Wednesday, 21 August 2019

द्रौपदी बावनकुळे : पत्रकार हेमंत जोशीद्रौपदी बावनकुळे : पत्रकार हेमंत जोशी 
जसे समुद्रमंथन पुराणात घडले त्याची पुनरावृत्ती पुन्हा एकवार महाराष्ट्रात झाली आहे घडलेली आहे. दिवंगत प्रमोद महाजन दिवंगत गोपीनाथ मुंडे दिवंगत अटलबिहारी वाजपेयी शरद पवार नरेंद्र मोदी आणि अमित शाह नितीन गडकरी व मोहन भागवत सारे देवाने एका खलबत्त्यात कुटले त्याचे एक अद्भुत रसायन तयार केले रसायन तयार झाले त्या रसायनाचे नाव आहे देवेंद्र फडणवीस. त्यांना ज्यांनी जवळून बघितले आहे जवळून अनुभवले आहे त्या सर्वांना जर विचारले देवेंद्र फडणवीस कसे आहेत उत्तर हत्ती आणि चार आंधळे कथेपद्धतीने येईल, जे सांगणारे असतील, ते वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर देतील, कोणाला फडणवीसांमध्ये मुंडे दिसतील तर कोणाला महाजन कोणाला त्यांच्यात थेट शरद पवार दिसेल त्यांच्या पुढे ते बेरकी वाटतील तर काहींना ते भाषणप्रभू वाजपेयी वाटतील काहींना त्यांच्यात नरेंद्र मोदी संचारलाय वाटेल तर काही म्हणतील ते या राज्यातले अमित शाह आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून काहींना ते आजवरच्या सरसंघचालकांची नक्कल करताहेत वाटेल तर काहींना वाटेल फडणवीसांचा पार अमित शाह झाला आहे, त्यांना देशापुशे जणू भीती अशी कोणाची वाटतच नाही. फडणवीस म्हणजे राजकारणातले आजचे गोविंदा आहेत, गोविंदाने विविध मान्यवर नटांची बेमालूम नक्कल केली आणि सिनेमात प्रथम क्रमांकाची आघाडी घेतली. फडणवीस देखील हे असेच, त्यांनी वर उल्लेख केलेल्या नेत्यांचे गुण जणू अवगत केले काहींचे काही अवगुण बाजूला ठेवले मग तयार झाले एक हादरवून सोडणारे अजबगजब राजकीय रसायन नेते देवेंद्र....

नागपुरातले म्हणजे नागपुरात होते तोपर्यंतच देवेंद्र म्हणजे सार्या नागपूरकरांना आवडणारे ग्राईपवॉटर चे गुटगुटीत आनंदित बाळ जे बोलके होते कट्टर संघाचे होते सर्वांचे लाडके होते, देवेंद्र संघाचे कट्टर होते पण त्यांचे राजकीय संबंध नागपूर शहरात त्यावेळी सर्वांशी अत्यंत सलोख्याचे असल्याने फार लहान वयात नगरसेवक झाले, महापौर देखील झाले, पुढे आमदार झाले, प्रदेशाध्यक्ष झाले तोपर्यंत देखील फडणवीसांचे नेतृत्व हे असे एकदम उफाळून वर येईल इतरांचे सोडा त्यांच्या आईला किंवा पत्नीला देखील वाटलेले नसावे पण त्यांच्यातला अर्जुन ओळखला होता फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांनी म्हणून गोपीनाथ मुंडे अचानक गेल्यानंतर मला फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करायचे आहे त्यांनी संघ भाजपा वर्तुळात सांगून टाकले. नेमकी देश प्रेमी माणसे ओळखावीत ती मोदी यांनीच, फडणवीसांचा त्यानंतरचा फक्त पाच वर्षांचा राजकीय प्रवास व इतिहास कसा खतरनाक, आपण सारेच बघतो आहे, अनुभवतो आहे. शरद पवार देखील एखाद्याला घाम फोडायचे पण त्यात पाप असायचे व्यक्तिगत स्वार्थ असायचा, पवारांमध्ये शिवाजी महाराज कमी दाऊद अधिक डोकवायचा. हेही घाम फोडतात, पण त्यांचे एखाद्याला घाम फोडणे राज्य किंवा राष्ट्र हितासाठी असते. एक नक्की सांगतो, फडणवीसांचे एक बरे आहे कि त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक किंवा राजकीय तरतूद त्या शरद पवारांसारखी करून ठेवायची नसल्याने त्यांचा पवारांसारखा राजकीय कचरा किंवा राजकीय खात्मा कधीही होणार नाही...
www.vikrantjoshi.com

पांडवांवरून जसा तीक्ष्ण नजरेचा एकाग्र शूर पराक्रमी अर्जुन फडणवीसांवरून आठवला, लगेच पाच पांडवांची पत्नी द्रौपदी देखील नजरेसमोर तरळली. द्रौपदीला पाच पाच पती होते तरी तिने स्वतःची फजिती करवून घेतली कधी वाचण्यात आलेले नाही ती एकाचवेळी 
पाचही पांडवांचा आदर करायची त्यामुळे त्या पाचही पांडवांचे द्रौपदीवर अतोनात प्रेम होते. राज्याचे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री, नागपूरचे पालक मंत्री, राज्याचे सर्वाधिक लाडके लोकप्रिय लोकमान्य मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे त्या द्रौपदीच्याच रांगेतले. पुरुषांमधले ते द्रौपदी यासाठी कि ते सांभाळत असलेली राजकीय कसरत सर्कस तुम्हाला एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालायला लावणारी. मी त्यांचे सखेसोबती विद्यावाचस्पती विश्वास पाठक यांना म्हणालो देखील कि बघा जेव्हा केव्हा देवेंद्र दिल्लीत निघून जातील येथे या राज्यात जसे मुख्यमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील किंवा गिरीश महाजन यांच्या नावाची चर्चा असेल त्यात चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव शंभर टक्के आघाडीवर असेल कारण बावनकुळे यांचे वागणे, आठवण करून देणे त्या द्रौपदीसारखे. ज्या तिघांच्या शब्दाला भाजपामध्ये मान आहे ज्यांच्या हाती आजची राज्यातली भाजपा आहे ते तिघेही म्हणजे मोहन भागवत, नितीन गडकरी आणि अर्थात देवेंद्र फडणवीस, मुका घ्या मुका असे त्यांना सांगितल्या गेले कि ते या बावनकुळेंना पटकन कडेवर उचलून घेतात आणि पटापट लाड करून मोकळे होतात...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असे असते कि एकदा का तुम्ही संघ वर्तुळातून सत्तेच्या म्हणजे भाजपा वर्तुळात सामील झालात कि संघाच्या अंतर्गत कामकाजात तुम्हाला काहीही करता येत नाही फक्त एक स्वयंसेवक म्हणून संघाने दिलेले आदेश कमालीची गुप्तता पाळून पार पाडायचे असतात. संघाबाहेर असे कधीही ऐकू येत नाही कि आजच मातोश्रीवर जाऊन आलो आणि दक्षिणा ठेवून आलो. सेनेत मात्र हे मोठ्या फुशारकीने दुर्दैवाने सांगितले जाते. तीन अति प्रचंड ताकदीचे पण एकमेकांच्या मांडीवर न बसलेले नेते. भागवत, फडणवीस व 
गडकरी. या तिघांचेही आदेश तर पाळावे लागतातच पण त्याचवेळी हे आदेश पाळतांना तिघातला एकही नाराज होणार नाही याची मोठी काळजी घ्यावी लागते. कमाल आहे बावनकुळे यांची, रिअली, त्या द्रौपदीनंतर हे एकमेव. बावनकुळे यांनाच हि कठीण सर्कस सांभाळता आली. अतिशय कठीण असे हे काम होते, आहे. पण चंद्रशेखर, असा आवाज द्यायचा अवकाश, बावनकुळे जेथे कुठे असतील तेथून धावत गेले नाहीत भेटले नाहीत त्यांनी टाळले असे कधीही घडले नाही आणि घडणार देखील नाही. विनम्रता त्यांच्यातला प्लस पॉईंट आहे. त्या तिघांत या कानाचे त्या कानाला कळू न देता तिघांची मर्जी संपादन केली, विश्वास संपादन केला मंत्री बावनकुळे यांनी. कमाल केली. पुराणात एकच रामभक्त' हनुमान ' होता, येथे मात्र एकाचवेळी तिघांनाही वाटते आमचा हनुमान चंद्रशेखर आहे. असे क्वचित खचित घडते, कधीकाळी अतिशय सामान्य वकूब असलेला गडकरींचा हा कार्यकर्ता, आज तीन तीन दिग्ग्जच्या गळ्यातला ताईत बनतो कारण बावनकुळेंना सकारात्मक पद्धतीने वागायचे आहे, काम करायचे आहे ज्याचे सुदैवाने भागवत, फडणवीस व गडकरी तिघांनाही वावडे नाही...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

No comments:

Post a comment