पवारांचे संस्कार : पत्रकार हेमंत जोशी
चांगले संस्कार झालेले फक्त भाजपा मधेच आहेत असे काहीही नसते पण उच्च संस्कार लाभलेले झालेले नेते भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत असे फारतर म्हणता येईल. दिवंगत सुसंस्कारी आर आर पाटील तर शरद पवारांचे उजवे हात होते तरीही किंवा शिवसेनेचे सुधीर जोशी त्यांच्या संस्कारांचा तर एखादा पाठ धडा शाळेत नाकी शिकविल्या जावा. विषय आठवला तो गाडगीळ दाम्पत्यावरून, मेधा गाडगीळ प्रशासकीय सेवेत उच्चपदस्थ आहेत, आता त्या निवृत्तीच्या अगदी उंबरठ्यावर आहेत त्यांचे पती आमदार आहेत बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांचे सुपुत्र आहेत या दोघांनी आडमार्गाने कमवायचे ठरविले असते तर त्यांची गणना आज अगदी शंभर टक्के पुण्यातल्या श्रीमंतामध्ये झाली असती. अलीकडे त्यांच्या मुलाच्या विवाहानिमित्ते झालेल्या साध्या स्वागत समारंभाला गेलो होतो बघून एवढेच लक्षात आले कि अनंत गाडगीळ काँग्रेसचे असूनही आणि मेधाताई प्रशासकीय सेवेत असूनही तेवढे उत्तम संस्कारांच्या बाबतीत करोडपती आहेत, पैसे त्यांनी जे मिळविले ते शंभर टक्के शुद्ध सोन्यासारखे उत्तमरीत्या कमावले जे राजकारणात आणि प्रशासकीय सेवेत सहसा घडत नाही. संस्कार व शरद पवार हा विषय पुढे असल्याने गाडगीळ दाम्पत्याचा उल्लेख केला...
जे शरद पवार अगदी अलीकडे नरेंद्र मोदींवर टीका करतांना जाहीर म्हणाले होते, सत्तेचा उपयोग एखाद्या धर्माच्या प्रसारासाठी करणारा असा पंतप्रधान भारताने याआधी कधी पहिला नाही. हे पंतप्रधान सर्व सहिष्णू तत्वांना तिलांजली देत असतांना भगवी वस्त्रे घालून, गुहेत जाऊन, तुम्ही देशाला कोणता संदेश देताय ? देवब्राम्हणांविषयी, भगव्याविषयी, संघ भाजपाविषयी मनातकायम द्वेष ठेऊन त्यापद्धतीने ज्यांनी कार्यकर्त्यांमध्ये संदेश पोहोचविले, मनात विष पेरले, बघा, नियतीचा खेळ, पुन्हा एकदा येनकेनप्रकारेण जनतेची, फक्त निवडणूक तोंडावर असल्याने सहानुभूती मिळविण्यासाठी हेच शरद पवार जाहीर भगवा झेंडा हाती घेऊन, रथावर चढवून मतांचा जोगवा मागत फिरताहेत. अत्यंत लाजिरवाणे म्हणजे ज्यांनी ताठ मानेने लोकांपुढे जाऊन मते मागवीत असे नेतेही त्यांच्याकडे नाहीत, नव्हते आणि नसतीलही त्यामुळे बाहेरच्या एकमेव अमोल कोल्हेंना पुढे केले जाते आहे....
www.vikrantjoshi.com
देशभक्ती वगैरे असे काहीही पवारांच्या आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणाचा फक्त स्वतःच्या भल्यासाठी दुरुपयोग करणाऱ्या त्यांच्या चेल्यांच्या मनात नसते, दरोडे कसे टाकावेत दगाफटका कसा करावा देश राज्य कसे लुटावे, लाटावे, ओरबाडावे तेवढेच त्यांच्या मनात असते, तेच त्यांच्या शिष्यांना देखील शिकविले गेलेले असल्याने पवारांनी निर्माण केले ते प्रफुल्ल पटेल यांच्याचसारखे देशविके नेते. त्यापलीकडे आणखी असे म्हणता येईल कि चांगले संस्कार झालेले नेते त्यांनी न घडविल्याने कालपरवा शिवसेनेतून आलेले कडव्या भगव्या विचारांच्या कोल्हे यांना वापरल्या जाते आहे. वास्तविक वापरून एखाद्याचा कंडोम करणे हे तर शरद पवार यांच्या अंगवळणी पडलेले, जे मी पण स्वतः अनुभवले आहे मात्र यापुढे पवारांचे सत्तेत येणे दूरदूरपर्यंत दिसत नसल्याने निदान कंडोम होणे खासदार अमोल कोल्हे यांच्या ते नक्की नशिबी येणार नाही अन्यथा जे भुजबळ आडनावाच्या माळ्याचे पवारांनी ते सारे सत्तेत असतांना करून ठेवले होते तेच अगदी नक्की अमोल कोल्हे यांच्याही बाबतीत शंभर टक्के घडले असते कारण पुढे जाणाऱ्यांचा कंडोम करणे पवारांना अजिबात अजिबात नवीन नाही....
आज जे अमोल कोल्हे करताहेत तेच कधीकाळी समता परिषद स्थापन केलेल्या श्री छगन भुजबळ यांचे झालेले होते, समता परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सभांना जेव्हा राज्यात व राष्ट्रांतही प्रचंड गर्दी व्हायला लागली त्यानंतर काहीच दिवसात भुजबळ यांचे राजकीय आयुष्य असे काही बेचव केल्या जाऊ लागले कि विचारू नका, पण राजू श्रीवास्तव च्या विनोदी भाषेत सांगायचे झाल्यास आता शरद पवारांचा म्हातारा गब्बर झाल्याने अगदी शंभर टक्के खासदार अमोल कोल्हे यांचा शोले मधला विजू खोटे होणार नाही त्यांचा क्षणार्धात यापुढे राजकीय खात्मा होणार नाही. पवार करूच शकणार नाही. मित्रहो, राज्य कसे लुटल्या जाते हे आमच्यासारख्या शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना अगदी जवळून बघायला मिळत असते, तसे पुरावेही आमच्याकडे असतात, शरद पवार व त्यांच्या विचारांच्या नेते मंत्री अधिकारी झालेल्यांच्या हाती हे राज्य आले आणि आपली मराठीची येथील जनतेची, सामान्य लोकांची अक्षरश: विकासाच्या नावाने वाट लागली, एवढे खात्रीपूर्वक
सांगतो, आर्थिकदृष्ट्या मोठे झालेत ते दलाल, मूठभर नेते आणि अधिकारी...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी
No comments:
Post a comment