता उगाचच असे डोक्यावर घेऊन नाचत नाही त्यासाठी आश्वासक शब्दांचा नेता व्हावे लागते, भूक तहान कुटुंब प्रकृतीस्वास्थ्य सारे काही विसरून जनतामय व्हावे लागते, फडणवीसांना 
मी एवढ्याच साठी मानतो कि ते दिलेला शब्द पूर्ण करण्याचा मनापासून प्रयत्न करतात. एक अत्यंत महत्वाचा मुद्दा असा कि पवार म्हणताहेत कि ईडीला घाबरले म्हणून त्यांचे व काँग्रेसचे सारे मोक्याचे महत्वाचे नेते पक्ष सोडून गेले. मला असे वाटते कि ते पवारांना किंवा काँग्रेस मधल्या राज्यातील व देशातील भरकटलेल्या दिशाहीन नेतृत्वाला कंटाळून त्यांनी पक्षांतर केले त्याहीपुढे जाऊन मी तर असे म्हणेन, त्या साऱ्यांनी फडणवीसांच्या कामाची नेतृत्वाची वृत्तीची वागण्याची पद्धत जवळून बघिली आहे त्यात त्यांना नक्की वाटले असावे कि येथे आपले नेतृत्व अबाधित राहील आणि फडणवीस किंवा उद्धव ठाकरे हे दोघेही त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला बेदखल न करता आपल्यातल्या नेतृत्वाची कदर करतील म्हणून ते थेट पवारांना किंवा काँग्रेसच्या निपचित पडलेल्या नेतृत्वाला कंटाळून सेना किंवा भाजपामध्ये आलेले आहेत...

देवेंद्र फडणवीसांशी या ना त्या माध्यमातून मी वाद यासाठी घालतो कि त्यांनीही काही चुकीचे अधिकारी मोक्याच्या जागी आणून बसविलेले आहेत. त्यावर त्यांचे असे सांगणे कि मलाही माहित आहेत कि हे अधिकारी कोणत्या थराला पोहोचलेले आहेत पण त्यांनाही कुठेतरी पोस्टिंग देणे आवश्यक ठरते मात्र मी त्यांना तंबी देतो कि हि तुम्हाला शेवटची संधी, आजपर्यंत तुम्ही तुमची बुद्धी स्वतःच्या भल्यासाठी वापरली आता यापुढे जनतेच्या चांगल्या कामांसाठी सेवेसाठी वापरली नाही तर तुम्हाला माहित आहे कि जेव्हा माझी सटकते तेव्हा वाईट लोकांचे काही खरे नसते, त्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मते या सरलेल्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक चांगली कामें करवून दाखवलेली आहे. मान गाये उस्ताद फडणवीसजी, चोरांच्या हाती थेट किल्ल्या देऊन तुम्ही जे त्यांना थेट वाल्मिकी व्हायला शिकविले आहे, मुख्यमंत्री तुस्सी ग्रेट हो...

आमच्या लहानपणी माझ्या एका जिवलग मित्राच्या आईला मी अतिशय जवळून बघत असे न्याहाळत असे, तिचे यासाठी कौतुक वाटे कि ती एकाचवेळी मोठे खटले असलेल्या त्या एकत्र कुटुंबात दिवसभरात जे जे काय करून दाखवायची त्याचेच मला भारी कौतुक वाटायचे, असायचे म्हणजे एकतर ती तिला दरवर्षी एक याप्रमाणे झालेल्या १०-११ मुलांकडे जातीने लक्ष घालायची. मित्राचे वडील शेतकरी, त्यामुळे ते जवळपास सतत घरीच असायचे त्यामुळे तिला रात्री आणि दिवसातून दोन वेळा 
तरी त्यांना कंपनी देणे भाग पडायचे अर्थात त्यामुळेच त्यांना दरवर्षी एक याप्रमाणे झटपट सतत मुले झाली. एक रांगायला लागला कि लगेच त्यांचे पॉट पुढे आलेले असे शिवाय ती स्वयंपाकघरात किंवा शेतीच्या कामात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची 
सरबराई करण्यात कायम पुढे असायची, हे सारे ती उत्साहात करायची कारण घर चांगले ठेवणे तिचे पॅशन होते, फडणवीसांचे देखील मित्राच्या त्या आईसारखेच, त्यांचे घर म्हणजे हे राज्य महाराष्ट्र, त्यांना ते चारही बाजूंनी चांगले ठेवायचे असते,त्यांचे त्यातून माझ्या या मित्राच्या आईसारखे होते म्हणून त्यांच्या तब्बेतीची कायम काळजी वाटते, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा कायम ठणठणीत असावा राहावा हीच देवाकडे प्रार्थना आणि मागणे...

केवळ या पाच वर्षात ज्यावेगाने आपल्या या राज्यात महिला बचत गट पुढे आले, कमावते झाले, पुढे गेले ते बघून कौतुक याचे कि ग्रामीण किंवा शहरी महिलांना दोन वेळेच्या जेवणाची किंवा जगण्याची भ्रांत असे त्या हजारो महिलांना शासनाने केवळ प्रोत्साहन देऊन नव्हे तर पाठीशी उभे राहून त्यांची जी आर्थिक घडी मोठ्या प्रमाणावर नीट बसवून दिली हे सारे बघून कौतुकाने आपोआप फडणवीसांकडे बघणे पाहणे क्रमप्राप्त होते. अत्यंत महत्वाचे म्हणजे बहुतेक ग्रामस्थ सावकारी पाशात जे अडकलेले होते त्यांना या मुख्यमंत्र्यांनी आधी बाहेर काढले तदनंतर त्यांना आर्थिक सहकार्य करून ज्यापद्धतीने कर्जमुक्त केले, आज त्या ग्रामस्थांच्या घरातले वातावरण थेट वर्षभर दिवाळी साजरी करण्यासारखे जे निर्माण झालेले आहे,त्याचे मोठे श्रेय जाते ते फक्त आणि फक्त फडणवीस सरकारला, एक डोळस पत्रकार म्हणून मी याकडे बघतो म्हणूनच कौतुक करतो. महत्वाचे म्हणजे प्रत्येक गावात विशेषतः विदर्भ मराठवाड्यातले स्थानिक गुंड वृत्तीचे जे सावकार होते त्यांचे ज्या पद्धतीने फडणवीस सरकारने कंबरडे मोडले ते बघून त्यांना लाख लाख सलाम...
क्रमश: हेमंत जोशी.

Sunday, 22 September 2019

राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र भाग २ : पत्रकार हेमंत जोशी
राज्यात देवेंद्र देशात नरेंद्र भाग २ : पत्रकार हेमंत जोशी 
जोशी आडनावाला परंपरेला शोभणारे भविष्य येथे वर्तवितो कि एक दिवस देवेंद्र मुंबईतून दिल्लीत जातील, पुढली विधानसभा निवडणूक लागण्याआधी शक्यतो ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीयध्यक्ष असतील समजा हे पटकन झटकन घडले नाही तर ते देशाचे अर्थमंत्री असतील, आणि तो दिवस फार दूर नाही, येणारी नवी विधानसभा संपण्याआधीच हे घडलेले असेल अर्थात पुढल्या महिन्यातले या राज्याचे ते नवे मुख्यमंत्री असतील हे तुम्हाला सांगणे म्हणजे लताबाईंना गाता येते हे आशाबाईंच्या कानात सांगण्यासारखे किंवा शार्दूल बायस याने अनेकांना फसविले आहे हे उद्योगपती के के अग्रवाल यांना कानात जाऊन सांगण्यासारखे....

देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय वाटचालीची २७-२८ वर्षे पूर्ण झालीत हे त्यांच्याकडे बघून अजिबात खरे वाटत नाही, जो माणूस पवारांना किंवा राज्यातल्या किंवा त्यांच्याच पक्षातल्या ताकदवान नेत्यांना लीलया चारी मुंड्या चित करून अंगाला साधा ओरखडा किंवा धूळ देखील लागू न देता पुन्हा पुढल्या मोहिमेला हात घालतो, नवख्याला वाटावे फडणवीस हे या राज्यातले सर्वाधिक वयस्क आणि सर्वाधिक अनुभवी नेते असावेत. अर्थात देशसेवा हेच जीवन मानणार्या नेत्याला अनुभवाची जेमतेम वर्षे देखील पुरेशी ठरतात, २७-२८ वर्षे मग त्यामानाने फार मोठे पर्व आहे असे वाटायला लागले आहे. अनेक आमदार मंत्री नेते आम्ही या मुंबईत वावरतांना बघतो, मंत्रालयात किंवा विधानभवनात इकडून तिकडे फिरतांना बघतो पण जवळून गेले तरी ते ओळखीचे नसतात, राजकीय पत्रकारितेत असूनही, असे अनेक मंत्री आसपास उभे असले तरी त्यांना ओळखणे कठीण असते कारण ते लोकांशी मला वाटते सतत लपाछपीचा खेळ खेळत असतात म्हणजे जनता त्यांना भेटायला आली कि हे त्यांच्यापासून दूर पळतात किंवा लपून तरी बसतात...

फडणवीसांच्या बाबतीत असे कधीही घडलेले बघितले नाही कि अमुक एखादा फक्त काही देणारा म्हणजे देवाणघेवाण करणारा माणूस आला कि त्याला पटकन समोर येऊन मिठीत घेतात आणि सामान्य माणूस आला कि साहेब वामकुक्षी घेताहेत त्यांची माणसे बाहेरच्या बाहेर सांगून मोकळे होतात. मुख्यमंत्री या नात्याने त्यांना सर्वसामान्य लोकांना भेटताना अनेकदा काही मर्यादा पाळाव्या लागतात पण मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसापासून दूर पळताहेत आणि सामान्य माणूस त्यांना शोधून काढण्यासाठी त्यांच्या मागे धावतो आहे असे ना कधी घडले ना कधी घडेल. सतत कायम लोकांमध्ये मिसळणारा हा असामान्य मुख्यमंत्री. आमदार झाले नामदार झाले पण त्यातून नेमके काय मिळविले हा प्रश्न बहुतेक आजी माजी आमदार नामदारांसमोर असतो.कारण त्यांना जे काय जास्तीत जास्त करायचे असते ते प्रामुख्याने त्यांच्या कुटुंबासाठी त्यांना करायचे असते, मिळवून ठेवायचे असते, येथे मात्र तसे अजिबात नाही, अख्खे राज्य हेच आपले कुटुंब मानणार्या मुख्यमंत्र्यांना तुम्ही हो आमच्यासाठी काय केले, विचारायचा अवकाश, तुम्ही थकून ऐकून झोपून जाल पण फडणवीसांनी केलेल्या लोकोपयोगी कामांची यादी संपता संपणार नाही...

अतिशय सूक्ष्म निरीक्षणातून हे सांगतो कि राजेंद्रकुमार अभिनयात दिलीपकुमारची नक्कल करायचा. मनोजकुमार किंवा त्यावेळेच्या अन्य अनेक अभिनेत्यांचे नेमके तेच होते ते बहुदा दिलीपकुमारची नक्कल करायचे येथे यादेशात मला वाटते आपले 
मुख्यमंत्री फडणवीस अनेकदा किंवा विविध वागण्यातून किंवा धडाकेबाज पण अभ्यासू निर्णय घेतांना ते हुबेहूब नरेंद्र मोदी यांची थेट नक्कल करतात असे वाटते, ते मलाही कदाचित तुम्हालाही जाणवत राहते, अर्थात देवेंद्र यांना त्यांच्या अगदी तरुण वयापासून म्हणजे ते २२ वय असतांना जेव्हा पहिल्यांदा नगरसेवक झाले तेव्हापासून मी बघत आलोय त्यामुळे हेही शंभर टक्के माझे सांगणे खरे नाही कि ते प्रत्येक बाबतीत मोदीजींची नक्कल करतात कारण अगदी तरुण वयापासून त्यांनी त्यांच्या वागण्याची बोलण्याची निर्णय घेण्याची एक स्टाईल डेव्हलप केलेलीच आहे पण त्यात मोदींची काही बाबतीत नक्कल करणे, त्यातून अभिनयातल्या अमिताभसारखे त्यांचे राजकीय वर्तुळातले सर्वगुणसंपन्न नेतृत्व आत्तापासूनच घडले आहे, तयार झाले आहे असे मला सतत त्यांच्याकडे एकटक बघतांना वाटत राहते...

आता एका नाजूक विशेषतः भाजपा कार्यकर्त्यांना किंवा संघ स्वयंसेवकांनाही अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्याकडे मी वळतोय. या मुद्दयांवर यासाठी येथे काही सांगायचे आहे कारण ते मुख्यमंत्र्यांशी संबंधित आहे, फडणवीसांच्या बाबतीत त्या मुद्दयांवर त्यांच्याच पक्षातले किंवा संघातले नाराज असावेत किंवा आहेत म्हणून हे नेमके कसे घडले का घडले सांगतो. हे बघा जेव्हा फडणवीस कोणतीही महत्वाची राजकीय भूमिका घेतात तेव्हा ते शंभर टक्के मोदी, शाह यांच्याशी आणि चंद्रकांत पाटलांसारख्या संघटनेतल्या मात्र या राज्यातल्या काही परिपकव नेत्यांशी आधी सखोल चर्चाच करतात नंतर ते निर्णय घेतात. मनात आले आणि निर्णय घेतले असे कधीही त्यांच्याबाबतीत घडत नाही, नेमकी मला माहिती आहे, म्हणून येथे हे सांगतो आहे....

अलीकडे विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी केवळ काही काळ आधी फडणवीसांनी राज्यातले विदर्भ सोडून अनेक विरोधी पक्षातले नेते त्यांच्याकडे आणले, घेतले त्यावर देखील त्यांनी सारे काही नियोजनबद्ध केलेले आहे हे म्हणजे असे नव्हते कि रेल्वेत प्रवास करतांना समोरची मुलगी आवडली आणि काहीही माहिती न घेता तिला आय लव्ह यु म्हणून टाकले, अजिबात असे घाईगर्दीने हे घडलेले नाही विशेष म्हणजे आपला मूळ कार्यकर्ता नेता आणि स्वयंसेवक नाराज होणार नाही त्याच्यावर अजिबात अन्याय होणार नाही त्याची पुरेपूर कोल्हापूर काळजी फडणवीसांनी घेतलेली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा अन्य पक्षांना त्यातील मुजोर जातीयवादी थर्डग्रेड नेत्यांना यशस्वी सामोरे जाण्यासाठी, निवडणुका जिंकण्यासाठी पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी त्यांना याबाबतीत मोदी यांची नक्कल करणे अत्यावश्यक होते ते त्यांनी केले...

यापूर्वी देखील मी लिहून ठेवलेले आहे कि या राज्यात जेथे जेथे भाजपा काहीशी थोडीशी कमकुवत आहे त्यांना वाटत होते तेथेच त्यांनी बाहेरच्या नेत्यांना आत घेतले. आलेले अनेक नेते जेथे शरद पवारांचे किंवा काँग्रेसचे झाले नाहीत ते आपले कधीही कायमस्वरूपी नाहीत हे आपल्याला कळते आणि फडणवीसांना काळात नाही असे नक्की घडलेले नाही, त्यांना पुढला प्रत्येक धोका तंतोतंत माहित असतांना देखील त्यांनी दूरदृष्टी ठेवूनच केलेले आहे, हे ध्यानात घ्यावे. बाहेरून आलेल्या किमान २५ टक्के नेत्यांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना संघ भाजपाचे महत्व कळले समजले तरी भाजपाचे ते मोठे यश आहे हे ध्यानात घ्या. विशेषतः विदर्भ सोडून काही भागात भाजपा मजबूत करणे अत्यंत महत्वाचे होते म्हणून फडणवीसांनी नेमके सल्ले घेऊन हे आक्रमक पाऊल उचलले आहे...
क्रमश: हेमंत जोशी.