Friday, 9 August 2019

पाकिस्थानी वृत्ती आणि आम्ही हिंदू : पत्रकार हेमंत जोशी


पाकिस्थानी वृत्ती आणि आम्ही हिंदू : पत्रकार हेमंत जोशी 
घोळका मग तो पुरुषांचा असो कि स्त्रियांचा, तरुणांचा असो कि तरुणींचा आम्ही भारतीय, हिंदुस्थानी कायम वर्षानुवर्शे सेक्स सिनेमा व राजकारण केवळ तीनच विषयांवर भेटलो कि बोलतो, चर्चा करतो, स्वतःची जमेल तशी अक्कल पाजळतो. कामजीवनावर भारतीय पुरुष बढाया मारता मारता बोलतात पण हेच पुरुष पेटलेल्या स्त्रीसमोर क्षणार्धात धारातीर्थ पडून पाठ करून घोरायलाही लागतात, त्यांच्या सेक्स वर बढायायुक्त गप्पा थापा तेवढ्या ऐकण्यासारख्या नक्की असतात. असो, या तीन विषयांव्यतिरिक्त बोलण्याचे इतरही विषय ठरू असू शकतात जणू हे भारतीयांना ठाऊकच नाही जे देशाच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. सांगितले ना सेक्स वर तर आम्ही भारतीय पुरुष असे बोलतो कि डॉ. राजन भोसले यांनी देखील तोंडात बोटे घालावीत किंवा सनी लिओनी दाम्पत्याने देखील आमचे कामजीवनावर बोलणे कान देऊन ऐकावे...

महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणावर आपले अर्धवट ऐकीव माहितीवर आधारित ज्ञान प्रसंगी शरद पवार यांना देखील चकित करून सोडते, मोठ्या नेत्यांनी नतमस्तक व्हावे, नेत्यांना तोंडाचा मोठ्ठा आ वासायला भाग पडणारे आम्हा मराठींचे राजकारणातले अति अर्धवट ज्ञान असते. आणि सिनेमा विषयावर तर वाट्टेल ते, ज्याला जसे समजेल, जसे जमेल तसे बोलत सुटतो. ज्यांना सेक्स सिनेमा व राजकारणातले नेमके, तंतोतंत कळत असते ते या अशा अर्धवटरावांचे बोलणे ऐकून वैतागत असतात. मला हे असे सकाळी फिरायला जातो तेव्हा हमखास भेटतात, त्यांना बघूनच, मी त्यांच्यापासून दूर पळून जातो किंवा त्यांना टाळून पुढे जातो. राज्याच्या राजकारणावर नेमकी माहिती हवी असेल तर त्यावर लिहिणारे अभिजित मुळ्ये योगेश नाईक यदु जोशी अभय देशपांडे भाऊ तोरसेकर योगेश त्रिवेदी विवेक भावसार मधुकर भावे साथी उदय तानपाठक उदय निरगुडकर किरण शेलार इत्यादींना जमले तर नक्की भेटावे, नेमके राजकारण त्यातून कळते...

आमची मानसिकता विशेषतः देशभक्तीच्या बाबतीत अति कमकुवत आहे म्हणजे अख्खे जग आम्हाला ' हिंदुस्थानी' म्हणते, आपण गांडू विचार डोक्यात घेऊन आपल्या तोंडात मात्र ' भारतीय ' असे येत राहते. मोगल व इंग्रज आमच्या बोकांडीवर वर्षानुवर्षे बसल्याने,मला वाटते आपली वृत्ती गुलामगिरीची अधिक झाली आहे, बघा, अनेकदा आपल्या तोंडून हेच निघते कि आपल्यापेक्षा इंग्रज चांगले होते. कधी बदलणार आपली मानसिकता कि आम्ही भारतीय आहोत पेक्षा आम्ही हिंदुस्थानी आहोत म्हणण्याची. शेजारचे आपले कट्टर दुश्मन ते पाकिस्थानी देखील आमचा उल्लेख कायम ' हिंदुस्थानी ' असाच करतात पण आम्हाला मात्र हिंदुस्थानी आहोत हिंदू आहोत असे सांगण्याची म्हणण्याची लाज वाटत असते किंवा भीती अधिक वाटत राहते....

मित्रहो, पत्रकार हा गाव न्हाव्यासारखा असतो म्हणजे लिखाण करतांना आमचे विचार कोणत्या पक्षाचे, हे बाजूला ठेवून वास्तविक आम्ही बॅलन्स लिखाण करायचे असते किंवा अमुक एखादी भूमिका घेऊन लिहायचे असेल तर तेही स्पष्ट सांगायचे असते जसे मी नेहमी लिहितो कि मी कट्टर हिंदुत्ववादी आहे पण मीडिया मध्ये हे फार कमी वेळा बघायला मिळते म्हणजे प्रताप आसबे यांना शरद पवार किंवा राष्ट्रवादीची तळी उचलायची असली तरी ते तसे भासवत नाहीत, लपवून ठेवतात, बहुतेक मीडियातल्या मंडळींचा चेहरा आणि मुखवटा वेगळा असतो. आसबे हे अगदी सहज उदाहरण दिले, आता खरे तर ते पत्रकारितेतून बाद झालेले आहेत. गावातल्या न्हाव्याला जसे सारे ग्राहक सारखेच तसे आम्हा पत्रकारांचे असायलाच हवे. वाचक मित्रहो, पहिल्यांदा, या पाच सात वर्षात या देशात या राज्यात पुन्हा एकदा इतर अनेक देशांसारखे देशभक्तीचे मिळालेल्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वारे वाहायला लागले आहे या भाजपा किंवा संघामुळे, फडणवीस मोदी शाह यासारख्या पोलादी नेत्यांमुळे आम्ही ' हिंदुस्थानी ' आहोत हे सांगतांना आता इतरांसारखी आमचीही छाती फुलून यायला लागलेली आहे त्यावर उत्तर हेच आहे कि त्या ' नायक ' या सिनेमातल्या नायकासारखे मुख्यमंत्री झालेल्या अनिल कपूरसारखे नेते सत्तेत आल्याने या देशात केवळ त्या सिनेमात नव्हे तर प्रत्यक्षात आमचे साऱ्यांचे स्वप्न उतरू लागल्याने म्हणजे गांडू मानसिकता दूर होऊन तुम्हा आम्हा सर्वांच्या विशेषतः हिंदुस्थानावर मनापासून प्रेम करणाऱ्या परत एकवार देशभक्तीचे वारे घुमायला लागले आहेत, प्लिज कंटिन्यू इट. 

मला आश्चर्य वाटते वाटले, स्वतःला समाजसेवक म्हणून पेश करणारे पुण्याचे विश्व्म्भर चौधरी जे काश्मीर प्रकरण घडल्यानंतर म्हणाले, बरळले कि मोदी शाह यांनी २०२४ ची लोकसभा जिंकून येण्यासाठी हे नाटक केले आहे, असे लिहिले. काय हे चौधरी असे गलिच्छ लिहिणे, मोदी शाह यांना हे नाटक करायचे असते तर ते त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी घडवून आणले असते, उचलली जीभ लावली टाळूला, पद्धतीने लिहू बोलू नये. एका निवृत्त शासकीय अधिकाऱ्याने विश्व्मभर चौधरी यांच्या विषयी म्हटले आहे कि, ' मुळात पुण्यातील हा कथित दीड शहाणा गृहस्थ, सुरुवातीला पर्यावरण तद्न्य म्हणून वावरत होता तोपर्यंत ठीक होते. मग एनजीओ कळपात पुरोगामी समाज सेवकाच्या वेशात वावरू लागला हेही परिवर्तन समजू शकतो. पण हळूहळू म्हणजे बेमालूमपणे राजकीय भाष्यकार म्हणून याला व्यासपीठ कोणी दिले त्या महाभागाचा शोध घ्यावा लागेल. थोडक्यात लोकांची भाबडी श्रद्धा पाहून बिलंदर माकड हनुमानाचा मुखवटा लावून वावरू लागले. ' वयाच्या १७ व्य वर्षांपासून मी देखील राजकीय वर्तुळात कायम वावरत आलोय पण कधीही बघितले नाही कि दुरदुरून चौधरी यांचा राजकारणासाठी काही संबंध होता पण वर सुरुवातीला सांगितले तेच खरे आहे, या देशातले अर्धवटराव राजकारणावर अधिक ज्ञान पाजळून मोकळे होतात...

मिस्टर विश्व्मभर चौधरी, हिंदुस्थानी हिंदुत्व हे नेमके शिकण्यासाठी तुम्हाला घराबाहेर देखील पडण्याची गरज नाही. पुण्यातले विश्वजीत देशपांडे तुमचे जवळचे नातेवाईक आहेत, त्यांची तुमची नेहमी भेट होते, त्यांच्याकडून जरी हिंदुत्व तुम्ही नेमके समजावून घेतले तरी वरून कीर्तन आतून तमाशा पद्धतीचे वर्तन तुमच्या हातून घडणार नाही आणि वरकरणी कीर्तन करतांना तुमची जीभ घसरणार नाही. अहो, आपण ब्राम्हण आहोत, आपल्या तोंडून चुकीचे काहीतरी बाहेर पडणे, इतर लगेच तोंडात शेण घालतात, असे काहीही बोलू नये. मला वाटते आपली वृत्ती अमेरिका इंग्लंड सारखी आहे म्हणजे आपल्या हिंदुस्थानात देखील आपण हिंदू सर्वांना मोठ्या मनाने कायम सांभाळून घेत आलो आहोत फक्त जे इंग्लंड मध्ये घडले किंवा आज घडते आहे, तेथे पाकिस्थानातले देशद्रोही मुसलमान एवढे घुसले आहेत कि मूळ इंग्लंडवासियांचेच अस्तित्व धोक्यात आले आहे, हे आपलीकडे न घडण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय आणि सामाजिक फांद्यांनी फार मोठे काम करून ठेवले आहे अन्यथा या देशात देखील जे पाकविचारांचे मुसलमान आहेत त्यांनी मोठा धुडगूस घालायला सुरुवात केली होती. वास्तविक काश्मीर हा आमचा प्रांत पण मोदी यांच्या निर्णयावर पाकडे केवढे चिडलेले आहेत, त्यांचे थोबाड या देशातल्या मुसलमानांनी वास्तविक उत्तर देऊन बंद करायला हवे, दुर्दैवाने ते घडत नाही, देशातल्या अगदीच थोड्या मुसलमानांना पाक विरोधी भूमिका घ्यायला आवडते...

www.vikrantjoshi.com

मोदी शाह फडणवीस विचारांचे नेते सत्तेत आल्याने या देशातल्या हिंदूंना जी भीती आधी वाटत होती तसे आता यापुढे अजिबात घाबरण्याचे कारण नाही आणि ज्या मुस्लिमांची नाळ या देशाशी जुळलेली आहे त्यांनी अजिबात विचलित होण्याचे कारण नाही कारण हिंदू हाच मुळात सहिष्णू वृत्तीचा असल्याने तो आमच्यात मिसळणाऱ्या मुस्लिमांना कधीही अंतर देणे शक्य नाही. पण आता त्या पाकड्या विचारांचे मात्र यापुढे नक्की काहीही चालणार नाही,याआधी अशी वाईट परिस्थिती होती कि एखाद्या पाकड्या विचारांच्या मुसलमानाने आमची हिंदू मुलगी प्रेमप्रकरणातून थेट बाटवण्यासाठी त्याच्या मुस्लिम वस्तीत नेली कि ती मुलगी ओढून आणण्याची हिम्मत हिंदूंमध्ये तर फार दूर पोलिसांची देखील होत नसे. उभ्या आयुष्यात माझ्या डोळ्यादेखत हे असे दोनवेळा माझ्या मित्रांच्या बाबतीत घडले आहे. त्या मित्रांच्या मुली मुसलमान तरुणांबरोबर पळून गेल्यानंतर आईवडिलांना खूप वर्षांनीं भेटल्या, तोवर बाटलेल्या या मुलींचे आयुष्य मुलं पैदा करून उध्वस्त झालेले होते. निदान या राज्यात लव्ह जिहाद यापुढे घडणार नाही एवढी हिम्मत काँग्रेस विचार बाजू पडल्याने आता आमच्यात आलेली आहे. येथे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, तसा सतत विचार करून जगायला हवे...

मी तर एखाद्या प्रचारकासारखा सार्या हिंदूंना अगदी उघड सांगत असतो कि तरुण झालेली तुमची मुले विशेषतः मुली बाहेर पडल्यानंतर पाक विचारांच्या मुसलमान तरुणांच्या संपर्कात मैत्रीच्या माध्यमातून येत जात असतील तर त्यावर त्वरित कठोर पावले उचलणे गरजेचे असते,अन्यथा काही दिवसानंतर तुमच्या मुली घरातून पळून जाऊन पाक विचारांच्या मुस्लिमांशी लग्न करून मोकळ्या होतील आणि तुमची मुले थेट ड्रग्स च्या आहारी गेलेली असतील. जे मुस्लिम पाक विचारांचे नाहीत ते अतिशय चांगले असतात. असे सुविचारी मुसलमान माझे २५ वर्षे शेजारी होते, त्यांचा मला आणि माझा त्यांना कायम आधार वाटे. काश्मीरची जरब बसल्याने पुन्हा एकवार या देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांची संख्या नक्की वाढेल जे त्यांच्या आमच्या सार्या हिंदुस्थान्यांच्या दृष्टीने चांगले असेल. येथे या राज्यात आम्हाला यापुढे जागोजाग दिवंगत शाबीर शेख यांच्यासारखे मुस्लिम असणे घडणे आवश्यक वाटते. महत्वाचे म्हणजे येथले मुसलमान तरुण व तरुणी मुख्य प्रवाहात सामील होऊन कसे पुढे जातील त्यावर नेत्यांनी राज्यकर्त्यांनी लक्ष घालणे अत्यावश्यक आहे. देशभक्तीच्या बाबतीत ज्यादिवशी चीन जपानइस्रायल सारखे देश आमच्या देशभक्तीकडे बघून तोंडात बोटे घालतील तो दिवस खऱ्या अर्थाने आनंदाचा दिवस असेल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

No comments:

Post a comment