Sunday, 4 August 2019

महाजन द ग्रेट २ : पत्रकार हेमंत जोशीमहाजन द ग्रेट २ : पत्रकार हेमंत जोशी 
आपल्या देशात असे आहे कि एक विशीष्ट पातळी तुम्ही गाठली कि तुम्हाला विनायसे पैसे मिळत असतात त्यानंतर ते अधिकाधिक कसे मिळत राहतील याकडे लक्ष न पुरवता मिळालेले अधिकार किंवा हाती घेतलेले सामाजिक कार्य नेटाने कसे पुढे नेता येईल त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते पैसे मिळत असतात पण समाजसेवा हातून घडते त्याचे समाधान वेगळे असते, नक्की पुण्य जमा होते. आपल्या खात्यात झोकून देऊन काम करणारे मंत्री फार कमी याउलट कमी वेळेत अधिकाधिक पैसे कसे घरी नेता येतील याकडेच अलीकडे नेत्यांचा अधिकाऱ्यांचा मंत्र्यांचा अधिकाधिक कल असतो. शरद पवार राज्यमंत्री मंत्री मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री म्हणून सत्तेत जसे बसले तसतसे हे राज्य अधिकाधिक बिघडत गेले, अतिशय नीच वृत्तीची माणसे त्यांच्या सभोवताली विविध पदांवर जमली जी फक्त डाकू प्रवृत्तीची होती आर आर पाटलांसारखे त्यांच्यासभोताली फार थोडे होते, जे जमले ते गुंड डाकू प्रवृत्तीचे होते, ज्यांनी फक्त हे राज्य नागडे करणे महत्वाचे मानले...

जे झपाटलेले असे फार फार कमी त्यातलेच एक मंत्री गिरीश महाजन म्हणून त्यांना त्यांच्या गुण दोषांसहित लोकांनी डोक्यावर घेतले. अण्णा हजारे यांच्या सारखे खडूस स्वच्छ समाजसेवी भलत्यासलत्या नेत्यांना कधीही जाऊन बिलगत नाहीत ते जसे आर आर आबांना दिसताक्षणी घट्ट मिठी प्रेमाची आदराची मारून मोकळे व्हायचे ते तसे गिरीश महाजनांच्या बाबतीत म्हणाल तर प्रेमाचे म्हणाल तर स्नेहाचे नाते अण्णांसारख्या या राज्यातल्या साऱ्याच मान्यवरांनी मनःपूर्वक जपले जोपासले आणि हे सारे एक मंत्री म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कामांची पावती व त्याचे बक्षीस आहे. मंत्र्यांकडे झपाटलेली माणसे हवीत जसे कल्याण औताडे नावाचे अर्जुन खोतकरांकडे किंवा धनंजय मुंडे यांच्याकडे डॉ. प्रशांत भामरे नावाचे असे खाजगी सचिव आहेत ज्यांचे सामाजिक विषयांवर प्रश्नांवर जगाच्या पुढे डोके चालते ते तसे महाजनांचे एक सहाय्यक रामेश्वर यांचे त्या आरोग्यविषयक प्रश्नांवर झपाटल्यागत वागणे असते....

www.vikrantjoshi.com

या पाच वर्षात गिरीश महाजन यांनी आरोग्यविषयक हाती घेतलेले विधायक कार्य, मला वाटते रामेश्वर हे वेडे झपाटलेले व्यक्तिमत्व त्यांच्यासंगे होते म्हणून गिरीश महाजन यांचे काम खूप सोपे झाले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील रुग्णांच्या विविध समस्यां व आजार, स्थानिक पातळीवर अपेक्षित वैद्यकीय उपचार व औषधांचा सुविधांचा अभाव आणि आर्थिकदृष्ट्या उपचारासाठी तरतुदी या सामाजिक भानातून भावनेतून महाजनांनी महाआरोग्य शिबिराची संकल्पना आधी त्यांच्या जामनेर विधानसभा मतदारसंघात आणली, राबवली पुढे मंत्री होताच फडणवीसांच्या सहकार्याने हीच संकल्पना त्यांनी ज्या वेगाने राज्याच्या कानाकोपऱ्यात यशस्वी करून दाखवली ते बघून परमेश्वराने देखील नक्की कौतुकाने टाळ्या वाजविल्या असतील. अत्यंत महत्वाचे म्हणजे मुंबईत आमदारांना राहण्यासाठी ज्या शासकीय खोल्या आहेत त्यातल्या कित्येक आमदारांनी त्या खोल्या मुंबईत गंभीर आजारांवर उपचार करवून घेण्यासाठी थेट महाजन यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सुपूर्द केल्या, महाजनांनी याही संधीचे सोने केले, रोग्यांचे सारे खर्च त्यांनी सावरले, रुग्णांना बरे करून घरी गावी पाठवले, 
पाठवताहेत...

अत्यंत महत्वाचे म्हणजे सतत, न थकता, न थांबता त्यांनी राज्यातल्या कानाकोपऱ्यात जेथे जेथे महाआरोग्य शिबिरे घेतली, तेथले आमदार मला कायम सांगायचे, महाशिबीर होऊन गेले आणि आमचे मतदान तर वाढलेच पण मतदारांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आमच्याविषयीचा त्यांच्या मनात आदर वाढला. एखाद्या खेड्यात शहरातला जावई सुट्टीत गेला कि जो तो त्याला आपल्या घरी बोलावतो त्या लाडक्या जावयासारखे महाजनांचे झाले आहे, जो तो त्यांना आग्रहाने महाशिबीर घेण्यासाठी आपापल्या मतदारसंघात गावात बोलावतो आणि महाजन देखील पक्षपात न करता त्यांना मनापासून सहकार्य करून मोकळे होतात. एकाचवेळी हजारो रुग्णांना त्यांच्या खिशाला चाट न बसता शहरात आणून त्यांच्यावर उपचार करवून देणे त्याचवेळी शहरातले तद्न्य डॉक्टर्स महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत नेणे, महाजन तुस्सी ग्रेट हो. सामूहिक रुग्ण तपासणी, औषधोपचार आणि शस्त्रक्रिया हे सारे सामान्य रुग्णांसाठी तेही मोफत व दर्जेदार, राज्यातल्या आजपर्यंत तडफडणाऱ्या जनतेला रुग्णांना आणखी काय हवे ? क्रमश: हेमंत जोशी

No comments:

Post a comment