Monday, 19 August 2019

महाजन महाआरोग्याचे महामेरू : पत्रकार हेमंत जोशीमहाजन महाआरोग्याचे महामेरू : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे आलेले प्रलय त्यामुळे बिघडलेले आरोग्य बिघडलेले मनःस्वास्थ्य, जीवाची शरीराची वयाची पदाची मृत्यूची आयुष्याची अपघाताची कशाचीही चिंता पर्वा काळजी न करता राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री श्री गिरीश महाजन यांनी थेट महापुरात उडी घेऊन अडकलेल्यांना केलेले सहकार्य ज्याचे थेट जाहीर कौतुक त्यांचे कट्टर राजकीय विरोधक एकनाथ खडसे यांनीही केले, त्या महा महाजनांची जबाबदारी आता अधिक वाढलेली आहे, राज्यात मराठवाडा वगळता आलेले महापूर, त्यातून लोकांचे बिघडलेले आरोग्य, काळजी करू नका, जेथे आर्थिक ऐपत नसलेल्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे, त्यांनी थेट गिरीश महाजन यांच्या बंगल्यात रामेश्वर नाईक जे महाआरोग्य शिबीरांचे तेथून अतिशय नियोजनपूर्वक कार्यालय थाटून आहेत, संपर्क साधावा, समाधान शंभर टक्के होईल, खात्रीने सांगतो...

अर्थात रामेश्वर नाईक म्हणाल तर महाजनांचा पीए म्हणाल तर सखा सोबती, अख्खे कुटुंब घेऊन महाजनांच्या महाकार्यात वाहून घेणारे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील सूक्ष निरीक्षण करून तोंडात बोटे घालावीत त्यापलीकडे गिरीश महाजन यांनी स्टेप बाय स्टेप महाआरोग्य शिबिराचे आणि रुग्णसेवेचे उभारलेले हे महाजाल महाजाळे जेथे ऐपत नसलेल्या रुग्णांनी थेट शिरावे आणि आपले आयुष्य वाचवावे असे हे आरोग्य निर्वाण महाकेंद्र, निदान महाजनांच्या कार्याला तरी देशाने सत्तेतील मंडळींनी असतील नसतील ते सारे अवॉर्ड्स रिवर्ड्स देऊन त्यांचे देशभर कौतुक करून मोकळे व्हावे, त्यापलीकडे जाऊन मी तर संघाला, भाजपाला हे सांगतो, त्यांनी महाजन राबवित असलेले हे महाआरोग्य शिबिराचे महाकार्य देशभरात कसे पसरेल ते बघावे, बिघडलेले आरोग्य हि आपल्यासमोर असलेली मोठी समस्या आहे, मोठी अडचण आहे, ती निदान सर्वसामान्यांच्या नजरेतून तरी या राज्यापुरती गिरीश महाजन आणि त्यांच्या टीमने सोडविलेली आहे पण हे ' महाआरोग्य शिबीर मिशन ' आणखी मोठे व्हायलाच हवे, देशभर पसरायलाच हवे, संघ भाजपाकडे वेळ नसेल तर त्यांनी कायमस्वरूपी हि जबाबदारी महाजन व त्यांच्या टीमवर सोपवावी, त्यांनी मोठे काम केले नक्की निश्चित म्हणता येईल...

www.vikrantjoshi.com

मंत्रालयासमोर जे आमदारांचे निवासस्थान आहे त्यातल्या जवळपास १७-१८ रूम्स राज्यातल्या विविध आमदारांनी प्रसंगी आपली आपल्या कार्यकर्त्यांची होणारी अडचण फजिती सहन करून तेही अतिशय उत्स्फूर्तपणे महाजन आणि त्यांच्या टीमकडे बहाल केल्या आहेत, आपल्या मतदारसंघातील सामान्य गरीब रुग्णांच्या कायम समस्या सोडविणार्या गिरीश महाजन यांच्यासाठी हे एवढे करणे आमचे एकप्रकारे कर्तव्य होते हे असे उदगार आपल्या खोल्या ज्यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत त्या महाजन यांच्याविषयी अगदी जाहीर काढतात, या आमदारांच्या किंवा राज्यातल्या साऱ्याच आमदारांच्या सर्वसामान्य गंभीर रुग्णांना कायमस्वरूपी दिलासा मिळाल्याने हे असे घडले, असे म्हणता येईल. दररोज रामेश्वर नाईक त्याचे कुटुंब व टीम, राज्याच्या विविध भागातून त्यां १७-१८ रूम्स मध्ये जे रुग्ण वास्तव्याला उपचारांना आलेले असतात, त्यांच्या दोन्ही वेळेच्या जेवणाचे आणि उपचाराचे जे नियोजन करतात, सर्व समाजसेवकांनी देखील येथे नतमस्तक व्हावे, घरात जरी एखादा गंभीर रुग्ण असेल तरी नाक मुरडणारे आम्ही,काय हो देणे घेणे महाजन आणि त्यांच्या त्या चमूला, पण जाऊन तर बघा तेथे तुम्ही प्रत्यक्ष, तोंडात बोटे घालाल, कौतुकाने तुमचे नयन भरून येतील...

गिरीश महाजन यांच्या महाआरोग्य शिबिराला त्यातून येथे मुंबईत येणाऱ्या अनेक रुग्णांना बरे करून घरी पाठवायचे म्हणजे खर्च मोठा होतो पण त्यांना तुमचे पैसेही नकोत, फारतर शुभेच्छा द्या किंवा देणगीच्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तू देऊन मोकळे व्हा, त्यांना तेवढे पुरेसे आहे कारण सारेकाही रुग्णांवरच खर्च व्हायचे आहे, आधीच्या सत्तेतल्या मंडळींसारखे त्यांचे नाही कि टाळूवरचे लोणी खाऊन मोकळे व्हायचे आहे. महाराष्ट्र शासन किंवा राज्यातले दानशूर उद्योजक महाजनांच्या पाठीशी अगदी उघड उभे आहेत कारण सारे काही क्रिस्टलक्लिअर आहे, फक्त व फक्त महाजनांचा त्यांच्या चमूचा हा संघर्ष सर्वसामान्य रुग्णांसाठी सुरु आहे, त्यात जात पात पक्ष असे काहीही नाही, जावे आणि रामेश्वर नाईक यांना महाजनांच्या मलबार हिलवरील बंगल्यावर थेट गाठावे तुमचे काम होते, रुग्णसेवेला लगेच प्रारंभ होतो. त्याशिवाय राज्याच्या विविध भागात ज्या पद्धतीने महाआरोग्य शिबिरे सतत कायम भरविण्यात येतात, एक शिबीर तर थेट अण्णा हजारे यांच्या अंगणातच नाईक व महाजन यांनी जेव्हा भरविले, उगाच नाही एरवी नेत्यांच्या बाबतीत अति काटेकोर सावध बोलणारे अण्णा हजारे या चमूच्या प्रेमात पडून जाहीर कौतुक करून मोकळे झाले. ते या महाआरोग्य शिबिराचे व महाजन टीमचे तेव्हापासून फॅनक्लब मेम्बर झाले 
आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांना आपल्या या मित्राला अगदी उघड सहकार्य करतांना, कशाचंही चिंता नसते, संशय येत नाही कारण सारेकाही राज्याच्या भल्यासाठी गिरीश महाजन करताहेत, त्यांचे हे कार्य जातीने बघायला हवे, आपण देखील त्यात सामील व्हायलाच हवे...

टीका करणे आम्हा पत्रकारांचे ते कर्तव्य आहे पण जेव्हा सामान्य जनतेविषयी राज्यात काही चांगले घडते तेव्हा त्यांच्यापर्यंत हे सारे पोहोचायलाच हवे. रामेश्वर मला म्हणाले, जेव्हा आपली मोठी कमाई, प्रॅक्टिस बाजूला ठेऊन प्रसंगी स्वतःच्या खर्चाने हेलिकॉप्टर घेऊनही जेव्हा राज्यातले मुंबईतले डॉ. पंड्यासारखे नामवंत तद्न्य डॉक्टर्स आमच्या या उपक्रमाला वाहून घेतात, डोळ्यात आनंदाश्रू तरळतात, माझे नशीब आहे कि मी आजारी पडलो, महाजनसाहेबांनी मला त्यातून बाहेर काढले आणि मी व माझे अख्खे मोठे कुटुंब महाजनमय व फडणवीसमय झाले. हेही सांगतो, फडणवीसाहेब हे मोठ्या मनाने विश्वास ठेवून आमच्या पाठीशी ज्यापद्धतीने उभे राहिले, आमचे काम अतिशय सोपे झाले....
क्रमश: हेमंत जोशी

No comments:

Post a comment